महिला दिन विशेष

आश्मीन मुंजाल,  कॉस्मेटोलॉजिस्ट

*  गरिमा पंकज

आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतून २५ वर्षांपूर्वी आश्मीन मुंजाल यांनी ‘आश्मीन ग्रेस’ नावाचे पार्लर सुरू केले. हळूहळू महिलांना ते आवडू लागले आणि त्यामुळेच पार्लरचा विस्तार होत गेला आणि पहिल्या मजल्यावरील इतर खोल्यांमध्येही पार्लरचे काम सुरू झाले. ८ वर्षांनंतर प्रथमच साऊथ एक्सच्या कमर्शिअल मार्केटमध्ये त्यांनी पार्लर उघडले आणि त्याला ‘आश्मीन मुंजालस अंपायर ऑफ मेकओव्हर’ असे नाव दिले,  मागणी वाढत गेली आणि लोक युनिसेक्स सलूनची मागणी करू लागले. त्यावेळी त्यांनी ‘स्टार सलून प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने स्वत:ची कंपनी नोंदणीकृत केली,  जिथे त्या कंपनीच्या संचालक होत्या आणि इतर भागीदार होते. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी स्टार सलूनमध्ये ‘स्टार अकॅडमी’ सुरू केली,  जिथे लोकांना सुंदर बनवण्याचे शिक्षण दिले जाऊ लागले. अशाप्रकारे, केवळ एका खोलीतून सुरू झालेले पार्लर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सलून बनले.

आश्मीन मुंजाल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते कौशल्य विकासासाठी पुरस्कार मिळाले. उपराष्ट्रपती एम. वैकय्या नायडू यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना महिला सक्षमीकरणासाठीही पुरस्कार मिळाले आहेत. सुषमा स्वराज पुरस्कारही मिळाला आहे. मेकअप आणि सौंदर्य क्षेत्रात अनेक ऑल इंडिया एक्सलन्स पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

आश्मीन मुंजाल मानतात की, जीवनात वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे करिअर घडत राहील. पैसा आणि प्रसिद्धीही येत-जात राहील. तुमची आवडही कधी ना कधी जोपासता येईल, पण तुमच्या मुलांचे बालपण मात्र कधीच परत येणार नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे बालपण आनंदाने अनुभवा. त्यांना पूर्ण वेळ द्या,  नाहीतर येणारी अपराधीपणाची भावना भविष्यात तुम्हाला तुमच्या यशाचा आनंद घेऊ देणार नाही.

या क्षेत्रात महिलांची प्रगती कशी होईल?

जर तुमची आवड लोकांना सुंदर बनवण्याची असेल तर तुम्ही पार्लर उघडले नाही तरी तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आज इन्स्टाग्राम, फेसबुक, गुगल, जस्ट डायल इत्यादी गोष्टी आहेत, ज्याद्वारे सर्व काही फोनवर उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त ब्युटी किट आणि इतर पार्लर प्रसाधनांसाठी थोडीफार गुंतवणूक करावी लागेल. बाकी तुम्ही सर्व काम तुमच्या घरातूनच व्यवस्थापित करू शकता. वेगळे दुकान असण्याची विशेष गरज नाही. ग्राहकांना तुमचा पत्ताही मोबाईलवरच मिळेल. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व कामं खूप सोपी झाली आहेत. त्यामुळे महिलांना घरून काम करणे सोपे आहे. तसेही, आजकाल लोकांमध्ये छान तयार होण्याची आणि सुंदर दिसण्याची खूप क्रेझ आहे. हेअरस्टाईल करणं असो किंवा मेकअप करणं असो,  महिला पार्लरमध्ये येतच असतात.

एखादी महिला सक्षम कशी होऊ शकते?

तुम्हाला स्वत:ला जे बनायचे आहे ते तुम्ही बनता. जर तुम्ही स्वत:ला बिचारी, कमककुवत महिला म्हणून पाहात असाल किंवा तसा विचार करत असाल तर तुम्ही तशाच बनाल, पण जर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. जोपर्यंत तुमचा स्वत:वर विश्वास नाही की तुम्ही अमुक एक गोष्ट करू शकता, तोपर्यंत तुम्ही ती कशी करू शकाल? प्रत्येक महिलेच्या आत शक्ती आणि ऊर्जा असते. ही शक्ती फक्त तुमच्यात आहे. ती कोणत्या मार्गाने वळवायची, हे देखील तुमच्याच हातात आहे.

पुढे जाण्यासाठीची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

माझ्या आईने मला नेहमीच खूप पाठिंबा दिला. ती एक नोकरदार महिला होती. दिल्ली पोलिसात इन्स्पेक्टर होती. तिने आयुष्यभर काम केले आणि कुटुंब तसेच तिच्या नोकरीत समतोल साधला. पुढे ती पोलीस स्टेशनची प्रभारी झाली. अनेकदा ती वुमन क्राइम सेलची प्रभारी होती. अनेक कठीण जबाबदाऱ्या तिने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. या सोबतच तिने आपल्या तीन मुलांचे संगोपन करणे, नातेवाईकांशी संपर्क ठेवणे, प्रवास करणे इत्यादी सर्व काही व्यवस्थित केले. त्यामुळेच आई माझी प्रेरणा झाली. तिने मला नेहमी शिकवले की, तू लग्न केलेस आणि मूल झाले तरी तू स्वावलंबी होण्यासाठी, स्वत:साठी काहीतरी केलं पाहिजेस.

स्मार्ट किचन मॅनेजमेण्ट टिप्स

* लतिका बत्रा

किचन घराचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. तेथील व्यवस्था पाहून लक्षात येतं की तुम्ही किती कुशल गृहिणी आहात. जर तुम्ही नोकरदार महिला असाल तर तुम्हाला दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. ज्याप्रकारे तुमच्याकडून कार्यालयात उच्चस्तरीय व्यवस्थापनाची अपेक्षा केली जाते, अगदी त्याच प्रकारचं कौशल्यपूर्ण कार्य ‘किचन मॅनेजमेण्ट’साठीही अपेक्षित असतं.

नोकरदार महिलांसाठी वेळेचा अभाव एक खूप मोठी समस्या असते. अशावेळी किचन मॅनेजमेण्ट संदर्भातील या टिप्स लक्षात घेतल्यात तर सर्व समस्या चुटकीसरशी दूर होतील :

* तुमचं किचन मोड्यूलर असो वा पारंपरिक, ते कायम स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा.

* सामान व्यवस्थित डब्यात ठेवा, तसेच प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा ठरवा. असं केल्यास वस्तू शोधण्यात वेळ वाया जाणार नाही.

* जो डबा वा बाटली तुम्ही काढाल, तो वापरानंतर ताबडतोब स्वच्छ करूनच परत ठेवा. हे काम चुकूनही उद्यावर ढकलू नका, कारण उद्या कधीच येणार नाही आणि स्वच्छतेचं हे काम अपूर्ण राहून तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी बनेल.

* झाडलोट करण्यासाठी पेपर किचन नॅपकिनचा वापर करा. यामुळे कापडी किचन टॉवेल धुवून सुकवण्याच्या त्रासातून सुटका मिळेल.

* किचनमध्ये ज्या ज्या वस्तू संपतील त्या किचनमध्ये ठेवलेल्या डायरीत नोंदवत जा. यामुळे रेशनची लिस्ट बनवणं सोपं होईल.

* डाळी, मसाले तसंच अन्य वस्तूंसाठी तुम्ही कितीही डबे वगैरे घेऊन आलात, तरी थोडं थोडकं सामान पिशव्या व पुड्यांमध्ये ठेवलेलं असतंच. त्यामुळे या सामानासाठी एक वेगळा कप्पा निश्चित करा तसंच उघड्या पिशव्यांचं तोंड नीट बंद करून कपडे सुकवण्यासाठी वापरात आणले जाणारे चिमटे त्यावर लावा. यामुळे सामान कप्प्यात पसरणार नाही.

* आवश्यक तितंकच रेशन किचनमध्ये ठेवावं. विनाकारण सामानाचा संचय करू नये.

* सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची भाजी खरेदी करून व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवा. काही भाज्या तुम्ही कापून व सोलून झिप बॅगमध्ये स्टोर करू शकता.

* अलीकडे सहज उपलब्ध फ्रोजन स्नॅक्सची काही पाकिटं आणून नक्की ठेवा. वेळीअवेळी येणाऱ्या पाहूण्यांचं स्वागत तुम्ही योग्य व कमी वेळात करू शकाल.

* सकाळी नाश्त्यामध्ये आणि ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं ते आधीच ठरवून घ्या. त्यासाठी आवश्यक साहित्य आहे किंवा नाही हेसुद्धा तपासून पाहा, नाहीतर तुम्ही भजी बनवायला घ्याल पण घरात बेसणच नसेल.

* दररोज जेवण बनवण्यापूर्वी कांदा, लसूण, टॉमेटो, आलं कापण्यावाटण्याच्या झंझीटापासून वाचण्यासाठी प्यूरीचा वापर करा. २५० ग्रॅम लसणीमध्ये १०० ग्रॅम आलं तसंच पाव कप व्हिनेगार मिसळून वाटून घ्या. प्यूरी तयार होईल. ती फ्रीजमध्ये ठेवा. मग आवश्यकतेनुसार वापरा. टोमॅटो प्यूरीसाठी एक किलोग्रॅम टोमॅटो, २ मोठे कांदे, ८ ते १० लसूण पाकळ्या, थोडीशी लवंग आणि मोठी वेलची व एक तुकडा दालचिनी एकत्र करून कुकरमध्ये व्यवस्थित शिजवा. मग वाटून गाळून एअरटाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. रसदार असो वा सुकी भाजी या प्यूरीचा वापर करा, चविष्ट भाजी क्षणार्धात तयार होईल.

* हे काम लवकर आटपण्यासाठी आपलं किचन हायटेक बनवा. बाजारात उपलब्ध अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरुन तुम्ही वेळेची बचत करू शकता तर दुसरीकडे निरनिराळे पदार्थही लवकर बनवून आपल्या पाक कलेचं उत्तम सादरीकरण करू शकाल. या उपकरणांचा सांभाळही योग्य प्रकारे करा. वापरानंतर ताबडतोब स्वच्छ करून ठेवा.

* जर तुमच्याकडे ओवन, मायक्रोवेव्ह, फूड प्रोसेसर, राइस कुकर इंडक्शन स्टोव्ह, इलेक्ट्रिक तंदूले यासारखी उपकरणं नसतील तर ती एक-एक करून खरेदी करा वा हफ्त्यांवरही घेऊ शकता. तुमच्यावर जास्त आर्थिक बोजा पडणार नाही. जन्मदिवस असो वा लनाचा वाढदिवस असो, पतीकडून कपडे, दागिने भेटवस्तू घेण्याऐवजी किचनमधील आपलं काम सोपं करणाऱ्या अशा उपकरणांची मागणी करा. निश्चितच ही उपकरणं दागिने, कपड्यांहून अधिक उपयुक्त ठरतील.

* किचन आवरूनच बाहेर पडा. सर्व वस्तू जागेवर ठेवा. कार्यालयातून परतल्यावर स्वच्छ किचन पाहून तुम्हाला खूप समाधान मिळेल.

* किचनमध्ये किटकमुंग्या होऊ नयेत म्हणून वेळोवेळी पेस्ट कंट्रोल जरूर करा. अलीकडे हर्बल पेस्ट कंट्रोल करण्याचीही पद्धत आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें