तुमच्याकडेही डिजिटल आय स्ट्रेन आहे का, मग जाणून घ्या त्याचे प्रतिबंध आणि उपचार

* गृहशोभिका टिम

आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर बसून घालवतात. मग ती कॉम्प्युटर स्क्रीन असो वा मोबाईल स्क्रीन. डिजिटल स्क्रीनसमोर तासनतास बसल्याने आपल्या डोळ्यांवर सर्वात वाईट परिणाम होतो. त्यामुळे तणाव, निद्रानाश आणि इतर अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. डोळ्यांशी संबंधित या समस्येला डिजिटल आय स्ट्रेन म्हणतात.

डिजिटल आय स्ट्रेन पूर्वी कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणून ओळखले जात असे. लोकांमध्ये हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे.

पूर्वी काम फक्त कॉम्प्युटरवर व्हायचे पण आता लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट फोन हे देखील आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. या गोष्टींच्या अतिवापरामुळे डिजिटल आय स्ट्रेनची समस्या उद्भवते.

याची सुरुवात डोळ्यांत हलक्या वेदनांनी होऊ शकते. परंतु वेळेवर उपचार न केल्यास भविष्यात डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

डिजिटल डोळ्यांच्या ताणाची सुरुवातीची लक्षणे

डोळ्यांत ताण येणे, डोळ्यांत पाणी येणे, वेदना, अंधुक दृष्टी, लालसरपणा ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. यासोबतच डोकेदुखी आणि अस्वस्थता देखील येऊ शकते. काहीवेळा हे चिडचिडेपणाचे कारण देखील असू शकते. सकाळी उठल्यावर तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे, पण जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा हा त्रास वाढू लागतो.

प्रतिबंध आणि उपचार

  1. डिजिटल उत्पादने वापरणे ही आपली गरज बनली आहे. अशा स्थितीत त्यांचा वापर करण्याची योग्य पद्धतही आपण जाणून घेतली पाहिजे. या गोष्टी डोळ्यांपासून खूप जवळ किंवा दूर वापरणे धोकादायक ठरू शकते.
  2. तुम्ही ज्या खोलीत बसून या गोष्टी वापरत आहात त्या खोलीत पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. अन्यथा डोळ्यांवर ताण येतो.

३. ऑफिसमध्ये एसी व्हेंटसमोर बसू नये. त्यामुळे डोळ्यातील पाणी सुकते. 20-20-20 नियम पाळले पाहिजेत. जे लोक ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर जास्त वेळ काम करतात त्यांनी दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर ठेवलेल्या वस्तूकडे पहावे. त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो.

  1. स्क्रीन खूप तेजस्वी नसावी आणि फॉन्ट आकार खूप लहान नसावा.
  2. जेव्हा तुम्ही संगणकावर बराच वेळ काम करता तेव्हा तुमच्या पापण्या एका मिनिटात फक्त 6-8 वेळा लुकलुकतात, तर 16-18 वेळा डोळे मिचकावणे सामान्य असते. अशा परिस्थितीत दर सहा महिन्यांनी एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

तर येईल गाढ झोप

* गरिमा

जीवनाच्या धावपळीत दिवसभर थकलेली व्यक्ती जेव्हा रात्री अंथरुणावर पडते, तेव्हा तिला सुखद गाढ झोपेची अपेक्षा असते. गाढ आणि आरामदायक झोप दिवसभराचा थकवा दूर करून शरीरात नवीन उत्साह भरते.

एका निरोगी माणसासाठी ५-६ तासांची झोप पुरेशी आहे,  तर लहान मुलांसाठी १०-१२ तासांची झोप पुरेशी असते. प्रौढांसाठी ४-५ तासांची झोप पुरेशी असते.

रात्री चांगली झोप न आल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, घोरणे, चिडचिडेपणा आणि एकाग्रतेत कमतरता, निर्णय घेण्यात अडचण, पोटात गडबड, उदासी, थकवा यासारख्या समस्या डोके वर काढतात.

झोप न येण्याची कारणे

झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. चिंता, तणाव, निराशा, रोजगाराशी संबंधित समस्या, मानसिक आणि भावनात्मक असुरक्षा वगैरे.

याबरोबरच निश्चित वेळी न झोपणे, चहा किंवा कॉफीचं जास्त सेवन, एखादा त्रास किंवा आजार, उशिरा जेवणे किंवा उपाशी झोपणे, रात्री उशिरापर्यंत टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल फोनला चिकटून राहणे, दिवसभर काही काम न करणे इ. कारणेही अनिद्रेची कारणे बनू शकतात.

कशी येईल सुखद झो

* ज्यांना दिवसभर पुन्हा-पुन्हा चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते, ते रात्री लवकर झोपत नाहीत. चहा किंवा कॉफीमध्ये असलेलं कॅफेन झोपेत बाधा निर्माण करतं. म्हणूनच खास करून झोपण्याच्या अगदी आधी त्यांचे सेवन टाळले पाहिजे.

* आपण जर मानसिकरीत्या एखाद्या गोष्टीवरून काळजीत असाल आणि काही निर्णय घेऊ शकत नसाल, तरीही आपल्या झोपेत बाधा येऊ शकते.

* आपण जर झोपण्याचा प्रयत्न करत असाल, पण झोप येत नसेल, तर उठून थोडा वेळ टीव्ही पाहा. एखादे आवडते पुस्तक वाचा किंवा मग हलके संगीत ऐका. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.

* झोपण्यापूर्वी थोड्या वेळासाठी आपले मन एखाद्या खास गोष्टीवर केंद्रित करा. त्यामुळे मनाची चंचलता कमी होईल आणि आपल्याला चांगली झोप येईल.

* रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ फेरफटका मारला पाहिजे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि झोपही आरामदायक येते. डिनरमध्ये जड आहार टाळला पाहिजे.

* जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. झोपण्याच्या ३ तास आधी जेवण घ्या.

* झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने गाढ झोप येते.

* झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. रोज एकाच वेळी झोपल्याने गाढ झोप लागते.

* झोपताना नेहमी सैल कपडे घातले पाहिजेत.

* रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने चांगली झोप येते.

* झोपताना खोलीत हलका प्रकाश असला पाहिजे.

* दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करावे लागते, त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी होते. त्यामुळे रोज व्यायाम जरूर करा. व्यायाम केल्याने वेदना दूर होतील आणि गाढ झोपही येईल.

या टीप्स आजमावल्यानंतरही झोपेची समस्या जशीच्या तशी राहिली, तर डॉक्टरांना भेटा आणि अनिद्रेच्या समस्येवर उपाय करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें