केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स : जर तुम्हाला तुमचे केस जलद वाढवायचे असतील तर या टिप्स फॉलो करा

* गृहशोभा टीम

केसांची काळजी घेण्याच्या टिप्स : केस हे तुमच्या सौंदर्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाला लांब, जाड आणि चमकदार केस हवे असतात. पण कधीकधी, कितीही प्रयत्न केले तरी, लांब केस मिळवणे हे स्वप्नच राहते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, येथे काही उत्तम टिप्स आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे केस जलद वाढवू शकता.

केसांची अशी घ्या काळजी

१. गरम तेल

ज्यांना केसांना गरम तेलाने मालिश करणे आवडते त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. निरोगी केसांसाठी आठवड्यातून एकदा गरम तेलाने मालिश करणे खूप महत्वाचे आहे. केस गळतीच्या समस्येपासूनही तेल मालिश केल्याने आराम मिळतो. जर तुम्हाला तुमचे केस जलद वाढवायचे असतील तर नारळ किंवा ऑलिव्ह तेलाने केसांची मालिश करणे चांगले.

२. ट्रिमिंग

जर तुम्हाला लांब केस हवे असतील तर कमीत कमी ८ ते १० आठवड्यांनी केस ट्रिमिंग करून घ्या. केस ट्रिम केल्याने केस जलद वाढण्यास मदत होते. प्रदूषण आणि सूर्यकिरण केसांना नुकसान करतात, म्हणून ते नियमितपणे ट्रिम करावेत. ट्रिम केल्याने, स्प्लिट एंड्स कापले जातात आणि केस वाढू लागतात.

३. केस विंचरा

केसांना कंघी करणे हे तेलाने मालिश करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. पण यासाठी योग्य कंगवा वापरणे देखील खूप महत्वाचे आहे. कंघी केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण योग्यरित्या होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी केसांना कंघी करायला विसरू नका. यामुळे मुळे मजबूत होतात आणि केसांची वाढही जलद होते.

४. कंडिशनिंग

तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल की केसांच्या खालचे केस मुळांच्या तुलनेत जास्त कोरडे आणि निर्जीव असतात. याचे मुख्य कारण म्हणजे केसांच्या खालच्या भागाला योग्य पोषण मिळत नाही. म्हणूनच केसांना कंडीशनिंग करणे खूप महत्वाचे आहे कारण ते केसांना नुकसान होण्यापासून वाचवते. शिवाय, केस निरोगी होतात.

गरजेचं आहे हेअर ऑइल मसाज

* गरिमा पंकज

ज्या प्रकारे शरीराला लुब्रिकेशन आणि नरिशिंगची गरज असते तसंच केसांना आणि स्काल्पलादेखील ऑइलची गरज असते. तेलं वेगवेगळया प्रकारचे असतात जे शरीराच्या वेगवेगळया गरजानुसार उपयोगी सिद्ध होतात. उदाहरणासाठी व्हेजिटेबल ऑइल, फ्लोरल ऑइल, मिनरल ऑइल, हर्बल ऑइल इत्यादी. यांचं स्वत:चं एक महत्त्व असतं, जसं एखाद्या लुब्रिकेशनसाठी, एखाद्या संपूर्ण आरोग्यसाठी किंवा एखाद्या नरिशमेंटसाठी, कधी एखाद्या गुडघ्यासाठी, त्वचेसाठी परिपूर्ण असतं.

स्काल्पमध्ये कोंडयाची समस्या, खाज, कोरडेपणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. खरंतर आपले केस अनेकदा तेलकट असतात. तुम्ही शाम्पू करता आणि संध्याकाळपर्यंत ते पूर्ण तेलकट होतात. याच्या विपरीत कधीकधी केस कोरडे आणि रफ होतात परंतु स्काल्प तेलकटच राहतो. जर एकाच जागी दोन वेगवेगळया प्रकारचे टेक्सचर आहेत आणि त्याचा पीएच बॅलन्स नसेल तर त्याला आपल्याला पीएच बॅलन्सिंग करावं लागतं. यासाठी केसांमध्ये कापूर, लिंबाचा रस इत्यादी टाकून स्काल्पमध्ये पेनीट्रेट करून घेतो. अनेकदा पीएच बॅलन्सिंग कॅप्सूल, अल्फा हायड्रोसी इत्यादीदेखील मसाज ऑइलमध्ये एकत्रित केले जाते.

यासंदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट आशमीन मुंजाल यांनी केस आणि स्कार्फच्या आरोग्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत :

तणावामुळे तुटतात केस

अनेकदा आपण तणावात असतो. छोटया छोटया गोष्टींनी त्रासतो. डोक्यात नकारात्मक भावना असतात. याचा सरळ परिणाम आपले केस आणि स्काल्पच्या आरोग्यावर होतो. यासाठी सर्वात गरजेचा आहे की तुम्ही नेहमी स्वत:च्या मनाला शांत ठेवा, आनंदी राहा आणि सकारात्मक गोष्टी मनात ठेवा. याचा चांगला परिणाम तुमच्या केसांवरती नक्कीच पडेल. तुमचे केस दाट आणि चमकदार होतील आणि स्काल्पदेखील निरोगी राहील. कोंडासारख्या समस्या देखील निर्माण होणार नाहीत.

मलीन केसांमध्ये ऑइल मसाज करू नका

अनेकदा आपण एक चूक करतो की जेव्हा आपले केस घाणेरडे असतात, आपण कुठून तरी बाहेरून फिरून आलेलो असतो आणि आपल्या केसांवरती प्रदूषणाचा परिणाम राहतो. चिकटपणा, धूळमाती जमलेली असते तेव्हा आपण केसांमध्ये नेमकं अशावेळी क्युटिकल्स आणि स्काल्पची रोमछिद्रंवरती एक्स्टर्नल मटेरियल म्हणजेच प्रदूषण आणि घाण जमा असते आणि पोर्सदेखील भरलेले असतात. ज्यामुळे ऑइलिंगने फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. म्हणूनच अशा घाणेरडया केसांमध्ये कधीही ऑयलिंग करता कामा नये. केस जेव्हा स्वच्छ असतील धुतलेले असतील तेव्हा त्यामध्ये ऑइल मसाज करा, तेव्हाच त्याचा परिणाम दिसेल.

कोंबदेखील गरजेचं

झोपण्यापूर्वी स्काल्पच्या वरती कमीत कमी १०० वेळा फणी नक्की फिरवा. यामुळेच स्काल्पची रोम छिद्रं मोकळी होतात आणि धूळमाती तसेच मृतत्वचा निघून जाते. जास्त फणी फिरवल्याने केस गळतील याची काळजी करू नका. उलट तुम्ही जेवढे फणी फिरवाल तेवढेच स्काल्पमध्ये रक्ताभिसरण वाढेल आणि तुमचे केस अधिक निरोगी बनतील.

हॉट ऑइल ट्रीटमेंट

स्वच्छ केसांमध्ये कमीत कमी ५० वेळा फणी फिरवा. सॉफ्ट ब्रिसल्स असणाऱ्या ब्रशने अशा प्रकारे फणी करा की मसाजसारखं होईल. तुम्ही साधीशी फणी वा मग कडूलिंबाच्या लाकडी फणीनेदेखील करू शकता. परंतु लक्षात घ्या फणी अधिक कडक नसावी उलट मुलायम असावी.

आता तेल गरम करून कॉटन त्यामध्ये बुडवून पूर्ण स्काल्पवरती आरामात लावा. तेल रबिंग करू नका. उलट हलक्या हाताने लाईट मसाज करा. केसांमध्ये तेल लावून जोर जोरात चंपी कधीच करू नका. अन्यथा केस खराब होऊन तुटू लागतील.

जेव्हा ऑइलिंग कराल तेव्हा स्टिमिंगदेखील गरजेचं आहे. यासाठी तुम्ही हॉटस्टीमरचा वापर करा वा पाणी गरम करून त्यामध्ये टॉवेल बुडवून ते केसांवरती लपेटू शकता व साधारणपणे १५ ते २० मिनिटांसाठी हा टॉवेल लपेटून ठेवा. यामुळे पोर्स मोकळे होतील आणि व्यवस्थित तेल आतमध्ये पॅनी ट्रेट होईल. यानंतर तुम्ही तेल लावलेल्या केसांना रात्रभरासाठी ठेवून शॉवर कॅप वा कॉटनचा दुपट्टा लपेटून घ्या. मग तेल योग्य प्रकारे राहील. अशा हॉट ऑइल ट्रीटमेंटने तुमचे केस निरोगी आणि चमकदार बनतील. हेड मसाजने केसाच्या खालच्या नसांमध्ये रक्ताभिसरण वेगाने होतं. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळती थांबते. या व्यतिरिक्तदेखील नियमितपणे हेड मसाज घेतल्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात.

केसांसाठी ऑइल मसाजचे फायदे

केसांच्या वाढीसाठी मदतनीस : केस प्रोटीनने बनतात आणि त्याच्या वाढीसाठी पुरेसं विटामिन आणि इतर न्यूट्रियंट्सची गरज असते. ऑइल मसाजने याची पुर्ती होते. या व्यतिरिक्त स्काल्पमध्ये तेलाने मालिश केल्यावर रंध्रे मोकळी होतात आणि यामुळे केसाच्या त्वचेत तेल व्यवस्थित शोषलं जातं. डोक्यात रक्ताभिसरण वाढतं आणि केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांच्या वाढीसाठीदेखील मदत मिळते.

नियमितरीत्या तेलाने मसाज केल्यास केसांमध्ये केमिकल आणि इतर हेअर ट्रीटमेंटने होणाऱ्या नुकसानीचा परिणामदेखील कमी दिसू लागतो. हेअर ऑइल केसांची चमक वाढवतं. उन्हामुळे केस अनेक द्विमुखी होतात. नियमितपणे केसांमध्ये तेलाने मालिश केल्यावर द्विमुखी केसांची समस्या संपून जाते आणि केसांना पोषण मिळतं.

केसांना मजबूत बनवा : पातळ केस, केसांमध्ये खूप कोरडेपणा किंवा चिकटपणा असणं आणि केस द्विमुखी होणं वा तुटणं वा गळणं. तसंही एका दिवसात शंभर ते दीडशे केस गळणे सामान्य आहे. परंतु यापेक्षा अधिक केस गळत असतील तर नियमितपणे तेलाची मसाज करून केसांना मजबूत बनवून याचं तुटणं कमी करा.

इन्फेक्शन रोखण्यासाठी : जेव्हा स्काल्पची रंध्र बंद होतात तेव्हा अनेक छोटया मोठया समस्या निर्माण होतात जसं की जळजळ, खाज आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन इत्यादी होऊ शकतं. इन्फेक्शनमुळे पुढे जाऊन डँड्रफ म्हणजेच कोंडयाची समस्यादेखील निर्माण होऊ शकते. यामुळे केसात उवा होण्याची भीती वाढते आणि अनेकदा केस गळतीची समस्यादेखील निर्माण होते. नियमित मध्ये केसांमध्ये अँटीबॅक्टरियल तत्त्व जसं की मधयुक्त तेलाने मालिश केल्यास स्काल्पला पोषण मिळतं आणि इन्फेक्शन होत नाही.

डँड्रफला रोखा : डँड्रफ हेअरफॉलचं सर्वात मोठं कारण आहे. या व्यतिरिक्त ऋतू बदलामुळे होणारे बदल आणि प्रदूषण या स्थितीमध्ये होणारे बदलांना अधिक खराब करतं. डँड्रफमुळे ड्राय स्काल्प, खाज उठणं, केस तुटणं आणि उवा होण्याचीदेखील भीती वाढते. डँड्रफ डेड स्किन असते, जी ड्राय स्काल्पची समस्या झाल्यास अधिक त्रास होतो.

हे ड्रायनेसदेखील स्वत:हून होत नाही. स्काल्पमध्ये डायनेस हा जेव्हा केसातील तेलीय ग्रंथी वा कमी सीबमचं उत्पादन करते वा अजिबातच करत नाही तेव्हा स्काल्पमध्ये कोरडेपणा येतो. नियमितरित्या तेलाने मसाज केल्याने स्काल्पला पोषण मिळण्या व्यतिरिक्त डोक्यातील तेलग्रंथीदेखील पुरेशा सीबमचं उत्पादन करू शकतात.

केस सुंदर बनवण्याचे २० उपाय

* सोमा घोष

प्रत्येक मुलीला सुंदर फडफडते केस हवे असतात, परंतु या धावपळीच्या जीवनामुळे, प्रदूषणामुळे आणि तणावामुळे, ही इच्छा पूर्ण करणे थोडे कठीण तर आहे, परंतु अशक्य नाही. केसांची थोडी काळजी घेतल्यास आपण फडफडत्या केसांची मल्लिका बनू शकता.

या संदर्भात, क्यूटिस स्किन क्लिनिकच्या त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल म्हणतात की केसांची गुणवत्ता परिपूर्ण होण्यासाठी त्यांना थोडा वेळ देणे आवश्यक आहे. खालील २० हेयर हैक्स आहेत :

  • सर्व प्रथम, आपल्या टाळूनुसार कधी आणि किती वेळा शॅम्पू करायचे ते ठरवा. आठवडयातून दोनदा शॅम्पू करणे योग्य असते. जर आपल्या डोक्यावरील टाळू तेलकट असेल तर अल्टर्नेट दिवशी किंवा दररोज शॅम्पू करा.
  • केसांना तेल लावणे ही एक जुनी प्रथा आहे आणि याचा केसांच्या वाढीशी काही संबंध नाही, कारण तेल धूळ-माती आकर्षित करते, डोक्यात कोंडा बनवते, म्हणून केसांना तेल लावणे टाळा.
  • नेहमीच लूज केशरचनेचा अवलंब करा. कसून बांधलेल्या पोनीटेल किंवा वेणीमुळे केस गळतात.
  • शॅम्पू करतांना केसांपेक्षा टाळू स्वच्छ करण्याकडे अधिक लक्ष द्या. अधिक शॅम्पू घातल्यामुळे केस कोरडे आणि कोमट होतात.
  • टाळूऐवजी केसांवर कंडिशनर वापरा. टाळूवर अधिक कंडिशनर वापरल्यास केस निर्जीव होतात.
  • हे खरे आहे की निरोगी केस निरोगी शरीरातच येतात, म्हणून आहारावर नेहमीच लक्ष देणे आवश्यक असते. अन्नामध्ये जास्त प्रथिने ठेवा. हे केस निरोगी आणि मजबूत ठेवते. अंडी, मासे, सोयाबीन, हिरव्या भाज्या इत्यादींमध्ये समृद्ध प्रोटीन असतात, जे आपल्या आहारात नेहमीच समाविष्ट केले जावेत.
  • नेहमी व्हिटॅमिनची पातळी तपासा. आवश्यकतेनुसार पूरक आहार घ्या. अशक्तपणा असणे चांगले नाही. लोहाच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. जर केस जास्त गळत असतील तर केस तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
  • ध्यान करणे हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे तणाव कमी होतो, ज्यामुळे केस गळणे कमी होते. आपल्या नसा शांत ठेवण्यासाठी ध्यान करा.
  • धूम्रपान टाळा. कारण बऱ्याच संशोधनात असे दिसून आले आहे की स्मोकिंग केल्याने केसांना जास्त नुकसान होते.
  • आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त समृध्द अँटिऑक्सिडंट पदार्थ समाविष्ट करा जसे बेरी, एवोकॅडो आणि नट्स.
  • केसांची स्टाईल योग्यरित्या करणे आवश्यक आहे. टेक्स्चर आणि व्हॉल्यूम स्प्रे पर्क दोन्ही निर्जीव केसांसाठी चांगले असतात, तर कंडिशनर आणि कर्ल क्रीम दोन्ही कुरळया केसांसाठी चांगले असतात.
  • केसांमध्ये कोणत्याही प्रकारची हिट वापरण्यापूर्वी उष्णता संरक्षण स्प्रे आणि सीरम अवश्य लावा.
  • जर तुम्हाला ब्लो ड्राय करायचे असेल तर ते चांगल्या प्रकारे जाणून घ्या. घरी हेयर ड्राय करणे ठीक आहे, परंतु सरळ केसांसाठी सलून चांगले असते. याशिवाय आपण घरी केस सरळ करीत असाल तर केसांच्या मुळापासून टोकापर्यंत उष्णता मध्यम ठेवा. हे केसांचा एक गोंडस रंग दर्शवेल.
  • ब्लॉन्ड आणि लाल केसदेखील आकर्षक दिसतात कारण केसांवर प्रयोग करणे हे मजेदार आणि सुरक्षित असते. हेअर कलर केल्यानंतर योग्य शॅम्पू आणि कंडिशनर लावणे आवश्यक आहे.
  • जेव्हा आपल्याकडे केस धुण्यास वेळ नसतो तेव्हा केसांसाठी ड्राय शॅम्पू वापरणे ही सर्वात मोठी हॅक्स आहे परंतु लक्षात ठेवा की केस धुण्यासाठी ड्राय शॅम्पू हा पर्याय नाही.
  • केसांची निगा राखण्यासाठी काही घरगुती उपचार चांगले असतात. जसे एक हेअर मास्क केस चमकदार आणि मऊ बनवते. केसांनुसार एका वाडग्यात अंडयाची पांढरी जर्दी घ्या आणि ओल्या केसांना लावा आणि कंघी करा.
  • ओल्या केसांमध्ये कंडिशनर म्हणून अंडयातील बलक लावा आणि थोडा वेळ मालिश करा. लावून झाल्यावर २० मिनिटांनी धुवा. यामुळे तकतकीत लुक येईल.
  • दोन आठवडयात एकदा शॅम्पूमध्ये १ एस्पिरिन मिसळा आणि केसांवर लावा. यामुळे केसांचा निर्जीवपणा संपतो आणि ते निरोगी दिसतात.
  • टॉवेलने केस कधीही जास्त झटकू किंवा पुसू नका. केस धुतल्यानंतर, त्यांना टॉवेलने गुंडाळा. यामुळे ते कमी फिजी होतात आणि मऊ राहतात.
  • केसांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करणे सोपे आहे, परंतु वेळेत डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे आहे. स्टेम सेल ट्रीटमेंट, लेसर ट्रीटमेंट इ. खूप लोकप्रिय आहेत.

कॅरेटिन ट्रीटमेंट फायदे आणि नुकसान

* मोनिका गुप्ता

अनेक मुली त्यांच्या फ्रिझ हेयरमुळे कंटाळलेल्या दिसतात. फ्रिझ हेयरमुळे केस सांभाळणं कठिण होऊन बसतं. यामुळे अनेक हेयर स्टायलिस्ट कॅरेटिन करण्याचा सल्ला देतात. खरंतर, कॅरेटिन एक अशी हेयर ट्रीटमेंट आहे ज्यामुळे केस सरळ, मुलायम आणि नॉन फ्रिझ होतात. कॅरेटिन ट्रीटमेंट केसांसाठी फायदेशीर तर आहेच परंतु याच्या साईड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

चला तर जाणून घेऊया कॅरेटिन ट्रीटमेंटचे फायदे आणि तोटे :

कॅरेटिन ट्रीटमेंट काय आहे?

कॅरेटिन आपल्या केसांच्या वरच्या थरावर असतं, हे एक नैसर्गिक प्रोटीन आहे. यामुळे केसांना चमक येते. प्रदूषण, केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर आणि कडक उन्हाच्या संपर्कात आल्याने केसांचं नैसर्गिक प्रोटीन निघू लागतं आणि केस कोरडे दिसू लागतात.

केसांच्या नैसर्गिक प्रोटीनची उणीव भरून काढण्यासाठी कॅरेटिन ट्रीटमेंट केली जाते. कॅरेटिन ट्रीटमेंटसाठी केसांमध्ये आर्टिफिशियल कॅरेटिनचा वापर केला जातो. या ट्रीटमेंटनंतर केस मुलायम आणि चमकदार दिसू लागतात. कॅरेटिन केसांमध्ये ६ ते ७ महिने राहतं.

कॅरेटिनचे फायदे

केसांना मिळतं पोषण : कॅरेटिनमुळे केस मॅनेज करणं सोप होऊन जातं. यामुळे केसांना पोषण मिळतं. जेव्हा आपण केसांवर हिटचा अतिरिक्त वापर करतो तेव्हा केसांमधून कॅरेटिन निघून जातं. अशावेळी कॅरेटिन ट्रीटमेंटने केसांना प्रोटीन मिळतं. डॅमेज केस पूर्ववत करण्यासाठी ही छान ट्रीटमेंट आहे.

कोरडया केसांमध्ये सुधारणा : केसांमध्ये केमिकल प्रॉडक्ट्स, ब्लो ड्रायर, आयर्न आणि हॉट रोलरचा वापर केल्याने केस रुक्ष आणि कोरडे होतात. केसांची चमक पूर्ववत होण्यासाठीदेखील कॅरेटिन ट्रीटमेंट केली जाते.

मुक्तता फ्रि हेयरपासून : फ्रिझ हेयरवाल्या अनेक स्त्रिया त्यांच्या केसांमुळे चिंतीत असतात. फ्रिझ हेयरमुळे कोणतीही हेयरस्टाईल करणं थोडं कठिण होऊन बसतं. अशा वेळी केसांसाठी कॅरेटिन उत्तम पर्याय आहे. कॅरेटिन नंतर केस सरळ, मुलायम आणि चमकदार दिसू लागतात आणि हेयरस्टायलिंग सहजपणे करता येते.

कॅरेटिनने केस सुरक्षित : कॅरेटिन ट्रीटमेंटने तुमचे केस सुरक्षित राहतात. कॅरेटिन केल्यानंतर तुमच्या केसांना एक अधिकचा संरक्षक थर मिळतो जो तुमच्या केसांचं बाहेरच्या धुळीपासून संरक्षण करतो.

कॅरेटिन ट्रीटमेंटने होणारे तोटे

कॅरेटिन ट्रीटमेंटने काही तोटे देखील आहेत :

* कॅरेटिन ट्रीटमेंटने केस पूर्णपणे सरळ होतात. ज्यामुळे केसांचा व्हॉल्युम निघून जातो. केसं घनदाट दिसत नाहीत.

* कॅरेटिननंतर केस लवकर तेलकट होतात.

* कॅरेटिननंतर तुम्हाला महागडे शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा लागतो.

* जर तुम्ही दुसऱ्या शॅम्पूचा वापर केला तर तुमच्या केसांचं नुकसान होतं.

* केस तेलकट झाले की हेयर वॉश करावे लागतात. जर तुम्ही अधिकाधिक हेयर वॉश केलं तर तुमच्या केसांवरच कॅरेटिन लवकर निघून जाईल.

* कॅरेटिन करण्यासाठी पैसे अधिक खर्च होतात आणि याचा प्रभाव फक्त ६ महिनेच राहतो.

* कॅरेटिनमध्ये फॉर्मलडिहाईड नावाचं केमिकल असतं जे आरोग्याच्या विविध समस्यां निर्माण करतं.

* तुम्हाला त्वचेशी संबंधित एखादा आजार असेल तर कॅरेटिन करण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

मान्सून स्पेशल : मान्सून हेअर अँड स्किन केअर

* डॉ. अप्रतिम गोयल

पावसात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असतात. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस तसेच इतर संसर्ग यांची लागण होते. त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या सरीमध्ये भरपूर प्रमाणात आम्ल असते, ज्यामुळे सर्वात जास्त त्वचा आणि केसांचे नुकसान होते. अशात या मोसमात काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून संरक्षण मिळते.

मान्सूनमध्ये त्वचेची देखभाल

सफाई किंवा क्लिंजिंग : पावसाच्या पाण्यात रसायने मोठया प्रमाणात असतात. त्यामुळे मान्सूनमध्ये त्वचेची योग्य प्रकारे सफाई होणे जरूरी असते. मेकअप काढायला मिल्क क्लिंजर किंवा मेकअप रिमूव्हरचा वापर केला गेला पाहिजे. त्वचेतील अशुद्धता धुऊन काढल्यामुळे त्वचेवरील रोम उघडले जातात. साबण वापरण्याऐवजी फेशिअल, फेस वॉश, फोम इ. अधिक परिणामकारक असते.

टोनिंग : क्लिंजिंगनंतर हे केले पाहिजे. मान्सूनदरम्यान वायू आणि जल याद्वारे अनेक मायक्रोब्स निर्माण होतात. यामुळे स्किन इन्फेक्शन तसेच त्वचा फाटण्यापासून वाचण्यासाठी अँटी बॅक्टेरियल टोनर अधिक उपयुक्त असतो. कॉटन बडचा वापर करून त्वचेवर हळुवार टोनर फिरवा. जर त्वचा अधिकच शुष्क असेल तर टोनरचा वापर टाळला पाहिजे. होय, अतिशय सौम्य टोनरचा वापर करू शकता. तेलकट आणि मुरूम असेलल्या त्वचेवर टोनर चांगला परिणाम करतो.

मॉइश्चरायजर : उन्हाळ्याप्रमाणेच पावसातही मॉइश्चरायझिंग आवश्यक असते. मान्सूनमुळे शुष्क त्वचेवर डिमॉश्चरायजिंग प्रभाव पडू शकतो तसेच तेलकट त्वचेवर याचा ओव्हर हायड्रेटिंग प्रभाव पडतो. पावसात हवेत आर्द्रता असतानाही त्वचा पूर्णपणे डिहायड्रेट होऊ शकते. परिणामी त्वचा निस्तेज होऊन आपली चमक हरवून बसते.

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी दररोज मॉश्चराइज करणे खूप आवश्यक असते. जर असे केले नाही तर त्वचेला खाज सुटू लागते. जर तुम्ही पाण्यात वारंवार भिजत असाल तर नॉन वॉटर बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा. लक्षात ठेवा की जरी तुमची त्वचा तेलकट असली तरी रात्री तुम्ही वॉटर बेस्ड लोशनच्या पातळ थराचा वापर केला पाहिजे.

सनस्क्रीन : सनस्क्रीनचा वापर न करता घरातून बाहेर पडू नका. असेपर्यंत ऊन तुमच्या त्वचेला युवीए तसेच युवीबी किरणांपासून संरक्षणाची गरज भासेल. घरातून बाहेर पडताना कमीतकमी २० मिनिटे आधी २५ एसपीएफ असेलेले सनस्क्रीन लावा आणि दर ३ ते ४ तासांनी हे लावत राहा. सर्वसाधारणपणे हा चुकीचा समज असतो की सनस्क्रीनचा वापर फक्त तेव्हाच करावा, जेव्हा ऊन असते. ढगाळ/पावसाळी दिवसातील वातावरणामधील अल्ट्राव्हायोलेट किरणांना कमी लेखू नका.

शरीर कोरडे ठेवा : पावसात भिजल्यावर शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्द्रता असलेल्या हवेत शरीरावर अनेक प्रकारचे किटाणू वाढीस लागतात. जर तुम्ही पावसाच्या पाण्यात भिजला असाल तर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. घरातून बाहेर पडताना पावसाचे पाणी पुसायला जवळ काही टिश्यू किंवा छोटा टॉवेल बाळगा.

त्वचेची देखभाल : चमकत्या तसेच डागविरहित त्वचेसाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्किन ट्रीटमेंट घेत राहा. पील्स तसेच लेजर ट्रीटमेंटसाठी मान्सून हा सर्वात चांगला मोसम असतो, कारण सूर्याची किरणे बहुतांशवेळा नसल्यामुळे उपचार केल्यानंतर विशेष देखभाल करावी लागत नाही.

मान्सूनमध्ये केसांची देखभाल

* जर पावसात केस भिजले असतील तर जितक्या लवकर शक्य होईल तेवढे माइल्ड शॅम्पूने केस धुवा. केसांना जास्त काळ पावसाच्या पाण्याने ओले ठेवू नका, कारण त्यात रसायनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

* डोक्याचे सुकेच मालिश करा जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. आठवडयातून एकदा कोमट तेलाने डोक्याला मसाज करणे चांगले असते, पण जास्त वेळ तेल केसांत राहू देऊ नका म्हणजे काही तासांतच ते धुवून टाका.

* दर दुसऱ्या दिवशी केस धुवावेत. जर लहान केस असतील तर तुम्ही ते रोज धुवू शकता. केस धुण्यासाठी अल्ट्राजेंटल किंवा बेबी शॅम्पू वापरणे अधिक चांगले असते. हेअर शॉफ्ट्सवर कंडिशनर लावल्याने केस मजबूत होतात.

* मान्सूनमध्ये हेअर स्प्रे किंवा जेलचा वापर करू नका, कारण हे स्कॅल्पला चिकटू शकतात आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो. ब्लो ड्राय करणेही या दिवसांत टाळा. जर रात्री केस ओले असतील तर त्यांना कंडिशनर लावून ब्लोअरच्या थंड हवेने सुकवा.

* पातळ, वेव्ही आणि कुरळया केसांत अधिक ओलावा शोषला जातो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्टायलिंग करण्याआधी ह्युमिडिटी प्रोटेक्टिव्ह जेल वापरावे.

* आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेअर केअर उत्पादनांची निवड करा. साधारणपणे गुंतलेले, कोरडे आणि रफ केस हे हेअर क्रीम लावून सरळ करता येतात.

* मान्सूनमध्ये हवेत अधिक आर्द्रता आणि ओलावा असल्याकारणाने कोंडा ही एक कॉमन समस्या असते. त्यामुळे आठवडयातून एकदा चांगल्या अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करावा.

* मॉन्सूनमध्ये पाण्यात क्लोरिनचे प्रमाणही अधिक असते, जे केसांना ब्लीच करून खराब करू शकते. त्यामुळे शक्य असल्यास केस पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

* पावसाचा मोसम हा केसांत उवा होण्यासाठीही अनुकूल असतो. जर केसांत उवा झाल्या असतील तर परमाइट लोशन वापरा. १ तास डोक्याला लावून ठेवा आणि मग धुऊन टाका. ३-४ आठवडे असे करत रहा.

अशी करा दमदार हेअरस्टाईल

* आश्मीन मुंजाल

केस सुंदर असतील, चेहऱ्याच्या आकारानुसार कापलेले असतील तर पर्सनॅलिटीचे सौंदर्य दुपट्टीने वाढते. पण केस सुंदर, सुटसुटीत दिसावेत यासाठी कोणत्या टीप्स आजमाव्यात या जाणून घेऊ या :

हेअर सिरम

केसांना सुटसुटीत ठेवण्यासाठी तेलाच्या ऐवजी हेअर सिरम लावावे. हे कमी तेलकट असते, ज्यामुळे केस सुटसुटीत वाटतात. कोरड्या, रूक्ष आणि खराब केसांसाठी हेअर सिरम एका जादूच्या छडीसारखे आहे. हेअर सिरममध्ये सिलिकॉन असते, जे केसांत मिसळून त्यांना चमकदार बनविते. तसेच हे लावल्याने सूर्याची युवी किरणे, प्रदूषण आणि वातावरणातील आद्रता केसांवर कुठलाही वाईट प्रभाव करू शकत नाही.

हेअर सिरम लावल्यामुळे केस मोकळे आणि निरोगी दिसतात. हेअर सिरमला केसांच्या लांबीनुसार कव्हर करून लावले पाहिजे. याला केसांच्या मुळाशी लावले जात नाही नाहीतर केस ऑयली होऊन जातात. चांगला परिणाम मिळण्यासाठी सिरम ओल्या केसांमध्येच लावले पाहिजे.

ड्राय शँपू

जर आपण आपले ब्लो आऊट किंवा आयर्निंग जास्त वेळेपर्यंत चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहात तर अशा स्थितीत ड्राय शँपूचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. ड्राय शँपू केस आणि स्कॅल्पमधून चिकटपणा आणि ऑईल शोषून घेतो, ज्यामुळे असे वाटते की आपण केस आताच धुतले आहेत. परंतु लक्षात ठेवा की ड्राय शँपू पाण्यावाचून केस धुण्याचा ऑप्शन नाही आहे, तर केस धुण्याचा वेळ वाचवण्यासाठी किंवा जेव्हा आपण घाईत असाल फक्त तेव्हाच याचा उपयोग करा.

ड्राय शँपूचा सगळयात मोठा फायदा हा आहे की पाण्याने केस न धुतासुद्धा आपण स्वच्छ आणि सुगंधित केस प्राप्त करू शकता. याशिवाय ड्राय शँपूचा उपयोग केल्यानंतर केसांना चांगला वॉल्युम मिळतो. ज्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल कॅरी करू शकता. ड्राय शँपू स्प्रे केल्यानंतर केसांत सफेद पावडर राहून जाते. पण आपल्या बोटांनी विंचरल्यावर तीही निघून जाते आणि आपल्याला मिळतात निरोगी दिसणारे केस तेही केवळ थोडयाच मिनिटांतच.

फ्लफी इफेक्टसाठी केसांना शँपू केल्यानंतर कंडिशनर लावावे. जेव्हा हलकेसे सुकुन जातील तेव्हा मुळापासून डोक्यापर्यंत मूस लावावे. पेडल ब्रशच्या सहाय्याने ब्लो ड्राय करा. आता एक राउंड थर्मो ब्रिसल ब्रशने हळू-हळू केसांना स्ट्रेट करा. स्टाइलिंग स्प्रे टाका. नंतर छोटया-छोटया सेक्शनमध्ये विभागून सेल्फ होल्डिंग थर्मो रोलर्स लावावे. हीट देऊन १० मिनिटापर्यंत सेट करा. रोलर्स हटवून ब्रशने हलक्या हाताने वोल्युम देत केसांना सेट करा. दुरून शाईन स्प्रे करा.

फिनिशिंग टचसाठी

घरातून बाहेर जाताना आपल्या डोक्याला फ्लिप करा आणि केसांना चांगल्याप्रकारे हलवा. यामुळे भरल्या-भरल्यासारखे वाटतात. यानंतर केसांमध्ये हेअर स्प्रे करा. ओल्या ऋतूत हेअर जेलचा वापर करू नका, कारण हे क्रिमी असते. या उत्पादनाचा वापर केल्यावर आपला लूक असा दिसेल जसे आपण नुकतेच केसांमध्ये ऑईल मसाज केला आहे.

हेअर स्टाईल कशी ठेवावी

केसांना मॅनेज करणेसुद्धा एक मॅनेजमेंट आहे. चिकट हवामानात आपले केस मोकळे सुटसुटीत राहावेत म्हणून आपल्या पर्सनॅलिटीत हेअरस्टाइलची मोठी भूमिका आहे. परंतु थोडया महिलाच आहेत, ज्या हेअरस्टाईलची काळजी घेतात. जर हेअरस्टाईलला प्रसंगाच्या हिशोबाने बदलले गेले तर आपण फुलासारख्या टवटवीत आणि नवीन दिसाल.
सर्वप्रथम परफेक्ट हेअरकटच्याद्वारे आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सहजपणे व्हिजिबल चेंज आणू शकता. यासाठी आपण गरजेपेक्षा जास्त तेल लावून कसून बांधलेल्या अंबाडा किंवा वेणीपासून सुटका मिळवत आपल्या फेसकट आणि प्रोफेशननुसार हेअर कट करवून त्यात ग्रे हेअरला लपवण्यासाठी सिंपल ब्लॅक व ब्राऊन कलरच्या जागी रिच कलर हायलाइटिंगचा उपयोग करा.

केसांना नेहमी मोकळे ठेवल्याने ते खराब होऊ शकतात. यासाठी वेगवेगळी हेअरस्टाईल बनवून केसांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण पोनीटेल किंवा फ्रेंच वेणी ट्राय करू शकता, जी बघण्यास खूप ट्रेंडी वाटते. याशिवाय केसांना अंशत: बांधून बाकी केसांना मोकळे सोडले जाऊ शकते.

लूप्ड पोनीटेल

आपण केसांमध्ये पोनीटेलचा ऑप्शनही चूज करू शकता. ही स्टाईल पोनीटेलला फोल्ड करून बनवली जाते. ही पाठीमागून एक लो बनसारखी दिसते, मात्र वास्तविक पोनीटेल असते. आपण टंबल्ड टेलही बनवू शकता. ही एक फिश प्लेटवाला लूक देईल. ही बनवण्यासाठी सोपी आहे.

केसांची साइड पार्टींग

जर आपले केस पातळ आहेत, तर साइड पार्टींग करून त्यांना बाउंसी लुक दिला जाऊ शकतो किंवा मग सगळया केसांना एका बाजूला करून घ्या. यामुळे केसांचा वॉल्युमही जास्त वाटू लागतो.

केसांमध्ये चांगल्या वेव्ससाठी

काही वेगळे ट्राय करू पाहताय तर मग स्विमिंग वेव्स बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम केसांवर लाइटली स्टायलिंग क्रीम लावावी. यात साइडने पार्टींग काढून थ्री किंवा फोर फ्लिक्सला कर्ल करा. यांना फेसच्या एका बाजूला सेट करा. इतर शिल्लक केसांचे स्मॉल लो बन बनवा.

केसांना सुंदर लूक देण्याचे जलद उपाय तेव्हा अवलंबा जेव्हा वेळेची कमतरता असेल, कारण केसांची सुंदरता बनवून ठेवण्याचा कोणताही शॉर्टकट नाहीए.

कशी घ्याल डॅमेज केसांची काळजी

– शैलेंद्र सिंह

केसांमुळे आपले सौंदर्य सर्वाधिक खुलून येते. काळानुसार आणि बदलत्या फॅशननुसार केसांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आणि हेच कारण आहे, ज्यामुळे त्यांची केअर घेणारी तमाम प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, पण गरज आहे की या उत्पादनांचा योग्य वापर केला गेला पाहिजे. डॅमेज केसांची काळजी घेणे अत्यावश्यक असते.

केसांना डॅमेज करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी म्हणजे केस गळणे, वेळे आधीच सफेद होणे, त्यात कोंडा म्हणजेच डँड्रफ होणे, द्विमुखी केस मुख्यत्वे सामील आहेत.

लखनौच्या नॅचरल्स सलोनच्या ब्युटी एक्स्पर्ट प्रीती शर्मा सांगतात, ‘‘केस डॅमेज होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार योग्य आणि पौष्टिक नसणे हे आहे. हल्ली लोक अशा प्रकारचा आहार कमीच घेतात, ज्यात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. बहुतांश लोक असा आहार घेतात, ज्यामुळे पोटसुद्धा खराब होते. याचा प्रभाव आपल्या केसांवर होतो तसेच अनेक आजार आपल्या पाठी लागतात. केसांची योग्य काळजी न घेतल्याने ते डॅमेज होऊ लागतात. झोप पूर्ण न झाल्यानेसुद्धा हा त्रास उद्भवतो. अशावेळी सर्वप्रथम केस डॅमेज होण्याचे कारण शोधून काढणे महत्वाचे आहे आणि त्यानंतर त्यांचा योग्य इलाज केला गेला पाहिजे.’’

डँड्रफ

डँड्रफ केसांच्या उद्भवणाऱ्या समस्यांपैकी खूप सामान्य समस्या आहे. डँड्रफ म्हणजे कोंडा रंगाने सफेद किंवा भुऱ्या रंगाचा असतो. या त्वचेच्या मृत पेशी असतात, ज्या त्वचेच्या बाह्य स्तरावर जमतात. कोंडा हा २ प्रकारचा असतो. पहिला हा तैलीय असतो आणि दुसरा कोरडा. तैलीय कोंडयात मृत पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात. दिसायला त्वचेच्या रंगाशी साधर्म्य साधणाऱ्या असतात. कोरडा कोंडा हा त्वचेतील आर्द्रता कमी झाल्याने निर्माण होतो. जेव्हा आपण केसांवरून कंगवा फिरवतो, तेव्हा हा कोंडा कपडयांवरही पडू लागतो. हा सफेद रंगाचा असतो.

कोंडा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोट खराब असणे हे आहे. केसांना पर्मिंग, स्ट्रेटनिंग आणि कलर केल्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत असतो, ज्यामुळे त्वचा मृत होते आणि कोंडा उत्पन्न होतो. केसांना योग्य प्रकारे शॅम्पू न केल्यामुळेही कोंडा होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळेही कोंडा होतो.

कोंडा दूर करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कोंडा झालेल्या व्यक्तिचा कंगवा आणि टॉवेल कधीही वापरू नका. आपला आहार पौष्टिक असेल याची काळजी घ्या. जेवणात मोड आलेली कडधान्ये, दूध, सॅलड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

कोंडा दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी केल्या जातात. टोमॅटो थेरपीनेही कोंडयाचा इलाज केला जातो. यासाठी टोमॅटोचा गर एका प्लास्टिकच्या भांडयात काढून घ्या. मग त्याची चांगली पेस्ट बनवून घ्या. यात लिंबाचा रस मिसळा. आणि हे मिश्रण संपूर्ण स्कॅल्पला लावा. हे सुकल्यावर केस धुवून टाका. कोंडा दूर करण्यासाठी अॅप्पल थेरपीचाही वापर केला जातो. यात २ अॅपल्सना किसून पेस्ट करून स्कॅल्पवर लावले जाते. ४० ते ४५ मिनिटे ठेवून मग धुतले जाते. असे आठवडयातून दोनदा अवश्य करावे.

वेळेआधी केस पिकणे

केसांची दुसरी मोठी समस्या म्हणजे अकाली केस पांढरे होणे. काळया, दाट केसांची प्रत्येकालाच आठवण येते. काळानुसार केस पांढरे होणे हा काही आजार नाही. पण हल्ली वेळेआधीच केस पांढरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. कधी कधी तर ऐन तारुण्यातच केस पिकताना दिसत आहेत.

कमी वयात मधुमेह म्हणजेच डायबिटीज केसांना वेळेआधी सफेद करतो. जर कुणाला सतत सर्दी होत असेल तरीही केस लवकर पांढरे होतात. केसांवर सतत केलेल्या केमिकल प्रॉडक्ट्सच्या माऱ्यानेही केस लवकर पिकतात. सायनस असेल तरीही केस पिकतात. पोषणा अभावीही केस कमी वयातच सफेद होऊ लागतात. याच बरोबर वातावरणातील धूळ, ऊन, प्रदूषण यामुळेही केस पांढरे होऊ लागतात.

केस वेळेआधी पिकणे रोखण्यासाठी नियमित कडिपत्त्याचे सेवन करा. यामुळे केस पांढरे होणे थांबवता येते. आवळा आणि शिकेकाई पावडर लोखंडाच्या कढईत भिजवून ठेवा. रात्रभर ठेवून सकाळी मेंदीमध्ये मिसळून केसांना लावा, असे आठवडयातून २ वेळा केल्याने केस सफेद होणे रोखता येते. योग्य डाएट घेऊनही केस हेल्दी करता येतात.

द्विमुखी केस

खराब शॅम्पू आणि साबण यांच्या वापराने केस द्विमुखी होतात. कधी कधी ब्लो ड्रायरच्या अतिवापरानेही ही समस्या उद्भवते.

केसांना या आजारापासून वाचवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केस ट्रिम करून घ्या. आठवडयातून दोन वेळा केसांना चांगला तेलाने मसाज करा. ते धुण्याआधी केसांना अर्धा तास दही लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पू करा. १-१ चमचा मध, ऑलिव्ह ऑइल आणि बदाम तेल हे अंडयात किंवा दह्यात मिसळून पूर्ण डोक्यावर व्यवस्थित लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. गरम पाण्यात टॉवेल बुडवून केसांना स्टीम द्या.

केस गळणे

केस गळणे हीसुद्धा खूप कॉमन समस्या आहे. प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. केस गळल्यामुळे सौंदर्यात बाधा येते. वेळेआधीच वृद्धत्व येते. चिंता, तणाव, हार्ट किंवा लिव्हरची समस्या, जास्त पोहोणे, केमिकलचा अति वापर आणि आहारातील पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळेही केस गळू लागतात. कधी कधी दीर्घ आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या दुष्परिणांमुळेही केस गळू लागतात. पोट खराब असेल किंवा कोंडा झाला असेल तरीही केस गळू लागतात.

साधारणपणे केस गळणे थांबवण्याचा काही असा हमखास उपाय नाही. काही घरगुती उपाय करून त्यांना गळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पहिला उपाय आहे, एक ग्लास रम एखाद्या बाटलीत ओतून घ्या. यात कांद्याचे ४ तुकडे करून घाला. बाटलीचे झाकण बंद करा. बाटली उन्हात ठेवा. ४८ तास ही बाटली उन्हात राहू द्या. त्यानंतर कांद्याचे तुकडे काढून फेकून द्या. उरलेले मिश्रण डोक्याला लावा आणि काही वेळाने केस धुवून टाका.

केस गळण्यापासून रोखण्याचा दुसरा घरगुती उपाय म्हणजे २ चमचे मेथीदाणे, ३ चमचे दह्यात घालून भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी संपूर्ण केसांना लावून २० मिनिटे ठेवून द्या. मग कोमट पाण्याने केस धुवू

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें