इंडियन आयडल मराठी’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

* सोमा घोष

‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत.

पहिल्यांदाच मराठी भाषेत! ‘इंडियन आयडल’ सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. एवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. प्रस्तुत ‘इंडियन आयडल मराठी’ महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही ५ रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. विजेतेपदासाठी सुरू असलेली चुरस, अनुभवण्यासाठी पाहत राहा, ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी येणार सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल !

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले आहेत. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला ‘इंडियन आयडल मराठी’चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. या स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. ग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाल्यावर या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी, स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून येणार आहेत. यावेळी त्यांना घरी परत आल्यासारखं वाटलं असं त्या म्हणाल्या.

अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमीळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातल्या एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचं पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झालं. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते आणि भजने यांचे गायन ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून त्या करताहेत. अनुराधा पौडवाल यांचा वरदहस्त स्पर्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला लाभणं ही स्पर्धकांसाठी भाग्याची गोष्ट ठरली आहे. ज्यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होतं अशा लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.

फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आणि त्यात अनुराधा पौडवाल यांना नक्की बघा.

सोनी मराठीवरील ‘इंडियन आयडल मराठी’

* सोमा घोष

२२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘Singing Star’ या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. Ajay-Atulहे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी  सुरांची पर्वणी असणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें