सौंदर्य समस्या

– समाधान ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजाद्वारा

माझ्या चेहऱ्यावर मुरुमं आहेत. ओपन पोर्सचीही समस्या आहे. माझ्यत न्यूनगंड निर्माण झाला आहे. कृपया माझ्या समस्येचं निराकरण करा.

मुरुमं येण्यामागे बरीच कारणं असतात. ही मुरुमं काही अंतर्गत कारणामुळे तर नाही ना? यासाठी तुम्ही रक्त तपासून पाहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय मलावरोध, कोंडा आणि तेलकट त्वचा यामुळेही मुरुमं येतात. म्हणूनच त्यांना बरं करण्याआधी त्यांच्या येण्याचं खरं कारण जाणून घ्या आणि मग उपाय करा. मुरुमं सुकवण्यासाठी पुदिन्याचा रस लावा. यामुळे काहीच दिवसांत मुरुमं सुकतील. वैद्यकिय उपचार म्हणून ओझोन ट्रीटमेंट घेऊ शकता. यामुळे त्वचा रिवायटलाइज आणि रिजुविनेट होते. शिवाय हीलिंग प्रक्रियाही वेगाने होते. यामध्ये अँटिफंगल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने इफेक्टेड स्किन लवकर बरी होते. ओपन पोर्सच्या समस्येसाठी यंग स्किन मास्कची सिटिंग्ज घ्या.

मी ३५ वर्षांची नोकरदार महिला आहे. मी चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप उत्पादनं वापरून पाहिली, पण चेहऱ्याचा कोरडेपणा गेला नाही. कृपया चेहरा ताजातवाना ठेवण्यासाठी घरगुती उपाय सांगा, जेणेकरून माझी समस्या सुटू शकेल.

कोरड्या आणि शुष्क त्वचेमध्ये आर्द्रता कमी असते. त्यामुळे चेहरा फिका पडतो. फिकेपणा दूर करण्यासाठी मास्क बनवा. ३-४ बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते जाडसर वाटून घ्या. यामध्ये स्मॅश केलेलं अर्धपिकं केळ, १ चमचा मध आणि ५ चमचे दूध मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये अर्धा चमचा कॅलेमाइन पावडर मिसळून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

माझी त्वचा टॅन झाली आहे. मुलतानी मातीनेही काही उपयोग झाला नाही. मी काय करू?

तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून फ्रूट बायोपील फेशियल करून घेऊ शकता. या फेशियलमध्ये इतर फळांसोबतच पपईच्या एन्द्ब्राइम्सचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचेचा रंग फिका होतो. यामुळे टॅनिंग रिमूव्ह होतं आणि त्वचेचं डीप क्ंिलजिंगही होते. घरातून निघण्याआधी चेहरा, हात, पाय, पाठ व शरीराच्या अन्य न झाकलेल्या भागांवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. घरच्या घरी टॅनिंग घालवण्यासाठी दही, अननसचा रस आणि साखरेची पेस्ट करून त्वचेवर स्क्रब करा. स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.

मी ३८ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्याची त्वचा सैल, कोरडी आणि पिवळसर आहे. अनेक क्रिम लावल्या, पण चेहरा निस्तेज राहिला. चेहऱ्याची टवटवी कायम राहण्यासाठी उपाय सांगा.

क्रीम वापरल्याने काही खास फायदा होत नाही. त्वचा कॅरोटिन नावाच्या प्रोटिनपासून बनलेली असते. त्वचेला संपूर्ण पोषण मिळावं म्हणून आपल्या आहारात प्रोटिनयुक्त पदार्थ उदाहरणार्थ, दूध, दही, पनीर, अंडी, मासे यांचा समावेश करा.

याशिवाय एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून लेजर ट्रीटमेंट घ्या आणि यंग स्कीन मास्क लावा. लेजरने स्किन रिजनरेट होईल आणि मास्कमुळे त्वचेला कोलोजन मिळेल. यामुळे त्वचा टाइट होईल. याशिवाय सैल त्वचेला अपलिफ्ट करण्यासाठी फेस लिफ्ंिटग ट्रिटमेंट घेऊ शकता.

माझं वय ४१ वर्षं आहे. माझ्या नाकावर खूप ब्लॅकहेड्स आहेत. त्यांना कसं दूर करता येईल. कृपया सांगा.

वेळोवेळी चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून फ्रूट पील करून घ्या. याशिवाय तुमच्या ब्यूटिशियनला ओझोन द्यायला सांगा. यामुळे पोर्स उघडतील आणि ब्लॅकहेड्स सहज निघतील. याशिवाय ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरच्या घरीही स्क्रब बनवू शकता. यासाठी अॅलोवेरा जेलमध्ये थोडं बेसन आणि थोडी खसखस मिसळून स्क्रब करा.

माझं वय ३२ वर्षं आहे. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आहेत. माझ्यासाठी कोणती क्रिम उपयोगी ठरेल.

तुम्ही बाजारात मिळणारी कोणतीही चांगली क्रिम किंवा आय सिरम वापरू शकता. ज्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॉमिन ‘ए’ आहे. डोळ्यांभोवती रिंग फिंगरने मसाज करा. यामुळे त्वचेवर खूप कमी दाब येतो.

माझं वय ३५ वर्षं आहे. माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत. त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा.

दिवसातून २-३ वेळा त्वचेवर अॅस्ट्रिंजंट लावा. हे अँटीबॅक्टेरियल असतं. यामुळे मुरुमं आणणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. ब्लॅकहेड्स असतील तर ते वेळोवेळी काढा. घरगुती उपाय म्हणून पुदीन्याची पेस्ट त्यावर लावा.

माझ्या चेहऱ्यावर पांढरे डाग आहेत. हे डाग लेजरने कायमचे नष्ट करता येऊ शकतात का?

पांढऱ्या डागांसाठी लेजर नव्हे तर परमनंट मेकअपच्या खास तंत्राद्वारे म्हणजे परमनंट कसरिंगद्वारे लावण्यात येतं. यामध्ये सुरूवातीला एका डागावर प्रयोग केला जातो. त्वचा तो रंग ग्रहण करत असेल तर २-३ महिन्यांनंतर त्वचेशी साधर्म्य असलेला रंग त्वचेच्या डर्मिस लेझरपर्यंत पोहोचवला जातो. यामुळे डाग दिसत नाहीत. परमनंट कलरिंगचा परिणाम २ ते १५ वर्षांपर्यंत राहतो.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मला माझे कर्ली केस सांभाळायला खूप त्रास होतो. कारण ते खूप गुंततात. त्याबरोबर निर्जीव व कोरडेही झाले आहेत? आणि गळुही लागले आहेत. कृपया काही उपाय सांगा.

कर्ली केसांना कोमट तेलाने मालीश केल्याने केसांना फायदा होतो. असे नियमितपणे केल्यास आपले कर्ली केस खूप सुंदर होतात. कोकोनट ऑइल, ऑलिव्ह किंवा मग आल्मंड ऑइलने आपण केसांना मसाज करू शकता. दररोज शाम्पू केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे केस गळती सुरू होते आणि केस डिहायड्रेट होऊ लागतात. त्यामुळे हा सल्ला दिला जातो की केस जास्त धुऊ नका.

कर्ली केस जास्त घट्ट बांधू नयेत. असं केल्यास कुरळे केस मुळातून कमजोर होऊन तुटू लागतात. जर आपले केस कुरळे असतील, तर ते हलके ओले असताना विंचरा. त्यामुळे केस कमी गुंततील. कुरळ्या केसांवर ड्रायरचा वापर कमी करा. कारण याच्या जास्त वापराने केस कमजोर होतात.

  • माझे वय ३५ वर्षे आहे. मी माझ्या कपाळावर मोठी टिकली लावते. त्यामुळे त्या ठिकाणी कायमचा स्पॉट पडला आहे. या स्पॉटला घरगुती उपायाने दूर केले जाऊ शकते का?

घरगुती उपचारांवर वेळ न घालवता जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवा. आपल्या मर्जीने कोणतेही औषध किंवा क्रीम वापरू नका. खरे तर खराब क्वालिटीच्या टिकलीमध्ये मोनोबँजॉइल इस्टस ऑफ हाइड्रोक्यूनोन पदार्थ आढळतो. त्यामुळे त्वचेला डाग पडतात. त्यामुळे ब्रँडेड टिकलीच लावा.

  • पेन्सिल आयलाइनर आणि लिक्विड आयलाइनरमध्ये कोण चांगला रिल्ट देतं?

लिक्विड आयलाइनरने डोळे जेवढे मोठे आणि आकर्षक दिसतात, तेवढे पेन्सिल आयलाइनरने दिसत नाही. लिक्विड आयलाइनर खूप वेळपर्यंत टिकून राहतो. ज्या लोकांची त्वचा ऑइली असते, त्यांच्यासाठी लिक्विड आयलाइनर एका जॅकपॉटप्रमाणे असतो. लिक्विड लाइनर दीर्घकाळपर्यंत त्याच शेपमध्ये राहतो. सोबतच हा अगदी स्वच्छही दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा पावडर आयलाइनर डोळ्यांच्या आजूबाजूला ऑइल प्रोड्यूस झाल्यामुळे दिवसभर त्याचा शेप खराब करू शकतं किंवा मग संपूर्ण पुसूनही जाऊ शकतं. लिक्विड आय लाइनरचा एक सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण याच्या मदतीने आपली काहीही क्रिएटिव्हिटी करू शकता.

माझे वय २० वर्ष आहे. माझी नखं खूप खरखरीत आणि कडक आहेत. ती सॉफ्ट करता येतील का?

नखे केवळ ती नाहीत, जी दिसतात. नखांच्या दिसणाऱ्या भागाला नेल प्लेट म्हणतात. त्याच्याखाली नेल बॅड असतो. तो सामान्य त्वचेसारखा असतो. नेल मॅट्रिक्सला मिळणारे पोषक तत्त्वच नखे हेल्दी किंवा कमजोर होण्यास जबाबदार असतात. कोरडी व निर्जीव नखे व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, हृदयरोग किंवा रोगप्रतिकार क्षमतेच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी १०० ग्रॅम बिटाचे सेवन रोज जरूर करा. त्याचबरोबर आयर्न, व्हिटॅमिन डी व कॅल्शियमयुक्त भोजन नियमितपणे घ्या.

  • माझे वय २६ वर्षे आहे. मला नखे वाढविण्याचा खूप शौक आहे. पण माझ्या नखांचा रंग पिवळा आहे, जो दिसायला चांगला दिसत नाही. काही घरगुती उपाय आहेत का, जेणेकरून माझ्या नखांवर चमक येईल व ती पिवळी दिसणार नाहीत?

ऑलिव्ह ऑइल नखांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे नखांना पोषण मिळते आणि त्यात चमक येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलला हलके गरम करून बोटे आणि नखांवर मसाज करा. काही दिवसांतच उत्तम परिणाम दिसू लागतील. प्रत्येक ती गोष्ट ज्यात व्हिटॅमिन ई आहे, नखांसाठी खूप चांगली असते. याबरोबरच व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण आहार घेतल्यानेही नखांचे आरोग्य चांगले राहते.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची क्रीम लावते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर व्हाइट हेड्स येतात. आपण ते दूर करण्यावर उपाय सांगाल का?

व्हाइट हेड्स अॅक्नेचा एक प्रकार आहे, जे त्वचेची रंध्रे तेलाच्या पाझारण्याबरोबरच घाण जमा झाल्यामुळे उत्पन्न होतात. व्हाइट हेड्स त्वचेच्या अंतर्गत पातळीवर तयार होतात. त्यांना प्रकाश वगैरे मिळत नाही आणि त्यांचा रंग सफेद राहतो.

आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्या तेल असते. जे आपल्या त्वचेमध्ये ओलावा आणि मॉइश्चरायजर टिकवून ठेवते. जर आपल्या त्वचेवर जास्त तेल तसेच राहील, तर त्यामुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम अशा असतात, ज्या आपल्या त्वचेला अजून चिकट बनवतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर मुरमे येऊ लागतात. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर आपण ऑइल फ्री क्रीमच लावा

व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी मेथीच्या पानात पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळा. विशेषत: जिथे व्हाइट हेड्स असतील, तिथे चोळा. या प्रक्रियेमुळे व्हाइट हेड्स निघून जातात. पेस्ट सुकल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

सौंदर्य समस्या

*समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • माझ्या कपाळाच्या दोन्ही बाजूला काळसर डाग आहेत. कृपया उपाय सांगा?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसनाचा वापर उत्तम आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, २ चमचे बेसन यांचं चांगलं मिश्रण करून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून सुकू द्या. असं दिवसातून एकदा नियमित करा. काळसर डाग नाहीसे होतील.

  • सकाळी उठल्यावर माझा चेहरा नॉर्मल भासतो. पण दुपारपर्यंत लाल होतो. हे कशामुळे होतं?

ऊन, काळजी, चॉकलेट व मसालेदार खाणं वगैरे यामुळे असे त्वचेचे आजार होतात. यावर उपाय म्हणजे रोज चेहरा नीट साफ करा व आहारांकडे विशेष लक्ष द्या. उन्हात जायचं असल्यास १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा, जे तुमच्या स्कीनचं युव्हीए व युव्हीबीपासून संरक्षण करेल. जास्तवेळ उन्हात राहायचं असेल तर २ तासांनी परत सनस्क्रीन लावा. भरपूर पाणी प्या.

  • माझ्या कपाळावर व ओठांभोवती काळपटपणा आला आहे. यावर उपाय काय?

ओठांच्या काळपटपणासाठी आधी ओठांना माइश्चराइज करण्याची गरज आहे. यासाठी भरपूर पाणी प्या. रात्री झोपण्याआधी बेंबीत ई-व्हिटामिन तेलाचे ३ थेंब टाका. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी गुलाबाच्या पानांची पेस्ट लावणे हा अचूक उपाय आहे. नियमित वापर केल्यास ओठांचा रंग हलका गुलाबी व चमकदार होतो. हवं असल्यास या पेस्टमध्ये तुम्ही थोडंसं ग्लिसरीन टाकू शकता.

  • मी १९ वर्षांची आहे. एक वर्षापूर्वी मी भुवयांवर पियरसिंग केलं होतं. पण मला आता त्यात काही घालायचं नाही. मी हे कॉस्मेटिक सर्जरी करून बंद करू शकते का? यात किती खर्च येईल?

नक्कीच. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या रिकाम्या जागा भरू शकता. यात कमीतकमी रू. १०-३० हजार रुपये खर्च आहे.

  • मी ४५ वर्षांची आहे. माझे केस खूप तेलकट आहेत. आठवड्यातून मी ३-४ वेळा शाम्पूने केस धुते. पांढऱ्या केसांसाठी डाय करते. परंतु १५-२० दिवसात परत भांगाच्या आसापास पांढरे केस दिसू लागतात. मी माझ्या केसांबद्दल चिंतीत आहे. केस दिर्घकाळ काळे राहावे यासाठी सोपा उपाय सांगा?

तेलकट केसांसाठी पाण्यात १ चमचा व्हिनेगर, २-३ थेंब लव्हेंडर इसेंशियल तेल टाकून केस धुवा. कलर्ड केसांसाठी असा कोणताही स्थायी उपचार नाही. पण जर तुम्ही प्रोफेशनल सलूनमध्ये जाऊन वर टचअप केला तर फायदा होईल.

केस सौम्य शाम्पूने धुवा. जमल्यास जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या वाटून १ चमचा भिजवलेल्या मेथ्या बारीक करून मिश्रण तयार करा. ते २-३ तास डोक्याच्या त्वचेवर लावा व नंतर शाम्पू करा.

  • मी २५ वर्षांची आहे. माझे केस खूप गळतात. असा काहीतरी घरगुती उपाय सांगा, ज्यामुळे केस गळणं कमी होईल?

केस गळण्यामागे चुकीची जीवनशैली, सुंतलित आणि पौष्टिक आहाराचा अभाव, प्रदूषित वातावरण आणि हार्मोन्समधील बदल अशी बरीच कारणं असतात. सोबतच एखादा आजार वा औषधाच्या सेवनामुळेही केसगळती होऊ शकते. आधी तुम्ही तुमचे केस गळण्याची कारणं जाणून घ्या. मग त्यानुसार उपाय करा.

घरगुती उपाय म्हणून आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मसाज करा आणि दही लावा, केसगळती थांबवण्यासाठी दही हा घरगुती उपाय आहे. दह्यामुळे केसांना पोषण मिळते. केस धुण्याच्या कमीत कमी ३० मिनिटं आधी दही लावा. दही सुकलं की केस धुवून टाका.

दुसरा उपाय म्हणून कोमट ऑलिव्ह तेलात १ चमचा मध आणि १ चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट करा आणि अंघोळीआधी केसांना लावा. एका तासाने केस शॉम्पूने धुवा. यामुळे केसगळती थांबते.

  • मी २९ वर्षांची आहे. माझी समस्या ही आहे की माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं आली आहेत आणि माझी त्वचासुद्धा फिकट पडली आहे. चेहऱ्यावरचं तेज परत मिळवण्यासाठी उपाय सांगा?

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तळांमुळे वय जास्त दिसतंच शिवाय चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. बऱ्याच काळासाठी चुकीचा आहार, संगणकाचा अतिवापर, त्वचेमध्ये पाण्याची कमतरता, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ही वर्तुळं घालवण्यासाठी  बदामाच्या तेलाने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा. हवं तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अंडरआय क्रिमचाही वापर करू शकता.

तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. वाटलं तर तुम्ही दहीसुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. दही त्वचेच्या आत लपलेली घाण दूर करून चेहऱ्यावरचे डाग, मुरमं नष्ट करते.

सौंदर्य समस्या

– परमजीत सोई, ब्यूटी एक्सपर्ट

  • मी २० वर्षीय तरुणी आहे. चेहऱ्यावर व वरच्या ओठांवर लव आहे. वॅक्स केल्यानंतर डाग राहातात. हे हटविण्याचा उपाय सांगा?

अपरलिप्स व चेहऱ्यावरची लव व डाग हटविण्यासाठी हळदीची घट्ट पेस्ट बनवा व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करून त्या जागी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळूहळू डाग व लव विरळ होतील.

मी ३० वर्षीय महिला आहे. माझ्या समस्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल आहे. ते दूर करण्याचा उपाय सांगा?

डोळ्यांखालची काळी वर्तुळं कम्प्युटर स्क्रीनसमोर अधिक वेळ बसल्याने व झोप पूर्ण न होण्यामुळेदेखील होऊ शकतात. ते काढण्यासाठी झोपतेवेळी डोळ्यांच्या आजूबाजूला बदाम तेल वा अंडर आय जेल लावा. फायदा होईल. यासोबत पौष्टिक आहारदेखील घ्या.

  • मी १७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागदेखील पडले आहेत; ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसतो. मी खूप उपाय केलेत परंतु काहीच फरक पडला नाही. कृपया, मला ही समस्या दूर करण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहऱ्यावर पिंपल्स हे प्रदूषण व हार्मोनल बदलामुळे होतात. पिंपल्सचे डाग हटविण्यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. याव्यतिरिक्त बटाट्याची सालं चेहऱ्यावर चोळा. दही व बेसनचं उटणे लावा. लिंबाच्या रसात हळद मिसळून पेस्ट बनवा व पिंपल्सवर लावा. या सर्व घरगुती उपायांनी तुमच्या समस्येचं समाधान होईल आणि हळूहळू पिंपल्सचे डागदेखील विरळ होतील. याव्यतिरिक्त अधिक तेलकट अन्न खाऊ नका. जंक फूड खाऊ नका.

  • माझं वय २२ वर्षं आहे. माझी समस्या अशी आहे की थंडीत माझी त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेवर अजिबात चमक नसते. त्वचेतील ओलावा कायम राहावा यासाठी मला काय करायला हवं?

त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण पाण्याच्या अभावामुळेदेखील त्वचा कोरडी व रुक्ष होते. याव्यतिरिक्त त्वचेवर अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावा. त्वचेचा थंड वाऱ्यापासून बचाव करा. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घ्या. त्वचा जर अधिक कोरडी असेल, तर गुलाबपाण्यात ग्लिसरीन एकत्रित करून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळण्याबरोबरच चेहऱ्याचं टोनिंगदेखील होईल.

  • मी ३० वर्षीय स्त्री आहे. माझे केस खूपच कोरडे व रूक्ष आहेत. ते सिल्की व शाइनी बनविण्याचा एखादा उपाय सांगा?

खाण्यापिण्यात पौष्टिक तत्त्वांचा अभाव आणि धूळप्रदूषणामुळे केस निस्तेज व रुक्ष दिसू लागतात. त्यांची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या. घरगुती उपायासाठी तुम्ही २ कप गरम पाण्यात १ चमचा मध मिसळून केसांवर लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.

याव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलाने केसांना मसाज करा व हॉट टॉवेल थेरेपी घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि ते सिल्की व शाइनी बनतील.

  • मी ४२ वर्षीय स्त्री आहे. माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, ज्या मी मेकअपने लपविते तरीदेखील त्या दिसतात. सुरकुत्या कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?

सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही दुधाच्या पावडरमध्ये पाणी आणि मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. असं केल्याने तुमची त्वचा कोमल होईल आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यादेखील दिसणार नाहीत. याव्यतिरिक्त केळं मॅशकडून त्याचा पॅक चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानंतर चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्यादेखील कमी होतात.

  • मी २२ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर व्हाइटहेड्स आहेत, ज्यामुळे चेहरा खराब दिसतो. ते घालविण्याचे उपाय सांगा?

व्हाइटहेड्स तेलकट त्वचेवर अधिक येतात. यामुळे अशा स्त्रियांनी धूळमाती व प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर राहायला हवं.

तुम्ही भरपूर पाणी प्या. बाहेरून घरी आल्यावर त्वचेचं क्लीजिंग करा. यामुळे मृतत्वचा व रोगजंतू निघून जातील. क्रीमी व ऑइली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा कमीत कमी वापर करा. व्हाइटहेड्सवर लिंबाचा रस व काकडीचा रस लावा. स्टीम घेतल्यानेदेखील फायदा होईल.

  • मी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिंनी आहे. माझे हात व चेहऱ्याचा रंग सावळा आहे. त्यामुळे रंग उजळण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहरा व हातांचा रंग उजळण्यासाठी कच्चं दूध चेहरा व हातांवर लावा. हे टोनरचं काम करेल. कच्चं दूध हात व चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि सुकल्यावर धुऊन टाका. यामुळे रंग उजळेल.

याव्यतिरिक्त पपईचा पल्प मॅश करून चेहरा व हातांवर लावा. यामुळेदेखील रंग उजळेल. घरातून निघतेवेळी चेहरा व हातांवर एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावावं.

सौंदर्य समस्या

* शंकाचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा, यांच्याकडून

माझ्या डोक्यावर खूप कमी केस आहेत. ते पातळ, मऊ आणि तेलकट आहेत. स्विमिंग केल्यानंतर केस निर्जीव आणि कोरडे होतात. त्यांना निरोगी राखण्यासाठी मी काय करू? कृपया हेसुद्धा सांगा की हेअरस्टाइल करताना केसांमध्ये बाउन्स आणण्यासाठी काय केलं पाहिजे?

स्विमिंग पूलमध्ये पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. यामुळे केस निर्जीव आणि कोरडे बनतात. जेव्हा तुम्ही शॉम्पूने केस धुवाल तेव्हा केसाच्या टोकांना कंडीशनर नक्की लावा. केस लहानपणापासूनच पातळ असतील तर काही उपाय करणं कठीण आहे.

हवं तर काही घरगुती करू शकता. दह्यामध्ये मेथी पावडर, आवळा आणि शिकेकाई भिजवून घ्या. या मिश्रणामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं तेल घालून उकळून घ्या. जेव्हा हे लिक्विड अर्ध होईल, तेव्हा ते गाळून त्याने केसांना मालिश करा. यांसह प्रथिनयुक्त आहार घ्या. याशिवाय हेअरस्टाइल करण्याआधी केसांना जेल मूज लावा. त्यानंतर सगळे केस पुढे घेऊन फ्लॅट फणीने केस विंचरा. मग केस मागे घेऊन झाडा. असं केल्याने केसांमध्ये बाउन्स येईल. स्काल्पपासून वर बोटे फिरवल्यानेही केस बाउन्सी होतात.

मी २४ वर्षांची आहे. माझ्या हाताच्या आणि मानेच्या काही भागात टॅनिंग झालं आहे. काही अँटी टॅनिंग क्रिम्स वापरून पाहिल्या. पण काहीच फरक पडला नाही. कृपया सांगा मी काय करू?

तुम्ही २० दिवसांतून एकदा ब्लिच करून घेऊ शकता. यामुळे टॅनिंग निघून जाईल आणि त्वचासुद्धा सॉफ्ट होईल. घरगुती उपाय म्हणून ओट्समध्ये पाइनअॅप्पल ज्यूस आणि स्ट्रॉबेरी पल्प मिसळून हात आणि मानेवर स्क्रब करा. पाइनअॅप्पल ज्यूसमुळे रंग उजळेल आणि स्ट्रॉबेरीमुळे त्वचा चमकेल.

माझं वय १९ वर्षं आहे. माझी त्वचा खूप तेलकट आहे. कडक ऊन असल्यावर चेहरा मेकअपनंतर एक-दोन तासांतच काळा पडू लागतो आणि चिकट होतो. कृपया काहीतरी घरगुती उपाय सांगावा?

तुम्ही मेकअपच्या फक्त वॉटरप्रुफ प्रोडक्ट्सचाच वापर करा. यामुळे मेकअप उतरणार नाही आणि चेहरा फ्रेश दिसेल. याशिवाय पर्समध्ये टू वे केक किंवा लूज पावडर टचअपसाठी ठेवू शकता. एक चमचा मुलतानी मातीमध्ये नारळ पाणी घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. या पॅकमुळे पोर्स बंद होतील आणि घामही येणार नाही.

माझं वय २० वर्षं आहे. माझे केस दाट आहेत, पण खूप कोरडे आणि द्विमुखी आहेत. मी हेअर स्पा आणि हेअर कटही वरचेवर करते. पण काहीच फरक पडत नाही. कृपया काहीतरी घरगुती उपचार सांगा?

केस जास्त स्ट्राँग केमिकलयुक्त शॉम्पूने धुतल्यामुळे आणि योग्य पोषण न मिळाल्याने केस द्विमुखी आणि कोरडे होतात. यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा आवळा किंवा भृंगराज तेलाने मालिश करा. प्रत्येकवेळी केस धुतल्यावर कंडीशनर लावा आणि केसांना माइल्ड हर्बल शॉम्पूनेच धुवा. द्विमुखी केस एखाद्या ब्यूटीपार्लमध्ये जाऊन कापून घ्या. द्विमुखी आणि कोरड्या केसांचं कारण कुपोषणही असते. त्यामुळे योग्य प्रमाणात प्रथिनयुक्त आहार घ्या.

मी २४ वर्षांची आहे. माझी नखं पिवळी दिसतात. मला नेहमी त्यावर नेलपेंट लावून ठेवावी लागते, सुरूवातीला नखे थोडीफार पिवळी दिसत होती. आता जास्त पिवळी दिसत आहेत आणि कुरुप वाटत आहेत. त्यांचा खरा रंग कसा परत आणता येईल?

शरीरात कॅल्शिअम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे नखं पिवळी पडू शकतात. तुमच्या आहारात दूध कमी असेल तर त्याचं प्रमाण वाढवा. शक्य असेल तर रोज एक अंडं खा. जर तुम्ही कॅल्शिअमयुक्त आहार योग्य प्रमाणात घेत असाल तर ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त आहाराचेही योग्य सेवन करा. शरीरात कॅल्शिअम नीट मिसळण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक आहे. नखांचा पिवळेपणा वाढत असेल तर नेलपेंट चांगल्या दर्जाची वापरा. निकृष्ट दर्जाच्या नेलपेंटचा रंग नखांवर उरतो आणि नखं पिवळी दिसू लागतात. याशिवाय नेलपेंट लावण्याआधी नखांवर बेस कोट लावा.

माझं वय २५ वर्षं आहे. माझी त्वचा खूप कोरडी आहे. मेकअप करूनही काही फरक पडत नाही. कृपया सांगा मी काय करू?

मेकअपने कोरड्या त्वचेवर काहीही परिणाम होत नाही. मेकअप करण्याआधी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ धुवून तिला काही मिनिटे मॉश्चरायज करा. याशिवाय ३-४ बदाम रात्रभर दूधात भिजवून ठेवा. सकाळी ते किसून त्यात केओलिन पावडर आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून स्क्रब करा, यामुळे त्वचा नरिश आणि मॉश्चराइज होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें