परदेशी शहरं हिवाळी पर्यटनासाठी स्वस्त अन् मस्त

– प्रतिनिधी

जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. वेगवेगळी विचारधारा आणि पध्दतीचे काही लोक आपलं जीवन निमूटपणे व्यतित करतात. तर काही लोक असेही असतात, ज्यांना केवळ फिरायची आवड असते. अशा प्रकारचे लोक नेहमी संधीच्या शोधात असतात की कधी त्यांना संधी मिळेल आणि कधी ते कुठे फिरायला जातील.

परंतु या सर्वांमध्ये जेव्हा अनेकदा आपण परदेशी पर्यटनाचा विचार करतो, तेव्हा मनात पैशांचा विचार येतो आणि आपण पैशांचं तोंड पाहत राहतो व पैसा खर्च होईल या भीतिने आपण आपला प्लॅन रद्द करतो, पण आता आम्ही आपल्याला सांगतोय की आपणही परदेशी पर्यटनाला जाऊ शकता, तेसुद्धा कमी खर्चात…विश्वास बसत नाहीए ना तुमचा?

तर आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की आता आपण या टेन्शनला निरोप द्या. कारण आपण परदेश यात्रा करू इच्छितो असाल आणि पैसाही समस्या असेल तर आम्ही आपणास  काही शहरांविषयी सांगू इच्छितो, जिथे जाऊन राहणे, खाणे, फिरणे आणि शॉपिंग करणे खूप स्वस्त आहे, परंतु आपल्याला तिथे प्रवासाला जायचं असेल, तर थंडीचा मोसम आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

सेन मिगुएल डे अल्लेन्डे, मॅक्सिको

मॅक्सिकोमध्ये सेन मिगुएल डे अल्लेन्डे खूप सुंदर शहर आहे. नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाण चांगले व स्वस्त सिध्द होऊ शकते. कारण सुरुवातीला वातावरण कोरडे असते. त्यामुळे इथे सूर्य आणि वातावरणाबाबत विचार न करता, आरामात आपण फिरायला जाऊ शकता आणि शहरातील सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.

पॅरिस, फ्रांस

पर्यटकांच्या लिस्टमध्ये पॅरिस सर्वात वरती असतं. परंतु उन्हाळ्यात इथे गर्दीमुळे पर्यटकांना कम्फर्ट झोन कमी मिळतो. तरीही लोकांना इथे जायला आवडतं. थंडीच्या काळात हे ठिकाण खूप कूल असतं. शॉपिंग आणि मौजमस्ती करणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे.

काबो सान लुकास, मॅक्सिको

काबो सान लुकास शहरही मॅक्सिकोमध्ये थंडीच्या सुट्टीच्या काळात फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. अशावेळी इथे जास्त गर्दी होण्यापूर्वी आणि वस्तूंच्या किंमती वाढण्यापूर्वी आपण थंडी संपवण्याच्या आत इथे जाऊ शकता. काबोमध्ये आपल्याला मासे पकडणे आणि व्हेल मासा पाहण्याचा गोल्डन चान्स मिळेल.

रिओ डे जेनेरो, ब्राझिल

थंडीच्या महिन्यांत इथे गेल्यावर स्वर्गसुख मिळते. ब्राझिलमध्ये हा एकप्रकारे वसंताचा काळ आहे. अशा वेळी जे लोक जास्त थंडीत फिरायचं टाळतात, अशा लोकांसाठी या मोसमात इथे फिरणे स्वस्त आणि सर्वात चांगले ठरेल. पर्यटकांना इथे समुद्रकिनारी वेळ घालवायला खूप आवडतं.

फोएनिक्स, एरिजोना

पर्यटनासाठी एरिजोनातील हे शहरही खूप चांगले आहे. यावेळी येथील तापमान गरमीच्या तुलनेत खूप कमी होते. त्यामुळे इथे दक्षिण-पश्चिमी शहराच्या पायी प्रवासाने अनोखी दृश्ये पाहायला मिळतील. इथे पर्यटक गोल्फसारखे आउटडोर गेमही खेळू शकतात.

रेकाजाविक, आइसलँड

अमेरिकेतून युरोपच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या पर्यटकांसाठी रेकाजाविक, आइसलँड एक लोकप्रिय आणि सुंदर स्टॉपओव्हर ठिकाण आहे. रेकाजाविक एक मनोरंजक शहर आहे, जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. इथे स्वस्त उड्डाणाची मजा घेण्याबरोबरच बरीचशी प्रेक्षणीय स्थळेही पाहायला मिळतील.

ऑरलँडो फ्लोरिडा

फ्लोरिडाच्या ओरलँडो शहरात नोव्हेंबरमध्ये तापमान खूप सामान्य असते. पर्यटकांना इथे गरम मोसमाची जाणीव होईल. त्यामुळे सुट्ट्या घालवण्यासाठी हा काळ एकदम परफेक्ट आहे. सुरुवातीला गर्दी कमी असल्याने वस्तू स्वस्त असतात. अशा वेळी आपण येथील डिद्ब्रानी वर्ल्ड पार्कसारख्या ठिकाणी आरामात मस्ती करू शकतात.

पाम स्प्रिंग्स, कॅलिफोर्निया

कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्स शहरही खूप शानदार आहे. लॉस एन्जिल्सपासून एका छोट्याशा ड्राइव्हने इथे जाता येईल. इथे गेल्यानंतर जगापासून दूर एका वेगळ्याच शांतीचा अनुभव येतो. शांतिपूर्ण रेगिस्तान शहरात हॉटेल, रिसॉर्ट्स आणि भाड्याच्या घरांत नोव्हेंबर महिन्यात चांगला वेळ घालवता येईल.

बार्सिलोना, स्पेन

स्पेनचे बार्सिलोनाही जगातील स्वस्त आणि चांगल्या शहरांपैकी एक आहे. इथे समुद्रात डुबकी मारण्याची एक वेगळीच मजा आहे. अर्थात, आपल्याला या मोसमात समुद्रात डुबकी मारायची इच्छा नसेल, तरीही इथे फिरण्यासाठी खूप सारी इतर ठिकाणेही आहेत. अलमुडेना गिरजाघर चर्च त्यापैकीच एक आहे.

बँकॉक, थायलँड

थायलँडच्या बँकॉक शहरातही फिरण्यासाठी थंडीचा महिना चांगला आहे. या मोसमात इथे हलकं ऊन पडतं. एवढंच नव्हे, येथील उड्डाणेही बऱ्यापैकी स्वस्त असतात. त्यामुळे सुट्टीच्या काळात इथे फिरण्याची एक वेगळीच मजा आहे.    निळ्या समुद्राचं सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकतं.

टॅ्व्हल सिकनेसपासून बचाव

– डॉ. शिखा शर्मा,

 प्रिमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

प्रवासादरम्यान तब्येत बिघडण्याला टॅ्व्हल सिकनेसही म्हणतात. ही फारच अनियमित अवस्था असते, जी आपले पूर्णपणे खच्चीकरण करते. प्रवासात होणारा हा त्रास कोणालाही होऊ शकतो. त्यातही स्त्रिया आणि ३ ते १२ वर्षांच्या मुलांना हा त्रास जास्तच प्रभावित करतो.

टॅ्व्हल सिकनेस कानाच्या आतल्या भागाला अस्वस्थ करणारा प्रभाव असतो, जो वारंवार होणारी हालचाल जसं की समुद्राच्या लाटा, रिक्षाचा आवाज, विमान उडणं इत्यादीमुळे होते. तुमच्या नजरेला जे दिसते त्याचे तरंग कानांच्या आतल्या भागांपर्यंत जाणवतात, आणि मग ते मेंदूला संदेश पाठवतात आणि समस्या निर्माण करतात.

टॅ्व्हल सिकनेसची लक्षणं
मळमळणे, त्वचा पिवळी पडणे, घाम सुटणं, उलट्या येणं, चक्कर येणं, डोकेदुखी, थकवा जाणवणं इत्यादी.

टॅ्व्हल सिकनेसची कारणं

प्रवासादरम्यान होणाऱ्या या समस्येचं सर्वात मोठं कारण हे आहे की हे न्यूरोटॉक्सिनच्या विरूद्ध मानसिक सुरक्षेच्या रूपात उत्पन्न होतं. तुमच्या शरीराचा जो वेग असतो, तुमचा मेंदू त्याची ओळख संवेदनात्मक ग्रंथींच्या ३ वेगवेगळ्या भागांद्वारे कानांचे आंतरभाग, डोळे आणि शरीराच्या खोल पेशींद्वारे करतो. उदाहरणार्थ जर डोळे मेंदूला हे सांगतात की व्यक्ती थांबलेला आहे याउलट वॅस्टिबुलर फ्रेमवर्कमध्ये डोक्याच्या हालचालींची माहिती होते तेव्हा ते मेंदूला संदेश देऊन भुरळ देतात आणि प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या समस्येची जाणीव करून देत. कानाच्या आतील भागांद्वारे अशा हालचालींची अनुभूती न झाल्यास प्रवासादरम्यान होणारा त्रास होत नाही आणि यावरूनच कळतं की प्रवासात होणारा त्रास वाढण्यासाठी कानाचे अंतर्गत भाग प्रमुख भूमिका साकारतात.

नेत्रहीन लोकांमध्येही प्रवासादरम्यान होणारा त्रास आढळण्याचं कारण हे समजलं जाऊ शकतं की दृश्य इनपुट यामध्ये कमी भूमिका निभावतात. मूव्हमेंट सिकनेस शक्यतो गंभीर प्रकारच्या डेव्हलपमेंटमुळे होते.

  • रिक्षा किंवा गाडीने प्रवास करतेवेळी त्रास होत असेल तर मागच्या सीटवर बसणं टाळा. मागे बसून पुस्तक वाचण्याऐवजी समोरच्या सीटवर बसल्याने तुम्हाला वेगाशी निगडित असलेले प्रश्न कमी त्रास देतात, जे तुम्हाला या समस्यांपासून दूर ठेवतात.
  • स्वत:ला अशा अवस्थेत ठेवा जिथे तुम्हाला कमीत कमी वेगाची जाणीव होईल, जसं की एखाद्या विमानात विंग्सच्यावर.
  • प्रवासादरम्यान कायम नैसर्गिक हवा घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला श्वास घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटतं.
  • प्रवासादरम्यान कधीच आपले डोळे बंद करू नका, कारण यामुळे काही हालचालींची जाणीव जास्त होते आणि तुम्हाला टॅ्व्हल सिकनेस सुरू होतो. तुम्हाला जेव्हा कधी त्रास व्हायला सुरूवात होईल, तेव्हा बदलणाऱ्या गोष्टींवर आपली नजर टाकायला सुरूवात करा.
  • मोठ्या प्रवासात भरपूर खाऊ नका. समुद्री प्रवासापूर्वी हलकं जेवण जेवा आणि मोठ्या टॅ्रकवर कमी प्रमाणात थोड्या थोड्या अंतराने खात राहा.
  • समुद्री प्रवासादरम्यान डोकं आणि शरीराची हालचाल कमी करा. तुम्ही आराम करू शकता किंवा कंबर टेकू शकता. एखादी उशी मानेखाली घेऊन आपलं डोकं तुम्ही स्थिर ठेवू शकता.
  • औषधं कानाच्या आतल्या भागांच्या मज्जातंतुंना आणि मळमळणे यासारख्या मेंदूच्या प्रतिक्रियेला शांत करतात. औषधं तेव्हा जास्त प्रभावी ठरतात, जेव्हा ती त्रास होण्याची जाणीव होण्यापूर्वीच घेतली जातात.
  • या समस्येपासून बचावासाठी खिडकीच्या बाहेर पाहात राहा किंवा ताजी हवा येण्यासाठी खिडकी खोला.
  • डुलकी घेतल्याने सायकोडेनिक प्रभावानेदेखील आराम मिळतो.
  • टॅ्व्हल सिकनेसपासून बचाव करण्याची एक सोपी पद्धत काही तरी चघळत राहणंदेखील आहे. प्रवासादरम्यान चुइंगम चावत राहिल्यानेदेखील आराम पडतो.
  • काही लोकांना मनगटावरील असे बॅण्ड घातल्यानेदेखील आराम पडतो, जे नीडल पॉइंट थेरेपी (पी६०)वर दाब टाकतात.
  • आलं टॅ्व्हल सिकनेस दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. दीर्घ काळापासून मळमळण्यावर उपचार म्हणून आल्याचा वापर केला जात आहे.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें