आरोग्य परामर्श

* डॉक्टर ज्योती बाली, इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट बेबीसून फर्टिलिटी अण्ड आईवीएफ सेंटर

प्रश्न : माझं वय ४० वर्षे आहे. मला खूप जास्त वैजायनल डिस्चार्ज होतं. हे कंडिशन खूपच त्रासदायक वाटतं. असं का होतं आणि यावर उपाय शक्य आहे का?

उत्तर : सामान्यपणे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये वैजायनल डिस्चार्ज एक सामान्य समस्या आहे. तुमची स्थिती सामान्य नाही आहे. तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. दोन्ही स्त्रावाच्या दरम्यान योनीमध्ये खाज, जळजळ, पांढरा रंगाचं दाट डिस्चार्ज, स्किन रॅशेज, सूज, वारंवार लघवीला होणं आणि लघवी करतेवेळी वेदनेसारख्या समस्या निर्माण होतात. असामान्य योनी स्त्रावाची अनेक कारणे असू शकतात. जसे की, यौनसंबंधाच्या दरम्यान होणारं संक्रमण रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं व ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या योनीमध्ये फंगल इस्ट नावाचा संक्रमण रोग होऊ शकतो. स्त्रिया सुरुवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कधीकधी गर्भाशय कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता निर्माण होते. तसंच सुरुवातीलाच याकडे लक्ष दिलं तर यावर उपचार केले तर निश्चितपणे ही समस्या बरी होऊ शकते. परंतु दुर्लक्ष वा बराच उशिराने उपाय केल्यानंतर गंभीर वा असाध्य रोगदेखील होऊ शकतो .

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. मला वारंवार एंडोमिट्रीओसीसची समस्या होत असते. मी सर्जरीद्वारे रिमुव्हदेखील केलं आहे. परंतु पुन्हा एंडोमिट्रीओसीस सांगितलं जातंय. मला पिरियड्समध्ये अधिक स्त्राव तसंच वेदना होतात.

उत्तर : गर्भाशयात होणारी समस्या आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील थर बनवणारा एंडोमिट्रीयम लाइनिंगमध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि तो गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतो. कधी कधी एंडोमिट्रीयमचा थर गर्भाशयाच्या बाहेरच्या थरा व्यक्तीरिक्त अंडाशय, आतडे आणि इतर प्रजनन अंगांमध्येदेखील पसरला जातो. ज्याला एंडोमिट्रीओसिस म्हटलं जातं. मोठया एंडोमिट्रीयम थरामुळे प्रजनन अंगात जसं फेलोपियन ट्यूब, अंडाशयाच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. इंडोमिट्रीओसिस स्त्रियांमध्ये पिरीएडच्या दरम्यान अधिक ब्लीडिंग आणि वेदनेचं कारण देखील बनतं. यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो तर दुसरीकडे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये हे इन्फर्टिलिटीचं कारणदेखील बनतं. ही समस्या एखाद्या बाहेरच्या संक्रमणामुळे नसून शरीराच्या आंतरिक प्रणालीच्या कमतरतेमुळे होते. इंडोमिट्रीओसिसच्या अंडाशयापर्यंत पसरणाऱ्या या भागावरती सिस्टदेखील बनतं.

मेडिकल ट्रीटमेंटने आर्टिफिशियल मेनोपोजच्या माध्यमातून एंडोमिट्रीओसीसला रोखलं जातं. यासाठी हार्मोनल औषधं वा महिन्यातून एक इंजेक्शन पुरेसं असतं. याव्यतिरिक्त इंडोमिट्रीओसिसच्या समस्येने ग्रस्त रुग्णाला जर आई व्हायचं असेल तर यासाठी आययुआय आणि आयव्हीएफसारख्या स्पेशल ट्रीटमेंट आहेत. जर रुग्णाचे वय अधिक असेल आणि अनेक सर्जरी झल्या असतील तर गर्भाशय आणि ओवरीज काढून हिस्टरेक्टोमी याचा सर्वाधिक उत्तम उपाय आहे.

प्रश्न : मी ७ महिन्याची गर्भवती आहे. माझं वय २८ वर्षे आहे. जसजशी वेळ जवळ येतेय, प्रसुतीबद्दल विचार करून मी घाबरुन जाते. कारण मी असं ऐकलंय की प्रसुतीच्या वेदना खूपच असहनीय असतात. मला जाणून घ्यायचंय की मी पेनलेस डिलिव्हरी करू शकते का? या पद्धतीने प्रसुती केल्यानंतर माझ्या व माझ्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम तर नाही ना होणार?

उत्तर : अलीकडे एपीड्यूरल एनेस्थेशियाद्वारे पेनलेस प्रसुती करणं खूपच सामान्य प्रक्रिया आहे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. तसंच मुलासाठी आणि आईसाठीदेखील या प्रक्रियेद्वारा प्रसुतीच्या असहनीय वेदनेपासून वाचू शकतात. या प्रक्रियेत एका छोटया कॅथेटरच्या मदतीने एपीड्यूरल आणि एनेस्थेशियाला लोअर बॉडीच्या एपीड्यूरल पार्टमध्ये टाकलं जातं. काही काळासाठी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. परंतु डॉक्टर आणि एनेस्थेशिया एक्सपर्टच्या देखरेखीखाली स्थितीला नियंत्रित केलं जातं.

प्रश्न : माझं वय ३८ आहे. मेडिकल तपासणीत माझ्या जननांगाच्या ट्यूबवर क्लोसिस आढळलं आहे. मला दुसरं मूल हवं आहे. परंतु अशा परिस्थितीत मी गर्भवती होणं शक्य आहे का? हा आजार माझ्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरतीदेखील परिणाम करू शकतो का?

उत्तर : गर्भाशय टीबी हा एक असा रोग आहे जो प्रामुख्याने स्त्रियांच्या जननांगांमध्ये जसं की अंडाशय, फेलोपियन ट्यूब, गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा आणि योनी व श्रोनिच्या आजूबाजूच्या लिंफ नोड्सला प्रभावित करतो. हा रोग प्रामुख्याने स्त्रियांच्या रिप्रोडक्शन वयाच्या दरम्यान प्रभावित करतो. अनेकदा वांझपणाचे कारण बनतं. जेनाईटल टीबीचा उपचार दोन स्तरावर केला जातो. पहिला स्तरांमध्ये दोन महिन्यापर्यंत कमीत कमी तीन अँटीटीबीच्या औषधांसोबत तसंच दुसऱ्या स्तरांमध्ये चार ते दहा महिन्यासाठी कमीत कमी दोन अँटीटीबीच्या औषधांसोबत कायम उपचार चालू राहतो आणि जेनाईटल पार्टमध्ये सर्जरीद्वारा उपचार केले जातात. उपचाराच्या दरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या सूचनांचं योग्य प्रकारे पालन करा. याच्या उपचारानंतर एआरटी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करू शकता. परंतु तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हे करावं लागणार.

सौंदर्य समस्या

– समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

माझ्या चेहऱ्यावर केस उगवत आहेत, त्यामुळे कुठे येण्या-जाण्यास मला लाज वाटते. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्यामुळे ते हटवता येतील?

हार्मोनलच्या बदलामुळे चेहऱ्यावर केस उगवण्याची समस्या येऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. केस हाताने प्लक करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. तुम्ही जेवढे केसांना प्लक करणार, त्याच्या दुप्पट वेगाने ते उगवणार. वाटल्यास आपण ब्युटी पार्लरमधून यासाठी कटोरी व्हॅक्सिंग करू शकता. जर चेहऱ्याच्या केसांवर कायमस्वरूपी उपचार करायचा असेल, तर एक्सपर्टकडून लेझर ट्रीटमेंट करून घ्या.

क्रीमचा वापर केल्याने चेहरा काळा पडतोय, काय करू?

सर्वप्रथम केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त लावणे बंद करा. त्यानंतर घरी बनवलेल्या फेसपॅक आणि स्क्रबच्या मदतीने चेहरा रोज स्वच्छ करा. आपला काळवंडलेला चेहरा पूर्ववत होईल.

माझ्या लिप्सवर व्हाइट स्पॉट होत आहेत, ते कसे बरे करता येतील?

लिंबू, संत्रे यासारख्या आंबट फळांचा रस पाण्यात मिसळून ओठांना लावल्यास डाग कमी करण्यास मदत होऊ शकते. हा रस आपण कापसाच्या बोळ्याने डागांवर लावू शकता. या सोप्या घरगुती उपायाने काही दिवसांतच डाग गायब होऊ लागतात. आपल्या आहारात लसणीचे सेवन वाढवल्याने आपल्याला सफेद डाग कमी करण्यास मदत मिळेल.

प्रेग्नंसीनंतर केस खूप गळत आहेत, असे का?

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनचे संतुलन बिघडते. त्यामुळे केस वेगाने गळतात. गर्भावस्थेत आहाराकडे लक्ष दिल्याने हे काही प्रमाणात कमी करता येते.

माझ्या चेहऱ्यावर तीळ आहेत आणि माझी त्वचा कोरडी आहे. मी काय करू, जेणेकरून माझी त्वचा उजळ होईल आणि डागांपासून माझी सुटका होईल?

चेहऱ्याच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा. तो ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग कमी करतो. २ महिने ही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला फरक दिसेल.

संवेदनशील त्वचेच्या देखभालीसाठी काही घरगुती उपाय सांगा?

जर आपली त्वचा संवेदनशील असेल, तर आपण त्वचारोग तज्ज्ञाला दाखवून तपासून घ्या. आपल्याला आपल्या त्वचेबाबत माहीत असले पाहिजे की कोणत्या कारणाने आपली त्वचा एवढी संवेदनशील होतेय. त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्यानंतर आपल्याकडे त्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम मार्ग व साधने असतील.

आपली त्वचा संवेदनशील असेल, तर तिची विशेष काळजी घेण्याची गरज असते. उन्हात जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा. खूप पाणी प्या आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा.

माझे केस कर्ली आहेत आणि जेव्हा ओले असतात, तेव्हा केवळ त्यावेळीच व्यवस्थित असतात. सुकल्यानंतर ते खूप हार्ड होतात. मी कशाप्रकारे माझ्या केसांना मृदू आणि सॉफ्ट करू शकते, एखादा उपाय सांगा?

केसांना मऊ बनवण्यासाठी आणि त्यांच्यात चमक आणण्यासाठी अंड्यापेक्षा उत्तम दुसरे काहीच नाही. हे एवढे प्रभावी आहे की एकदा वापरल्यानंतर आपल्याला फरक जाणवेल. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि लॅक्टिन असते. ते केसांना निरोगी बनवते. त्यात ऑलिव्ह ऑइल मिसळून लावल्याने फायदा होईल.

दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल?

तुळस तोंड आणि दातांच्या आजारांपासून आपले रक्षण करते. याची पाने उन्हात वाळवून पावडर बनवून मग टूथपेस्टमध्ये मिसळून रोज ब्रश करा. पिवळेपणा दूर होईल. मिठामध्ये सोडियम आणि क्लोराइड दोन्हीचे मिश्रण असते. ते दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. परंतु याचा जास्त वापर दातांच्या इनॅमलचे नुकसान करू शकते. तसेही मीठ आणि राईच्या तेलाने दातांना चमक आणण्याचा उपाय प्रचलित आहे. चिमूटभर मिठात २-३ थेंब तेल मिसळून दात स्वच्छ करा.

माझे वय २८ वर्षे आहे. मी खूप बारीक आहे. माझी मानही खूप बारीक आहे. त्यामुळे कोणताही नेकपीस मला शोभून दिसत नाही. मी कशा प्रकारचे नेकपीस व एक्सेसरीजचा वापर करू, कृपया मला सांगा?

तुम्ही ज्याप्रकारे आपल्या शरीराच्या ठेवणीबाबत माहिती दिलीय, त्यावरून वाटते की तुमची मान लांब असावी. उंच मान असणाऱ्या महिलांना कुठल्याही लांबीची चेन शोभून दिसते. उंच व बारीक असणाऱ्या महिलांना मध्यम आकाराचे दागिने जास्त चांगले दिसतात. सामान्यपणे दागिने कपड्यांच्या हिशोबाने घातले जातात. इथे लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे आपले टॉप, कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळ्याच्या डिझाइनवरही आपल्या नेकपीसचा लुक अवलंबून असतो. ड्रेसच्या गळ्याच्या आकाराची माळ असू नये. उदा. गोल गळ्याच्या ड्रेसवर गोल आकाराची माळ घालू नये. मोठ्या गोल गळ्याच्या ड्रेसवर छोटी चेन आणि व्ही नेकवाल्या ड्रेसवर छोटी गोल किंवा अंडाकार माळेचा वापर करावा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २५ वर्षीय अविवाहित तरुण आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मेव्हणीवर माझे प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मुलगीही लग्नासाठी तयार आहे. एवढेच नव्हे, तर तिच्या घरच्यांचाही या लग्नाला काही विरोध नाही. पण माझी आई या लग्नाच्या ठाम विरोधात आहे. याला मजबूत कारणही आहे.

खरे म्हणजे माझी वहिनी (मुलीची बहीण) खूप उग्र आणि घमेंडखोर स्वभावाची आहे. तिने कधीही आपल्या पतीला आणि ना ही घरातील कुठल्याही सदस्याला मानसन्मान दिला. माझ्या वहिनीने घरातील लहानांनाही कधी जिव्हाळा दाखवला नाहीए. तिला फक्त आणि फक्त स्वत:ची काळजी आहे. ती आपल्या मनाप्रमाणे वागते.

याच कारणामुळे माझा दादा आणि आई-वडिलांचा विरोध असतानाही, ती एका खासगी कंपनीत खूपच खालच्या पातळीवरील नोकरी करू लागलीय. त्यामुळे घरातील काम व मुलांची जबाबदारी आईवर येऊन पडली आहे. माझी आई म्हणते की जर मोठ्या बहिणीने आमच्या नाकीनऊ आणले आहेतच. रोज घरात भांडणं करते, अशा वेळी तिच्या बहिणीशी लग्न केलेस, तर दोघी बहिणी मिळून घराची दुर्दशा करतील, हे मला कळले पाहिजे. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मोठ्या बहिणीचा स्वभाव असा आहे, याचा अर्थ छोटी बहीणही कडक स्वभावाची असेल, असे काही नाही. छोट्या बहिणीचा स्वभाव खरोखरंच मोठ्या बहिणीपेक्षा वेगळा आहे. ती खूप सरळसाधी असून तिला जबाबदारीची जाणीव आहे.

मी खूप समजावूनही घरातले लोक तयार होत नाहीएत. मी काय करू? मला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांनी परवानगी द्यावी, अशीही माझी इच्छा आहे. कृपा करून काहीतरी उपाय सांगा.

मी त्या मुलीला जेवढे जाणले आहे, ती आपल्या बहिणी(वहिनी)सारखी मुळीच नाहीए, पण ही गोष्ट मी कुटुंबीयाना समजावू शकत नाहीए. आई हट्टाला पेटली आहे की कुठल्याही मुलीशी (मग भले ती सुंदर नसली तरी) माझे लग्न लावून       देणार, पण या मुलीशी मुळीच नाही. मी काय करू?

घरच्यांनी तुमची वहिनी म्हणजेच मुलीच्या मोठ्या बहिणीचे वागणे पाहिले आहे. त्यांना जो वाईट अनुभव  मिळाला, त्यामुळे त्यांना असे लग्न त्या घरात करून देण्यास भीती वाटतेय. जर त्यांच्या बाजूने विचार केला, तर ते आपल्या जागी योग्यच आहेत.

तुमचे म्हणणे आहे की ती मुलगी (आपली प्रेयसी) आपल्या बहिणीसारखी नाहीए, तर तुम्हाला कळले पाहिजे की, लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या जीवनात खूप फरक असतो. विवाहाच्या पूर्वीचे जीवन काल्पनिक असते. तिथे प्रेयसी आणि  प्रियकर स्वत:ला एकमेकांसमोर उत्तम दर्शवण्याचाच प्रयत्न करतात. खरे गुणदोष तर लग्नानंतर कळतात. म्हणून लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी चांगल्याप्रकारे विचार करा. मनाबरोबरच मेंदूचेही ऐका. लग्न हा जीवनाचा महत्त्वाचा निर्णय आहे, जो रिटेक होत नाही.

जर तुम्हाला मुलीमध्ये काही वाईट गुण दिसत नाहीत, तर घरातील मंडळींना समजावण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजावा की दुसरी मुलगी जिची ते निवड करतील, ती चांगली आणि साधी असेलच, हे जरूरी नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्या पसंतीकडे दुर्लक्ष करू नये. जर ते तुमचे म्हणणे ऐकत नसतील, तर एखाद्या नातेवाइकाची किंवा कौटुंबिक मित्राची मदत घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, या लग्नाच्या चांगल्या-वाईट परिणामांना आपण जबाबदार असाल.

मी एक सुशिक्षित गृहिणी आहे. लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. २ गोंडस मुले आहेत. पती खूप प्रेम करणारे आणि काळजी घेणारे आहेत. मी हरप्रकारे आनंदी आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक सल लपून राहिला आहे. त्यामुळे मी दु:खी होते.

खरे तर शाळा-कॉलेजमध्ये मी खूप हुशार विद्यार्थिनी होते. लहानपणापासून माझी इच्छा होती की शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करेन, पण कॉलेजमधून बाहेर पडताच लग्न झाले. मग २ मुलांची देखभाल आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढी व्यस्त झाले की मनातील इच्छा मनातच राहिली. मला सारखे वाटत राहते की गृहिणीचे काम हे काय काम आहे? हे तर अशिक्षित आणि कमी शिकलेल्या बायकाही चांगल्याप्रकारे करतात. माझे शिक्षण आणि उच्चशिक्षित असल्याचा काय फायदा? मी काय करू?

आपण एक कुशल गृहिणी आहात. आपण कुशलतापूर्वक घरकुटुंबाची जबाबदारी पार पाडत आणि मुलांची चांगली देखभाल करत आहात, ही कमी महत्त्वाची गोष्ट नाहीए. तुम्ही असे का समजता की गृहिणी बनून राहिल्यास आपले शिक्षण वाया जातेय. असे म्हणतात की एका स्त्रीने शिक्षण घेतल्याने संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे कल्याण होते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्यांना कमी समजू नका.

जर आपल्याला खंत वाटत असेल की गृहिणीच्या कर्तव्यामुळे आपण काही खास करू शकला नाहीत, तर आपण घरबसल्या ट्युशन इ.चे काम करू शकता. यामुळे आपण आपल्या शिक्षणाचा सदुपयोगही कराल शिवाय आपल्याला मानसिक समाधानही मिळेल. एखादी एनजीओ वगैरेही जॉइन करू शकता.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर    डॉ. भारती तनेजा द्वारा

माझे केस काही महिन्यांपासून वेगाने गळत आहेत. त्यामध्ये कोंडादेखील आहे. यासाठी कोणती अशी ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे माझी केसगळती बंद होईल आणि नवीन केस येतील?

केस गळण्यामागे अनेक कारणं असतात, ज्यामध्ये कोंडादेखील एक आहे. अशामध्ये कोंडा ठिक करणं गरजेचं आहे. तुमच्या केसांमध्ये याचं इन्फेक्शन पसरलं आहे, म्हणून आता हे नैसर्गिक पद्धतीने करणं कठीण आहे. कोंडयापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून बायोप्ट्रान घेऊ शकता. या दोन्हीमुळे डिसइन्फेकशन होतं. ज्यामुळे कोंडादेखील जातो आणि केस गळतीदेखील बंद होते. यासोबतच लेझरने केसांचं नूतनीकरण होतं.

माझं वय ४० आहे.वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागला आहे. या वयात मला कशा प्रकारचा मेकअप आणि स्किन केअर करायला हवी? कृपया सांगा?

चाळीशीनंतर त्वचा कोरडी होते. अशावेळी त्वचेला नरिश करण्यासाठी सिटीएमपी अर्थातच क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्शनची गरज आहे. क्लींजिंगसाठी तुम्ही नरिशिंग क्लिंजींग मिल्कचा वापर करायला हवा. हे त्वचेला डीप क्लीन करण्याबरोबरच कोरडेपणादेखील दूर करतं. त्वचेवर एजिंग दिसण्याचं प्रमुख कारण ओपन पोर्स आहे. हे पोर्स कमी करण्यासाठी क्लींजिंगनंतर टोनिंग करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की तुमचा टोनर अल्कोहोल युक्त नसावा. सोबत चेहऱ्याचा ओलावा  कायम राखण्यासाठी मॉइश्चरायझर नक्की लावा. चेहऱ्याची केअर करणंही तेवढंच गरजेचं आहे, जेवढं त्याचा संरक्षण. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचा करपली जाते. यामुळे सुरकुत्या, ब्राऊन स्पॉट्स इत्यादी एजिंगची लक्षणें दिसून येतात. म्हणूनच यापासून वाचण्यासाठी उन्हात निघण्यापूर्वी सन स्क्रीन आवर्जून लावा.

खूप काळापासून केसांना घरातच स्ट्रेट करते. परंतु त्याचा रिल्ट पार्लरसारखा मिळत नाही. मला केस स्ट्रेट करण्याची योग्य पद्धत सांगा?

जेव्हा तुम्ही पार्लर वा क्लिनिकमध्ये केस स्ट्रेटनिंग करता तेव्हा ते करणारी लोकं नॉर्मली एक्सपर्टस असतात. जे केसांच्या पातळ पातळ लेयर्सना स्ट्रेटनिंग करतात, त्यांच्याद्वारे स्ट्रेटनिंग करण्यामध्ये वापरण्यात आलेलं स्ट्रेटनिंग उत्तम क्वालिटीचेदेखील असतातं, जे घरी तेवढया चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही दररोज घरच्या घरी स्ट्रेटनिंग करण्याच्या बदल्यात परमनंट स्ट्रेटनिंग करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला पार्लरसारखे सरळ केस कायमचे मिळतील. स्ट्रेट केस ठेवण्यासाठी तुम्ही केसांना परमनंट हेअर एक्सटेन्शनदेखील करू शकता. जर परमनंट हेअर एक्सटेन्शन करायचं असेल, तर जेव्हादेखील बाहेर जाल तेव्हा बाहेर एक्सटेंशन लावूनदेखील केसांना सेट करू शकता. यामुळे केस खूपच सुंदर दिसतात.

माझ्या डोळयाच्या आजूबाजूला सूज दिसून येते. असं का होतं आणि ते दूर करण्यासाठी मला काय करायला हवं?

अशा प्रकारची समस्या डोळयांच्या आजूबाजूला लिंफ एकत्रित झाल्यामुळे उत्पन्न होतं. याचं प्रमुख कारण हेल्थ प्रॉब्लेम वा मग औषधांचे साईड इफेक्टस आहेत. जर तुम्ही दीर्घकाळासाठी एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर सर्वप्रथम तुमची इंटरनल तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावर उपचार करा. या व्यतिरिक्त ही सूज कमी करण्यासाठी एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये जा. तिथे लिंफला व्याक्युम मशीनच्या माध्यमातून ड्रेन केलं जातं आणि लेझरद्वारे त्वचेला री जनरेट केलं जातं. ही ट्रीटमेंट खूपच मोठी आहे, परंतु यामुळे फायदा नक्की होईल.

माझं वय ३० वर्षं आहे. माझी त्वचा तेलकट आहे. मला क्रीम वा कोलाजन सिरममध्ये कशाचा दररोज वापर करायला हवा?

सिरममध्ये त्वचेला रिपेअर करणारी तत्व कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात. ज्यामुळे हे खूपच कमी प्रमाणात लागतं आणि अधिक परिणामकारक असतं. जर क्रीम माईंल्ड असेल तर यामुळे सिरम क्रीमपेक्षा अधिक योग्य आहे. तुमची त्वचा डीपली नरिश करण्यासाठी दररोज सकाळी फेस क्लीन वा शक्य असेल  तर लाईट स्क्रब केल्यानंतर कोलाजन सिरमचा वापर करा. याच्या दररोजच्या वापरामुळे तुमची त्वचा रिपेअर करून त्याला प्रोटेक्ट व हायड्रेट करेल. सोबतच एजिंग साइन्सदेखील दूर होईल.

रात्री झोपण्यापूर्वी ए. एच. ए. म्हणजेचं अल्फा हाय ड्रॉक्सी अॅसिड सिरम लावा. यामध्ये १४ फ्रूट अॅसीडस असतात, जे त्वचेत कोलाजन वेगाने बनवून त्यावर सुरकुत्या पडण्यापासून वाचवतात आणि डोळया खालचा काळेपणा दूर करण्यातदेखील मदत करतात. या सीरमच्या दररोजच्या वापरामुळे साईन ऑफ एजिंग कमी होईल, सोबतच त्वचा उजळेल व तरुण दिसून येईल. सिरम तेलकट त्वचेसाठी अधिक योग्य आहे, कारण कोरडया त्वचेवर सिरम लावल्यामुळे थोडा घट्टपणा येतो आणि कोरडया त्वचेसाठी क्रीमचा वापर योग्य आहे.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २४ वर्षांची तरुणी आहे. ३-४ महिन्यानंतर माझं लग्न होणार आहे. मी अजूनपर्यंत कोणासोबतही सेक्स संबंध केले नाहीत. परंतु नियमित मॅस्टरबेशन करते. मला वाटतं की यामुळे प्रायव्हेट पार्टची त्वचा लूज पडली आहे. त्यामुळे मी खूप तणावात आहे. मी काय करू?

ज्या प्रकारे सेक्स केल्यामुळे नाजूक भागाची त्वचा लूज पडत नाही, त्याचप्रमाणे मॅस्टरबेशननेदेखील त्वचेवर कोणताही फरक पडत नाही आणि शिथिलतादेखील येत नाही. हा तुमचा एक भ्रम आहे.

खरं म्हणजे कोणत्याही अवयवाच्या कमी उपयोगाने शिथिलता येते. नियमित उपयोगाने नाही. तुम्ही तुमच्या लग्नाची तयारी करा आणि मनातील भीती पूर्णपणे काढून टाका. तुमच्या वैवाहिक आयुष्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. सासर आणि माहेर जवळजवळच आहे. त्यामुळे माझी आई आणि इतर नातेवाईक अनेकदा सासरी येतजात असतात. माझ्या पतींचा काहीच विरोध नाही. परंतु माझ्या सासूबाईंना हे आवडत नाही. त्या म्हणतात की तू तुझ्या  आईला सांग की सारखं भेटायला येऊ नका. खरंतर सासरी माझ्या माहेरच्या लोकांचा पूर्ण मान राखला जातो. परंतु सासूबाईंचं म्हणणं आहे की नातेवाईकांमध्ये दुरूनच संबंध ठेवल्यामुळे नवेपणा राहतो. यामुळे घरात वाददेखील होतात. परंतु मी माझ्या आईला हे कसं सांगू? एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचं मन दुखवायचं नाही आहे. कृपया योग्य सल्ला द्या?

तुमच्या सासूबाईंचं म्हणणे योग्य आहे. नातं प्रेमाने निभवावं त्यामध्ये अंतर असावं. त्यामुळे नातेसंबंध दीर्घकाळ राहतात आणि संबंधांमध्येदेखील गोडवा राहतो.

अनेकदा काही प्रकरणांमध्ये मुलीचं सासर जवळ असतं, तेव्हा तिच्या माहेरच्या नातेवाईकांचंसारखं सासरी येणं जाणं असतं आणि ते अनेकदा कौटुंबिक प्रकरणांमध्येदेखील नाक खुपसतात. यामुळे मुलीचं घर विस्कटलं जातं.

भलेही प्रत्येक सुखदु:खात एकमेकांची साथ द्या, परंतु नात्यांमध्ये थोडं अंतर ठेवा. त्यामुळे सर्वांच्या मनात प्रेम व नात्यांचा गोडवा राहील.

तुम्ही तुमच्या आईशी याबाबत मोकळेपणाने बोलून घ्या. त्या तुमच्या आई आहेत आणि यामुळे तुमच्या घरात क्लेश होईल, हे त्यांना आवडणार नाही. होय, एक मुलगी असण्याची जबाबदारी तुम्हीदेखील निभवा आणि यासाठी एक निश्ंिचत वेळ वा दिवशी तुम्ही स्वत:हून माहेरी जाऊन तिची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्याशी फोनवरुनदेखील नियमित संपर्कात रहा. माहेरच्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा. नक्कीच यामुळे घरातील क्लेश कमी होईल आणि नात्यांमध्येदेखील गोडवा बनून राहील.

मी ३२ वर्षीय विवाहिता आहे. सासू-सासरे नसल्यामुळे १७ वर्षांच्या दिरासोबत राहते. मी त्याला माझ्या मुलासारखं प्रेम करते. परंतु इकडे काही दिवसापासून पाहते की तो टीव्हीवर अनेकदा क्राईम शो पाहतो आणि त्यावर गप्पादेखील मारतो. काही दिवसांपूर्वी त्याचं २-४ मुलांशी भांडण झालं होतं. मी यावरून त्याला ओरडले तेव्हा उलट उत्तर दिलं नाही परंतु त्या दिवसांपासून तो माझ्याशी कमी बोलतोय. क्राईम शो बघण्याची सवय लागली आहे. अनेकदा त्याला रागावूनदेखील तो दुर्लक्ष करतो. त्याची ही सवय वाईट गोष्टींमध्ये बदलणार तर नाही ना? कृपया योग्य सल्ला द्या?

टीव्हीवर दिसणारे अनेक क्राईम शो हे काल्पनिक असतात. जे समाजात जागरुकता नाही तर लोकांना भडकविण्याचे काम नक्कीच करतात.

अनेकदा नात्यांमध्ये धोका, एका मित्राकडून दुसऱ्या मित्राचा खून, पैशासाठी खून, लग्नात फसवणूक, अनैतिक संबंध, पती-पत्नींच्या नात्यांत विश्वासाचा अभाव दाखवणं, कुठे ना कुठे लोकांच्या मनात आपल्या लोकांबद्दल अविश्वासाचे भाव निर्माण करतं. म्हणूनच टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या अनेक क्राईम शो हे नात्यांना प्रभावित करतात. गुन्हेगारांसाठी मार्गदर्शकाची भूमिकादेखील निभावतात.

अलिकडेच एक बातमी प्रसिद्ध झाली होती ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली होती जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याने पोलिसांना सांगितलं की ही हत्या त्याने टीव्हीवरचा एका क्राईम शो पाहिल्यानंतर केली होती. केवळ हेच प्रकरण नाही तर सतत काही ना काही घटना घडतच असतात.

अनेक क्राईम शोमध्ये दाखवलं जातं की गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हा करतेवेळी काळजी घेतो म्हणजे तो कायद्याच्या कचाटयात सापडणार नाही. यामुळे कुठे न कुठे गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत.

मुलांना तर या मालिकांपासून दूर ठेवण्यातच भलाई आहे आणि तसंही तुमच्या दिराचं वय खूपच कमी आहे. त्याचं मन अभ्यासात लागायला हवं. तुम्ही त्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला चांगली मासिकं वा चांगलं साहित्य वाचण्यासाठी प्रेरित करा. हवं असल्यास तुम्ही तुमच्या पतीशीदेखील बोलून पहा म्हणजे वेळेतच तो योग्य मार्गाला लागेल.

सौंदर्य समस्या

– समाधान ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजाद्वारा

माझ्या चेहऱ्यावर मुरुमं आहेत. ओपन पोर्सचीही समस्या आहे. माझ्यत न्यूनगंड निर्माण झाला आहे. कृपया माझ्या समस्येचं निराकरण करा.

मुरुमं येण्यामागे बरीच कारणं असतात. ही मुरुमं काही अंतर्गत कारणामुळे तर नाही ना? यासाठी तुम्ही रक्त तपासून पाहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय मलावरोध, कोंडा आणि तेलकट त्वचा यामुळेही मुरुमं येतात. म्हणूनच त्यांना बरं करण्याआधी त्यांच्या येण्याचं खरं कारण जाणून घ्या आणि मग उपाय करा. मुरुमं सुकवण्यासाठी पुदिन्याचा रस लावा. यामुळे काहीच दिवसांत मुरुमं सुकतील. वैद्यकिय उपचार म्हणून ओझोन ट्रीटमेंट घेऊ शकता. यामुळे त्वचा रिवायटलाइज आणि रिजुविनेट होते. शिवाय हीलिंग प्रक्रियाही वेगाने होते. यामध्ये अँटिफंगल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने इफेक्टेड स्किन लवकर बरी होते. ओपन पोर्सच्या समस्येसाठी यंग स्किन मास्कची सिटिंग्ज घ्या.

मी ३५ वर्षांची नोकरदार महिला आहे. मी चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप उत्पादनं वापरून पाहिली, पण चेहऱ्याचा कोरडेपणा गेला नाही. कृपया चेहरा ताजातवाना ठेवण्यासाठी घरगुती उपाय सांगा, जेणेकरून माझी समस्या सुटू शकेल.

कोरड्या आणि शुष्क त्वचेमध्ये आर्द्रता कमी असते. त्यामुळे चेहरा फिका पडतो. फिकेपणा दूर करण्यासाठी मास्क बनवा. ३-४ बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते जाडसर वाटून घ्या. यामध्ये स्मॅश केलेलं अर्धपिकं केळ, १ चमचा मध आणि ५ चमचे दूध मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये अर्धा चमचा कॅलेमाइन पावडर मिसळून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

माझी त्वचा टॅन झाली आहे. मुलतानी मातीनेही काही उपयोग झाला नाही. मी काय करू?

तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून फ्रूट बायोपील फेशियल करून घेऊ शकता. या फेशियलमध्ये इतर फळांसोबतच पपईच्या एन्द्ब्राइम्सचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचेचा रंग फिका होतो. यामुळे टॅनिंग रिमूव्ह होतं आणि त्वचेचं डीप क्ंिलजिंगही होते. घरातून निघण्याआधी चेहरा, हात, पाय, पाठ व शरीराच्या अन्य न झाकलेल्या भागांवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. घरच्या घरी टॅनिंग घालवण्यासाठी दही, अननसचा रस आणि साखरेची पेस्ट करून त्वचेवर स्क्रब करा. स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.

मी ३८ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्याची त्वचा सैल, कोरडी आणि पिवळसर आहे. अनेक क्रिम लावल्या, पण चेहरा निस्तेज राहिला. चेहऱ्याची टवटवी कायम राहण्यासाठी उपाय सांगा.

क्रीम वापरल्याने काही खास फायदा होत नाही. त्वचा कॅरोटिन नावाच्या प्रोटिनपासून बनलेली असते. त्वचेला संपूर्ण पोषण मिळावं म्हणून आपल्या आहारात प्रोटिनयुक्त पदार्थ उदाहरणार्थ, दूध, दही, पनीर, अंडी, मासे यांचा समावेश करा.

याशिवाय एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून लेजर ट्रीटमेंट घ्या आणि यंग स्कीन मास्क लावा. लेजरने स्किन रिजनरेट होईल आणि मास्कमुळे त्वचेला कोलोजन मिळेल. यामुळे त्वचा टाइट होईल. याशिवाय सैल त्वचेला अपलिफ्ट करण्यासाठी फेस लिफ्ंिटग ट्रिटमेंट घेऊ शकता.

माझं वय ४१ वर्षं आहे. माझ्या नाकावर खूप ब्लॅकहेड्स आहेत. त्यांना कसं दूर करता येईल. कृपया सांगा.

वेळोवेळी चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून फ्रूट पील करून घ्या. याशिवाय तुमच्या ब्यूटिशियनला ओझोन द्यायला सांगा. यामुळे पोर्स उघडतील आणि ब्लॅकहेड्स सहज निघतील. याशिवाय ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरच्या घरीही स्क्रब बनवू शकता. यासाठी अॅलोवेरा जेलमध्ये थोडं बेसन आणि थोडी खसखस मिसळून स्क्रब करा.

माझं वय ३२ वर्षं आहे. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आहेत. माझ्यासाठी कोणती क्रिम उपयोगी ठरेल.

तुम्ही बाजारात मिळणारी कोणतीही चांगली क्रिम किंवा आय सिरम वापरू शकता. ज्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॉमिन ‘ए’ आहे. डोळ्यांभोवती रिंग फिंगरने मसाज करा. यामुळे त्वचेवर खूप कमी दाब येतो.

माझं वय ३५ वर्षं आहे. माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत. त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा.

दिवसातून २-३ वेळा त्वचेवर अॅस्ट्रिंजंट लावा. हे अँटीबॅक्टेरियल असतं. यामुळे मुरुमं आणणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. ब्लॅकहेड्स असतील तर ते वेळोवेळी काढा. घरगुती उपाय म्हणून पुदीन्याची पेस्ट त्यावर लावा.

माझ्या चेहऱ्यावर पांढरे डाग आहेत. हे डाग लेजरने कायमचे नष्ट करता येऊ शकतात का?

पांढऱ्या डागांसाठी लेजर नव्हे तर परमनंट मेकअपच्या खास तंत्राद्वारे म्हणजे परमनंट कसरिंगद्वारे लावण्यात येतं. यामध्ये सुरूवातीला एका डागावर प्रयोग केला जातो. त्वचा तो रंग ग्रहण करत असेल तर २-३ महिन्यांनंतर त्वचेशी साधर्म्य असलेला रंग त्वचेच्या डर्मिस लेझरपर्यंत पोहोचवला जातो. यामुळे डाग दिसत नाहीत. परमनंट कलरिंगचा परिणाम २ ते १५ वर्षांपर्यंत राहतो.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २३ वर्षांची नवविवाहित महिला आहे. लग्नानंतर अनेक स्वप्ने उराशी बाळगून मी सासरच्या घरी आले, पण मला सासरचे वातावरण अजिबात आवडत नाही. माझ्या सासू विनाकारण टोकत राहतात आणि त्या केव्हा खूष होतील, केव्हा रागावतील हेही कळत नाही. त्या मला अनेकदा म्हणतात की, आता तुझे लग्न झाले आहे आणि तुला त्यानुसारच जगले पाहिजे. माझे मन खूप दु:खी आहे. मी काय करावे कृपया सल्ला द्या?

जर तुमच्या सासूचा मूड प्रत्येक क्षणी बनत-बिघडत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तिला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही स्वत:ला कोसत राहण्याची आणि सासूविषयी गैरसमज करून घेण्याची चूक करू नका, घर-गृहस्थीच्या दबावाखाली त्या कदाचित कधी कधी तुमच्यावर राग काढत असतील, पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही की त्यांचे तुमच्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी कमी आहे.

दुसरे म्हणजे, तुमची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आणि तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही लग्न केले आहे असा विचार करणे निरर्थक आहे. त्यांनी एखाद्या गोष्टीला नकार दिल्यास हे आवश्यक नाही की त्या तुमचा अपमान करत आहेत.

आजच्या सासूचा दृष्टिकोन आधुनिक आहे आणि त्यांच्यात स्मार्टपणे घर चालवण्याची क्षमता आहे. सुनेला मुलगी म्हणून आकार देण्याचे काम सासूच करते. साहजिकच, सासूबाई तुम्हाला आतापासूनच घर कुशलतेने चालविण्यासाठी आणि त्यांना पटवून देण्यासाठी तयार करत आहेत.

सून म्हणून न राहता मुलगी म्हणून जगले तर बरे होईल. सासूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, फिरायला जा, खरेदीला जा. जेव्हा तुमच्या सासूबाईंना खात्री होईल की तुम्ही आता घर-गृहस्थी सांभाळू शकता तेव्हा त्या तुमच्याकडे चाव्या सोपवून निश्ंचत होतील.

मी २५ वर्षांची तरुणी आहे. २-३ महिन्यांनी माझे लग्न होणार आहे. मंगेतर एका मोठया कंपनीत चांगल्या पदावर काम करत आहे. परंतु असे असूनही एक चिंतादेखील आहे. खरं तर, मंगेतर लग्नाआधीच संबंध बनवू इच्छितो. इतकंच नाही तर तो मोबाईलवर पॉर्न व्हिडिओही पाठवत राहतो आणि जेव्हाही त्याच्याशी बोलते तेव्हा त्याला माझ्याशी सेक्सवर जास्त बोलायचं असतं. व्हिडिओ कॉलदरम्यान तो मला न्यूड व्हायलादेखील सांगतो. माझा मंगेतर कुठल्या मानसिक विकाराच्या आहारी गेला आहे का? मी काय करावे कृपया सल्ला द्या?

लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे अजिबात योग्य नाही. जर तुमचा मंगेतर तुमच्यावर यासाठी दबाव आणत असेल तर त्याला स्पष्टपणे नकार द्या. राहिली गोष्ट त्याची कुठल्या मानसिक विकाराने ग्रस्त असण्याची तर ती त्याच्या जवळ कुणी राहिल्यावरच कळू शकते.

जर तुमचा मंगेतर फक्त सेक्सबद्दल बोलत असेल, पॉर्न चित्रपट पाहण्याचा छंद असेल, तर स्पष्ट आहे ही एक विकृतीच आहे, ज्याला सेक्स अॅडिक्शन म्हणतात.

सेक्स अॅडिक्शन म्हणजे लैंगिक व्यसन हा एक मानसिक आजार आहे, ज्याचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच होत नाही, तर करिअर आणि नातेसंबंधांवरही होतो.

संशोधकांचे असे मत आहे की जे लोक सेक्सच्या बाबतीत स्वत:वर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांचा स्वत:सोबतच इतरांच्या आयुष्यावरही परिणाम होतो. अशा व्यक्तीला जर स्वत:ला अस्वस्थ किंवा तणाव जाणवत असेल तर त्याला पुन्हा-पुन्हा सेक्स करण्याची इच्छा होते जेणेकरून त्याचा ताण कमी होईल.

तुमचा मंगेतर लैंगिक व्यसनाने ग्रस्त आहे, हे त्याने स्वत: किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीने उघड केले तरच कळू शकते. तुम्ही जे काही कराल ते विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा. लग्न म्हणजे बाहुल्यांचा खेळ नाही. जर तुम्हाला मंगेतराच्या वागण्यात काही विकृती आढळत असेल तर तुम्ही स्वत:च ठरवा की तुम्हाला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे की नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें