सुपर पॅरेंट्स सिंड्रोमचे बळी तर नाहीत

* पुष्पा भाटिया

सहावीत शिकणारा मोहित हा घरातून बेपत्ता झाला होता. तो दूध घ्यायला निघाला पण घरी परतला नाही. एक आठवड्यानंतर एक गृहस्थ मोहितला घरी सोडून गेले. विचारणा केली असता तो स्वत:च घराबाहेर पळून गेल्याचे निष्पन्न झाले. वास्तविक परीक्षेत त्याचे मार्कस् कमी आले होते. वडिलांच्या भीतीचा सामना करणे त्याच्यासाठी कठीण होते. म्हणून तो घरून पळून गेला होता.

लहान बंटू कधी-कधी घशात काही अडकल्याची तक्रार करतो तर कधी-कधी पोट दुखण्याची. तो नेहमीच उदास आणि खवळलेला असतो. जेवणही व्यवस्थित करत नाही. छोटया-छोटया गोष्टींवर रडू लागतो. वैद्यकीय तपासणीत सर्वकाही व्यवस्थित निघाले. वास्तविक, ही दोन्ही मुले त्यांच्या पालकांच्या सुपर पॅरेंट सिंड्रोमची शिकार आहेत.

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर मॅडलिन लेव्हिन यांनी आपल्या ‘प्राइस ऑफ प्रिव्हिलेन’ पुस्तकात असे लिहिले आहे की जे पालक त्यांच्या यशासाठी मुलांवर अनावश्यकपणे जास्त दबाव आणतात ते अनवधानाने त्यांना तणाव आणि नैराश्याचे बळी बनवतात. त्यांच्या मते, या पालकांना नेहमीच आपल्या मुलांना इतरांपेक्षा पुढे पहायचे असते. भले मग अभ्यास असो, खेळ असो किंवा इतर कोणतेही क्रियाकलाप, ते प्रत्येक क्षेत्रात मुलांना पुश करतात. वास्तवापासून दूर, जेव्हा असे मूल आई-वडिलांच्या अपेक्षांची पूर्तता करत नाही, तेव्हा त्याला दु:ख, निराशा आणि कोंडीची परिस्थिती येते.

प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचे मूल ना केवळ त्याच्या वर्गातील अभ्यासात उच्च श्रेणीत असावे, तर इतर क्रियाकलापांकरितादेखील उत्साहित आणि प्रोत्साहित असावे. शाळा उघडत नाहीत तोच पालक तयार होतात. मागील वर्षी जी काही कामगिरी राहिली असेल, जो काही निकाल राहिला असेल, या वर्षी मात्र अगदी सुरुवातीपासूनच लक्ष द्यायचे आहे. मग दररोजचे क्रियाकलाप, गृहपाठ, खेळ प्रत्येक क्षेत्र पालकांच्या नित्यकर्मांचा महत्त्वपूर्ण भाग बनतात.

जर आपणदेखील सुपर पालक सिंड्रोमने वेढले गेले असाल तर मानसशास्त्रज्ञांनी दिलेल्या या सूचनांकडे लक्ष द्या आणि आपल्या वर्तनात नियंत्रण आणि समजूत आणा :

प्रेमाने समजावून सांगा : मुलांच्या भविष्याबद्दल आपल्या मनात असुरक्षिततेची भावना असणे स्वाभाविक आहे. कधीकधी मनोबलच्या कमतरतेमुळे आपणास असुरक्षित वाटते आणि हीच भावना आपण आपल्या मुलांमध्येही भरता. अशा परिस्थितीत आपल्या मुलाचा विश्वास कोलमडू लागतो, म्हणूनच आपण स्वत:वर विश्वास ठेवणे आणि त्याला आपल्या प्रेमाच्या आणि ममतेच्या सावलीत सुरक्षिततेची जाणीव करून देणे चांगले होईल. हसणे आणि आनंदी असणे हा एक अतिशय सकारात्मक दृष्टीकोन आहे. जर आपण हसत असाल तर मूलदेखील हसेल आणि तेच शिकेल. हे त्याच्यात आत्मविश्वास आणि आपल्यात भरवसा वाढवेल की तो जसापण आहे आपल्याला प्रिय आहे.

तुलना करू नका : मुलाची तुलना कोणत्याही मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मुलाशी करू नका. एखाद्या परीक्षेत किंवा स्पर्धेत त्याला इतर मुलापेक्षा कमी मार्कस् मिळाले असतील किंवा तो एखाद्या स्पर्धेत हरला असेल तर विजयी मुलाशी आपल्या मुलाची तुलना करण्याऐवजी प्रेमाने मुलाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणा की काही हरकत नाही, या वेळी हरला म्हणून काय झाले, पुढच्या वेळी प्रयत्न कर, यश तुझ्या पायांत लोटांगण घेईल. असे केल्याने आपल्या मुलाचा आत्मविश्वास दुखावला जाणार नाही.

व्याख्यान देणे टाळा : चर्चा केल्याने बऱ्याच समस्यांचे निराकरण होते, परंतु असेही व्हायला नको की आपणच बोलत राहाल आणि मुल ऐकत राहील. जर असे असेल तर खात्रीने माना की त्याने तुमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

मुलाची क्षमता आणि मर्यादा ओळखा : एकापाठोपाठ एक क्लास जॉईन करून देऊन आपण ते बरोबर केले की चूक, हे मुलाच्या दृष्टिकोनातून पहावे की कदाचित असे तर नाही की दुसऱ्याचे बघून किंवा दुसऱ्यांशी तुलना करण्याच्या चक्करमध्ये आपण असे केले आहे. आपल्या मुलाची क्षमता आणि मर्यादा समजून घेतल्याशिवाय नेहमीच पुढे जाण्यासाठी त्यावर दबाव आणत आपण त्याचे भले करण्याऐवजी त्याचे नुकसान करीत आहात. आपण आपली विचारसरणी बदलली तर चांगले होईल.

गोपनीयतेचा आदर करा : शिस्त आणि आज्ञाधारकपणा महत्त्वपूर्ण असतो परंतु वेळोवेळी उदारता दाखविणेदेखील महत्त्वाचे असते. आपल्या मुलास काही काळ एकटे राहण्याची इच्छा असल्यास, इंटरनेट आणि मोबाईलवर एखाद्याशी गप्पा मारु इच्छित असल्यास, त्यास तसे करू द्या. जर आपल्याला असे वाटत असेल की तो काहीतरी चूकीचे करीत आहे तर आपण सूचना देण्याऐवजी किंवा टीका करण्याऐवजी त्याचे मार्गदर्शन करा. कधीकधी मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणेदेखील आवश्यक असते.

चांगल्या कार्याचे कौतुक करा : जेव्हा आपण मुलाला त्याच्या चुकांबद्दल फटकारण्यास विसरू शकत नाही, तर मग चांगल्या कार्यासाठी त्याचे कौतुक करण्यास का विसरता? मुलाची प्रशंसा केवळ त्याच्या निकालाच्या कार्डापर्यंतच मर्यादित ठेवू नका. त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्याला पुरस्कार देण्याबरोबरच त्याच्या पाठीवर शाबाशी देण्यास आणि त्याला मिठी मारण्यास विसरू नका.

एका मानसशास्त्रज्ञाच्या मते, जर आपल्या मुलाने त्याच्या एखाद्या मित्राबरोबर एखादी चांगली योजना तयार केली असेल किंवा त्याच्याशी चांगला वागला असेल, पाहुण्यांबरोबर शिष्टाचाराने वावरत असेल, दुसऱ्याच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत असेल तरीही त्याची स्तुती करा. असे न केल्यामुळे त्याचे मन दुखावले जाईल.

हरणेदेखील महत्त्वाचे आहे : मुलाला चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त करा, जिंकण्यासाठी नाही. जरी त्याला कधी अपयश आले तरीसुद्धा त्याच्या समोर दु:ख व्यक्त करू नका. तो हरला तरीही त्याच्या चांगल्या प्रयत्नांचे कौतुक करा आणि पुढच्या वेळी जिंकण्यासाठी प्रवृत्त करा.

काही पालक मुलांबरोबर खेळत असताना जाणूनबुजून हार मानतात. हे कधीही करू नका. अशाने मुलाला प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले जाणार नाही आणि प्रत्येक वेळी कठोर परिश्रम न करता जिंकण्याची इच्छा ठेवेल. जिंकण्याबरोबरच त्याला सहज पराभव स्वीकारण्यास शिकवा.

घरगुती वातावरण देखील जबाबदार : मुलाची पहिली शाळा त्याचे घर असते. आपल्या पालकांच्या आश्रयात तो आत्मविश्वास, दृढनिश्चय, निर्णयशक्ती, धैर्य आणि स्पष्ट विचारसरणी यांसारख्या गुणांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवतो.

मानसशास्त्रज्ञ मनीष कंदपाल यांच्या म्हणण्यानुसार घरातल्या वडीलधाऱ्यांचा अपमान, मोठ-मोठी भांडणे, शिवीगाळ, पालक दारू आणि सिगारेट अशा वाईट व्यसनांच्या आहारी जाणे इ. गोष्टींचा मुलांच्या मनावर लवकर परिणाम होतो. मुलाला जे दिसते तेच शिकतो.

आपला तणाव आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा : जेव्हा आपण कार्यालयाचा आणि घराचा तणाव घेऊन आपल्या मुलांसमोर येता तेव्हा ते आपल्याबरोबर बसण्याऐवजी इतरत्र वेळ घालवणे पसंत करतात. मुले आपणास आनंदी पाहू इच्छित असतात जेणेकरून ते आपल्याबरोबर आपल्या समस्या शेयर करू शकतील. दुसऱ्याच्या तणावासाठी किंवा रागासाठी मुलांना दटावणे किंवा त्यांवर हात उगारणे योग्य नाही.

स्वत:शी तुलना कधीच करू नका : हे आवश्यक नाही की आपल्या बालपणात आपल्याला जे काही मिळाले नव्हते त्या सर्व गोष्टी आपण आपल्या मुलास देऊ शकले. हेदेखील आवश्यक नाही की जर आपण सुवर्णपदक विजेता होते, एक चांगले गायक किंवा खेळाडू होते तर आपले मूलही तसेच असले पाहिजे. प्रत्येक मुलाचे स्वत:चे छंद, कल आणि मर्यादा असतात. त्यास त्याच दिशेने बनवण्याचा प्रयत्न करा. कधीही गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करू नका. आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे, त्याला आपली प्रतिभा चमकवण्यासाठी योग्य प्रोत्साहन आणि वातावरण तयार केले पाहिजे.

कोरोना काळात वाढतोय मुलांमध्ये तणाव

* सुनील शर्मा

एके दिवशी, दहा वर्षीय नीरज अचानक आईला म्हणाला, ‘‘मम्मी, मामाच्या घरी जाऊया.’’

हे ऐकून त्याच्या आईने समजावले की, ‘‘बाळा, सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आहे, म्हणून आपण कुठेही जाऊ शकत नाही.’’

हे ऐकून नीरज निराश झाला आणि पाय आपटत रागाने म्हणाल, ‘‘हे काय आहे… किती दिवस झाले, आपण कुठेच गेलोलो नाही.’’ फक्त घरातच राहायचे. उद्यानात किंवा मित्रांना भेटण्यासाठीही जाता येत नाही. सतत थोडया-थोडया अंतराने सॅनिटायझरने हात धुवावे लागतात आणि जरा जरी घराबाहेर गेल्यास तोंडावर मास्क लावावा लागतो. खेळण्यासाठी फक्त टेरेसवरच जाता येते…

‘‘मी आता कंटाळलो आहे. जेव्हा तुझ्याकडे मोबाइल मागतो, तेव्हा बाबा ओरडतात आणि तू मात्र दिवसभर इअरफोन लावून मोबाइलवर वेब सीरीज पाहत बसतेस.’’

मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवडयापासून संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाशी झुंज देत आहे. कितीतरी लोक घरात बंद आहेत, विशेषत: मुले घरात कैद झाली आहेत. ती शाळेत जाऊ शकत नाहीत. पार्क सामसूम झाले आहेत.

सुरुवातीला मुलांना असे वाटले होते की, शाळा बंद झाल्या म्हणजे आता दिवसभर मजा करायची. परंतु हळूहळू त्यांना समजले की, हे सुट्टीचे दिवस नाहीत, तर त्यांच्या निरागस बागडण्यावर जणू कर्फ्यू लावण्यात आला आहे.

याचा परिणाम असा झाला की, नीरजसारख्या लहान मुलांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले आहेत. ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान करू शकतो.

सध्या तरी ही समस्या प्राथमिक टप्प्यात आहे, म्हणूनच मुले वैतागत असल्यास मोठयांनी रागावू नये. उलट त्यांनी मुलांना या मोकळया वेळेत एखादे चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

गॅझेट बनले आधार

केमिकल लोच्याबाबत बोलायचे झाल्यास, लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, तणावामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा दिनक्रम बदलला आहे. मोठी माणसे कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडतात, पण मुले मात्र ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोच्या स्पर्धकांप्रमाणे घरातच बंदिस्त झाली आहेत.

दुसरीकडे मुलांच्या शाळा सध्या बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यास मात्र सुरू आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय ते मनोरंजनसाठीही मोबाइल, संगणक, लॅपटॉप किंवा टीव्हीचाच आधार घेतात. यामुळे केवळ त्यांच्या डोळयांवरच वाईट परिणाम होत नाही तर मानसिकदृष्टयाही ते थकून जातात.

सध्या आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही, पण हे कटू सत्य आहे की, टीव्हीवरील कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्या सातत्याने ऐकल्यामुळे मोठया माणसांसोबतच मुलांमध्येही तणाव वाढत आहे.

या तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तर अशा परिस्थितीत मुलांना काहीही करून नकारात्मक वातावरणातून बाहेर काढणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांना घरी किंवा छतावर असे खेळ खेळायला प्रोत्साहित करायला हवे, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होईल, त्यांना भरपूर घाम येईल. याशिवाय त्यांना चित्रकला, पुस्तके वाचणे किंवा इतर कोणत्यातरी कलेत गुंतवून ठेवा.

यांनी असे केले

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या सोना चौधरी यांना २ मुलगे आहेत. कोरोना काळात ही दोन्ही मुले घरातील कामात आईला मदत करतात. स्वयंपाकघरात काहीतरी नवीन पदार्थ बनवतात. कविता लिहितात.

सोना चौधरी यांच्या २ मुलांपैकी मोठा मुलगा सुजल १५ वर्षांचा असून अकरावीत शिकतो. तर, १२ वर्षांच्या लहान मुलाचे नाव व्योम आहे आणि तो आठवीत शिकतो. दोघांनाही पुस्तक लिहिण्याची आवड आहे आणि त्यांनी प्रत्येकी २ पुस्तके लिहिली आहेत.

सोना चौधरी यांनी सांगितले की, ‘‘मी दोघांकडून घराच्या साफसफाईसारखी कामे करून घेते. मीही त्यांच्या बरोबरीने हे काम करते. त्यांना स्वयंपाकघरात माझ्या सोबत ठेवते, शिवाय मोकळा वेळ मिळताच त्याच्यांबरोबर खेळते.’’

सोना चौधरी यांच्या मते, ‘‘सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या वागणुकीत बदल झाला आहे. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी मुलांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मुले शाळेसोबतच आपल्या आजूबाजूच्या परिसराकडूनही खूप काही शिकत असत. घरातील कामातून शिकत असत.

‘‘सध्याच्या कोरोना काळात मुलांना घरातच प्रात्यक्षिक करून शिकण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन शिकवणी चांगली आहे, परंतु मुलांना चांगल्या प्रकारे जगायची शिकवण मिळावी यासाठी वडीलधाऱ्यांनी त्यांना स्वत:सोबत ठेवायला हवे. ते जे काही करतात ते मुलांना दाखवायला हवे, शिकवायला हवे. यालाच कौशल्यांचा सराव असे म्हणतात. चीनसारख्या देशात लहान वयातच मुलांकडून कौशल्यांचा सराव करून घेतला जातो.

महिला काँग्रेसशी संबंधित आणि आया नगर प्रभागातील उपाध्यक्षा मधु गुप्ता यांना २ मुले आहेत. १० वर्षांची अग्रिमा आणि ७ वर्षांचा समन्वय. मधु गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘एकीकडे ऑनलाइन वर्गामुळे त्यांचा स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढत आहे. ती आळसावत असून त्यांची शारीरिक हालचालही कमी होत असल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. पण, दुसरीकडे कोरोना कालावधीत मुले घरीच असल्यामुळे मी या वेळेचा सकारात्मक उपयोग करून घेत आहे. मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते आणि त्यांनी घरातील इतर कामे शिकावीत यासाठी त्यांना मदत करते. जसे की, डायनिंग टेबल मांडणे, खाण्याची भांडी स्वयंपाकघरात ठेवणे, कपाटात स्वत:चे कपडे नीट लावून ठेवणे, खोली स्वच्छ करणे इत्यादी.

‘‘राजकारणात असण्यासोबात मीसुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे, म्हणूनच दररोज मला घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत, मुश्किलीने मिळणारा थोडासा वेळही योग्य प्रकारे वापरून त्यावेळेत मुलांना चांगल्या सवयी, घरकाम शिकवून मी माझा दिनक्रमही सहजसोपा करून घेतला आहे.’’

पण प्रत्येक घरात असे घडत नाही. कोरोनामुळे बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आहे. याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम होत आहे. मुलेही याला अपवाद नाहीत. परंतु काही खबरदारी घेतल्यास मुलांचा ताण कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त जर तुमचा मुलगा असामान्यपणे वागत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें