महिलांचे शोषण

* प्रतिनिधी

मुलगा जन्माला घालण्यासाठी महिलांवर किती दबाव असतो याचा नमुना दिल्लीतील एका गावात पाहायला मिळाला, ज्यामध्ये एका आईने आपल्या 2 महिन्यांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिला सुचले नाही तर तिला खराब ओव्हनमध्ये लपवले. तिने मूल चोरीला गेल्याचे नाटक करायला सुरुवात केली. या महिलेला आधीच एक मुलगा होता आणि सामान्यतः स्त्रिया एका मुलानंतर मुलीसह आनंदी असतात.

आपला समाज थोडाफार सुशिक्षित झाला असेल, पण आजही धार्मिक कथांचे दडपण इतके वाढले आहे की जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही एक ओझं वाटू लागते. आपल्या पौराणिक कथांमध्ये, मुलींना इतका शाप दिला जातो की प्रत्येक गर्भवती स्त्रीला मुलगा होण्याची कल्पना येऊ लागते.

या कथा आता आपल्या शिक्षणाचा भाग बनत चालल्या आहेत. स्त्रियांना त्यागाची देवता म्हणून संबोधून त्यांचे प्रचंड शोषण केले जाते आणि त्या आयुष्यभर रडत कल्पती राहतात. काँग्रेसच्या राजवटीत केलेल्या कायद्यात महिलांना हक्क तर मिळतातच, पण त्याचाही फटका महिलांना सहन करावा लागतो, कारण प्रत्येक हक्काचा उपभोग घेण्यासाठी त्यांना पोलीस आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो आणि जर भाऊ किंवा वडील त्यांच्याबरोबर जाण्यासाठी, नंतर मुलगी जन्माला आल्यावर ते शिव्याशाप देतात. प्रत्येक स्त्रीच्या अवचेतन मनात या पौराणिक कथा आणि स्त्रियांच्या व्रत-उत्सवांमुळे आपण हीन आहोत आणि आपल्या सुखाचा त्याग करावा लागतो, असा विचार निर्माण झाला आहे.

गमतीची गोष्ट म्हणजे धर्माचे वर्चस्व असलेल्या जवळपास सर्वच सुसंस्कृत समाजात स्त्रिया कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडतात. पाश्चिमात्य श्रीमंत देशांमध्येही महिलांचा दर्जा पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आहे आणि समान पात्रता असूनही त्या विशेष बिलिंगला बळी पडतात आणि एका आवाजानंतर त्यांची बढती थांबते. संपूर्ण जगावर पुरुषांचे वर्चस्व असताना, दिल्लीच्या चिराग दिल्ली गावातील नवख्या आईला मुलगा जन्माला आल्यावर आपली चूक दिसू लागली आणि चूक सुधारण्यासाठी त्याने त्याची हत्या केली यात नवल नाही.

आता या महिलेला शिक्षा करण्यापेक्षा तिला काही दिवस मानसिक रुग्णालयात ठेवावे. ती गुन्हेगार आहे पण तिला पळवून नेल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले तर पती आणि मुलाचे जगणे कठीण होईल. नवरा दुसरं लग्न करू शकत नाही किंवा एकटा घरही चालवू शकत नाही.

 

७५ वर्षांत किती बदलले महिलांचे जीवन

* गरिमा पंकज

अलीकडेच ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या तारिणी नौकेवर स्वार होऊन ६ महिला अधिकाऱ्यांनी साहसी मोहीम राबवली. तो दिवस १९ सप्टेंबर, २०१७ हा होता, जेव्हा ऐश्वर्या, एस. विजया, वर्तिका जोशी, प्रतिभा जामवाल, पी. स्वाती आणि पायल गुप्ता यांनी समुद्र्मार्गे आयएनएस तारिणीवरून प्रवास सुरू केला. १९ मे, २०१८ रोजी २१,६०० नॉटिकल मैल म्हणजेच २१६ हजार नॉटिकल मैल अंतर यशस्वीपणे पार करून त्या परतल्या होत्या. या मोहिमेला सुमारे २५४ दिवस लागले आणि मोहीम फत्ते करून या ६ नौदल महिला अधिकाऱ्यांनी इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले.

२१ मे, २०१८ रोजी त्या ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पोलंड आणि दक्षिण आफ्रिकेतून गोव्यात पोहोचल्या. त्यांच्या समोरही तितकीच आव्हाने होती जितकी पुरुष अधिकाऱ्यांसमोर असतात, पण त्यांनी नेटाने लढा देत यश मिळवले. ही आहे आजच्या स्त्रीची बदललेली प्रतिमा. या आहेत जोखीम पत्करून त्याचा धाडसाने सामना करणाऱ्या आजच्या महिला.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक कालावधीतील या प्रवासात देशातील महिलांचे जीवनमान खूप बदलले आहे. त्यांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. त्यांना अनेक अधिकार मिळाले आहेत. अनेक बंधनांपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. अनेक प्रकारच्या हक्कांसाठी त्या लढल्या आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी यशाची पताका रोवली असून अनेक क्षेत्रांत पुरुषांना मागे टाकले आहे, पण हेही नाकारता येणार नाही की अजूनही त्यांना जाचक रूढी-परंपरांचा त्रास सहन करावा लागत आहे. आजही त्यांना समाजात दुय्यम दर्जा आहे. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार होत असून आजही त्यांची झोळी रिकामीच आहे.

चला, या ७५ वर्षांत महिलांच्या आयुष्यात कोणते बदल झाले ते पाहूयात.

समाज आणि कुटुंबातील महिलांच्या स्थितीत हळूहळू का होईना, पण सकारात्मक बदल होत आहेत.

स्त्री सुशिक्षित झाली

आपले अस्तित्व ओळखणे आणि आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी स्त्रीने सुशिक्षित असणे, आपले हक्क जाणून घेणे आणि आपली कर्तव्ये ओळखून न घाबरता पुढे जाणे गरजेचे असते. स्त्रीच्या विकासात शिक्षणाची फार मोठी भूमिका आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांना समान अधिकार मिळाले, त्यानुसार लिहिण्या-वाचण्याची संधी मिळाली. इथूनच अर्ध्या लोकसंख्येचे जग बदलण्यास प्रारंभ झाला.

शिक्षणामुळे महिला जागृत झाल्या. त्या परंपरागत आणि जुनाट विचारांतून बाहेर पडल्या. त्यांना स्वत:च्या हक्कांची जाणीव झाली. जेव्हा त्यांनी शिक्षण घेतले तेव्हा त्या नोकरीसाठी घराबाहेर पडल्या. पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांनी स्वत:चे स्थान निश्चित केले आणि आर्थिकदृष्ट्या त्या स्वावलंबी झाल्या.

महिला आता केवळ गृहिणीच्या भूमिकेपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक पाठबळ देत आहेत. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अशा महिला इतरांवर अवलंबून न राहता आपले कुटुंब, आई-वडील, पतीला आर्थिक मदत करू लागल्या आहेत. ज्या फारशा शिकलेल्या नाहीत, त्यांनाही आपल्या मुलींना चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. ही एक सकारात्मक बाब आहे.

गेल्या सात दशकांमध्ये महिलांच्या रोजगाराच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. आज अनेक महिला कंपनीच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक होत आहेत. त्या सर्वोच्च पदावर काम करत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करत आहेत. या सर्व बदलांमुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे.

त्या आपले म्हणणे सर्वांना पटवून देण्यास सक्षम आहेत. स्वत:चे हक्क मिळविण्यासाठी सज्ज झालेल्या दिसत आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याही स्वत:चे मत मांडू लागल्या आहेत. महिलांशी संबंधित अनेक मोहिमाही याच माध्यमातून सुरू आहेत, ज्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार, शिक्षणात महिलांचा सहभाग वाढला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या प्रवेशाचा टक्का सतत वाढत आहे. दशकभरापूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, शैक्षणिक क्षेत्रात महिलांचा सहभाग ५५.१ टक्के होता जो आता वाढून ६८.४ टक्के झाला आहे. म्हणजे या क्षेत्रात महिलांची वाढ १३ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान हे महिलांच्या जीवनातील शिक्षणाचे साधन बनले आहे. मोठमोठ्या शाळा महाविद्यालयांव्यतिरिक्त मुली घरी बसून अभ्यास करत आहेत. ऑनलाइन कंपन्यांशी जोडल्या जाऊन त्यांच्या उत्पादनांची विक्री करत आहेत. त्यांना स्वत:च्या अधिकारांची जाणीव होऊन त्या जागृत होऊ लागल्या आहेत.

मनानेही स्वतंत्र झाल्या महिला

महिला आता त्यांच्या मनाचे ऐकतात आणि त्यावर विचार करतात. योग्य निर्णय घेण्यासाठी मागेपुढे पाहात नाहीत. म्हणजेच त्या आता मनानेही स्वतंत्र होऊ लागल्या आहेत. आता त्यांनी काही करायचे ठरवले तर त्या ते करून दाखवतातच.

आजच्या महिला काहीतरी धाडसी आणि कठीण काम करण्याचा निर्धार करून ते यशस्वीपणे करायला शिकल्या आहेत. १०-२० वर्षांपूर्वीपर्यंत असे करण्याची साधी कल्पनाही त्या करू शकत नव्हत्या, पण आता त्यांच्याकडे योग्य मार्ग आणि हिंमतही आहे. एकमेकींकडूनही महिलांना प्रेरणा मिळत आहे. स्वतंत्र भारतातील महिलांची ही नवी, स्वतंत्र प्रतिमा आहे.

स्वत:ला केले सिद्ध

देशाचा विकास हा मानवी संसाधनांवर अवलंबून असतो. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही स्थान असते. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील नागरिकांना समान हक्क मिळाले, ज्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग खुला झाला. महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची क्षमता आणि कौशल्य सिद्ध करून दाखवले. खेळाचे क्षेत्र असो किंवा विज्ञान असो, राजकारण असो किंवा कार्पोरेट जग असो, अभिनय असो किंवा लष्करी क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो किंवा अभियांत्रिकी, सर्वत्र महिला आपली क्षमता सिद्ध करत आहेत.

आज परराष्ट्र आणि संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या महिलांकडे आहेत आणि त्या आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. त्या देशातील सर्वोच्च पदावर आहेत. फायटर पायलट बनून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठीही सज्ज आहेत. हे सर्व बदल अतिशय सकारात्मक आहेत. आता घरातली माणसे म्हणजे वडील असोत, भाऊ किंवा पती असो, हे सर्व महिलांच्या योगदानाला महत्त्व देत असून त्यांना सहकार्य करू लागले आहेत.

आपल्या इच्छेप्रमाणे जगणे

विशेषत: मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतातील महानगरांमध्ये आणि मोठया शहरांमध्ये राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या स्थितीत खूप बदल झाला आहे. आता त्यांना शारीरिक पोषण आणि मानसिक विकासाच्या समान संधी मिळत आहेत. रात्री-अपरात्री आवश्यक कामासाठी त्या निर्भयपणे घराबाहेर पडू शकतात. बिनधास्तपणे आपल्या आवडीचे कपडे घालू शकतात.

स्वत:च्या मनाप्रमाणे वागू शकतात. जोडीदाराची निवड स्वेच्छेने करण्याचा अधिकारही त्यांना मिळू लागला आहे. मनाला वाटले तर त्या बुरखा किंवा मग बिकिनीही घालू शकतात. स्वत:च्या मर्जीनुसार लिपस्टिक लावू शकतात किंवा मेकअप न करता फिरू शकतात. लग्न करायचे की नाही, हेही ठरवू शकतात. त्या स्वत:च्या इच्छेने एकट्या राहू शकतात आणि त्यासाठी कोणीही त्यांना टोमणे मारू शकत नाही. स्वत:च्या आवडीची नोकरी करून स्वावलंबी जीवन जगण्याची संधी त्यांच्याकडे आहे.

घरातही सन्मान

शिक्षण आणि जागृतीचा परिणाम कौटुंबिक हिंसाचारावरही झाला आहे. आता अशी प्रकरणे पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहेत. अहवालानुसार वैवाहिक जीवनात हिंसाचाराचा सामना कराव्या लागणाऱ्या महिलांचा टक्का ३७.२ वरून २८.८ टक्क्यांवर आला आहे. सर्वेक्षणानुसार आता केवळ ३.३ टक्के महिलांनाच गर्भधारणेदरम्यान हिंसाचाराला सामोरे जावे लागले.

एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, १५ ते ४९ या वयोगटातील ८४ टक्के महिला आता घरगुती निर्णय घेण्याच्या चर्चेत सहभागी होत आहेत. २००५-०६ मध्ये घरगुती निर्णयात विवाहित महिलांची टक्केवारी ७६ टक्के होती. ताज्या आकडेवारीनुसार सुमारे ३८ टक्के महिला एकटया किंवा संयुक्तपणे घर अथवा जमिनीच्या मालक आहेत.

आजच्या बदलत्या वातावरणात महिला ज्या प्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, एकत्रितपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, ही समाजासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. आज राजकारण, तंत्रज्ञान, सुरक्षा यासह ज्या कोणत्या क्षेत्रात महिलांनी पदार्पण केले तिथे त्यांना यश मिळाले आहे. आता अशी एकही जागा नाही जिथे आजच्या महिला स्वत:च्या अस्तित्वाचा ठसा उमटवत नाहीत. इतके सर्व करूनही त्या घराची जबाबदारीही सक्षमपणे सांभाळत आहेत.

अलीकडेच भारताने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने अभूतपूर्व पावले उचलली आहेत. देशाच्या संसद आणि राज्य विधिमंडळात महिलांचा एक तृतीयांश सहभाग निश्चिंत केला आहे. एवढे मात्र नक्की की, ज्या शिक्षित आणि पात्र आहेत त्याच आरक्षणाचा फायदा घेत आहेत. आजही पडद्यामागे राहणाऱ्या महिलांची अवस्था जैसे थे आहे.

अधिक प्रयत्न करणे गरजेचे

नाण्याची दुसरी बाजूही विचारात घेण्यासारखी आहे जिथे आजही महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. बलात्कार झाल्यानंतर आपला समाज त्या महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. एवढेच नाही तर स्त्री भ्रुण हत्येसारख्या घटनांमुळे महिलांच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत.

आजही महिलांना पाहिजे तितके पुढे येऊ दिले जात नाही आणि यामगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपला समाज पुरुषप्रधान आहे. परिस्थिती अशी आहे की, महिला ही पुरुषाच्या भोग विलासाची वस्तू मानली जाते. जाहिराती, चित्रपटांत तिला अश्लील स्वरूपात सादर केले जाते.

भारतापुरते बोलायचे तर आपल्याला असे दिसून येईल की, अजूनही आपल्या देशातील महिलांची स्थिती सुधारण्याची गरज आहे. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवून आपण महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू शकतो.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रगती झाली असली तरी आजही अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. लिंग गुणोत्तराच्या आधारावर देश अजूनही फारशी प्रगती करू शकलेला नाही.

शहरी भागात आरोग्य सेवांचा विस्तार झाला आहे, त्यामुळे माता मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गावांची स्थिती मात्र अद्यापही फारशी बदललेली नाही. युनिसेफनुसार, भारतात प्रसूतीदरम्यानचे माता मृत्यूचे प्रमाण आधीच कमी झाले असले तरी ते अजूनही खूप जास्त आहे. प्रत्येक देशात दरवर्षी सुमारे ४५ हजार महिलांचा मृत्यू प्रसूतीदरम्यान होतो.

वेतन असमानता

भारतातील धर्मादाय संस्थांचे आंतरराष्ट्रीय महासंघ ऑक्सफॅमच्या मते पुरुष आणि महिलांमधील वेतन असमानता ही जगातील सर्वात वाईट असमानता आहे. मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स (एमएसआय)नुसार पुरुष आणि महिला दोघांनी समान काम केले तरी त्याच कामासाठी भारतीय पुरुष महिलांपेक्षा २५ टक्के जास्त कमावतात.

महिला हिंसाचार ही भारतीय समाजातील प्रमुख समस्या आहे. महिला सुरक्षेच्या प्रचारासाठी ‘‘मुलींनी कसे वागावे?’’ हे त्यांना शिकवण्याऐवजी पुरुषांना ‘‘सर्व महिलांचा आदर’’ करायला शिकवणे अधिक गरजेचे आहे.

देशाच्या पितृसत्ताक रचनेमुळे भारतात अजूनही घरगुती अत्याचार होत आहेत. संस्कृतीनुरूप ते स्वीकारण्यात आले आहेत. भारतातील तरुण पुरुष आणि महिलांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, ५७ टक्के मुले आणि ५३ टक्के मुलींचे असे मानणे आहे की, महिलांना त्यांच्या पतीकडून मारहाण करणे योग्य आहे.

२०१५ ते २०१६ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के नोकरदार महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून घरगुती अत्याचाराला सामोरे जावे लागते.

भारतीय महिलांचा लष्करातील सहभाग खूपच कमी आहे आणि अलिकडच्या वर्षांत त्यात घट झाली आहे. येथे स्त्री-पुरुष गुणोत्तर फक्त ०.३६ आहे.

महिलांना या गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळालेले नाही

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खास असतो, कारण या दिवशी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून स्वतंत्र झालो, पण महिलांच्या स्थितीबाबत बोलायचे झाल्यास आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांना अद्याप स्वातंत्र्य मिळालेले नाही. देशाच्या लोकसंख्येच्या ४९ टक्के महिला अजूनही सुरक्षा, गतिशीलता, आर्थिक स्वातंत्र्य, पूर्वग्रह आणि पुरुषप्रधान समाज यांसारख्या समस्यांशी लढत आहे.

न्याय करण्याचा अधिकार नाही

आपल्यासारखा पुरुषप्रधान समाज पुरुषांना निर्णय घेण्याचा अधिकार देतो, पण मुलींना नाही. बहुतेक मुली स्वत:च्या इच्छेनुसार शिकू शकत नाहीत. क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत, करिअर घडवू शकत नाहीत. इतकेच कशाला तर स्वत:चा जोडीदार निवडण्याचा अधिकारही त्यांना मिळत नाही. शिक्षण किंवा नोकरी इथपासून ते आर्थिक निर्णय आणि स्व:कमाईचा वापर इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींसाठी त्यांना पुरुषांचाच निर्णय मान्य करावा लागतो. पुरुषप्रधान समाजाच्या वर्चस्वामुळे भारतात स्त्रीभ्रुण हत्येच्या अनेक घटना घडत आहेत. हुंडयाच्या नावाखाली त्यांना जाळले जात आहे आणि त्यांचे अस्तित्व घराच्या चार भिंतींआड कैद करण्यात आले आहे.

हिंसा, अत्याचार आणि शोषणापासून स्वातंत्र्य नाहीच

भारतातील महिलांना दररोज याची आठवण करून दिली जाते की, त्या घर, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी किती असुरक्षित आहेत. घरात अन्याय, नवरा, सासूची मारहाण आणि टोमणे मारणे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ किंवा मानसिक दबाव, सोशल मीडियावर वाईट टिपण्णी, रस्त्यावर विनयभंग आणि बलात्कार, मोबाईलवर ब्लॅक कॉल्स अशा प्रसंगाना महिलांना दररोज सामोरे जावे लागते. कमावत्या २७ टक्के महिला शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात. ११ टक्के महिलांना इमोशनल ब्लॅकमेलिंग अर्थात भावनिक जाचाला सामोरे जावे लागते.

लग्नानंतर काम करण्याचे स्वातंत्र्य

भारतातील अनेक महिला आजही गृहिणीप्रमाणे जीवन जगत आहेत. यातल्या अनेक महिला घरकामात आनंदी असतात, पण काही नाईलाजाने घराबाहेर पडून नोकरी करू शकत नाहीत. आजही अनेक ठिकाणी महिला लग्नानंतर नोकरी करण्याचे स्वातंत्र्य महिलांना नाही. काही पुरुष आजही घरकाम हे महिलांचे काम समजून घरकाम करणे हा स्वत:चा अपमान समजतात.

मनाप्रमाणे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य

काही काळापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटलेल्या जीन्सवर म्हटले होते की, आजकाल महिला फाटक्या जीन्स घालतात. त्यांचे गुडघे दिसतात. हे कसले संस्कार? यातून मुले काय शिकत आहेत आणि महिला समाजाला कोणता संदेश देत आहेत अशी विधाने नेत्यांकडून किंवा देशाकडून अथवा तथाकथित हितचिंतकांकडूनही केली जातात. देशाला सांभाळणाऱ्यांचीच विचारसरणी अशी असेल तर तिथे महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य कसे मिळणार?

स्त्रीकडे केवळ शरीर म्हणून बघण्याची मानसिकता

महिलांनी आजवर जे काही मिळवले आहे तो त्यांचा स्वत:चा अनुभव आहे. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी ते मिळवले आहे, पण पुरुषप्रधान समाज हा लैंगिक विचारांपलीकडे जाऊ शकलेला नाही. स्त्रीकडे केवळ शरीर मानण्याची मानसिकता अजूनही आहे.

खाप पंचायतींच्या महिलांबाबतचे तुघलकी फर्मान लपून राहिलेले नाहीत. या समाजात बुलंदशहरसारख्या घटना रोजच घडत आहेत. त्या आपल्या प्रगतीशील समाजाला लागलेला कलंक आहेत. दलित, गरीब आणि अशिक्षित महिलांची काळजी घेणे दूरच राहिले, कारण शहरी लोकही या सामाजिक परंपरांचे ओझे वाहताना दिसत आहेत.

जगभरातील संसदेत महिलांच्या संख्येच्या बाबतीत भारत अजूनही १०३ व्या क्रमांकावर आहे. याउलट ज्यांना आपण आपल्यापेक्षा जास्त मागासलेले समजतो त्या नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या संसदेत महिला खासदारांची संख्या जास्त आहे.

भारतातील महिलांची स्थिती सुधारली, पण मार्ग खडतरच

आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारतात महिलांची स्थिती समाधानकारक असल्याचे म्हणता येणार नाही. देश आधुनिकतेची कास धरत असला तरी महिलांवरील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यांना आजही अनेक प्रकारच्या धार्मिक रूढी, लैंगिक गुन्हे, लिंग भेदभाव, घरगुती हिंसाचार, निम्नस्तरीय जीवनशैली, निरक्षरता, कुपोषण, हुंडाबळी, स्त्री भ्रुणहत्या, सामाजिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे.

काही महिलांनी यावर मात करून आपल्या देशाला विविध क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. यात स्व. इंदिरा गांधी, प्रतिभादेवी सिंह पाटील, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमन, महादेवी वर्मा, सुभद्रा कुमारी चौहान, अमृता प्रीतम, महाश्वेता देवी, लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अलका याज्ञिक, मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, मेधा पाटकर, अरुंधती रॉय, चंदा कोचर, पी.टी. उषा, सायना नेहवाल, सानिया मिझा, साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू, हिमा दास, झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर, गीता फोगट, मेरी कोम वगैरे नावे उल्लेखनीय आहेत.

भारतासारख्या पुरुषप्रधान देशात ७०व्या दशकापासून महिला सक्षमीकरण आणि स्त्रीवाद हा शब्द समोर आला. स्वयंसेवी संस्थांनीही महिलांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करून त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हरयाणा, राजस्थान, पश्चिमी उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणी स्त्री भ्रुणहत्या थांबवून लिंग गुणोत्तर आणि शिक्षण क्षेत्राचा घसरलेला स्तर संतुलित करण्यास तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात महिलांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना राबविण्यात येत आहे.

स्वातंत्र्यात्तर काळात महिलांना समान हक्क, संधीची समानता, समान कामासाठी समान वेतन, अपमानजनक प्रथांवर निर्बंध इत्यादींसाठी भारतीय राज्यघटनेत अनेक तरतुदी करण्यात आल्या. शिवाय, हुंडाविरोधी कायदा १९६१, कौटुंबिक न्यायालय कायदा १९८४, सती प्रथा बंदी कायदा १९८७, राष्ट्रीय महिला आयोग कायदा १९९०, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५, बालविवाह प्रतिबंध कायदा २००६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध) कायदा २०१३ इ. भारतीय महिलांना गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रमुख कायदे आहेत. अनेक राज्यांतील गाव आणि नगर पंचायतींमधील महिलांसाठी राखीव जागांचीही तरतूद करण्यात आली आहे.

महिलांची सुरक्षा आणि समानतेसाठी उचलण्यात आलेले प्रत्येक पाऊल काही अंशी का होईना, पण महिलांची स्थिती सुधारण्यात प्रभावी ठरत आहे. तरीही सामाजिक सुधारणेचा वेग इतका मंद आहे की हवे त्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. म्हणूनच आता अधिक वेगाने या क्षेत्रात आपल्याला अधिक वेगाने शिक्षणाचा प्रसार आणि जनजागृतीचे काम करण्याची गरज आहे.

विकास आणि महिलांची प्रगती या दोन वेगळया गोष्टी नाहीत हे आपण समजून घेतले पाहिजे. याकडे दोन भिन्न दृष्टिकोनातून पाहिल्यास केवळ अपयशच मिळेल. महिलांचा विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आजही आपण मुलींना रात्री ९ नंतर बाहेर पडू देत नाही, कारण असुरक्षिततेची भावना इतकी आहे की, निर्भयासारख्या घटनेमुळे प्रत्येक वडील घाबरले आहेत. सरकारने समाजात सुरक्षेची हमी दिली तर कदाचित यात बदल होऊ शकेल. मुळात यासाठी कोणतेही प्रयत्न करण्याची गरज नाही तर सरकारने सुरक्षा आणि कौटुंबिक लिंगभेद दूर करायला हवा, फक्त एवढे प्रयत्न झाले तरी पुरेसे आहेत.

विचारच नव्हे लुकही झाला बोल्ड

* गरिमा पंकज

स्त्रिया आज घराचा उंबरठा ओलांडून उच्च पदांवरही स्थानापन्न झालेल्या आहेत. मिस वर्ल्डचा किताब मिळवणे असो किंवा मिस युनिव्हर्सच्या कॉर्पोरेट जगतात नाव कमवायचे असो किंवा पुरूषप्रधान क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेचे सादरीकरण असो. महिला सामाजिक बेड्या तोडून आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.

त्यांचे विचार बोल्ड झाले आहेत आणि त्याबरोबरच त्यांच्या लुक आणि व्यक्तिमत्त्वामध्येही बदल झाला आहे. पेहराव असो किंवा मेकअप बोल्डनेस आणि स्वातंत्र्य प्रत्येक पैलूमध्ये दिसून येत आहे.

चर्चेत राहणं आवडतं

हल्लीच दंगल फेम फातिमा शेख आपल्या बोल्ड फोटो शूटमुळे चर्चेत राहिली. फातिमाने इंस्टाग्रामवर २ बोल्ड फोटो शेअर केले. यात ती बीचवर स्विमसूटमध्ये दिसत आहे.

आज स्त्रिया अशा प्रकारच्या बोल्ड लुकद्वारे चर्चेत येण्यास घाबरत नाहीत, या उलट त्या याचा आनंद घेतात. बोल्ड लुकचे अजून एक उदाहरण मलायका अरोरासुद्धा आहे, जी नेहमी फॅशन आणि तिच्या बोल्ड स्टेटमेन्टसाठी चर्चेत असते.

क्रिएटीव्हिटीचे फंडे

आजकाल मुली आणि महिला फॅशनेबल आणि बोल्ड दिसण्यासाठी स्वत:ची अशी एक वेगळी स्टाइल बनवतात. स्टाइलमुळे स्वत:चे असे एक वेगळे स्थान निर्माण होते, जे लोक नेहमी लक्षात ठेवतात.

श्री लाइफस्टाइलच्या जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कपूर म्हणतात, ‘‘तुम्ही कुठला फॅन्सी ड्रेस घातला आहे याच्याशी लोकांना देणेघेणे नसते. तुम्ही तो कशाप्रकारे सांभाळत आहात ही गोष्ट महत्त्वाची आहे. ड्रेस लोकांच्या नजरेत आला पाहिजे आणि तो त्यांना आवडला पाहिजे. मग तो इंडियन असो की वेस्टर्न, प्रयत्न करा अशी स्टाइल बनवण्याची जी वेगळीही असेल आणि तुम्हाला शोभेलसुद्धा.’’

‘‘उदाहरण म्हणजे साडी एक पारंपारिक पेहराव आहे. पण हल्लीच्या मुली बॉलीवुडमधील ताऱ्यांकडून प्रेरित होऊन त्यालाही ग्लॅमरस टच देतात. साडीसोबत मॅडरिन कॉलर ब्लाऊज, हॉल्टर नेक ब्लाऊज, लोकट स्लीवलेस आणि नेट स्लिव्ह ब्लाऊज घातल्याने खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसतात.’’

फॅशनचा परिणाम प्रत्येक वयावर

महिला आता स्वत:वर वयाचा प्रभाव जाणवू देत नाहीत. आजच्या काळात फॅशनचे परिणाम सर्वच वयोगटावर दिसून येतात. आई, आजी, आत्या आधी साड्या व पंजाबी ड्रेसशिवाय काही वेगळे वापरत नसत. आता त्यांनाही तितकेच मॉर्डन दिसायचे असते. जितक्या त्यांच्या मुली आणि सूना दिसतात. आता त्याही जीन्स, ट्राउजर, टीशर्ट आणि शर्टमध्ये स्वत:ला कंफर्टेबल समजतात व तरूण दिसण्याचा प्रयत्न करतात.

आत्मविश्वासासाठी बोल्ड मेकअप

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या मेकअप आर्टिस्ट इशिका तनेजा म्हणतात की मेकअपमुळे व्यक्तिचे बाह्य सौंदर्यच उठून दिसते असे नाही तर, यामुळे जगासमोर स्वत:ला सादर करण्याचा आत्मविश्वासही बळावतो. मेकअपद्वारे सुंदर बनून स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास व चांगले घडण्याची मानसिकता ठासून भरली जाते. या आत्मविश्वासामुळे त्या जे काही काम करतात, त्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळते.

इशिका म्हणतात की मेकअप तुम्हाला गर्दीपासून वेगळे करतो. बोल्ड दिसण्यासाठी आजकाल ब्लॅक आणि ट्रान्सपरंट शेडच्या मस्काऱ्याऐवजी पिंक ग्रीन यलो असे कलरफुल मस्कारेही वापरले जातात. या कलरफुल शेड्स फक्त तुमचे डोळे मोठे व सुंदर बनवतात असे नाही तर ब्लॅक मस्काऱ्यापेक्षा जास्त आकर्षकही दिसतात.

बोल्ड लुकमध्ये लिपस्टिकच्या डार्क शेड्स जसे लाल आणि पिंक चेहऱ्याला आकर्षक लुक देतात एवढेच नाही तर डार्क कलर चेहऱ्याला जास्त काळ एनर्जेटिकही ठेवतात.

याचप्रमाणे डोळ्यांच्या स्मोकी लुकला बोल्ड मेकअपमध्ये जास्त पसंती दिली जाते, आयब्रोज पूर्णपणे वाढवून किंवा कुठल्याही आकाराशिवाय ठेवल्या जातात किंवा आकारही दिला जातो. पण मग पाँइंट्स न देता स्टे्ट ठेवल्या जातात. नखांना नवा लुक देण्यासाठी नेलआर्टचा वापर केला जातो.

कॉस्मेटिक सर्जरीने बोल्ड लुक

आज कॉस्मेटिक सर्जरीनेही कमाल केली आहे की लोक फक्त चेहराच नाही तर वॉर्ड पार्ट्सलाही नवा व बोल्ड लुक देऊ शकतात. मोठमोठ्या शहरातच नव्हे तर लहान लहान शहरातही बॉडी कंटूरिंग क्लिनिक उघडले आहेत. महिला जसे शिल्पा शेट्टीसारखे कर्व्ह, कॅटरिना कैफसारखे आकर्षक ओठ किंवा प्रियंका चोप्रासारखा सेक्सी लुक मिळवण्यासाठी व बोल्ड दिसण्यासाठी इथे लाखो रूपये खर्च करण्यासाठी मागे पुढे पहात नाहीत.

बीएलके सेंटर फॉर कॉस्मेटिक अॅन्ड सर्जरीचे डॉ. लोकेश कुमार सांगतात की कॉस्मेटिक सर्जरीद्वारे अनेक प्रकारे आकर्षक आणि बोल्ड लुक मिळवला जाऊ शकतो. जसे :

फेस लिफिटंग : फेस लिफिटंग दोन प्रकारे केले जाते. पहिली आहे पारंपरिक पद्धत ज्यात सर्जिकल प्रक्रियेद्वारा ढीली त्वचा आणि सुरकुत्या नीट केल्या जातात. हे पूर्णपणे एखाद्या ऑपरेशनप्रमाणे असतं आणि २-३ दिवस रूग्णालयात राहावं लागतं. सर्जरी करून पेशी व त्वचा घट्ट केली जाते.

ब्रेस्ट कंटुअर्स : अनेक स्त्रिया त्यांच्या स्तनांच्या आकाराने खुश नसतात. वाढत्या वयासोबत स्तनांचे सैलावणेही एक मुख्य समस्या आहे. ब्रेस्ट एनलार्जमेंट आणि ब्रेस्ट ऑगमेन्टेशनद्वारे स्तनांना मनासारखा आकार दिला जातो. ब्रेस्ट इनहांसमेन्टमध्ये सिलिकॉन इंप्लांट सर्वात जास्त प्रचलित आहे.

लिप सर्जरी : ही सर्जरी दोन कारणांनी केली जाते. एक तर ज्यांचे ओठ पातळ असतात त्यांच्यासाठी इनहांसमेंट सर्जरी केली जाते. या सर्जरीद्वारे ओठांमध्ये स्टफिंग करून त्यांचा आकार वाढवला जातो.

दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचे ओठ मोठे आणि जाड असतात, त्यांच्यासाठी लिप रिडक्शन सर्जरी केली जाते. सर्जरीऐवजी एक नॉन सर्जिकल प्रकारही आहे ज्यामध्ये फिलर्सने ओठांच्या दिसण्यात बदल केला जातो.

नोज शेपिंग : काही लोकांचे नाक त्यांच्या चेहऱ्याला साजेसे नसते. सर्जरी करून नाकाच्या आकारात बदल केले जातात. म्हणजे ते त्यांच्या चेहऱ्याला शोभून दिसेल. या सर्जरीसाठी रूग्णालयात दाखल व्हावे लागते आणि पूर्ण बरे होण्यासाठी कमीत कमी दोन-तीन आठवडे इतका वेळ लागतो.

टॅटू : हल्लीच्या मुलींना आपला लुक कूल आणि बोल्ड दिसण्यासाठी वेगवेगळे टॅटू वगैरे काढून घेण्याचेही वेड आहे. काही मुली आपल्या आईवडिलांचे नाव किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव असलेले टॅटू गोंदवून घेतात. बॉयफ्रेन्डचे नाव गोंदवून घेणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाही.

संसार मोडण्याचं कारण महत्त्वाकांक्षी पती किंवा पत्नी

* भारत भूषण श्रीवास्तव

दिग्दर्शक गुलजारचा १९७५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आंधी’ने ‘रेकॉर्डब्रेक’ यश संपादन केलं होतं. या चित्रपटावर त्या काळात वाद झालेच होते, त्याची चर्चा आजही ऐकायला मिळते. कारण हा चित्रपट दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आयुष्यावर बनला होता. या चित्रपटात संजीव कुमारने नायकाची आणि सुचित्रा सेनने नायिकेची भूमिका साकारली होती, जिचं २०१४ साली निधन झालं होतं.

‘आंधी’ चित्रपटाचा केंद्रीय विषय राजकारण होता, पण हा चित्रपट चालला तो तडा जाणाऱ्या दाम्पत्य जीवनाच्या सटीक चित्रीकरणामुळे. ज्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये इंदिरा गांधी स्पष्ट दिसत होत्या. त्याचबरोबर दिसत होत्या त्या एक प्रतिभासंपन्न पत्नीच्या इच्छा आकांक्षा, ज्या पूर्ण करण्यासाठी ती पतीचाही त्याग करते आणि मुलीचाही, पण त्यांना मात्र ती विसरू शकत नाही. पतीपासून वेगळी होऊन जेव्हा ती अनेक वर्षांनी एका हिल स्टेशनवर आपले राजकीय दिवस घालवायला येते, तेव्हा ती ज्या हॉटेलात थांबते, तिथला मॅनेजर तिचा पतीच निघतो.

पतीला पुन्हा आपल्याजवळ बघून वृद्ध होत चाललेली नायिका कमजोर पडू लागते. तिच्या लक्षात येतं की खरं सुख पतीच्या बाहुपाशात, स्वयंपाकघरात, घरसंसारात, आपसातील थट्टामस्करीत आणि मुलांच्या संगोपनात आहे, अशा चिखलफेक करणाऱ्या राजकारणात नाही. पण प्रत्येकवेळी तिला हीच जाणीव होते की आता या राजकीय दलदलीतून बाहेर पडणं कठिण आहे, जे तिच्या पतीला आवडत नाही. राजकारण आणि पती यापैकी एकाची निवड करणं तिला कायम द्विधावस्थेत टाकत असे. अशात तिचे वडीलही तिला कायम पुढे जाण्यासाठी भडकवत असतात. ही द्विधावस्था चेहऱ्यावरील भाव आणि संवाद इत्यादींच्या माध्यमाने सुचित्रा सेनने इतकी सशक्त बनवली होती की कदाचित खरा पात्रदेखील असं करू शकला नसता.

आरतीची भूमिका साकारणारी सुचित्रा सेन जेव्हा दाम्पत्यजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर पतीबरोबर फिरताना आणि रोमांस करताना दिसते, तेव्हा तर विरोधक तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागतात.

स्वभावाने हट्टी आणि रागिष्ट आरती या सगळ्यामुळे भडकते, कारण तिच्या नजरेत ती काहीच चुकीचं करत नव्हती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा तिला सर्वत्र हे विचारलं जातं की हॉटेल मॅनेजर जे.के.शी तिचे काय संबंध आहेत, तेव्हा मात्र ती शस्त्र टाकते, अशात तिचा पती तिची साथ देतो. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या जनता सभेत ती आपल्या पतीला घेऊन जाते आणि सर्वांना सत्य सांगते की ते तिचे पती आहेत. जर त्यांच्यासोबत फिरणं हा अपराध आहे तर हो तिने हा अपराध केला आहे आणि शेवटी रडत रडत भावुक होऊन आरती जनतेला म्हणते की ती मत नव्हे, त्यांच्याकडून न्याय मागत आहे.

जनताही तिला विजयी करून न्याय मिळवून देते. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ती जेव्हा हॅलीकॉप्टरमध्ये बसून दिल्लीला निघते, तेव्हा संजीव कुमार तिला सांगतो की मला तुला कायम जिंकताना पाहायचं आहे.

याच सुखावर चित्रपट संपतो. पण तिथेच ज्ञानी प्रेक्षकांसमोर हा प्रश्नदेखील सोडून जातो की ज्या पतीला करिअरसाठी सोडलं, त्याला सार्वजनिकरीत्या स्वीकार करणं हा राजाकारणाचा भाग नव्हता का? ही जनतेसोबत एक भावनात्मक ब्लॅकमेलिंग नव्हती का?

एकच गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात सगळं काही योग्य आहे. हेदेखील स्पष्ट होतं की एक महत्त्वाकांक्षी पत्नी जिला हरणं पसंत नाही ती जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.

इंदिरा गांधी: अपवाद आणि आदर्श

चित्रपट बाजूला ठेवला तर इंदिरा गांधी भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत. याचं कारण म्हणावं तर ७०च्या दशकात स्त्रियांवर अनेक बंधनं होती. त्यांचं महत्त्वाकांक्षी असणं गुन्हा समजला जायचा आणि या महत्त्वाकांक्षेची हत्या तेव्हा खूपच सहजपणे पतप्रतिष्ठा आणि समाज नावाच्या शस्त्राने केली जायची. मात्र इंदिरा गांधी याला अपवाद होत्या, म्हणूनच त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा जिवंत ठेवली आणि दाम्पत्य व संसाराच्या भानगडीत पडल्या नाही, ज्यामुळे त्या एक आदर्श आणि अपवाद ठरल्या नव्या पिढीला त्यांच्याबद्दल फक्त इतकंच माहीत आहे की त्या एक यशस्वी आणि लोकप्रिय नेत्या होत्या. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणत्या अटींवर मिळवल्या होत्या, याचं दर्शन ‘आंधी’ चित्रपटातून झालं आहे.

इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधीचा त्यांच्या पत्नीवर कसलाच जोर चालत नव्हता. त्यामुळे इंदिरा गांधी आपल्या आंतरजातीय प्रेम विवाहावर कधीच पस्तावल्या नाहीत आणि त्यांनी कधीच सार्वजनिकरीत्या आपल्या पतीची निंदानालस्ती वा चर्चाही केली नाही. या वैशिष्ट्यांमुळेदेखील ज्याला पतीचा मोठा सन्मान समजला गेला होता. त्यांना उच्च स्तरावर नेऊन ठेवलं होतं.

पण जेव्हा पत्नी इतकी महत्त्वाकांक्षी असेल की ती घर तोडायलाच निघाली असेल तेव्हा पतीने काय करायला हवं, जेणेकरून संसारही टिकून राहील आणि पत्नीला कसलं नुकसानही होणार नाही. त्या प्रश्नाची एक नव्हे अनेक उत्तरं असतील, ज्या खरंतर सूचना असतील, कारण हे देखील स्पष्ट आहे की पत्नी महत्त्वाकांक्षी असणं ही समस्या नाही, तर समस्या पतीकडून तिला मॅनेज न करू शकणं आहे.

याच शृंखलेत पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ६३ वर्षांच्या क्रिकेटर इमरान खानचंही नाव येतं, ज्यांनी आपल्या पत्नी रेहम खानला तलाक दिला. विशेष म्हणजे रेहम खान आणि इमरान दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. रेहमला पहिल्या पतीपासून ३ मुलं आहेत, तर इमरानलाही पहिल्या पत्नीपासून २ मुलं आहेत. वयानेही रेहम इमरानपेक्षा २० वर्षांनी लहान आहे.

या घटस्फोटाचं कारण त्या दोघांचं दुसरं लग्न किंवा मेळ नसलेलं लग्न नसून इमरानच्या मते रेहमची वाढती राजकीय इच्छा आकांक्षा जबाबदार आहे. इमरान पाकिस्तानच्या मुख्य राजकीय पक्ष तहरीके इंसाफ (पीटीआय)चे संस्थापक आणि पुढारी आहेत. अशीदेखील चर्चा आहे की रेहम पीटीआयवर अधिकार गाजवायला बघत होती. ती सतत पक्षाच्या बैठकीत जाऊ लागली होती आणि कार्यकर्त्यांची पसंतही ठरू लागली होती. पीटीआयची पाकिस्तानच्या सत्तेत काही दखल असो वा नसो, पण तिथल्या राजकारणात मजबूत पकड आहे, ज्यामुळे पाकिस्तानात इमरानच्या चाहत्यांची संख्याही जास्त आहे.

या तणावामुळे एकेकाळची बीबीसीची टीव्हीवरील निवेदिका असलेल्या रेहमदेखील असं वक्तव्य करून हे सिद्ध केलं की या घटस्फोटाचं कारण खरोखरंच तिची महत्त्वाकांक्षा आहे. रेहम सांगते की पाकिस्तानात तिला शिव्या दिल्या जायच्या. तिथलं वातावरण स्त्रियांच्या हक्कांच्या बाजूचं नव्हतं. ती तर संपूर्ण देशाची वहिनी झाली होती, ज्यांना हवं ते तिला शिव्या देऊ शकत होते.

घटस्फोटानंतर रेहमने हे सांगितलं की इमरानची इच्छा होती की तिने फक्त चूल पेटवावी म्हणजे एखाद्या पारंपरिक घरगुती बायकोसारखं राहावं, जे तिला मान्य नव्हतं. स्पष्टच आहे की या सगळ्यांमुळे खरोखरंच रेहमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या होत्या आणि इमरानला हे मान्य नव्हतं.

पती होण्याचा एक फरक

प्रश्न हा आहे की काय पतीकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की ते आपल्या पत्नींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास अडथळा ठरणार नाहीत. तर याचं उत्तर स्पष्ट आहे ‘नाही.’ कारण पुरुषांचा स्वत:चा अहंकार असतो. तो पत्नीला आपल्यापुढे जाऊन वेगळी ओळख निर्माण करण्याची आणि प्रसिद्ध होण्याची संधी देत नाही. मात्र याबाबत पूर्णपणे त्यालाच दोषी ठरवणंदेखील त्याच्याशी अतिरेकपणाचं ठरेल. जर पती म्हणू शकते की तिनेच का झुकावं आणि तडजोड करावी, तर पतीकडूनही हा हक्क हिरावला जाऊ शकत नाही. प्रश्न संसार आणि मुलांसोबत अघोषित असलेल्या विवाहाच्या नियमांचाही असतो.

१९७३ साली अमिताभ बच्चन आणि जया भादुरीचा चित्रपट ‘अभिमान’देखील बॉक्स ऑफिसवर बराच गाजला होता. या चित्रपटात पती पत्नी दोघेही गायक असतात, पण पत्नीला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे पती वैतागतो आणि एकमेकांपासून वेगळे होण्याची परिस्थिती निर्माण होते. पत्नी माहेरी निघून जाते आणि गर्भपात झाल्यामुळे दु:खी राहू लागते. मात्र नंतर पती तिची समजूत घालून तिला पुन्हा स्टेजवर आणतो आणि तिच्यासोबत गाणं गातो. पण असं तेव्हाच घडतं, जेव्हा पत्नीने पराभव पत्करलेला असतो.

एका मध्यमवर्गीय पतीचं आपल्या पत्नीचं यश आणि प्रसिद्धी पचवू न शकणं आणि त्यासाठी दु:खी, कुंठित आणि चिडचिडं होणं, या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. त्याला वाटतं की पत्नी पुढे गेल्यामुळे जग त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. पत्नीमुळे त्याच्या प्रतिभेचं योग्य मूल्यमापन होत नाहीए आणि लोक त्याची चेष्टा करत आहेत. आता एक नजर रीलऐवेजी रियल लाइफवर टाकली, तर इथे अमिताभ प्रसिद्धीच्या अलौकिक उंचीवर होता, हे तर प्रत्येकालाच माहीत आहे की इथे जया भादूरीचे अमिताभसाठी कितपत आणि काय काय त्याग केले आहेत. आपल्या पतीचं बुडणारं करिअर सावरण्यासाठी तिने ‘सिलसिला’ चित्रपटात काम करणंही स्वीकारलं होतं.

खरंतर प्रतिभासंपन्न महत्त्वाकांक्षी पत्नीचा पती कायम हीनभावना आणि कुंठितपणाला बळी पडत असल्याची गोष्ट सामान्य आयुष्यात घडत असल्याचं दिसून येतं. कारण त्याचा कमकुवतपणा दर्शवणारं एक सत्य त्याच्यासमोर उभं ठाकलेलं असतं आणि इथूनच सुरू होतो लढा, द्विधावस्था, चिडचिड आणि कुंठितपणा. पतीला हे चांगल्याप्रकारे माहीत असतं की तो पत्नीपेक्षा मागे आहे आणि हे सत्य सर्वांना कळत आहे. वैवाहिक जीवनाचा हा तो टप्पा असतो जिथे तो आपल्या पत्नीला नाकारू शकत नाही, स्वीकारूही शकत नाही आणि खरंतर पत्नीची यामध्ये काहीच चूक नसते.

एकीकडे यश आणि प्रसिद्धीच्या पायऱ्या चढणाऱ्या पत्नीला पतीचा कुंठितपणा आणि चिंता कळतच नाही आणि ती आपला प्रवास सुरूच ठेवते तर दुसरीकडे पतीला असं वाटतं की ती मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी असं करत आहे. अशावेळी गरज असते ती ‘अभिमान’ चित्रपटातील बिंदू, असराणी आणि डेविडसारख्या शुभचिंतकांची.

जे पतीपत्नीला समजवू शकतील की खरंतर दोघांपैकी चुकीचं कोणीच नाहीए. गरज वास्तविकता स्वीकारण्याची असते, जिथे कोणाचाच अपमान होणार नसतो.

पण असे शुभचिंतक चित्रपटांमध्येच आढळतात. खऱ्या जगात नाही. त्यामुळे पतीचा कुंठीतपणा नैराश्यात बदलू लागतो आणि तो अनेकवेळा क्रूरपणा करू लागतो.

अशा कुंठितपणापासून सुटका मिळवण्यासाठी ही गोष्ट फार गरजेची आहे की पतीने पत्नीची पात्रता आणि श्रेष्ठत्त्व मनापासून स्वीकारावं आणि पत्नीनेही पतीला सतत हे दर्शवून द्यावं की तिने आजवर जे काही मिळवलं आहे ते त्याच्या सहकार्यामुळेच आहे.

यात शंका नाही की महत्त्वाकांक्षी पत्नीचं पहिलं प्राधान्य तिचं आपलं ध्येय असतं, घर संसार, मुलं किंवा पती नाही. पण याचा अर्थ असा नसतो की तिला त्यांची कसलीच काळजी अगर पर्वा नाही. याचा हाच अर्थ असतो की तिला आपली प्रतिभा कळते, आपल्या ध्येयापर्यंत तिला पोहोचता येतं आणि कुठलीच तडजोड करण्यावर तिचा विश्वास नसतो.

लक्षात ठेवा

  • पतीपत्नीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा वैवाहिक जीवन आणि संसारासाठी चांगली नसते. म्हणून यापासून दूर राहा. एकमेकांच्या भावना आणि इच्छेचा मान राखल्यानेच ते दोघे त्या सर्व गोष्टी मिळवू शकतात, ज्या त्यांना हव्या आहेत.
  • पत्नीला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल वा काही बनायचं असेल तर काहीच चुकीचं नाही. हा तिचा हक्क आहे. पण पत्नींनी हेदेखील समजून घ्यावं की त्यांना जे हवं आहे, त्याने त्यांना काय मिळणार आणि यामुळे पतींच्या भावना दुखावत तर नाहीत ना…?
  • पतीचं प्रोत्साहन आणि प्रशंसा मिळाल्याने पत्नीची प्रतिभा आणखीनच उजळून निघते. तिचा विचार पतीला अपमानित करण्याचा नसतो. ही परिस्थिती तेव्हाच येते, जेव्हा पती आतल्या आत जळफळत असतो आणि पत्नीने जे यश मिळवलं असतं त्यातून तो स्वत:ला बाजूला करून टाकतो.
  • पत्नी कमवती असेल, सार्वजनिक आयुष्य जगत असेल तर पतीनेही हीन भावना न बाळगता आपल्या पत्नीवर अभिमान बाळगायला हवा.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें