मुलांना चहाडखोर बनवू नका

– पूनम पांडे

चहाडया किंवा चुगल्यांची सुरुवातच एखाद्या मसालेदार किंवा खमंग बातमीने होते. बाल मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, मुलांना अशा गोष्टी ऐकायला मजा येते. तुमची मुले जर आजूबाजूच्या गोष्टी मीठमसाला लावून तुम्हाला सांगत असतील तर सावध व्हा, कारण ही सवय तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्त्व बिघडवू  शकते. ती तुमच्या मुलाला कल्पनेतील अशा जगात घेऊन जाते जे खूपच निराशाजनक असते. तिथे वास्तव १ टक्काही नसते आणि मसालेदार गोष्टी, असत्य १०० टक्के असते. यामुळे मुलाचा दृष्टिकोन बिघडू लागेल. तो सत्याकडे पाठ फिरवायला शिकेल. चुगल्या, आधारहीन गोष्टी सांगू लागेल. हा खूपच धोकादायक स्वभाव आहे. असा स्वभाव मुलांमध्ये तेव्हा विकसित होतो जेव्हा आईवडील मुलाच्या गोष्टी चवीने ऐकू लागतात, कारण मुले ज्या गोष्टी सांगतात त्या मनोरंजक, कुतूहल जगवणाऱ्या असतात. भलेही त्या किती खऱ्या आहेत हे प्रत्यक्ष मुलालाही माहीत नसते. त्यामुळे अशा गोष्टींना महत्त्व देऊ नका अन्यथा मुलांची विचारसरणी चुकीची आणि भविष्य अंधकारमय होईल.

बाल्यावस्थेत बरेच कुतूहल असते. आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या गोष्टी कान लावून ऐकायची मुलांना सवय लागू शकते. अशावेळी प्रयत्न करा की, तुम्ही जेव्हा कधी अशा गोष्टी कराल तेव्हा सर्वसाधारण बोलता तसेच बोला, जेणेकरून मुलांमध्ये कान लावून ऐकण्याची सवय विकसित होणार नाही.

ही घटना सर्वांसाठीच एक चांगला धडा आहे. मिताचा भावनांवर कधीच ताबा नसायचा. त्यामुळेच ती कुठलाही विचार न करता शेजारीपाजारी, नातेवाईक सर्वांच्या गोष्टी मुलांसमोर बिनदिक्तपणे सांगायची. मिताच्या गोष्टी ऐकून तिच्या मुलांच्या मनात संबंधित व्यक्तीबाबत चुकीचे मत तयार होऊ लागले आणि एके दिवशी यामुळेच एका कौटुंबिक कार्यक्रमात मिताच्या मुलांनी त्या व्यक्तीचा चहाडया बिनधास्त सर्वांसमोर केल्या.

मिता आणि तिथल्या सर्वांनाच आश्चर्य वाटले की, मुलांच्या तोंडी अशा गोष्टी आल्याच कशा? त्यानंतर सर्वांनीच यासाठी फक्त मितालाच दोष दिला. तिथले वातावरण उत्साहाचे होते, पण रंगाचा बेरंग झाला होता.

मिताला खूपच लाजल्यासारखे झाले. शेवटी चूक तिचीच होती. तिने मुलांमध्ये तिरस्काराचे बीज पेरले होते.

मितासारखी चूक अनेक आईंकडून होते. कोणावर तरी नाराज होऊन एखाद्याकडे आपले मन मोकळे करताना त्या हा विचार करत नाहीत की, मुले निरागस आहेत. त्यांच्यावर याचा चुकीचा परिणाम होईल. मनात जेव्हा रागाचे विष भरलेले असते तेव्हा काय बोलावे आणि काय बोलू नये, हे समजत नसते. तरीही हे आपल्याच हातात असते की, कुठल्याही प्रकारची चहाडी आदींपासून मुलांना दूरच ठेवावे, कारण ती आपले भविष्य आहेत.

निंदा बिघडवते संबंध

कोणीतरी बरोबरच सांगितले आहे की, निंदा करण्यात खूप मजा येते. पण हाच निंदारस तुमच्या जीवनात नकारात्मकता ठासून भरतो. त्यामुळे अनेकदा इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करतो. असे म्हणतात की, भिंतींनाही कान असतात. त्यामुळे आज तुम्ही इतरांबद्दल जे काही बोलता ते भविष्यात कधीतरी त्या व्यक्तीच्या कानावर पडतेच. अशावेळी तुमचे संबंध बिघडायला वेळ लागत नाही.

आपण आपले जीवन अगदी सहज, सुंदर जगले पाहिजे. प्रत्येक माणसात काहीतरी कमतरता असतेच. त्याकडे लक्ष दिले तर सतत चहाडी किंवा चुगली करत रहावेसे वाटेल. नकळतपणे तुम्ही ती गोष्ट तुमच्या मुलांसमोर बोलाल. हा तोच क्षण असेल जिथून तुमच्या मुलालाही चहाडी करण्याची सवय लागेल. जेव्हा तुम्ही एखाद्यावर नाराज असाल तेव्हा त्याचवेळी तुमच्यातील २-४ चुकीच्या सवयी आठवा. यामुळे तुम्हाला संतुलन साधता येईल. निदान यामुळे तरी तुमच्या तोंडून चुकीची गोष्ट बाहेर पडून ती मुलांच्या कानांपर्यंत पोहोचणार नाही.

वाईट सवयींची जननी म्हणजे चहाडी

चहाडी करणाऱ्या व्यक्तीच्या मनात चहाडी किंवा चुगली करण्यासोबतच खोटे बोलणे, एखाद्याबद्दल वाईट सांगणे, भांडणे लावून देणे, निंदा करणे इत्यादी अनेक वाईट सवयी जन्माला येतात. त्यामुळे हळूहळू ती व्यक्ती आपले अस्तित्व गमावून बसते. विश्वास ठेवायच्या किंवा मानसन्मान देण्याच्या लायकीचा उरत नाही.

प्रत्येकाचे जीवन एकसारखे नसते. त्यामुळेच कुठे कोणाच्या जीवनात काही चुकीचे घडत असते तेव्हा त्या गोष्टीला मीठमसाला लावून ती सर्वत्र पसरवणे आणि त्या व्यक्तीची परिस्थिती आणखी बिकट व्हावी या उद्देशाने असे वागणे म्हणजे तुमच्यातील वाईट वृत्तीचा कडेलोट आहे.

सर्वसाधारणपणे असे पाहायला मिळते की, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातील चुगलखोर सवयीमुळेच मुलांना हळूहळू चुगली करायची सवय लागते. ही सवय मुलांना समाज आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वापासून संपूर्णपणे अलिप्त करते.

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींची मजा घेत चुगल्या लावायची गरजच काय? कुठे गेली तुमच्यातली माणुसकी? खरंतर ही सवय खूपच घाणेरडी आहे. यापासून लांब राहणेच तुमच्यासाठी योग्य ठरते. तोंडातून बाहेर पडलेली गोष्ट खूप मोठा प्रवास करत फिरते. बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी करायला हवा. नकारात्मक विचारांमुळे  मेंदूवरचा ताण वाढतो. म्हणूनच मुलांची  प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्यांच्या समोर कोणाच्याच चुगल्या करू नका. गप्पा ऊर्जा जागवणाऱ्या, प्रेरणादायी असायला  हव्यात.

निसर्गत:च मुले संवेदनशील, हळव्या मनाची असतात. तुमच्या तोंडून सतत निघणाऱ्या चहाड्या, इतरांची निंदा यामुळे मुलांवर अनावश्यक ताण येऊ शकतो. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो. म्हणून उगाचच तुमचे तोंड खराब करून घेऊ नका. आत्मविश्वास हेच बुद्धी आणि मेंदूच्या विकासासाठी उत्तम औषध आहे. चहाड्या नव्हे तर एकमेकांना मदत करणे, समजूतदारपणा, सर्वांसोबत हसूनखेळून राहणे यामुळेच आपल्या आणि मुलांच्या जीवनातही समाधानाचा सुगंध दरवळतो.

मदर्स डे स्पेशल : या 5 मार्गांनी मुलांचे भविष्य सुरक्षित करा

* गरिमा पंकज

विभक्त कुटुंबे आणि नोकरी करणाऱ्या पालकांच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे मुलांचे बालपण सीमाभिंतीत कैद झाले आहे. ते उद्याने किंवा मोकळ्या जागेत खेळण्याऐवजी व्हिडिओ गेम खेळतात. त्याचे मित्र आमच्या वयाची मुलं नसून टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल. याचा मुलांच्या वागणुकीवर आणि मानसिकतेवर मोठा परिणाम होतो. त्यांना ना सामाजिकतेच्या युक्त्या शिकता येतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्व सामान्यपणे विकसित होत नाही.

योग्य भावनिक विकासासाठी सामाजिक कौशल्ये का महत्त्वाची आहेत डॉ. संदीप गोविल, मानसशास्त्रज्ञ, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणतात, “माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजापासून वेगळा राहू शकत नाही. यशस्वी आणि उत्तम जीवनासाठी, मुलांना इतर लोकांशी जुळवून घेण्यास त्रास होऊ नये हे आवश्यक आहे. जी मुले सामाजिक कौशल्ये विकसित करत नाहीत त्यांना मोठे झाल्यावर निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यात अडचणी येतात. सामाजिक कौशल्ये मुलांमध्ये भागीदारीची भावना विकसित करतात आणि ऑटिझम रोखतात. त्यामुळे त्यांच्या मनातील एकटेपणाची भावना कमी होते.

आक्रमक वर्तनाला आळा घालण्यासाठी डॉ. संदीप गोविल म्हणतात, “आक्रमक वर्तन ही एक समस्या आहे जी मुलांमध्ये खूप सामान्य होत चालली आहे. कौटुंबिक ताणतणाव, टीव्ही किंवा इंटरनेटवर हिंसक कार्यक्रम पाहणे, अभ्यासात चांगली कामगिरी करण्याचा दबाव किंवा आक्रमक वागणूक कुटुंबापासून दूर वसतिगृहात राहणाऱ्या मुलांमध्ये जास्त दिसून येते. अशी मुले सर्वांपासून दूर राहतात. इतर मुलांना दुखापत झाली की ते ओरडू लागतात. शिवीगाळ करत मारामारीवर उतरतात. कधी कधी खूप राग आला तर ते हिंसक होतात.

मुलांना एका दिवसात सामाजिकतेचा धडा शिकवता येत नाही. यासाठी लहानपणापासूनच त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  1. मूल लहान असताना

न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहणारी 5 वर्षापर्यंतची मुले सहसा त्यांच्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना चिकटून असतात. या वयापासून त्यांना चिकटून राहण्याऐवजी सामाजिक कार्य करण्यास शिकवले पाहिजे.

  1. तुमच्या मुलांशी बोला :

डॉ. रुबी आहुजा, मानसशास्त्रज्ञ, पारस ब्लिस हॉस्पिटल म्हणतात, “तुमचे मूल अगदी लहान असल्यापासून त्याला त्याच्या नावाने संबोधा, त्याच्याशी बोलत राहा. त्याच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला सांगत रहा. जर तो खेळण्याशी खेळत असेल तर त्या खेळण्याचं नाव विचारा. खेळण्याला कोणता रंग आहे, त्यात गुणवत्ता काय आहे अशा गोष्टी विचारत राहा. नवीन पद्धतीने खेळायला शिका. यामुळे मुलाला एकांतात खेळण्याच्या सवयीतून बाहेर पडता येईल.” मुलाची ओळख मित्रांशी, शेजाऱ्यांशी करून द्या: दर रविवारी नवीन नातेवाईक किंवा शेजारी भेटण्याचा प्रयत्न करा. पार्टी वगैरेमध्ये अनेक नवीन लोकांना एकत्र बघून लहान मूल घाबरून जाते. पण जेव्हा तुम्ही तुमची खास माणसं आणि त्यांच्या मुलांशी वेळोवेळी त्याची ओळख करून देत राहाल, तेव्हा ते मूल जसजसं मोठं होईल तसतसं ते या नात्यांमध्ये अधिकाधिक जगायला शिकेल.

  1. इतर मुलांसोबत मिसळण्याची आणि खेळण्याची परवानगी द्या :

तुमच्या मुलाला त्याच्या आजूबाजूच्या इतर मुलांसोबत किंवा शाळेत मिसळण्यास मदत करा जेणेकरून त्याला सहकार्याची तसेच भागीदारीची शक्ती समजेल. मुले खेळतात तेव्हा एकमेकांशी बोलतात. एकमेकांशी मिसळा. त्यामुळे सहकार्याची भावना आणि आत्मीयता वाढते. त्यांचा दृष्टीकोन विकसित होतो आणि ते इतरांच्या समस्या समजून घेतात, ते इतर मुलांमध्ये मिसळून जीवनातील युक्त्या शिकतात, जे आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात.

  1. पालकत्वामध्ये बदल करत राहा :

डॉ. संदीप गोविल म्हणतात, “मुलांना त्यांच्या गरजेच्या वेळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उपलब्ध व्हा, पण त्यांना थोडी जागा द्या. त्यांच्यासोबत नेहमी सावलीसारखे राहू नका. मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांची वागणूक बदलते. आपण 3 वर्षांच्या आणि 13 वर्षांच्या मुलाशी समान वागणूक देऊ शकत नाही. मुलांचे वागणे त्यानुसार बदलत असल्याने त्यांच्याशी असलेल्या नात्यात बदल करा. गॅझेटसह घालवायला कमी वेळ द्या. गॅजेट्सच्या अतिवापरामुळे मुलांचा त्यांच्या सभोवतालच्या परिसराशी संपर्क तुटतो. मेंदूतील तणावाची पातळी वाढू लागते, त्यामुळे वर्तन थोडे आक्रमक होते. यामुळे सामाजिक, भावनिक आणि लक्ष समस्या उद्भवतात. स्क्रीन सतत पाहण्याने अंतर्गत घड्याळात अडथळा येतो. मुलांना गॅझेटचा वापर कमी करू द्या, कारण त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्याने स्वतःशी संपर्क साधण्यात आणि इतरांशी संबंध जोडण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसात २ तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहू नका.

  1. धार्मिक कार्यांपासून दूर राहा :

तुमच्या मुलांना अगदी सुरुवातीपासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल शिकवा. त्यांना धार्मिक कार्य, उपासना, अवैज्ञानिक विचार यापासून दूर ठेवा.

७ मार्ग घडवतील मुलांचे भविष्य

* गरिमा

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि आईवडील दोघेही कामाला जात असल्यामुळे मुले जणू लहापणापासूनच घराच्या चार भिंतीत कैद झाली आहेत. उद्यान किंवा मोकळया जागेत खेळण्याऐवजी ती व्हिडीओ गेम खेळतात. त्यांचे मित्र हे त्यांच्याच वयाची मुले नाहीत, तर टीव्ही, संगणक, मोबाइल हे आहेत.

याचा मुलांच्या वागणुकीवर आणि त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो. ते समाजात रहायला शिकू शकत नाहीत, शिवाय त्यांचे व्यक्तिमत्त्वही विकसित होऊ शकत नाही.

का गरजेची आहेत सामाजिक कौशल्ये

योग्य भावनिक विकासासाठी सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मानसशास्त्रज्ञ डॉ. संदीप गोविल सांगितले की, ‘‘माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजापासून वेगळा राहू शकत नाही. यशस्वी आणि चांगल्या आयुष्यासाठी, मुलांना इतर लोकांशी वागताना, बोलताना कुठलीही अडचण येऊ नये, हे महत्त्वाचे आहे. ज्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होत नाहीत त्यांना मोठे झाल्यावर समाजासोबत निरोगी संबंध प्रस्थापित करताना अडचणी येतात. सामाजिक कौशल्यांमुळे मुलांमध्ये भागीदारीची भावना विकसित होते आणि ती मुलांना आत्मकेंद्री होण्यापासून वाचवते. त्यांच्या मनात एकटेपणाची भावना कमी करते.’’

आक्रमक वर्तनाला आळा घालण्यासाठी डॉ. संदीप गोविल सांगतात, ‘‘आक्रमक वर्तन ही एक अशी समस्या आहे जी मुलांमध्ये असणे ही सामान्य बाब बनत चालली आहे. कौटुंबिक ताण, टीव्ही किंवा इंटरनेटवर हिंसक कार्यक्रम पाहणे, अभ्यासात चांगले गुण मिळवण्याचे दडपण किंवा कुटुंबापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये आक्रमक वर्तन हे जास्त दिसून येते. अशी मुले सर्वांपासून लांब राहणेच पसंत करतात. इतर मुलांनी त्यांचे मन दुखावल्यास आरडाओरड करू लागतात. अर्वाच्च भाषेत बोलून मारहाण करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा खूपच राग आल्यास ते खूपच हिंसक होतात.’’

मुलांना लहानपणापासूनच समाजकरणाचे धडे दिले तर त्यांच्यात अशा प्रकारची प्रवृत्ती जन्मालाच येणार नाही.

मुलांना एका दिवसात समाजवादाचे धडे दिले जाऊ शकत नाहीत. यासाठी लहानपणापासूनच त्यांच्या संगोपनावर लक्ष देणे गरजेचे आहे.

जेव्हा मूल लहान असते : विभक्त कुटुंबात राहणारी ५ वर्षांपर्यंतची मुले सहसा आईवडील किंवा आजीआजोबांकडेच जास्त वेळ राहतात. प्रत्यक्षात लहान वयापासून त्यांना सतत स्वत: जवळ न ठेवता समाजात चांगल्या प्रकारे वावरायला शिकवले पाहिजे.

आपल्या मुलांशी बोला : पारस ब्लिस रुग्णालयाच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. रूबी आहुजा यांनी सांगितले की, ‘‘जेव्हा तुमचे मूल लहान असते तेव्हापासूनच त्याच्या नावाने त्याला हाक मारा. त्याच्याशी बोलत रहा. त्याला सभोवतालच्या सर्व गोष्टींबद्दल सांगत रहा. जर तो खेळण्यांसोबत खेळत असेल तर त्याला त्या खेळण्याला काय म्हणतात, हे विचारा. खेळण्यांचा रंग कोणता आहे आणि त्यामध्ये काय विशेष आहे, अशा अनेक गोष्टी विचारत रहा. नवनवीन प्रकारे खेळायला शिकवा.’’

मुलाला मित्र आणि शेजाऱ्यांची ओळख करुन द्या : दर रविवारी मुलगा एखादे नवीन नातेवाईक किंवा शेजाऱ्यांना भेटेल असा प्रयत्न करा. पार्टीत किंवा तत्सम कार्यक्रमात लहान मुल हे बऱ्याचदा खूप साऱ्या अनोळखी लोकांना एकत्र पाहून घाबरते. पण, जर तुम्ही तुमच्या खास लोकांशी आणि त्यांच्या मुलांशी आपल्या मुलाची वेळोवेळी भेट घडवून आणत असाल तर मूल जसजसे मोठे होईल तसे या नात्यांमध्ये अधिकाधिक मिसळण्यास शिकेल.

इतर मुलांबरोबर मिसळू द्या, खेळू द्या : आपल्या मुलाला आपल्या आजूबाजूच्या किंवा त्याच्या शाळेतील इतर मुलांबरोबर मिसळण्यास मदत करा, जेणेकरून इतरांना सहकार्य करण्यासोबतच मिळूनमिसळून रहायचे असते, हे त्याच्या लक्षात येईल. मुले खेळतात तेव्हा ती एकमेकांशी बोलतात. एकमेकांत मिसळून जातात. यामुळे सहकार्याची आणि आत्मीयतेची भावना वाढते. त्यांची वृत्ती विकसित होते आणि त्यांना इतरांच्या समस्या समजतात. इतर मुलांशी मिळूनमिसळून जीवन मजेत जगण्याचा गुण त्यांच्या अंगी विकसित होतो, जो त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो.

जेव्हा मुले मोठी होत असतात

पालनपोषणात बदल घडवून आणत रहा : डॉ. संदीप गोविल सांगतात की, ‘‘मुलांच्या गरजेच्या वेळी मानसिक आणि शारीरिकदृष्टया त्यांच्यासोबत रहा, परंतु त्यांना त्यांची थोडी स्पेस द्या. त्यांच्याबरोबर नेहमीच सावलीसारखे राहू नका. आपण ३ वर्षांच्या आणि १३ वर्षांच्या मुलाबरोबर एकाच पद्धतीने वागू शकत नाही. मुलांच्या वागणुकीत बदल होऊ लागताच त्यानुसारच त्याला समजून घेऊन त्याच्याशी बोला.

गॅझेटसोबत कमी वेळ घालवू द्या

गॅझेट्सचा जास्त प्रमाणात वापर केल्याने मुलांच्या आजूबाजूला असलेला संबंध तुटतो. मेंदूत ताणतणावाची पातळी वाढते, ज्यामुळे वर्तन किंचित आक्रमक होते. यामुळे सामाजिक, भावनिक आणि एकाग्र होऊ न शकण्ययाची समस्या उद्भवते. सतत स्क्रीन पाहण्यामुळे अंतर्गत चक्र बिघडते.

मुलांना गॅझेटचा वापर कमीत कमी करू द्या, कारण त्याच्याबरोबर जास्त वेळ घालविल्यामुळे मुलांना स्वत:चा स्वत:शी आणि इतरांशीही संपर्क साधण्यातही समस्या येऊ शकतात. दिवसभरात २ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पहायला देऊ नका.

धार्मिक कार्यांपासून दूर ठेवा : आपल्या मुलांना अगदी लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी सांगा. त्यांना धार्मिक कार्य, पूजापाठ अशा अवैज्ञानिक विचारांपासून दूर ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें