* ज्योती गुप्ता
लोक बहुतेकदा सणाच्यावेळी खरेदी करण्यास किंवा नवीन सुरुवात करण्यास प्राधान्य देतात. परंतु बऱ्याचवेळा आर्थिक अडचणींमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्या गरजा लक्षात घेऊन बँका अशा अनेक ऑफर देतात, ज्यातून आपण लहानाहून लहान आणि मोठयाहून मोठया वस्तू सहजपणे खरेदी करू शकता आणि स्वस्त ईएमआयचा फायदा घेऊ शकता.
येथे आम्ही आपल्याला अशी माहिती देत आहोत, जी आपल्याला गुंतवणूक करण्यात मदत करेल :
१० टक्के कॅशबॅक
उत्सवाच्या निमित्ताने अनेक बँकांनी खरेदीवर १० टक्के कॅशबॅकची ऑफर दिली आहे. काही बँकांचे बऱ्याच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सबरोबर टायअप्सदेखील असतात. ही कॅशबॅक केवळ मर्यादित उत्पादन आणि निश्चित रकमेवर असते. म्हणूनच खरेदी करताना मर्यादा अवश्य लक्षात ठेवा, तरच आपण या ऑफरचा लाभ उठवू शकाल.
पैशांशिवाय खरेदी करा
काही बँका पैसे न भरता खरेदी करण्याची सुवर्ण संधी आपल्या ग्राहकांना उत्सवाची भेट म्हणून देतात. या ऑफरनुसार ग्राहकाला खरेदी करताना कुठले पैसे द्यावे लागत नाहीत आणि पुढच्या महिन्यापासून ईएमआय त्याच्या डेबिट कार्डवर प्रारंभ होते, जे ग्राहक आरामात ६ ते १८ महिन्यांत भरू शकतो.
कार न्या, पुढील वर्षी पैसे चुकवा
बऱ्याच बँकांनी ही सुविधादेखील दिली आहे, जर तुम्हाला कार विकत घ्यायची असेल तर आता कर्ज घ्या आणि पुढच्या वर्षापासून त्याची ईएमआय भरा. त्याचबरोबर महिलांसाठी व्याज दरामध्ये ०.२५ ते ०.५० टक्के अतिरिक्त सूटही दिली जात आहे.
दुचाकी दररोज ७७ रुपयांना उपलब्ध आहे
जर आपण बऱ्याच वर्षांपासून दुचाकी घेण्याचा विचार करीत असाल आणि हे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नसेल तर ही योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोठले डाऊन पेमेंट करावे लागणार नाही किंवा प्रक्रिया शुल्कही लागणार नाही. कर्ज मंजूर होताच काही वेळातच तुमच्या खात्यात पैसे येतील. त्याचबरोबर या योजनेंतर्गत तुम्हाला विशेष कंपनीची बाईक व स्कूटरवर २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.
क्रेडिट कार्डने फायदे घ्या
काही बँका असे क्रेडिट कार्डदेखील लाँच करीत आहेत, ज्यांचे ईएमआय व्याज दर खूपच कमी असेल आणि आपल्याला ४.५० करोड रुपयांचे हवाई अपघात कव्हरदेखील मिळेल. तसेच, खरेदीवर तुम्हाला भरपूर सूट मिळेल.
याशिवाय काही खास क्रेडिट कार्डधारकांना एक असे कार्डही देण्यात आले आहे, जेणेकरून ते सर्व प्रकारच्या खरेदीवर आणि बिलाच्या देयकावर ३० टक्के सूट मिळविण्यास सक्षम असतील. यासाठी काही वार्षिक शुल्क भरावे लागेल, ज्याचे ५० टक्के परत केले जातील. तसेच आपल्याला बँकेकडून ब्रांडेड भेटवस्तूदेखील मिळतील.
कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात
दिवाळीनिमित्त ग्राहकांना मोठी भेट देताना अनेक बँकांनी रेपो दरांशी जोडल्या गेलेल्या किरकोळ कर्जाच्या व्याज दरामध्ये ०.२५ टक्क्यांपासून ०.१० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. ज्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्जासह सर्व किरकोळ कर्जे स्वस्त झाले आहेत. तर तुम्हीसुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता.
येथे गुंतवणूक करू शकता
बहुतेक लोक सणाला पैशांची उधळपट्टी करतात. यामध्ये ते कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लेटेस्ट गॅझेट आणि सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात, खरेतर आपण आपल्या पैशाची अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, जेणेकरुन आपल्याला भविष्यात लाभ मिळतील.
येथे आम्ही तुम्हाला अशाच काही परवडणाऱ्या गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दल सांगत आहोत.
कर्जाची परतफेड करून ओझे हलके करा : समजा आपल्या कंपनीने आपल्याला चांगला बोनस दिला आहे. या रकमेने आपण कर्जाची परतफेड करू शकता, ज्यामुळे पैसे परत करण्याचा दाब कमी होईल आणि आपण तणावमुक्त होऊन आनंद साजरा करू शकाल. याला विवेकशील गुंतवणूकदेखील म्हणता येईल.
दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा : आपण बऱ्याच दिवसापासून दीर्घकाळासाठी गुंतवणूकीचा विचार करत असाल परंतु अद्याप करू शकले नसाल, तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. या गुंतवणूकीमुळे आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित असेल.
आपत्कालीन निधी : आजच्या काळात केव्हा वाईट वेळ येईल काही सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत वाईट परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण आधीपासूनच तयारी करायला हवी. म्हणूनच या उत्सवानिमित्ताने आपण आपत्कालीन निधीमध्ये गुंतवणूक करावी आणि आपल्या कुटुंबास आर्थिकदृष्टया सुरक्षित असल्याची जाणीव करून द्यावी.
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे अर्थपूर्ण आहे : ईटीएफ खरेदी करून आपण चांगली गुंतवणूक करू शकता. तसेही आजच्या काळात लोक भौतिक सोने खरेदी करण्याऐवजी इतर मार्गांनी गुंतवणूक करण्यास अधिक प्राधान्य देतात. असे करून आपण आपली परंपराही निभवू शकता आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थितीदेखील मजबूत करू शकाल.