कसे सजवावे स्वप्नातील घर?

* गरिमा पंकज

घर म्हणजे स्वप्नांचे निवासस्थान जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत जीवनातील सुख-दु:ख वाटून घेता. या घराची सजावट अशी असावी की जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभवती शांततेची अनुभूती मिळेल.

घर मालकीचे असो किंवा भाडयाचे, तुम्ही एकटे राहात असाल किंवा कुटुंबासोबत, जर ते घर आकर्षक आणि आरामदायी असेल तर मनाला आनंद आणि आराम देते. त्या घरात तुम्ही जो काही वेळ घालवता तो तुमचा असतो. त्यामुळे घराची देखभाल आणि सजावटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घराच्या सजावटीत वेळोवेळी मोठे बदल करा आणि चांगल्या इंटीरियरचा आनंद घ्या. विशेषत: सणासुदीच्या काळात घर आकर्षक बनवण्याचे तुमचे छोटे छोटे प्रयत्न सणाचा आनंद द्विगुणित करतात.

चला तर मग, तुमच्या घराचे आतील भाग आकर्षक कसे बनवायचे ते जाणून घेऊया :

भिंतीना रंगकाम करा

तुम्ही असे केल्यास, तुम्हाला फार कमी खर्चात अतिशय सुंदर बदल दिसतील. पेंटिंगसाठी असा रंग निवडा जो तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करेल आणि खोलीला साजेसा ठरेल. जर तुमचा स्वभाव चैतन्यदायी असेल तर तुम्ही सोनेरी, पिवळा किंवा चमकदार हिरवा रंग निवडा. तुम्ही शांत आणि संयमी स्वभावाचे असाल तर राखाडी किंवा निळा रंग अधिक शोभून दिसेल.

वेगवेगळया खोल्यांना वेगवेगळे रंग लावा. खोलीच्या सर्व भिंतींवर एकच रंग लावण्याचा ट्रेंडही संपला आहे. भिंती वेगवेगळ्या शेड्सने रंगवा आणि लुक किती वेगळा वाटतो ते स्वत:च अनुभवा.

प्रत्येक भिंतीला वेगळा रंग द्यायचा नसेल तर दिवाणखान्याची एक भिंत इतर रंगांपेक्षा वेगळया रंगात रंगवून तुम्ही नाविन्याची अनुभूती घेऊ शकता. अधिक प्रकाशासाठी आणि घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी खोलीची एक भिंत गडद रंगात रंगवा.

तुम्ही काही डिझाइन्स करून तुम्ही याला क्रिएटिव्ह लुकही देऊ शकता किंवा लक्ष वेधण्यासाठी खोलीच्या कोणत्याही भिंतीवर तुम्ही वॉलपेपर लावू शकता. वॉलपेपर तुमच्या इंटीरियर डिझाइनला वेगळा लुक देऊ शकतो. त्यासाठी जास्त खर्च येणार नाही आणि भिंतींनाही छान लुक मिळेल. बाजारात सर्व प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत.

आरशांनी द्या घराला उत्कृष्ट लुक

घराला सुंदर आणि आधुनिक लुक देण्यासाठी आरशांचा प्रयोग करा. घराच्या भिंतींवर आरसे लावा. त्यामुळे प्रकाशाच्या परावर्तनाने सर्व खोल्या उजळून निघतात आणि मोठया दिसू लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टायलिश आरसा निवडणे आणि तो योग्य ठिकाणी लावणे. तुम्ही वेगवेगळया प्रकारच्या फ्रेम्स एकत्रित करून भिंतीवर कलाकृतीही करू शकता.

दिवाणखान्याच्या भिंतीचा रंग उजळ किंवा ऑफ-ब्राईट असेल तर क्लासी आरसा लावून खोलीला हटके लुक द्या. खोलीला सुंदर आणि आधुनिक बनवण्यासाठी मध्यभागी एक आरसा ठेवा. असे केल्याने, आरशावर पडणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे खोली अधिक उजळ होईल.

त्याचप्रमाणे बेडरूममध्ये आरसा लावल्याने तो प्रशस्त दिसेल आणि खोलीला साजेसा लुकही देईल. आरशामुळे बेडरूममध्ये प्रकाशाचे परावर्तन वाढेल आणि ती ग्लॅमरस दिसेल. पलंगाच्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या लॅम्प शेड्सभोवती अनेक लहान आकाराचे आरसे लावून तुम्ही बेडरूमला स्मार्ट लुक देऊ शकता. तुम्ही स्वयंपाकघरात छोटे-छोटे पुरातन आरसे लावून लहान कलाकृतीही करू शकता. ते अतिशय आकर्षक दिसते.

स्वयंपाकघर मोठे असेल तर त्यानुसार आरशाची फ्रेम, डिझाइन आणि आकार निवडा. बाथरूमला स्मार्ट लुक देण्यासाठी जड वजनाचे आणि जड फ्रेमचे आरसे वापरू नका तर हलके आरसे वापरा. तुम्हाला बाथरूमला क्लासिक टच द्यायचा असेल तर पारंपरिक फ्रेम आणि मेटॅलिक फिनिशिंग असलेले आरसे लावा.

घर सजवा नवीन फर्निचरने

कोणत्याही घराच्या सजावटीमध्ये फर्निचर हा अत्यंत आवश्यक घटक असतो. तुमच्या आवडीनुसार आरामदायी फर्निचर निवडा. तुम्ही वस्तू ठेवण्यासाठी रिकामे बॉक्स, एक मोठा बुक शेल्फ आणि छोटया वस्तू ठेवण्यासाठी खालच्या भागात एक कव्हर असेल असे स्टोरेज निवडा. या प्रकारचे स्टोरेज फर्निचर आकर्षक दिसेल आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोगही होईल. असे काही फर्निचर खरेदी करा जे नवीन डिझाईनचे आणि आकर्षक असेल, जेणेकरून ते घराचे रुप पालटेल.

तुम्ही एखादे शोकेस किंवा कपाटही खरेदी केले पाहिजे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवू शकता. मधल्या भागात दरवाजा बसवून तुम्ही त्यातही सामान ठेवू शकता. त्यात पुस्तके ठेवण्यासाठीही मोठी जागा असते. याशिवाय तुमची आर्टिफिशियल ज्वेलरी आणि लहान वस्तू ठेवण्यासाठी तळाशी एक छोटा बॉक्स असावा. असे फर्निचर दुहेरी कामाचे ठरते.

शिमरी टच

आजकाल लोक शिमरी म्हणजे चमकदार फर्निचर वापरायला लागले आहेत. तुम्ही तुमच्या कॉफी टेबल आणि एंड टेबल्समध्ये ब्रास शिमर वापरू शकता. प्लांटर्समध्ये ब्रास स्टँडही असू शकतो आणि विंटेज क्रिस्टल झुमर त्याला एक चांगली जोड ठरेल. तुम्ही क्रिस्टल पेंडंट लाइट आणि टेबल लॅम्प वापरू शकता. गालिच्यांवरही शिमर टेसेल्स घाला. तुमची लिव्हिंग रूम सीक्वेंन्स कुशन कव्हर्सने सजवा. सोनेरी कडा असलेल्या डिनर सेटने टेबल सजवा. आजकाल कटलरी हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे.

कलात्मक वस्तू ठेवा

कलाकृती, चित्रं, पेंटिंग्ज, कोणत्याही कार्यक्रमाचे पोस्टर्स, तुमची आवडती चित्रं आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी घराच्या भिंती सजवल्याने तुमच्या घराच्या सौंदर्यात भर पडते. भिंती सजवण्यासाठी फर्निचरशी जुळणारे रंग आणि थीम निवडा.

तुमच्या आयुष्यातील सर्वात खास आठवणींचे एक मोठे चित्र तयार करा आणि ते दिवाणखान्याच्या मुख्य भिंतीवर टांगून ठेवा किंवा तुमच्या आठवणींचे छोटे फोटो फ्रेम करून घ्या आणि भिंतीवर छान सजवा. जेव्हा लोक तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना तुमच्या सोनेरी आठवणी पाहून आनंद होईल आणि तुम्हीही हवे तेव्हा घरबसल्या तुमच्या आठवणी ताज्या करू शकता.

दिव्यांनी सजवा घर

घरातील दिवे आणि शेड्समध्ये काही बदल करा आणि काही सजावटीचे दिवे लावा. घरात ठिकठिकाणी छोटे आणि आकर्षक दिवे लावा किंवा तुम्ही दिवे लटकवूही शकता, ज्याच्या मिणमिणत्या प्रकाशाने घर उजळून निघेल. जर तुम्ही एकाच खोलीत अनेक दिवे लावणार असाल तर विविध आकार, प्रकार आणि विविध रंगांचे दिवे लावा.

नवीन पडदे लावा

सुंदर नवे पडदे लावून घर सजवणे हा जुना पण सोपा मार्ग आहे. घरातल्या फर्निचरशी जुळणारे पडदे घराला सुंदर लुक देतील. अनेक रंग आणि डिझाईनचे पडदे निवडा. यामुळे तुमचे घर शोभून दिसेल. आकर्षक पडदे कोणत्याही घराचे सौंदर्य वाढवतात. फक्त पडदे बदलून आणि त्यानुसार दिवाणखाना व्यवस्थित ठेवून घर सुंदर बनवता येते.

आजकाल कॉटन व्यतिरिक्त नेट, सिल्क, टिश्यू, ब्रासो, क्रश इत्यादीपासून बनवलेल्या पडद्यांना जास्त पसंती दिली जात आहे. नेटचे पडदे नवा ट्रेंड आहे. हे सर्व पडदे २०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ज्या खोलीत कमी प्रकाश आवश्यक आहे त्या खोलीत गडद रंगाचे पडदे लावा, ज्यामुळे उजेड कमी होईल. खोली मोठी दिसण्यासाठी हलक्या रंगाचे पडदे वापरा.

निसर्गाशी जोडले जा

थोडा वेळ जरी निसर्गाकडे बघितले तरी खूप प्रसन्न वाटते. निसर्गाचा काही भाग तुमच्या घरात आला तर तुमचे घर किती सुंदर दिसेल याची कल्पना करा. त्यासाठी घराच्या गच्चीवर किंवा व्हरांड्यात बाग करावी लागेल. घराबाहेर खिडक्यांवरही तुम्ही रोपे लावू शकता. तुम्ही काही इनडोअर रोपेही लावू शकता. त्यामुळे घर खूप सुंदर दिसेल. तुम्ही टेबलावर लहान रंगीबेरंगी प्लास्टिकची फुले किंवा फुलदाण्या ठेवू शकता. तसेच घराच्या एका कोपऱ्यातील रिकाम्या ग्लासमध्ये वाळू भरून तुम्ही ती घरातील एखाद्या शांत ठिकाणी ठेवू शकता.

चांगल्या अंतर्गत सजावटीसाठी, घरातील जास्तीत जास्त जागा कशी वापरता येईल आणि सर्व सामान व्यवस्थितपणे कसे ठेवता येईल याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे.

Diwali Special: उत्सवप्रसंगी असे सजवा घर

* नितीश चंद्रा, मॅडहोम डॉट कॉम

सण, उत्सव सुरू होताच सर्वांमध्येच उत्साह संचारतो. सर्वांनाच आपापल्या घरांना सजावट करून पारंपरिक तसेच आधुनिक रूप द्यायचे असते, जेणेकरून येणाऱ्या आप्तेष्टांसोबत दुप्पट उत्साहाने सण साजरा करता येईल.

आपल्या घराची सजावट नव्या ढंगात करण्यासाठी अशा अनेक वस्तू आहेत. विविध सजावटीच्या सामानासह तुम्ही अनेक प्रकारे घर सजवू शकता आणि प्रियजनांकडून प्रशंसा ऐकू शकता.

प्रकाश : घर आकर्षक बनवण्यामध्ये विविध प्रकारच्या लाइट्स खूप महत्त्वाच्या असतात. दिवाळी, नाताळ, गुरूनानक जयंती इ. सणांमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशाचे काही वेगळेच महत्त्व आहे. चमकदार रंगांच्या शानदार मेणबत्त्या, विविध आकारांमध्ये उपलब्ध असणारे मेणबत्ती स्टॅन्ड, टी लाईट स्टॅन्ड, ग्लास वोटिवच्या संग्रहाच्या वापराने तुम्ही आपल्या घरातील उत्सव उजळू शकता. भारतीय घरांमध्ये जर तांब्याचा दिवा नसेल तर सण अपूर्ण वाटतो. घराच्या दारावर कंदिलाच्या आकाराचे वोटिव किंवा लॉनमध्ये मेणबत्ती टी, लाइट हॉल्टर्सद्वारे घराला सुंदर रूप देऊ शकता. सुंगधित मेमबत्त्यांचा वापर तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकेल. सुरेख लॅम्पशेड्सद्वारे तुम्ही इंटिरियरला नवा लुक देऊ शकता. कोपऱ्यात ठेवलेला एखादा लांब लॅम्प शेड तुमच्या खोलीत प्रकाश पसरून बेडरूमचं सौंदर्य आणखी खुलवेल.

सेंटर पीसेस : सेंटर पीसेस शिवाय देशी डेकोर अपूर्ण आहे. यांचा वापर करून आपल्या घराला पारंपरिक रूप देऊ शकता. हल्ली विविध रूपात उपलब्ध पारंपरिक किंवा आधुनिक शैलीतील मुर्त्या सर्वांत जास्त पसंत केल्या जातात. यामध्ये तुम्ही लाल नारिंगी रंगाच्या नैसर्गिक फुलांचा वापर करून चैतन्य आणू शकता.

फुलदाणी : भारतीय संस्कृतीत फुलांना विशेष महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी घर सुगंधित आणि सुंदर दिसावे म्हणून फुलांचा वापर केला जातो. लिली, ट्यूलिप आणि ऑक्रिडची फुले घराला सुगंधित ठेवतात. बाजारात मिळणाऱ्या फुलदाण्यांमध्ये तुम्ही ही फुले ठेवू शकता. यामुळे घरातील सौंदर्य अजून उठावदार होईल.

रग्ज आणि गालिचे

फरशीवर रग्ज किंवा गालिचे अंथरून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता. घराच्या बाहेरील भागात जसे की अंगण आणि मोकळ्या भागात हातांनी विणलेले सुंदर गालिचे किंवा रग्जचा वापर करून तुम्ही पाहुण्यांवर छाप सोडू शकता.

चादरी/कुशन कव्हर/रूफुस

उत्सव सणांच्या दिवसांत बिछान्यावरील गडद रंगीत चादरींचा संग्रह घरात सकारात्मक उर्जा आणू शकतो. खोल्यांमध्ये असलेले शानदार डिझाइनचे कुशन कव्हर्ससुद्वा सर्वांचे लक्ष वेधून घेतील. बागेत सुंदर रूफुसचा वापर करून बाग अधिक सुंदर बनवू शकता.

ऐक्सेंट फर्निचर

ऐक्सेंट फर्निचर आपल्या अनोख्या डिझाइनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हल्ली बाजारात ऐक्सेंट खुर्च्या, वुडन चेस्ट, साईड टेबल्स तर सुंदर काउचेजसुद्धा उपलब्ध आहेत. या उत्सवांमध्ये अशा फर्निचरचा वापर करून आपण घराची शोभा वाढवू शकता व आपल्या सर्वोत्तम निवडीचीही सर्वांना जाणीव करून देऊ शकता.

डेकोरेटिव्ह आरसे

डेकोरेटिव्ह आरशांच्या वापरामुळे घरात अतिरिक्त जागेचा भास होतो आणि प्रवेश करतेवेळची छाया प्रतिबिंबित करतो. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवेशही होतो. या लहान परंतु कलात्मक वस्तूंनी तुम्ही घराचे सौंदर्य वाढवू शकता.

दस्तकारी आरशांचा वापर घराला विशेष सौंदर्य मिळवून देतो. तुम्ही बाजारात उपलब्ध आरसे जसे बाथरूममधील आरसा, विंटेज किंवा डेकोरेटिव्ह आरसा यापैकी योग्य पर्याय निवडावा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें