गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी एक ५२ वर्षांची स्त्री आहे. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला ५ वर्षे झाली आहेत. माझे गेल्या काही महिन्यांपासून २७ वर्षांच्या अविवाहित पुरुषाशी शारीरिक संबंध आहेत. तो माझी खूप काळजी घेतो आणि आम्ही दोघे परस्पर संमतीने लैंगिक संबंध बनवतो. मला त्याच्याबरोबर समाधान वाटते आणि तो केवळ सेक्समध्येच नव्हे तर दु:खातदेखील नेहमी सहकार्य करतो. तो खूप जोमदारदेखील आहे पण सेक्स करताना त्याला कंडोम लावायला आवडत नाही. तथापि, मी कुटुंब नियोजन केले आहे. यात काही धोका तर नाही ना? कृपया सल्ला द्या?

आपल्या लैंगिक जोडीदाराचा लैंगिक संबंधादरम्यान कंडोम न वापरल्याने कौटुंबिक नियोजनाशी कोणताही संबंध नाही. लैंगिक संबंधात गर्भधारणेसाठी वाव असेल याची शक्यताही फारच कमी आहे. परंतु कंडोम केवळ गर्भनिरोधकच नव्हे तर लैंगिक संसर्गापासून बचाव करण्याचे एक चांगले साधन देखील मानले जाते.

सेक्स पार्टनरला सेक्स दरम्यान कंडोम वापरण्यास सांगा. याद्वारे आपण दोघेही लैंगिक संसर्गापासून वाचाल आणि तणावमुक्त होऊन लैंगिक संबंधाचा आनंद घेऊ शकाल.

 

  • मी २८ वर्षांची महिला आहे. गेल्या वर्षीच लग्न झाले. लग्नानंतर सासरी आल्यावर २-३ दिवसांतच समजले की नवरा मम्माज बॉयआहे. ते कोणतीही कामे केवळ आईला विचारून करतात आणि ते माझ्या एकाही गोष्टीशी सहमत होत नाहीत. माझ्या सासूच स्वयंपाकापासून ते पडद्याच्या रंगापर्यंतची निवड करतात आणि माझ्या शब्दांना थोडेही महत्त्व देत नाहीत. यामुळे मी खूप तणावात असते. काय करावे हे समजत नाही?

आपण नुकतेच विवाहित झाला आहात. आपले पती समजूतदार आहेत आणि म्हणूनच त्याला अचानक आपल्या आईकडे दुर्लक्ष करून तुमच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे योग्य वाटत नसेल. यामुळे घरात अनावश्यक तणाव निर्माण होईल.

कालांतराने आपण हळूहळू घरात आपले स्थान बनवावे. आपल्या सासूला, सासू नव्हे तर आई समजावे. त्यांच्या मोकळया वेळेत त्यांच्याबरोबर बसा, टीव्ही पहा, खरेदी करायला जा, त्यांचा आवडता ड्रेस त्यांना खरेदी करून द्या. घरातील कामात मदत करा.

जेव्हा आपल्या सासूला खात्री होईल की आपण आता घरगृहस्थी चांगल्या प्रकारे हाताळू शकता तेव्हा हळूहळू ती संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे सोपवेल.

  • मी ४८ वर्षांची महिला आहे. सेक्सची इच्छा होते पण ओलेपणा कमी होतो. असे नाही की मी शिखरावर पोहोचत नाही. मला सांगा मी काय करावे?

रजोनिवृत्तीमुळे ही समस्या उद्भवू शकते, कारण रजोनिवृत्तीनंतर शरीरात फीमेल हार्मोन इस्ट्रोजेनची कमतरता असते आणि यामुळेही ही समस्या उद्भवते.

शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण आहारातील गरजेकडे लक्ष दिले पाहिजे. हंगामी फळे, हिरव्या भाज्या, दूध, पनीर इत्यादी नियमितपणे खा आणि नियमित फिरा, व्यायाम करा.

आपण सध्या सेक्स करताना क्रीम वापरू शकता. हे गुळगुळीतपणा ठेवेल आणि सेक्सचा आनंददेखील येईल. सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले करणे चांगले. यानेदेखील बऱ्याच प्रमाणात कोरडेपणाचा त्रास टाळता येऊ शकतो.

मी २६ वर्षांची आहे आणि माझा प्रियकर माझ्यापेक्षा ५ वर्ष मोठा आहे. यामुळे लैंगिक संबंधात कोणतीही समस्या उद्भवू शकते का? मला त्याच्याबरोबर सेक्स करण्याची इच्छा आहे परंतु कधीकधी असे वाटते की तो मला पाठिंबा देऊ शकत नाही, कारण एकदा जेव्हा दीर्घकाळापर्यंत फोरप्ले केल्यानंतर तो त्याचे जननेंद्रिय घालायचा प्रयत्न करीत होता, तेव्हा वारंवार प्रत्त्न करूनही तो यशस्वी होऊ शकत नव्हता. त्याला काही अडचण आहे का? कृपया सल्ला द्या?

तुमच्या जोडीदाराचे वय इतकेही झाले नाही की तो सेक्स करण्यात अयोग्य असेल. सत्य हे आहे की जर त्याने योग्य आहारविषयक सूचनांचे पालन केले आणि नियमित व्यायामाची सवय लावली तर लैंगिक संबंधाचा आनंद बऱ्याच काळापर्यंत उपभोगता येऊ शकेल.

हे सहसा लैंगिक संभोगाच्या ज्ञानाअभावी होते. घाई-गडबडीमुळे किंवा कुठल्या भीतीमुळे तो लैंगिक संबंध बनवण्यात अयशस्वी झाला असेल. सेक्स ही एक आरामात हाताळण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दोघांचीही मने शांत असावीत आणि वातावरणदेखील शांत असावे.

तुम्ही दोघे सेक्स करण्यापूर्वी फोरप्लेचा आनंद घ्याल तर अधिक चांगले होईल.     जेव्हा पार्टनर सेक्ससाठी पूर्णपणे तयार असेल, तेव्हा त्याला जननेंद्र्रिय घालायला सांगा. नक्कीच, आपणा दोघांनाही त्यात पराकाष्ठेचा आनंद मिळेल. परंतु लक्षात ठेवा, कृपया यावेळी पुरुष जोडीदारास कंडोम वापरण्यास सांगा.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला एक वर्ष झालं आहे. आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं, तरीही आम्हा पतिपत्नीमध्ये सतत भांडणं होतात. थोडीफार भांडणं तर प्रत्येक पतिपत्नीमध्ये होतात, पण जेवढे आम्ही भांडतो, तेवढे कदाचित कोणीच भांडत नसेल. आश्चर्य या गोष्टीचे आहे की लग्नापूर्वी सर्वकाही ठीक होते, पण लग्न झाले आणि परिस्थिती बदलली व माझे पतिही. मला विश्वास बसत नाही की ही तीच व्यक्ती आहे का, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं व जो माझ्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा मान राखत होता. आम्ही तासन्तास एकमेकांशी गप्पा मारायचो आणि आता तर बोलण्यासाठी काही विषय नसतो किंवा तोंड उघडलंही तरी एकमेकांवर गरळ ओकली जाते. कधी-कधी वाटते की खरंच मी माझ्या भावा-बहिणीप्रमाणे अॅरेंज मॅरेज केले असते तर किती बरं झालं असतं. ते सर्व आपल्या घरकुटुंबासोबत अनेक वर्षांपासून किती सुखी जीवन जगत आहेत आणि मी एका वर्षातच त्रस्त झाले आहे.

दोनवेळा तर पती आणि त्याच्या घरच्यांना कंटाळून मी माहेरीही निघून गेले होते. माझी समजूत काढण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी कोणीही आले नाही. दोन्ही वेळा मी स्वत:च परत गेले.

खरं तर सर्व भांडणाचे मूळ माझ्या २ नणंदा आहेत. दोघीही विवाहित आहेत, तरीही त्या आपल्या सासरी जात नाहीत आणि आमच्या घरात बस्तान मांडून बसल्या आहेत. मोठ्या नणंदेच्या विवाहाला १० वर्षे झाली आहेत आणि छोटीच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. लग्नापूर्वी माझे पती सांगायचे की दोघीही माझ्या लग्नानंतर लवकर आपल्या घरी जातील. आता त्या आईला मदत करायला राहात आहेत. जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा आईसाठी त्या निश्चिंत होतील. कारण घर सांभाळणारी त्यांची सून येईल ना, पण लग्नाला १ वर्ष झाले आहे आणि त्या त्यांच्या घरी जाण्याचे नाव घेत नाहीत.

दोन्ही नणंदा सासूसोबत मिळून मला त्रास देतात. एवढेच नाही, संध्याकाळी माझे पती घरी आल्यावर माझी चुगली करतात आणि आधीच त्रस्त झालेली मी जेव्हा पतिकडूनही बोलणी खाते, तेव्हा मात्र माझा धीर सुटतो. मी दिवसभराचा रागही त्यांच्यावर काढते. मानसिक त्रास झेलण्याबरोबरच मी शारीरिक रूपानेही त्रस्त आहे. मला थायरॉईड आहे, त्यामुळे मी खूप जाडी झाले आहे. परिणामी, मला गर्भधारणाही होत नाहीए. कुणास ठाऊक, मी आई बनेन की नाही.

जीवन खूप कठीण झाले आहे. लग्न करून मी काय मिळवले, हा विचार करून मी त्रस्त होते. डोके दुखू लागते. काहीही मार्ग दिसत नाही. छान राहावेसे, कुठे जावे-यावेसे वाटत नाही. घरात ३-३ महिलांनी माझं जगणं मुश्किल केले आहे. आयुष्यभर असंच कुढत जगावं लागणार का, कृपया सांगा काय करू?

आपले वैवाहिक जीवन सुखद नाहीए, याचा दोष आपल्या लव्ह मॅरेजला देऊ नका. अॅरेंज मॅरेजमध्येही समस्या येत नाहीत असे होत नाही. अडचणी बहुतेक सर्वच वैवाहिक जीवनात येतात. त्यामुळे आपल्या विवाहाचे तुलनात्मक मूल्यांकन करू नका की अॅरेंज मॅरेज केले असते, तर सुखी राहिले असते.

आपल्या प्रकरणात मुख्य मुद्दा आपल्या दोन्ही विवाहित नणंदा आहेत. एकट्या सासूबरोबरच जुळवून घेणे सुनेसाठी सोपे नसते. इथे तर ३-३ महिलांनी आपलं जगणं कठीण केले आहे. यामुळेच आपल्या पतिशी आपले संबंध खराब होत आहेत.

स्थिती कोणतीही असो, सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला स्वत:च्या हिंमतीवर करावा लागेल. कुठेतरी थोडंसं गोड बोलून, तर कुठेतरी निडरता दाखवत, जेणेकरून पतीच्या आई व बहिणींमुळे तुमचं नातं बिघडू नये. अर्थात, असे करणे सोपे नाहीए, पण याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीए. पतिसमोर आपली बाजू मांडा, पण त्यांना टोमणे मारून दोष देऊ नका. जी गोष्ट तुम्ही सामान्य राहून प्रेमाने समजावू शकता, ती भांडण करून समजावू शकत नाही. त्यांचा मूड पाहून त्यांना समजावा की त्यांच्या बहिणींनी आपापल्या घरी जाऊन राहिले पाहिजे. कारण जवळ राहिल्याने संबंध खराब होतात. उलट अंतर ठेवून राहिल्याने प्रेम वाढते.

जिथे भांडून नाराज होऊन माहेरी जाण्याची गोष्ट आहे, तर अशी चूक पुन्हा मुळीच करू नका. त्यामुळे तुमची प्रतिमा बिघडते. समस्यांवर उपाय शोधल्याने त्या दूर होतात, ना की त्यांच्यापासून दूर पळाल्याने.

आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. थायरॉइडवरही उपाय करा. त्यामुळे आपण लठ्ठपणापासून काही प्रमाणात सुटका मिळवू शकता.

मातृत्वाबाबत जिथे आपली काळजी आहे, तर आपल्या लग्नाला अजून १ वर्षच झालं आहे. वेळेनुसार आपण मातृत्वसुखही प्राप्त करू शकाल.

जवळच्या एखाद्या कुटुंब कल्याण केंद्रात जाऊन यावर सल्ला घेऊ शकता. पण सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या हुशारीने आपली कौटुंबिक स्थिती अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करा.

यासाठी आम्ही आपल्याला केवळ सल्ला देऊ शकतो, प्रयत्न तर आपल्याला स्वत:लाच करावे लागतील. सकारात्मक विचार बाळगा, हिंमत आणि धैर्याने समस्यांचा सामना करा, मग तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्व समस्यांतून मुक्त होऊन आपले वैवाहिक जीवन सुखी बनवलेलं असेल.

गृहशोभिकेचा सल्ला

 

मी २० वर्षीय तरूण आहे. मी सुरुवातीपासूनच खूप अंतर्मुख स्वभावाचा आहे. खूप कमी लोकांशी माझी मैत्री आहे. अर्थात, कुटुंबातही आईवडिलांशिवाय दुसरं कोणीही नाहीए आणि ते दोघंही नोकरदार आहेत. त्यामुळे घरीही मी जास्त वेळ एकटाच असतो. साहजिकच याच कारणामुळे मी लोकांत पटकन मिसळत नाही. माझी छबी शाळा आणि कॉलेजमध्ये एक अभ्यासू किंवा असं म्हणा की पुस्तकातील किडा अशीच राहिली आहे. माझ्यासोबतची मुले कॉलेजमध्ये मौजमस्ती करत असत. नवनवीन गर्लफ्रेंड्स ठेवत असत. उलट माझे या गोष्टीकडे कधी कलच नव्हता. घरातल्यांचीही इच्छा होती की मी चांगले ग्रेड्स मिळवावे. मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यात गुंतलो आहे.

गेल्या महिन्यात कुणास ठाऊक कसे, एका मुलीचे फ्रेंडशिप प्रपोजल मी कसं स्वीकार केलं, तेही फेसबुकवर. काही दिवसांच्या मैत्रीतच आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आम्ही रोज भेटू लागलो होतो.

एके दिवशी तिने डिनरची फर्माइश केली आणि त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये संबंधही ठेवले. माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता. त्यामुळे मी एवढा कामोत्तेजित झालो होतो की सुरक्षेसाठी कंडोमचाही वापर केला नाही.

आठवड्याभरापूर्वी एका मित्राद्वारे कळलं की माझ्या या मैत्रिणीने अनेक लोकांशी संबंध ठेवले आहेत. हे सत्य कळल्यानंतर मी तिला भेटणं बंद केलं. सर्व संबंध संपवून टाकले. अगदी चॅटिंग, फोन वगैरेही. परंतु या गोष्टीबाबत खूप काळजीत आहे की त्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे मला एड्स तर होणार नाही ना?

त्या मुलीशी संबंध तोडून आपण समजदारपणाचे काम केले आहे. अशा प्रकारच्या मुली सरळसाध्या तरुणांना फसवून ऐश करतात आणि अनेकदा त्याबदल्यात लैंगिक रोगांची भेटही देतात.

मी ४२ वर्षीय विवाहित आहे. विवाहाला १६ वर्षे झाली आहेत. २ मुलं आहेत. सुखी आणि संपन्न दाम्पत्य जीवन आहे. ३ महिने आधीपर्यंत मी स्वत:ला एक यशस्वी गृहिणी आणि पतिची प्रेयसी समजत होते,   पण एके दिवशी कळलं की पती जेव्हा अनेक दिवसांसाठी टूरवर जातात, तेव्हा तिथे (मुंबईत) कुठल्यातरी कॉलगर्लबरोबर मजा करतात.

आता हे सत्य कळल्यावर माझी झोपच उडाली आहे. मला स्वत:चाच राग येऊ लागला आहे. मी ज्या पतिवर डोळे झाकून विश्वास ठेवत राहिले, त्यांनी माझा विश्वासघात केला. मी त्यांच्याशी याबाबत काही बोलले नाहीए, पण मनातल्या मनात कुढत आहे. मला कळत नाहीए की या स्थितीत स्वत:ला कशी सावरू? माझ्या पतिने चिडलेला मूड आणि काळजीत असलेला चेहरा पाहून अनेकदा विचारलं, पण तब्येत बरी नसल्याचे सांगत टाळलं. कृपया मला सांगा, मी काय करू?

तुमचं काळजीत पडणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही काळजीत किंवा तणावग्रस्त होऊन समस्या संपणार नाही. त्यासाठी आपल्याला स्वत:ला प्रयत्न करावे लागतील. पतिला समोर बसवून त्यांच्याशी बोला. त्यांना समजवा की अशा प्रकारचे वागणे अनुचित तर आहेच, पण त्यांच्या स्वत:च्या हिताचेही नाही. कॉलगर्ल्सचे अनेक पुरुषांशी संबंध असतात आणि त्यांच्याशी संबंध बनवल्याने एड्ससारखा आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्यांनी या व्यभिचारापासून दूर राहिले पाहिजे. त्यांना प्रेमाने, रागाने कसेही समजावा आणि हेही सांगा की जर त्यांनी ही गोष्ट संपवली नाही, तर तुम्ही त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणार नाहीत.

मी बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे आणि अॅक्टर बनायची इच्छा आहे. मी नाटकात काम करतो. मोठमोठ्या ऑडिटोरियम्समध्ये शो केले आहेत. अॅक्टर बनण्यासाठी मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घ्यायला हवा का? जर तसे असेल, तर त्यासाठी मला काय करायला हवं आणि त्या प्रशिक्षणानंतर मी अॅक्टर बनू शकेन का?

आपली ही चांगली हॉबी आहे. जर भविष्यात तुम्हाला यातच करियर करायचं असेल, तर बीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या या मनपसंत कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकता. याच्या माहितीबद्दलचा प्रश्न आहे, तर ती तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकेल. आपल्याला सावध करतोय की अन्य क्षेत्रांच्या तुलनेत या क्षेत्रात प्रतिस्पर्धी खूप आहेत. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.

मी २४ वर्षीय तरुणी आहे. पतिचे वय २६ वर्षे आहे. आम्ही दोघांना सेक्सबाबत मुळीच ज्ञान नाही. विवाहाला ६ महिने झाले आहेत. तरीही आम्ही अजून नीटपणे सहवासाचे सुख घेतलेले नाहीए. पती जेव्हाही सहवासासाठी प्रवृत्त होतात,  मला भीतिमुळे सामान्य वाटत नाही. पती सहवास तर करतात, पण त्यांना वाटतं की ते बलात्कार करत आहेत. काय करू, जेणेकरून आम्हीही इतर दाम्पत्यांप्रमाणे सेक्सचा आनंद घेऊ शकू?

आपण विवाहितांसाठीचे सेक्स या विषयावर चांगले पुस्तक वाचले पाहिजे. त्यानंतर आपल्याला माहिती मिळेल की कसे संबंध बनवावेत. त्याबरोबरच सहवासासाठी प्रवृत्त होण्यापूर्वी आपण दोघांनी प्रणय, आलिंगन, चुंबन इ. रतिक्रीडा केल्या पाहिजेत. त्यामुळे कामोत्तेजना वाढते. त्यानंतर तुम्ही सहवास केल्यास आपल्याला जरूर सुख मिळेल. अर्थात, आपण आपल्या मनात काही पूर्वग्रह ठेवू नये.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें