७ विंटर स्किन केअर टीप्स

* पूजा नागदेव, कॉस्मेटोलॉजीस्ट, फाउंडर ऑफ इनाचर

थंडीचा त्रास वयोपरत्वे अधिक धोकादायक होतो. जसजसे आपण मोठे होतो आपली त्वचा पातळ होत जाते. खासकरून काही अशा लोकांना जे उन्हाच्या अधिक संपर्कात राहतात. सोबतच वय वाढल्यामुळे आपलं शरीर अधिक कोरडं होत जातं.

अशावेळी हिवाळयात या स्किन केअर टीप्सचं पालन करणं खूपच गरजेचं आहे.

क्लिंजरचा वापर

वास्तविकपणे आपल्याला दररोज आपल्या शरीराला वरपासून खालपर्यंत साबणाने स्वच्छ करण्याची काहीच गरज नसते. मॉइश्चरच या जागी राहणं खूपच गरजेचं आहे, जिथे त्याची गरज आहे. जसं की काख, पाय आणि चेहरा. साबणाचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. परंतु साबणाचा वापर आपल्या त्वचेला कोरडं करतो. म्हणून गरजेचं आहे की आपल्या शरीरातील मॉइश्चर अधिकाधिक शरीरावर असावं आणि ते साबणाने काढता कामा नये.

जिथे खरी गरज आहे तिथे एक मुलायम सुगंध नसणाऱ्या क्लिंजर कॉपीचा वापर करा. अशी उत्पादनं शोधा ज्यामध्ये मॉइश्चराइजर वा तेल असावं. अशाप्रकारे तुम्ही या जागा स्वच्छ करण्याबरोबरच मॉइश्चराइजरदेखील करू शकता, जिथे मॉइश्चरची गरज असते.

थंड पाण्याने अंघोळ करा

हिवाळयातील सर्वात थंड दिवसात तुम्हाला गरम पाण्याने अंघोळ कराविशी वाटते. परंतु अधिक गरम पाणी तुमच्या शरीरातील नैसर्गिक बॅरियर खराब करू शकतं, जे शरीरातील मॉइश्चरला रोखण्यासाठी बनविण्यात आलेलं असतं.

टेंपरेचर कम्फर्ट होण्यासाठी पाणी पुरेसं गरम असायला हवं. लक्षात ठेवा की जर टेंपरेचर पाच वर्षाच्या मुलासाठी अधिक असेल तर ते तुमच्यासाठीदेखील अधिकच आहे. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमच्या त्वचेला दररोज पाण्याच्या संपर्कात आणणं गरजेचं आहे. तुमच्या त्वचेच्या सर्वात वरच्या थराला संपर्कात आणण्यासाठी १० ते १५ मिनिटे गरम पाण्याखाली बसा.

अंघोळीपूर्वी

शॉवर घेण्यापूर्वी लोशन वा क्रीम लावा, अन्यथा तुम्ही पाण्याच्या माइश्चराइजिंगचा लाभ घेऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही शॉवर घेऊन बाहेर पडता, तेव्हा तुमची त्वचा व्यवस्थित हायड्रेट होते. परंतु तुम्ही पाण्याची उणीव पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर एखादं तेल वा लोशन लावलं नाही तर तुमची त्वचा पूर्णपणे कोरडी होईल.

अनेक महिला बॉडी मॉइश्चराइज करण्यासाठी सुगंधित लोशन वा तेलाचा वापर करतात, जे शरीराला इरिटेट करू शकतं.

त्वचेला तेलापासून दूर ठेवू नका

भलेही तुमची त्वचा तेलकट किंवा मुरूम फुटकुळयानी भरलेली असेल परंतु तुम्हाला तुमच्या शरीराप्रमाणे स्वत:चा चेहरा धुतल्यानंतरदेखील सुगंध नसलेलं मॉइश्चराइजर लावणे गरजेचे आहे. तुमची त्वचा तेलकट असली तरीदेखील तुमच्या चेहऱ्या खालचा थर कोरडाच असतो. यासाठी एक हलका तेलमुक्त मॉइश्चराइजरचा वापर करा. खासकरून जर तुम्ही मुरूमपुटकुळया काढणाऱ्या उत्पादनाचा वापर करत असाल. प्रिस्क्रिप्शन वा ओव्हर द काउंटरची उत्पादनं मुरुमांना कोरडी आणि त्रास देणारी असतात. म्हणून तुम्हाला हे सहन करण्यासाठी सक्षम व्हावं लागणार.

सनस्क्रीनसोबत स्टिक करा

आपल्याला हिवाळयात भलेही ऊन लागत नसलं तरी हानिकारक किरण यामध्येदेखील असतात. ही किरणं चेहऱ्याच्या आतपर्यंत जातात, जे त्रासाचं प्रमुख कारण बनतात. जर तुम्ही अधिक काळ बाहेर रहात असाल तर एसपीएफ -३० सोबत दररोज एक मॉइश्चराइजर लावणं गरजेचे आहे. परंतु जर तुम्ही बाहेर असाल वा जर तुम्ही डोंगराळ भागात रहात असाल वा जिथे अनेकदा बर्फ पडत असेल तर तुम्ही दिवसातून अनेकदा मॉइश्चराइजर लावण्याची गरज आहे.

आरोग्याकडे लक्ष द्या

प्रत्येक ऋतूच्या हिशोबाने तुमच्या त्वचेची देखभाल करणं खूपच गरजेचं आहे. खासकरून जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या त्रासामुळे कंटाळलेले असता, जो अनेकदा हिवाळयात होतो. जसं की एक्?िमा इत्यादी. कोणतीही गोष्ट रोखण्यापेक्षा कोणतीही गोष्ट ठीक करण्याचा त्रास अधिक असतो. समस्या निर्माण होण्यापूर्वीच तुम्ही हिवाळयाच्या ऋतूमध्ये स्किनकेअर रुटीन सुरू करणं अधिक योग्य आहे.

त्वचेला करा हिवाळ्यासाठी तयार

-प्रीति जैन

हिवाळ्याचा ऋतू सुरू होताच त्वचा कोरडी व निर्जीव दिसू लागते. या ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

काही विशेष गोष्टींवर लक्ष देऊन या दिवसांतही सुंदर त्वचा मिळवता येऊ   शकते :

मॉइश्चरायझिं

दैनंदिन स्किन केअरसाठी दिवसा आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. मॉइश्चरायझरची निवड करतेवेळी हे जरूर पहा की त्यात ऑइलचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही. जर रात्री झोपण्याआधी तेलाने त्वचेला  मॉइश्चरायझ करत असाल तर बदाम, ऑलिव्ह, नारळ किंवा एवाकॉडो तेलाचाच वापर करा.

सनस्क्रीनची गरज

हिवाळ्यात सनस्क्रीनची गरज नसते हे अगदी खरे नाही. वास्तविक हिवाळ्यात आपली त्वचा उन्हाच्या जास्त संपर्कात येते. त्यामुले घरातून बाहेर निघण्यापूर्वी अर्धा तास आधी सनस्क्रीन जरूर लावावे. उन्हात जास्त वेळ थांबलात तर २-३ तासांनंतर पुन्हा लावावे.

स्किन एक्सफोलिएशन

हिवाळ्यात त्वचेला एक्सफोलिएट म्हणजेच त्वचेवरून मृत पेशी किंवा त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंगची गरज नसते हे पूर्ण खरं नाही. त्वचेचा मुलायमपणा व टवटवी टिकवून ठेवण्यासाठी स्किन एक्सफोलिएशनची गरज असते. ज्यामुळे मृत पेशी निघण्याबरोबरच रक्ताभिसरण होण्यासही मदत होते. एक्सफोलिएशनसाठी सौम्य व सी मिनरलयुक्त स्क्रबचा वापर करणं अधिक फायदेशीर असते.

बॉडी रॅप

हिवाळ्यात बॉडी स्पामध्ये बॉडी रॅप ट्रीटमेंट घेतल्याने शरीरात उत्साह, स्फूर्ती येते. या ट्रीटमेंटमध्ये शरीरावर तऱ्हेतऱ्हेचे लेप लावले जातात. ज्यामुळे मृत पेशी काढण्याबरोबरच त्वचेचा पोतही सुंदर बनवतात. या रॅप्समध्ये मड, सीमड इ मुख्य आहेत.

रिफ्रेशिंग फेशिअल वाइप्स

चेहरा सतत स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करण्याऐवजी फेशिअल वाइप्सचा वापर करावा, कारण फेशिअल वाइप्स त्वचा शुष्क न करता तुमच्या त्वचेला तजेलदार, स्वच्छ व चमकदार बनवू शकतात.

ग्लोइंग मेकअप

हिवाळ्यात गार वातावरणामुळे त्वचेचं सौंदर्य हरवते व त्यामुळे मेकअप केल्यानंतरही चेहऱ्यावर उठावदारपणा येत नाही. म्हणून नैसर्गिक चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आधी चेहऱ्याला  मॉइश्चरायझर करावे. मग स्कीनटोनच्या १ शेड डीपर मॅट पावडरचा वापर कपाळ, नाक व गालांवर करावा. निर्जीव त्वचा सतेज दिसावी म्हणून फाईन हायलायटरचा वापर करावा. मग ग्लॅमर ग्लोने फायनल टच द्यावा. ग्लॅमर ग्लो पावडरने तुमची त्वचा तजेलदार व सौम्य दिसेलय

डोळ्यांची काळजी

सिनिअर कन्सलल्टंट, आय सर्जन डॉ. विनोद गुप्ता यांच्या मते उन्हाळा असो वा हिवाळा, आपण शरीराच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करतो. पण डोळ्यांची काळजी मात्र फारशी घेत नाही. कारण ऋतू बदलाचा परिणाम आपल्या डोळ्यांवरही होत असतो.

डॉ. विनोद गुप्तांच्या मते, प्रत्येक ऋतुत आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्या. यासाठी तुम्ही चश्म्याचा वापर तणावपूर्ण व थकलेल्या डोळ्यांसाठी नैसर्गिक आरामदायी गुलाबजलचा उपयोग करू शकतो. पण जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अल्कोहोल फ्री उत्पादने

हार्श पिलींग स्क्रब, मास्क आणि अल्कोहोल बेस्ड टोनर अशा उत्पादनांचा वापर केल्याने त्वचा कोरडी होते व त्वचेला हानी पोहोचते. म्हणून हिवाळ्यात उन्हाळ्यातील स्कीन प्रॉडक्टचा वापर करू नका. हिवाळ्यानुसारच माईल्ड क्लीन्जर, स्क्रबर याचा वापर करावा. नॉन अल्कोहोल बेस्ड टोनर व डीप एसेंशिअल सब्सटंसेजयुक्त नरिशिंग मास्क वापरून तुम्ही तुमच्या त्वचेला नॅचरली यंग लुकींग स्किन बनवू शकता.

मॅजिकल रूटीन केअर

त्वचेला कायम तरूण, सुंदर राखण्यासाठी स्किनकेअर मॅजिकल दीपल पॉवर जाणून घेण्याची गरज आहे. सर्वात आधी चेहऱ्याला सौम्य नॉन अल्कोहोल बेस्ड क्लींजरने स्वच्छ करावे. विंटर स्मूद स्किनसाठी फेस सिरम व डीप  मॉइश्चरायझर मिसळून पूर्ण चेहऱ्यावर व मानेवर लावावे, त्यामुळे तुमची त्वचा रिहायडे्रट करून अॅन्टीएजिंगचे काम करेल.

सुंदर पाय

पायाच्या सुंदरतेमुळे व कुरूपतेमुळे व्यक्तिच्या सवयी व वागणूकीची माहिती मिळते. तसं बघता पायाची काळजी प्रत्येक ऋतूत व दरदिवशी घेतली गेली पाहिजे. पण हिवाळ्यात पायांच्या समस्यामध्ये अधिकच वाढ होते. उदाहरणार्थ पायाच्या भेगा, कॉर्न, फंगस, गांठ, टॅनिंग इ. फूट फॉर्मल किंवा प्रिमिअम स्टोनच्या मदतीने पायांची डेड स्किन काढून टाका, मग फूट मसाजर क्रिम किंवा  मॉइश्चरायझर क्रिममध्ये एसेंशियल ऑईलचे काही थेंब टाकून मालिश करा. हे अॅन्टीबॅक्टेरिअल व अॅन्टीफंगल असते. फंगल इन्फेक्शनमध्ये हे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय रोजमेरी ऑईल ब्लड सर्कुलेशन सुधारते. याचाही वापर तुम्ही करू शकता.

स्मूथ स्किन वॅक्सींग

असा समज आहे की हिवाळ्यात वॅक्सींगची गरज भासत नाही. पण हे खोटे आहे. नियमित वॅक्सींग केल्याने तुमची डेड स्कीन ही निघून जाते. त्यामुळे त्वचा मऊ मुलायम होते. बाजारात अनेक प्रकारचे वॅक्सींग उपलब्ध आहेत. यात हिवाळ्यासाठी उत्तम पर्याय आहेत. बॉडी बटर, रॉयल वॅक्स, लेमनग्रास, डर्ट रिमूव्हर, टॅन रिमूव्हर, चॉकलेट, डीटॅन, पॅच वॅक्सींग, एलोवेरा वॅक्स.

मिनरल ऑईल मेकअप रिमूव्हर

थंडीच्या दिवसात आपली त्वचा शुष्क व निर्जीव होते. घर आणि बाहेरचे तापमान यातील फरक तसेच हॉट ब्लोअरमुळेही त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते. त्यामुळे मेकअप काढण्यासाठीही नॉर्मल क्लीजिंग मिल्क ऐवजी मिनरल ऑईल बेस्ड मेकअप रिमूव्हरचा वापर करा. हे त्वचेची सौम्यपणे स्वच्छता करून त्वचेवर तेलाचा थर तयार करते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें