गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी एक विवाहित गृहिणी आहे. पती स्मार्ट व हँडसम आहेत आणि स्वत:च्या वयापेक्षा खूप लहान दिसतात. ते सरकारी विभागात अधिकारी आहेत. २ मुलं आहेत, जी आपापल्या कुटुंबीयांसोबत आनंदी जीवन जगत आहेत. माझी समस्या ही आहे की गेल्या १ वर्षांपासून पतीने माझ्यासोबत सेक्स केला नाहीये. खरंतर आमच्यामध्ये कोणतीही भांडण नाही आहेत. १-२ लोकांनी मला सांगितलं की त्यांचे एका बाईशी संबंध आहेत. सांगा मी काय करू?

जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये कोणतीही भांडणं नाहीयेत परंतु पतीं सेक्समध्ये रुची घेत नाहीत, तर तुम्ही याचं कारण जाणण्याचा प्रयत्न करायला हवा.

शक्यता आहे की ते अधिकारी असल्यामुळे कामाच्या ओझ्याने दबलेले असतील आणि तणावात राहत असतील वा त्यांना एखादा त्रास असू शकतो. वेळ आणि मूड पाहून तुम्हीच पतींशी बोलून घ्यावं.

जर तुम्हाला वाटतंय त्यांचे एका बाईशी संबंध आहेत तर एकीव गोष्टींवरती विश्वास ठेवून तुमच्या दाम्पत्य जीवनात विष घोळवत आहात. दुसऱ्यांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका.

तसेही अनैतिक संबंध जास्त दिवस टिकत नाहीत. उशिरा का होईना या नात्यांवरती विराम लागतो.

जर तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा जीव आणायचा असेल तर पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, त्यांना खूप प्रेम द्या, कामकाजाबद्दल विचारा, सोबत फिरायला जा.

हा जर त्यांच्यामध्ये एखादे शारीरिक विकाराची लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मी १९ वर्षांची आहे आणि माझ्यापेक्षा २ वर्षांनी असलेल्या मोठ्या मुलावरती प्रेम करते. आम्ही अनेकदा सेक्सचा आनंददेखील घेतलाय. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायचं आहे. त्याच्या घरातल्यांची देखील कोणतीच आडकाटी नाहीये, परंतु माझ्या घरातले काही तयार होत नाहीत, कारण तो वेगळ्या जातीचा आहे आणि मी वेगळा जातीची आहे. आमच्या नात्यांबद्दल घरातल्यांना समजलं तेव्हा त्यांनी माझं शिक्षण बंद केलं आणि मोबाईलदेखील घेतला. तरी देखील मी त्या मुलाला लपून छापून भेटते. प्रियकर माझ्याशिवाय राहू शकत नाही. यामुळे त्याचा अभ्यासदेखील डिस्टर्ब होत आहे. तो म्हणत आहे की जर घरवाले नाही मानत असतील तर अजून थांबूया, ४ वर्षांनंतर जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा आपण लग्न करूया. परंतु या गोष्टीला मी कसा दिलासा देऊ जे मन रात्रंदिवस त्याच्यासाठी धडकत आहे. सांगा मी काय करू?

तुमचं वय अजून खूप लहान आहे. हे वय अभ्यास करून काही बनण्याचं असतं, परंतु तुम्ही कमी वयातच ही चूक करून बसलात. अगदी शारीरिक संबंध देखील ठेवलेत.

तुमच्या पालकांचं विचार करणं योग्य आहे. त्यांना देखील वाटते की अगोदर तुम्ही स्वत:च्या पायावर उभे राहावं, करियर बनवावं, तेव्हाच लग्नाबद्दल विचार करावा.

ठीक आहे, जे झालं ते झालं. आता समजूतदारपणा यातच आहे की तुम्ही अगोदर तुमच्या घरातल्यांचा विश्वास सार्थ करून अभ्यास सुरू ठेवा. प्रियकराला त्याचं करियर बनवू द्या.

जर तो ४ वर्षं वाट पाहायला सांगत असेल तर त्याचं विचार करणे योग्य आहे. जर त्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे तर ४ वर्षांनंतर का होईना तो तुमच्याशी नक्कीच लग्न करेल.

एकमेकांची जात वेगळी असली तरी आजच्या काळात ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. समाजामध्ये अशी अनेक लग्नं होत आहेत. उशिरा का होईना तुमचे पालकदेखील मानतील. जर त्यांनी मान्य केलं नाही तर तुम्ही दोघे कोर्ट मॅरेज करू शकता. मात्र तुम्ही सध्या तरी दोघांच्या करिअरवरती लक्ष द्यायला हवं.

मी ३३ वर्षीय विवाहिता आहे. पती आणि दोन मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. लग्नापूर्वी माझ्या आयुष्यात एक तरुण आला होता, ज्याच्यावर माझं प्रेम होतं. परंतु काही कारणामुळे आमचे लग्न होऊ शकलं नव्हतं. आता त्याचं देखील स्वत:चं कुटुंब, पत्नी व मुलं आहेत. इकडे काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आम्ही दोघे भेटलो. मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली आणि आता आम्ही तासन्तास गप्पा मारत चॅटिंग करत असतो. त्याला मला भेटायचं आहे, सांगा मी काय करू?

तो तुमचा भविष्य भूतकाळ होता. आता तुमच्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत. पती, कुटुंब, मुलं व आनंदी जीवन आहे. जुन्या गोष्टी ताज्या करून तुम्ही दोघे एकत्रित आला आहात. त्यामुळे कुटुंबाच्या आनंदावर ग्रहण लागू शकतं, म्हणून हे नातं पुढे न जाण्यातच शहाणपणा आहे.

जर तो एक मित्राच्या नाते तुम्हाला भेटू इच्छित असेल तर यामध्ये काहीच वाईट नाहीये. तुम्ही घराबाहेर एखाद्या रेस्टॉरंट वा पार्कात त्याला भेटू शकता. मैत्री असेल तर भेटायला काहीच वाईट नाही. मात्र भेट मर्यादित असावी, हद्द पार करू नका.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २६ वर्षांची आहे. पिरिड्सदरम्यान माझ्या ब्रेस्टचा आकार हेवी होतो. ब्रेस्ट थोडी कडकसुद्धा होते. पिरिड्सनंतर काही दिवस ही समस्या कायम राहते. यामुळे सेक्सच्यावेळी मला बरोबर वाटत नाही. सांगा मी काय करू?

पिरिड्सदरम्यान ब्रेस्ट हेवी होणे ही काही गंभीर समस्या नाहीए. हे साधारणत: सॉल्ट रिटेंशनमुळे होते. तुम्ही फॅमिली डॉक्टरना भेटून आपली समस्या सांगणं उत्तम. व्यवस्थित खाणेपिणे व उपचार यामुळे ना केवळ ही समस्या संपेल तर तुमचे सॉल्ट रिटेंशन आणि कंजेशनसुद्धा कमी होईल.

मी २१ वर्षीय तरूणी आहे आणि हॉस्टेलमध्ये राहते. माझी रूममेट माझी चांगली मैत्रीण बनली आहे. आम्ही कधीकधी मोबाइलवर एकत्र पॉर्न मुव्हीसुद्धा पाहतो. अलीकडेच काही दिवसांपूर्वीच माझी मैत्रीण सेक्स टॉईज घेऊन आली. तिने मलासुद्धा हे वापरायला सांगितले. सुरुवातीला मला असे करायला संकोच वाटला, पण आता मला याची चटक लागली आहे. कृपया मला सांगा सेक्स टॉईज कितपत सुरक्षित आहेत? मी काही चूक तर करत नाही ना?

जर हायजिनकडे लक्ष दिले तर सेक्स टॉईज वापरण्यात काही गंभीर धोका नाही. पण बाजारात लपून छपून मिळणाऱ्या सेक्स टॉईजच्या अनेक रेंज भारतासहित अनेक देशात प्रतिबंधित आहेत.

योग्य हेच राहील की तुम्ही आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलवर पॉर्न मुव्ही बघण्याची सवय सुटू शकते. याउलट सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्या आणि चांगली मासिकं, साहित्य वाचा. शक्य असेल तर आपल्या रूममेटपासून दूर राहण्यासाठी रूम बदलून घ्या.

मी ३२ वर्षीय विवाहित पुरुष आहे. माझे सहजीवन समाधानी आहे. पण काही दिवसांपासून मी चिंतेत आहे. माझी पत्नी पॉर्न मुव्ही पाहून सेक्सदरम्यान तशा स्टेप्स करायला सांगते. सुरुवातीला मलाही मजा वाटली पण अनेक स्टेप्स इतक्या विचित्र असतात की मला कळत नाहीत. सांगा मी काय करू?

विवाहानंतर सेक्स संबंधात एकमेकांचा विचार करणे आणि लैंगिक सक प्राप्त होणे वैवाहिक जीवनाचा पाया आहे. त्यात सेक्स तर निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे.

जर पत्नीची इच्छा सेक्सदरम्यान वेगवेगळी आसनं करून ते आणखी आनंददायक बनवण्याची असेल तर यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल.

तुम्ही यासाठी ‘कामसूत्र’ साहित्याची मदत घेऊ शकता. यात रतिक्रीडेच्या आसनांबाबत विस्ताराने सांगितले आहे. सेक्स संबंधांच्यावेळी आपल्या पत्नीशी मोकळेपणाने बोला आणि एकमेकांना सहयोग करा. रात्री अंथरुणात जाण्याआधी हलका पण पौष्टीक आहार घ्या. यामुळे सेक्स प्रक्रियेत ऊर्जा टिकून राहील.

मी ३४ वर्षांचा आहे आणि ५ वर्षाच्या मुलीचा पिता आहे. लग्नानंतर काही वर्ष वैवाहिक आयुष्य छान चालले होते. पण अलीकडे पत्नी थोडी बदलल्यासारखी वाटते. सेक्स संबंध करून महिनोंमहिने उलटतात. माझी इच्छा असली तरी ती काहीतरी कारण सांगून टाळते. तिच्या या बदललेल्या वागणूकीमुळे मी पडताळणी केली तेव्हा कळले की तिचे तिच्या कार्यालयातील एका सहकाऱ्याशी संबंध आहेत. मी माझ्या पत्नीला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झालो. आता मला वाटते की हे संबंध संपवावे आणि तिला घटस्फोट द्यावा. कृपया सल्ला द्या?

वैवाहिक जीवनात पती अथवा पत्नीचे सेक्सप्रति उदासीनता दर्शवणे, सेक्स संबंध निर्माण करण्यास नकार देणे घटस्फोटासाठी कारणीभूत ठरते. तुम्ही तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण पत्नीला पटले नाही. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. पण हे तुमचे व्यक्तिगत मत असू शकते. जो काही निर्णय घ्याल तो सारासार विचार करून घ्या, कारण तुमची ५ वर्षांची मुलगी तुम्हा दोघांची जवाबदारी आहे. तिच्यावर घटस्फोटाचा वाईट परिणाम होऊ शकतो.

घटस्फोट घेणे सोपे नाही आणि तुम्हाला त्रिशंकू अवस्थता लटकवू शकतो. जो हक्क तुम्ही मिळवू इच्छिता, शक्यता आहे, तो तुम्हाला मिळणारच नाही.

मी ३२ वर्षीय महिला आहे. २ मुलांची आई आहे. लग्न होऊन ११ वर्षं झाली आहेत. सुरुवातीला सगळे नीट सुरु नव्हते. सासू छळत असे. नवराही भांडणात अंगावर हात उचलत असे. यात वेगळे म्हणजे माझी एका फेसबुक फ्रेंडशी चांगली मैत्री झाली. आम्ही दोघे वेगवेगळया शहरात राहतो, तरीही आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग आणि गप्पा मारत असतो. त्याची आणि माझी एकदाही भेट झाली नाही आहे पण आम्ही आपापसात बोलल्याशिवाय राहू शकत नाही. त्याला अनेकदा मी ब्लॉक केले पण परत तशीच स्थिती होते. कधीकधी मनाला जाणवते की मी माझ्या नवऱ्याला चिट का करते आहे? सांगा मी काय करू?

तुम्ही या अपराधी भावनेत अजिबात राहू नका. तुम्ही काही चुकीचे करत नाही आहात. जर तुम्हाला मानसिक सुख घरात मिळत नसेल तर तुम्ही शांती मिळावी म्हणून फेसबुक फ्रेंडचा आधार घेत आहात. तो पुरुष असो वा स्त्री, हे चुकीचे नाही आहे. नैतिकतेच्या घोळात न फसता आपली मन:शांती घालवू नका. हो, एकमेकांना भेटायचे असेल तर आधी २-३ वेळा विचार करा की जोखीम घ्यावी की नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें