मासिकपाळी कुप्रथांवर प्रश्नचिन्ह

* प्रेम बजाज

मासिकपाळी प्रजनन क्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे, ज्यामध्ये गर्भाशयातून रक्त योनीतून बाहेर पडतं. ही प्रक्रिया मुलींमध्ये जवळजवळ ११ ते १४ वर्षे वयापासून सुरू होते. ही नैसर्गिक प्रक्रिया तिला समाजात स्त्रीचा दर्जा देते.

मासिकपाळी मुलींसाठी एक अद्वितीय घटना आहे, जी जुन्या दंतकथांनी घेरलेली आहे आणि समाजाचे ठेकेदार मासिकपाळीतून जाणाऱ्या स्त्रिया व मुलींच्या आयुष्याचे सामाजिक व सांस्कृतिक पैलूतून बाहेर करतात, खरंतर याचवेळी त्यांना देखभालीची अधिक गरज असते. इजिप्त आणि ग्रीकच्या तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे की दर महिन्याला स्त्रीमध्ये सेक्षू अल डिझायरचं वादळ निर्माण होतं.

जेव्हा हे डिझायर पूर्ण होत नाही तेव्हा शरीरातून रक्त वाहतं आणि यालाच मासिकपाळी म्हटलं जातं. मासिकपाळीपूर्वी स्त्रीच्या मूडमध्ये बदल होतो. कधी कधी चिडचिडेपणा आणि शरीरातील कोणत्याही भागात असंख्य वेदना होतात. हे गरजेचं नाही की सर्व स्त्रियांसोबत असंच होतं. काही सामान्य तर काहींना असहनीय वेदना होतात. काहींचं म्हणणं आहे की हे सेक्सच्या वंचणेमुळे होतं. यामुळे आजदेखील काही लोकं मुलींना सांगतात की लग्नानंतर सर्व वेदना ठीक होतील.

विचित्र तर्क

भारतामध्ये याचा उल्लेख वर्जीत राहिला कारण हिंदू संस्कृतीनुसार याच्या मागे एक कथा प्रचलित आहे, ज्यामध्ये इंद्रदेवताकडून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. ज्याच्या पापाचा चौथा भाग स्त्रियांना देण्यात आला.

तर यामुळे त्यांना मासिकपाळी येते आणि यामध्ये त्यांना अपवित्र समजलं जातं म्हणून त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची मनाई केली जाते. तसंच दुसरं कारण हे मानलं जातं की हिंदू देवी देवतांचे मंत्र संस्कृतमध्ये आहेत. जे वाचण्यासाठी एकाग्रतेची गरज असते आणि मासिकपाळीमध्ये असहनीय वेदना झाल्यामुळे एकाग्रता होत नाही.

खरंतर हे ढोंग प्रत्येकवेळी स्त्रियांना याची जाणीव देण्यासाठी केलं जातं की त्या पापी आहेत आणि जोपर्यंत दानपुण्य धनाबरोबरच शरीराने देखील करतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल. या ढोंगीनी शारीरिक नैसर्गिक प्रक्रियेचा वापर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर केला आहे.

मासिकपाळीशी संबंधित जवळजवळ प्रत्येक जुनी गोष्ट बिनबुडाची आहे. मासिकपाळीमध्ये शहरी भागात मंदिर वा प्रामुख्याने गावामध्ये स्वयंपाक घरात जाण्यासदेखील मनाई आहे. त्याचं मुख्य कारण हे सांगितलं जातं की मासिकपाळीच्यावेळी शरीरातून खास गंध निघतो. ज्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना लोणचं इत्यादीला हात लावण्यासदेखील मनाई केली जाते. तर वैज्ञानिक परीक्षणमध्ये असं काहीच आढळलं नाही. यावेळी मंदिरामध्ये प्रवेश आणि यौन संबंध ठेवण्यास मनाई केली जाते.

बिनबुडाच्या गोष्टी

स्वामीनारायण संप्रदायने त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे की स्त्रियांनी या दिवसात या नियमांचे पालन का करायला हवं. त्यानुसार स्त्रिया अत्याधिक शारीरिक श्रम करतात ज्यामुळे त्या थकतात आणि या दिवसात त्यांच्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा येतो. त्यांना आराम मिळावा या हेतूने त्यांना वेगळं ठेवलं जातं. परंतु याचा अर्थ असा झाला की त्या घरातील सर्वात घाणेरडया खोलीत पडून राहाव्यात. मासिकपाळी एक शारीरिक प्रक्रिया आहे, जर हेच रक्त शरीराच्या आतमध्ये वाहिल्यास ती स्त्री पवित्र असते तर ते रक्त बाहेर आल्यास अपवित्र कशी? या सर्व गोष्टी बिनबुडाच्या आहेत.

मासिकपाळीच्या दरम्यान स्त्रियांची अवस्था ना रुग्णांसारखी होते, ना आपण त्यांच्यावर दया दाखवायला हवी. हे असं आहे जसं की प्रत्येक व्यक्ती रात्रीपर्यंत थकून झोपू इच्छिते. मासिकपाळी स्त्रियांच्या परीपूर्णतेची ओळख आहे.

मासिक पाळीवरील हवामानाचा प्रभाव

* जस्मिन वासुदेव, मार्केटिंग मॅनेजर, सॅनिटरी नॅपकिन्स नऊ

आपल्या सर्वांच्या मनात मासिक पाळीबाबत अनेक प्रश्न असतात. जसे की त्याचा कसा परिणाम होतो? त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो? आपल्या या चक्रात कसं तरी व्यत्यय आला तर?

हवामान तुमच्या मासिक पाळीत व्यत्यय आणू शकते? उत्तर होय आहे. हिवाळ्यात मासिक पाळीपूर्वीचा ताण आणि मासिक पाळी येण्याआधीचा ताण वाढू शकतो. हिवाळ्यातील पीरियड्स अनेकांसाठी अत्यंत वाईट असू शकतात. हिवाळ्यात अति थंडीमुळे महिला सहज आजारी पडू शकतात. बर्‍याच वेळा महिलांचा मूडदेखील तापमानाप्रमाणेच घसरत राहतो आणि असे दिसते की या हिवाळ्याच्या हंगामाचा त्यांच्या मासिक पाळीच्या चक्रावर खूप परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात मासिक पाळी येण्याच्या समस्यांबाबत महिलांची तक्रार असते. अशा परिस्थितीत बदलत्या हवामानासोबत काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला, हिवाळ्यात पीरियड्स सायकलमधील बदलांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया :

  1. पीरियड्स सायकलचा कालावधी

थंडीमुळे पीरियड्स सायकलच्या कालावधीवर परिणाम होतो. संप्रेरक स्राव वाढणे, ओव्हुलेशनची वारंवारता वाढणे आणि चक्र कमी होणे जेथे हिवाळ्याच्या तुलनेत ०.९ दिवस असते तर हिवाळ्यात चक्र थंडीमुळे बिघडते. या संशोधनानुसार, उन्हाळ्यात अंडाशय अधिक सक्रिय असते. हिवाळ्यात ओव्हुलेशन पातळी 97% वरून 71% पर्यंत कमी होते. मासिक पाळी लांबल्यामुळे आणि ओव्हुलेशन कमी झाल्यामुळे पीरियड्स हा त्रासदायक अनुभव असू शकतो.

  1. सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाश म्हणजेच सूर्यकिरण व्हिटॅमिन डी आणि डोपामाइन दोन्ही तयार करण्यात मदत करतात. त्यांच्याशिवाय, मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला जाणवणारा मूड स्विंग वाढू शकतो, ज्यावर मात करणे कठीण आहे. धूपामुळे आनंद, प्रेरणा आणि एकाग्रता वाढते. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील फॉलिक उत्तेजक हार्मोनचा स्राव वाढतो. हा हार्मोन शरीराला सामान्य बनवतो. स्त्रिया उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात जास्त ओव्हुलेशन करतात, ज्यामुळे त्यांची मासिक पाळी जास्त काळ टिकते.

  1. मासिक पाळीपूर्वीचे सिंड्रोम

प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी स्त्रियांमध्ये दिसणारे बदल किंवा लक्षणे, ज्यामध्ये स्त्रियांना चिडचिड, सूज येणे, चिंता आणि नैराश्य जाणवणे. हिवाळ्यात, स्त्रिया मुख्यतः घरीच असतात, ज्यामुळे त्यांना अधिक तटस्थ वाटते. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे म्हणजे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पीएमएस आणखी वाढतो. अशा वेळी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कॅल्शियम जास्त असलेले अन्न खाणे आणि नियमित व्यायाम केल्याने पीएमएसची लक्षणे सुधारू शकतात.

  1. मासिक पाळीत वेदना

हिवाळ्यात मासिक पाळीच्या वेदना अधिक वाढतात, कारण ते आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हिवाळ्यात वेदना अधिक होतात. यासाठी गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅड या वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.

  1. हार्मोनल असंतुलन

हिवाळ्यात होणारी आणखी एक समस्या म्हणजे हार्मोनल असंतुलन. थंड हवामानामुळे, हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाश असतो, कमी सूर्यप्रकाशामुळे अंतःस्रावी प्रणालीवर परिणाम होतोच, पण थायरॉईडचा वेगही मंदावतो. थायरॉईडमुळे चयापचय देखील मंदावतो. शरीर हवामानाशी जुळवून घेईपर्यंत हे आपल्या चयापचय आणि मासिक पाळीवर परिणाम करते. तुम्हाला मासिक पाळीत जास्त समस्या असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा एंडोक्राइनोलॉजिस्टला भेटा.

आपल्या वर्तनाचा, बदलांचा आपल्या मासिक पाळीवरही परिणाम होतो. हिवाळ्यात आपल्या व्यावहारिक जीवनात व्यायाम कमी करणे, जास्त चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ खाणे, जास्त मद्यपान करणे असे अनेक बदल दिसून येतात. या प्रकारच्या जीवनशैलीमुळे मासिक पाळीच्या वेदना वाढू शकतात आणि पीएमएस वाढू शकतो. मूड, चयापचय आणि मासिक पाळी हे सर्व ऋतूंच्या बदलानुसार बदलतात.

 

आरोग्य परामर्श

* डॉक्टर स्तुती मोदी, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच आयवीएफ एक्स्पर्ट, श्री मूलचंद हॉस्पिटल करणाल, हरियाणा

प्रश्न : माझ्या ओवरीत वारंवार सिस्ट बनतं. याचं कारण काय आहे आणि यामध्ये कॅन्सरचादेखील धोका संभवू शकतो का?

उत्तर : ओवरीमध्ये सिस्ट विविध कारणांनी बनू शकतो. मोनोपॉज याचं सर्वात प्रमुख कारण आहे. या व्यतिरिक्त पॉलिसीस्टिक ओवरी सिंड्रोम, एन्डो मॅट्रियोसिस, हार्मोन असंतुलन, क्रोनिक पेल्विक इन फ्लॅमेशन, ट्यूमर इत्यादीदेखील कारणं असू शकतात. सामान्य सिस्ट ज्याचा आकार ४ सेंटीमीटरपेक्षा कमी असतो, ते अनेकदा आपोआप कमी होतात. मोठया आणि गुंतागुंतीच्या सिस्टवर उपचाराची गरज असते. तसंही ओवेरियन सीस्ट कॅन्सरहित असतात, परंतु काही बाबतीत हे कॅन्सरयुक्तदेखील असू शकतात. खासकरून वाढत्या वयासोबत मेनोपॉजनंतर ज्या महिलांमध्ये ओवेरियन सीस्ट बनतं त्यामध्ये ओवेरियन कॅन्सरची शक्यता वाढू शकते.

प्रश्न : माझ्या वडिलांना लिव्हर आणि आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. मी असं ऐकलंय की हे पुढेदेखील कुटुंबात होऊ शकतं. माझं वय ३२ वर्षें आहे. यापासून वाचण्यासाठी मला कोणती काळजी घ्यायला हवी?

उत्तर : हे खरं आहे की अनुवंशिकता कॅन्सरचं प्रमुख रिस्पेक्टर मानलं जातं. जर तुमच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुमच्यासाठी हा धोका १२ ते १४ टक्के अधिक असतो. अशाच प्रकारे लिव्हर कॅन्सरमध्येदेखील अनुवंशिकता  महत्त्वाची भूमिका साकारते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही गरजेची पावलं उचलू शकता जसं की शारीरिकरित्या सक्रिय रहा, स्वत:चे वजन वाढू देऊ नका, दारूचे सेवन करू नका, मुलांना स्तनपान करा, गर्भ निरोधक गोळयांचे सेवन करू नका. खासकरून ३५ वर्षांनंतर मोनोपोज नंतर हार्मोन थेरपी घेऊ नका.

प्रश्न : फायब्रॉइड्सच्या सर्जरीनंतर हे पुन्हा होऊ शकतं का?

उत्तर : फायब्रॉइड्स गर्भाशयात विकसित होणाऱ्या कॅन्सर रहित पिंड आहेत जे याच्या भिंतीच्या मासपेशी आणि संयोजि टिशूपासून बनतात. यांना सर्जरीद्वारे काढले जाते. ज्याला मायोमेकटोमी म्हणतात. सर्जरीनंतरदेखील हे फायब्रॉईड्स पुन्हा विकसित होण्याची शक्यता २५ ते ३० टक्के असते. यापासून वाचण्यासाठी मीठ कमी खा, रक्तदाब नियंत्रणात ठेवा, व्यायाम करा, कमरेच्या आजूबाजूची चरबी वाढू देऊ नका, पोटॅशियमचे सेवन वाढवा.

प्रश्न : माझ्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. या दरम्यान माझा ३ वेळा गर्भपात झाला आहे. मी कधीच आई होऊ शकत नाही का?

उत्तर : वारंवार गर्भपात होण्याचा अर्थ वांझपणा नाही. तुम्ही आई बनू शकता. गर्भपात होण्याची अनेक कारणं असतात जसं की अनुवंशिक समस्या, हार्मोनल असंतुलन, संक्रमण, भ्रुण निर्माणमध्ये विकृती आणि इम्युनोलॉजिकल व पर्यावरणीय कारक. कारणांचा योग्य शोध घेऊन योग्य जीवन शैली स्वीकारून तसंच योग्य उपचारद्वारे तुम्ही आई बनू शकता.

प्रश्न : माझ्या कुटुंबात अर्ली मेनोपॉजची समस्या आहे. माझी आजी आणि आईला मेनोपॉज ४०व्या वर्षीच आला होता. मी करिअरमुळे आता फॅमिली प्लॅनिंग करत नाहीए. मी काय करू?

उत्तर : अर्ली मेनोपॉजमध्ये अनुवंशिकतेचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. मेनोपॉजच्या स्थितीत आल्यानंतर स्त्रियांना स्त्री बीज होऊ शकत नाही. यामुळे गर्भधारणा करणं असंभव होऊन जातं. अशावेळी तुम्ही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह तंत्रज्ञानचा(एआरटी)आधार घेऊ शकता वा मग आपलं बीज फ्रीज करू शकता, जे आयव्हीएफ करताना वापरलं  जातं.

प्रश्न : मला २ वर्षांची एक मुलगी आहे. मला आता ४-५ वर्षांत दुसरं मूल नको आहे. मुलांमध्ये अंतर राखण्याची सर्वात सुरक्षित पद्धत कोणती आहे?

उत्तर : मुलांमध्ये अंतर राखण्यासाठी अनेक गर्भनिरोधक गोळयांचं सेवन दररोज करावं लागतं. जेव्हा तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तेव्हा याचं सेवन बंद करा. व्हेजाइनल रींगचा वापरदेखील करता येतो. हे दर महिन्याला बदलावं लागतं. इंजेक्शन गर्भावस्था रोखण्यासाठी ९०-९५ टक्के सिद्ध आहे. हे इंजेक्शन दर तिसऱ्या महिन्यात घ्यावं लागतं. इंट्रा युटेराइन डिव्हायसेस (आययुडीएस)देखील येतं, जे दीर्घकाळपर्यंत काम करतं आणि त्याची खात्री ९९ टक्के आहे.

प्रश्न : मला वाटतं की माझी मासिकपाळी बंद होणार आहे. यामध्ये मला कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल?

उत्तर : मासिक पाळी बंद होणं म्हणजे मेनोपॉजनंतर तुम्हाला हॉट फ्लॅशेज आणि व्हेजाइनल ड्रायनेससारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हॉट फ्लॅशेजमुळे रात्री खूप घाम येण्याने तुमची झोपमोड होऊ शकते. व्हेजाइनल ड्रायनेसपासून वाचण्यासाठी तुम्ही वॉटर बेस्ड लुब्रिकंट्स वा व्हेजाइनल एस्ट्रोजन क्रीमचा वापर करू शकता. काही स्त्रियांमध्ये मूड स्विंग आणि वजन वाढण्यासारखी समस्यादेखील पाहायला मिळते. यापासून वाचण्यासाठी समतोल आणि पोषक आहाराचं सेवन करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें