* प्रतिनिधी
मी २६ वर्षांची आहे. पिरिड्सदरम्यान माझ्या ब्रेस्टचा आकार हेवी होतो. ब्रेस्ट थोडी कडकसुद्धा होते. पिरिड्सनंतर काही दिवस ही समस्या कायम राहते. यामुळे सेक्सच्यावेळी मला बरोबर वाटत नाही. सांगा मी काय करू?
पिरिड्सदरम्यान ब्रेस्ट हेवी होणे ही काही गंभीर समस्या नाहीए. हे साधारणत: सॉल्ट रिटेंशनमुळे होते. तुम्ही फॅमिली डॉक्टरना भेटून आपली समस्या सांगणं उत्तम. व्यवस्थित खाणेपिणे व उपचार यामुळे ना केवळ ही समस्या संपेल तर तुमचे सॉल्ट रिटेंशन आणि कंजेशनसुद्धा कमी होईल.
मी २१ वर्षीय तरूणी आहे आणि हॉस्टेलमध्ये राहते. माझी रूममेट माझी चांगली मैत्रीण बनली आहे. आम्ही कधीकधी मोबाइलवर एकत्र पॉर्न मुव्हीसुद्धा पाहतो. अलीकडेच काही दिवसांपूर्वीच माझी मैत्रीण सेक्स टॉईज घेऊन आली. तिने मलासुद्धा हे वापरायला सांगितले. सुरुवातीला मला असे करायला संकोच वाटला, पण आता मला याची चटक लागली आहे. कृपया मला सांगा सेक्स टॉईज कितपत सुरक्षित आहेत? मी काही चूक तर करत नाही ना?
जर हायजिनकडे लक्ष दिले तर सेक्स टॉईज वापरण्यात काही गंभीर धोका नाही. पण बाजारात लपून छपून मिळणाऱ्या सेक्स टॉईजच्या अनेक रेंज भारतासहित अनेक देशात प्रतिबंधित आहेत.
योग्य हेच राहील की तुम्ही आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलवर पॉर्न मुव्ही बघण्याची सवय सुटू शकते. याउलट सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्या आणि चांगली मासिकं, साहित्य वाचा. शक्य असेल तर आपल्या रूममेटपासून दूर राहण्यासाठी रूम बदलून घ्या.
मी ३२ वर्षीय विवाहित पुरुष आहे. माझे सहजीवन समाधानी आहे. पण काही दिवसांपासून मी चिंतेत आहे. माझी पत्नी पॉर्न मुव्ही पाहून सेक्सदरम्यान तशा स्टेप्स करायला सांगते. सुरुवातीला मलाही मजा वाटली पण अनेक स्टेप्स इतक्या विचित्र असतात की मला कळत नाहीत. सांगा मी काय करू?
विवाहानंतर सेक्स संबंधात एकमेकांचा विचार करणे आणि लैंगिक सक प्राप्त होणे वैवाहिक जीवनाचा पाया आहे. त्यात सेक्स तर निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे.