गर्भधारणामध्येदेखील दिसा चांगले

* ललिता गोयल

गर्भधारणा हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर काळ असतो जेव्हा तिला दररोज नवीन गोष्टींचा अनुभव येतो. अंतर्गत बदलांबरोबरच त्यात शारीरिक बदलही होतात. एकीकडे नवीन पाहुण्याचे आगमन आनंद देते, तर दुसरीकडे वाढते वजन तिला त्रास देते आणि तिला वाटते की आता तिला फक्त सैल कपडे घालावे लागतील, जे तिच्या सुंदर आणि फॅशनेबल दिसण्याच्या इच्छेला बाधा आणतील. पण ती चुकीचा विचार करते. असे नाही.

महिला गरोदरपणातही सुंदर आणि फॅशनेबल दिसू शकतात आणि फॅशनेबल आणि आरामदायक कपडे परिधान करून 2 ते 3 असण्याचा आनंद द्विगुणित करू शकतात. आता तुम्हाला तुमचे वाढलेले पोट सैल शर्टने लपवण्याची गरज नाही. तंबूसारखे दिसण्याऐवजी, गर्भधारणेच्या या सुंदर काळात हॉट आणि ग्लॅमरस पहा.

अनेक पर्याय आहेत

वुड बी मॉम्स फॅशनेबल आणि आधुनिक दिसण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला त्यांच्याकडे एक नजर टाकूया :

कुर्ती : तुम्ही एम्ब्रॉयडरीसह कॉन्ट्रास्ट योक कुर्ती, मँडरीन कॉलर रोलअप स्लीव्ह कुर्ती, लेस कुर्ती, पॅचवर्क कुर्ती, फ्रंट स्मोकिंग आणि बॅकटी कुर्ती लेगिंगसह घालू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कॅप्रीसोबतही ते परिधान करून हॉट आणि ग्लॅमरस दिसू शकता.

टॉप्स : गरोदरपणात काफ्तान्स घालण्याचा एक स्मार्ट पर्यायदेखील असू शकतो, जो लेगिंग आणि कॅप्रिससह परिधान केला जाऊ शकतो. हे तुम्हाला स्मार्ट लुक देईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही स्पॅगेटीसह बटण असलेला टी-शर्टदेखील घालू शकता. हे तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला आधार देईल. एम्पायर कट रॅप ड्रेसेस आणि टॉप्सदेखील तुमच्या वरच्या शरीराचे सौंदर्य वाढवतील. पांढऱ्या पोंचोला चड्डीशी जुळवून तुम्ही सपाट चप्पल घालू शकता आणि बाहेर फिरायला जाऊ शकता. आरामदायी असण्यासोबतच ते तुम्हाला फॅशनेबल लुकदेखील देईल.

जीन्स, पँट : गरोदरपणात स्मार्ट लूकसाठी तुम्ही जीन्स आणि विणलेली पँटही घालू शकता. ही ओव्हर द टमी स्टाइल विणलेली पँट केवळ स्ट्रेच करण्यायोग्य नाही, तर त्यात हलका लवचिक किंवा कमरबंददेखील आहे, जो पोटाच्या वाढत्या आकारानुसार समायोजित केला जाऊ शकतो. मॅटर्निटी जीन्स आणि पॅंटची संपूर्ण श्रेणी बाजारात उपलब्ध आहे. यासोबत हेवी वर्क कुर्ती किंवा टी-शर्ट घालून आधुनिक आणि ट्रेंडी लुक मिळवता येतो. जर तुम्हाला गरोदरपणात जीन्स घालण्याची आवड असेल तर तुम्ही स्ट्रेचेबल डेनिम किंवा सिल्की डेनिम घालू शकता. यासोबत तुम्ही कॉटन फॅब्रिकपासून बनवलेला ऑक्सफर्ड शर्ट घालू शकता.

अ‍ॅक्सेसरीज : प्रिंटेड कलरफुल स्कार्फ, स्टोल्स वापरून तुम्ही स्वत:ला स्टायलिश लुक देऊ शकता. यामुळे, पाहणाऱ्याची नजर तुमच्या वाढलेल्या शरीराऐवजी तुमच्या स्टायलिश लूककडे जाईल. तुम्ही फंकी ब्रेसलेट, झुमके आणि मणी यांना तुमच्या फॅशन स्टेटमेंटचा भाग बनवू शकता.

गरोदर महिलांसाठी खास फ्लॅट बॅलेरिना शूज स्टाइलही बाजारात उपलब्ध आहेत, जी तुम्ही जीन्स किंवा पँटसोबत घालू शकता. गरोदरपणात फॅशनेबल दिसण्याबद्दल बोलताना फॅशन डिझायनर मीनाक्षी खंडेलवाल म्हणतात, “स्त्रिया आणि फॅशन हातात हात घालून चालतात. परंतु बहुतेक स्त्रिया या काळात आपले वाढलेले पोट लपवण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात सैल कपडे घालतात आणि निराशेने आयुष्यातील हा सुंदर काळ गमावतात. पण आता काळ बदलत आहे. परदेशी महिलांप्रमाणेच भारतीय महिलाही गरोदरपणात आधुनिक आणि फॅशनेबल दिसण्याच्या मार्गावर आहेत. ही इच्छा लक्षात घेऊन मोठ्या कंपन्या वुड बी मॉम्ससाठी खास डिझाईन केलेल्या कपड्यांची किरकोळ दुकानेही उघडत आहेत. गर्भवती महिलांना स्मार्ट लूक देण्यासाठी ही स्टोअर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

मीनाक्षी खंडेलवाल तुमच्या गरोदरपणात हॉट आणि ग्लॅमरस दिसण्याची तुमची इच्छा पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी काही टिप्स आमच्यासोबत शेअर करत आहेत. चला, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या खास टिप्स :

गरोदरपणात, एक टॉप निवडा ज्याची समोरची रचना pleated yoke असेल. वरचा भाग समोरून रुंद असू शकतो पण मागच्या बाजूला गाठ बसवतो. कपड्याच्या हेमलाइनमध्ये विविधता आणून स्वतःला एक रोमांचक लुक द्या. कपड्यांचे कापड कॉटन आणि स्पॅन्डेक्स निवडा, जे आरामदायी तसेच स्ट्रेचेबल आहेत. कपडे निवडताना हलक्या रंगांऐवजी गडद रंग निवडा. असे केल्याने तुम्हाला स्लिम लूक मिळेल. स्कार्फ, कानातले, ब्रेसलेट इत्यादी मॅचिंग ऍक्सेसरीज घाला. स्लिम लूकसाठी लहान प्रिंटचे कपडे निवडा. आरामदायी अनुभूतीसाठी हॅरेम असलेली कुर्ती वापरून पहा. गरोदरपणात वाढलेल्या बस्टच्या आकाराला स्लिम लुक देण्यासाठी डीप व्ही नेक घाला. याला स्मार्ट लुक देण्यासाठी स्कार्फ घ्या किंवा स्टायलिश पद्धतीने चोरा. उंच टाचांच्या पादत्राणांऐवजी फ्लॅट बॅलेरिना किंवा चप्पल घाला.

आता तुम्ही स्वतःला पूर्णपणे फॅशनेबल आणि स्टायलिश लुक देऊन गरोदरपणात आनंद घेण्यासाठी तयार आहात. आता नक्कीच लोक तुमची तुलना हेडी क्लम, निकोल रिची आणि जेनिफर गार्नर या सेलिब्रिटींशी करतील, जे त्यांच्या गरोदरपणातही हॉट आणि ग्लॅमरस दिसत होते आणि त्या वेळेचा पूर्ण आनंद लुटत होते.

ऑफिस आणि गर्भावस्था राखा ताळमेळ

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, फरिदाबादच्या स्त्रीरोगतज्ञ  डॉ. अनिता कान्ट यांच्याशी ललीता गोयल यांनी केलेल्या चर्चेवर आधारित

जेव्हा एक नोकरदार स्त्री आई बनण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिच्या मनात प्रश्न उभा राहतो की कशा गर्भावस्थेसोबत ऑफिसच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता येतील? गर्भवती असणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. अशा परिस्थितीत शरीर स्वत:चे निर्देश ऐकत नाही. पण असे असले तरी गर्भावस्था हा काही आजार नाही.

एका काम करणाऱ्या स्त्रीला खालील पद्धती अवलंबून ऑफिसच्या जबाबदाऱ्या सहज निभावता येतात :

बॉसला सांगा गोड बातमी : गर्भवती असल्याची गोड बातमी कळताच सर्वात आव्हानात्मक काम असते ते आपल्या बॉसला याबाबत सांगणे. बहुतांश महिला पहिल्या तीन महिन्यांपर्यंत आपल्या गर्भावस्थेची बातमी लपवून ठेवायचा प्रयत्न करतात. त्या आपली ही गोड बातमी ऑफिसमध्ये बॉसला सांगायला संकोचतात. असे अजिबात करू नका.

यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मदत घेऊन ही बातमी बॉससोबत शेअर करा व त्याला आपल्या विश्वासात घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा संपूर्ण पाठिंबा मिळू शकेल. याशिवाय कंपनीचे धोरण म्हणजे मॅटर्निटी लिव्ह, मेडिकल रीएबर्समेंट, लिव्ह विदाउट पे वगैरेची संपूर्ण माहिती मिळवा.

अपराधीपणाची भावना येऊ देऊ नका : तुम्ही टेलिव्हिजनवर राधिका आपटे अभिनित एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल, ज्यात राधिका आपटेची सिनिअर तिच्या ड्रेसमध्ये तिच्या बेबी बम्पला छान लपवल्याबाबत तिची प्रशंसा करते, पण यासोबतच तिला न मिळणाऱ्या प्रमोशनचे कारणसुद्धा सांगते.

राधिका आपटे कोणताही संकोच न करता संपूर्ण आत्मविश्वासाने आपल्या गर्भावस्थेवर अभिमानाने उत्तर देते, ‘‘वास्तविक, आपल्या ऑफिसमध्ये जेव्हा कळते की एखादी स्त्री गर्भवती आहे तेव्हा ना केवळ तिला सल्ल्याचा खजिना भेट म्हणून दिला जातो तर तिच्या कार्यक्षमतेवरही शंका व्यक्त केली जाते की ती गर्भावस्था आणि ऑफिस एकावेळी कसे सांभाळेल? तिला सतत आठवण करून दिली जाते की तिला अडचणींचा सामना करावा लागेल. ‘असे बसू नको, असे चालू नकोस, हे खाऊ नकोस, असे कपडे घालू नकोस.’ यासारख्या अनेक सल्ल्याने तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते. तिचा गर्भावस्थेसोबत नोकरी करण्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

या सगळयाविरुद्ध जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकाल, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल तर मनात कोणताही अपराधीपणाचा  सल ठेवू नका.

स्वत:ला नेहमी आठवण करून द्या की तू सगळे अगदी उत्तम मॅनेज करत आहे. आपले काम आणि गर्भावस्थेचा पुरेपूर आनंद उपभोगा.

लक्षात ठेवा की तुम्ही  स्वत:ला अधिक चांगले ओळखता ना की ते तुमच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट केवळ यावरच लक्ष केंद्रित करा. गर्भावस्था आणि नोकरी करण्याचा निर्णय याबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना बाळगू नका, असे केल्याने तुम्ही या दोन्ही गोष्टी छान हाताळू शकाल.

स्ट्रेसचा स्तर नीट हाताळा : गर्भावस्थेदरम्यान शारीरिक आणि हार्मोन्सच्या बदलामुळे स्ट्रेसचा स्तर वाढणे सामान्य गोष्ट आहे. पण जसे की तुम्ही आयुष्याच्या सर्वात सुंदर काळातून जात असता, म्हणून सर्व नकारात्मक विचार झुगारून केवळ आपल्या गर्भात वाढत असलेल्या बाळावरच लक्ष केंद्रित करा. ऑफिसमधील घटनांना सामान्य स्वरूपात स्वीकारा. आपले ध्येय साकार करण्यासाठी स्वत: तणावाखाली वावरू नका. जास्त उशिरापर्यंत थांबावे लागणार नाही यासाठी प्रयत्नशील रहा. बाळाच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रिलॅक्सेशनचे तंत्र आत्मसात करा. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने प्रिटेनल व्यायामाच्या क्लासेसला जाऊ शकता. तिथे सांगितलेल्या  ब्रीदिंग तंत्राचा वापर ऑफिसमध्ये करू शकता.

आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांची यादी बनवून त्यांच्या प्राथमिकतेकडे लक्ष द्या. जर  काम न केल्याने तुम्हाला बरे वाटत नसेल, तर काम करू नका. जड सामान उचलणे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त कोलाहल असलेल्या ठिकाणांपासून दूर रहा.

संतुलित आहार घ्या : गर्भावस्थेत सगळयात महत्वाचे आहे ते संतुलित आहार घेणे. अनेकदा कामात व्यस्त असल्याने गर्भवती महिला आपल्या आहाराबाबत निष्काळजीपणा करतात. असे अजिबात करता कामा नये.

लोह आणि प्रथिनयुक्त आहार घ्या : गर्भावस्थेतील थकवा लोहाची कमतरता दर्शवतो. अशावेळी आयर्न व प्रथिनयुक्त आहार जसे सीफूड, हिरव्या पालेभाज्या, रेड मीट, बीन्स, धान्य यांचा आपल्या जेवणात जास्तीतजास्त समावेशित करा.

ऑफिसमध्ये स्वत:ला उत्साहित ठेवण्यासाठी ठराविक वेळेनंतर मिनी मिल वा स्नॅक्स म्हणून भाजलेले चणे वा मोड आलेली कडधान्य घेऊन जात जा.

आपल्या ऑफिसच्या ड्रॉव्हरमध्ये सुका मेवा ठेवा. हे तुम्हाला ऊर्जा प्रदान करेल. दर दोन तासांनी काहीनाकाही खात रहा. यामुळे ना केवळ तुमच्या ऊर्जेचा स्तर कायम राहील, तर तुमचा मूडसुद्धा ताजातवाना राहील.

कामाचे ठिकाण सुविधाजनक बनवा : गर्भवस्थेच्या काळात आपल्या कामाचे ठिकाण शारीरिक बदलानुसार सुविधाजनक बनवणे चुकीचे नाही, कारण जशी जशी प्रसूतीची वेळ जवळ जवळ येईल तशी तशी तुमची बसण्याची आणि उभे राहण्याची स्थिती अडचणीची होत जाईल. म्हणून ऑफिसमध्ये बसण्यासाठी अडजस्टेबल लोअर बॅकला आधार देणारी खुर्ची घ्या जेणेकरून दीर्घ काळपर्यंत बसण्यात काही त्रास होणार नाही. जर खुर्ची अडजस्टेबल नसेल तर लहानशी उशी वा कुशन आपल्या कंबरेला आधार देण्यासाठी ठेवा. पाय सोडून बसू नका अन्यथा पायावर सूज येऊ शकते. पायांना आधार देण्यासाठी डेस्कच्या खाली फूट रेस्ट वा लहान स्टूल ठेवा. जिन्यांचा वापर टाळा.

जर खूप वेळ उभे राहावे लागणार असेल तर एक पाय फुटरेस्टवर ठेवा. अशा व्यवस्था दुसऱ्या पायासाठीही करा. वापरायला सोपे पादत्राणे वा सँडेल्स घाला. जर वाकावे लागले तर कंबरेऐवजी गुडघ्यांच्या आधारे वाका. गर्भावस्थेत अॅसिडिटीपासून दूर राहण्यासाठी कामातून लहान लहान ब्रेक घ्या आणि चाला. स्ट्रेचिंग आणि लहानसहान व्यायाम करा (आपल्या गायनोकोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार) जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित सुरु राहील. दिर्घ श्वास घ्या आणि स्वत:ला रिलॅक्स करा.

वार्विक मेडिकल स्कुलच्या फाउंडर्सना असे आढळले की दिवसातून ६ तासांपेक्षा जास्त वाकून बसले तर गर्भवती महिलांच्या वजनात अवाजवी वाढ होते. त्यांनी सांगितले आहे की गर्भवती महिलांनी शक्य तितके वाकून बसणे टाळावे, कारण यामुळे गर्भात असलेल्या बाळाला त्रास होऊ शकतो.

सुपर प्रेग्नन्ट स्त्री बनू नका : अनेक गर्भवती महिला गर्भावस्थेत अती ताण असलेले काम करतात व स्वत:ला सुपर एनर्जीक असल्याचे दाखवतात. असे अजिबात करू नका. तुम्ही एकाच वेळी काम आणि गर्भावस्था अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडत असता. हेच मुळात खूप महत्वाचे आहे.

तुम्हाला हे कळायला हवे की तुम्ही या वेळी नाजूक परिस्थितून जात आहात. तुम्हाला तुमच्यासोबत आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचेही रक्षण करायचे आहे. म्हणून आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

अधून मधून आराम करा : आपल्या मिटींग्ज आणि अपॉईंटमेंट्स ट्रॅक करण्याकरिता ई-मेल कॅलेंडर प्रोग्राम वापरा. आपल्या कामाचा आराखडा स्वत: तयार करा की तुम्ही किती जास्तीचे काम करू शकता. ज्या क्षणी तुम्हाला थकवा जाणवेल, तेव्हा लगेच काम थांबवा. गरज भासल्यास ऑफिसच्या कलिग्जची मदत घ्या.

सोयीस्कर व स्टायलिश मॅटर्निटीवेअर : वाढत्या बेबीसोबत सोयीचे व स्टायलिश  मॅटर्निटीवेअर निवडणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. तसे पाहता सुरूवातीचे ३ महिने बहुतांश गर्भवती स्त्रिया मॅटर्निटीवेअरबाबत फार गंभीर नसतात. पण जसाजसा तुमच्या कंबरेचा आकार वाढत जातो आणि तुम्हाला तुमचे कपडे असुविधाजनक वाटू लागतात, तशीतशी मॅटर्निटी वेअरची गरज भासू लागते.

डॉक्टर सल्ला देतात की या दरम्यान फार घट्ट टॉप आणि पॅन्ट घालू नका, कारण या अवस्थेत शरीराचे तापमान वाढत जाते, म्हणून हलके सुती, फ्लोई लायक्रा यासारखे कपडे घाला. ढिल्या शर्टच्यावर जॅकेट घाला. गर्भावस्थेत तंग कपडे घातल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो, तसेच मांस पेशीसुद्धा आकुंचन पावू शकतात. गर्भावस्थेत ऑफिसवेअरमध्ये स्मार्ट आणि सोयीस्कर असा लुक आणण्यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल जीन्स व निटेड पँट्ससुद्धा वापरू शकता. ओव्हर द टमी स्टाइलच्या या पँट्स स्ट्रेचेबल असण्यासोबतच यात हलके इलॅस्टिक वा वेस्ट बँड असतात, जे वाढत्या पोटाच्या आकारानुसार अॅड्जस्ट होतात. अॅक्सेसरीजमध्ये रंगीत स्कार्फ व स्टोलचा वापर केल्यास तुम्ही स्वत:ला स्टायलिश लुक देऊ शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें