* पूनम अहमद
मुंबईमध्ये राहणाऱ्या सुनीताची मुले नववीच्या वर्गात असताना ती आणि तिचा नवरा निलीन पुण्यात एका लग्नाला गेले होते. लग्नाला जाणे गरजेचे होते आणि त्यात मुलांची परीक्षा होती. बऱ्याच विचाराअंती पतिपत्नी मुलांची समजूत घातल्यानंतर कामवालीला सूचना देऊन २ रात्रींसाठी पुण्याला गेले.
ती म्हणते, ‘‘पहिल्यांदा तर माझ्या मनात याची चिंता वाटत होती की, आम्ही नसताना मुलांना काही अडचण भासू नये, आम्ही सोसायटीमध्येही नवीन होतो. मीही बरेच दिवस घरात राहून कंटाळले होते. याआधी कधी मुलांना एकटे सोडून गेलो नव्हतो. पण जेव्हा गेलो, तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ज्या गोष्टीची विनाकारण चिंता करत मी गेले होते, परंतु पहिल्याच रात्री मुलांशी बोलून इतका आनंद झाला, जेव्हा बघितले की दोघेही छानपणे आपापले काम करत आहेत, आमच्याशिवाय सर्व व्यवस्थित मॅनेज करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. तेव्हा कुठे मी माझी पहिली चाइल्ड फ्री ट्रिप मनापासून एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही दोघे बऱ्याच वेळा १-२ रात्रींसाठी बाहेर फिरायला गेलो, मुलांनीही हेच सांगितले की, आम्ही तर शाळा-कॉलेजमध्ये व्यस्त असतो, तुम्ही निर्धास्तपणे जाऊन येत जा.
‘‘मुले जेव्हा फ्री झाली तेव्हा त्यांच्यासोबत कधी फिरायला गेलो, नाहीतर आम्ही २-३ रात्रींच्या ट्रिपवरून आता १ आठवडयाच्या ट्रिपवर आलो आहोत आणि तसे वारंवार जात राहतो. काही दिवस एकमेकांच्या सहवासात स्वत:चा वेळ घालवून फ्रेश होऊन परत येतो. त्यामुळे मन आनंदी राहते.’’
आता तर कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे कुटुंबातील वेळ जास्तीचा झाला होता. बऱ्याचशा लोकांवर वर्क फ्रॉम होमचा फार ताण होता, घरातील इतर सदस्यांच्या गरजा आणि मुलांचे ऑनलाइन वर्ग यामुळे पती-पत्नीला एकमेकांबरोबरचे मोकळे क्षण फार मुश्किलीने मिळत होते. दोघांवरही कामाचा भरपूर ताण होता. कदाचित हेच कारण आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर पती-पत्नी एकमेकांसोबत चांगले क्षण घालवण्यासाठी मुलांशिवाय ट्रिपचे नियोजन करताना दिसले, जे कदाचित गरजेचेही झाले होते.
एक मजेशीर किस्सा
नीता तर तिचा एक मजेशीर किस्सा सांगताना म्हणते, ‘‘एकदा तिचा पती ऑफिसच्या काही मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात जात होता. तिथे माझी एक खास मैत्रीण राहात होती, मलाही असे वाटले की मीसुद्धा त्याच्याबरोबर जाऊन तिला तिथे भेटून येईन. मला एकच मुलगा आहे, जो त्यावेळी आठवीमध्ये होता. त्याच्या मित्राची आई म्हणाली की, मुलाला त्यांच्याकडे सोडून मी जाऊ शकते.’’
‘‘मी एका रात्रीसाठी गेले. मुलाने त्याचा वेळ त्याच्या मित्राच्या घरी इतका एन्जॉय केला की, त्यानंतर कित्येक दिवस तो सांगत होता की आई, पुन्हा तुझ्या कोणत्या मैत्रिणीला भेटायला जाणार असशील तर मी राहीन. त्यानंतर आम्ही पती-पत्नी जेव्हाही बाहेर गेलो, तेव्हा तो एकटा असताना कधी त्याच्या मित्रांना बोलवायचा, कधी त्यांच्या घरी जायचा. आम्हीही छोटे हनीमून साजरे करून यायचो आणि मुलगाही त्याचा वेळ छान एन्जॉय करायचा.’’
बऱ्याचशा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज प्रौढांना याप्रकारे वेळ घालवण्यासाठी बरेचसे पर्याय आणि ऑफर देत असतात. लक्झरी रिसॉर्टची संख्या वाढत चालली आहे. काही विमान कंपन्या तर छोटया मुलांपासून लांब बसण्यासाठी सीट निवडण्याचा पर्यायही देतात. चला तर या ट्रेंडबद्दल काही बोलू :
एकांतही आणि मज्जाही
मुलांशिवाय पती-पत्नीने एकटेच ट्रिपला जाणे ही काही नवीन गोष्ट नाही. ९०च्या दशकात कॅरेबियन सिंगल्स रिसॉर्टने ही कल्पना समोर आणली होती. हा ट्रेंड कोणालाही एका रुटीन जीवनातून एक वेगळी वैयक्तिक मोकळीक देतो. मग सनसेट क्रुजवर जाणे असो, तारांकित स्पा ट्रीटमेंट असो, यात कोणत्याही प्रकारची रोमांचकारी अॅक्टिव्हीटी प्लॅन केली जाऊ शकते.
आजकाल भारतात हा ट्रेंड अनेक कारणांमुळे प्रचलित आहे. व्यस्त जीवनशैली, मुलांची देखभाल आणि त्यांची कधीही न संपणारी कामे, तसेच अन्य जबाबदाऱ्या पार पाडतापाडता सद्यस्थितीत प्रौढ जोडपी एकमेकांसोबत वेळ घालवणे विसरून गेली आहेत किंवा इच्छा असूनही एकमेकांच्या सहवासात राहू शकत नाहीत. आजकाल दोघे जेव्हा अशा प्रकारचा प्लॅन बनवतात, तेव्हा त्यांना चांगल्या ठिकाणी एकांताची अपेक्षा असते.
वी टाइम एन्जॉय
भारतात बरीचशी जोडपी गोवा, जयपूर, कुर्ग आणि उत्तरेकडील हिल स्टेशन्सवर जाणे पसंत करतात. तसेच परदेशात जाण्यासाठी आजकाल कित्येक लोक थायलंड, मेक्सिको आणि सॅशेल्सला जाणे पसंद करत आहेत. एडल्ट्स ओन्ली हॉलिडेज पॅकेजमध्ये कँडल लाईट डिनर्स, स्कूबा डायव्हिंग, जंगल सफारी आणि रेन फॉरेस्टचा आनंद घेतला जाऊ शकतो. जोडीदार आता वी टाइम एन्जॉय करू इच्छितात आणि करतही आहेत.