आरोग्य परामर्श

* डॉ. अरविंद वैद्य, आयव्हीएफ एक्सपर्ट,
इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली

प्रश्न : माझे वय २८ वर्षे आहे. माझ्या लग्नाला एकच वर्ष झालं आहे. मी आणि माझे पती दोघंही मायनर थॅलेसीमिक आहोत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की जर आम्ही मुलाचं प्लॅन केलं, तर मुलाला मेजर थॅलेसीमिक होण्याची शक्यता ९० टक्के असेल. यासाठी काही मेडिकल उपाय आहे का?

उत्तर : आईवडील दोघंही थॅलेसीमिक असल्यावर मुलाला मेजर थॅलेसीमिक होण्याची शक्यता २५ टक्के, मायनर थॅलेसीमिक होण्याची ५० टक्के आणि सामान्य होण्याची २५ टक्के शक्यता असते. संपूर्ण जगात असं कोणतंही औषध नाही, जे याला रोखू किंवा बरं करू शकेल. मुलाला थॅलेसीमिकच्या विळख्यातून वाचवण्यापासून जन्मापूर्वी डायग्नोसिसच्या दोन पध्दती आहेत.

पहिली सीव्हीएम म्हणजेच क्रोनिक विलस बायोप्सी. अशा वेळी मूल जर असामान्य असेल, तर गर्भपात करून घ्यावा. दुसरं आईवडील दोघांच्या म्युटेशन स्टडीनंतर पीजीडी म्हणजेच प्रीजेनेटिक डायग्नोसिस करून घ्यावे. त्यानंतर निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात इंप्लांट केले जाते.

प्रश्न : माझं वय ३७ वर्षे आहे. लग्नाच्या ८ वर्षांत माझे ४ गर्भपात झाले आहेत. अशा वेळी मी काय केले पाहिजे? मी असं ऐकलं आहे की, आयव्हीएफमध्येही गर्भपात होऊ शकतो?

उत्तर : हे अगदी बरोबर आहे की आयव्हीएफमध्येही गर्भपात होऊ शकतो, विशेषत: ३ महिन्यांमध्ये. जर आपला ४ वेळा गर्भपात झाला असेल, तर आयव्हीएफचा पर्याय निवडा. अशा स्थितीत भ्रूणांना तयार केल्यानंतर त्यांची जेनेटिक स्क्रिनिंग केली जाते. निरोगी भ्रूणाला गर्भाशयात इंप्लांट केले जाते. त्यामुळे गर्भावस्थेचा दरही वाढतो आणि गर्भपाताचा धोकाही कमी होते.

प्रश्न : माझे वय ३० वर्षे आहे. मी अजून लग्नासाठी तयार नाहीए, पण आई बनायची इच्छा आहे. वाढत्या वयाबरोबर मी आई बनण्याचं सुख गमावू शकते का? मी काय केले पाहिजे?

उत्तर : आपण वय वाढल्यानंतरही आपली बायोलॉजिकल अपत्य प्राप्त करू शकता. त्यासाठी २ पर्याय उपलब्ध आहेत. जर आपण विवाहित असाल किंवा आपला पार्टनर फिक्स असेल, तर आपण अँब्रियो फ्रीजिंगचा पर्याय निवडू शकता. यात अंडी आणि शुक्राणूंना फलित करून भ्रूण तयार करून त्याला फ्रीज करता येतं. जर आपण सिंगल असाल, तर आपण एग फ्रीज करू शकता. याला विट्रीफिकेशन म्हणतात. यात तरल नायट्रोजनमध्ये यांना प्रीझर्व्ह करून ठेवले जाते. अनेक वर्षे याला सुरक्षित ठेवले जाते. यासाठी आपल्याला वार्षिक शुल्क द्यावे लागेल.

प्रश्न : मी २७ वर्षीय अविवाहित महिला आहे. मला फायब्रॉइडची समस्या आहेत. मग याचा अर्थ मी कधीही आई बनू शकत नाही का?

उत्तर : असं आवश्यक नाहीए, सर्वप्रथम समस्या किती गंभीर आहे, याची तपासणी केली जाते. फायब्रॉइड अनेक प्रकारचे असतात. जेव्हा फायब्रॉइडचा आकार खूप मोठा होतो आणि समस्या गंभीर होते, तेव्हा त्याला ऑपरेशनद्वारे काढलं जातं. अनेक प्रकरणांत तर ते न काढताच गर्भधारणा शक्य होते.

प्रश्न :  कमी वयात डायबिटिक असलेल्या महिलेला कंसिव्ह करण्यात खूप समस्या येते का?

उत्तर : बऱ्याच प्रकरणांत डायबिटिक महिला निरोगी मुलांना जन्म देतात. डायबिटिसबरोबर जी सर्वात मोठी समस्या जोडलेली आहे, ती आहे शुगर लेव्हलची. जर शुगर अनियंत्रित असेल, तर मुलांमध्ये आनुवंशिक व्यंग निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. परंतु रक्तात शुगरच्या प्रमाणाला नियंत्रित केले गेले, तर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करून सामान्य मुलाला जन्म देणे शक्य आहे.

प्रश्न : मी असं ऐकलं आहे की महिला आपलं अंड दान करून दुसऱ्या एखाद्या महिलेला आई बनायला मदत करू शकते. मी अशा एखाद्या महिलेला मदत करू शकते का आणि याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो का?

उत्तर : कोणतीही महिला अंडी दान करू शकते. केवळ तिला डोनर बनण्यापूर्वी काही तपासण्या करून घ्याव्या लागतात. अंडी दान करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक रूपाने फिट असणे खूप आवश्यक आहे. एका डोनरचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असायला हवे.

प्रश्न : माझे वय ४५ वर्षे आहे. माझ्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत, परंतु मूल झालेलं नाहीए. मी अलीकडेच एका बातमीत पाहिलं होतं की ५० वर्षांच्या वयातही महिला आई बनू शकतात. मेनोपॉजनंतरही मी आई बनू शकते का?

उत्तर : असिस्टिव्ड रीप्रोडक्टिव्ह तंत्राने मेनोपॉजनंतरही आई बनणे शक्य बनले आहे. मेनोपॉजचा अर्थ अंडी संपणं. अशावेळी एखाद्या एग डोनरकडून अंडी घेतली जातात आणि ती प्रयोगशाळेत फलित करून भ्रूण तयार केला जातो. मग भ्रूणाला गर्भाशयात इंप्लांट केले जाते. तसेही आईव्हीएफमध्येही उत्तम परिणाम ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्याच महिलांना मिळतात. आपले वय ४५ वर्षे आहे, जर आपण शारीरिकरीत्या फिट आहात, तर पॉझिटिव्ह परिणाम मिळण्याची शक्यता जास्त आहे.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ५३ वर्षांची आहे. बँकेत ऑफिसर आहे. माझ्यावर कामाचा खूप ताण असतो. कदाचित म्हणूनच माझं ब्लडप्रेशर वाढत आहे. माझ्या लक्षात येतयं की गेल्या २-३ वर्षांपासून हिवाळ्यात जास्त वाढतं. घरी मुलं व नवरा माझी थट्टा करतात की असं काही वसंत ऋतुप्रमाणे ब्लडप्रेशर कमी जास्त होत नाही. पण मला भुक लागली की खायची सवय आहे. कृपया मला सांगा की हिवाळ्याचा ब्लडप्रेशर वाढण्यासाठी काही संबंध आहे का? जर असेल तर ते सामान्य ठेवण्यासाठी काय उपाय करावे जेणेकरून माझं आरोग्य मला सुहृढ राखता येईल.

उत्तर : नक्कीच हिवाळ्यात काहीचं ब्लडप्रेशर वाढू शकतं. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कित्येकाचं ब्लडप्रेशर ६-७ ते १० अंकांनी वाढत असतं असं वैद्यकीय संशोधनात (क्लिनिकल संशोधनात) आढळलं आहे. जर ब्लडप्रेशर वाढून १४० अंक सिस्टॉलिक व ९० अंक डायस्टॉविकच्यावर गेलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी.

ब्लडप्रेशर वाढणं हे तब्येतीला हानिकारक आहे. शरीरातील नसांवर अतिरिक्त दबाव पडल्याने हृदय, किडणी, मेंदू व डोळ्यांचा पडदा यावर हळूहळू परीणाम होऊ शकतो.

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपयुक्त औषधांशिवाय जीवनशैलीत बदल करायची गरज आहे. समतोल आहारत मीठाचा कमी वापर, नियमित व्यायाम व वजनावर नियंत्रण असायला हवं.

जर सकाळी उठल्यावर डोक्याचा मागचा भाग जड वाटत असेल तर ब्लडप्रेशर जास्त आहे असे मानावे व लगेच ब्लडप्रेशर मोजून घ्या. वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी जर तुम्हाला औषधाचा डोस वाढवून दिला तर त्यात चालढकल करू नका. उलट लगेच सुरू करा. कधीकधी एखादं छोटंसं जास्तीचं औषध घ्यावं लागतं.

हिवाळ्यात काही लोकांचं ब्लडप्रेशर वाढतं कारण ते जेवणात अधिक मीठ वापरतात. त्यामुळे दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

ताजी फळं, पालेभाज्या भरपूर खा. शुद्ध दुधाऐवजी स्प्रेटा दुध प्या. जेवणात सॅचुरेटेड फॅट्स कमी करा.

काही रूग्णांमध्ये सकाळी सकाळी ब्लडप्रेशर जास्त आढळते. जर तुमचं असं असेल तर औषधांची वेळ बदलण्याची गरज आहे. काही औषधं सकाळी तर काही संध्याकाळी घेऊन ब्लडप्रेशर नियंत्रणात आणता येतं. याबाबतीत तुम्ही डॉक्टरांना विचारा.

तुमच्या कार्यशैलीतला बदल तुमचा ताण कमी करू शकेल. हसण्या खेळण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी वेळ येण्याची गरज आहे. शिवाय एकत्र व्यायाम, ध्यान, वगैरे हे ताण कमी करण्याचे उत्तम उपाय आहेत.

प्रश्न : माझं वय ४४ वर्षं आहे. मला मासिक पाळीच्या काही दिवस आधी स्तनांमध्ये जडत्त्व व वेदना जाणवतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आहे की काय असं वाटतं. माझ्या मावशीला हा रोग झाला होता. त्यामुळे लहान वयातच ती वारली. आता मी काय करायला हवं?

उत्तर : तुमची मावशी ब्रेस्ट कॅन्सरने गेली. त्यामुळे तुमच्या मनात भीतीचा आजाराप्रति असणं स्वाभाविक आहे. परंतु ज्याप्रकारे मासिक पाळीबरोबर स्तनांमध्ये होणारे बदल तुम्ही सांगता आहात, ते मला फायब्रोयडिनोसिस किंवा फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज याची लक्षणं वाटतात. यात मासिकपाळीच्या ३-४ दिवस आधी वेदना सुरू होतात व स्त्राव सुरू झाल्यावर थांबतात. स्तनांच्या हालचालीबरोबर वेदना वाढतात. हे मासिकपाळीच्या चक्राबरोबर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे प्रेरीत होतं. त्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही.

वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही छोटेछोटे उपाय करू शकता. आधी तर दिवसभर २४ तास ब्रेसिअर घालून राहा. ज्यामुळे स्तनांना आधार मिळतो. तरीही    वेदना जाणवल्या तर एखादं सौम्य वेदनाशमक औषध उदा. पॅरासिटामोल, इबुप्रोफेन घ्या. तरीही फायदा झाला नाही तर एखाद्या सर्जनला भेटा. गरज असेल तर व्हिटॅमिन ई व हारर्मोनल औषधांनी बरं वाटेल.

तुमच्या मावशीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तुमचं याबाबतीत जागृत असणं चांगलं आहे. त्यामुळे दर महिन्याला तुम्ही तुमच्या ब्रेस्टची स्वयंतपासणी नियमितपणे करणं फारच उत्तम ठरेल. बेडवर झोपून किंवा आरशासमोर उभं राहून दोन्ही स्तनांमध्ये गाठ, त्वचेतील बदल व स्तनाग्रातील बदल यांचं निरिक्षण करा. थोडा जरी संशय आला तर ताबडतोब तपासणी करा. चालढकळ करू नका. वेळेत उपचार घेतल्याने कितीतरी केसेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं मुळासकट निर्मुलन झालं आहे.

आपण वजन, आहार यांचा नेहमी समतोल ठेवा. लठ्ठपणा, जंकफूड, तळलेले पदार्थ, मांसाहार वगैरे ब्रेस्ट कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. तुमच्याकडे असा इतिहास आहे (मावशीचा) तुमच्या कुटुंबात आधीच हा रोग आहे त्यामुळे या रिस्कला अधिक वाढू न देणंच योग्य आहे.

गृहशोभिकेचा सल्ला

*गृहशोभिका टीम

  • मी २७ वर्षीय विवाहित महिला आहे. माझे लग्न १० महिन्यांपूर्वी झाले आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मी त्यांना सेक्सच्या बाबतीत संपूर्णपणे समाधानी करू शकत नाही. कारण आहे माझ्या व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त आकुंचित म्हणजे जास्त टाईट आहेत. सेक्स संबंध करताना या कारणामुळे मी माझ्या पतिला साथ देऊ शकत नाही. या दरम्यान मला अत्यंत वेदना होतात. पतिच्या आग्रहाला मी नाकारूही शकत नाही. पण सेक्स करण्याच्या नावाने माझे हात पाय गळतात आणि टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करते. यामुळे माझे पती नाराज राहू लागले आहेत. सांगा मी काय करू?

आधी तर तुम्हाला तुमच्या मनात सेक्सबद्दल बसलेली भीती काढावी लागेल, कारण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे जी वैवाहिक जीवनातील ऊब कायम ठेवते.

दुसरे, व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त टाईट असणे फार गंभीर समस्या नाहीए, शिवाय लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसांमधील ही एक सामान्य समस्या असू शकते किंवा मनात बसलेल्या भीतिमुळे तुम्ही व्हजायना संकुचित करत असाल.

त्यापेक्षा सेक्स करण्याअगोदर फोरप्ले करणं अधिक योग्य ठरेल आणि याचा वेळ सुरूवातीला एवढा जास्त असावा की तुम्ही सेक्ससाठी पूर्णत: तयार व्हाल. हे आणखी इंटरेस्टिंग व्हावे यासाठी पतिला सांगा की त्याने ल्युब्रिकंट वा चिकट तेलाचा वापर करावा.

बाजारात आजकाल व्हजायनल मोल्ड्ससुद्धा उपलब्ध आहेत, ज्याच्या वापराने सेक्सक्रिया आणखी आनंदी केली जाऊ शकते. पतिला सेक्स संबंधांच्या काळात पेनिट्रेशन स्लो ठेवायला सांगा. हळूहळू तुम्हालासुद्धा याचा आनंद घेता येईल आणि तुम्ही मोकळेपणाने आनंद उपभोगाल. या शिवाय जर समस्या जशीच्या तशी राहिली तर एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाला भेटा.

  • मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. लग्नाला २ वर्ष झाली आहेत. सासरी कशाची कमी नाही. पती सरकारी नोकरी करतात आणि उच्चपदस्थ आहेत. ते स्कूल टॉपर विद्यार्थी होतेच शिवाय कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतसुद्धा टॉपर होते. आपल्या कार्यालयातसुद्धा त्यांच्या कामाला कोणी नावं ठेवत नाहीत. पण समस्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील आहे आणि अशी आहे की जी आजवर केवळ माझ्या आईला आणि सासूला माहीत आहे. खरेतर, पती सेक्स संबंध ठेवताना हिंसक बनतात. ते मला त्यांच्यासोबत पॉर्न मुव्ही बघायला सांगतात आणि मग सेक्स करतात. यादरम्यान ते माझ्या कोमल अवयवांना जोरजोरात घर्षण करतात आणि त्यावर दातसुद्धा रुतवतात. कधीकधी तर माझ्या ब्रेस्टमधून रक्तसुद्धा निघू लागते. अशा असह्य वेदना सहन केल्यावर माझ्याच्याने अंथरुणातून उठणेसुद्धा होत नाही. माझे पती माझी ही अवस्था पाहून खेद व्यक्त करतात आणि सारखे क्षमा मागत राहतात. कधीकधी वाटते की आत्महत्या करावी. खरेतर माझे पती माझी गरजेपेक्षा काळजी करतात आणि माझे त्यांच्यापासून दूर राहणे त्यांना इतके खटकते की ते माझ्याविना एक क्षणही राहू शकत नाही.

जर पती केवळ मानसिक त्रास देत असते आणि प्रेम केले नसते तर मी त्यांना केव्हाच घटस्फोट दिला असता पण वाटते की कदाचित ते एखाद्या मानसिक रोगाने ग्रासले आहेत. आणि असा विचार करूनच मी पतिला सोडू शकत नाही. मी माझ्या सासूला, ज्या मला आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात, हे सगळे सांगितले तर त्या गप्प बसल्या. त्या केवळ एवढेच म्हणाल्या की हळूहळू सगळे नीट होईल. इकडे आईला सांगितले तेव्हा ती संतापली आणि सर्वाना एकत्र बसवून ती यावर चर्चा करू इच्छित होती. अजून हे माझाया बाबांना माहीत नाही, कारण मला माहीत आहे की ते या मुद्द्यावर गप्प बसणार नाहीत. पती, सासर आणि माहेर हे नाते क्षणात संपू शकते. काहीच समजत नाही की काय करू? कृपया सल्ला द्या?

तुमची समस्या पाहाता असे वाटते की तुमच्या पतिला सेक्शुअल सॅडिज्म हा मनोविकार आहे. असा मनोरुग्ण सामान्य जीवनात तर नॉर्मल राहतो, अशांच्या वर्तनावर कोणालाच संशय येत नाही, पण सेक्स करताना ते लोक हिंसक होतात आणि दुसऱ्याला चावणे, बोचकारणे, संवेदनशील अवयवांवर प्रहार करणे, वेगात सेक्स करणे अशा पीडा देण्यात त्यांना आनंद वाटतो. कधीकधी असे मनोरुग्ण जोडीदाराला इतक्या वेदना देतात की या संबंधांना पूर्णविराम मिळतो. तसे आपल्या अशा वर्तनाचा नंतर त्यांना पश्चातापसुद्धा होतो आणि अशी चूक परत न करण्याचे वचनसुद्धा देतात, पण परत सेक्स करताना सगळे विसरून जातात.

तुमच्याबाबतीतसुद्धा असेच झाले आहे आणि तुम्ही हे चांगले केले की हे सगळे आपल्या आईला आणि सासूला सांगितले आहे.

अशा मनोरुग्णांना भावनिक आधाराची गरज असते. रोजचे व्यवहार करताना तुमच्या पतिसोबत बोला. पतिसोबत जास्तीतजास्त वेळ घालवा, एकत्र फिरायला जा, शॉपिंग करा, चांगले साहित्य वाचायला प्रोत्साहन द्या.

एखाद्या चांगल्या सेक्शुअल सॅडिज्मच्या तज्ज्ञांकडे उपचारासाठी घेऊन जा, तरीही आशेचा काही किरण दिसत नसेल तर पतिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें