* मोनिका गुप्ता

अनेक मुली त्यांच्या फ्रिझ हेयरमुळे कंटाळलेल्या दिसतात. फ्रिझ हेयरमुळे केस सांभाळणं कठिण होऊन बसतं. यामुळे अनेक हेयर स्टायलिस्ट कॅरेटिन करण्याचा सल्ला देतात. खरंतर, कॅरेटिन एक अशी हेयर ट्रीटमेंट आहे ज्यामुळे केस सरळ, मुलायम आणि नॉन फ्रिझ होतात. कॅरेटिन ट्रीटमेंट केसांसाठी फायदेशीर तर आहेच परंतु याच्या साईड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

चला तर जाणून घेऊया कॅरेटिन ट्रीटमेंटचे फायदे आणि तोटे :

कॅरेटिन ट्रीटमेंट काय आहे?

कॅरेटिन आपल्या केसांच्या वरच्या थरावर असतं, हे एक नैसर्गिक प्रोटीन आहे. यामुळे केसांना चमक येते. प्रदूषण, केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर आणि कडक उन्हाच्या संपर्कात आल्याने केसांचं नैसर्गिक प्रोटीन निघू लागतं आणि केस कोरडे दिसू लागतात.

केसांच्या नैसर्गिक प्रोटीनची उणीव भरून काढण्यासाठी कॅरेटिन ट्रीटमेंट केली जाते. कॅरेटिन ट्रीटमेंटसाठी केसांमध्ये आर्टिफिशियल कॅरेटिनचा वापर केला जातो. या ट्रीटमेंटनंतर केस मुलायम आणि चमकदार दिसू लागतात. कॅरेटिन केसांमध्ये ६ ते ७ महिने राहतं.

कॅरेटिनचे फायदे

केसांना मिळतं पोषण : कॅरेटिनमुळे केस मॅनेज करणं सोप होऊन जातं. यामुळे केसांना पोषण मिळतं. जेव्हा आपण केसांवर हिटचा अतिरिक्त वापर करतो तेव्हा केसांमधून कॅरेटिन निघून जातं. अशावेळी कॅरेटिन ट्रीटमेंटने केसांना प्रोटीन मिळतं. डॅमेज केस पूर्ववत करण्यासाठी ही छान ट्रीटमेंट आहे.

कोरडया केसांमध्ये सुधारणा : केसांमध्ये केमिकल प्रॉडक्ट्स, ब्लो ड्रायर, आयर्न आणि हॉट रोलरचा वापर केल्याने केस रुक्ष आणि कोरडे होतात. केसांची चमक पूर्ववत होण्यासाठीदेखील कॅरेटिन ट्रीटमेंट केली जाते.

मुक्तता फ्रि हेयरपासून : फ्रिझ हेयरवाल्या अनेक स्त्रिया त्यांच्या केसांमुळे चिंतीत असतात. फ्रिझ हेयरमुळे कोणतीही हेयरस्टाईल करणं थोडं कठिण होऊन बसतं. अशा वेळी केसांसाठी कॅरेटिन उत्तम पर्याय आहे. कॅरेटिन नंतर केस सरळ, मुलायम आणि चमकदार दिसू लागतात आणि हेयरस्टायलिंग सहजपणे करता येते.

कॅरेटिनने केस सुरक्षित : कॅरेटिन ट्रीटमेंटने तुमचे केस सुरक्षित राहतात. कॅरेटिन केल्यानंतर तुमच्या केसांना एक अधिकचा संरक्षक थर मिळतो जो तुमच्या केसांचं बाहेरच्या धुळीपासून संरक्षण करतो.

कॅरेटिन ट्रीटमेंटने होणारे तोटे

कॅरेटिन ट्रीटमेंटने काही तोटे देखील आहेत :

* कॅरेटिन ट्रीटमेंटने केस पूर्णपणे सरळ होतात. ज्यामुळे केसांचा व्हॉल्युम निघून जातो. केसं घनदाट दिसत नाहीत.

* कॅरेटिननंतर केस लवकर तेलकट होतात.

* कॅरेटिननंतर तुम्हाला महागडे शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा लागतो.

* जर तुम्ही दुसऱ्या शॅम्पूचा वापर केला तर तुमच्या केसांचं नुकसान होतं.

* केस तेलकट झाले की हेयर वॉश करावे लागतात. जर तुम्ही अधिकाधिक हेयर वॉश केलं तर तुमच्या केसांवरच कॅरेटिन लवकर निघून जाईल.

* कॅरेटिन करण्यासाठी पैसे अधिक खर्च होतात आणि याचा प्रभाव फक्त ६ महिनेच राहतो.

* कॅरेटिनमध्ये फॉर्मलडिहाईड नावाचं केमिकल असतं जे आरोग्याच्या विविध समस्यां निर्माण करतं.

* तुम्हाला त्वचेशी संबंधित एखादा आजार असेल तर कॅरेटिन करण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...