गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २६ वर्षांची आहे. पिरिड्सदरम्यान माझ्या ब्रेस्टचा आकार हेवी होतो. ब्रेस्ट थोडी कडकसुद्धा होते. पिरिड्सनंतर काही दिवस ही समस्या कायम राहते. यामुळे सेक्सच्यावेळी मला बरोबर वाटत नाही. सांगा मी काय करू?

पिरिड्सदरम्यान ब्रेस्ट हेवी होणे ही काही गंभीर समस्या नाहीए. हे साधारणत: सॉल्ट रिटेंशनमुळे होते. तुम्ही फॅमिली डॉक्टरना भेटून आपली समस्या सांगणं उत्तम. व्यवस्थित खाणेपिणे व उपचार यामुळे ना केवळ ही समस्या संपेल तर तुमचे सॉल्ट रिटेंशन आणि कंजेशनसुद्धा कमी होईल.

मी २१ वर्षीय तरूणी आहे आणि हॉस्टेलमध्ये राहते. माझी रूममेट माझी चांगली मैत्रीण बनली आहे. आम्ही कधीकधी मोबाइलवर एकत्र पॉर्न मुव्हीसुद्धा पाहतो. अलीकडेच काही दिवसांपूर्वीच माझी मैत्रीण सेक्स टॉईज घेऊन आली. तिने मलासुद्धा हे वापरायला सांगितले. सुरुवातीला मला असे करायला संकोच वाटला, पण आता मला याची चटक लागली आहे. कृपया मला सांगा सेक्स टॉईज कितपत सुरक्षित आहेत? मी काही चूक तर करत नाही ना?

जर हायजिनकडे लक्ष दिले तर सेक्स टॉईज वापरण्यात काही गंभीर धोका नाही. पण बाजारात लपून छपून मिळणाऱ्या सेक्स टॉईजच्या अनेक रेंज भारतासहित अनेक देशात प्रतिबंधित आहेत.

योग्य हेच राहील की तुम्ही आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलवर पॉर्न मुव्ही बघण्याची सवय सुटू शकते. याउलट सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्या आणि चांगली मासिकं, साहित्य वाचा. शक्य असेल तर आपल्या रूममेटपासून दूर राहण्यासाठी रूम बदलून घ्या.

मी ३२ वर्षीय विवाहित पुरुष आहे. माझे सहजीवन समाधानी आहे. पण काही दिवसांपासून मी चिंतेत आहे. माझी पत्नी पॉर्न मुव्ही पाहून सेक्सदरम्यान तशा स्टेप्स करायला सांगते. सुरुवातीला मलाही मजा वाटली पण अनेक स्टेप्स इतक्या विचित्र असतात की मला कळत नाहीत. सांगा मी काय करू?

विवाहानंतर सेक्स संबंधात एकमेकांचा विचार करणे आणि लैंगिक सक प्राप्त होणे वैवाहिक जीवनाचा पाया आहे. त्यात सेक्स तर निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे.

जर पत्नीची इच्छा सेक्सदरम्यान वेगवेगळी आसनं करून ते आणखी आनंददायक बनवण्याची असेल तर यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल.

तुम्ही यासाठी ‘कामसूत्र’ साहित्याची मदत घेऊ शकता. यात रतिक्रीडेच्या आसनांबाबत विस्ताराने सांगितले आहे. सेक्स संबंधांच्यावेळी आपल्या पत्नीशी मोकळेपणाने बोला आणि एकमेकांना सहयोग करा. रात्री अंथरुणात जाण्याआधी हलका पण पौष्टीक आहार घ्या. यामुळे सेक्स प्रक्रियेत ऊर्जा टिकून राहील.

मी ३४ वर्षांचा आहे आणि ५ वर्षाच्या मुलीचा पिता आहे. लग्नानंतर काही वर्ष वैवाहिक आयुष्य छान चालले होते. पण अलीकडे पत्नी थोडी बदलल्यासारखी वाटते. सेक्स संबंध करून महिनोंमहिने उलटतात. माझी इच्छा असली तरी ती काहीतरी कारण सांगून टाळते. तिच्या या बदललेल्या वागणूकीमुळे मी पडताळणी केली तेव्हा कळले की तिचे तिच्या कार्यालयातील एका सहकाऱ्याशी संबंध आहेत. मी माझ्या पत्नीला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झालो. आता मला वाटते की हे संबंध संपवावे आणि तिला घटस्फोट द्यावा. कृपया सल्ला द्या?

वैवाहिक जीवनात पती अथवा पत्नीचे सेक्सप्रति उदासीनता दर्शवणे, सेक्स संबंध निर्माण करण्यास नकार देणे घटस्फोटासाठी कारणीभूत ठरते. तुम्ही तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण पत्नीला पटले नाही. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. पण हे तुमचे व्यक्तिगत मत असू शकते. जो काही निर्णय घ्याल तो सारासार विचार करून घ्या, कारण तुमची ५ वर्षांची मुलगी तुम्हा दोघांची जवाबदारी आहे. तिच्यावर घटस्फोटाचा वाईट परिणाम होऊ शकतो.

घटस्फोट घेणे सोपे नाही आणि तुम्हाला त्रिशंकू अवस्थता लटकवू शकतो. जो हक्क तुम्ही मिळवू इच्छिता, शक्यता आहे, तो तुम्हाला मिळणारच नाही.

मी ३२ वर्षीय महिला आहे. २ मुलांची आई आहे. लग्न होऊन ११ वर्षं झाली आहेत. सुरुवातीला सगळे नीट सुरु नव्हते. सासू छळत असे. नवराही भांडणात अंगावर हात उचलत असे. यात वेगळे म्हणजे माझी एका फेसबुक फ्रेंडशी चांगली मैत्री झाली. आम्ही दोघे वेगवेगळया शहरात राहतो, तरीही आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग आणि गप्पा मारत असतो. त्याची आणि माझी एकदाही भेट झाली नाही आहे पण आम्ही आपापसात बोलल्याशिवाय राहू शकत नाही. त्याला अनेकदा मी ब्लॉक केले पण परत तशीच स्थिती होते. कधीकधी मनाला जाणवते की मी माझ्या नवऱ्याला चिट का करते आहे? सांगा मी काय करू?

तुम्ही या अपराधी भावनेत अजिबात राहू नका. तुम्ही काही चुकीचे करत नाही आहात. जर तुम्हाला मानसिक सुख घरात मिळत नसेल तर तुम्ही शांती मिळावी म्हणून फेसबुक फ्रेंडचा आधार घेत आहात. तो पुरुष असो वा स्त्री, हे चुकीचे नाही आहे. नैतिकतेच्या घोळात न फसता आपली मन:शांती घालवू नका. हो, एकमेकांना भेटायचे असेल तर आधी २-३ वेळा विचार करा की जोखीम घ्यावी की नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २७ वर्षांची अविवाहित मुलगी आहे आणि रिलेशनशिपमध्ये आहे. सध्या लग्न करण्याची इच्छा नाही. सेक्स करताना प्रियकर कंडोम वापरतो. मला हे जाणून घ्यायचे आहे की गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम खरोखर प्रभावी आहे का?सेक्स पूर्णपणे सुरक्षित राहण्यासाठी २ कंडोम एकत्र वापरले जाऊ शकतात का?

गर्भनिरोधकासाठी कंडोम हा एक सोपा आणि चांगला पर्याय मानला जातो. ते बाजारातही सहज उपलब्ध ही आहे. त्याचा वापर केवळ गर्भधारणा रोकण्यासाठीच नव्हे तर एसटीडीसारख्या समस्यांपासूनही शरीराचे संरक्षण करणे आहे.

सेक्स दरम्यान कंडोम वापरूनही गर्भधारणा तेव्हाच होऊ शकते जेव्हा कंडोम फाटला गेला असेल. सामान्यत: निकृष्ट दर्जाचा कंडोम फाटण्याची भीती असते. म्हणून आपण आपल्या प्रियकराशी याबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे. त्याला फक्त ब्रँडेड कंडोम वापरण्यास सांगा. ब्रँडेड कंडोम दीर्घकाळ टिकणारे असतात आणि ते सहजपणे तुटत नाहीत. आजकाल बाजारात अनेक फ्लेवर्समध्ये कंडोम उपलब्ध आहेत, जे सेक्सला अधिक रोमांचक बनवतात.

जरी कंडोम हे गर्भनिरोधकांचे एक चांगले साधन असले तरी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सेक्सदरम्यान महिला योनीतून गर्भनिरोधक गोळयादेखील वापरू शकता. याद्वारे तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय सेक्सचा पूर्ण आनंद घेऊ शकता. पण बॉयफ्रेंडला कंडोम लावण्यास जरूर सांगा.

मी २५ वर्षांची नोकरी करणारी मुलगी आहे. मी २ महिन्यांनी लग्न करणार आहे. मला स्वयंपाक करायला येत नाही, तर मी टीव्ही मालिकांमध्ये पाहिलं आहे की जेव्हा सुनेला स्वयंपाक करायला येत नाही तेव्हा सासरचे लोक तिची चेष्टाच करत नाही तर तिला त्रास ही देतात. मला सांगा मी काय करू?

छोटया पडद्यावर प्रसारित होणाऱ्या बहुतेक मालिकांचा खऱ्या जीवनाशी दूर-दूरपर्यंतही काही संबंध नसतो. सासू-सून टाईपच्या काही मालिका तर एवढया फसव्या असतात की त्या जनजागृती करण्याऐवजी समाजात गोंधळ आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात. क्वचितच अशी एखादी मालिका असेल ज्यामध्ये सासू-सुनेचे नाते यापेक्षा चांगल्या पद्धतीने मांडले गेले असेल.

तरीही तुम्ही तुमच्या मंगेतराशी बोला आणि याबद्दल माहिती द्या, लग्नाला अजून २ महिने बाकी आहेत, त्यामुळे आतापासून स्वयंपाक करायला शिकण्यास सुरुवात करा. स्वयंपाक हीदेखील एक कला आहे, ज्यामध्ये कुशल स्त्रीला इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही, तसेच तिला पती आणि मुलांसह घरातील सर्व सदस्यांचे खूप प्रेमही मिळते.

मी २५ वर्षांचा अविवाहित तरुण आहे. माझी अडचण माझ्या प्रेयशीबद्दल आहे, जी मनाने चांगली आहे आणि माझ्यावर खूप प्रेमही करते, पण ती नेहमी नाराज असते. मी तिला नेहमी फिरायला घेऊन जावे, चित्रपट दाखवावा, शॉपिंग करावे असे तिला वाटते, ती मला वारंवार फोन करून त्रासही देत असते. ती म्हणते तू जे काही करशील ते मला सांगून कर. कधी कधी असं वाटतं की मी वाईटरित्या अडकलोय. मला सांगा मी काय करू?

प्रत्येक प्रेयशीला वाटते की तिच्या प्रियकराने तिच्यावर प्रेम करावे, तिला वेळ द्यावा, चित्रपट दाखवायला घेऊन जावे, शॉपिंग करावे, भेटवस्तू द्याव्यात तुमच्या प्रेयशीलाही तुमच्याकडून अशीच अपेक्षा आहे. जर तुम्ही काम करत असाल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी प्रेयशीला नक्कीच वेळ द्या. होय, उर्वरित दिवसात हालचाल विचारत रहा.

विनाकारण ती तुम्हाला वारंवार फोन करत असेल, तर त्याबद्दल तिच्याशी बोला आणि वेळेनुसार भेटण्याचे आणि फिरायला जाण्याचे वेळापत्रक निश्चिंत करा. असे करूनही जर ती जुमानत नसेल आणि तुम्हाला त्रास देत असेल तर तिच्यापासून अंतर राखण्यातच फायदा आहे.

मी २९ वर्षांची विवाहित आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे. लग्नाआधीच आम्हाला सांगितले गेले होते की मला संयुक्त कुटुंबात राहायचे आहे, तसे तर इथे कुठल्या गोष्टीची अडचण नसली तरी सासरचे बहुतेक लोक मोकळया विचारांचे नाहीत, तर मी खूप मोकळया मनाची आहे. यामुळे मला कधी-कधी त्यांची नाराजी सहन करावी लागते आणि मोकळेपणामुळे माझ्या नणंदा आणि जाऊ माझ्याकडे विचित्र नजरेनेही पाहतात. पतीला इतरत्र फ्लॅट घेण्यास सांगू शकत नाही. मला सांगा मी काय करू?

कुटुंबात कधी कधी मतभेद, वादविवाद, भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण फॅमिली हे फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपसारखे नाही, ज्यात तुम्ही शेकडो लोक तर जोडले आहेत, पण तुम्हाला कोणी आवडत नसेल तर तुम्ही त्याला एकाच क्लिकवर एका झटक्यात काढून टाकू शकता. कुटुंबातील काही सदस्य तुमच्याकडे कसे पाहतात, कसे वागतात याची अजिबात पर्वा करू नका. स्वत:ला अशा प्रकारे व्यवस्थित करणे चांगले होईल की आपण नेहमीच एक सुंदर व्यक्ती राहाल. कोण कसे पाहते हे त्याच्यावर अवलंबून आहे.

आजकाल जिथे बहुतेक लोक विभक्त कुटुंबात राहतात आणि सर्व निषिद्धांमधून जातात, तिथे आजच्या काळात तुम्हाला संयुक्त कुटुंबात राहण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये थोडी समज दाखवली तर भविष्यात हे तुमच्यासाठी फायदेशीरच सिद्ध होईल.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २३ वर्षांची नवविवाहित महिला आहे. लग्नानंतर अनेक स्वप्ने उराशी बाळगून मी सासरच्या घरी आले, पण मला सासरचे वातावरण अजिबात आवडत नाही. माझ्या सासू विनाकारण टोकत राहतात आणि त्या केव्हा खूष होतील, केव्हा रागावतील हेही कळत नाही. त्या मला अनेकदा म्हणतात की, आता तुझे लग्न झाले आहे आणि तुला त्यानुसारच जगले पाहिजे. माझे मन खूप दु:खी आहे. मी काय करावे कृपया सल्ला द्या?

जर तुमच्या सासूचा मूड प्रत्येक क्षणी बनत-बिघडत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तिला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही स्वत:ला कोसत राहण्याची आणि सासूविषयी गैरसमज करून घेण्याची चूक करू नका, घर-गृहस्थीच्या दबावाखाली त्या कदाचित कधी कधी तुमच्यावर राग काढत असतील, पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही की त्यांचे तुमच्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी कमी आहे.

दुसरे म्हणजे, तुमची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आणि तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही लग्न केले आहे असा विचार करणे निरर्थक आहे. त्यांनी एखाद्या गोष्टीला नकार दिल्यास हे आवश्यक नाही की त्या तुमचा अपमान करत आहेत.

आजच्या सासूचा दृष्टिकोन आधुनिक आहे आणि त्यांच्यात स्मार्टपणे घर चालवण्याची क्षमता आहे. सुनेला मुलगी म्हणून आकार देण्याचे काम सासूच करते. साहजिकच, सासूबाई तुम्हाला आतापासूनच घर कुशलतेने चालविण्यासाठी आणि त्यांना पटवून देण्यासाठी तयार करत आहेत.

सून म्हणून न राहता मुलगी म्हणून जगले तर बरे होईल. सासूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, फिरायला जा, खरेदीला जा. जेव्हा तुमच्या सासूबाईंना खात्री होईल की तुम्ही आता घर-गृहस्थी सांभाळू शकता तेव्हा त्या तुमच्याकडे चाव्या सोपवून निश्ंचत होतील.

मी २५ वर्षांची तरुणी आहे. २-३ महिन्यांनी माझे लग्न होणार आहे. मंगेतर एका मोठया कंपनीत चांगल्या पदावर काम करत आहे. परंतु असे असूनही एक चिंतादेखील आहे. खरं तर, मंगेतर लग्नाआधीच संबंध बनवू इच्छितो. इतकंच नाही तर तो मोबाईलवर पॉर्न व्हिडिओही पाठवत राहतो आणि जेव्हाही त्याच्याशी बोलते तेव्हा त्याला माझ्याशी सेक्सवर जास्त बोलायचं असतं. व्हिडिओ कॉलदरम्यान तो मला न्यूड व्हायलादेखील सांगतो. माझा मंगेतर कुठल्या मानसिक विकाराच्या आहारी गेला आहे का? मी काय करावे कृपया सल्ला द्या?

लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे अजिबात योग्य नाही. जर तुमचा मंगेतर तुमच्यावर यासाठी दबाव आणत असेल तर त्याला स्पष्टपणे नकार द्या. राहिली गोष्ट त्याची कुठल्या मानसिक विकाराने ग्रस्त असण्याची तर ती त्याच्या जवळ कुणी राहिल्यावरच कळू शकते.

जर तुमचा मंगेतर फक्त सेक्सबद्दल बोलत असेल, पॉर्न चित्रपट पाहण्याचा छंद असेल, तर स्पष्ट आहे ही एक विकृतीच आहे, ज्याला सेक्स अॅडिक्शन म्हणतात.

सेक्स अॅडिक्शन म्हणजे लैंगिक व्यसन हा एक मानसिक आजार आहे, ज्याचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच होत नाही, तर करिअर आणि नातेसंबंधांवरही होतो.

संशोधकांचे असे मत आहे की जे लोक सेक्सच्या बाबतीत स्वत:वर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांचा स्वत:सोबतच इतरांच्या आयुष्यावरही परिणाम होतो. अशा व्यक्तीला जर स्वत:ला अस्वस्थ किंवा तणाव जाणवत असेल तर त्याला पुन्हा-पुन्हा सेक्स करण्याची इच्छा होते जेणेकरून त्याचा ताण कमी होईल.

तुमचा मंगेतर लैंगिक व्यसनाने ग्रस्त आहे, हे त्याने स्वत: किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीने उघड केले तरच कळू शकते. तुम्ही जे काही कराल ते विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा. लग्न म्हणजे बाहुल्यांचा खेळ नाही. जर तुम्हाला मंगेतराच्या वागण्यात काही विकृती आढळत असेल तर तुम्ही स्वत:च ठरवा की तुम्हाला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे की नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें