गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. विवाहाला ३ वर्षं झाली आहेत. आम्ही अजूनही शरीरसंबंध साधले नाहीत. विवाहाच्या पहिल्या रात्री शरीरसंबंध साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेदना झाल्यामुळे मी पतीला अडवलं. त्याच भीतीने पुन्हा प्रयत्नच केला नाही. पतीनेही कधी बळजबरी केली नाही, परंतु आता घरची मंडळी मुल हवं म्हणून मागे लागली आहेत. त्यांना अधिक काळ टाळता येणार नाही. तसं बघता अपत्य आम्हालाही हवं आहे. शरीरसंबंधाशिवाय हे शक्य नाही, परंतु यादरम्यान होणाऱ्या वेदना मी सहन करू शकले नाही कर काय होणार?

पहिल्यांदा शरीरसंबंध साधताना स्त्रीला थोडीशी वेदना आणि रक्तस्त्राव होतो, परंतु ही वेदना असहनीय नसते. संभोगादरम्यान मिळणाऱ्या लैंगिक सुखासमोर ही वेदना काहीच नसते. विवाहाला इतका कालावधी लोटला असूनही तुम्ही अजून सेक्सचा आनंद उपभोगू शकला नाहीत. तुमच्या मनातील सेक्सप्रतिची भीती दूर करून शरीरसंबंध साधा आणि आपलं गृहस्थ जीवन आनंदी बनवा.

  • मी एका मुलावर प्रेम करत होते. प्रेमात आम्ही मर्यादा ओलांडून परस्परांशी अनैतिक संबंध ठेवले होते. काही वर्षांपूर्वी आमचा ब्रेकअप झाला. आता घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मी मात्र अजिबात उत्साहित नाही. कारण मला भीती आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री संबंध साधल्यावर मला रक्तस्त्राव झाला नाही, तर पतीला पहिल्या रात्रीच समजेल की माझे विवाहपूर्व शारीरिक संबंध होते. पती मला अपमानित करून घराबाहेर काढेल. यापेक्षा मी लग्न न करणंच योग्य ठरेल. तुमचं काय मत आहे?

तुम्ही भूतकाळात जी चूक केली, त्यासाठी आता पश्चाताप वा लग्न न करण्याचा तुमचा निर्णय योग्य नाही. तुम्ही जोपर्यंत आपल्या मुखाने स्विकारणार नाही की तुम्ही कधी कुणाशी संबंध साधले आहेत तोवर पतीला समजणार नाही. तेव्हा या गोष्टी विसरून लग्नाची तयारी करा.

  • मी २२ वर्षीय तरुण आहे. एका मुलीवर ३-४ वर्षांपासून प्रेम करत होतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मागच्या वर्षी प्रथम मंदिरात आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज केलं. आम्हा दोघांचे कुंटुंबीय विवाहासाठी तयार नव्हते, त्यामुळे पैशांची व्यवस्था करून मी स्वतंत्र खोली घेतली आणि मग तिला सोबत राहायला बोलावलं. महिनाभर आम्ही अतिशय आनंदात राहिलो, परंतु त्यानंतर ती आपल्या घरच्यांना भेटू लागली. कुणास ठाऊक तिच्या घरच्यांनी तिला काय समजावलं? ती आपल्या घरी निघून गेली आणि पुन्हा परतलीच नाही. फोनसुद्धा बंद केला.

एके दिवशी तिचे भाऊ येऊन मला घरातून उचलून घेऊन गेले आणि चौकीत तक्रार नोंदवली. परंतु माझी काहीच चूक नसल्याने त्यांना मला सोडावं लागलं. आता मुलीकडील लोक दबाव आणत आहेत की मी घटस्फोट द्यावा. मला समजत नाहीए की परस्परसंमतीने विवाह केल्यानंतरही तिने माझी अशी फसवणूक का केली?

तुमच्या पत्नीचं वय खूप कमी आहे. त्यामुळे प्रेम आणि विवाहाप्रति त्या फारशा गंभीर दिसत नाहीत. शिवाय किशोरावस्थेत विरूद्धलिंगी व्यक्तिप्रति निर्माण झालेले आकर्षण प्रेम नसतं. हे लैंगिक आकर्षण जितक्या वेगाने निर्माण होतं, तितक्याच वेगाने लोप पावतं. हेच कारण आहे की भावनेच्या भरात तुम्ही दोघांनी (विशेषत: तुमच्या पत्नीने) विवाह केला, परंतु लवकरच एकमेकांकडून अपेक्षाभंग झाला. जर मुलगी कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन तुमच्याकडे घटस्फोटाची मागणी करत असेल तर तो तुम्ही दिली पाहिजे.

  • मी २७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या विवाहाला ४ वर्षं झाली आहेत. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. परंतु सद्यस्थितित मी थोडी द्विधा मन:स्थितीत आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझा एक सहकारी मला पसंत करतो. प्रत्येक लहानसहान समस्येमध्ये नेहमी मला सहकार्य करतो. तो माझ्याशी मैत्री करू इच्छितो, परंतु मल भीती वाटते की माझ्या पतींनी ही मैत्री गैरअर्थाने घेऊ नये आणि यामुळे माझं वैवाहिक जीवन प्रभावित होऊ नये. मला माहीत आहे की माझे पती तितके उदारमतवादी नाहीत. आमच्या गप्पांमध्येही नकळत त्याचा विषय निघाला तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. मी काय केलं पाहिजे, ते सांगा?

तुम्ही समजदार तरुणी आहात. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की जर आपल्या तथाकथित सहकाऱ्याशी तुम्ही मैत्री केली, तर ही गोष्ट तुमच्या पतीला आवडणार नाही. केवळ तुमचे पतीच नव्हे सामान्यत: प्रत्येक पतीला हेच वाटतं की त्याच्या पत्नीने केवळ त्याचंच असावं. अन्य पुरुषासोबत पत्नीची जवळीक कोणत्याही पतीच्या गळी उतरत नाही. तेव्हा आपल्या सहकाऱ्याला सहकारीच राहू द्या. आवश्यकता भासल्यासच त्याची आपल्या ऑफिसच्या कामात मदत घ्या. शक्यता आहे की तुम्हाला आकर्षित करण्यासाठी वा तुमच्याशी जवळीक वाढवण्यासाठीच तो तुम्हाला तत्परतेने मदत करत असेल. ऑफिसमध्ये पुरुष सहकाऱ्यांशी थोडं अंतर राखून वागणंच योग्य असतं. तुम्हीही थोड्याशा सावध राहिलात तर तुमचं वैवाहिक जीवन प्रभावित होणार नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांचा तरूण आहे. माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिचंसुद्धा माझ्यावर निरतिशय प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. पण जेव्हा मुलीने तिच्या घरी याविषयी सांगितलं तेव्हा तिच्या घरात हल्लकल्लोळ माजला. तिच्या घरच्यांनी मुलीला मारहाण केली व तिचा मोबाइल ताब्यात घेतला. एवढंच नाही तर तिचं घराबाहेर येणंजाणं बंद केलं. तिने माझ्याशी संबंध तोडले नाहीत तर ते मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरूंगात पाठवतील वा मला जीवे मारतील अशी तिला धमकी दिली. मुलगी यामुळे खूप घाबरली. तिने खाणंपिणं सोडून दिलं, प्रत्येक वेळी रडत राहते. तिच्यामुळे माझ्या जिवाला धोका पोहोचू नये असं तिला वाटतं.

आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नाही. लग्नाला नकार देण्यामागचं कारण हे आहे की मुलीच्या आजीची जात (गोत्र) आणि आमची जात एक आहे. त्यामुळे नात्याने आम्ही दोघे भाऊबहिण आहोत.

माझ्या घरच्यांचा यावर अजिबात विश्वास नाही. त्यांच्याकडून लग्नासाठी पूर्ण होकार आहे. परंतु मुलीकडच्यांची सहमती नाही. दुसरीकडे कुठे तरी लग्नासाठी ते मुलीवर दबाव आणत आहेत. पण मुलगी मात्र अडून बसली आहे की लग्न करणार तर माझ्याशीच. नाहीतर मरून जाईन असं तिचं म्हणणं आहे. मला काही समजत नाही की काय करू?

मी मुलीच्या आई व मोठ्या बहिणीला भेटलो. आम्ही दोघं एकमेकांबाबत खूप गंभीर आहोत, आम्ही एकमेकांबरोबर खूप सुखी राहू तेव्हा आमच्या लग्नाला परवानगी द्या, असं समजवायचा प्रयत्न केला. परंतु त्या काहीच करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. समाज आमचं लग्न कधीच स्वीकारणार नाही. शेवटी याच समाजात त्यांना राहायचं आहे. समाजाच्या विरोधात त्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीचा मी पिच्छा सोडणं योग्य अन्यथा अघटित घडू शकतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न करू शकत नाही. सांगा, आम्ही काय करावं?

एकतर आपण २१व्या शतकात जगतो आहे. आपण सुशिक्षित आहोत व स्वत:ला सुधारक मानतो. असं असूनही जात, गोत्र, जन्मकुंडली याच चक्रात अडकून आहोत. जेव्हा आंतरजातीय विवाहाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा काही ना काही वाद जरूर होतो.

जन्मपत्रिकेत जर वधूवराचे गुण मिळाले तर विवाह यशस्वी होतात असं मानलं जातं. परंतु प्रत्यक्षात मात्र विवाह यशस्वी होण्यात या गोष्टींचं काहीही योगदान नाही. या अशा जुन्या गोष्टींच्या मोहात अडकवून ज्योतिष-पूजारी आपलं दुकान चालवत असतात. खरंतर लोक हे वास्तव जाणून असतात. पण समाजातील तथाकथिक ठेकेदारांच्या दादागिरीमुळे विरोध करायला घाबरतात.

आता तर तुम्ही फक्त २१ वर्षांचे आहात. तुम्ही लग्नासाठी वाट पाहू शकता. शक्यता आहे की तुमच्या दबावात येऊन उशीरा का होईना मुलीकडचे होकार देतील. जर कोणत्याही परिस्थितीत मुलीकडचे मानायला तयार नसतील तर तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. एकदा लग्न झालं की थोड्या नाराजीनंतर ते तुम्हाला स्वीकारतील.

  • मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला २ वर्षं झालीत. हे माझं दुसरं लग्नं आहे. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर मी खूप दु:खी असायचे. कारण माहेरून मला कुणाचाच आधार नव्हता. अशात माझ्या नवऱ्याने मला मित्राप्रमाणे सांभाळून घेतलं आणि आमच्या मैत्रीचं रूपांतर केव्हा प्रेमात झालं कळलंच नाही. त्यांनी मग घरच्यांशी बोलून माझ्याशी विवाह केला. माझे पती मुसलमान व मी हिंदू आहे. लग्नानंतरचे ३-४ महिने चांगले गेले. त्यानंतर सासूच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती माझ्याशी नेहमी भांडते. नवऱ्याला मी याबाबत सांगते, पण तो आईला काहीही बोलत नाही. मी खूप चिंतेत असते.

पहिल्या विवाहातून मला दोन मुलं आहेत. ज्यांना पतिने घटस्फोटानंतर स्वत:जवळ ठेवून घेतलं आहे. मला त्यांची खूप आठवण येते. पण माझ्या नवऱ्याशी मी याबाबत काही बोलू शकत नाही. सतत बेचैन असते. वाटतं की दुसरं लग्न करून मी चूक केली. मी काय करू?

तुम्ही सांगितलं नाही की पहिल्या पतीशी तुमचा घटस्फोट का झाला, जेव्हा की तुम्ही दोन मुलांची आई आहात. शिवाय आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही मुलांचा विचार करायला हवा होता. पण तुम्ही आपल्या स्वार्थापायी त्यांचा तसूभरही विचार केला नाही. घटस्फोटाचे परीणाम सर्वात जास्त मुलांना भोगावे लागतात हे तुम्हाला समजायला हवं होतं.

शिवाय नवरा म्हणजे काही वस्तू नाही मनात आलं की बदलून टाका. विवाह म्हणजे तडजोड असते. ज्यात पतीपत्नींना स्वत:चे अहं बाजूला ठेवून ताळमेळ बसवावा लागतो. विशेषत: जेव्हा तुमच्यावर मुलांची जबाबदारी असते. तुमच्या बाबतीत असं वाटतं की तुम्ही आवेशात येऊन घाईघाईने निर्णय घेतला. एवढं करूनही दुसऱ्या लग्नातही तुम्ही सुखी नाही. म्हणजे की तुमच्या स्वभावातच काहीतरी खोट आहे. नातेसंबंध निभावून न्यायला शिका. हेच तुमच्यासाठी योग्य होईल. मुलांसाठी तुमचा जीव तगमगतो ते व्यर्थ आहे. याचा तुम्ही आधीच विचार करायला हवा होता. आता तर तुमच्या मुलांनाही तुम्हाला भेटायची इच्छा नसेल. शिवाय तुमचे पती व परिवार यांनासुद्धा तुमचा मूर्खपणा असह्य होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें