जोडीदार

कथा * सावित्री शर्मा ’सवि’

‘‘तुला खायला नीट बनवताही येत नाही, दुसरं काय करणार?’’ असं म्हणत विभोरने खाण्याची ताटली उचलून फेकून दिली.

थरथर कापत वसु ताटलीकडे मूकपणे पाहत राहिली. एवढी ताकद वापरूनही ताटलीसोबतच तिची इज्जतही जमिनीवर लोळत होती.

वसुने आपल्या कुटुंबात असा अन्नाचा अपमान कधीच पाहिला नव्हता किंवा आपल्या वडिलांना आपल्या आईला असे वागवताना पाहिले नव्हते. आश्चर्याने आणि दु:खाने पापण्या ओल्या झाल्या. ओल्या पापण्या लपवून तिने तोंड फिरवले. मन ओरडू लागले, मीठ कमी असेल तर प्रश्न, त्यापेक्षा जास्त असेल तरीही मग प्रश्न. कोणते मापदंड आहे जे मोजेल. जर तिने ठरवले तर ती कोणालाही तक्रार करण्याची संधी देणार नाही. आता घर आणि ऑफिसचा समतोल साधताना वसुला थकवा जाणवू लागला. थकल्यासारखे असूनही ती विभोरचे आवडते पदार्थ मोठ्या आवडीने बनवायची.

तिचे प्रयत्न असायचे की कधीतरी ती विभोरच्या हृदयाला स्पर्श करेल. पण प्रत्येकवेळी तिच्या आशा धुळीस मिळायच्या.

पूर्वग्रहाने ग्रासलेला विभोर आपले प्रयत्न हाणून पाडत आहे, असे वसुला वाटू लागले. जेव्हा जेव्हा ती समजावण्याचा प्रयत्न करायची तेव्हा टीव्हीवर बाबांनी दाखवलेली शिकवण विभोरच्या मनावर कायम राहायची आणि तो त्या परिघापासून एक इंचही दूर जात नसे. जेव्हा एखादी धारणा मनोविकृतीचे रूप घेते तेव्हा ती सोडणे सहज सोपे नसते. विभोरच्या बाबतीतही असेच घडत होते. समाजव्यवस्थेत ज्यामध्ये स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आणि पुरुषाची गुलाम म्हणून मानली जाते. ही गोष्ट विभोरच्या मनात खोलवर रुजली होती. तो यापलीकडे जायला किंवा काही समजायला तयार नव्हता.

नवऱ्याने फेकलेली इडली-सांबराची ताटली उचलताना वसु खूप विचार करत होती. अंतर्गत संघर्षाने तिचे मन अस्वस्थ झाले होते. काही बोलण्यासाठी ओरडण्याची गरज नाही. प्रेमळ शब्दांनी सोडवलेले प्रश्न योग्य परिणाम देतात.

जर मनाच्या कोपऱ्यात थोडीजरी जागा असेल, तर माणूस जे काही बोलतो ते प्रेमाने किंवा समजून घेण्यासाठी असते, अपमानासाठी नाही. वसुला असे वाटायचे की विभोर तिचा अपमान करण्याचे निमित्त शोधत आहे आणि वसु या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत राहत. सर्व काही ओरडूनच का सांगायचे? आज तिने विभोरशी बोलायचं ठरवलं. आयुष्य असे जगता येत नाही. ‘‘विभोर, मला तुम्हाला काही सांगायचे आहे,’’ वसुने विचारले.

‘‘सांग.’’

विभोरच्या आवाजात विनाकारण राग होता, तरीही वसु स्वत:ला नॉर्मल करत म्हणाली, ‘‘तुम्ही म्हणता तसं मी करायचा प्रयत्न करते. ऑफिसमधून बाहेर पडण्याआधी सगळी कामं पूर्ण करते आणि परत आल्यावर पूर्ण करते, पण तुमच्या तक्रारी काही कमीच होत नाहीत.’’

‘‘तुझ्या कामांनी मी दु:खी झालो आहे. तू एकही काम नीट करत नाहीस आणि तू जे घरचे काम करत आहेस ते काही उपकार नाही, ते तुलाच करायचे आहे. आदरणीय नीमा बाबा म्हणत होते ते ऐकले नाही का नवऱ्याची सेवा करणे, हा स्त्रियांचा धर्म आहे आणि घर सुरळीत चालवणे हे तुमचे कर्तव्य आहे. कुटुंबातील कोणालाही तक्रार करण्याची संधी मिळू नये… आणि ना की घराबाहेर काम करणे.’’

‘‘आणि पुरुषांची कर्तव्ये काय आहेत? हे पण सांगा, विभोर.’’

‘‘तू फक्त प्रत्येक गोष्टीवर वाद घालतेस. मी जे बोलतो ते तू काही ऐकत नाही; तरीही मी तुझ्याशी प्रेमाने बोलावे असे तुला वाटते,’’ विभोर उपेक्षित शब्दांत उपदेश देऊन निघून गेला.

वसुचे पुढचे शब्द तिच्या तोंडातच राहिले, किती आत्मविश्वासाने तिने आज समजावण्याचा प्रयत्न केला होता.

दु:खाची व्याख्या फक्त भाजीत मीठ कमी किंवा जास्त असते एवढ्यापुरती मर्यादित आहे का, असा विचार वसु करू लागली. माणूस दु:खी झाला तर त्याला वेदना होतात, इथे तर असे वाटतंय की जणू ते दु:खाचे उत्सव साजरे करत आहेत. हे खूप विचित्र वागणं आहे आणि हे लोक जे प्रवचन देत राहतात, रोज नवनवीन बाबा, भोंदूबाबा, कधी मंडपात, कधी व्हिडीओ बनवतात, त्यांचे एकच मत आहे – महिलांना कैद करा.

जर तुम्ही स्वत:च्या इच्छेने एक श्वासही घेऊ शकत नसाल तर मग काय बाकीचे सर्व विषय संपल्यातच जमा चर्चादेखील फक्त महिला विरोधी. तसे, देवीच्या नावाचा गौरव करताना थकत नाही.

वसुला असे वाटायचे की काश! ती आपल्या नवऱ्याला समजावू शकली असती. निराश होऊन ती स्वत:लाच समजावत. शेवटी निवड तिचीच होती. पप्पा म्हणाले होते, ‘‘बेटा, हे बघ, विभोरचे वडील नाहीत. आयुष्यात खूप अडचणी असतील, त्या लोकांना तुझे ऑफिसमध्ये काम करणे आवडत नाही, तरीही मी त्यांना समजावले आहे. पुढे तुलाच सांभाळायचे आहे.’’

‘‘पप्पा, मला पैशाची लालसा नाही. तुम्हालाही माहीती आहे की तुमच्याकडे समजूतदार आणि सुसंवादी जोडीदार असेल तर आयुष्य आनंदाने भरून जाते.’’ मग आदर्श विचारांनी भरलेली ती, विभोरला न पाहताच त्याच्या प्रेमात पडली होती आणि तिने मनात विचार केला, जर त्याला वडील नसतील तर त्याला आयुष्य समजलेच असेल. तो समजूतदार माणूस असावा. अडचणी माणसाला अनुभवी बनवतात.

पप्पांनी पुन्हा एकदा म्हटले की बेटा, पुन्हा विचार कर. आणखी काही स्थळं आहेत. पण भावूक झालेल्या वसुने आपले हृदय विभोरच्या स्वाधीन केले आणि नंतर दोघांनी लग्न केले. तेव्हा कोणास ठाऊक होते की एकविसाव्या शतकातही स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात कोणी इतके असू शकते. सकाळ-संध्याकाळ टीव्हीवर दिसणारे बाबा ऐकल्याने मानसिक विकार पाळू शकतो. आपला वेळ व्यायाम इत्यादीसाठी देण्याऐवजी तो अशा प्रकारे नष्ट करू शकतो. कोणी वयस्कर असेल तर एकवेळ समजूही शकतो. अशाप्रकारे काम सोडून, निरुपयोगी होऊन निरर्थक गोष्टींवर वेळ वाया घालवणे हे वसुला मूर्खपणाचे वाटले.

सुशिक्षित विभोरचे बाबांचे प्रवचन ऐकणे, हे वसुलाही आश्चर्यकारक वाटायचे. आजच्या काळात जेव्हा एका स्त्रीच्या आर्थिक पाठिंब्याशिवाय घर सुरळीत चालणे शक्य नाही तेव्हा या गोष्टी पुरुषाच्या आजारी मानसिकतेचा किंवा आजारी अहंकाराचाच भाग आहेत.

सुरुवातीला वसुने विचार केला की ती शांत राहिली तर विभोरचा राग कमी होईल. पण वसुचा शांत आणि सौम्य स्वभावही विभोरमध्ये काही बदल घडवून आणू शकला नाही.

दररोज ती स्वत: आणि विभोरमध्ये प्रेमाचे बंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे; पण विभोर दगडासारखा त्याच्या मतांवर ठाम असायचा. वसु ऑफिसला जाण्याआधी सगळी कामं उरकून घेत असे आणि विभोर रोज टीव्हीवरच्या नवनवीन बाबांचे निरर्थक बोलणे, लक्ष देऊन ऐकत असे, जे त्याच्या मनावर बिंबवले गेले असायचे आणि त्याच्या पुरुषी अहंकाराला पोषक असे. प्रत्येक बाबतीत तो ऐकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करत असे. कधी-कधी वसुने त्याला काही करायला सांगितले तरी तो रागाने ओरडून तिचा अपमान करायचा. आज वसु सकाळी लवकर उठली. तिला ऑफिसला लवकर जायचे होते. तिने स्वत:सोबत सर्वांसाठी चहा बनवला आणि विभोरला देत म्हणाली, ‘‘विभोर, मी ताईंसाठीही चहा बनवला आहे. मी अंघोळ करायला जात आहे. मला आज लवकर ऑफिसला जायचे आहे. ताई उठल्यावर, तुम्ही ती गरम करून त्यांना द्या.’’

वसुची नणंदही तिच्या लहान मुलासोबत राहायला आली होती.

हे ऐकून विभोरचा मूड बिघडला. तो ओरडला, ‘‘वसु, आईकडे दुर्लक्ष करतेय हे मला दिसतंय. तू आईचा नाश्ता बनवून कॅसरोलमध्ये ठेवशील आणि आज तुला सुट्टी घ्यायला हवी होती, सुमन आली आहे.’’

‘‘मी संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करेन, विभोर, पण मी सुट्टी घेऊ शकत नाही. माझे प्रमोशन बाकी आहे आणि विभोर, तुम्ही का ओरडत आहात? तुम्ही शांतपणेही सांगू शकता. जेव्हा तुम्ही ओरडता ते चांगलं नाही वाटत, तेही सर्वांसमोर.’’

‘‘का? सगळ्यांसमोर हा काय विषय आहे? इथे बाहेरचा कोण आहे? माझी आई आहे, माझे भाऊ-बहीण आहेत.’’

‘‘नाही, विभोर बोलायची पद्धत आहे, या विषयावर विचार करा,’’ असं म्हणत वसु ऑफिसला निघून गेली.

वसु ऑफिसला निघाली की विभोर तिला काही ना काही काम नक्की सांगत असे. वसुला ते करावे लागे, ज्यामुळे तिला अनेकदा ऑफिसला जायला उशीर व्हायचा आणि मग तिला बॉसचा ओरडा पडत.

वसुचा नेहमी प्रयत्न असे की ती गोष्ट समजावून सांगून मिटवायचा, तशीही ती नेहमी हसतमुख राहायची. तिला वाटायचं, कदाचित वडिलांच्या अकाली निधनामुळे चिडचिड होत असेल, प्रेमाने हळूहळू सगळं सुरळीत होईल. आशेचा किरण तिच्या ओठांवर हास्य पसरवत असे. काहीही झालं तरी वसु कधीच तोंड फुलवून फिरत नसे. मात्र या प्रयत्नांदरम्यान विभोरची महिलांबद्दलची अवहेलना त्यांच्या नात्यात विष कालवत होती.

मार्च महिना होता. काम खूप जास्तच असते. रात्रीचे ८ वाजले होते, वसु लवकर काम उरकण्यात व्यस्त होती तेवढ्यात फोन वाजला.

‘‘काय झालं, अजून घरी पोचली नाहीस?’’ विभोर कठोर आवाजात बोलला.

‘‘बस विभोर मी निघतेच आहे.’’

‘‘काय हे आठ वाजताही तू ऑफिसमध्येच? जेवणाची वेळ झाली आहे, कधी होईल जेवण? मी काही करणार नाही, लवकर घरी ये.’’

‘‘मी बाहेरून ऑर्डर करते.’’

‘‘नाही, आम्ही बाहेरचे काहीही खाणार नाही. तू निघ आता, येऊन बनव,’’ असं म्हणत विभोर फोनवरच ओरडला.

वसुने आजूबाजूला पाहिलं, तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने विभोरचा आवाज ऐकला होता. वसुच्या डोळ्यांत अपमानाचे अश्रू तरळले. विभोर त्याला हवे तेव्हा बाहेरून जेवण मागवायचा, पण वसुने त्याला तसे करायला सांगितले तर तो कधीच ऑर्डर करत नसे.

थकलेला वसु घरात शिरली तेव्हा सगळे निवांत बसून बाबांचे प्रवचन टीव्हीवर ऐकत होते. ती आत शिरताच सर्वांनी तिच्याकडे उदासीन नजरेने पाहिले जणू ती बाहेरून फिरून येत आहे. मग पुन्हा टीव्ही बघू लागले, ज्यात अनेकदा चर्चा होत असे की आजकाल या बायका घराबाहेर कामाला जातात हे फक्त एक निमित्त आहे. जेणेकरून त्या मोकळेपणाने फिरू शकतील आणि काम टाळून फॅशन करू शकतील. म्हणून कामाच्या बहाण्याने बाहेर पडतात. या सर्व गोष्टी ऐकून विभोर वसुच्या नोकरी करण्यावर चिडत असे.

आज विभोरचा मूड गगनाला भिडला होता कारण त्याची बहीण आली होती. वसुने लॅपटॉपची बॅग ठेवली आणि पटकन हात धुवून चहाचे आधन ठेवले. थकवा एवढा होता की जेवण बनवायची हिंमत होत नव्हती. पण बनवायचे तर होते. चहा प्यायल्यावर वसुला जरा फ्रेश वाटत असे. मग तिने विचार केला की कोणाला चहा हवा असेल तर सर्वांना विचारून येऊ.

‘‘आई, विभोर, दीदी तुम्ही चहा घेणार का? मी स्वत:साठी बनवत आहे,’’ तिने विचारले.

‘‘अरे, संध्याकाळचे ७ वाजलेत, ही वेळ आहे का चहा प्यायची? पटकन जेवण बनव आणि हो, आईने अजून औषध घेतले नाही, ते पण घेऊन ये,’’ विभोर म्हणाला.

थकवा आणि तिच्या नवऱ्याच्या कमांडिंग आवाजाने वसुला तोडले. तिला माहित होते की नवऱ्याला नाही वाटत की तिने ऑफिसमध्ये काम करावे. त्याच्या मते स्त्रीने फक्त घरीच काम केले पाहिजे. बाहेर गेल्यावर ती स्वच्छंद होईल. वसु गप्पच राहिली. कोणत्याही परिस्थितीत नोकरी सोडायची नाही हे तिला माहीत होते. तिने आईसाठी औषध आणि पाणी आणून दिले. मग चहा करता-करता जेवणाच्या तयारीला लागली. आता हे प्रकरण वाढवणे तिला योग्य वाटले नाही. शारीरिक थकवा आणि विभोरचे विचार मनाला अस्वस्थ करत होते.

काळ आपल्या गतीने पुढे जाऊ लागला. वसु शांत राहण्याचा प्रयत्न करायची आणि हसत हसत सगळ्यांना उत्तर देत असे. जेव्हा कधी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटायचे, न जाणे का विभोर विचित्र प्रतिक्रिया द्यायचा आणि अनेकदा उद्धटपणाच्या नावाने तिला विभूषित करत. आज वसु स्वयंपाक करताना गुणगुणायला लागली, गाणी गाताना वसुचा कंटाळाही जात असे आणि मनही हलकं होत असे.

हे एकून विभोर म्हणाला, ‘‘आई, पाहिलंस किती उद्धट आहे! आत्ताच तिला ओरडा पडला आणि आता गात आहे. काही आदरच नाही.’’

वास्तविक, काही वेळापूर्वी विभोर तिच्यावर कपड्यांसाठी ओरडला होता, त्याला तोच शर्ट घालायचा होता जो मळलेला होता. वसु फद्मस्रद्य रविवारीच वॉशिंग मशीन लावायची.

वसुने ते ऐकले. किचनमधून येत म्हणाली, ‘‘मी काय तोंड पाडून फिरत राहू. तुम्हाला तेही आवडणार नाही.’’

असेही तिन्ही भावंडांमध्ये सर्वात लहान असलेली वसु ही खेळकर, आनंदी मुलगी होती.

लग्नाला ४ वर्षे उलटूनही विभोरमध्ये कोणताही बदल झाला नाही. आता वसुला वाटू लागले की तिच्याकडून काही चूक तर नाही ना झाली. वडिलांच्या अनुपस्थितीने विभोरला सभ्य आणि जबाबदार बनवले असेल असे तिला वाटले होते, पण वसुचे विचार तिला चुकीचे ठरवत होते.

सुट्टीचा दिवस होता, सासुचा पाय दुखत होता. काही वेळाने विभोर आला आणि येताच म्हणाला, ‘‘अरे वसु, तू आईसमोर डोक्यावर पदर नाही घेतलास? डोकं टेकवून सासुचे पाय दाबत असलेल्या, तल्लीन झालेल्या वसुला हेसुद्धा कळले नाही की विभोर ऑफिसमधून कधी आला आणि न जाणे कधी तिचा पदर डोक्यावरून निसटला.’’

अचानक विभोरने वसुच्या गालावर जोरात थोबाडीत मारली. वसु कळवळली. ‘‘मी २ मिनिटात तुझा उद्धटपणा ठीक करेन. आईसमोर डोक्यावर पदर नाही, एवढी छोटीशी गोष्टही सांगावी लागेल.’’

वसुने नवऱ्याकडे प्रश्नार्थक-आश्चर्य मिश्रित नजरेने पाहिले. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर डोक्यावरील पदराबद्दल बोलले गेले आहे, जे यापूर्वी कधीच बोलले गेले नव्हते. ती स्वत: पदर डोक्यावर ठेवत होती आणि जरी तो पदर निसटला म्हणून त्यासाठी थोबाडीत! तिचे संपूर्ण अस्तित्व डळमळीत झालं होतं.

दु:ख गिळत वसुने सासुकडे पाहिले, कदाचित सासू म्हणेल की ती सेवा करतेय, डोक्यावरून पदर निसटला तर त्यात एवढं काय? पण तिथे शांतता पसरली होती. असे वाटत होते की सासू तिथे नाहीच. वसुला इतक्या परकेपणाची अपेक्षा नव्हती.

तिच्या गालावरील बोटांचे ठसे तिच्या हृदयावर उमटलेले दिसले. ती शांतपणे उठून तिच्या खोलीत आली. आज तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसत होते.

वसुच्या मनाने बंड केला की विभोरला काहीच का समजून घ्यायचे नाही. त्याहून वाईट वाटले ते सासुचे गप्प बसणे. वडिलधाऱ्यांनी पहिल्यांदा समजावून सांगितल्यास कदाचित भविष्यात मुलं चुका करत नाहीत. वसुच्या लक्षात आले की आई विभोरला कोणत्याही गोष्टीवर कधीच काही बोलत नाही. हे तिच्यासाठी थोडे विचित्र होते.

दुसऱ्या दिवशी वसु आईशी बोलली, ‘‘आई, काल जेव्हा विभोरने थोबाडीत मारली तेव्हा तुम्ही काहीच का बोलला नाहीत? हे वागणं योग्य होतं का?’’

आईने अगदी स्पष्ट आणि उदासीनपणे उत्तर दिले, ‘‘वसु, मी कधीच कोणाला काही बोलत नाही. त्याचे वडील होते, त्यांनाही कधीच काही बोलले नाही.’’

कदाचित आईलाही कधी बोलता आले नसेल. आता वसुलाच काहीतरी विचार करायचा होता. असे जीवन जगणे कठीण आहे.

‘‘आई, मी काही दिवसांसाठी माझ्या माहेरी जाणार आहे. कृपया विभोरला कळवा.’’

‘‘बेटा, तूच विभोरला सांग,’’ आई म्हणाली, म्हणून वसुने इच्छा नसतानाही विभोरला फोन केला. विभोर कार्यालयात होता. एकदा उचलला नाही तर पुन्हा फोन डायल केला.

काहीही न ऐकता विभोर ओरडू लागला, ‘‘एवढं काय संकट कोसळलं होतं की पुन्हा फोन डायल केला?’’

वसु अगदी शांत आवाजात म्हणाली, ‘‘मी माझ्या माहेरी जात आहे,’’ विभोर काही बोलायच्या आधीच वसुने फोन कट केला. विभोर सवयीने ओरडणार हे वसुला माहीत होते.

कोणतीही प्रतिक्रिया न देता वसु तिच्या माहेरी आली. आत्तापर्यंत वसु सांभाळत असलेली विभोरच्या घरची व्यवस्थाच ढासळू लागली.

‘‘विभोर, माझे औषध संपले.’’

‘‘ठीक आहे, आई.’’

‘‘आणि स्वयंपाकघरातील वस्तू आणि फळेही संपली आहेत,’’ आई हळूच म्हणाली. आत्तापर्यंत सर्व वसु करत होती, हे तिला माहीत होतं. कसे तरी इतके दिवस मोलकरणीच्या मदतीने काढले. वसु गेल्यावर विभोरने वसुला फोन केला नाही. तिने स्वत:च परत यावे असे त्याला अहंकाराने वाटत होते. परंतु आता वसुला विभोरला समजवायचं होतं.

एके दिवशी संध्याकाळी विभोर ऑफिसमधून परतल्यावर बेडवर झोपला. आईने कपाळाला हात लावला तर खूप ताप होता. त्याचे संपूर्ण शरीर तापाने फणफणत होते. त्याची तब्येत बिघडल्याने समस्या वाढू लागल्या.

आज विभोरला वसुची खूप आठवण येत होती. मागच्यावेळी विभोर आजारी पडल्यावर किती सेवा केली होती. तिचे रात्रभर जागणे, ताजा ज्यूस देणे. पण त्याने कधीच वसुचा आदर केला नाही. आता त्याला स्वत:चाच राग आला होता. सर्व काही त्याला अस्वस्थ करत होते.

एकदा बोलण्यासाठी विभोरने फोन उचलला, मग त्याचा इगो समोर आला आणि त्याने न बोलता फोन ठेवून दिला.

दुसऱ्या दिवशी आई म्हणाली, ‘‘बेटा, वसुला घेऊन ये, मीसुद्धा आता तुझी काळजी घेऊ शकत नाही. मी म्हातारी झाली आहे. संधिवाताचा त्रास मला होतो. ती वसु होती जी माझी लसणीच्या तेलाने मालिश करायची म्हणून चालू शकत होते.’’

विभोर काही न बोलता डोके टेकवून बसला होता. त्याचे मनही वसुप्रति आपल्या वागण्याला धिक्कारत होते.

‘‘तू असं डोके झाकवून का बसला आहेस? आज मी विचार करतेय की मी पहिल्यांदा तुला थांबवलं असतं तर कदाचित हे दिवस बघावे लागले नसते,’’ आई जरा चढया आवाजात म्हणाली.

विभोरच्या डोळ्यांसमोर वसुचा निरागस चेहरा तरळत होता. सदैव हसणारी वसु मौन धारण करून उदास राहू लागली होती… तिच्या गैरहजेरीत त्याला याची जाणीव होत होती.

‘‘चल उठ, पुरे झाले. घरची लक्ष्मी परत घेऊन ये. मलाही तिची माफी मागावी लागेल. मीही योग्य गोष्टीची साथ दिली नाही,’’ आई म्हणाली.

विभोरचे डोळे चमकले. खऱ्या दृष्टीने आज तो त्याच्या जोडीदाराला घ्यायला जाणार होता. विभोरने फोन न करता सरप्राईज देण्याचा विचार केला. वसु माहेरी ऑफिसमधून येऊन बागेत चहा पित होती. विभोरला गेटवर उभं बघून तिच्या मनाला आनंद झाला; पण मनात शंकांचे ढग दाटून आले की जर मला घेऊन गेले आणि पूर्वीसारखे वागले तर?

विभोरच्या आवाजाने वसु भानावर आली, ‘‘वसु, तू मला आत यायला सांगणार नाहीस का?’’ आज विभोरच्या आवाजात राग नव्हता तर प्रेम होते.

‘‘हो, विभोर आत या.’’

आत आल्यावर विभोर वसुला म्हणाला, ‘‘वसु, मी वचन देतो, मी यापुढे तुझा अपमान करणार नाही, मी यापुढे टीव्हीवर फालतू गोष्टी पाहणार नाही, खरं तर तू माझी चांगली अर्धांगिनी आहेस. माझ्या बरोबरीची आहेस,’’ आणि विभोरने वसुसमोर हात जोडले.

वसु गंभीर आणि शांत आवाजात म्हणाली, ‘‘येईन मी पण एक अट आहे.’’

‘‘हो, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत,’’ विभोर अधीरतेने म्हणाला.

‘‘नाही, आधी ऐका. विभोर, मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा तिला नवीन घर, नवीन वातावरण आणि सगळ्यांशी जुळवून घेणं खूप अवघड जातं… तुम्हाला याचा अनुभव नाही म्हणून तुम्ही एक महिना माझ्या माहेरी राहा. आपण दोघे इथूनच ऑफिसला जाऊ… मग मी तुमच्यासोबत येईन.’’

विभोरने होकारार्थी मान हलवली. भावी जीवनाचा पाया परिपक्व होण्यासाठी सज्ज होता. अंगणात गंधराजाचा हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता.

अरविंद आणि अनीता

कथा * रुचि गोनटिया

‘‘हॅलो… हा ऐक.’’

‘‘हा बोल.’’

‘‘मिरवणूक मोठ्या थाटामाटात रवाना झाली आहे.’’

‘‘काय? जरा जोरात बोल, मला काहीचं ऐकू येत नाहीय.’’

‘‘अरे, मी म्हणतोय की लग्नाची मिरवणूक निघाली आहे.’’

‘‘अच्छा, इतक्या गोंगाटात तुझा आवाज नीट ऐकू येत नव्हता.’’

‘‘येथे प्रत्येकजण खूप मजा करत आहे. प्रत्येकजण बँडवाल्याना आपापल्या आवडीचं गाणं वाजवण्यासाठी आग्रह करत आहेत.’’

तेवढ्यातच घोड्यावर स्वार झालेल्या वरराजाचा फोन कोणीतरी हिसकावून घेतला.

‘‘हॅलो, मी सविता वहिनी बोलतेय. अगं जाऊबाई, आज तरी माझ्या दिराला सोड. मग उद्यापासून तो फक्त तुझाच असणार आहे. लवकरचं भेटू. बाय.’’

‘‘अरविंद दादा, हे घ्या सांभाळा तुमच्या खोडकर चिकूला आणि हा फोन आता तुमच्या भावाकडूनच परत घ्या. आम्हाला सगळ्यांना सेलेब्रेट करताना जरा बघा… त्यानंतर तर तुमचाच ढोल वाजणार आहे,’’ सविता वहिनी आज वेगळ्याच मूडमध्ये होती.

ती मनापासून खुश या कारणासाठी होती कि, तिने तिच्या लग्नात घातलेला ९ किलोग्रॅमचा लेहेंगा आजही अल्टर न करता तिला व्यवस्थित झाला होता. ती या सगळ्या जमावात पण आज एखाद्या नवरीपेक्षा कमी भासत नव्हती. ती आपल्या ४ वर्षाच्या मुलाला दीर स्वार असलेल्या घोड्यावर बसवून ठुमकत ठुमकत त्यांचा फोन घेऊन पसार झाली.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचं एकत्र उत्साह पाहून स्मितहास्य करत अरविंद सुखावला.

‘‘चिकू, तुला माहीत आहे का आज काय आहे?’’

‘‘आज माझे लग्न आहे,’’ चिकू आपल्या काकांना म्हणाला.

‘‘चिकू, आज माझं लग्न आहे, तुझं नाही.’’

‘‘नाही, माझं आहे… आईला विचारा…’’ असं म्हणत चिकू रडवेला झाला

‘‘ठीक आहे, ठीक आहे, तुझे लग्न आहे, बसं. आता हस बघू.’’

मोठ्या मुश्किलीने चिकूचा मूड ठीक झाला आणि बँडवाल्यांनी ‘आज मेरे यार कि शादी है…’ गाणं वाजवायला सुरवात केली.

हे गाणं ऐकून अरविंदचे सगळे मित्र जोरदार नाचू लागले आणि तोच व्हिडीओवाला त्या सगळ्यांचे हावभाव शूट करण्यात मनापासून व्यस्त झाला.

‘दीदी तेरा देवर दिवाना…’ या गाण्याच्या ठेक्यावर रोजच्या धकाधकीच्या जीवनात, सतत कामात व्यस्त आणि कंटाळलेल्या सगळ्या वहिनींनी आपापल्या सासवांना नजर अंदाज करत, साडी कमरेत खोचून ठुमक्यांवर ठुमके मारायला सुरवात केली. तसेच ‘मेहेंदी लगा के रखना…’ या गाण्यावर सर्व नवीजुनी जोडपी रोमँटिक अंदाजात थिरकू लागली.

पण प्रत्येक गाण्यावर लहान मुलांच्या थिरकण्याला कोणाचीच तोड नव्हती. ते लहान लहान हिरो एखादं गाणं वाजलं नाही कि, लगेचच कोणताही ताळमेळ न साधता आपल्या पूर्ण ताकदीनिशी हातपाय हलवू लागायचे. या सगळ्यांचा हर्षोल्हास पाहून घोड्यावर बसलेले दोन्ही वर अरविंद आणि चिकूला खूप मजा वाटत होती. अरविंदची छोटी आत्या पाठी गर्दीसोबत हळूहळू लपून चालत नवऱ्याच्या वडिलांना म्हणजेच आपल्या भावाला शोधून खेचत सगळ्यांच्या मध्ये घेऊन आली.

ते नाही नाही करत राहिले, पण सगळ्यांच्या जिद्दीसमोर कधी न ठुमकणारे त्याचे वडील दोन्ही हात वर करून जेव्हा बेफिकीरपणे गोलगोल फिरताना अरविंदने पाहिले तेव्हा तो भावुक झाला.

व्हिडीओवाला या सुंदर क्षणांना त्याच्या कॅमेरात कैद करण्यात यशस्वी झाला.

वरातीत सगळ्यात पुढे बाल कलाकार व युवावर्ग, त्यांच्यामागे बँडवाले, त्यांच्या पाठी घोड्यावर बसलेले अरविंद आणि चिकू, त्यांच्या मागे वरातीसोबत चालत येणारे ५० वर्षांवरील लोकं आणि त्यांच्या पाठी एक व्हीआयपी गाडी जिच्यात काकी आणि मोठे काका ज्यांना शुगर तर आधीपासूनच होती आणि त्यात हल्लीचं गुडघ्यांच्या झालेल्या ऑपेरेशनचं दुखणं. उफ्फ, कुठे कोणाला एवढा त्रास आहे कि, प्रतिस्पर्धा करत आरामात आतमध्ये बसून होते.

‘‘अरे पिंकी, रिंकू कुठे राहिलातं? वरात दारात आली आहे. जरा अनुला बघून या, ती तयार झाली कि नाही ते…’’ वधूची आई सुषमा हिने काळजीच्या स्वरात आपल्या दोन्ही भाच्यांना विचारलं.

त्या डोक्यापासून पायापर्यंत रंगीत चमकणारे कपडे घालून, आपापला घागरा अगदी हळुवारपणे काही इंच वर करून, सोनेरी रंगाच्या सँडलचा टकटक आवाज करत आपल्या दिदीच्या रूमच्या दिशेने जाऊ लागल्या.

‘‘अनीता दिदी तू तयार झालीस का?’’ आत बसलेल्या अनीताच्या कानावर पिंकी आणि रिकूंचा कोमल स्वर पडला.

‘‘हा, एक मिनिट थांबा. फोटोग्राफर फोटो काढत आहे.’’

‘‘दिदी, आम्हाला पण बघायचे आहेत, आम्हाला पण बघायचे आहेत,’’ त्या आनंदाने उड्या मारत म्हणू लागल्या.

‘‘दादा, जरा दरवाजा उघडून त्यांना आतमध्ये घ्या.’’

कधी खुर्चीवर बसून, कधी इकडे तिकडे बघत, तर कधी गजरा पकडून मेहेंदीकडे पाहत. अनीताला स्मितहास्य करत पोज देताना पाहून पिंकी रिंकूसुद्धा आपापल्या लग्नाची स्वप्न पाहू लागल्या.

‘‘तुम्ही काही कामानिमित्त आला होतात का?’’ अनीताने तिचे फोटो सेशन चालू असताना विचारले.

‘‘अगं हा दिदी, वरात आली आहे, हेच सांगायला आम्ही आलो होतो.’’

‘‘उफ्फ, एवढा वेळ होऊन गेला, तरी का नाही सांगितलंत? दादा, तुम्ही आटपा, बसं झालं आता,’’ अनीता स्वत:ला आरशात पाहत घाईघाईत आपली ओढणी आणि मेकअप नीट करू लागली.

बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोठावत म्हणाले, ‘‘दिदी आवर लवकर…भाओजी स्टेजवर पोहोचले आहेत…’’

‘‘हा झालंच, चला…’’ लाजणारी आणि घाबरलेली अनीता राहून राहून आपल्या मैत्रिणींना एकचं प्रश्न विचारत होती. ‘‘मी चांगली तर दिसतेय ना? मी चांगली तर दिसतेय ना?’’

२-४ वेळा, ‘‘हो तू खूप सुंदर दिसत आहेस…’’ हे ऐकल्यावर अचानक अनीताचा आत्मविश्वास वाढला.

अनीताच्या मैत्रिणी आणि बहीणभाऊ मोठ्या प्रेमाने हळूहळू तिला मोकळ्या आकाशाच्या खाली असलेल्या हिरव्या लॉनमध्ये, संथ वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यात, रेड कारपेट वरून चालत, फुलांनी सजलेल्या स्टेजवळ घेऊन जाऊ लागले.

इतक्यातच डीजेवाल्या बाबूंनी त्यांना येताना पाहून लगेचच चालू गाणं चेंज करत, ‘बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है….’’ हे गाणं लावलं.

हे गाणं ऐकून लगेचच वर आणि वधू दोन्ही पक्षांचे फोटोग्राफर अरविंदाला एकट्याला सोडून अनीताच्या दिशेने धावले.

एक तिला हळूहळू चाला, असं म्हणू लागला, तर दुसरा थोडं वर बघा, अजून थोडं वर… हा बसबस.. थोडं खाली… असं सांगू लागला.

मुलीचे वडील केशवजी लांबूनच आपल्याला मुलीला नवरीच्या रूपात सजलेले पाहून आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकले नाहीत आणि ते आपल्या हृदयावर हात ठेवून एकदम खुर्चीवर बसले.

‘माझी मुलगी एवढीशी होती. कशी इतक्या लवकर मोठी झाली. आज बापाचं अंगण सोडून तिच्या नवऱ्याच्या घरी निघून जाईल माझी मुलगी,’’ मनातल्या मनात हा विचार करून ते रडवेले झाले.

आपल्या लाडक्या अनुला आज असं पाहून नक्कीच यांची अवस्था अशी होणारच आहे, हे त्यांच्या पत्नीला खूप आधीपासून माहित होतं.

‘‘तुम्ही स्वत:ला सांभाळा. याचं शहरात तर तिची पाठवणी होणार आहे. बघा तुम्ही, तिचा एक पाय माहेरी आणि दुसरा सासरी असेल,’’ सुषमाजी त्यांच्या खांद्याला धीराची थाप मारत बोलू लागल्या.

‘आज तुझ्या वडिलांना माझा प्रणाम सुषमा. एका बापासाठी किती कठीण क्षण असतो हा. आपल्या काळजाच्या तुकड्याला कोणा दुसऱ्याच्या हातात सोपवायचं.’’

‘‘हे तर विधीचे विधान आहे… प्रत्येक बापाला यातून जावं लागतं. चला आता, अश्रू पुसा. आनंदाचा प्रसंग आहे. असं उदास राहणं चांगलं वाटतं का?’’

स्टेजवर थर्माकॉलने बनवलेल्या हृदयाच्या आकाराच्या दोन बाणांच्या छेदामध्ये ‘अरविंद आणि अनीता यांचा शुभविवाह’ असे लिहिलेल्या नावासमोर उभी असलेली नवविवाहित जोडी स्टेजवर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसोबत फोटो काढून घेत होती, तर चिकूसारखा त्यांच्या मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता.

चिकूला सांभाळण्यासाठी सविता वहिनीला बोलवण्यात आलं. ती आईस्क्रीमचे आमिष दाखवून अखेर त्याला स्टेजवरून खाली उतरवण्यात यशस्वी झाली. तरीसुद्धा चिकू काही फोटोंमध्ये स्वत:ला क्लिक करून घेण्यात सफल झाला.

फोटोग्राफरच्या म्हणण्यानुसार मोहक शैलीत नवविवाहित दांपत्य एकामागोमाग एक फोटो काढत होते. या क्षणी हे नवविवाहित जोडपं स्वत:ला एखाद्या सेलिब्रेटीपेक्षा काही कमी समजत नव्हतं.

ज्यांना निघायची घाई होती, ते रजिस्टर आणि पेन घेऊन खुर्ची टेबलवर बसलेल्या समाजातील वरिष्ठ व्यक्तींकडे आपापले इन्व्हलोप देण्यासाठी पुढे सरसावत होते. त्या पाहूणांच्या इन्व्हलोपमध्ये तेवढीचं किंमत होती, जितकी कि केशवजीद्वारा त्या पाहुण्यांच्या घरातील लग्नसमारंभाला याआधी कधी दिली गेली होती. या सगळ्याचा रेकॉर्ड आलेल्या पाहुण्यांकडे असलेल्या अशाच लग्नाच्या एखाद्या रजिस्टरमध्ये नमूद केलेला होता.

जे लग्नाचा पुरेपूर आनंद घ्यायला आले होते, ते वरात यायच्या आधीच लग्नात असलेल्या अर्ध्या अधिक पक्वानांची टेस्ट घेऊन मोकळे झाले होते.

जे लोक केशवजींच्या या समारंभाला पहिल्यांदाच हजर राहिले होते, ते लोक लग्नात केलेल्या खर्चाचा विचार करून आपल्या पाकिटातील रक्कम कमी-जास्त करत होते आणि ज्यांच्या सर्व मुलांची लग्न झाली होती, अशा बहुतेक पाहुण्यांनी आपल्या नातेवाईकांकडून लग्नात आलेल्या भेटवस्तू ज्यांच्यात अधिकतर थंड पाण्याची बॉटल, हॉट केस सेट, डिनर सेट इत्यादीचा समावेश होता, अशा वस्तूंच्या काढलेल्या पॅकिंगच्या टेपवर नवी टेप लावून अगदी हळुवारपणे आपलं नावं मोठ्या कलाकृतीने लिहून नवविवाहित जोड्याला टिळा लावून गिफ्ट देत हसतमुखाने फोटो काढत पूढे पुढे चालत राहिले.

आता हीच प्रथा अरविंद आणि अनीता इतरांच्या लग्नात करताना दिसतील. संपूर्ण लग्नाच्या भेटवस्तूंमधे फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच काही भेटवस्तू होत्या, ज्या खऱ्या अर्थाने या लग्नासाठी विशेष खरेदी करण्यात आल्या होत्या आणि ज्या नवविवाहित जोडप्याच्या कामी येणार होत्या.

एका दिवसाच्या छानचौकीसाठी आपली कित्येक वर्षांची जमापुंजी स्वाहा करणारे दोन्ही पक्ष आपल्या जवळच्या नातेवाईकांना अर्ध्या रात्री नव दाम्पत्याला ७ फेरे मारताना बघत, जांभया देताना आणि लग्नात काही ना काहीतरी कमतरता काढत असताना जवळून पाहत आणि ऐकत राहिले. सकाळ झाली, मुलीची पाठवणी झाली. दोघांचे आईवडील ‘नशिबाने सर्व सुरळीत पार पडलं,’ असं म्हणतं निसर्गाचे आभार मानत होते.

दुसऱ्या दिवशी दोन्ही घरचे सगळे पाहुणे गेल्यानंतर एका खोलीत एकांतात घरच्या एका विश्वासू व्यक्तीला लग्नात आलेल्या प्रेसेंट पाकिटांमधून आलेल्या पैशांचा हिशोब मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली, जे खूप अभिमानस्पद होतं. मग त्याच आलेल्या पैशातून लग्नाच्या उरलेल्या काही खर्चाची भरपाई केली जाते.

काही दिवसांनी त्यांच्या लग्नाचा अल्बम आणि व्हिडीओ हातात आला. सगळेजण मोठया आवडीनेसारखा सारखा तो अल्बम पाहून त्या सर्व सुंदर क्षणांना ताजं करत होते. हा क्रम काही महिन्यांपर्यंत असाच राहिला. आता पुढे घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहासोबत अल्बमसुद्धा पाहायला मिळणारं हे निश्चित आहे.

खरंच, भारतीय लग्नांच्या आपल्यातच काही गोडकडू कहाण्या असतात. कितीतरी अगणित नातेसंबंध दूरच्या नातेवाइकांच्या मार्फत इतरांच्या लग्नातचं जोडले जातात. काही तरुणांची मनंसुद्धा अशाच लग्नांत जोडली जातात. वर्षानुवर्षे एकमेकांना न भेटणारे नातेवाईक लग्नाच्या एका आमंत्रण पत्रिकेने अगदी आनंदी होऊन जातात. म्हणूनच तर लग्न कोणत्याही सण किंवा उत्सवापेक्षा कमी मानलं जात नाही.

अशा आपापल्या लग्नाच्या कितीतरी गोष्टी प्रत्येकाला कायम स्मरणात राहतात, ज्यामुळे कधी आपण अतिशय आनंदी होतो, तर कधी जे आपल्यापासून लांब गेले आहेत, त्यांचे फोटो पाहून आपल्याला रडू देखील येते. तुम्हीसुद्धा तुमच्या लग्नातील एखादा सुंदर किस्सा आमच्यासोबत नक्की शेअर करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें