उन्हाळ्यात कशी असावीत अंतर्वस्त्रे

* पारुल भटनागर

उहाळयात विशेष करून थंडावा देणाऱ्या रंगांचे हवेशीर कपडे महिलांना आवडतात. त्यांच्यासाठी हा ऋतू स्वत:ला सुपर सेक्सी दाखवण्यासाठीचा असतो. अशावेळी बाह्य पोशाखासह आपली अंतर्वस्त्रेही इतकी सेक्सी असावीत की, त्यावर स्ट्रीप ड्रेस किंवा इतर कोणताही हॉट ड्रेस घातल्यानंतरचा आपला सुपर सेक्सी लुक लोकांना आकर्षित करणारा ठरावा, असे तुम्हाला वाटत नाही का?

उन्हाळयात स्टाईलसोबतच तुम्हाला आरामदायी वाटणेही गरजेचे असते अन्यथा ही फॅशन तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. चला, जाणून घेऊया की, उन्हाळयात तुमची अंतर्वस्त्रे कशी असायला हवीत :

कॉटन फॅब्रिक असते सर्वोत्तम

बाजारात तुम्हाला वेगवेगळया डिझाईन्स आणि वेगवेगळया फॅब्रिक्सची अंतर्वस्त्रे मिळतात. ती पाहून क्षणभर तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकता, पण त्यांचे फॅब्रिक कॉटनचे असेल, याकडे लक्ष द्या, कारण ओलावा शोषून घेण्याची क्षमता हे या फॅब्रिकचे वैशिष्टय असते.

या फॅब्रिकमुळे आरामदायी वाटते, शिवाय दिवसभर थंडावाही जाणवतो. या कपडयातील गारवा मिळवून देणारा गुण तुमच्या शरीरावर कुठलीही अॅलर्जी होऊ देत नाही. त्यामुळेच कॉटनची अंतर्वस्त्रे वापरा आणि स्वत:ला कूल ठेवा.

साईजकडे लक्ष द्या

ज्याप्रमाणे प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळया आकाराची अंतर्वस्त्रे लागतात. त्यामुळे तुमच्या शरीरयष्टीनुसारच अंतर्वस्त्रे निवडा. सुमारे ७० टक्के महिला चुकीच्या साईजची ब्रा निवडतात.

जास्त घट्ट ब्रा घातल्याने त्वचेवर लालसर व्रण उमटतात. अॅलर्जी होते, जी अत्यंत त्रासदायक असते. यामुळे रक्ताभिसरणावरही परिणाम होतो आणि हे आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते, तर सैल ब्रा घातल्याने कपांना योग्य आकार मिळत नाही, त्यामुळे ब्रेस्ट लटकत राहतात. साहजिकच तुमची फिगर खराब होते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही अंतर्वस्त्रे खरेदी कराल तेव्हा शरीराची साईज अर्थात आकार लक्षात ठेवा.

न्यूड शेडची निवड करा

जर तुम्ही उन्हाळयात न्यूड शेडची ब्रा निवडलीत तर तुम्हाला खूप आरामदायी वाटेल, कारण हे रंग तुम्हाला थंडावा मिळवून देतील आणि टॅनिंगपासूनही दूर ठेवतील. जर तुम्ही जास्त गडद रंगाची ब्रा घातली तर गरम झाल्यासारखे वाटेल. यामुळे तुमची त्वचा टॅन होण्याचीही भीती असते. तुम्हाला काळी ब्रा आणि पँटीज खूपच सेक्सी वाटत असतील, पण थंडावा मिळवण्यासाठी या उन्हाळयात तुम्ही न्यूड शेडच निवडा.

लवलेस ब्रा

या उन्हाळयात सेक्सी दिसण्यासाठी, लेस स्टाईल ब्रा वापरा, कारण ती तुम्ही लो कट टॉपसह, टँक टॉपवरही घालू शकता. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसता, शिवाय ती तुमच्या ब्रेस्टसाठी आरामदायी ठरेल, अशाच प्रकारे शिवलेली असते. या घामाघूम करणाऱ्या दिवसांमध्ये ती तुमच्या त्वचेला गारवा मिळवून देण्याचे काम करते. त्यामुळे खऱ्याअर्थी ही ब्रा तुम्हाला स्टायलिश, सेक्सी आणि आरामदायी लुक मिळवून देईल.

स्ट्रेपलेस ब्रा निवडा

स्ट्रेपलेस ब्रा ही कुठल्याही हॉट ड्रेसच्या आत चांगली दिसते. यामुळे खांद्यांनाही मोकळेपणा मिळतो, आरामदायी वाटते. खांद्यांवर लालसर व्रण येत नाहीत किंवा जळजळही होत नाही, कारण जेव्हा जास्त वेळ ब्रा घातली जाते तेव्हा कप व्यवस्थित पकडण्यासाठी पट्टया वापरल्या जातात, ज्यामुळे खांद्यांवर थोडासा ताण येतो, पण यात असे काहीच नसते.

टीशर्ट ब्रा ठरते सर्वोत्तम

टीशर्ट ब्रा उन्हाळयात सर्वोत्तम ठरते, कारण ती अतिशय पातळ फॅब्रिकपासून बनवलेली असते, शिवाय वायर फ्रीही असते. यामुळे, तुम्ही कुठलाही त्रास किंवा अस्वस्थतेशिवाय ती दिवसभर घालू शकता. उन्हाळयात ज्यांना जास्त घाम येतो अशा महिलांसाठी टीशर्ट ब्रा उत्तम ठरते.

पँटीज असतात अधिक आरामदायक

उन्हाळयात पँटीज खरेदी करताना थोडासाही निष्काळजीपणा बरा नाही,      कारण हा भाग अतिशय संवेदनशील असतो आणि या भागावर जास्त घाम येत असल्याने त्वचा सोलपटून लाल होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही पँटी खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा की, ती नैसर्गिक फॅब्रिकची म्हणजे कॉटनची असावी आणि त्यावर कोणतीही वजनदार नक्षी नसावी, कारण यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

 

बेबी बंप फोटोशूटचा नवा ट्रेण्ड

* एनी अंकिता

लग्न, पार्टी, मॉडेलिंग फोटोशूटबाबत तुम्ही बरंच काही नक्कीच ऐकलं असणार, परंतु आता एका नव्या फोटोशूटचा ट्रेण्ड सुरू झालाय आणि तो आहे बेबी बंपचा. पूर्वी जिथे स्त्रिया आपल्या बेबी बंपला झाकून ठेवायच्या, तिथे आज आपलं सौंदर्य कॅप्चर करून त्यांना कायम आठवणीत ठेवायचं असतं. हा त्यांची फॅशन आणि लाइफस्टाइलचा भाग बनत चाललाय.

पूर्वी बेबी बंप केवळ हॉलीवूड सेलिब्रिटीज दाखवत असत, परंतु आता हा ट्रेण्ड बॉलीवूड सेलिब्रिटीजदेखील फॉलो करत आहेत. त्या त्यांच्या फॅन्समध्ये राहाण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या बेबी बंप्सचे फोटो शेअर करत आहेत.

लॅक्मे फॅशन वीक समर २०१६मध्ये मॉडेल कॅरोल ग्रेझियसने साडी परिधान करून रॅम्पवर वॉक करून हा ट्रेण्ड अधिक पॉप्युलर बनविलाय.

या सेलिब्रिटीजने केलंय बेबी बंप फोटोशूट

कोंकणा सेन : आपल्या ऑफ बीट परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या कोंकणाने आपल्या बेबी बंपसोबत असंच काहीसं केलंय. तिने एका मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी बेबी बंपसोबत फोटोशूट केलंय.

श्वेता साल्वे : हिची बेबी बंप एक्सपेरिमेण्ट पाहून तर तुम्ही चकितच व्हाल की बेबी बंपसोबत एवढी क्रिएटिव्हिटी केली जाऊ शकते. श्वेताने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये बरेच फोटो शूट केले आहेत.

लारा दत्ता : आपल्या प्रेगन्सीच्या दरम्यान लारा दत्ताने कधीही आपलं सोशल लाइफ बंद केलं नाही, याउलट कायम आपल्या बेबी बंपसोबत ट्रेण्डी आउटफिट्समध्ये दिसली.

जेनेलिया डिसूझा : बॉलीवूडचं क्यूट कपल जेनेलिया आणि रितेश देशमुखनेदेखील आपल्या दुसऱ्या बाळाच्यावेळी ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोशूट केले होते.

अर्पिता खान आणि आयूष शर्मा : या कपलनेदेखील मॅटरनिटी फोटोशूट केलंय. व्हाइट ड्रेसमध्ये दोघे खूपच एलिगंट दिसत होते.

बेबी बंप फोटोशूट आपल्या मुलांसोबत आपले सुंदर क्षण सजवून ठेवण्याची एक पद्धत आहे. तुम्हीदेखील मॅटरनिटी फोटोशूटचं प्लानिंग करणार असाल तर अजिबात संकोच करू नका, उलट आपले सुंदर क्षण आठवणींच्या अल्बममध्ये साठविण्यासाठी काही टिप्सचा आधार घ्या.

केव्हा कराल फोटोशूट

प्रेगनन्सीमध्ये फोटोशूट नेमकं केव्हा करायचं याचा तुमच्या मनात विचार येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ६व्या आणि ७व्या महिन्यामधीलचा काळ बेबी बंप फोटोशूटसाठी उत्तम असतो. यावेळी तुमचं बंप गोल गरगरीत आणि सुंदर दिसतं.

काय घालायचं आणि काय नाही

तुमचं बंप उठून दिसण्यासाठी खूप सैलसर कपडे वापरू नका; कारण यामुळे तुमच्या बंपचं सौंदर्य उठून दिसणार नाही.

तुम्ही बटन असणारं ब्री शर्टदेखील वापरू शकता. थोडासा सेक्सी लुक देण्यासाठी बंपजवळचं बटन उघडं ठेवा. हवं असल्यास तुम्ही टीशर्टदेखील ट्राय करू शकता, फक्त टीशर्ट फिटिंगचे नसावं.

कलरमध्ये तुम्ही लाइट कलर म्हणजेच क्रीम, बेज, ग्रे, व्हाइट इत्यादी रंगांची निवड करा. डार्क कलर, फ्लोरल प्रिण्ट आणि चौकटीचे कपडे वापरू नका.

बेबी बंप फोटोशूटमध्ये हेवी ज्वेलरी वापरू नका. कारण हेवी ज्वेलरी वापरल्याने बेबी बंपचं सौंदर्य कमी होतं, त्यामुळे सिंपल व नॅचरल दिसण्याचा प्रयत्न करा.

हेअरस्टाइल व मेकअप साधा असावा

तुम्ही फोटोशूट करून घेताय याचा अर्थ असा नाहीए की तुम्ही भरपूर मेकअप लावावा किंवा लेटेस्ट हेअरस्टाइल करावी. तर अशा वेळी जास्तीत जास्त नॅचरल दिसण्याचा प्रयत्न करा; कारण तुम्ही फोटोत जेवढ्या नॅचरल दिसाल तेवढंच तुमचं सौंदर्य अधिक द्विगुणित होईल.

फोटोशूटसाठी काही टिप्स

* तुम्ही तुमच्या बंपवर तुमचा हात ठेवून फोटो क्लिक करू शकता. तुम्ही काही प्रॉप्सचादेखील वापर करू शकता. जसं बाळाचं पहिलं अल्ट्रासाउंड, बेबी शूज इत्यादी. परंतु एकाच फोटोत भरपूर प्रॉप्सचा वापर करू नका.

* तुम्ही सेल्फीच्या माध्यमातूनदेखील तुमचं बेबी बंप शूट करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला कॅमेऱ्याचा अँगल सेट करावा लागेल म्हणजे तुमचं बंप दिसून येईल. तुम्ही आरशात पाहूनदेखील क्लिक करू शकता.

* फक्त तुमचाच फोटो क्लिक करत राहू नका, काही रोमॅण्टिक कपल शॉट्सदेखील घ्या. तुमचं बाळ तुमच्यासाठी जेवढं खास आहे तेवढंच तुमच्या पार्टनरसाठीदेखील आहे. हवं असल्यास काही फोटोमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्सचादेखील समावेश करू शकता.

* हो, पण एक लक्षात घ्या, सतत फोटोशूट करत राहू नका, उलट अधूनमधून थोडा ब्रेक घ्या. थकण्यापासून वाचण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे तुम्ही फोटोग्राफरसोबत बसून अगोदरच चर्चा करून घ्या की तो कसा शॉट घेणार आहे आणि तुम्हाला कसा फोटो हवाय म्हणजे शूटसाठी अधिक वेळ लागणार नाही. हवं असल्यास ज्या फोटोग्राफरकडून तुम्ही फोटो काढून घेणार आहात त्याने यापूर्वी काढलेले फोटो बघा. यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि तुम्ही फोटोग्राफरला योग्य प्रकारे समजावू शकाल.

* कॅमेरा ऑन होताच आपण सर्वकाही विसरून जातो. फोटो चांगला यावा यासाठी डिफरंट पोझ ट्राय करू लागतो, परंतु तुम्ही तुमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्हाला ज्या पोझमध्ये कम्फर्टेबल वाटेल, तीच पोझ घ्या.

ट्रेंडी फिंगर रिंग्स

* पूनम पांडेय

फुल फिंगर रिंग

फुल फिंगर रिंगची ही डिझाइन संपूर्ण बोटाला व्यापते. या प्रकारच्या अंगठीमुळे बोटाला फुलर असा लुक मिळतो. तुम्ही याला इंडियन आणि इंडो-वेस्टर्न पेहरावासोबत टिम अप करू शकता. पण जेव्हा तुम्ही फुल फिंगर रिंग परिधान कराल त्यावेळी दुसरी कोणतीही अंगठी परिधान करू नका. जर बोट आखूड आणि जाड असेल तर ही फुल रिंग शोभून दिसणार नाही.

मिड फिंगर रिंग

नेहमीच्या अंगठीला बोटाच्या शेवटाला घाला आणि नेल आर्ट रिंगला बोटाच्या सुरुवातीला घाला. पण मिड फिंगर रिंगला बरोबर बोटाच्या मधोमध घाला. म्हणूनच त्याला मिड फिंगर रिंग म्हणतात. विशेष समारंभांव्यतिरिक्त तुम्ही रोज जीन्स, टी-शर्ट, सलवारकमीज वगैंरे सोबतही परिधान करू शकता.

चेन फिंगर रिंग

जर तुमचे हात बारीक असतील तर चेन फिंगर रिंग तुमच्या हाताला भरलेला लुक देतात. एकापेक्षा जास्त बोटातही चेन फिंगर रिंग परिधान करतात. अंगठी चेनच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेली असते. म्हणूनच याला चेन फिंगर रिंग म्हणतात. परंतु या रिंग्स विशेष प्रसगांसाठीच परिधान केल्या जातात.

कॉकटेल फिंगर रिंग

जर तुम्हाला काही मिनिटांतच फॅशनेबल लुक मिळवायचा असेलतर, आपल्या नेहमीच्या सिंपल रिंगऐवजी जागी कॉकटेल फिंगर रिंग परिधान करा. मोठी आणि बोल्ड साईजच्या कॉकटेल रिंगमुळे नेहमीच स्टायलिश लुक मिळतो. यास तुम्ही वेस्टर्न आउटफिटसोबत परिधान करू शकता. अशी रिंग उंच आणि बारीक स्त्रियांवर जास्त शोभून दिसतात.

फोर फिंगर रिंग

जर तुम्हाला चारही बोटांत अंगठी घालायला आवडतं. तसेच चारही बोटांमध्ये वेगवेगळी अंगठी घालण्याऐवजी फोर फिंगर रिंगला तुम्ही आपली पहिली पसंती बनवू शकता. फोर फिंगर चारही बोटांत एकत्र घातली जाते. ही फोर फिंगर रिंग तुम्ही रोज वापरू शकत नाही. ही केवळ काही खास समारंभांमध्येच परिधान करा.

 

नेल आर्ट रिंग

जर तुमच्याकडे नेल आर्ट करून घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही नेल आर्ट रिंगचा वापर करू शकता. या अंगठीला बोटाच्या पुढच्या बाजूला नखाच्या इथेच परिधान केले जाते. वेस्टर्न कपडयांवर निऑन, काळ्या-पांढऱ्या शेडस्मधील नेल आर्ट रिंगची निवड करू शकता. भारतीय पारंपरिक कपडयावर ज्येष्ठ नेल आर्ट रिंगची निवड करता येईल.

ट्रिपल फिंगर रिंग

डबल फिंगर रिंगप्रमाणे ट्रिपल फिंगर रिंगलाही अनेकांची पसंती मिळत आहे. ही एकत्र तीन बोटांत परिधान केली जाते. सिंपल डायमंडसह कलरफुल डायमंडमध्येदेखील या रिंग्ज उपलब्ध आहेत. तुमच्या पेहरावांनुसार रिंगची निवड करा.

डबल फिंगर रिंग

अशाप्रकारची अंगठी एकावेळी दोन बोटांत परिधान करता येते. या डबल फिंगर रिंगचा लुक एकदम स्टाइलिश दिसतो. साध्या डबल रिंगपासून अगदी ह्युज डिझाइनवाल्या डबल रिंग बाजारात उपलब्ध आहेत. रोज वापरण्यासाठी सिंपल स्टाइलच्या डबल रिंग वापरा आणि विशेष प्रसंगांकरीता ज्वेल डबल फिंगर रिंगची खरेदी करा. जर तुमची बोटे बारीक असतील तर हेवी आणि जर बोटे जाड असतील तर लाइट फिंगर रिंगची निवड करा.

कफ फिंगर रिंग

बाजारात या कफ फिंगर रिंगची मागणी मोठया प्रमाणात आहे. प्लेन कफसह डिझायनर कफ रिंग देखील बाजारात उपलब्ध आहेत. जर बोटे लांब असतील तर जास्त रुंदीची कफ रिंग निवडा जर बोटे आखुड असतील तर कमी रुंदीची कफ रिंग निवडल्यास बोटे दिसणार नाहीत.

जमाना आदिवासी फॅशनचा

* सुमन वाजपेयी

नवीन फॅशनचा अवलंब करणे आजकालचा ट्रेंड आहे. म्हणूनच फॅशन डिझायनर्सही हटके प्रयोग करत आहेत. कानातले असोत किंवा साडया, यात आदिवासी लुक बराच लोकप्रिय आहे. आजकाल आदिवासी प्रिंट सर्व प्रकारच्या पोशाखांवर पाहायला मिळत आहे.

आदिवासींमध्ये निसर्ग आणि प्राण्यांविषयी ओढ पाहायला मिळते. त्यामुळेच अशा ड्रेस मटेरियलमध्येही नैसर्गिक प्रिंट्स आणि रंगांचा वापर वाढत आहे. आदिवासी प्रिंटस असलेल्या पाश्चात्य कपडयांचीही बरीच चलती आहे. ते फ्यूजन लुक देतात. सोबतच प्रिंट्सही अगदी ट्रेंडी दिसतात. आदिवासी लुक असलेल्या साडयांचीही सध्या चलती आहे. खासकरून कॉटन आणि हँडलूमच्या आदिवासी प्रिंट्स असलेल्या या साडया क्लासी आणि आकर्षक लुक देतात. ऐश्वर्या राय बच्चनपासून जेनेलिया आणि बिपाशाही अशाप्रकारच्या साडया परिधान करताना दिसू शकतात.

आफ्रिकन प्रिंट्सनेही आदिवासी लुकमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आफ्रिकन प्रिंट्सच्या स्कार्फपासून ते बॅडशीट्स, उशाही पसंतीस उतरत आहेत. आफ्रिकन प्रिंट्सच्या सलवार सूटचा वापरही वाढला आहे. आदिवासी लुक हा पारंपरिक पेहराव, साडीसोबतच कॅपरी, पॅण्ट, ट्यूनिकपासून ते मिनीजपर्यंत सर्वांवर ट्राय करता येऊ शकतो. आदिवासी प्रिंट्स पॅण्टला कूल लुक मिळवून देतात. याला तुम्ही बॉयफ्रेंड शर्टसोबत मॅचिंग करून घालू शकता. आदिवासी प्रिंट्सच्या प्लाझो पँटदेखील घालू शकता, ज्याला टँग किंवा  क्रॉप टॉपसह तुम्ही सहज कॅरी करू शकता.

ज्वेलरीही असते खास

ड्रेसबरोबरच ज्वेलरीमध्येही आदिवासींचा लुक कॅरी केला जात आहे. आदिवासी कानातले तरुणींसह वयस्कर महिलाही घालू लागल्या आहेत. यांचे वैशिष्टय म्हणजे हे पारंपरिक किंवा ट्रेंडी अशा कुठल्याही लुकला मॅच करतात. आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक स्त्रिया खूप जड दागिने घालतात. परंतु डिझाइनर त्याच्या हलक्या वजनाच्या डिझाईन्स तयार करत आहेत. अष्टधातू, तांब्याच्या तारांसोबत चांदी मिक्स करून बनविलेली आदिवासी ज्वेलरी इंडोवेस्टर्न आऊटफिटसह खूपच छान दिसते. यात अॅनिमल ज्वेलरी जसे की, कासवाची अंगठी, घुबडाची चेन, पोपटाचे कानातले, लीफ सेट इत्यादींचा सध्या खूपच ट्रेंड आहे.

चांदीच्या पांढऱ्या किंवा काळया धातूपासून बनवलेले कानातलेही सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

आदिवासी बोहो बांगडयादेखील वेगळा लुक देतात. त्या पाश्चिमात्य तसेच पारंपरिक पेहरावासोबतही घालता येतात. बोहो बांगडयांना कडा किंवा ब्रेसलेटप्रमाणेही घालता येते. आदिवासी प्रिंट्स असलेले स्कार्फ खूपच स्मार्ट लुक देतात. ते जीन्स, ड्रेस किंवा कुर्ती जीन्स अशाप्रकारे कोणत्याही पेहरावासोबत परिधान केले जाऊ शकतात. तुम्ही तुमचा फॉर्मल किंवा कॅज्युअल आदिवासी स्कार्फ कुठल्याही आऊटफिटसह कॅरी करू शकता.

जर तुम्ही प्लेन ड्रेस घालणार असाल तर त्यासोबत आदिवासी प्रिंट स्कार्फ वापरा. यामुळे आपला ड्रेस आणखी आकर्षक दिसेल. जर तुम्ही ब्रोच लावत असाल तर साडीला आदिवासी ब्रोच लावता येऊ शकेल.

मेकअपवरही आहे जादू

आदिवासी लुकच्या मेकअपची वाढती क्रेझ तरुणींमध्ये दिसू शकते. आदिवासी लुक मिळविण्यासाठी डोळयांचा विशेष मेकअप केला जातो. यामुळे डोळे बोल्ड दिसू लागतात. यासाठी वरच्या आणि खालच्या दोन्हीकडील पापण्यांना चांगल्याप्रकारे हायलाईट केले जाते आणि डोळे उठून दिसण्यासाठी काजळ लावले जाते. त्यानंतर आयशॅडो वापरून डोळयांना बोल्ड लुक दिला जातो. नंतर मस्करा लावून आर्टिफिशियल लॅशेज लावल्या जातात.

आदिवासी लुक मिळविण्यासाठी लिक्विड फाउंडेशन आणि ब्रोन्जरचा उपयोग ओठांवर केला जातो, परंतु या उपयोग खूप कमी प्रमाणात केला जातो, फक्त त्याचा हलकासा टच दिला जातो. या लुकसाठी ब्लशरदेखील वापरला जात नाही. लिपस्टिकसाठी मॅट कलर निवडा जे नारंगी आणि कोरलच्यामधले असतील किंवा मग लाल रंगाशी मिळत्याजुळत्या शेडचीही लिपस्टिक लावता येईल.

हेअर स्टाईलबाबत बोलायचे म्हणजे, या लुकसाठी केस मोकळे सोडा किंवा सैलसर बांधा. बोटांनीच केस पसरवा. मोकळे, साधारपणे कर्ल केलेले केस या स्टाईलसाठी योग्य ठरतात. आदिवासी स्त्रिया केस सजवण्यासाठी विविध प्रकारचे जड दागिने वापरतात, परंतु ते दागिने प्रमाण मानून या दिवसात ज्या डिझाईन्स तयार केल्या जात आहेत, त्यांना फॅशन ज्वेलरी असे म्हणतात.

फॅशन छोट्या शहरांतील

* दीपा पांडे

नेहमीच दोन-अडीच वर्षांनी होणाऱ्या बदलीमुळे सीमा एवढया देश-प्रदेशात फिरली होती की नेहमीच ती काय घालावे आणि काय नाही, अशा विचारात पडत असे. तुमच्यासोबतही असेच घडते का? आपण जर मोठया शहरात राहात असाल, तर आपण निर्धास्तपणे कोणताही पेहराव घालू शकता, पण आपण जर छोटया शहरात राहात असाल, तर हे पाहणे आवश्यक आहे की, तेथील वातावरण कसे आहे. अजूनही तिथे चेहऱ्यावर घुंगट घेण्याचा रिवाज आहे का किंवा मग डोक्यावर पदर घेण्याचा रिवाज आहे का? तेथील वातावरणानुसार तुम्हालाही तुमचा वार्डरोब तयार करावा लागेल, अन्यथा सर्वांमध्ये तुम्हाला अवघडल्यासारखे होईल.

२००४ मध्ये सीमाची बदली हरदोई, उत्तर प्रदेशात झाली होती, तेव्हा तिथे तिने पाहिले की सर्व महिला साडी नेसत आणि घुंगट चेहऱ्यावर ओढून घेत असत, तर मुली पंजाबी ड्रेस वापरत असत. खूप कमी मुली जीन्स घालत होत्या, तीही कधीतरी. आज मात्र एवढया वर्षांत खूप बदल झाला आहे. आज त्याच महिला कुर्ती-लेगिंग्ज वापरू लागल्या आहेत, तर मुली जीन्स आणि टॉप. आज अशीच स्थिती अनूपपूर मध्य प्रदेशमध्येही आहे. आता कोणी हरदोईवरून फोन करून खुशाली विचारली की सीमा सांगते, इथे आजही १२ वर्षांपूर्वी हरदोई होतं, मग प्रश्न विचारणारीही हसू लागते.

काय वापराल?

‘जसा देश तसा वेश’ ही म्हण खरी असली, तरी याचा अर्थ असा नाही की सर्व महिला साडी नेसतात, त्यामुळे तुम्हीही साडीशिवाय दुसरे काही वापरायचेच नाहीत. उलट साडीबरोबरच सलवार-कमीज, चुडीदार, लेगिंग, पॅरलल इ. पेहराव कुठलाही संकोच न बाळगता वापरा. एकमेकांचे पाहून आजूबाजूच्या महिलांनाही अशा प्रकारचे कपडे वापरण्याची इच्छा होईल.

आपण जर एखाद्या लग्नाला जात असाल, तर मात्र साडीच सर्वात उत्तम पेहराव ठरेल. अशा वेळी पारंपरिक पद्धतीने तयार होऊन सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता. रोज साडी, चूडीदार परिधान करणाऱ्या महिला तुमचं पारंपरिक रूप पाहून दंग राहतील. त्याचप्रमाणे, अशाच भेटीगाठींच्या प्रसंगी पॅरलल, लेगिंग किंवा सलवार सूटसोबत छान ओढणी घेऊ शकता. जर तुम्हाला मोठा दीर किंवा सासऱ्यांसमोर चेहरा दाखवायचा नसेल, तर आपला दुपट्टा डोक्यावर चांगल्याप्रकारे घेऊन पिनअप करा. असे केल्याने आपल्या डोक्यावरील पदरही सरकणार नाही आणि कोणी तुमच्या फॅशनला नावही ठेवणार नाही.

जर साडी नेसून कंटाळा आला असेल, तर आपल्या आवडीनुसार गुजराती वर्क मिरर आणि गोंडयांनी सजलेली, राजस्थानी बांधणीच्या किंवा नक्षीकाम केलेल्या राजसी दिसणारी लहंगा-चोली घालून मिरवा. रेडीमेड लेहंगा-साडीही आपल्या सोईनुसार वापरू शकता.

तरुणी जीन्स किंवा पँटसोबत गुडघ्यांपर्यंत कुर्ती व स्टोल वापरून आपली हौस भागवू शकतात. हा पेहराव लांबून कुर्ती व लेगिंगचा लुक देईल. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळयाही दिसणार नाही. जर कमी वयाच्या तरुणी असाल तर लाँग स्कर्ट आणि शॉर्ट कुर्तीवर स्टोल घेऊन सणासुदीला आपला हटके लुक मिळवू शकता.

जर तुम्हाला मिनी मिडी किंवा हॉट पँट घालायची इच्छा असेल आणि तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल, तर आपण पतीसोबत एकांतात आपल्या बेडरूममध्ये अशा प्रकारचा पेहराव करून मिरवू शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्या शहरात फिरायला जाताना तिथे आपला मनपसंद ड्रेस वापरू शकता. मात्र आपला फोटो सोशल मीडीया उदा. फेसबुक, व्हॉट्सअपवर पोस्ट करू नका. कारण तुम्हाला परत त्याच कुटुंबात परतायचे आहे.

काय वापरणे टाळाल?

आता काही अतिउत्साही महिला विचित्र कपडे वापरतात किंवा मग हास्याला पात्र ठरतात. उदा. नेटची साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन फिरणे. अशा वेळी त्यांना काय झाकायचे आहे अन् काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. काही महिला स्किन टाइट लेगिंगसोबत कुर्ता वापरतात. अशा वेळी वाटते की केवळ कुर्ताच घातला आहे. हे दिसायला खूप वाईट दिसते. म्हणूनच बाहेर जाताना आपल्या वेशभूषेची विशेष काळजी घ्या.

साडी खरोखरच संपूर्ण पोशाख आहे, पण तीही नेसण्याच्या अनेक पद्धती आहेत. साडी सरळ पदर, उलटा पदर अशा कुठल्याही पद्धतीने नेसलेली असेल, तरी त्याच्यासोबत मॅचिंग ब्लाउज व परकर नसेल, तर ती खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे ती व्यवस्थित नेसलेली नसेल, वरती उचलली गेली असेल, फॉल निघाला असेल, पदर पसरलेला असेल, तरीही खराब दिसते.

जर जीन्स किंवा पँट घालायची असेल, तर शॉर्ट टॉप किंवा स्किन टाइट जीन्स वापरणे टाळा. लाँग स्कर्टसोबत टाइट शर्ट किंवा टीशर्ट वापरू नका. छोटया शहरांमध्ये असे कपडे परिधान केलेल्या तरुणींकडे लोक असे काही वळून पाहतात की जणू काही प्राणिसंग्रहालयातून एखादा प्राणी बाहेर येऊन रस्त्यावर फिरतोय.

पेहराव कुठलाही असो, तो योग्य प्रकारे केलेला नसेल, तर तो आपले रूप खुलविण्याऐवजी घटवितो. काही महिलांना वाटते की महागडे ड्रेसेसच शोभून दिसतात, पण असे नाहीए. रोजच्या पोशाखांमध्येही त्यांच्या किंमतीपेक्षा रंगांचे संयोजन, डिझाइन जास्त महत्त्वाची असते. म्हणूनच जो पेहराव कराल, तो शोभण्यासारखा असावा. त्याच्या रंगांशी मिळत्याजुळत्या बांगडया, कडे, ब्रेसलेट, आर्टिफिशिअल ज्वेलरी वापरून तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

फॅशनेबल पेहराव प्रत्येक वयाची आवड

* रेणू श्रीवास्तव

एक काळ असा होता की त्यावेळी महिलांच्या साजशृंगारावर कोणतेही बंधन नव्हते. आपले सौंदर्य उजळण्यासाठी त्या आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करत होत्या, जसजसा काळ पुढे सरकला, तसतसा समाज त्यांच्या सर्व गोष्टी काढून घेत गेला. त्यांच्या इच्छा चार भिंतींच्या आत दबून राहू लागल्या, पण आता पुन्हा एकदा समाज एका मर्यादेपर्यंत बदलला आहे आणि महिला आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागल्या आहेत.

नवीन विचारधारेबरोबरच समाजालाही आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी भाग पाडावेच लागते. फॅशनने प्रत्येक वयाच्या महिलांसाठी एक मोठी क्रांती केली आहे. सडक्या मानसिकतेनुसार सहावारी साडीमध्ये शरीर झाकण्याची प्रथा मोडून काढण्यासाठी महिला तत्पर झाल्या आहेत.

आज आकर्षक पेहराव, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि आकर्षक विचारधारा हे पर्याय बनले आहेत. ‘जीवन माझे, तनमन माझे, तर मग मी फॅशनच्या बदलत्या मोसमानुसार याला का सजवू नको?’ आज प्रत्येक महिलेच्या ओठी हेच उद्गार आहेत. धर्म, समाज, परिवार, मुल्ला-मौलवी मग कितीही फतवे काढू देत, काही पर्वा नाही.

जेव्हा प्रत्येक क्षेत्रात मुलींनी, महिलांनी आपले आकाश शोधले आहे, आपले अधिकार शोधत आहेत, तर मग मनाप्रमाणे पेहराव करणे ही तर सामान्य गोष्ट आहे. एखाद्या खास निमित्ताने पेहराव करण्यास रोखण्याचे काही कारण नाही. जीन्स, टॉप, स्कर्ट, छोटा फ्रॉक, शर्टमध्ये खुलणारे शरीर, न जाणो वयाची किती वर्षे लपवतात आणि तारुण्याची अनुभूती देतात.

घराबाहेरील दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पेहरावांना खूप महत्त्व असते. वाहन संचालनावर अधिपत्य ठेवणाऱ्या मुली असो किंवा तरुणी, प्रौढ महिला असो किंवा वृध्द त्यांना पेहरावांना आधुनिक साच्यात सजावेच लागते. लग्न समारंभ आणि सणांच्या काळात जरी, मोती आणि टिकल्यांनी सजलेल्या साड्या, पायघोळ आणि लहेंग्यासह भारी दागिने घातल्यास आपण आकर्षक तर दिसालच, पण इतरही तुमच्या प्रेमात पडतील. अर्थात, रोजच्या जीवनात यांचा वापर करणे शक्य नसते.

आज ६० असो किंवा ७०, जास्त वयाच्याही भारतीय महिला परदेशातच नव्हे, तर आपल्या देशातही जीन्स, पँट, स्कर्ट, टॉप यासारख्या पोषाखांमध्ये दिसतात, तेव्हा नजरेला खूप बरे वाटते. प्राचीन आणि आधुनिक फॅशनेबल पेहरावांच्या मिश्रीत डिझाइन नयनरम्य होण्यासोबतच बजेटमध्ये असतात. एकापेक्षा एक डिझायनर ड्रेसेस फॅशनच्या जगात लोकप्रियता मिळवत आहेत.

फॅशनवर मुली किंवा महिलांचे विचार

२४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयर दिव्या दत्ता सांगते की सलवार-कमीजपेक्षा तिला जीन्स, पँट, फुल स्कर्ट, टॉप, शर्टमध्ये जास्त चांगले वाटते. त्यामुळे अशा ड्रेसेसमध्ये उत्साही, स्मार्ट तर दिसताच, पण हलकेफुलके वाटण्याबरोबरच, प्रत्येक वर्गातील लोकांसोबत काम करताना सहजता जाणवते.

अनारकली पेहरावांची चाहती बँकेत काम करणारी पूजा सर्व आधुनिक पेहराव वापरते, पण योग्यप्रकारे. पेहरावांबरोबरच ती कामाचे ठिकाण व भेटणाऱ्यांनाही तेवढेच महत्त्व देते. ज्यांचे वजन जास्त आहे, अशा महिलांना घट्ट कपड्यांऐवजी सैलसर कपड्यांत पाहणे तिला जास्त आवडते.

३७ वर्षीय डेंटिस्ट सृजानेही दिव्याप्रमाणेच सांगितले, पण तिला विशेष प्रसंगी पारंपरिक आणि आधुनिक फ्युजनचे परिधान खूप आवडतात. घराबाहेर कॅपरी वापरणे तिला आरामदायक वाटते.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी रश्मी, सपना, मेघा, नमिताने सांगितले की त्यांना नवीन फॅशनचे कपडे सुंदर, टिकाऊ होण्यासोबतच आरामदायकही वाटतात. कपड्यांचे मटेरियल एवढे चांगले असते की ते घरीच धुऊ शकतो. ड्राय वॉशची काही गरज भासत नाही.

४५ वर्षीय अंजूलाल खास प्रसंगी बनारसी डिझायनर साडी वापरतात. त्यांना आधुनिक आणि पारंपरिक सलवारकुर्ता घालायला आवडतो.

पाटणा वुमन्स कॉलेजच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका ५० वर्षीय स्तुती प्रसाद यांचे म्हणणे आहे की त्यांना सलवार-कुर्ता घालायला खूप आवडतो. त्या प्राध्यापिका असल्याने पेहरावात शालीनतेची काळजी घ्यावी लागते.

६० वर्षीय गृहिणी सुनीता लंडनच्या वाऱ्या करू लागल्याने, त्या जीन्स, टॉप, शर्टच वापरतात. आकर्षक साडी एखाद्या खास प्रसंगी वापरतात.

७५ वर्षीय मीनाजींना रंगीबेरंगी गाउन घालायला खूप आवडतात. त्या जेव्हाही अमेरिकेला जातात, तेव्हा तेथील मॉल्समधून एकापेक्षा एक फॅशनेबल पेहराव खरेदी करून आणतात.

वास्तविक, आपल्या मनपसंत पेहरावांच्या संगतीत जगण्याचा अंदाजच काही निराळा असतो. मग मन नेहमी उत्साहाने भरलेले असते आणि थकवा, ताण आपल्या आयुष्यातून हद्दपार होतात.

फॅशन फ्लोरल प्रिंटची

* मोनिका ओसवाल

फ्लोरल प्रिंट चिरकालिक फॅशन आहे, म्हणजेच वर्षांनुवर्षे ती टिकून आहे. काळानुसार या फॅशनची लोकप्रियता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. गरमीच्या मोसमात आपण फ्लोरल प्रिंट पेहरावांशिवाय आपल्या वॉर्डरोबची कल्पनाही करू शकत नाही. गरमीच्या मोसमात जेव्हा आपल्याला सर्व निरस वाटू लागतं, तेव्हा आपल्या पेहरावावर खुललेली फुलं आपल्यामध्ये उत्साह भरतात आणि आपला मूड ताजातवाना करतात.

मात्र बहुतेक महिलांना फ्लोरल प्रिंट स्टाइलबाबत थोडया गायडन्सची गरज असते. नेहमीच महिला यासोबत अयोग्य मॅचिंगचे पेहराव वापरून त्याच्या आकर्षक पॅटर्नवर अन्याय करतात. त्यामुळे त्यांचा  संपूर्ण लुकच बिघडून जातो. यासंबंधीच इथे काही टीप्स दिल्या आहेत:

घ्या बोल्ड एंड ब्यूटी निर्णय

इतकी वर्षे आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये असलेल्या फ्लोरल डिझाइनला कंटाळला असाल, तर आता वेळ आलीय की काही आकर्षक नवीन रंगांमधील काही नवीन पॅटर्न सामील केले जावेत. फुलांच्या छोटया-छोटया प्रिंटच्या पेहरावांना आकर्षक मोठया आकारातील प्रिंटमध्ये आणि चटकदार रंगात बदला, यामुळे आपल्या वॉर्डरोबमध्ये ताजेपणा येईल आणि आपला आकर्षक लुकही समोर येईल.

फ्लोरल शूजचा वापर करा

हो, हे खरं आहे, फ्लोरल शूजची या दिवसांत फॅशन आहे आणि स्मार्ट महिलांच्या शू कॅबिनेटमध्ये हे जरूर दिसतील. जर तुम्हालाही असे शूज वापरायला आवडत असतील, तर ३डी फ्लोरल पॅटर्नसुद्धा निवडू शकता. फ्लोरल शूजसोबत असाच पेहराव वापरा. तो शोभून दिसेल. या दिवसांत अशा प्रकारचे शूज मॉलमध्ये सहज मिळू शकतात. हे घालूनच बाहेर पडा आणि बोल्ड फॅशनची सुरुवात करा.

फ्लोरल फॉर्मल टीशर्ट

स्टायलिश लुकसाठी फ्लोरल प्रिंटेड टीशर्टही उत्तम पर्याय आहेत. फ्लोरल टीशर्टसोबत सॉलिड रंगाची ट्राउजर वापरा किंवा आवडीच्या डेनिमची निवड करा.

सामान्यपणे आपण फ्लोरल टीशर्टला फॉर्मल पेहराव मानत नाही, पण हे सॉलिड कलर समर ब्लेजर, फॉर्मल ट्राउजर आणि क्लोज्ड शूजसह वापरले, तर आपल्याला खूप छान फॉर्मल लुक मिळू शकतो.

फ्लोरल मॅक्सी डे्रसही वापरून पाहा

फ्लोरल मॅक्सी ड्रेस एक जबरदस्त स्टाइल स्टेटमेंट आहे. कोणत्याही उंचीची महिला याचा वापर करू शकते. हा कॅज्युअल व सेमीफॉर्मल दोन्ही पद्धतीने वापरता येईल. रविवारची एखादी ब्रंच पार्टी किंवा मूव्ही पाहण्यासाठी एखाद्या कॅज्युअल वेळी मॅक्सी ड्रेस वापरा. लोकांचं लक्ष आपण वेधून घ्याल.

मिक्सिंग आणि मॅचवर लक्ष द्या

जर आपल्या फुलांच्या प्रिंट असलेल्या फॅशनबाबत संभ्रमात असाल, तर फ्लोरल प्रिंटचा एका दुसऱ्या पेहरावासोबत वापर करून पाहा. जास्त आकर्षक दिसण्यासाठी फॅशनबाह्य ठरलेल्या प्रिंटसह दुसऱ्या प्रिंटचा वापर करा. आपल्या फ्लोरल पँट आणि टॉपमुळे एक वेगळा लुक तयार होईल व त्यामुळे तुम्ही जास्त आकर्षक दिसाल. छोटया आणि सूक्ष्म फ्लोरल प्रिंटसह त्याच आकाराच्या प्रिंटला मॅच करा. मोठया किंवा बोल्ड पॅटर्नसोबत मोठया व बोल्ड प्रिंटची निवड करा.

फ्लोरल हॅरम पँटने दाखवा खास अंदाज

या दिवसांत फ्लोरल हॅरम पँट खूप फॅशनमध्ये आहेत. गरमीच्या मोसमासाठी ही पँट कूल आणि आरामदायक आहे. जेव्हा यात फ्लोरल प्रिंट वापरली जाते, तेव्हा याचे आकर्षण अधिक द्विगुणित होते. जर आपण सडसडीत असाल, फ्लोरल पेहराव वापरून मिरवू शकता. प्रिंटेड हॅरमसह कोणत्याही सॉलिड कलरचा टॉप वापरा आणि आकर्षक लुक मिळवा.

फ्लोरल पँटसोबत बना फॅन्सी

जर आपण कंप्लीट लुकसाठी योग्य रंग आणि पॅटर्नची निवड केली असेल, तर फ्लोरल पँट खूप आकर्षक वाटू शकते. हलक्या सौम्य शेडच्या फ्लोरल पँटची निवड करा आणि यासोबत लांब टॉप वापरा. यासोबत पीप टो किंवा सॉफ्ट मॅटॅलिक कलरसुद्धा वापरू शकता.

आपला फ्लोरल लुक कंप्लीट करण्यासाठी ड्रेसला मॅचिंग फुलांच्या प्रिंटेड हेअर बँडचाही वापर करू शकता. हेअर एक्सेसरीची फॅशन दीर्घकाळ तशीच राहते.   मुली प्रिंटेड टर्बन नॉटवाल्या हेअर बँडमध्ये कूल आणि आकर्षक दिसतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें