गर्भावस्थेतदेखील त्वचा राहील नितळ

* शैलेंद्र सिंह

गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरात विविध प्रकारचे हार्मोनल बदल होत असतात, ज्याचा परिणाम शरीरावर वेगवेगळया प्रकारे होतो. या बदलांमध्ये सर्वाधिक प्रभाव त्वचेवर होतो. ज्यामुळे सुरकुत्या, डाग आणि पिंपल्सदेखील येतात. परंतु त्यासाठी अधिक चिंता करण्याची गरज नाही आहे. बाळाच्या जन्मानंतर काही काळातच हा त्रास आपोआप दूर होतो.

अनेकदा त्वचेवर होणारे काही बदल जसं की सुरकुत्या आणि स्ट्रेच मार्क्सचा प्रभाव त्वचेवर राहतो. यासाठी गर्भावस्थेच्यादरम्यान काही काळजी घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात लखनौच्या अमरावती इस्पितळाच्या त्वचा आणि केस तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका सिंह सांगतात, ‘‘गर्भावस्था आयुष्याची  खूपच छान अनुभूती आहे. यामध्ये त्वचेशी संबंधित काही त्रास होतो. परंतु याबाबत कोणताही तणाव घेण्याची गरज नसते. थोडीशी काळजी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.’’

पिंपल्सना घाबरू नका

गर्भावस्थेचा त्वचेवर उत्तम प्रभावदेखील पडतो. यादरम्यान त्वचेत चमक येते. मुरूमं, पुटकुळया आल्यामुळे त्वचेवर डाग पडतात. किशोरावस्थेप्रमाणे अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या काळातदेखील मुरूमं पुटकुळया येऊ लागतात. हे सर्व हार्मोन्स स्तराच्या चढ उतारामुळे होतं. गर्भावस्थेच्या सुरुवातीचे महिने असं होण्याची शक्यता अधिक वाढते.

जर पिरिएडच्या पूर्वी वा दरम्यान मुरूमं, पुटकुळया येत असतील तर खूप शक्यता आहे की गर्भावस्थेच्या दरम्यानदेखील त्या येतात. आता  यापासून वाचण्यासाठी लॅक्टिक अॅसिड आणि ट्री ऑइलचा वापर करा.

गर्भावस्थेच्या दरम्यान चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डागदेखील पडतात. हार्मोन वाढल्यामुळे त्वचेवर तीळ, निप्पल इत्यादीदेखील गडद रंगाचे दिसून येतात. उन्हात जाण्याने ही समस्या अधिक वाढू शकते. तसंही काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर हे डाग हलके होतात, परंतू काहीं बाबत असं काही होत नाही.  जेव्हादेखील तुम्ही बाहेर पडाल तेव्हा कमीत कमी ३० एसपीएफ सनस्क्रीन लावायला विसरू नका.

गर्भावस्थेमध्ये त्वचेचा कोरडेपणासाठी व ती ओलसर आणि सुंदर दिसण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणार नाही आणि ती अधिक तरुण दिसेल.

मॉइश्चरायझर गर्भावस्थेमध्ये त्वचेचा ओलसरपणा वाढवत नाही. परंतु त्याचा नैसर्गिक ओलसरपणा कायम ठेवून देतो. तुमच्या त्वचेच्या अनुरुप सौंदर्य उत्पादनं निवडा आणि जरुरी असेल तर गर्भावस्थेच्या दरम्यान तुमच्या त्वचेच्या अनुसार त्यामध्ये बदल करा.

गर्भावस्थेच्या दरम्यान पूर्ण नऊ महिने त्वचा एकसारखी राहत नाही. म्हणून यामध्ये आलेल्या बदलानुसार क्रीमचादेखील वापर करा. या बाबतीत डॉक्टरांचा सल्लादेखील घेत राहा.

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरात वेदना होण्याची तक्रार असते. ज्यामुळे त्यांना झोप घेण्यामध्ये त्रास होतो. पूर्ण झोप न झाल्यामुळे त्वचेवरदेखील याचा प्रभाव पडतो. उत्तम झोपेसाठी झोपण्यापूर्वी डोकं व पूर्ण शरीराला मालिश करणं फायदेशीर ठरतं.

गर्भावस्थेच्या दरम्यान पडणाऱ्या सुरकुत्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाएटकडे देखील लक्ष द्या. सुरकुत्या पूर्णपणे ठीक करण्यासाठी लेझर ट्रीटमेंटदेखील एक पर्याय आहे. कोणत्या चांगल्या डीप पिगमेंटेशन क्रीमचा नियमित प्रयोग करण्यानेदेखील फायदा होऊ शकतो.

स्ट्रेच मार्क्स पडणं

सुरकुत्याप्रमाणे स्त्रियांच्या पोटावर आणि स्तनांवर गर्भावस्थेच्या दरम्यान स्ट्रेच मार्क्स पडतात. काही स्त्रियांच्या काख, नितंब आणि हातांवरदेखील स्ट्रेच मार्क्स होतात. हे कधीच जात नाहीत. हा काळानुसार हलके नक्कीच होतात. गर्भावस्थेत पडणाऱ्या स्ट्रेच मार्क्सपासून वाचण्यासाठी गर्भाच्या चौथ्या महिन्यापासून विटामिन ई ऑईल नियमित व हलक्या हाताने लावा. स्ट्रेच मार्क्स नक्कीच कमी होतील.

नसांचे उभारणं

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या दरम्यान नस उभारण्याची समस्या निर्माण होते. पाय, चेहरा, मान आणि हातांवर साधारणपणे ही समस्या निर्माण होते. काही स्त्रियांना शिरांमध्ये सूज आणि चेहरा लाल होण्याची समस्यादेखील उद्भवते. काही स्त्रियांची त्वचा गर्भावस्थेत कोरडी आणि संवेदनशील होते. यासाठी घरच्या घरी उपचार केले जाऊ शकतात. काही स्त्रियांना खासकरून ज्या थंड जागी राहतात त्यांना मध्ये गर्भावस्थेत अधिक हार्मोन बनल्यामुळे पायांवर तात्पुरते डाग पडतात.

मेकअपनेदेखील लपवू शकता डाग

गर्भावस्थेच्या दरम्यान अशा प्रकारचे डाग पडल्यामुळे सौंदर्य बिघडू नये म्हणून यापासून वाचण्यासाठी मेकअपचा आधार घेता येतो. मेकअप आर्टिस्ट पायल श्रीवास्तव सांगतात, ‘‘गर्भावस्थेमध्ये स्किन केअर सोबतच मेकअप  करण्यात सावधानता बाळगायला हवी म्हणजे कोणत्याही सौंदर्य उत्पादनाचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही. नारळाच्या तेलाने त्वचेची नियमित मालिश करा.

असं न केल्यामुळे त्वचेची रोमछिद्रे बंद होतात, त्यामुळे त्यावर डाग पडू शकतात. दररोज रात्री चेहरा व्यवस्थित स्वच्छ करावा म्हणजे त्यावर मेकअपचं कोणतंही निशाण, मळ, धूळ इत्यादी राहणार नाही.

सकाळी मेकअप करण्यापूर्वी क्लींजिंग करा म्हणजे त्वचा ताजीतवानी, स्वच्छ आणि चिपचिपीत रहित राहील. क्लींजिंगनंतर हलकासा टोनरचा वापर करा. म्हणजे त्वचेची रोमछिद्रे बंद होतील आणि क्लिंजरचं निशान राहणार नाही. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील.

गर्भावस्थेत त्वचेसंबंधित समस्यांचे कारण चुकीचा आहार घेणं आणि योग्य देखभाल न करणे देखील असतं गर्भावस्थेच्या दरम्यान आहारात पुरेशी ताजी फळं, भाज्या, कडधान्य, वनस्पती तेल, डाळी, अंडी, दूध, पनीर, मासे इत्यादींचा समावेश करा. दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी नक्की प्या. यामुळेदेखील त्वचेचा रंग नितळ होतो. गर्भावस्थेमध्ये जो आहार घेता त्यांचा सरळ परिणाम त्वचेवर होतो.’’

विटामिनने त्वचेची देखभाल

गर्भावस्थेत निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी विटामिन घेणं खूपच गरजेचा आहे. विटामिन ‘ए’च्या कमीपणामुळे त्वचा कोरडी होते. यामुळे सुरकुत्या पडतात आणि त्वचेची छिद्रे मोठी होतात. फळं, भाज्या, गाजर, हिरव्या पालेभाज्या, माशाचे तेल, अंड आणि कलेजीमध्ये विटामिन ‘ए’चे उत्तम स्त्रोत असतात. विटामिन ‘बी’ ने रक्तप्रवाह वाढतो. हे अतिरिक्त तेल कटपणा कमी करतात. त्वचेच्या अधिकांश समस्यांचे मूळ हे विटामिन ‘बी’ ची कमतरता आहे. कडधान्य, कलेजी, हिरव्या पालेभाज्या, मासे इत्यादी विटामिन ‘बी’ चे उत्तम स्त्रोत आहेत.

निरोगी, चमकदार व सुंदर त्वचेसाठी विटामिन ‘सी’ गरजेचं असतं. याच्या वापराने त्वचा सैलसर पडत नाही, तर ती तरुण राहते. आंबट फळं, स्ट्रॉबेरी, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो आणि भाजलेले बटाटे विटामिन ‘सी’ चे उत्तम स्त्रोत आहेत. विटामिन ‘ई’ च्या कमतरतेमुळे त्वचेला सुरकुत्या पडतात. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि वनस्पती तेलांमध्ये विटामिन ‘ई’ पर्याप्त प्रमाणात आढळतं. विटामिन सोबतच काही खनिज पदार्थदेखील त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात मदतनीस ठरतात.

गर्भवती स्त्रीसाठी ड्रायव्हिंग टीप्स

* शकुंतला सिंह

रस्ते अपघाताचे प्रमुख कारण आहे तो वेगाने चालवणं, नशेत ड्रायव्हिंग करणं, रहदारीच्या नियमांचं उल्लंघन करणं इत्यादी. याव्यतिरिक्त खराब रस्ते आणि सिटी प्लॅनिंगदेखील दुर्घटनांच कारण असू शकतं.

स्त्रिया आणि कार अपघात

अलिकडे शहरांमध्ये स्त्री कार चालकांची संख्या सतत वाढत आहे. यामध्ये काही नियमितपणे कार्यालयात येण्या-जाण्यासाठी वापर करतात, तर काही इतर वैयक्तिक कामासाठी. नोकरदार स्त्रिया तर गर्भावस्थेमध्येदेखील ड्राईव्ह करून कार्यालयात जातात. गर्भावस्थेत जीवनशैली, शारीरिक आणि मानसिक बदल घडणे स्वाभाविक आहे. त्यांना स्वत: आणि गर्भातील शिशू दोघांचीही काळजी घ्यायची असते. अशावेळी गर्भवती स्त्रियांनी ड्रायव्हिंग करतेवेळी खास सावधानता बाळगायला हवी.

छोटयामोठया कार अपघातात एखादा खास धोका उद्भवत नाही, परंतु जर जास्त मार लागला असेल तर त्यामध्ये विविध प्रकारचा धोका असतो.

गर्भपात : खरंतर बाळ गर्भात एम्नीयोटीक द्रव्यात नैसर्गिकरित्या सुरक्षित असतं. तरीदेखील एखाद्या मोठया दुर्घटनेमध्ये गर्भाशय पंक्चर होण्याची धोका असतो. ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

वेळेपूर्वी जन्म : दुर्घटनेवेळी येणारं स्ट्रेस व त्यानंतर होणाऱ्या स्ट्रेसमुळे फ्री मॅच्योर प्रसूती होऊ शकते.

गर्भनाळ तुटणं : दुर्घटनेच्या आघातामुळे गर्भनाळ गर्भात गर्भाशयातून तुटून वेगळी होऊ शकते, ज्यामुळे बाळ गर्भाबाहेर येऊ शकतं. प्रेग्नेंसीच्या शेवटच्या काही आठवडयात याची आशंका अधिक असते.

हाय रिस्क प्रेग्नेंसी : प्रेग्नेंसीच्या दरम्यान शिशु अथवा आई या दोघांच्या स्वास्थावर कायम नजर ठेवणं गरजेचं असतं त्याला हाय रिस्क प्रेग्नेंसी म्हणतात. जसं की आईला मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार वा खूपच कमी वा अधिक वयामध्ये प्रेग्नेंसीच्या काही समस्या असतात. अशावेळी आई आणि गर्भातील शिशु दोघांनाही डॉक्टरकडे चेकअप आणि अल्ट्रासाऊंड इत्यादी तपासणीसाठी वारंवार जावं लागतं अशा स्त्रियांनी अधिक सतर्क राहायला हवं.

यूट्रस इंजरी : गर्भावस्थेत यूट्रस म्हणजे गर्भाशय मोठं होतं आणि कार अपघातात पोटाला मार लागल्यावर गर्भाशय फाटण्याची भीती असते. अशावेळी आई आणि शिशु दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो.

जन्म दोष : कार अपघातात गर्भाशयाला अपघात झाल्यामुळे भ्रुणामध्ये काही दोष होण्याची शक्यता असते. बाळ किती अगोदर झालंय आणि त्याला किती जास्त जखम झाली आहे. या गोष्टीवर बर्थ डिफेक्ट म्हणजेच जन्म दोष अवलंबून असतो.

भ्रुणाला आघात : कार दुर्घटनेत आईच्या पोटाला जास्त मार लागल्यामुळे बाळाच्या ऑक्सिजन सप्लायमध्ये बाधा निर्माण होते. शिशूच्या शरीराचा मेंदू वा इतर काही खास भागाला जखम झाल्यामुळे दूरगामी समस्या निर्माण होण्याची भीती असते.

कू आणि कंट्रा कू इंजरी : कार अपघातामध्ये दोन प्रकारच्या हेड इंजुरी होतात – कू आणि कंट्रा कू इंजरी. इंजरी तेव्हा होते जेव्हा कारमध्ये बसलेल्या स्त्रीचे डोकं स्टिअरिंगवर आपटत आणि डोक्यासमोर जखम होते. हा आघात झाल्यामुळे पहिली इंजरी आहे. यामध्ये मेंदूच्या दुसऱ्या अपघाताची शक्यतादेखील असते. कंट्रा कू इंजरी ही जेव्हा पुढे लागलेल्या डोक्याची जखम मागच्या मेंदूपर्यंत पोहोचते.

असं यासाठी होतं कारण कवटीच्या आतील मेंदूतला आघात झाल्यामुळे ते गतिशील होतं आणि मेंदू कवटीच्या मागच्या भागाला आपटतो आणि कू आणि कंट्रा कू इंजरी दोन्ही अवस्थेत स्त्रीला खूपच धोका असतो. सोबतच गर्भातील शिशुवरदेखील याचा वाईट परिणाम होण्याची भीती असते.

गरोदर महिलांचा आहार कसा असावा

* दीपिका विरेंद्र

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव असतो. गर्भात वाढणारं मूल आईला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं. संवदेनशील बनवतं, प्रेम करायला शिकवतं. त्यामुळे गरोदर महिला स्वत:ची विशेष काळजी घेतात. कारण अशावेळी महिला फक्त स्वत:साठीच नाही तर बाळासाठीही अन्न ग्रहण करत असतात.

नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांना सतत थकवा जाणवतो. ८-९ तास ऑफिसमध्ये काम केल्याने त्या जास्त थकतात. याशिवाय महिलांना घरातली कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस श्रमाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांचा आहार कसा असावा.

असा असावा नाश्ता

तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच स्वयंपाक आणि घरातली इतर कामं सुरू करत असाल तर हे योग्य नाही. सकाळी उठताच सर्वात आधी ग्रीन टी प्या. दिवसाची सुरूवात ग्रीन टी ने झाली तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही. त्यानंतर अंघोळ करून फ्रेश व्हा. दुपारचं जेवण तुम्ही स्वत: करत असाल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवा. सकाळी सगळं तयार मिळालं तर जेवण करणं डोकेदुखी ठरणार नाही. जेवण करून झाल्यावर सर्वात आधी नाश्ता करा. नाश्त्याला उकडलेली अंडी, चपाती आणि भाजी खा. त्यानंतर आपला डबा तयार करा. डब्यात फळं, सुका मेवा आणि जेवण भरा. दही किंवा ताक घ्यायला विसरू नका.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर

ऑफिसला पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी प्या. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्यानंतर थोडा आराम करा. काम सुरू करण्याआधी डाळिंब किंवा सफरचंद खा. हे तुमच्यासह बाळाच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे. शक्य असेल तर केळं खा. त्यानंतर आपलं काम सुरू करा.

दुपारचं जेवण चांगलं घ्या

डाळ-भात, भाजी-चपाती, दही किंवा ताक जे तुम्ही आणलं असेल ते व्यवस्थित चावून खा. घाईघाईत खाऊ नका. जेवणासोबत काकडी खा. सलाड तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

संध्याकाळचा नाश्ता

बऱ्याचदा असं दिसून येतं की गरोदर महिला संध्याकाळच्या नाश्त्याला समोसा, जिलेबी इत्यादी पदार्थ खातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात, पण आरोग्यदायी नसतात. त्यामुळे घरून सुकामेवा घेऊन या आणि तोच खा. चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटत असेल तर पिऊ शकता. हे दोघांसाठीही फायदेशीर असेल. संध्याकाळी नाश्त्याच्या नावाखाली पूर्ण पोट भरू नका. कारण रात्रीचं जेवणही जेवायचं आहे.

घरी पोहोचण्यासाठी घाई करू नका. ऑफिसची कॅब असेल तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर संध्याकाळी रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे आरामात निघा. थोडा उशिर झाला तरी चालेल. पण घरी आरामात सुरक्षित पोहोचा. घरी पोहोचल्यावर थोडा आराम करा, पाणी प्या. त्यानंतर घरातली कामं करा.

रात्री पौष्टिक जेवण करा

रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. एकवेळ डाळ नक्की खा. सोबत चपाती, सलाड आणि बेबीकॉर्न, ब्रोकोली, पनीर इत्यादी भाज्या खा.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं फिरा. दिवसभरात एक ग्लास दूध नक्की प्या. बाळंतपणादरम्यान दूध अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या.

ऑफिससोबत घरातलं काम मॅनेज करायला जमत नसेल तर मेड ठेवा. सगळं काम स्वत:वर घेऊ नका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें