सोनी मराठीवरील ‘इंडियन आयडल मराठी’

* सोमा घोष

२२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘Singing Star’ या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. Ajay-Atulहे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी  सुरांची पर्वणी असणार आहे.

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर

* प्रतिनिधी

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली.

मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का….असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे

दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचे, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा, या ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेचा प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे.

इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडे पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. १५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!

 ‘कोण होणार करोडपती’

*सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ पाहताना घरबसल्या लखपती होण्याची सधी- प्ले अलॉंगवर ‘कोण होणार करोडपती’ खेळा, १२ जुलैपासून…

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम  नक्कीच जिंकली असती.

आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या  प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. १२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम  सोम.शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

हा कार्यक्रम पाहताना  प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. ‘कोण होणार करोडपती’

पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू  शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते  म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक  या खेळात निवांत सहभागी  होऊन, लखपती होऊ शकतात.

या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ’ आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ  शकता!

पाहा, ‘कोण होणार करोडपती’,

सोम.-शनि., १२ जुलैपासून  रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें