गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

अलीकडेच माझं लग्न झालंय. पती खूपच समजूतदार आहेत आणि माझ्यावर खूप प्रेमदेखील करतात. माझी समस्या ही आहे की माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्या अनेकदा माझ्या घरी येतात आणि मला त्यांच्या बॉयफ्रेंड्सबद्दल खूपच जवळच्या आणि अंतर्गत गोष्टी सांगत राहतात. त्या मला फोनवरदेखील फोटो व गोष्टी शेअर करत राहतात. त्या बोलता-बोलता माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दलदेखील चेष्टा करत राहतात. हे सर्व ऐकूण मी स्वत:वर नाराज होते. असं वाटतं की लग्नापूर्वीचं आयुष्य किती छान होतं. मी खूप त्रासलेली आहे. कृपया सांगा काय करू?

फॅन्टसी म्हणजेच काल्पनिक जगतात हरवलेल्या अशा तरुणीं खरंतर यामध्येच आनंद मिळवतात आणि त्या याला स्टेटस सिम्बॉल समजतात. तसेच त्यांना वाटत असतं की दुसऱ्यानेदेखील त्यांच्या प्रमाणे विचार करावा आणि तेच करावं. याचा मनावर नक्कीच परिणाम होत असतो.

तुम्ही असं अजिबात करू नका. कारण आता तुम्ही विवाहित आहात आणि तुमचे पती तुमच्यावर खूप प्रेमदेखील करतात. यासाठी योग्य आहे की वैवाहिक आयुष्याची गाडी व्यवस्थित चालवा. लग्नानंतर आयुष्यात आनंद कमी होत नाही.

तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता की लग्नाबाबत तुमचे विचार वेगळे आहेत, आता मी विवाहित आहे म्हणून या सर्व गोष्टींमध्ये मला अजिबात रुची नाही आहे.

मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. आम्ही एका शहरात भाडयाच्या घरात रहातो. काही दिवसांपूर्वी माझ्या पतींचा छोटा भाऊ म्हणजेच माझा दिर आमच्यासोबत राहायला आला आहे. दिर अजून अविवाहित आहे. पती ऑफिसच्या कामात व्यस्त असतात, यामुळे मी माझ्या दिरासोबत शॉपिंग इत्यादी करू लागली. तिकडे काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाल्यामुळे मी चिंताग्रस्त आहे. तो आता माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. मला हात लावायला पाहतो. कळत नाही आहे की मी काय करू? यामुळे दोन्ही भावांमध्ये अंतर यावं असं मला नकोय. अनेकदा वाटतं की पतीना याबद्दल सांगावं. परंतु काहीतरी विचार करून मी पुन्हा थांबते. सांगा मी काय करू?

शक्य आहे की जास्त चेष्टा-मस्करी करून तुम्ही त्याला डोक्यावर बसवलं आहे. दिर आणि वहिनीच नातं खूपच पवित्र असतं आणि जर तुमचा दिर मर्यादा विसरून चुकीची इच्छा ठेवत असेल तर नक्कीच त्याच्यापासून दूर रहा. खरेदी वा बाजारसाठीदेखील दिरासोबत न जाता पतीसोबत जा. तुम्ही तुमचं लहान-मोठं सामान पतीसोबत जाऊनदेखील खरेदी करू शकता. पती ऑफिसमधून आल्यानंतर जवळच्या बाजारात जाऊन खरेदी करू शकता. यामुळे पतीलादेखील चांगलं वाटेल. आठवडयाच्या शेवटी वा ज्या दिवशी पतींना सुट्टी असतील त्यांच्यासोबत जाऊन पूर्ण आठवडयाची खरेदी करून घ्या. या दरम्यान तुम्हाला संयमाने काम करावं लागेल.

मी एकत्रित कुटुंबात रहाते. सासू-सासरे चांगल्या पदावर होते. आता ते निवृत्त आहेत. माझे पती आणि मोठे दिर चांगल्या कंपनीमध्ये काम करतात. ननंदेचं अजून लग्न झालेलं नाहीये. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे म्हणजे सगळी सुखसुविधा आहे. परंतु दररोज किटकिट आणि भांडणामुळे मी त्रासली आहे. पतींना एकत्र कुटुंबात रहायचंय. म्हणून वेगळा फ्लॅट घेऊन राहण्यासाठी सांगू शकत नाही. कृपया सांगा मी काय करू?

घरात छोटी मोठी भांडण होणं सामान्य गोष्ट आहे. असं म्हणतात की जिथे तक्रार असते तिथेच प्रेमदेखील असतं. परंतु जेव्हा मतभेद मनभेदामध्ये बदलून मोठया भांडणाचं रूप घेऊ लागतात तेव्हा ही नक्कीच चिंतेची बाब असते. सध्या तुमच्या घराची अवस्था वाईट नाही आहे की पतीसोबत तुम्ही वेगळं राहण्याचा विचार करावा. घरातील भांडण कोणा मोठया वादाचं रूप घेऊ नये यापासून वाचण्यासाठी तुम्हाला स्वत: पुढाकार घ्यावा लागणार.

एकत्रित कुटुंबात साधारणपणे कामाबाबतदेखील वाद होतात. म्हणून तुम्ही घरातील कामेदेखील व्यवस्थितरित्या मिळून-मिसळून करा. छोटया-मोठया गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यातच समजूतदारपणा आहे. लोक संयुक्त कुटुंबात राहून स्वत:च्या स्वप्नांना पंख देऊ शकत नाही परंतु एकत्रित कुटुंबात यासाठी खूपच चांगली संधी मिळते. एकत्रित कुटुंबात वाढलेली मुलेदेखील इतर मुलांच्या तुलनेत मानसिक व शारिरिकरित्या अधिक सुदृढ होतात.

मी ४२ वर्षीय पुरुष आहे. एक मुलगा आहे जो होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतोय. मी आणि माझी पत्नी दोघेही नोकरदार आहोत. समस्या वृद्ध वडिलांबाबत आहे. ते चालू फिरू शकत नाहीत आणि त्यांची विशेष देखभाल करावी लागते. कमी वेळ मिळत असल्यामुळे आम्ही त्यांची योग्य देखभाल करू शकत नाही आहोत. त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेवू शकतो का? एखाद्या वृद्धाश्रमाची माहिती मिळाली तर आमचं काम सहज सोपं होईल?

तुम्ही तुमच्या वृद्ध वडिलांची देखभाल करण्यासाठी दिवसा एखादी केअरटेकर ठेवणे योग्य राहील. या अवस्थेत वृद्धांना फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक व मानसिकरित्यादेखील आपल्या लोकांसोबत राहायला आवडतं. नंतर सकाळ-संध्याकाळ आणि सुटीच्या दिवशी त्यांना तुमची सोबत मिळत राहील. यामुळे ते कंटाळणार देखील नाहीत आणि योग्य देखभालमुळे ते निरोगीदेखील रहातील.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २६ वर्षांचा तरुण आहे. एके दिवशी माझ्या फेसबुक अकाउंटवर एका महिलेच्या मैत्रिणीची सूचना आली. मी त्याला माझी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही दिवसांनी त्या बाईने माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली, मग हळू हळू आम्ही हाय हॅलो करू लागलो. ती विवाहित, 46 वर्षांची, 2 मुलांची आई आहे हे मला चांगले माहीत आहे तेव्हा मी त्या स्त्रीकडे अधिकाधिक आकर्षित होत आहे.

तिचा नवरा दुसऱ्या शहरात तैनात आहे आणि ती मुलांसोबत एकटीच राहते आणि स्वतःचे बुटीक चालवते. ती आता मला तिच्या घरी बोलावते आहे. मी तिला भेटायला वेडा होतोय पण तरीही मनात कुठेतरी नाही, सगळं काही बरं होणार नाहीअसा विचार आहे. मन बिघडतंय. एक विचित्र गोंधळ सुरू आहे. तुमचे मत मला योग्य मार्ग दाखवू शकेल.

अगं, धन्यवाद, तुम्ही अजून कोणतीही चुकीची पावले उचलली नाहीत. तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक करणार आहात. सापळ्यात फेकून तुम्हाला तुमचे चांगले आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे का? स्त्री विवाहित आहे, 2 मुलांची आई आहे, तुझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. त्यात गुंतून तुम्हाला काय मिळणार?

ना तुम्ही त्याच्याशी लग्न करून कुटुंब बनवू शकता, ना तुम्ही त्याची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता. हे पाऊल उचलून तुम्ही दुसऱ्याच्या घराला आग लावाल. जर तिच्या नवऱ्याला तुमच्याबद्दल कळले तर नशिबात काय होईल माहीत नाही.

एकदा असे गृहीत धरूया की त्या स्त्रीला तिच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी तुमच्याशी मैत्री करायची आहे. दोघांनाही शारीरिक संबंध ठेवून एकमेकांची कमतरता पूर्ण करायची आहे, पण तरीही ते योग्य होणार नाही.

तुमच्यासाठी अजिबात नाही कारण आता तुमचे वय आले आहे एक नवीन सुरुवात करण्याचे, तुमच्या समान जोडीदारासोबत घर सेटल करण्याचे. त्या बाईला काही होणार नाही. ती तुमच्याकडून तिची लैंगिक इच्छा पूर्ण करेल पण तुमचे काय. तिचे स्वतःचे कुटुंब आहे, मुले आहेत, नवऱ्याला समाजात प्रतिष्ठा आहे. पण या महिलेशी संबंध ठेवून तुम्हाला काय मिळणार, काही नाही.

तुम्ही आकर्षणाच्या जाळ्यात पडत आहात. अडकू नका काही येणार नाही. तुमचे आयुष्य चुकीच्या मार्गावर नेऊ नका.

आमच्या मताचे अनुसरण करा, त्या महिलेशी संपर्क करणे थांबवा. मीडियाच्या प्रत्येक बाजूने त्याला ब्लॉक करा. जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तो कॉल अजिबात उचलू नका. तो दुसऱ्या क्रमांकावरून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतो. काही दिवस तुम्ही अस्वस्थ असाल पण हळूहळू तुम्हाला समजेल की तुम्ही जे काही केले ते चांगले केले. आयुष्य अगदी सरळ चाललेलं असताना ते कशाला फसवायचं?

 

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी ३० वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. माझं माहेर आणि सासर कानपूरला जवळ-जवळच आहे. मी पती आणि एक वर्षाच्या मुलासोबत दिल्लीत राहते. जेव्हा मी १०-१५ दिवसांसाठी जाते, तेव्हा सासूची अशी इच्छा असते की मी माझा संपूर्ण वेळ त्यांच्यासोबतच घालवावा. माहेरी २-३ दिवस राहण्यावरही त्यांचा आक्षेप असतो. त्यांचं म्हणणं असतं की माहेर जवळच आहे ना मग तिथे राहायला जाण्यात काय अर्थ आहे. फक्त भेटून ये. पण इच्छा असूनही मला असं करता येत नाही. आई आणि भावंडांसोबत २-४ दिवस राहिल्याशिवाय समाधान होत नाही. माझे पती स्वत:च्या आईला काही बोलत नाहीत आणि मलाही.

पुढच्या महिन्यात माझ्या पुतणीचं लग्न आहे. लग्नाचं निमंत्रण आल्यापासून मी उत्साहात आहे की त्यानिमित्ताने नातेवाईकांची भेट होईल. पण मी तिथे जाऊन राहिल्याने परत सासू आकांडतांडव करेल याची भीती वाटते. सगळी मजाच निघून जाईल.

दादा-वहिनी आतापासूनच आग्रह करत आहेत की मी सर्वात पहिलं पोहोचलं पाहिजे. लग्नाची खरेदी माझ्यासोबतच करणार. इतक्या आग्रहाने बोलवत असल्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही आहे आणि जास्त दिवसांसाठी गेले तर सासू वाद घालेल. काय करू कळत नाहीये. कृपया मार्गदर्शन करा.   

तुमचं माहेर आणि सासर जरी एका शहरात असलं तरी तुम्ही स्वत: दिल्लीला  राहता. त्यामुळे माहेरच्यांशीही कधीतरीच भेटणं होत असेल. अशावेळी तुम्ही २-४ दिवस माहेरी जाऊन राहात असाल तर तुमच्या सासूला हरकत असण्याचं कारण नाही. तुम्ही पूर्णवेळ सासरी घालवल्यानंतर माहेरून मात्र एका दिवसात परत ये हे सासूने सांगणं चुकीचं आहे.

तुमच्या सासूचा हा हट्ट तालिबानी आहे. तुमचे पती तुम्हा दोघींच्या वादात पडत नाहीत, तटस्थ राहतात. हे काही प्रमाणात योग्यही आहे. तुम्ही तुमच्या सासूला प्रेमाने समजावू शकता की तुमचं माहेर जवळच असलं तरीही तुम्ही दिल्लीला राहात असल्याने तिथे कधीतरीच जाणं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावासा वाटतो.

तुमच्या दादा-वहिनीची त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत जी अपेक्षा आहे, त्यात तुम्ही त्यांना निराश करणं योग्य नाही. पती तुमच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नसले तरीही तुम्ही तिथे जाऊन सहकार्य केलं पाहिजे.

माहेरासाठी इतकं करणं हे तुमच्या सासूला खटकू शकतं, त्या रागावू शकतात, आकांडतांडव करतील, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. एकदा लग्न पार पडलं की तुम्ही त्यांना समजवू शकता. सासू-सुनांमध्ये अशाप्रकारचे वाद होतच असतात. शेवटी घरोघरी मातीच्या चुली.

मी २८ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. माझं वैवाहिक जीवन सुखी आहे. फक्त एकच त्रास आहे तो म्हणजे माझे पती खूप उधळपट्टी करतात. जराही पैसे वाचवत नाहीत. मी कित्तीतरी वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे की आपण आपल्या मुलांसाठी पैसे वाचवले पाहिजेत. पण त्यांच्या कानात हवा जात नाही.

आज आमचा पगार चांगला आहे. पण उद्या मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या गरजा वाढतील. त्या आम्ही कशा पूर्ण करणार आहोत. याचाच विचार करून मी माहेरी गुपचूप एक खातं उघडलं आहे. त्यात थोडे-थोडे पैसे जमा करत असते.

अशाप्रकारे मी आतापर्यंत ९ लाख जमा केले आहेत. मुलांसाठी पैसे जमवण्याचं समाधान आहे. पण दुसऱ्या बाजूला ही भीतिही आहे की पतीपासून लपवून पैसे साठवण्यात मी काही चूक तर  करत नाहीये ना. त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल.

माझे पती खूपच साधे आणि चांगले आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्यापासून काहीही लपवत नाहीत. मग मी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून त्यांचा विश्वासघात तर करत नाहीये ना. कृपया मला या अपराधीपणाच्या भावनेतून सोडवा.

तुमचा विचार अगदी योग्य आहे की उत्पन्न कितीही असलं तरीही भविष्यासाठी थोडीफार तरतूद केली पाहिजे. मुलांसाठी किंवा स्वत:साठीही काहीवेळा असा खर्च करावा लागतो ज्याचा विचार आपण आधी केलेला नसतो. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी केलेली बचत कामी येते. कदाचित तुमचे पती हे आज समजू शकत नाहीयेत. म्हणून तुमचं सांगणं मनावर घेत नाही आहेत. पण वेळेनुसार अनुभवाने त्यांना समज येत जाईल.

तुम्ही त्यांना न सांगता उघडलेल्या खात्याचाच प्रश्न असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. कारण तुम्ही चांगल्या उद्देशानेच हे पाऊल उचलत आहात. त्यामुळे तुम्ही अपराधीपणाची भावना बाळगू नका. पण तरीही त्यांचा मूड बघून तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगू शकता. हे ऐकून त्यांना आनंदच होईल आणि तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं नाही याचं दडपण तुमच्यावर राहणार नाही.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर, सुदीप सिंग सचदेव, नेफ्रोलॉजिस्ट, नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, गुरुग्राम

प्रश्न : मी २२ वर्षांची आहे. काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मला भीती वाटत होती की मला कोरोना तर झाला नसेल, पण तपासणीत माझ्या किडनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनात आले. मला योगा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु मला हे जाणून घ्यायचे आहे की ही समस्या आहाराद्वारे दूर केली जाऊ शकते का?

उत्तर : तुम्ही ज्या समस्येचा उल्लेख करत आहात त्याला हायपरफॉस्फेटमिया म्हणतात. हे फॉस्फरसच्या अतिसेवनामुळे होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी योगासोबतच आहारात बदल केल्यास फॉस्फेटचे प्रमाणही कमी करता येते.

सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट, प्रक्रिया केलेले मांस, प्रक्रिया केलेले चीज, जंक फूड, आईस्क्रीम इत्यादींचे सेवन कमीत कमी करावे. याशिवाय बीन्स, ब्रोकोली, कॉर्न, मशरूम, भोपळा, पालक आणि रताळे इत्यादींचे सेवनदेखील कमी करावे. अगदी मांस, मासे, कॉटेज चीज, मोझरेला चीज इत्यादींचे सेवन महिन्यातून एकदाच करावे.

प्रश्न : मी २६ वर्षांची आहे. बरेच दिवस माझे पोट खालच्या भागात कधीही दुखू लागते. कधीकधी ही वेदना सौम्य असते तर कधी तीक्ष्ण असते. यासोबतच मला रात्री वारंवार लघवी होऊ लागली आहे, त्यामुळे मला जळजळ होण्याची समस्या होते. मला सांगा हे का होत आहे आणि त्यावर उपाय काय आहे?

उत्तर : तुम्ही सांगितलेली लक्षणे मूत्रपिंडाचा आजार दर्शवतात. सुरुवातीला या आजाराची काही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, परंतु तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून असे दिसते की हा त्रास किरकोळ नाही. तथापि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. सर्व प्रथम आपण हे नेफ्रोलॉजिस्टकडून तपासले पाहिजे. जितक्या लवकर समस्येचे निदान होईल तितके चांगले, कारण निदान आणि उपचारात उशीर केल्याने केवळ तुमचा जीवच धोक्यात येऊ शकत नाही, तर तुम्हाला इतर अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो. सर्वात धोकादायक परिणामांपैकी किडनी रोगाची शेवटची पायरी, अशक्तपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या संबंधित रोगांची ओळख आहे.

रोग टाळण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा आणि आवश्यक असल्यास आपल्या आहारातदेखील बदल करा. अधिकाधिक पेये, विशेषत: पाणी प्या, जेणेकरून मूत्रपिंड शरीरातून सोडियम, युरिया आणि विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकू शकतील. सोडियम किंवा मीठाचे सेवन कमीत कमी करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची नोकरदार महिला आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी माझ्या तब्येतीकडे कधीच लक्ष देऊ शकले नाही, त्यामुळे माझी किडनी जवळपास खराब झाली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे कुठले दुष्परिणाम आहेत का? समस्येपासून मुक्त होण्याचा दुसरा कोणताही मार्ग आहे का?

उत्तर : जेव्हा मूत्रपिंड निकामी होऊन अंतिम टप्प्यात पोहोचते तेव्हा डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणानेच त्यावर नियंत्रण मिळवता येते. डायलिसिस आठवडयातून एकदा किंवा त्याहूनही अधिक वेळाही केले जाऊ शकते, ते परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्यारोपणामध्ये खराब झालेले मूत्रपिंड निरोगी मूत्रपिंडाने बदलले जाते. ८० टक्के प्रत्यारोपण प्रकरणे यशस्वी होतात. प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये एकच भीती असते की शरीर कदाचित प्रत्यारोपणास नाकारणार तर नाही का? तथापि हा धोका पत्करणे महत्त्वाचे आहे, कारण निरोगी मूत्रपिंड तुम्हाला चांगले जीवन जगण्यास मदत करू शकते.

प्रश्न : मी ३२ वर्षांचा आहे. खरं तर अनेक दिवसांपासून मला माझ्या खालच्या ओटीपोटात असे दुखत आहे जणू कोणी सुई टोचत आहे. ही वेदना माझ्या प्रायव्हेट पार्टमध्येही जाणवत आहे, त्यामुळे माझे जगणे कठीण झाले आहे. कृपया मला सांगा की यापासून मुक्त कसे व्हावे?

उत्तर : हे दुखणे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते. आनुवंशिकता, औषधांचे दुष्परिणाम, लघवीत वारंवार संसर्ग, खनिज घटकांचे जास्त प्रमाण, पाण्याचे कमीत कमी सेवन इत्यादींमुळे खडे तयार होतात. कॅल्शियम किंवा यूरिक अॅसिड हळूहळू मूत्रपिंडात जमा होते आणि खडयाचा आकार घेते. सर्वप्रथम स्वत:ची तपासणी करा म्हणजे खरी समस्या काय आहे हे कळेल.

जर खडा लहान असेल तर काही औषधे आणि जास्त पाणी प्यायल्याने तो लघवीद्वारे बाहेर निघेल. जर तो मोठा असेल तर शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जाईल. त्यामुळे तपासणी करण्यास अजिबात उशीर करू नका.

प्रश्न : माझ्या एका मैत्रिणीचे किडनी प्रत्यारोपण होत आहे. किडनी दानासाठी डॉक्टरांनी माझी निवड केली आहे. तथापि मला यावर काही आक्षेप नसला तरी मला हे जाणून घ्यायचे आहे की याचे काही दुष्परिणाम आहेत का? किडनी दान केल्यानंतर कोणकोणती काळजी घ्यावी लागेल?

उत्तर : तू कोणाला तरी जीवदान देणार आहेस याचा मला आनंद आहे. तुला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण एक किडनी असूनही एक निरोगी आणि चांगले जीवन जगता येते. तुला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जसे की निरोगी जीवनशैली जगणे, वेदनाशामक औषधांचे सेवन कमी करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घेणे, शारीरिकदृष्टया सक्रिय असणे, पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे इत्यादी. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला कधीही कुठला त्रास होणार नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी १८ वर्षीय मुलगी आहे. मी गेल्या ३ वर्षांपासून एका मुलावर प्रेम करते. मी आतापर्यंत त्याला कधी भेटले नाही, पण व्हॉट्सअॅपवर त्याचा चेहरा पाहिला आहे. आम्हा दोघांमध्ये तासन्तास गप्पागोष्टी होतात. अलीकडे काही दिवसांपासून तो मला टाळण्याचा प्रयत्न करतोय. फोन केला, तर कट करतो आणि कधी बिझि असल्याचा बहाणा करून बोलत नाही. त्याने मला खूप वचने दिली होती. मला जाणून घ्यायचं आहे की तो असं का करतोय? मी खूप त्रस्त आहे. कृपया उचित सल्ला द्या? मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या मुलाशी माझं बोलणं फोनवर एकदा राँग नंबर लागून सुरू झालं होतं.

तुम्ही ३ वर्षांपासून एका अनोळखी माणसाशी बोलत होता, ज्याला आपण कधी भेटलाही नाहीत, ही आश्चर्याची गोष्ट आहे. बोलता बोलता दरम्यान आपलं त्याच्यावर प्रेमही बसलं, तेही व्हॉट्सअॅपवर डीपीला लावलेला फोटो पाहून.

तुम्ही सांगितलं की आता तुमचं वय १८ वर्षे आहे. म्हणजे जेव्हा त्या अनोळखी माणसाशी बोलणं सुरू झालं, तेव्हा आपलं वय १६ वर्षांचं असेल.

खरं तर नैसर्गिकरीत्या आपले अपरिपक्व वय होते आणि या वयातील भोळेपणामुळेच आपण फोनवरच मन देऊन बसलात.

आपल्या प्रश्नात आपण हे सांगितलं नाही की त्या मुलाने किंवा आपण कधी भेटण्याबाबत बोलला होतात की नाही? जर मुलाने आपल्याला भेटायचा हट्ट केला असेल आणि काही कारणामुळे आपण त्याला भेटू शकला नसाल, तर शक्यता आहे की त्याने दुसऱ्या कोणाला तरी निवडलं असेल.

तसेही, सोशल मिडिया, उदा. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर चुकीचा नंबर आणि आयडी बनवूनही लोक गैर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.

अशी अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. जेव्हा या माध्यमांचा चुकीचा वापर करून मुलींना फसवण्यात आलं आणि मग मैत्रीच्या बहाण्याने चुकीची कृत्ये केली गेली.

नुकतेच दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्येही एक असेच प्रकरण समोर आले होते, जेव्हा फेक आयडी बनवून कुणी व्यक्तिने अनेकांना मूर्ख बनवलं होतं.

त्यामुळे शक्य आहे की आपला हा मित्र फेक आयडी अथवा नंबरने आपल्याशी बोलत असेल आणि आपला फायदा उठवण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित, तो लग्न झालेलाही असेल, जो आपल्याकडून त्याच्या अयोग्य इच्छा पूर्ण न झाल्याने अन्य शिकारीच्या शोधात असेल.

त्यामुळे हे प्रेम या वयातील चूक समजून विसरून जाणे उत्तम ठरेल आणि सध्यातरी आपल्या करियरकडे लक्ष द्या. योग्य आणि उचित वेळी आपल्याला योग्य जोडीदार जरूर मिळेल.

मी २५ वर्षीय विवाहिता आहे आणि ३ वर्षीय मुलाची आईही आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. परंतु लग्नाला ४ वर्षे होऊनही त्यांची रोज सहवास करण्याची इच्छा असते. पतिची इच्छा असते की सहवासापूर्वी मी मुखमैथुनात सहकार्य करावे, पण भीती वाटते की त्यामुळे मला कुठला लैंगिक रोग तर  होणार नाही ना. मी नकार दिल्यास ते माझ्यावर नाराज होतात. मला जाणून     घ्यायचं आहे की मुखमैथुन किती सुरक्षित आहे? ही एक असामान्य प्रक्रिया आहे का?

जसं की आपण सांगितलं आहे की पतिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि सुखी दाम्पत्य जीवनाची निशाणीही आहे.

सेक्स संबंधाच्या वेळी मुखमैथुन म्हणजेच ओरल सेक्स एक सामन्य प्रक्रिया आहे, जी समागमापूर्वी फोरप्लेमध्ये रोमांच आणण्यासाठी, त्याला आनंददायक बनवण्यासाठी केली जाते. अर्थात, हायजिन म्हणजेच स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे.

‘कामसूत्र’मध्येही या मजेदार क्रीडेचं वर्णन केले जाते आणि अजिंठा-वेरूळ गुंफेतील मूर्तींमध्येही या क्रीडेचे मोकळेपणाने चित्रण केले गेले आहे. म्हणजेच मुखमैथुनाचे वेड प्राचीन काळापासूनच राहिले आहे.

जर तुम्ही आणि तुमचे पती शारीरिक स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेत असाल, तर मुखमैथुनापासून कोणतेही नुकसान नाही. पतीसोबत सेक्ससंबंधांचा मनमुराद आनंद घ्या जेणेकरून परस्पर प्रेम कायम राहिल.

मी १९ वर्षीय तरुणी आहे आणि पीजीमध्ये राहते. मला रात्री पॉर्न म्हणजेच ब्लू फिल्म पाहण्याचे व्यसन लागले आहे. रोज रात्री मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ किंवा फिल्म पाहिली नाही, तर मला बेचैनी होऊ लागते. मला या सवयीपासून सुटका करून घ्यायची आहे. कृपया उचित सल्ला द्या?

आपण मॅच्युअर आहात. आतापासून असं व्यसन लागलं तर आपण आपल्या करियरपासून दूर होऊ शकता. आपण आपलं लक्ष चांगलं साहित्य, मासिके वाचण्यावर केंद्रित करा. काही दिवसांतच आपल्याला जाणवेल की चांगले साहित्य व मासिके वाचल्यामुळे केवळ आपलं ज्ञानच वाढणार नाही, तर आपल्याला आनंदही मिळेल.

रात्री झोपण्यापूर्वी मासिके किंवा जेही चांगले वाटेल, ते वाचण्याची सवय लावून घ्या.

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांची आहे. माझ्या ओठांच्या बाजूला लहान-लहान मुरुमे आहेत. ते दिसायला अतिशय विचित्र आणि कुरूप वाटतात. कृपया मला उपाय सांगा?

ओठांभोवती मुरुमे येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे उष्णता, मेकअप व्यवस्थित साफ न करणे इ. लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळेही संक्रमण होऊ शकते.

याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा लाभ घेऊ शकता. उदा :

बर्फाने शेक द्या : बर्फ सूज कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेतील घाण काढून टाकण्यासही मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स असतील तरीही तुम्ही बर्फ वापरू शकता. बर्फाने शेक देण्यासाठी बर्फ एखाद्या कापडाने गुंडाळा आणि नंतर तो प्रभावित जागेवर लावा.

हळद : हळद त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील मुरुमे काढून टाकण्याचे काम करतात.

हळद वापरण्यासाठी तुम्हाला हळदीची पेस्ट बनवावी लागेल.

यासाठी तुम्ही १ टीस्पून हळद घ्या आणि त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा.

आता ही पेस्ट ओठांवर लावा आणि १० मिनिटे सोडा.

मध : मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म आढळतात, जे मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्याचे काम करतात.

मध सूज कमी करण्यासाठीदेखील कार्य करते. जर तुम्हाला फोडे येण्याची समस्या असेल तरी तुम्ही मध वापरू शकता. संसर्गापासून मुक्त होण्यासाठी ओठांच्याभोवती मध चांगल्या प्रकारे लावा. ही प्रक्रिया २-३ वेळा पुन्हा करा.

  • मी १९ वर्षांची आहे. पूर्वी माझे दात पांढरे दिसायचे, पण आता ते हळूहळू पिवळे होत आहेत. मी सकाळी दातदेखील चांगले स्वच्छ करते. माझे दात पूर्वीप्रमाणे पांढरे दिसण्यासाठी मी काय करावे?

दातांची योग्य काळजी न घेतल्याने दात पिवळे होऊ लागतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण या उपायांचे पालन केले पाहिजे :

तुळस : तुळशी हा दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. तुळशी अनेक रोगांपासून दातांचे रक्षणदेखील करते. तसेच तोंड आणि दातांच्या आजारांपासून सुटकाही मिळते.  हिचा वापर करण्यासाठी तुळशीची पाने उन्हात वाळवा. यांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्याने दात चमकू लागतात.

मीठ : मीठ ही दात स्वच्छ करण्याची खूप जुनी कृती आहे. मीठात थोडा कोळसा घातल्याने दात चमकू लागतात.

व्हिनेगर : सफरचंद व्हिनेगर १ चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. तुमचा टूथब्रश या मिश्रणात बुडवा आणि हळूवारपणे आपल्या दातांवर ब्रश करा. ही प्रक्रिया सकाळी आणि रात्री पुन्हा करा. हे मिश्रण वापरल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो. तसेच श्वासातील दुर्गंधीची समस्यादेखील राहत नाही.

  • मी २२ वर्षांची आहे. जेव्हाही मी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करते, माझे केस पूर्णपणे निघत नाहीत. हे केस खूप लहान असतात, जे त्वचेतून बाहेर पडताना दिसतात. कृपया मला सांगा की ते पूर्णपणे कसे काढायचे?

या केसांना इनग्रोथ हेअर म्हणतात. आपण त्यांना एक्सफोलीएट करून काढू शकता. यामुळे त्वचेच्या आत अडकलेले केस मऊ होतील आणि बाहेर येतील. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध साहित्य वापरू शकता.

एवोकॅडो आणि मध : एवोकॅडो मॅश करा, आता त्यात २ टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून साखर घाला. साखर एक सौम्य एक्सफोलिएशन देईल आणि मध व एवोकॅडो आपल्या त्वचेला पोषण देईल.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही १-२ चमचे ताज्या लिंबाचा रस घालू शकता. लिंबाच्या रसाने त्वचा घट्ट होईल आणि यामुळे छिद्रदेखील बंद होतील.

हा मास्क १५-२० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर तो पूर्णपणे धुऊन काढा.

टीट्री ऑइल : टीट्री ऑइलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे, जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संसर्गाचा धोका टाळतात आणि इनग्रोथ केसांची समस्यादेखील दूर करतात. टीट्री ऑइलमध्ये डिस्टिल्ड वॉटर मिसळून ते त्वचेवर लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. वॅक्सिंगनंतर १ दिवसांनी हे उपाय अवलंबा.

  • मी २८ वर्षांची महिला आहे. मला पायाच्या नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. याचे निराकरण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा?

नखांमध्ये बुरशीची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपले पाय शूजमध्ये बराच काळ बंद असतात, ते व्यवस्थित साफ केले जात नाहीत. बुरशीपासून मुक्त होण्यासाठी लसूण आणि लवंग तेल मोहरीच्या तेलात मिसळा आणि चांगले गरम करा. आता रात्री झोपण्यापूर्वी ते पाय आणि नखांवर लावा.

तेल लावल्यानंतर मोजे घाला आणि झोपा. असे केल्याने, बुरशीजन्य संसर्गामध्ये सुधारणा दिसून येईल.

त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अँटीस्पिरंट पावडरदेखील वापरू शकता. जर समस्या अजूनही कायम राहिली तर निश्चिंतपणे संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २९ वर्षांची असून एका मुलीची आई आहे. आम्हाला आणखी २-३ वर्षं दुसरे मूल नको आहे. मी कॉपर टीबद्दल ऐकले आहे. माझ्या वहिनीने सांगितले की, ती लावल्यानंतर वां होण्याची भीती असते आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होतो. हे खरे आहे का? कॉपर टी किती सुरक्षित आहे?

कॉपर टी इंग्रजी अक्षर टी या आकाराचे डिव्हाइस आहे. यात पुढच्या बाजूने धागा निघालेला असतो, जो अगदी सहजपणे व्हर्जायनामध्ये इंसर्ट केला जातो. कॉपर टी ६-७ वर्षांपर्यंत काम करू शकते. गर्भधारणा टाळण्यासाठी हा सोपा व उत्तम पर्याय आहे.

यामुळे वांझपण येत नाही आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होत नाही. हे एक चांगले गर्भनिरोधक आहे पण, बहुसंख्य महिलांना याबाबत जास्त माहिती नसते आणि त्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात.

आशियात केवळ २७ टक्केच महिलाच आययूडी गर्भनिरोधक वापरतात. यावरून हे स्पष्ट होते की, जनजागृतीचा अभाव हे यामागचे कारण आहे. प्रत्यक्षात हे लावणे अतिशय सोपे आहे आणि जेव्हा गर्भधारणेची इच्छा होईल तेव्हा महिला ती सहजपणे काढूनही टाकू शकतात.

कॉपर टी लावणे व काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडेच जावे. बाजारात सहजपणे उपलब्ध असलेल्या कॉपर टीमुळे मासिक च्रकावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.

  • मी २५ वर्षांची आहे. २-३ महिन्यांनंतर माझे लग्न होणार आहे. नवरा मनमोकळेपणाने वागणारा आणि रोमँटिक आहे. पण त्याने सांगितले की त्याला इंटरकोर्सआधी ओरल सेक्स अधिक आवडते. मला हे माहिती करून घ्यायचे आहे की, ओरल सेक्समुळे काही नुकसान तर होत नाही ना?

शारीरिक स्वच्छता म्हणजे हायजीनकडे लक्ष दिल्यास ओरल सेक्समुळे कुठलेच नुकसान होत नाही. उलट हे सेक्स आणखी मजेदार करते.

‘कामसूत्र’मध्येही ओरल सेक्स ही एक स्वाभाविक क्रिया असल्याचे म्हटले आहे आणि याच्या विविध आसनांबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे.

अजिंठा, एलोरा लेण्यांमध्ये आजही अशा मूर्ती पहायला मिळतील ज्या नरनारीमधील या प्रक्रियेला नजाकतीने दाखवत याचे समर्थन करतात की, शेकडो वर्षांपूर्वीही ओरल सेक्स म्हणजे मुख मैथुनाचे वेड होते.

ओरल सेक्समध्ये सेक्स पार्टनरला आपल्या तोंडाच्या मदतीने सेक्सचे समाधान मिळवून द्यायचे असते. त्यासाठी पार्टनरचे सेक्स आर्गन तोंडात घ्यावे लागते. या क्रियेत तोंडाचा वापर करून एकमेकांच्या डोळयात पाहून ओरल सेक्स करणे फारच रोमांचक अनुभव असतो.

पण ओरल सेक्ससाठी एकमेकांची परवानगी असणे खूपच गरजेचे आहे.

  • मी २७ वर्षांची विवाहिता असून प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. पतीचा स्वत:चा व्यवसाय आहे. माझे पती सरळ स्वभावाचे असून माझ्यावर खूप प्रेमही करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून ते माझ्यावर संशय घेऊ लागले आहेत. गुपचूप माझा मोबाइलही तपासून पाहतात. मला नवऱ्याला गमवायचे नाही. सांगा, मी काय करू?

प्रेमात संशय हा असा एक काटा आहे जो दु:ख तर देतोच सोबतच नात्यामध्ये तिरस्कार निर्माण करतो. संशयामुळे सुखी वैवाहिक जीवन उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

तुमचे पती गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यावर संशय घेऊ लागले असतील तर हे स्पष्ट आहे की, पूर्वी सर्व व्यवस्थित होते पण आता कदाचित असे काही घडत असेल ज्यामुळे ते संशय घेऊ लागले असतील.

अशावेळी तुम्ही एकांतात पतीकडून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण, एखादी गोष्ट मनातल्या मनात ठेवून कुढत बसण्याने समस्या सुटणार नाही, उलट दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहील.

तुमचे पती सतत आणि गुपचूप तुमचा मोबाइल तपासून पाहत असतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, तुम्ही गरजेपेक्षा जास्तवेळ मोबाइल पाहत असाल. पती असेल तर गरजेपुरताच मोबाइलचा वापर करा.

पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सुख-दु:ख शेअर करा. तरीही पतीचे वागणे बदलत नसेल तर एखाद्या समुपदेशकाची मदत घेता येईल.

  • मी २३ वर्षांची तरुणी असून एका विवाहित पुरुषावर माझे प्रेम आहे. आमच्यामध्ये फिजिकल रिलेशनही आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि सांगतो की, आपण लग्न करूया. मी काय करू?

तुम्ही ज्या आगीशी खेळत आहात ती एकाच वेळी अनेक कुटुंबाना जाळू शकते. तुमचा तथाकथित प्रेमी तुम्हाला मुर्ख बनवत आहे. या नात्याला येथेच पूर्णविराम देऊन चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच योग्य ठरेल.

आता राहिली गोष्ट एका विवाहित पुरुषाशी लग्न करायची तर, कायद्यानुसार हे लग्न बेकायदेशीर ठरेल.

सौंदर्य समस्या

* इशिका तनेजा एअर ब्रश मेकअप एक्सपर्ट

  • मागील कित्येक वर्षांपासून सतत नेलपेण्ट लावल्यामुळे माझ्या नखांवर पिवळेपणा आला आहे. नखं कमकुवत व तुटल्यासारखे दिसतात. कृपया यासाठी काय करावे लागेल ते सांगा?

नखे पिवळी दिसणं हे फक्त आरोग्यासाठी वाईट नाही तर ते दिसायलाही वाईट दिसते. ही समस्या सोडवण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवून नखांवर लावा व टूथब्रशने सॉफ्ट स्क्रब करा. नखांना अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवणे हासुद्धा उत्तम पर्याय आहे.

केसांसाठी योग्य शाम्पू कसा निवडावा?

हल्ली कंपन्या तऱ्हेतऱ्हेचे शाम्पू बनवत आहेत. शाम्पू निवडण्यासाठी तुमचे केस कशाप्रकारचे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. केस धुतल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात दुसऱ्याच दिवशी व थंडीच्या मोसमात दोन दिवसांनंतर चिकट होऊ लागले आणि धुण्याची गरज वाटत असेल तर तुमचे केस ऑयली आहेत.

जर उन्हाळी दिवसांत २ दिवसांनंतर आणि थंडीच्या दिवसांत ३ दिवसांनंतर धुण्याची गरज वाटली तर तुमचे केस सामान्य आहेत. जर उन्हाळी दिवसांत ३ दिवसांपर्यंत आणि थंडीच्या दिवसांत ४ दिवसांपर्यंत केस धुण्याची गरज पडली नाही तर तुमचे केस कोरडे आहेत.

शुष्क केसांसाठी नेहमी मिल्की म्हणजे कंडीशनर युक्त शॉम्पू वापरा. खूप शुष्क व द्विमुखी केसांना क्रिमी शाम्पूबरोबर एक्स्ट्रा कंडिशनरचा पण वापर करा. ऑयली केसांना जास्त करून डीप क्लीन शाम्पूचा वापर योग्य असतो.

  • मी वॉर्म आणि कूल टोनबद्दल खूप वाचले आहे. कसे समजून घेऊ की माझा टोन वॉर्म आहे की कूल? घरी स्वत:च हे जाणून घेणे शक्य आहे का? त्याची काही पद्धत आहे का?

आपली नॅचुरल स्कीनटोन ४ रंगांमध्ये असते. यलो, पिंक, ऑलिव्ह किंवा पीच कलर. यामध्ये २ टोन वॉर्म व २ टोन कूल असतात. भारतीय त्वचा साधारणत: वॉर्म टोनमध्ये असते.

आपली स्कीनटोन वॉर्म आहे की कूल हे आपण घरीसुद्धा माहीत करून घेऊ शकतो. यासाठी उन्हात जाऊन आपले केस वर बांधावेत. मग स्वत:वर गोल्डन किंवा सिल्व्हर कापड ठेवून पाहा. असे केल्याने जर तुम्हाला गोल्ड कलर शोभून दिसत असेल तर तुमची स्कीन टोन वॉर्म आहे. सिल्व्हर कलर सूट होत असेल तर स्कीनटोन कूल आहे.

हिना डाय बनवण्याची चांगली पद्धत सांगा?

हिना एक नैसर्गिक डाय आहे. जिच्या योग्य आणि सततच्या वापराने केसांना उत्तम रंग मिळतो. रात्री २ चमचे चहा पावडर, २ ग्लास पाण्यात घालून उकळून घ्या.

पाणी अर्धे राहील तेव्हा गाळून घ्या. लोखंडी कढईत २ कप मेंदी, अर्धा कर आवळा पावडर, अर्धा कप शिकेकाई पावडर, २ चमचे कॉफी पावडर व अर्धा चमचा कात घालून चहा पावडरच्या पाण्याने पेस्ट बनवून घ्या. सकाळी यात अंडे व मध घालून व्यवस्थित मिसळून घ्या व केसांना लावा. २-३ तासानंतर केस धुऊन घ्या. मग सुकल्यावर केसांना तेल लावा. दुसऱ्यादिवशी शाम्पू लावा. केसांना सुंदर रंग येईल व केस चमकदार होतील.

  • मी १८ वर्षांची आहे. माझ्या शरीरावर अनेत ठिकाणी पांढरे डाग आहेत. मला कायमस्वरूपी पद्धतींबद्दल माहिती हवी आहे व हे कुठे करता येऊ शकते? खर्च किती येईल याबद्दलही सांगा?

सफेद डाग लपवण्यासाठी परमनंट कलरिंग पद्धती उपलब्ध आहे. ही फायदेशीर आहे. यामध्ये सर्वात आधी एखादा पांढरा डाग निवडून त्यावर टेस्ट केली जाते. जर त्वचेच्या रंगाने तो रंग स्विकारला तर २-३ महिन्यांनी त्वचेशी मिळता जुळता रंग त्वचेच्या डर्मिस लेयरपर्यंत पोहोचवला जातो. ज्यामुळे डाग दिसत नाहीत.

परमनंट कलरिंगचा परिणाम २ चे १५ वर्षांपर्यंत राहू शकतो. ही सुविधा तुम्हाला प्रसिद्ध कॉस्मेटिक क्लीनिकमध्ये मिळू शकते. याचा खर्च ५ हजार रुपयांपासून सुरू होतो. जो प्रत्येकी इंच स्वेअरच्या हिशेबाने असतो.

  • माझी त्वचा खूपच काळवंडली आहे. मुलतानी मातीनेही फायदा होत नाही. काय करू?

तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लीनिकमधून प्रूट बायोपील करवून घेऊ शकता. या फेशिअलमध्ये इतर फळांव्यतिरिक्त पपईच्या एंजाइम्सचा पण वापर केला जातो. जो स्कीन कलर लाईट करतो. या फेशिअलमुळे टॅनिंग तर दूर होतेच. पण त्वचेची खोलवर स्वच्छता होते. बरोबरीनेच उन्हात बाहेर पडताना चेहरा, हात, पाय, पाठ व इतर उघड्या भागांवर सनस्क्रीन जरूर लावा.

घरी टॅन रिमूव्ह करण्यासाठी चोकरमध्ये दही, थोडा अननसाचा रस आणि थोडी साखर मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि उजळ राहते.

सौंदर्य समस्या

*प्रतिनिधी

  • मसाजसाठी कोणते तेल योग्य आहेत आणि मालिश कशी करावी, कृपया सांगा?

चांगल्या टाळूच्या आरोग्यासाठी जोजोबा तेल, रोझमेरी तेल, ऑलिव्ह तेल, नारळ, मोहरी किंवा बदाम तेलाने मालिश करा. आठवड्यातून दोनदा कोरड्या केसांवर, आठवड्यातून एकदा सामान्य केसांवर मालिश करा. टाळूचे पोषण करण्यासाठी मालिश करण्याची पद्धतदेखील विशेष असावी. दोन्ही हातांचे अंगठे मानेच्या मागच्या खड्ड्यात ठेवा, बोट कपाळावर समोर पसरून ठेवा. मग कपाळावर बोटं ठेवून, अंगठा गोलाकार हालचालीत फिरवून आणा. मग बोटे सरळ डोक्याच्या मध्यभागी हलवा आणि हलवा. अशा प्रकारे, मानेपासून खाली डोक्याच्या वरपर्यंत दाब देताना मालिश करा.

दिवसभर काम केल्यानंतर थकवा आपल्या संपूर्ण शरीरावर अधिराज्य गाजवतो. अशा स्थितीत थकव्यामुळे मेंदू काहीही विचार करण्याच्या स्थितीत नसतो. थोडी विश्रांती आणि मालिश शरीरात ऊर्जा परत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मालिश तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू की डोक्याची मालिश केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे ऑक्सिजनची पुरेशी मात्रा मेंदूपर्यंत पोहोचते आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते.

जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रतीच्या तेलाने मसाज करता तेव्हा ते तुम्हाला मानसिक शांती तर देतेच पण तुमचे केस सुंदर आणि निरोगी बनवते. याशिवाय डोक्याला मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहोत.

मायग्रेन आणि डोकेदुखी मध्ये कधीकधी तणाव किंवा चिंतामुळे पाठ आणि डोकेदुखीची समस्या असते. यामुळे, तुमच्या दैनंदिन जीवनातील कामांवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत जर तुम्ही डोक्यावर मसाज केला तर ते संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह वाढवते. हे तुमचे मन शांत करते आणि तणाव दूर करते. याशिवाय जर डोक्याची नियमितपणे मालिश केली गेली तर मायग्रेनची समस्या देखील कायमची दूर होऊ शकते.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी विवाहित युवक आहे आणि एका मुलाचा बाप आहे. मी आपल्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चिंतीत आहे. माझ्या बायकोने आधी एका तरुणाबरोबर मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये लैंगिक संबंधही निर्माण झाले. मला जेव्हा बायकोच्या या व्यभिचाराबद्दल कळलं तेव्हा प्रथम आमच्यात खूप भांडणतंटे झाले. एकत्र राहत असूनही आम्हा दोघांमध्ये दुरावा वाढू लागला आणि एक दिवस ती मुलाला माझ्याजवळ सोडून निघून गेली. आता ३ वर्षांनंतर ती अचानक परत आली.

वाटतं की त्या मित्राने तिला दगा दिला आहे, म्हणून ती परत आली आहे. ती आल्यानंतर मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण एवढं करूनही ती माझ्याशी ना मोकळेपणाने बोलते ना शरीर संबंधांना होकार देते. एकाच छताखाली राहूनही आम्ही दोघे अपरिचितासारखे वावरतो. मी काय करू?

आता हे तर म्हणू शकत नाही की तुमच्या बायकोला तिच्या कुकर्माचा पश्चाताप होत असेल आणि म्हणून ती नॉर्मल होत नाही आहे. तुम्ही आशा करा की काही काळानंतर ती स्वत:च सामान्य व्यवहार करू लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही एखाद्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. काउन्सिंलिंगमुळे कळेल की बायकोच्या मनात काय आहे. कायदा हातात घेणं सोपं नाही, कारण न्यायालय अशा बायकांचंही अधिकिने ऐकून घेतं.

  • मी २५ वर्षांची विवाहिता आहे. माझं वैवाहिक जीवन सुखी नाही. याचं कारण मी स्वत: आहे असं मी मानते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. पण सगळा दिवस छान गेल्यावर रात्री मी पतीला उदास आणि नाराज करते. कारण जेव्हा पण ते माझ्या सहवासाची अपेक्षा करतात, मी बिथरते.

सहवास तर दूर त्यांना चुंबन आणि मिठीही मारू देत नाही. यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. हास्यास्पद हे आहे की जेव्हा ते माझ्याजवळ नसतात, तेव्हा माझं मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छाही होते. मी काय करू की माझ्या पतिला शारीरिक सुख देऊ शकेन?

तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला हे कळायला हवं की सेक्स हा सहजीवनाचा कणा आहे. म्हणून जेव्हा पती तुमच्या सहवासाची अपेक्षा करतो, तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवं. स्त्रीची शारीरिक रचनासुद्धा अशी असते की प्रयत्न न करताही ती पतीची कामेच्छा पूर्ण करू शकते.

तुम्हाला मानसिकदृष्टया थोडं सक्रिय व्हायची गरज आहे आणि तुमच्याकडून शारीरिक सुख घेणं हा तुमच्या पतीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना यापासून वंचित ठेवता कामा नये. सहवासात तुमच्या सक्रियतेने तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं सहजीवन छान बहरेल.

मी २५ वर्षीय युवक आहे. माझं लग्न होऊन ३ वर्ष उलटली आहेत. एक दिड वर्षांची मुलगीसुद्धा आहे. माझ्या पत्नीशी विवाह झाल्यावर पहिली २ वर्ष खूप छान गेली किंवा असं म्हणा की खूपच रोमँटिक गेली. आम्ही दोघे खूप फिरलो, दिवस रात्र रोमान्समध्ये बुडालेलो असायचो. माझे मित्र आम्हाला लव्हबर्ड म्हणत असत. कारण आम्ही नेहमी रोमँटिक मूडमध्ये असायचो. वाटायचं की आम्ही आजन्म असेच राहू. २ वर्ष उलटता उलटता ती एका मुलाची आई झाली आणि तिच्या पत्नी म्हणून वर्तणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडला. आता तिची सेक्समधील रुची समजा की संपत चालली आहे. आधी ती सहवासासाठी व्याकुळ असायची. ती आता सेक्सकडे पाठ फिरवते आणि मी रुची दाखवली तरीही खास उत्साह दाखवत नाही.

कित्येकदा मला जाणवतं की मी बलात्कार करत आहे. सहवासालासुद्धा ती इतर कामांप्रमाणे आटोपून टाकायचा प्रयत्न करते. मी शोधत राहतो की पूर्वीची उर्जा, आधीचा उत्साह अचानक कुठे हरवला? काय सगळया जोडप्यांमध्ये असंच होतं?

थोडं व्यावहारिक होऊन विचार कराल तर लग्नाच्या सुरूवातीच्या काळाची तुलना करून नाराज होणार नाही. तुम्हाला कळायला हवं की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही बिनधास्त होऊन रोमान्स यामुळे करू शकला कारण त्यावेळेस कोणती जवाबदारी नव्हती. तुम्ही फक्त स्वत:च्या दृष्टींने नाही तर बायकोच्या दृष्टीनीही बघायला हवं. गर्भावस्थेचे कठीण ९ महिने मग प्रसूती आणि नंतर लहान बालकाचं संगोपन. या सगळयामुळे जर तुमची बायको तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असेल तर अजाणता का होईना तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी.

हे फार छान होईल जर तुम्ही बाळाला सांभाळण्यात किंवा घराच्या बारीक सारीक कामात मदत केलीत. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा. यामुळे तिला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही.

याशिवाय बाळ थोडं मोठं झाल्यानंतरही तुमचं सहजीवन आपोआप मार्गी लागेल. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांप्रमाणे नाही, पण खूप छान वाटेल तुम्हाला. थोडा धीर धरा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें