* प्रतिनिधी
प्रत्येक ऋतूमध्ये फॅशनेबल दिसण्यासाठी त्या ऋतूप्रमाणे फक्त आऊटफिटचीच निवड नाही तर एक्सेसरीजचंही कलेक्शन जवळ असणं आवश्यक आहे. आऊटफिट आणि एक्सेसरीजच्या बेस्ट कॉम्बिनेशनमुळेच तर व्यक्तिमत्वाला एक परफेक्ट लुक मिळतो. हॉट समर सिझनमध्ये कोणत्या कुल एक्सेसरीजने आपला लुक कम्प्लिट कराल, हे माहीत करून घेण्यासाठी आम्ही फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट सोनम जैन यांच्याशी चर्चा केली.
फ्लोरल स्कार्फ : हॉट समरमध्ये फ्रेश लुकसाठी आपल्या वार्डरोबमध्ये स्कार्फचं कलेक्शन अवश्य ठेवा. आजकाल फ्लोरल प्रिंटेड कलरफुल स्कार्फची फॅशन आहे. हा तुम्ही शॉर्ट ड्रेससोबत किंवा टी शर्टबरोबर कॅरी करू शकता. स्कार्फ रोज वेगळया स्टाईलचे घाला. यामुळे तुम्ही जास्त स्टायलिश दिसाल.
एव्हिएटर सनग्लास : कडक उन्हात डोळयाच्या सुरक्षेबरोबरच स्टायलिश दिसायचं असेल तर सनग्लासहून दुसरा कोणता पर्याय नाही. परंतु गोल किंवा चौकोनी वा बॉक्स शेपऐवजी मेटल फ्रेमचा एव्हिएटर सनग्लास निवडा. हे घातल्यावर तुम्हाला जास्त आय मेकअपची गरज भासणार नाही.
क्लासिक वॉच : या उन्हाळयात बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी आपल्या हाताचं सौंदर्य वाढवा क्लासिक वॉच घालून. हे कोणत्याही आऊटफिटबरोबर सहज मॅच होतं आणि लेदर बेल्ट असल्यामुळे कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही.
सुपरसाईज्ड बॅग : कम्प्लिट लुककरिता सुपरसाईज्ड बॅगला आपली पहिली पसंत बनवा. यात फक्त तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू सहज मावू शकतात. याशिवाय ही बॅग तुम्हाला सुपरस्टायलिश लुक देते. आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायचं असेल तर नियॉन शेडची हॅन्ड बॅग खरेदी करा. पारदर्शक बॅगही ट्राय करू शकता. ही तुम्हाला बोल्ड लुक देईल.
पॉप कलर्स नेकपीस : गोल्ड, डायमंड आणि रेगुलर नेकपीसने जर तुम्ही कंटाळला असाल तर पॉप कलर्सच्या हॉट नेकपीसला आपली स्टाईल स्टेटमेंट बनवा. आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये लाईम, ग्रीन, पिंक, ऑरेंज यासारखे पॉप शेड्स स्टोन, पर्ल आणि क्रिस्टलने बनलेल्या नेकपीसला जागा द्या. सिंगल शेड किंवा प्लेन आऊटफिटबरोबर पॉप कलरचा नेकपीस तुम्हाला सुपर स्टायलिश लुक देईल.
स्टेटमेंन्ट इयररिंग : समर सिझनमध्ये कुल लुकसाठी आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये रेग्युलर इअररिंगऐवजी लांब स्टेटमेंट इयररिंग्ज ठेवा. शॉर्ट्सबरोबर लांब इयररिंग्जचं कॉम्बिनेशन तुम्हाला सुंदर आणि हॉट लुक देईल. कोणत्याही शेप आणि साईजच्या स्टेटमेंन्ट इयररिंग्जची निवड तुम्ही करू शकता.
अँकल ब्रेसलेट फुटवेअर : आता हिवाळा संपला आहे. त्यामुळे फुल पॅक फुटवेअरच्या जागी आपल्या शु रॅकमध्ये अँकल ब्रेसलेट फुटवेअर ठेवा. हे फुटवेअर चारही बाजूंनी उघडे असतात. हे वापरल्याने घामही येत नाही. हे दिसायलाही खूप स्टायलिश असतात. शॉर्ट्सबरोबर हे खूप हॉट दिसतात.
ग्लिटर मोबाईल कव्हर : फुटवेअर आणि हॅन्ड बॅगप्रमाणेच मोबाईलही एक्सेसरीजमधेच गणला जातो. परंतु फुटवेअर आणि बॅगप्रमाणे रोज मोबाईल बदलणं सोपं नाही, मग मोबाईल कव्हर बदलून मोबाईलला एक नवीन लुक का देत नाही. म्हणून समरमध्ये कुल लुकसाठी ग्लिटर मोबाईल कव्हर खरेदी करा.
थम्ब रिंग्ज : फॅशनेबल दिसायला इंडेक्स फिंगरमध्ये कॉकटेल किंवा डबल फिंगर रिंग घालण्याऐवजी अंगठयात रिंग ट्राय करा. कुल लुकसाठी अॅनिमल प्रिंटेड किंवा मग चंकी थम्ब रिंग खरेदी करा, आजकाल याचा ट्रेंड सुरु आहे. तुम्हाला हवं तर दोन्ही हाताच्या अंगठयात किंवा फक्त एका हाताच्या अंगठ्यात आणि इतर बोटातही तुम्ही वेगवेगळ्या शेप स्टाइलच्या रिंग घालू शकता.
हॉटहॅट्स : जर तुम्ही हॉलिडे मूडमध्ये आहात आणि बीचवर सुट्ट्या घालवायला जात आहात, तर आपला लुक कम्प्लिट करायला आऊटफिटला मॅच अशा हॉट हॅट घ्यायला विसरू नका. उन्हापासून सुरक्षित ठेवण्याबरोबरच या हॅट तुम्हाला फॅशनेबल लुकही देतील. जरा मोठी हॅट जास्त आकर्षक दिसेल. ही तुम्ही आपली पहिली पसंत बनवू शकता.