मुलायम केसांसाठी योग्य उत्पादन

* पारुल भटनागर

केस सुंदर असल्यास चेहऱ्याचा रंग बदलतो. आजचे युग स्टाईलचे आहे आणि याच स्टाईलच्या मोहात महिला कधी केस रंगवतात, कधी हायलाइट करतात, कधी रिबॉन्डिंग करतात तर कधी हेअरस्टायलिंग उत्पादनांचा वापर करतात. काळासोबत ताळमेळ राखणे ही चांगली गोष्ट आहे, पण कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करून स्वत:चे नुकसान करून घेणे शहाणपणाचे नाही.

काहीवेळा सर्वकाही ठीक असते, परंतु जेव्हा तुम्ही स्टाईलच्या नावाखाली केसांवर जास्त प्रमाणात रसायने आणि उष्ण उत्पादने वापरण्यास सुरुवात करता किंवा केसांची काळजी घेत नाही तेव्हा केस खराब होतात. ही उत्पादने केसांतील नैसर्गिक ओलावा चोरून केस निर्जीव बनवतात.

इतकेच नाही तर केस गळती सुरू होते, केसांच्या दुभंगलेल्या टोकांची समस्या सुरू होते आणि केस रुक्ष होतात, जे तुमचे सौंदर्य कमी करण्याचे काम करतात.

अशा परिस्थितीत, खराब केसांवर विशेष उपचार करणे आवश्यक असते, जेणेकरून तुमच्या निर्जीव केसांना पुन्हा चमक मिळेल. याबद्दल जाणून घेऊया कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव यांच्याकडून :

सीरमने केस मॉइश्चराय करा

केसांतील आर्द्रता निघून गेल्यानंतरच केस खराब, निस्तेज होऊ लागतात.

परंतु जर खराब झालेले केस सीरमने हायड्रेटेड ठेवले तर हळूहळू ते पूर्ववत होऊ लागतात, कारण सीरम हे प्रदूषण आणि सूर्यप्रकाश यांच्यातील संरक्षणात्मक थर म्हणून काम करते. मात्र त्यासाठी तुमचे हेअर सीरम केसांच्या प्रकारानुसार असणे आवश्यक असते आणि ते लावण्याची पद्धत योग्य असावी लागते, तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही ते केसांना लावाल तेव्हा तुमचे केस थोडेसे ओलसर असायला हवेत. तुम्ही तुमच्या हातांवर सीरमचे काही थेंब घ्या, त्यांना दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून केसांना लावा आणि तसेच राहू द्या. यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या केसांवर चमक राहून ते मुलायम होतील. जेव्हा कधी तुम्हाला कोरडेपणा, रुक्षपणामुळे केस निर्जीव वाटतील त्यावेळी सीरम नक्की लावा. याला स्मूदनिंग ट्रीटमेंट असेही म्हणतात.

सीरममधील सामग्री

बाजारात तुम्हाला शेकडो सीरम मिळतील, पण तुम्ही तेच सीरम निवडा जे तुमच्या केसांना जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल. त्यासाठी सीरममध्ये कोणती सामग्री किंवा घटक वापरले आहेत, याची माहिती तुम्हाला असायला हवी.

* हलक्या वजनाचे सीरम सर्वोत्तम ठरते. यात ऑर्गन ऑईल, जोजोबा ऑइल आणि सनफ्लॉवर ऑईलचे गुणधर्म असतात. हे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करून केसांना निरोगी, मुलायम आणि चमकदार बनवते.

* कोकोनट मिल्क अँटीब्रेकेज सीरम हे कमी वेळेत केसांना चमकदार आणि निरोगी बनवते.

* सीरममधील ह्यालुरोनिक अॅसिड केसांना ओलावा मिळवून देते. केस घनदाट होण्यास मदत करते.

* यातील पॉलिफिनोल्स केसांना अँटीऑक्सिडंट्सचे संरक्षणात्मक कवच मिळवून देते.

* व्हिटॅमिन बी-१२ केसांना अतिशय मुलायम बनवते.

या सामग्रीपासून दूर राहा

* पीइजी, पॉलिक्वार्टेनियम, कृत्रिम रंग, डीसोडियम इडीटीए, सुगंध यासारख्या नुकसानदायी रसायनांपासून दूर राहा. सीरममध्ये सिंथेटिक सिलिकॉनचाही वापर केला जातो. तो केसांवर एक संरक्षणात्मक थर तयार करण्यासोबतच केसांमधील ओलावा पुरेशा प्रमाणात टिकवून ठेवण्याचे काम करतो. केसांचे नुकसान करणाऱ्या घटकांना केसांपर्यंत पोहोचू न देण्यासाठीही तो उपयोगी ठरतो.

हेअर कंडिशनर

कंडिशनर केसांना आवश्यक पोषक द्रव्ये देऊन त्यांना निरोगी, मुलायम बनवते. बहुतांश महिला असा विचार करतात की, केसांना रुक्ष होण्यापासून वाचवून मुलायम बनवण्यासाठी आम्ही कंडिशनरचा वापर केला होता, मात्र कंडिशनरचा वापर करून १ दिवस उलटताच केस जैसे थे होतात. कंडिशनरचा मात्र असा दावा असतो की, याच्या वापरामुळे केस अनेक दिवसांपर्यंत मुलायम राहतील.

असे होते कारण तुमच्या कंडिशनरमध्ये गरजेपेक्षा जास्त रसायनांचा वापर केलेला असतो ज्यामुळे केस कोरडे होतात.

त्यामुळेच जर तुमचे केस खराब झाले असतील तर कंडिशनर खरेदी करताना त्यात कोणती सामग्री वापरली आहे, हे माहीत करून घ्या तरच तुम्हाला कंडिशनरचा फायदा होईल.

कंडिशनरमधील सामग्री

* अवाकाडो ऑइलमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऑइल केसांना मजबूत बनवून अतिनील सूर्यकिरणांपासून त्यांचे रक्षण करते.

* वीट प्रोटीन तुमच्या केसांना मजबूत बनवून त्यांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्याचे काम करते.

* कंडिशनरमधील केराटिनचा वापर केसांसाठी उपयोगी ठरतो. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते. ते केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देते.

* ऑर्गन ऑइलमध्ये ओलिक आणि लिनोलेइक नावाचे फॅटी अॅसिड असते, जे तुमचे केस आणि केसांवरील त्वचेला फॅटी लेअर मिळवून देऊन केसांमधील कोरडेपणा दूर करते. केसांना नरम, मुलायम बनवते.

* पँथेनॉल म्हणजे व्हिटॅमिन बी ५ खूपच परिणामकारक असते जे केसांमधील मॉइश्चर वाढवण्याचे काम करते.

* शिया बटरमध्ये व्हिटॅमिन ए, इ आणि इसेन्शिअल फॅटी अॅसिड असते जे उष्ण उत्पादनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांना वाचवते. केसांमधील कोरडेपणा दूर करून त्यांची चमक वाढवण्यासाठी मदत करते.

या सामग्रीपासून दूर राहा

* पेरबेन्स, सल्फेट्स, ट्रिक्लोसन, सिंथेटिकचे रंग, सुगंध, रॅटीनील पल्मीटेड हे हळूहळू केसांमधील मॉइश्चर संपवण्यासह त्वचेच्या अॅलर्जीसही कारणीभूत ठरतात. म्हणूनच यांचा वापर करून बनवण्यात आलेल्या कंडिशनरचा वापर करू नका, अन्यथा खराब झालेले केस आणखी खराब होतील.

शाम्पू

धूळमाती आणि प्रदूषणामुळे केस खराब, रुक्ष होतात. यावर उपाय म्हणून आपण सतत शाम्पू करतो, पण कुठलीही माहिती न घेता ज्या शाम्पूचा वापर तुम्ही केसांना पोषण मिळवून देण्यासाठी करता त्याच शाम्पूमुळे तुमचे केस अधिक खराब होतात, याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यामुळे आठवडयातून किती दिवस शाम्पू करावा आणि कोणता शाम्पू वापरावा ज्यामुळे केसांना पोषण मिळून ते निरोगी राहतील, हे माहिती करून घेणे गरजेचे असते.

शाम्पूमधील घटक

* केसांच्या मुळापर्यंत जाऊन स्वच्छता करणारा शाम्पू सर्वोत्तम असतो. यात वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे केसांना पोषण मिळते. केसांमधील कोरडेपणा दूर होऊन केस मऊ, चमकदार दिसू लागतात.

* शाम्पूमध्ये फर्नेटेड राईस वॉटर, प्रो व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसिडसारखे घटक असतात जे काही दिवसांमध्येच निर्जीव झालेल्या केसांना दुरुस्त करण्याचे काम करतात.

* शाम्पूमधील सोया प्रोटीन केसांना पोषण देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेते, कारण यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन केस चमकदार होतात.

* हनी मॉइश्चर शाम्पू कोरडया आणि खराब झालेल्या केसांना हायड्रेट करून त्यांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्याचे काम करतो. केसांची मुळे मजबूत करून केस गळती रोखण्यास मदत करतो.

या सामग्रीपासून दूर राहा

शाम्पूमध्ये सोडियम लॉरेयल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट असते. ते केसांना कोरडे बनवते. यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

* पेराबेन्स आणि ऐथिल पेराबेन्स हे केसांच्या उत्पादनांचा टिकाऊपणा वाढवतात, मात्र ते महिलांमधील हार्मोन्सला प्रभावित करून कर्करोग होण्याचा धोका वाढवतात.

* शाम्पूला घट्ट बनवण्यासाठी सोडियम क्लोराईडचा वापर केला जातो, मात्र यामुळे केसांची त्वचा कोरडी होणे, जळजळ, केस गळतीची समस्या निर्माण होते.

* यात वापरण्यात आलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांची त्वचा खराब होते. अस्थमा, कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात.

* शाम्पूमधील सेलिनियम सल्फाईड कर्करोगाचे कारण बनू शकते.

* शाम्पूमध्ये वापरले जाणारे रंग रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याचे काम करतात.

द्य रॅटिनील पल्मिटेटमुळे त्वचा पिवळसर पडते. लाल चट्टे, जळजळ अशा समस्या निर्माण होतात.

हेअर मास्क

हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळते, कारण यात केसांना मॉइश्चर मिळवून देणारी तत्त्वे असतात. हे कंडिशनरच्या तुलनेत केसांना खूप जास्त पोषण मिळवून देते, पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा हेअर मास्क नैसर्गिक गोष्टींनी बनवलेले असते.

येथे आम्ही तुम्हाला काही अशा हेअर मास्कची माहिती देणार आहोत जे खराब झालेल्या केसांना पोषण मिळवून देण्यासोबतच केस मूलायम बनवण्याचेही काम करतात.

* केराटिन आणि ऑर्गन ऑइल हेअर मास्क केस गळती रोखून केसांना हायड्रेट, मॉइश्चर मिळवून देते. केसांना दुरुस्त करण्याचे काम करते. केराटिन हे आपल्या केसांमध्ये असलेले नैसर्गिक प्रोटीन असते, पण प्रदूषण, धूळमाती आणि उन्हामुळे ते केसांमधून गायब होते. ते पुन्हा केसांमध्ये परत येण्यासाठी कृत्रिम केराटिन उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे केस पुन्हा मुलायम होतात, तर ऑर्गन ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई केसांना मुलायम आणि सिल्की बनवण्याचे काम करते. विशेष म्हणजे हे सर्व प्रकारच्या केसांसाठी परिणामकारक असते. मार्केटमध्ये २०० मिलिलीटर हेअर मास्कची किंमत  सुमारे ५०० रुपये असते.

* रेड ओनियन ब्लॅक सीड ऑइलपासून बनवलेला हेअर मास्क केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देते. हे पातळ, कमकुवत आणि केस गळतीची समस्या दूर करते. यात पेराबिन, सल्फेट, सिलिकॉस आणि कोणतेही रंग नसतात. याचा अर्थ हे पूर्णपणे नैसर्गिक असते. यात व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंन्ट्स असल्यामुळे ते केसांची पीएच पातळी नियंत्रित ठेवते, तर ब्लॅक सीड ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंन्ट्स आणि नॅरिशमेंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ते फ्री रेडिकल्समुळे केसांच्या होणाऱ्या नुकसनापासून केसांचे रक्षण करून त्यांना सुदृढ बनवते.

* कोलेजन हेअर मास्क ब्लॅक सीड ऑइल आणि शिया बटरने बनवलेला असतो. यात रुक्ष, खराब झालेले केस पूर्ववत करण्याची क्षमता असते, कारण यात व्हिटॅमिन्स आणि आवश्यक फॅटी अॅसिड असल्यामुळे ते उष्णता आणि रसायनांमुळे केसांच्या होणाऱ्या नुकसनापासून केसांचे रक्षण करते. त्याच्या १०० ग्रॅम पाकिटाची किंमत सुमारे २५० रुपये असते.

* राईस वॉटर हेअर मास्क यासाठी खास आहे कारण यात उपलब्ध असलेले इनोसिटोल हे तत्त्व खराब झालेल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केसांना दुरुस्त करते. हे सल्फेट, सिलिकॉन आणि पेराबिन फ्री प्रोडक्ट आहे. याच्या २०० मिलिलीटर पाकिटाची किंमत सुमारे ५३० रुपये आहे.

केस सुंदर बनवण्याचे २० उपाय

* सोमा घोष

प्रत्येक मुलीला सुंदर फडफडते केस हवे असतात, परंतु या धावपळीच्या जीवनामुळे, प्रदूषणामुळे आणि तणावामुळे, ही इच्छा पूर्ण करणे थोडे कठीण तर आहे, परंतु अशक्य नाही. केसांची थोडी काळजी घेतल्यास आपण फडफडत्या केसांची मल्लिका बनू शकता.

या संदर्भात, क्यूटिस स्किन क्लिनिकच्या त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल म्हणतात की केसांची गुणवत्ता परिपूर्ण होण्यासाठी त्यांना थोडा वेळ देणे आवश्यक आहे. खालील २० हेयर हैक्स आहेत :

  • सर्व प्रथम, आपल्या टाळूनुसार कधी आणि किती वेळा शॅम्पू करायचे ते ठरवा. आठवडयातून दोनदा शॅम्पू करणे योग्य असते. जर आपल्या डोक्यावरील टाळू तेलकट असेल तर अल्टर्नेट दिवशी किंवा दररोज शॅम्पू करा.
  • केसांना तेल लावणे ही एक जुनी प्रथा आहे आणि याचा केसांच्या वाढीशी काही संबंध नाही, कारण तेल धूळ-माती आकर्षित करते, डोक्यात कोंडा बनवते, म्हणून केसांना तेल लावणे टाळा.
  • नेहमीच लूज केशरचनेचा अवलंब करा. कसून बांधलेल्या पोनीटेल किंवा वेणीमुळे केस गळतात.
  • शॅम्पू करतांना केसांपेक्षा टाळू स्वच्छ करण्याकडे अधिक लक्ष द्या. अधिक शॅम्पू घातल्यामुळे केस कोरडे आणि कोमट होतात.
  • टाळूऐवजी केसांवर कंडिशनर वापरा. टाळूवर अधिक कंडिशनर वापरल्यास केस निर्जीव होतात.
  • हे खरे आहे की निरोगी केस निरोगी शरीरातच येतात, म्हणून आहारावर नेहमीच लक्ष देणे आवश्यक असते. अन्नामध्ये जास्त प्रथिने ठेवा. हे केस निरोगी आणि मजबूत ठेवते. अंडी, मासे, सोयाबीन, हिरव्या भाज्या इत्यादींमध्ये समृद्ध प्रोटीन असतात, जे आपल्या आहारात नेहमीच समाविष्ट केले जावेत.
  • नेहमी व्हिटॅमिनची पातळी तपासा. आवश्यकतेनुसार पूरक आहार घ्या. अशक्तपणा असणे चांगले नाही. लोहाच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. जर केस जास्त गळत असतील तर केस तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
  • ध्यान करणे हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे तणाव कमी होतो, ज्यामुळे केस गळणे कमी होते. आपल्या नसा शांत ठेवण्यासाठी ध्यान करा.
  • धूम्रपान टाळा. कारण बऱ्याच संशोधनात असे दिसून आले आहे की स्मोकिंग केल्याने केसांना जास्त नुकसान होते.
  • आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त समृध्द अँटिऑक्सिडंट पदार्थ समाविष्ट करा जसे बेरी, एवोकॅडो आणि नट्स.
  • केसांची स्टाईल योग्यरित्या करणे आवश्यक आहे. टेक्स्चर आणि व्हॉल्यूम स्प्रे पर्क दोन्ही निर्जीव केसांसाठी चांगले असतात, तर कंडिशनर आणि कर्ल क्रीम दोन्ही कुरळया केसांसाठी चांगले असतात.
  • केसांमध्ये कोणत्याही प्रकारची हिट वापरण्यापूर्वी उष्णता संरक्षण स्प्रे आणि सीरम अवश्य लावा.
  • जर तुम्हाला ब्लो ड्राय करायचे असेल तर ते चांगल्या प्रकारे जाणून घ्या. घरी हेयर ड्राय करणे ठीक आहे, परंतु सरळ केसांसाठी सलून चांगले असते. याशिवाय आपण घरी केस सरळ करीत असाल तर केसांच्या मुळापासून टोकापर्यंत उष्णता मध्यम ठेवा. हे केसांचा एक गोंडस रंग दर्शवेल.
  • ब्लॉन्ड आणि लाल केसदेखील आकर्षक दिसतात कारण केसांवर प्रयोग करणे हे मजेदार आणि सुरक्षित असते. हेअर कलर केल्यानंतर योग्य शॅम्पू आणि कंडिशनर लावणे आवश्यक आहे.
  • जेव्हा आपल्याकडे केस धुण्यास वेळ नसतो तेव्हा केसांसाठी ड्राय शॅम्पू वापरणे ही सर्वात मोठी हॅक्स आहे परंतु लक्षात ठेवा की केस धुण्यासाठी ड्राय शॅम्पू हा पर्याय नाही.
  • केसांची निगा राखण्यासाठी काही घरगुती उपचार चांगले असतात. जसे एक हेअर मास्क केस चमकदार आणि मऊ बनवते. केसांनुसार एका वाडग्यात अंडयाची पांढरी जर्दी घ्या आणि ओल्या केसांना लावा आणि कंघी करा.
  • ओल्या केसांमध्ये कंडिशनर म्हणून अंडयातील बलक लावा आणि थोडा वेळ मालिश करा. लावून झाल्यावर २० मिनिटांनी धुवा. यामुळे तकतकीत लुक येईल.
  • दोन आठवडयात एकदा शॅम्पूमध्ये १ एस्पिरिन मिसळा आणि केसांवर लावा. यामुळे केसांचा निर्जीवपणा संपतो आणि ते निरोगी दिसतात.
  • टॉवेलने केस कधीही जास्त झटकू किंवा पुसू नका. केस धुतल्यानंतर, त्यांना टॉवेलने गुंडाळा. यामुळे ते कमी फिजी होतात आणि मऊ राहतात.
  • केसांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करणे सोपे आहे, परंतु वेळेत डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे आहे. स्टेम सेल ट्रीटमेंट, लेसर ट्रीटमेंट इ. खूप लोकप्रिय आहेत.

केस सुंदर बनवण्यासाठी टीप्स

* प्रतिनिधी

बदलती जीवनशैली आणि धावपळीमुळे वैयक्तिकरीत्या सौंदर्याची काळजी घेण्यास वेळ उपलब्ध नाही आणि आजकाल कोरोनामुळेही लोकांमध्ये तणावही वाढत आहे. या सगळयांमुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत थोडीशी काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या केसांचे सौंदर्य टिकवून ठेवू शकता :

* जर तुमची टाळू तेलकट असेल तर अल्टरनेट डे किंवा दररोज शॅम्पू करा.

* शॅम्पू करताना केसांपेक्षा टाळू स्वच्छ करण्याकडे अधिक लक्ष द्या, अधिक शॅम्पू लावल्याने केस कोरडे आणि खिळखिळे होतात.

* कंडिशनर टाळूऐवजी केसांवर वापरा. टाळूवर जास्त कंडिशनर वापरल्याने केस निर्जीव होतात.

* हे खरे आहे की निरोगी शरीरातच निरोगी केस राहतात, म्हणून नेहमी आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते. अन्नामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक ठेवा, यामुळे केस निरोगी आणि मजबूत राहतात. अंडी, मासे, सोयाबीन, हिरव्या भाज्या इत्यादी प्रथिने समृद्ध असतात, जे नेहमी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.

* आहारात बेरी, एवोकॅडो आणि नट्ससारखे अधिक समृद्ध अँटिऑक्सिडंट खाद्य पदार्थ समाविष्ट करा.

* केसांची स्टाईल योग्यरित्या करणे आवश्यक आहे. टेक्स्चर आणि व्हॉल्यूम स्प्रे पर्क दोन्ही निर्जीव केसांसाठी चांगले असतात, तर कंडिशनर आणि कर्ल क्रीम दोन्ही कुरळे केसांसाठी चांगले असतात.

* जर तुम्हाला ब्लो ड्राय करायचे असेल तर ते चांगले जाणून घ्या. घरी हेअर ड्राय करणे ठीक आहे पण सरळ केसांसाठी सलून चांगले असते. याशिवाय जर तुम्ही घरीच केस सरळ करत असाल तर उष्णता मध्यम ठेवा आणि केसांच्या मुळापासून टोकापर्यंत घ्या, यामुळे केसांना एक गोंडस लुक मिळेल.

* काही घरगुती उपाय केसांची निगा राखण्यासाठी चांगले असतात. ज्याप्रमाणे हेअर मास्क केसांना चमकदार आणि मऊ बनवते, केसांनुसार एका वाडग्यात अंड्याचे पांढरे बलक घ्या, ओल्या केसांमध्ये लावा आणि कोब करा.

* अंडयातील बलक ओल्या केसांना कंडिशनर म्हणून लावा आणि थोडा वेळ मसाज करा, २० मिनिटांनंतर ते धुवा. यामुळे ग्लॉसी लुक मिळेल.

* केसांना टॉवेलने कधीही जास्त पुसू नका किंवा पाडू नका, केस धुतल्यानंतर त्यांना टॉवेलने गुंडाळून ठेवा, यामुळे ते कमी झिजतात आणि मऊ राहतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें