मजा बनू नये सजा

– शैलेंद्र सिंह

हिमाचल प्रदेशातील एका महिला नेत्याचा बाथरुममधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना मोठा फटका बसला. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय समाजात होणारी बदनामी वेगळीच होती. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तो दोघांच्या मर्जीने बनवण्यात आला असून त्यामागे त्यांचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता हे स्पष्ट झाले. दोघांनी एकमेकांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने हे केले नव्हते. तरीही सोशल मीडियावर तो अचानक व्हायरल झाल्याने त्यांच्यासाठी तो घातक ठरला.

जिव्हाळयाच्या क्षणांचा व्हिडिओ वादाचा मुद्दा बनण्याची ही पहिलीच घटना नाही. काही काळापूर्वी मथुरेतील एका पुजाऱ्याचेही असेच प्रकरण समोर आले होते. त्याचे त्याच्या परदेशी शिष्येसोबतचे सेक्सी क्षणांचे अनेक व्हिडिओ होते, जे त्याच्या स्वत:च्या लॅपटॉपवर होते. एके दिवशी लॅपटॉप खराब झाला.

त्याने तो दुरुस्त करायला दिला तेव्हा तेथून ते व्हिडीओ बनले आणि सीडीच्या माध्यमातून बाजारात पोहोचले. त्यावेळी व्हॉट्सअॅप वापरात नव्हता. त्यामुळे मथुरेतील ती घटना सीडीच्या माध्यमातूनच प्रकाशझोतात आली.

सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये राजकारण्यांसह अनेक बडया लोकांचे सेक्सी क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चेत आले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आहे. असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्वत:च्या जीवाचे बरे-वाईट करून घेण्याचा प्रयत्नही केला.

प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीमध्ये बनवलेले असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते. अशा स्थितीत असे व्हिडिओ किंवा फोटो बनू न देणे आवश्यक आहे.

ब्लॅकमेलिंगचे साधन : २० वर्षीय रेखा यादवने तिचा प्रियकर विशाल गुर्जरला चुंबन देतानाचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ दोघांनी केवळ त्यांच्यातील नात्याची खोली दाखवण्यासाठी बनवला होता. काही वेळाने तो व्हिडिओही डिलीट करण्यात आला, मात्र रेखाची मैत्रीण पूनमने रेखाचे मेमरी कार्ड घेतले. त्यातून पूनमचा स्वत:चा काही डेटा डिलीट झाला, जो खूप महत्त्वाचा होता. जेव्हा तिने तिचा मित्र दीपकला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, असे एक सॉफ्टवेअर आहे ज्यातून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवता येऊ शकतो.

दीपकने पूनमचे मेमरी कार्ड घेतले आणि तिचा डेटा मिळवला. त्यात रेखा यादव आणि तिचा प्रियकर विशाल गुर्जरचा चुंबनाचा व्हिडिओही सापडला. त्यानंतर दीपकने रेखाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

तंत्रज्ञानाचा गैरवापर

सॉफ्टवेअर अभियंता दीपक जाटव सांगतात की, आता असे सॉफ्टवेअर्स आहेत जे मेमरी कार्ड किंवा कम्प्युटर, लॅपटॉपमधून फोटो किंवा व्हिडिओ रिकव्हर करू शकतात, जे खूप पूर्वी डिलीट झाले होते. अशा स्थितीत एकच मार्ग उरतो की, तुमचे नाते कितीही खोलवर असले तरी त्या सेक्सी क्षणांचे फोटो किंवा व्हिडिओ बनवणे टाळावे.

अनेकदा असेही दिसून आले आहे की, जेव्हा परस्पर संबंध तुटतात तेव्हा लोक असे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करतात. सोशल मीडिया हे आता असे माध्यम बनले आहे की अशा गोष्टी देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला वेळ लागत नाही. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्यावेळी अशा घटना समोर येतात. तेव्हा लोकांना वाटते की असे कसे घडले?

सहसा प्रेयसीला विश्वास बसू लागतो की, लग्न होणारच आहे, मग सेक्स करताना व्हिडिओ बनवला तर काय फरक पडतो?

करिअर होते उद्धवस्त

चांगले करिअर घडवत असतानाच अनेकदा जिव्हाळयाच्या क्षणांचे हे फोटो आणि व्हिडिओ समोर येतात. अलीकडे अनेक नेत्यांचे असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता व्हिडिओमधला चेहराही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदलता येतो.

नुकताच गुजरातचा नेता हार्दिक पटेलचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जेव्हा तो तिथल्या सरकारविरोधात मोठी लढाई लढत होता. असे नेते, अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील लोक, समाजसेवक यांची संख्या कमी नाही. सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होणे ही फार मोठया आश्चर्याची गोष्ट नाही.

अशा घटना कायदेशीरदृष्टया चुकीच्या मानल्या गेल्या तरी त्या व्हायरल करणाऱ्यांवर आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, पण हे खूप अवघड काम आहे. शिक्षा होण्यापूर्वीच ज्याचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होतो, तो पुरता कोलमडून जातो.

समाजावर प्रभाव

सोशल मीडियाचे माध्यम समोर आल्यानंतर असे व्हिडिओ आणि फोटो वेगाने व्हायरल होऊ लागले आहेत, ज्याचा समाजावर वाईट परिणाम होऊ लागला आहे. अलीकडच्या काळात लोकांचे मनोधैर्य इतके वाढले आहे की, बलात्कारासारख्या घटनांचे व्हिडिओ त्यांच्याच गळयातील फास बनले आहेत. त्या व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी आधी त्यांची ओळख पटवली आणि नंतर त्यांना तुरुंगात पाठवले. अशा परिस्थितीत हे व्हिडीओ गुन्हेगाराला तुरुंगात पाठवण्याचे साधनही बनले.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही असे व्हिडिओ बनवून पॉर्न साइट्सवर विकण्याचा व्यवसाय करतात. हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून आधी त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ शूट करतात आणि नंतर त्यांची पॉर्न साइटवर विक्री करतात.

अशा परिस्थितीत जिव्हाळयाच्या क्षणांचे बनवलेले हे व्हिडिओ किती धोकादायक असू शकतात याची कल्पना करणे सोपे नाही. यापासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा जिव्हाळयाच्या क्षणांचे व्हिडिओ बनवणे टाळणे. भावनिकता आणि प्रेमाची खोली व्यक्त करण्यासाठी बनवलेले हे व्हिडिओ व्हायरल होऊन कधी गळफास बनतील, हे कळणारही नाही. त्यामुळे अशी लाजिरवाणी परिस्थिती टाळण्यासाठी जिव्हाळयाच्या क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो काढणे टाळणे आवश्यक आहे. जिव्हाळयाचे क्षण तुमचेच असतात.

नोकरदार स्त्रिया कौशल्यांवर ताबा आर्थिक स्वातंत्र्याचा

* गरिमा पंकज

महामारी आणि मंदीमुळे नोकरदार स्त्रियांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अभ्यासानुसार, आपल्या देशात नोकरदार स्त्रियांची संख्या खूपच कमी आहे. भारतात काम करण्याचे वय असलेल्या ६७ टक्के पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या फक्त ९ टक्के आहे.

स्वातंत्र्याला ७४ वर्षांहून अधिक काळ लोटूनही, रोजगाराच्या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग खूपच कमी आहे, विशेषत: तरुणींना त्यांच्या करिअरच्या मार्गात अनेक अडथळे आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यांच्यासाठी, रोजगाराच्या क्षेत्रात लैंगिक भेदभावाची असलेली स्थिती ही आजही १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला होती तशीच आहे.

स्त्रियांनी कितीही तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेतले, तरी त्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक असमानतेचा फटका सहन करावा लागतो. आजही त्यांच्या वाटयाला कमी पगाराच्या नोकऱ्या येतात.

महामारीचा फटका नोकरदार स्त्रियांना

आजकाल चांगल्या नोकऱ्या, ज्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत, त्या कमी होत चालल्या आहेत. करारावर आधारित नोकऱ्या अधिक आहेत. सीएमआयईच्या अभ्यासानुसार, नोकरदार स्त्रियांसाठी हा खूप कठीण काळ आहे.

साथीच्या आजारामुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत. ७१ टक्के पुरुष, तर ११ टक्के स्त्रिया नोकरी करतात. असे असूनही, स्त्रियांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण तब्बल १७ टक्के आहे, तर पुरुषांमध्ये ते यापेक्षा खूपच कमी म्हणजे फक्त ६ टक्के आहे. याचा अर्थ असा की, नोकरी शोधणाऱ्या खूप कमी स्त्रिया आहेत आणि पुरुषांच्या तुलनेत त्यांना नोकरी मिळणे खूप अवघड आहे. नोकरीच्या क्षेत्रात स्त्रियांशी केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये स्त्री कामगारांची संख्या केवळ १०.७ टक्के होती तर लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये १३.९ टक्के  स्त्रियांना नोकरी गमवावी लागली होती. नोव्हेंबर २०२० पर्यंत, बहुतेक पुरुषांनी त्यांच्या नोकऱ्या परत मिळवल्या होत्या, परंतु स्त्रियांच्या बाबतीत असे होऊ शकले नाही. नोव्हेंबर, २०२० पर्यंत, ४९ टक्के स्त्रियांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या, मात्र फार कमी स्त्रियांना काम परत मिळू शकले.

ऑनलाइन प्रोफेशनल नेटवर्क ‘लिंक्डइन अपॉर्च्युनिटी-२०२१’ ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की,  साथीच्या रोगामुळे स्त्रियांवर अधिक परिणाम झाला आहे आणि त्यांना अधिक दबावाचा सामना करावा लागत आहे. हे सर्वेक्षण १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकांवर ऑनलाइन करण्यात आले होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपानसह ७ देशांतील लोक सहभागी झाले होते.

सर्वेक्षणानुसार, कोरोना महामारीचा परदेशात काम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा भारतातील नोकरदार स्त्रियांवर जास्त परिणाम झाला. ९० टक्के स्त्रिया कोरोनामुळे दबावाखाली आहेत. संपूर्ण आशिया पॅसिफिक देशांमध्ये स्त्रियांना काम आणि पगारासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागते. २२ टक्के स्त्रियांचे असे म्हणणे आहे की, त्यांना पुरुषांसारखे प्राधान्य दिले जात नाही.

देशातील ३७ टक्के नोकरदार स्त्रियांच्या मते, त्यांना पुरुषांपेक्षा कमी संधी मिळतात. २५ टक्के पुरुषही या मताशी सहमत आहेत. या स्त्रियांचे म्हणणे असे आहे की, त्यांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो.

कार्यालयीन कामासह घर सांभाळण्याची जबाबदारी

तरुणी जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडतात तेव्हा सुरुवातीला त्यांना नोकरी मिळणे खूप कठीण होते. घर आणि मातृत्वाच्या जबाबदारीमुळे तिला नोकरी मिळवण्यात अडचणी येऊ लागतात. कुटुंबातील सदस्य तिला घर सांभाळण्याचा सल्ला देतात.

नोकरीच्या ठिकाणी स्त्रीला कराव्या लागणाऱ्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जाते आणि ती हसतमुख चेहऱ्याने स्वयंपाक करण्यासाठी वेळेवर घरी येईल, घर आणि मुलांची काळजी घेईल, स्वच्छता करेल, अशी अपेक्षा केली जाते. त्यामुळेच मुली नोकरीतील अधिक जबाबदारीचे पद घेणे टाळतात.

कार्यालयातील वरिष्ठही मुलींना महत्त्वाची पदे देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात. कुठेतरी ते हेही लक्षात ठेवतात की, लग्नानंतर तिला नोकरी करण्यात किंवा नोकरीवरील जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ते तिला कमी महत्त्वाच्या पदावर ठेवतात. स्त्रियांनाही या सर्व परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्या साध्या कामाला महत्त्व देतात. जवळपास दोन तृतीयांश नोकरदार स्त्रियांना कौटुंबिक आणि घरगुती जबाबदाऱ्यांमुळे कामाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागतो.

कमी पगाराची नोकरी

गृहिणी आपल्या घरच्या सुनेला अशी नोकरी करण्याचा सल्ला देते जिथे कमी वेळ द्यावा लागेल आणि पगार कमी असला तरी कार्यालयही जवळपास असेल. तुझ्या पगारावर घर चालत नाही, मग पगाराच्या मागे लागून घरच्या जबाबदाऱ्यांकडे का पाठ फिरवायची, असा त्यांचा युक्तिवाद असतो.

या सर्व गोष्टींमुळे नकळत स्त्रिया कमी पगाराच्या नोकऱ्यांकडे ढकलल्या जातात. घर आणि मुले सांभाळण्यात गुंतलेल्या स्त्रिया हळूहळू चांगली नोकरी आणि करिअरची स्वप्नं विसरून जातात आणि स्वत:ला कुटुंबात बंदिस्त करायला शिकतात.

लग्नानंतर, बहुतेक स्त्रियांनी नोकरी न करणे किंवा कमी पगाराची नोकरी करणे यामागील एक कारण म्हणजे त्यांना नोकरी करायची असूनही त्यांच्यावर अनेक बंधने लादली जातात. उदाहरणार्थ, घरातील वडीलधारी मंडळी स्त्रीला सल्ला देतात की, तिने संध्याकाळी ७ वाजायच्या आत घरी यायलाच हवे.

अतिआवश्यक असूनही तिला मिटींगसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची परवानगी कुटुंबाकडून मिळत नाही. याउलट घरातला कोणताही सदस्य आजारी असेल तर सर्वप्रथम तिलाच सुट्टी घ्यावी लागते.

कोणत्याही घरात, पुरुष हा कमावणारा मुख्य सदस्य मानला जातो. स्त्रियांना पुढे येण्याची संधी कमी मिळते. स्त्रीही कमी पगाराची नोकरी करते, कारण ती नोकरी करते की नाही, हे घरच्यांसाठी महत्त्वाचे नसते. त्यामुळेच तिला अनेकदा अशी नोकरी शोधण्याचा सल्ला दिला जातो, जिथे पगार कमी असला तरी घरातली कामेही ती सहज करू शकेल.

शहरांमध्ये जास्त वाईट परिस्थिती

सीएमआयईच्या कंझ्युमर पिरॅमिड्स हाऊसहोल्ड सव्हेमध्ये भारतीय स्त्रीच्या नोकरीमधील सहभागाबाबतचे २ अनपेक्षित पैलू दिसून आले. यातील सर्वात पहिला म्हणजे, शहरांतील सुशिक्षित स्त्रियांपेक्षा ग्रामीण भागातील स्त्रिया जास्त कामाला जातात.

२०१९-२० मध्ये काम करणाऱ्या ग्रामीण महिलांची संख्या ११.३ टक्के तर शहरी महिलांची संख्या केवळ ९.७ टक्के होती. दोन्हीकडची परिस्थिती विभिन्न असली तरी शहरी सुशिक्षित स्त्रियांना नोकरीच्या अधिकाधिक संधींची अपेक्षा असणे स्वाभाविक असते. वास्तव मात्र याच्या उलट आहे. दुसरे म्हणजे, तरुणींना चांगली नोकरी मिळवण्यात अधिक अडचणी येतात.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार, गावातील स्त्रिया शहरी लोकसंख्येच्या तुलनेत घराबाहेर जास्त काम करतात. गावांमध्ये ३५ टक्के पेक्षा जास्त स्त्रिया शेतात काम करतात आणि यातील ४५ टक्के स्त्रिया वर्षभरात ५० हजार रुपयेही कमवू शकत नाहीत. यातील केवळ २६ टक्के स्त्रिया त्यांच्या इच्छेनुसार पैसे खर्च करण्यास सक्षम असतात.

शहरी भागात, २ ते ५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबात केवळ १३ टक्के स्त्रिया कामावर जातात, तर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न गटात ही टक्केवारी केवळ ९ आहे. याचप्रमाणे ५० हजार ते ५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये गावात काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी १६ ते १९ आहे.

हिंसा आणि लैंगिक शोषण

अलीकडेच ‘हर रिस्पेक्ट’ या स्वयंसेवी संस्थेने भारतीय कारखान्यांतील स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारावर आधारित डेटा प्रकाशित केला आहे. हा डेटा प्रामुख्याने एका अभ्यासावर आधारित आहे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ११,५०० स्त्री आणि पुरुष तसेच कामावरील त्यांचे व्यवस्थापक यांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना लैंगिक असमानतेचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. यात रोजगार, वेतनाचाही समावेश आहे. ही आकडेवारी भारतीय समाजात स्त्रीसोबत होणारा भेदभाव, हिंसा आणि लैंगिक शोषण स्पष्टपणे दर्शवते.

या अभ्यासात सहभागी झालेल्या ३४ टक्के पुरुष आणि स्त्री कामगारांनी असे सांगितले की, अनेकदा अशी वेळ येते जेव्हा एखादी स्त्री स्वत:च तिला होणाऱ्या मारहाणीसाठी कारणीभूत असते. इतकेच नाही तर ३६ टक्के कामगारांनी हेदेखील मान्य केले की, जर एखाद्या पर्यवेक्षकाने स्त्री कर्मचाऱ्याकडे संभोगाची इच्छा व्यक्त केली आणि तीही त्यास तयार झाली तर तो लैंगिक छळ नाही. अहवालानुसार, २८ टक्क्यांहून अधिक लोकांनी पतीने पत्नीला मारहाण करणे गैर नसल्याचे सांगितले.

अशी अनेक कारणे या अभ्यासात देण्यात आली आहेत, ज्यामुळे घर किंवा कार्यालयात स्त्रियांवर अत्याचार होतात. याचे श्रेय पुरुषी सामाजिक जीवनसरणी आणि लिंगभेद आहे, जो स्त्रियांना पुरुषांच्या अधीन ठेवतो. सुरुवातीपासूनच असा मतप्रवाह रूढ झाला आहे की, सामाजिक आणि आर्थिकदृष्टया स्त्री ही पुरुषावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत कुठेतरी स्त्रीला घर आणि कार्यालयात अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते जे अगदी स्वाभाविक आहे. पद असो किंवा पगार, स्त्रीमध्ये पुरुषांइतकीच क्षमता असूनही अनेकदा तिला दुय्यम स्थान दिले जाते.

विचारसरणीत बदल गरजेचा

यूएनडीपी (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम)च्या अहवालात ७५ देशांतील लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला. जगातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहते. या अभ्यासानुसार, असे दिसून आले की, समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी स्त्रियांना अनेक अदृश्य अडथळयांचा सामना करावा लागतो.

अहवालात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यात समाविष्ट असलेल्यांपैकी जवळपास निम्म्या लोकांना असे वाटते की, पुरुष हे सर्वोत्तम राजकीय नेते आहेत, तर ४० टक्के पेक्षा जास्त लोकांचे मत होते की, पुरुष चांगले व्यावसायिक, अधिकारी आहेत, म्हणूनच जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा पुरुषांनाच अशा प्रकारचे काम किंवा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.

घरात मुलगा आणि मुलगी दोघेही असतील तर त्या मुलाला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी पाठवायला कुणाची काहीच हरकत नसते, पण मुलीला मात्र फार तर छोटी-मोठी नोकरी करायला त्याच शहरात पाठवले जाते आणि तेही तिने घरच्यांची खूप समजूत काढल्यानंतर. अशा प्रकारच्या विचारसरणीत बदल होणे अत्यंत गरजेचे आहे.

आजही सामाजिक अडथळयांमुळे स्त्रियांना इच्छा असूनही आर्थिक विकासात हातभार लावता येत नाही. आर्थिक स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी जोपर्यंत स्त्रियांचा विकास आणि स्वातंत्र्याकडे समानतेच्या विचारसरणीतून पाहिले जात नाही तोपर्यंत त्यांना संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकत नाही.

वाईट नजरांपासून बचाव इतका वेदनादायी का?

* गरिमा पंकज

मेट्रो स्टेशनवर असो वा गजबजलेल्या रस्त्यावर असो, बसमध्ये असो वा बाईकवर किंवा रिक्षावर असो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मुली नेहमी दुपट्टा किंवा स्टोलने आपला संपूर्ण चेहरा आणि केस झाकून ठेवतात. त्यांचे फक्त डोळे दिसतात. कधीकधी तर त्यावरही गॉगल असतो. या मुलींचे वय १५ ते ३५ असते. आता तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहत असेल की शेवटी या मुली डाकूप्रमाणे आपला चेहरा का लपवत असतात? अखेरीस प्रदूषण, धूळमातीचा पुरुषांना आणि जास्त वयाच्या महिलांनाही त्रास होतो, मग या मुली कोणापासून बचावाचा प्रयत्न करत असतात?

तशा तर, या मुली वाईट नजरांपासून बचाव करू पाहतात. पुरुष जात तशी तर महिलांना अतिशय सहयोग देत असते पण अनेकदा गर्दीत मुलींचा सामना अशा नजरांशीसुद्धा होतो, ज्या कपडयांसोबत शरीराचाही पूर्ण एक्सरे घेत असतात. अशा नजरांमध्ये वासनेच्या ज्वाला स्पष्ट दिसून येतात. संधी मिळताच अशा नजरेची माणसं या मुलींना पकडून त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांचे पंख उध्वस्त करून फेकून देतात.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या २०१४च्या अहवालानुसार आपल्या देशात दर तासाला ४ बलात्कार म्हणजे दर १४ मिनिटात एक बलात्कार होतो. अशा परिस्थितीत मुलींनी स्वत:च आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या नजरांपासून स्वत:ला सोडवणे ज्या त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारतात. त्यांच्या धैर्याला मुळापासून नाहीसे करतात. हेच कारण आहे की आता मुली जुडोकराटे शिकत आहेत. लाजाळू बनण्यापेक्षा कुस्तीत मुलांना पराभूत करणे त्यांना आवडू लागले आहे. पायलट बनून आपल्या स्वप्नांना पंख देणे शिकू लागल्या आहेत, नेता बनून संपूर्ण समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत.

पण सत्य हे आहे की उदाहरण बनणाऱ्या अशा महिला आता जास्त नाहीत. आजही अशा महिलांची संख्या अधिक आहे, ज्यांच्यासोबत भेदभाव आणि क्रुरतेचा भयानक खेळ खेळला जात आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते आणि हे काम केवळ पुरुषच करत नाही, अनेकदा महिलासुद्धा महिलांशी असे वर्तन करतात. सुरक्षेच्या नावावर त्यांच्या आयुष्याशी खेळत राहतात.

अशीच एक मनाचा थरकाप उडवणारी प्रथा आहे, पुरुषांच्या वाईट नजरांपासून बचाव करण्यासाठी ब्रेस्ट आयर्निंग.

ब्रेस्ट आयर्निंग

ब्रेस्ट आयर्निंग म्हणजे छाती गरम इस्त्रीने दाबणे. या परंपरेत मुलींच्या छातीला एखाद्या गरम वस्तूने दाबून टाकले जाते, जेणेकरून त्यांच्यावर आलेल्या वक्षांची वाढ थांबवली जाईल आणि त्यांना पुरुषांच्या वाईट नजरांपासून सुरक्षित ठेवता येईल.

आफ्रिका महाद्वीपातील कॅमरून, नायजेरिया आणि साऊथ आफ्रिकेतील अनेक समुदायात असे मानले जाते की महिलांची छाती जाळल्यास त्याची वाढ खुंटते. तेव्हा पुरुषाचे लक्ष मुलींकडे जाणार नाही. यामुळे बलात्कारासारख्या घटना कमी होतील. किशोरवयीन मुलींचे पालकच त्यांच्यासोबत असे घृणास्पद वर्तन करतात. ब्रेस्ट आयर्निंगच्या ५८ टक्के घटनांमध्ये मुलींच्या आयाच हे दुष्कृत्य करतात. दगड, हातोडा व चिमटयाला गरम करून मुलींच्या छातीवर लावले जाते, जेणेकरून त्यांच्या छातीतील पेशी कायमस्वरूपी नष्ट होतील.

ही वेदनादायी प्रक्रिया केवळ यासाठी की मुलींना तरुण दिसण्यापासून दूर ठेवले जावे. जास्तीतजास्त काळ ती मुलगी लहान दिसावी आणि अशा पुरुषांच्या दृष्टीआड राहावी जे त्यांना पळवून नेतात. त्यांचे लैंगिकशोषण करतात किंवा त्याच्यावर अश्लील शेरे मारतात. म्हणजे हा संरक्षणाचा एक मार्ग मानला जातो. यौनशोषणापासून रक्षण, बलात्कारापासून रक्षण, पुरूषांच्या मुलींप्रति आकर्षणापासूनन रक्षण.

कॅमरूनमधील बहुतांश मुली ९-१० वर्षांच्या वयातच ब्रेस्ट आयर्निंगच्या प्रक्रियेतून जातात. ब्रेस्ट आयर्निंगची ही बीभत्स प्रक्रिया मुलींसोबत सतत २-३ महिने सुरु असते.

आफ्रिकेच्या गिनियन गल्फची लोकसंख्या जवळपास दीड कोटी आहे आणि इथे साधारण २५० जमाती राहतात. टोगो, बेनिन आणि इक्काटोरियल गुनियाला लागून असलेल्या या देशाला ‘मिनिएचर आफ्रिका’सुद्धा म्हटले जाते. या विचित्र प्रथेमुळे गेल्या काही काळापासून कॅमरून चर्चेत आहे.

मुळात पश्चिमी आफ्रिकेत सुरु झालेली ही परंपरा आता ब्रिटनसहीत अन्य युरोपियन देशांपर्यंत पोहोचली आहे. एका अनुमानानुसार ब्रिटनमध्येसुद्धा जवळपास १,००० मुलींना अशा प्रक्रियेतून जावे लागते.

या प्रथेचा मुलींच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो, केवळ शारीरिकच नाही तर मानसिकसुद्धा. ब्रेस्ट आयर्निंगमुळे त्यांना इन्फेक्शन, खाज, ब्रेस्ट कॅन्सर यासारखे आजार होतात. भविष्यात स्तनपान करण्यातसुद्धा त्रास सहन करावा लागतो.

महत्वाचे हे की इतर आफ्रिकी देशांच्या तुलनेत कॅमरून ह्या देशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे. लैंगिक आकर्षण आणि प्रदर्शनापासून दूर राहण्यासाठी केली जाणारी ही प्रक्रिया असूनही येथील मुली अल्प वयातच गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये पुढे येत असतात.

स्पष्टच आहे, ब्रेस्ट आयर्निंगमुळे या धारणेला बळकटी येते की मुलींच्या शरीराचे आकर्षणच पुरुषांना लाचार करते की ते अशा प्रकारचे दुष्कृत्य करतात, लैंगिक अत्याचार वा बलात्कार यासारख्या घटनांमध्ये पुरुषांची काही चूक नसते.

ही प्रथा व्हॉयलेन्स या अंतर्गत येते. एक असा हिंसाचार जो सुरक्षेच्या नावावर घरातील लोकच करतात आणि आपल्याच मुलीचे जीवन बरबाद करतात.

जगभरात मुलींना अशा वेदनादा प्रथांमधून जावे लागते, जेणेकरून त्यांचे चारित्र्य चांगले राहावे. जणूकाही चारित्र्य अशी गोष्ट आहे जिला अशा निरर्थक प्रथांद्वारे चोरण्यापासून वाचवले जाऊ शकते.

कुप्रथांचा काळा इतिहास

महिलांवर अत्याचार होण्याचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि मार्गही अनेक आहेत. निरनिराळया प्रकारच्या प्रथा आणि परंपरा यांच्या नावावर त्यांच्यासोबत जबरदस्ती केली जाते, त्यांना त्रास देण्यात येतो आणि वेदना दिल्या जातात. त्यांच्या शरीरासोबतच त्यांच्या मनाला पायदळी तुडवले जाते. काही अशाच कुप्रथांबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्यांचा उद्देश कधी महिलांची पवित्रता तपासून पाहणे असतो तर कधी त्याची सुरक्षा, तर कधी त्यांचे सौंदर्य वाढवणे तर कधी कुरूप बनवणे. म्हणजे कारण काहीही असो पण मुळात उद्देश त्यांची प्रतारणा करणे आणि त्यांना पुरुषांच्या अधीन ठेवणे हा असतो :

* स्त्रियांना खतना यासारख्या कुप्रथेचे शिकार व्हावे लागते. यात स्त्रीचे क्लायटोरिस कापले जाते, जेणेकरून त्यांना सेक्स करण्याची इच्छा होणार नाही. भारतात या प्रथेचे चलन बोहरा मुसलमान समाजात आहे. भारतात बोहरा समाजाची लोकसंख्या साधारण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते. १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा समाज खूप समृद्ध आहे आणि दाऊदी बोहरा समाज भारतातील सर्वात जास्त सुशिक्षित समाजापैकी एक आहे. शिकलेसवरलेले असूनही ते यासारख्या शेंडा ना बुडखा यासारख्या प्रथांवर विश्वास ठेवतात. मुलींचा खतनाच्या किशोरवयाच्या आधी करण्यात येतो. यात अनेक प्रकार जसे ब्लेड वा चाकूचा वापर करून क्लायटोरिसच्या बाहेरील भागाला कट देणे वा बाहेरच्या भागाची त्वचा काढून टाकणे. खातनामुळे पूर्वी अॅनेस्थेशियासुद्धा दिला जात नाही. मुली संपूर्णत: शुद्धीत असतात आणि वेदनेने किंचाळत असतात.

खतना उरकल्यावर हळद, गरम पाणी आणि किरकोळ मलम लावू वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी समजूत आहे की क्लायटोरीस काढल्याने मुलीची लैंगिक इच्छा कमी होते आणि ती लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवत नाही.

खतनामुळे स्त्रीला शारीरिक त्रास तर सहन करावाच लागतो, शिवाय निरनिराळया मानसिक त्रासांमधून जावे लागते. त्यांच्या लैंगिक जीवनावरसुद्धा परिणाम होतो आणि त्या भविष्यात लैंगिक सुखाचा आनंद उपभोगू शकत नाहीत.

* थायलंडच्या केरन जमातीत लांब मान असणे हे स्त्रीच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते. म्हणून त्यांची मान लांब करण्याकरिता त्यांना एका प्रक्रियेतून जावे लागते. ५ वर्षांच्या वयात त्यांच्या गळयात रिंग घातली जाते. याने मान भले लांब होत असेल, पण ज्या वेदनेतून आणि त्रासातून त्यांना जावे लागते हे तर ती पीडित मुलगीच जाणू शकते. ती तिची मान पूर्णपणे फिरवू शकत नाही आणि ही रिंग त्यांना आयुष्यभर घालावी लागते.

* रोमानिया, इटलीने, यूएसए शिवाय इतर अनेक देशांमध्ये जिप्सी समुदायाचे लोक राहतात. या समुदायात एखाद्या मुलीशी लग्न करायची इच्छा झाली तर मुलाला तिचे अपहरण करावे लागते. जर ३-४ दिवसात मुलगा तिच्या आईवडिलांच्या नकळत तिला लपवून ठेवण्यात यशस्वी झाला तर ती मुलगी त्याची संपत्ती मानली जाते आणि मग दोघांचे लग्न करून दिले जाते.

* भारतात दीर्घ काळ बहुविवाहाची प्रथा कायम होती, यात पुरुषांना हे स्वातंत्र्य होते की ते हवे तेव्हा पाहिजे तेवढया स्त्रियांना आपली पत्नी बनवू शकत होते. यामुळे स्त्रिया आपल्या पतिसाठी भोगदासी बनून राहिल्या. अशाच प्रकारे केरळ आणि हिमाचल प्रदेशात बहुपतित्वाची परंपरा कायम आहे, ज्यात एक स्त्री अनेक पतिची पत्नी बनणे मान्य करते. या व्यवस्थेत आधी निश्चित केले जाते की स्त्री किती दिवस कोणत्या पतिसोबत राहील.

* दक्षिण भारतातील आदिवासी टोडा, उत्तर भारतातील जौनसर भंवरमध्ये, त्रावणकोर आणि मलबारमधील नायर, हिमाचलमधील किन्नोर व पंजाबच्या मालवा क्षेत्रातसुद्धा अशा प्रथा आढळतात. जशी पूर्वीची बहूपतित्वाची परंपरा स्त्रीला भावनिक दृष्टया कमकुवत करायची, तशीच शारीरिक दृष्ट्याही धक्कादायक असायची.

* केनिया, घाना आणि युगांडा यासारख्या देशात एखाद्या विधवा स्त्रीला हे सिद्ध करावे लागते की तिच्या पतिचा मृत्यू तिच्यामुळे झाला नाही अशा वेळी त्या विधवेला क्लिनजरसोबत झोपावे लागते. कुठेकुठे तर विधवेला आपल्या मृत पतिच्या शरीरासोबत ३ दिवस झोपावे लागते. परंपरेच्या नावावर तिला पतिच्या भावांसोबत सेक्स करण्यास जबरदस्ती केली जाते.

* सुमात्रामध्ये मैनताईवान जमातीत स्त्रियांचे दात ब्लेडने टोकदार बनवले जातात. इथे अशी समजूत आहे की टोकदार दात असलेली स्त्री जास्त सुंदर दिसते.

अशाच प्रकारे आफ्रिकेच्या मुर्सी आणि सुरमा जमातीत महिला जेव्हा प्युबर्टीच्या वयात येतात, तेव्हा त्यांचे खालचे समोरचे २ दात काढून खालच्या ओठाला छिद्र करून तो ओढला जातो आणि त्याला एक पट्टी लावली जाते. वेदना सहन करण्याकरिता कोणतेही औषध देण्यात येत नाही. दर वर्षी या लिप प्लेटचा आकार वाढवला जातो. अशी समजूत आहे की जितकी मोठी प्लेट आणि जाड ओठ असतील तेवढी महिला सुंदर असेल.

* सोमालिया आणि इजिप्तच्या काही भागात मागास जमातीत खूपच विचित्र कारणासाठी क्लिटोरल विकृत केले जाते. किशोरवयीन मुलींचे कौमार्य विना औषध सुरक्षित राहावे म्हणून व्हजायना सील केला जातो. हे आजही सुरु आहे, तसे थोडे कमी झाले आहे.

* इस्लामिक गणराज्य मॉरिटानियाच्या काही भागात अशी धारणा आहे की जास्त वजन असलेली पत्नी आनंद आणि समृद्धी घेऊन येते. त्यामुळे लग्नाआधी तरुणींना जबरदस्तीने साधारण १६,००० कॅलरीचा डाएट दिला जातो, जेणेकरून त्यांचे वजन वाढेल.

*अरुणाचल प्रदेशमधील जिरो व्हॅलीच्या अपातनी जमातीच्या स्त्रियांच्या नाकाच्या छिद्रात वूडन प्लग्स घुसवतात. असे त्या कुरूप दिसाव्या म्हणून केले जाते, जेणेकरून इतर कोणत्या जमातिने त्यांना पळवून नेऊ नये. तसे तर आता यावर बऱ्याच प्रमाणात बंदी आणण्यात आली आहे.

पुरुष धुतल्या तांदळासारखे असतात का?

भारतीय इतिहासात चाणाक्य आणि त्याच्या अर्थशास्त्राचे खूपच नाव आहे. जरा त्याचे स्त्रियांबाबत विचार बघा :

स्त्रिया एकाशी बोलत असतात आणि दुसऱ्याकडे पाहात असतात आणि तिसऱ्याचे चिंतन करत असतात. या कोणा एकावर प्रेम करत नाही.

सांगायचा अर्थ हा की स्त्रीसारखी पापी आणि व्यभिचारी कोणी नसते. पण चाणाक्याला हे विचारायला नको होते का की पुरुष काय धुतल्या तांदळासारखे असतात का?

कामवासना तर मानवी प्रवृत्तीचे एक नैसर्गिक अंग आहे आणि मर्यादेचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती स्त्री आणि पुरुष दोघांनाही सामान प्रमाणात मिळते. परंतु धर्मशास्त्रात नेहमी व्यभिचारासाठी स्त्रीच्या चारित्र्यालाच दोषी मानले आहे. पुरुष आपले अवगुण सहज झाकू शकतो. समाजात त्याचे स्थान मजबूत असते, म्हणून तो निर्दोष असतो, उलट स्त्रीला नेहमीच शोषण सहन करावे लागते.

आपण शतकांपूर्वीची मानसिकता बदलवायला हवी. जर डोळे उघडून पाहिले तर शारीरिक दृष्टया वेगळे असूनही स्त्री आणि पुरुष निसर्गाच्या २ एकसारख्या रचना आहेत. दोघांनी मिळून आणि एका स्तरावर पुढे जाण्यातच समाजाची प्रगती शक्य आहे. स्त्री असो वा पुरुष दोघांनाही समान संधी व दर्जा देणे काळाची गरज आहे.

घरगुती हिंसा : सहन करू नका, आवाज उठवा

* डॉ. शशी गोयल

आजची स्त्री छेडछाड सहन करू शकते, जेव्हा ती पुरदामध्ये नसते किंवा घराच्या सीमा भिंतीपर्यंत मर्यादित नसते? ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मग त्याला पायऱ्यांवर पुरुष बाजूने विचारायचे कारण काय? कधी आरक्षण, कधी स्वतःसाठी वेगळा कायदा. 1983 मध्ये सरकारने भारतीय दंड संहितेअंतर्गत घरगुती हिंसाचार लागू केला आणि त्यानंतर अनेक वर्षांनी भारतीय दंड संहितेचे कलम 498-A बनवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

सरकारकडून महिला संरक्षण विधेयक मंजूर करणे म्हणजे महिलेला त्रास दिला जातो. केवळ घरगुती आणि अशिक्षितच नाही तर सुशिक्षित आणि नोकरी करणारे देखील. स्त्रिया केवळ कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयच नव्हे तर उच्च वर्गातही अत्याचारित आहेत. एक सर्वेक्षण असे दर्शवते की 50% स्त्रिया घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. केवळ पतीच नाही तर पतीच्या कुटुंबातील इतर लोकांनाही त्रास होतो. अनेक वेळा त्यांना त्यांचे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्याची परवानगी नसते. गुन्हा म्हणजे पत्नीवर हल्ला करणे

पतीकडून पत्नीवर अत्याचार केल्याबद्दल दररोज शेकडो गुन्हे दाखल होतात. त्यापैकी काही असे आहेत की ते खरोखर पती -पत्नी आहेत की नाही हे जाणून आश्चर्य वाटेल. आतापर्यंत हा हल्ला गुन्हा मानला जात नव्हता. असे मानले जात होते की ही पती -पत्नीमधील परस्पर प्रकरण आहे, परंतु नवीन कायदा पास झाल्यामुळे हा गुन्हा बनला आहे, ज्यामध्ये पतीला 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

कार्यवाही अवघड असली तरी नवीन कायदा अतिशय सोपा आहे. नवीन कायद्यानुसार, आधी पोलिस चित्रात येतील, त्यानंतर पीडितेला स्वयंसेवी संस्थेकडे जावे लागेल. भारतात पोलिसांची भूमिका काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. प्रकरण गुंतागुंतीचे होईल. हे विधेयक महिलांना त्यांच्या पतींच्या हिंसाचाराविरोधात दिवाणी खटले चालवण्याचा पर्याय देण्याची आशा देते. हे विधेयक महिलांना कोणत्याही अंतिम टप्प्यावर तक्रार न घेता प्रथम माहिती अहवाल दाखल करून थेट न्यायालयात जाण्याची परवानगी देते.

पत्नीचे काम ओळखले जात नाही, पत्नी घरात किती काम करते हे पतीला फरक पडत नाही. तो त्याला सजावटीची वस्तू मानतो. नोकर ठेवायचा की नाही, त्याला समजले की घरात कोणतेही काम नाही. संपूर्ण दिवस एकतर त्याने शेजारच्या गप्पा मारल्या असत्या किंवा त्याने बेड तोडला असता. ‘कोणती मिल तुम्हाला चालवायची आहे’ हे म्हणणे हे एक लक्षवेधी आहे. फक्त २ रोट्या शिजवायच्या होत्या. तुम्ही असे कोणते काम केले ज्यासाठी तुम्हाला थोड्या कामासाठीही वेळ मिळाला नाही?

खालच्या वर्गात दारूबंदी हे मुख्य कारण आहे. सकाळपासून संपूर्ण लक्ष दारूसाठी पैसे हिसकावण्यावर आहे. पती असो किंवा मुलगा, यात कोणीही असू शकतो. अगदी दारूसाठी वडील मुलीवर अत्याचार करतात. अहंकार मध्यम वर्गात प्रथम येतो. जरी एखादी स्त्री कमावते, तिच्यासाठी निषेध, निंदा आहे आणि जर ती कमवत नसेल तर ती एक खोडकर व्यक्ती आहे. स्त्रियांच्या कार्याचे कुठेही कौतुक होत नाही, ना घरी आणि ना बाहेर. घरच्या स्त्रियाही मुलासाठी म्हणतील की थकल्यासारखे आले आहे. सून त्या नंतर काम करून आली असती, तरीही ती गस्त घातल्यानंतर येत आहे असे म्हटले जाईल. कुटूंब, कार्यालयात कोठेही स्त्रीच्या मोठ्या आवाजात बोलणे कोणालाही आवडत नाही. त्याने शांतपणे बोलावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

ही गोष्ट लहानपणापासून मुलांच्या मनात आहे की ते मुलींपेक्षा श्रेष्ठ आहेत. मुली अनोळखी आहेत, मुलगा घराचा प्रमुख आहे, घराचा वंशज आहे, दिवा आहे. येथून मुलगा स्वतःला श्रेष्ठ समजण्यास सुरवात करतो. बोलण्यावरून मुलीला धमकावले जाते. स्त्रीला सुरुवातीपासूनच दासीचे रूप दिले जाते. तिला नोकर म्हणून दाखल केले जाते. आई हे देखील शिकवते की तुम्हाला सर्वांना आनंदी ठेवावे लागेल. यामध्ये तुम्ही आनंदी आहात, त्याला स्वतःची कोणतीही इच्छा नाही. आणि येथूनच स्त्रियांवर अत्याचार सुरू होतो.

स्वतःला महत्त्व द्यायला शिका घरगुती हिंसा टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला जागे करावे लागेल. स्वतःला नम्र न बनवून स्वतःचा आदर करायला शिका. सर्वप्रथम घरातील मुलीचा आदर करा. इतरांच्या सुनांना आदर द्या.

जेव्हा अत्याचार असह्य होतो, तेव्हाच ती स्त्री ही बाब घराबाहेर काढते. घराची शोभा राखण्याची जबाबदारी केवळ स्त्रीची नाही. जर स्त्रीला घराची लाज मानली गेली तर पुरुषाने ती लाज ठेवावी. जर त्याचे उल्लंघन झाले तर कायदा रक्षक बनतो. यासाठी, स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें