गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २६ वर्षांची आहे आणि माझा प्रियकर माझ्यापेक्षा ५ वर्षांने मोठा आहे. यामुळे सेक्स संबंधांमध्ये एखादा त्रास होऊ शकतो का? मला त्याच्यासोबत सेक्स करायचा आहे परंतु कधी कधी वाटतं की तो मला साथ देऊ शकत नाही, कारण एकदा जेव्हा उशिरापर्यंत फोर प्ले केल्यानंतर तो त्याचं पेनिस इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तो वारंवार प्रयत्न करूनदेखील यशस्वी होऊ शकला नव्हता. त्याला एखादा त्रास आहे का? कृपया सल्ला द्या?

तुमच्या जोडीदाराचं वय एवढंदेखील कमी नाही की तो सेक्स करण्यामध्ये सक्षम नाहीए. खरंतर योग्य आहार संबंधी निर्देशांचे पालन आणि नियमित व्यायामाची सवय असेल तर सेक्स आनंद दीर्घकाळपर्यंत घेतला जाऊ शकतो.

असं साधारणपणे सेक्चुअल इंटरकोर्सच्या माहितीच्या अभावामुळे होतं. कदाचित गडबडीत अथवा एखाद्या भीतीमुळे तो सेक्स संबंध ठेवण्यास अयशस्वी होत असेल.

सेक्स आरामात करण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दोघांचं मन शांत असावं आणि वातावरणदेखील शांत असावं. सेक्सपूर्वी तुम्ही दोघं फोर प्लेचा आनंद घ्या. जेव्हा जोडीदार पूर्णपणे सेक्ससाठी तयार असेल तेव्हाच पेनिस इन्सर्ट करण्याला सांगा. नक्कीच तुम्हा दोघांना यामध्ये सुख मिळेल. परंतु लक्षात ठेवा, पुरुष जोडीदाराला या दरम्यान कंडोमचा वापर करायला नक्की सांगा.

मी २८ वर्षीय महिला आहे. गेल्या वर्षी लग्न झालं होतं, लग्नानंतर सासरी आली तेव्हा दोन-तीन दिवसातच समजून गेले की माझे पती मम्माज बॉय आहेत. ते त्यांच्या आईला विचारूनच प्रत्येक काम करतात आणि माझं एक अजिबात ऐकत नाहीत. खाण्यापासून ते पडद्याच्या रंगांपर्यंतची निवड माझ्या सासुबाईच करतात आणि मला माझ्या बोलण्याला ते महत्त्व देत नाहीत, यामुळे मी सतत तणावात असते कळत नाही काय करू?

तुमचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे. तुमचे पती समजूतदार आहेत आणि त्यांना असं वाटत नाही की अचानक आईकडे दुर्लक्ष करावं आणि तुमच्या बोलण्याला त्यांच्यासमोर महत्व द्यावं. यामुळे घरात विनाकारण तणावाचं वातावरण होईल. तुम्ही हळूहळू काळाबरोबर घरात तुमची जागा बनवा. तुम्ही तुमच्या सासूला सासूबाई न समजता आई समजा. त्यांच्यासोबत रिकाम्या वेळेत बसा, टीव्ही पहा, शॉपिंग करायला जा. त्यांचा आवडीचा ड्रेस विकत घेऊन त्यांना द्या. घरातील कामामध्ये त्यांची मदत करा.

जेव्हा तुमच्या सासूबाईंना खात्री होईल की तुम्ही चांगला संसार करू शकता, तेव्हा हळूहळू ते तुम्हाला सर्व जबाबदाऱ्या सोपवतील.

मी ४८ वर्षांची आहे. सेक्सची इच्छा होते तेव्हा ओलसरपणा कमी होतो. असं नाही की मला अजिबात सुख मिळत नाही. सांगा मी काय करू?

शक्यता आहे की ही समस्या मेनोपोजमुळे होत आहे कारण मेनोपॉजनंतर शरीरात फीमेल हार्मोन एस्ट्रोजनच्या अभाव होतो आणि यामुळेदेखील ही समस्या निर्माण होते.

शरीरात एस्ट्रोजेनच प्रमाण वाढविण्यासाठी तुम्ही आहारसंबंधी गरजांकडे लक्ष द्या. खाण्यात मोसमी फळं, हिरव्या भाज्या, दूध, पनीर इत्यादींचे नियमित सेवन करा आणि नियमितपणे फिरा आणि व्यायाम करा.

सेक्स करतेवेळी तुम्ही सध्या क्रीमचा वापर करू शकता. यामुळे ओलसरपणा राहील आणि सेक्सचा आनंद देखील येईल. सेक्स पूर्वी फोर प्ले करा यामुळे बराच काळपर्यंत कोरडेपणाच्या समस्येपासून वाचता येईल.

मी ५२ वर्षीय महिला आहे. पती जाऊन पाच वर्षे झाली आहेत. गेल्या काही महिन्यापासून एका २७ वर्षीय अविवाहित तरुणांशी माझे शारीरिक संबंध आहेत. तो माझी खूप काळजी घेतो आणि आम्ही एकमेकांच्या संमतीने संबंध ठेवले आहेत. माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत आणि केवळ सेक्सच नाही तर अडीअडचणींमध्ये देखील तो कायम माझ्या सोबत असतो. तो खूपच जोशीला आहे परंतु सेक्स करतेवेळी त्याला कंडोम लावायला आवडत नाही. खरंतर मी कुटुंब नियोजन केलं आहे यामध्ये काही धोका तर नाही ना? कृपया सल्ला द्या.

तुमच्या सेक्स पार्टनरचं सेक्सच्या दरम्यान कंडोमचा वापर न केल्यामुळे कुटुंब नियोजनाशी कोणताही संबंध नाहीए. सेक्स संबंधाच्या दरम्यान गर्भ राहील याची देखील खात्री असून नसल्यासारखी आहे. परंतु कंडोम फक्त गर्भनिरोधक मध्येच नाही तर यौन संक्रमणापासूनदेखील बचाव करण्याचं एक उत्तम साधन मानलं जातं. सेक्स पार्टनरला सांगा की त्याने सेक्सच्या दरम्यान कंडोमचा वापर करावा. यामुळे तुम्ही दोघेही यौन संक्रमणापासून वाचाल आणि तणाव मुक्त होऊन सेक्सचा आनंद घेऊ शकाल.

 

कौमार्यच चारित्र्याकरता प्रमाण का?

* मिनी सिंह

आपण २१ व्या शतकात जगत आहोत. माणूस चंद्रावर पोहोचला आहे. अनेक क्षेत्रात मुली मुलांच्या समानतेने वाटचाल करत आहेत. उलट अनेक क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. तरीही अजूनही काही लोक असे आहेत जे मुलींचे पावित्र्य त्यांच्या कौमार्यावरून ठरवतात. पुरुषांसाठी आजही मुलीचे कौमार्य महत्वाचे मानले जाते. आजही त्यांच्या पावित्र्याची पडताळणी केली जाते.

जरी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे पालन करतो, त्यांच्यासारखे खाणेपिणे, त्यांच्यासारखे उठणेबसणे, शिकणे, बोलणे, राहू इच्छितो, पण तरीही मानसिकता अजूनही १४-१५व्या शतकातील आहे. सुशिक्षित असूनही कुठेतरी मुलांची मानसिकता अजूनही अशीच आहे की त्यांची नववधू व्हर्जिन असायला हवी.

आजही भारतीय समाजात लग्नात मुलगी व्हर्जिन असणे अनिवार्य मानले जाते. मुली व्हर्जिन असणे घराची प्रतिष्ठा व चारित्र्य यांच्याशी तोलले जाते. जर लग्नाआधी मुलगी आपल्या पुरुष मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर तिला चारित्र्यहीन म्हटले जाते. पण जर मुलाने असे केले तर म्हटले जाते की हे वयच असे असते.

व्हर्जिनिटीचा अर्थ

व्हर्जिनिटीचा अर्थ कौमार्य म्हणजे मुलगी कुमारिका आहे व तिने याआधी कोणाशीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ती व्हर्जिन आहे. हे तपासण्यासाठी आपल्या समाजात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यात सर्वात विचित्र मार्ग म्हणजे पहिल्या रात्री बेडवर पांढरी चादर टाकून पाहणे की संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग पडले आहेत की नाही. कौमार्याबाबत आजही इतके गैरसमज आहेत की शिकलेसवरलेले लोकसुद्धा ही गोष्ट नाकारत नाही.

कौमार्याबाबत गैरसमज

पहिल्यावेळी शरीरसंबंध ठेवले की रक्तस्त्राव होतोच हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण ९० टक्के घटनांमध्ये पहिल्यावेळी सेक्स केल्यास रक्तस्त्राव होत नाही. एका संशोधनात असे आढळले की सेक्स दरम्यान रक्तस्त्राव होत नाही. घोडेस्वारी व टेम्पोन अशा खेळांमुळे पडदा फाटतो किंवा तो अत्यंत पातळ होतो किंवा राहातच नाही.

पहिल्या वेळी सेक्स करताना वेदना होतात, हा एक दुसरा गैरसमज आहे. जर सेक्सच्या वेळी मुलगा व मुलगी मानसिकदृष्टया तयार असतील तर शक्यता आहे की वेदना होणार नाहीत. पण जर मुलगी तणावाखाली असून सेक्ससाठी मानसिकदृष्टया तयार नसेल तर योनी कोरडी व आकुंचन पावली तर पहिल्या वेळी वेदना होण्याची शक्यता असते. जर सेक्सआधी योग्य प्रकारे फोरप्ले केला गेला तरी वेदनेची शक्यता कमी असते किंवा नसतेच.

व्हर्जिन मुलीच्या योनीचा आकार लहान असतो, हे खोटे आहे, कारण प्रत्येक मुलीच्या योनीचा आकार तिच्या शरीरयष्टीप्रमाणे असतो. व्हजायनाचा आकार लहानमोठा असणे किंवा शिथिल अथवा आकुंचन पावलेला असणे याचा तिच्या व्हर्जिन असण्याशी काहीही संबंध नाही.

टू फिंगर टेस्ट

अनेक लोकांचे म्हणणे आहे की मुलीच्या कौमार्याच्या टेस्टसाठी सर्वात भरवशाची टेस्ट टू फिंगर टेस्ट आहे. पण अशी कोणतीही टेस्ट नाहीए, ज्यावरून हे समजेल की मुलीचे कुणाशी संबंध होते किंवा नाही.

हे अतिशय क्लेशकारक आहे की बलात्कारपीडित स्त्रीच्या कौमार्याचे परीक्षण टू फिंगर टेस्टने केले जाते. याने कळते की त्या मुलीचा बलात्कार झाला आहे की नाही. पण अशा प्रकारची टेस्ट करणे म्हणजे एका बलात्कारानंतर दुसरा बलात्कार करण्यासारखे आहे. २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की टू फिंगर टेस्ट पीडितेला तेवढयाच वेदना देतात, जेवढया दुष्कर्म करताना होतात. कोर्टाने असेसुद्धा म्हटले आहे की अशी टेस्ट करणे बलात्कार पीडितेचा अपमान आहे. हे तिचे अधिकार नाकारणे आहे. सरकारने ही टेस्ट बंद करून दुसरा एखादा उपाय शोधावा.

एका तज्ज्ञाचा दावा आहे की आज समाज तंत्रज्ञान जगात आहे. एका पीडितेसोबत अशी टू फिंगर टेस्ट करणे अमानवीय आहे. ही टेस्ट पीडितेसोबत परत बलात्कार करण्यासारखे आहे. म्हणून या टेस्टवर पूर्णत: बंदी आणायला हवी.

सायकल चालवणे, घोडेस्वारी, डान्स, व्यायाम किंवा इतर कोणत्या कामामुळे पडदा आधीच नाहीसा झालेला असतो. अशात एखाद्या मुलीच्या चारित्र्याचा अंदाज लावणे स्वत:लाच धोका देण्यासारखे आहे. महिलेच्या कौमार्याचे परीक्षण करणे मागास समाजाचे लक्षण आहे.

कौमार्याचे परीक्षण

तुम्ही हे ऐकून अवाक् व्हाल की आजही एक समुदाय असा आहे ज्यात नवविवाहित वधूचे कौमार्य परीक्षण केले जाते. महाराष्ट्रातील कांजरभाट समाजात पहिल्या रात्री वधूच्या कौमार्याची तपासणी त्या समाजातील महिला करतात. पहिल्या रात्री वरवधूच्या बेडवर पांढरी चादर टाकली जाते. खोलीत जाण्याआधी दागिने व टोकदार वस्तू ज्या तिने घातल्या असतात, त्या काढल्या जातात, जेणेकरून तिच्या अंगावर कोणतीही जखम होऊन रक्त येऊ नये.

जर संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग दिसले तर वधू परीक्षेत पास झाली, जर असे घडले नाही तर ती नापास झाली. या कुप्रथेत केवळ वधूचेच परीक्षण होते, वराचे नाही. मुलाने लग्नाआधी कोणाशी संबंध ठेवले आहे अथवा नाही हे कोणीच विचारात घेत नाही आणि कोणाला विचारायचेसुद्धा नसते.

कांजरभाट समाजातील अनेक तरुण व महिला या प्रथेविरुद्ध आवाज उठवतात, पण अशांना समाजातून बहिष्कृत केले जाते. या समुदायातील तरुण ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ या शीर्षकाखाली ही मोहीम चालवत आहेत. यात व्हीचा अर्थ व्हर्जिनिटी आहे. या मोहिमेचे समर्थन करणाऱ्या एका युवकाला या समुदायाने चांगलीच मारहाण केली होती.

थोड्याफार प्रमाणात ही मानसिकता इतर वर्गातही आहे. पण ती अशाप्रकारे दिसून येत नाही. पती सतत हेच जाणून घेण्यात गुंतलेला असतो की आपली पत्नी लग्नाआधी इतर कोणावर प्रेम तर करत नव्हती ना?

हायमन सर्जरीची का आवश्यकता आहे

आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की डॉक्टरांनी यावरसुद्धा उपाय शोधला आहे. हो, गमावलेली व्हर्जिनिटी मुलगी परत मिळवू शकते.

एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार हे ऑपरेशन केवळ हायक्लास मुलीच नाही तर उच्चवर्गीय, मध्यम वर्गीय मुलीसुद्धा करू शकतात. एका चिकित्सक संस्थानांद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात मुली हे सगळे विवश होऊन करतात, जेणेकरून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या उद्भवणार नाही.

नागपुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. घिसड यांचे म्हणणे आहे की मुली त्यांच्या योनीच्या आच्छादनाला पूर्ववत करण्याबाबत विचारतात कारण त्यांना वाटत असते की जर त्यांचे लग्न एखाद्या रूढीवादी कुटुंबात झाले तर ते लोक तिचे जगणे कठीण करून टाकतील.

डॉक्टर पुढे सांगतात की पालक स्वत:च मुलीला ऑपरेशन करण्यासाठी घेऊन येतात. व्हर्जिनिटी नष्ट होण्याचे कोणतेही कारण असो, जर आईबापांसोबत मुलगी आली तर तिचे मनोबल कायम राहते.

काय आहे ही हायमन सर्जरी

जर एखाद्या मुलीने कोणत्याही कारणास्तव आपली व्हर्जिनिटी गमावली असेल तर ती ही सर्जरी करू शकते. या सर्जरीत घाबरायचे कोणतेच कारण नाही ना याचे कोणते साईडइफेक्ट्स आहेत. ही सर्जरी करून कोणतीही महिला कुमारिका होऊ शकते.

मुलं कितीही उच्च विचारी असण्याचा दावा करत असतील तरी आजही त्यांचे लक्ष मुलीच्या कौमार्यावरच असते. पण आता त्यांना ही मानसिकता  बदलावी लागेल. आज जर मुलींना ही सर्जरी करावी लागत असेल तर ते केवळ त्या पुरुषी मानसिकतेमुळेच, ज्यांना लग्नानंतर आपल्या बायकोकडून हे सिद्ध करून घायचे असते की तिचे कौमार्य सुरक्षित आहे वा नाही, भले त्यांचे स्वत:चे अनेक मुलीशी संबंध का असेना.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें