प्रत्येक रंग काहीतरी सांगतो

* राजीव मर्चेट

आपले विचार, भावना आणि बुद्धिमत्ता विकसित करण्यात रंगांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत आकर्षक, सहज दिसणारे आणि वैविध्यपूर्ण रंगांमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा सोडण्याची शक्ती असते. हे रंग आपल्या हृदयावर आणि मनावर परिणाम करू शकतात. जर यांना योग्य प्रमाणात समाविष्ट केले गेले तर काही ठराविक रंग आणि त्यांचे कॉम्बिनेशन्स भरपूर चैतन्य आणू शकतात.

सजावटीच्या विविध वस्तू जसे की चित्रे, लँप, फुलदाण्या, वॉलपेपर, फुले, वनस्पती, दिवे, कलाकृती, मूर्त्या, फर्निचर इत्यादींचा समावेश करून विविध रंगांचा समावेश केला जाऊ शकतो. यासह घराचे सौंदर्य वाढविणाऱ्या सजावटीच्या वस्तू, मेणबत्त्यांपासून ते सॉफ्ट फर्निचर जसे की पडदे, ड्रेप, अॅक्सेसरीज, कुशन, ट्यूब पिलो, बेड आणि बाथरूम लिनेन्स, डायनिंग टेबल सेट, मॅट्स आणि रनरने ही रंग जोडले जाऊ शकतात. तसेच किचन वेअर जसे की सर्व्ह वेअर, क्रॉकरी, बेक वेअर, मग, ट्रे इत्यादीदेखील रंग सामील करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतात. संपूर्ण जग कलेच्या उत्कृष्ट नमुन्यांनी भरलेले आहे, जे घरात सजविता येतात आणि घराला बहुआयामी, सुंदर आणि आकर्षक बनवता येते.

ट्रेंडी शेड्स, पॅटर्न आणि प्रिंट्समध्ये उपलब्ध हे इंटिरियर फॅब्रिक वेअर घराच्या सजावटीमध्ये फार मोठा बदल घडवून आणू शकतात आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत आणि कुठल्याही जास्त देखभालीशिवाय.

कलेचे रंग थोडे क्लिष्ट असतात, म्हणून योग्य गोष्ट आणि योग्य प्रमाणात निवडा. तज्ज्ञांचे मतही घेता येईल. रंग समजून घेणे की त्याच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे, त्याची ऊर्जा आणि त्याचा परिणाम काय आहे, या सर्व गोष्टी नवीन मुलांचा खेळ आहेत. हे रंग तुमचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत करतील.

लाल : हा गतिशीलता, उत्साह आणि दृढनिश्चयाचा रंग आहे. हा रंग अतिशय तेजस्वी आहे आणि आधुनिक संदर्भात त्याचा अर्थ शक्तिशाली आणि प्रभावी बनला आहे. हा रंग हुकूमशाही, जलद रागीट होण्याचे आणि निर्भयतेचे प्रतीक आहे. लाल रंग जितका सुंदर आहे, ज्यांना तो आवडतो ते तितकेच उत्साही, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ते असतात.

निळा : हा रंग विश्वास, प्रामाणिकपणा, निष्ठा, सुव्यवस्था, शांती आणि संयम यांचे प्रतीक आहे. ज्या लोकांना निळा रंग आवडतो ते दयाळू, आशावादी, अंदाज लावण्यासारखे, एकटे आणि क्षमाशील नसतात.

हिरवा : ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो त्यांच्या हृदय आणि मनाचे योग्य संतुलन असते. ते निसर्गप्रेमी, संवेदनशील, अनुकरणीय, व्यवहारकुशल, कुटुंबासाठी समर्पित असतात.

पिवळा : पिवळा हादेखील सकारात्मकता आणि नकारात्मकतेचा संमिश्र रंग असतो, हा रंग आशावाद, उत्साह, बुद्धिमत्ता आणि तर्कसंगतता दर्शवतो. त्याचवेळी तो एखाद्या व्यक्तीला विश्लेषणात्मक, भित्रे आणि गर्विष्ठ बनवतो.

पांढरा : हा परिपूर्णतेचा रंग आहे, जो प्रेरणा आणि खोली देतो. स्वातंत्र्य आणि पावित्र्यतेचे प्रतीक मानला जाणारा हा रंग एकता, सौहार्द, समानता आणि संपूर्णता देतो.

व्हायलेट (जांभळा) : जे लोक व्हायलेट रंग पसंत करतात ते सौम्य, उत्साही आणि करामती व्यक्तिमत्वाचे धनी असतात. ते इतरांवर अवलंबून असतात, म्हणून ते रोजच्या जबाबदाऱ्या घेणे टाळतात. ते लोकांना सहज ओळखतात, त्यांना सत्ता आवडते.

राखाडी : हा सर्वात जास्त मोहक रंग आहे, जो निराशाजनक असूनही सुंदर आहे, कंटाळवाणा असूनही परिपक्व आहे, रुक्ष असला तरीही क्लासिक आहे. हा शेड स्थिरता आणि मोहक लाटांसह तेजस्वी महिमेचे वर्णन करतो.

तपकिरी : या रंगाचे प्रेमी गंभीर, जमिनीशी जुळलेले असूनही भव्यतेची झलक देतात. हे लोक साधे, सरळ, आश्रित असूनही, कधीकधी कंजूस आणि भौतिकवादी असतात.

काळा : मजबूत, मर्यादित, सुंदर, आकर्षक आणि गारवा देणारा काळा रंग खूप गाढ असतो, ज्याला अनेक लोक अशुभ म्हणू शकतात. हा रंग रहस्य, नकारात्मकता, निराशा आणि पुराणमतवादितेचे प्रतीक आहे.

नारिंगी : अत्यंत तेजस्वी रंग नारिंगी हा स्पष्टवक्तेपणाचा आणि रोमांच साधणाऱ्यांचा रंग आहे. आशावादी, आनंदी, दयाळू आणि स्वीकार्य असण्याबरोबरच हा रंग वरवरचा, समाजविघातक आणि अत्याधिक अहंकारी लोकांचे प्रतीक आहे.

छोट्याछोट्या आनंदाने नात्यांमध्ये आणा गोडवा

* गरिमा पंकज

दिवाळी एक प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे सैर करणारा सण आहे. प्रकाशाचं हे पर्व चंद्रप्रकाशात उजळलेल्या पौर्णिमेला नाही तर चहुबाजुंनी पसरलेल्या अंधारालादेखील परिभाषित करणाऱ्या अमावस्येचा दिवस असतो. म्हणजेच जेव्हा चहूबाजूंनी अंधार पसरलेला असेल, तेव्हाच आपल्याला प्रकाश आणायचा आहे. आनंदाचा शोध करायचा आहे. आनंद आपल्या आजूबाजूलाच आहे, जो छोटयाछोटया गोष्टींमध्ये लपलेला आहे. आपल्याला तो जमा करायचा आहे. दिवाळी जुन्या, विस्मृतीत गेलेल्या नात्यांना जागविण्याचा आणि निभावण्याचादेखील सण आहे.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे माणसं सतत एकटी होत चालली आहेत,

तिथे आपल्यासाठी दररोज नात्यांचे नवीन रोपटे लावणं खूपच गरजेचं झालंय.

दिवाळीच्या बहाण्याने आपण कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत अधिक छान वेळ घालवून घरदार अधिक उजळविण्याची संधी मिळते. तसंही सणवार आनंद वाटण्याचं एक माध्यम आहे. दिवाळीचा सण प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. यंदाचा हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत छोटया छोटया गोष्टींचा आनंद घेत साजरा करूया.

घराला द्या क्रिएटिव्ह लूक

* दिवाळीत आपल्या घराच्या सजावटीत थोडा बदल करा. पत्नी आणि मुलांसोबत २ दिवस अगोदरच या कामाला लागा. यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची संधी मिळेल. पत्नीसोबत थोडी मस्ती करण्याचादेखील आनंद मिळेल. मुलंदेखील तुमचं नवीन कौशल्य आणि खेळकर क्षण व्यतीत करून आनंदित होतील.

* घराच्या अडगळीतील जुन्या वस्तू फेकण्याऐवजी त्या रियुज करण्याचा प्रयत्न करा. त्यांची दुरुस्ती करा आणि त्यांना नवीन लूक द्या. जसं की तुम्ही जुन्या काचेच्या बाटल्यांचा लॅम्प बनवू शकता आणि जुन्या डब्यांना सजवून कुंडया बनवू शकता. अशाप्रकारे तुमच्या जुन्या सामानाने घराला नवीन लूक देऊ शकता. यामुळे तुमचं घर क्रिएटिव्हिटीसोबतच सजलेलं दिसेल. जे सर्वांना आवडेल देखील. या कामांमध्ये मुलांची मदत घ्यायला विसरू नका.

* अलीकडे तर साधारणपणे लहान मूल असलेल्या सर्वच घरांमध्ये क्ले गेम असतातच. हा एक प्रकारचं रबरासारखा हलका पदार्थ असतो, जो लहान मुलांची इमॅजिनेशन आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला लक्षात घेऊन बनविण्यात आलेला आहे. क्ले एक प्रकारचा खूपच फ्लेझिबल पदार्थ असतो, ज्याला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. शाळेतदेखील मुलांना क्लेच्या मदतीने नवनवीन वस्तू बनवायला शिकवलं जातं.

तर या दिवाळीत तुम्ही तुमच्या मुलांना होम डेकोरेशनसाठी काही नवीन कलाकृती वा मग डिझाईनर दिवे बनविण्याची प्रेरणा द्या. यासाठी तुम्ही त्यांना मदतदेखील करू शकता. यामुळे मुलांचं मन गुंतेल आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायलादेखील मिळेल आणि तुमचं त्यांच्यासोबत ट्युनिंगदेखील स्ट्राँग होईल.

* फुलं कायमच सर्वांना आकर्षित करतात. म्हणूनच दिवाळीत घराची सजावट फुलांनी करा. तुम्ही बाजारातून आर्टिफिशियल फुलं आणूनदेखील घराची सजावट करू शकता. यामुळे तुमचं घर सुंदर दिसण्याबरोबरच आकर्षकदेखील दिसेल.

* तुम्ही मुलांसोबत मिळून तुमचे नातेवाईक वा मित्रांसाठी हाताने बनवलेले हॅम्पर्सदेखील बनवू शकता. काही रंगीत थर्माकोल बॉक्स बनवू शकता. चॉकलेट, केक, सुकामेवा इत्यादी सजवून हॅम्पर बनवा. याव्यतिरिक्त काही दिवे, मेणबत्त्या वगैरेदेखील जोडा, जे दिवाळीची अनुभूती देतील. तुमच्या हम्परमध्ये विंड चाईम्स लावा आणि मग बघा मुलं अशी हॅम्पर्स बनवण्यासाठी किती उत्साहित होतात.

* दिवाळीसाठी तुम्ही सुंदर घरातल्या घरात रंगीबेरंगी मेणबत्त्या तयार करू शकता. ज्या तुम्ही स्वत: मुलांसोबत मिळून बनविलेल्या असतील.

* मुलांना सुंदर आणि रंगीत रांगोळीदेखील पहायला आवडते. तुम्ही सोबत असाल तर हे काम त्यांच्यासाठी अधिक छान आणि रोमांचक होऊ शकतं. तुम्ही त्यांना रांगोळी काढायला शिकवून दुसरी कामं करू शकता. रांगोळी काढण्यात मुलं व्यग्र होतील. काही क्रिएटिव्ह करण्याचा आनंददेखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल.

* दिवाळीच्या दिवसाला खास बनविण्यासाठी मुलांना दिवाळीशी संबंधित काही कथा सांगा. स्वत:च्या घरातील कुटुंबीयांसोबत या सणाशी संबंधित तुमच्या काही आठवणी ताज्या करा. दिवाळीशी संबंधित काही पुस्तकेदेखील मुलांना देऊ शकता.

दिवाळीच्या अनोख्या भेटवस्तू

* पत्नी आपल्या पतींना दिवाळीत घालण्यासाठी एक सुंदर डिझाईन केलेला पारंपारिक कुर्ता-पायजमा सेट भेट देऊ शकतात.

* तुम्ही तुमच्या कुटुंबियातील सदस्यांचं एक मेमरी कोलाजदेखिल बनू शकता. यामध्ये आतापर्यंतचे आवडते फोटो एक प्रेममध्ये बसवून तुमच्या भिंतीवर लावू शकता. हे सर्वांसाठी सुवर्ण क्षणांची एक संस्मरणीय भेट राहील.

* या दिवाळीत तुम्ही तुमच्या जीवनसाथीला पर्सनलाइज्ड ज्वेलरी सेट देऊन सरप्राईज करू शकता. ज्वेलरी सेटमध्ये पेंडेंट वा अंगठी वा स्वत:च्या आवडीची एखादी वस्तूच्या इनिशियलला जोडू शकता. यामध्ये त्यांचा आवडता रंगदेखील असू शकतो.

* मुलांची खोली वेगळया प्रकारे सजवून त्यांना सरप्राईज करू शकता.

* मुलांना पर्सनलाइज्ड वस्तू खूप आवडतात. जर त्यावर त्यांचा आवडीचा कार्टून बनलेलं असेल तर मग काय विचारूच नका. दुधासाठी कप, वॉटर बॉटल, मुलांचा टॉवेल, कलर्स, पेन्सिल इत्यादींवर स्वत:चं नाव तसंच आवडीच कार्टून बनविल्यास ते खूपच आनंदित  होतील.

* मुलं सणावारी नवीन कपडे घालण्यासाठी खूपच उत्सुक असतात. या दिवाळीत तुम्ही त्यांना ट्रॅडिशनल लूक देऊ शकता. तुम्ही मुलं आणि मुलींच्या ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी कपडयांसाठी ऑनलाईनदेखील एक्सप्लोर करू शकता.

* मिठाई खासकरून ‘चॉकलेट’ मुलांसाठी सर्वात छान दिवाळीची भेट असेल. तुम्ही काही वेगळया स्टाइलच्या चॉकलेट्स घरच्या घरी बनवू शकता.

सोबत शॉपिंग करा

* दिवाळीसाठी खूप खरेदी करायची असते. हे खूपच थकविणारं काम असतं. परंतु या खरेदीत तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांनादेखील सहभागी केलंत तर तुम्हाला फार त्रास होणार नाही, उलट आनंदच मिळेल.

* तुम्ही तुमची जाऊबाई, दीर वा खास मैत्रीणींना शॉपिंग करण्यासाठी बोलावू शकता. त्यामुळे सर्वांचं आउटिंगदेखील होईल, सोबत वेळ घालविण्याचीदेखील संधी मिळेल. यासोबतच तुमची खरेदी बजेटमध्येदेखील राहील, कारण सर्वजणांनी मिळून शॉपिंग केली तर बचतदेखील होते.

* दिवाळीच्या तयारीच्या दरम्यान अचानक घरी पाहुणे आलेत आणि नेमकं कुटुंबीयांसाठी शॉपिंग करण्यासाठी निघायचं असेल, तर मेकअप करायलादेखील वेळ मिळत नाही. अशावेळी घाईघाईत निघायचं असतं आणि वेळ नसेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही बीबी क्रीम लावा. बीबी क्रीम तुम्हाला मेकअपसारखाच फिनिश देतं. हे लावून तासनतास बसावं लागत नाही. बस तुम्ही ते लावलं आणि तुमचा फेस ग्लो करू लागतो. मग हवं असल्यास पाहुण्यांसोबत बसा वा खरेदीसाठी जा. अशाप्रकारे उलट तुम्ही काही मिनिटात तयार व्हाल.

घरच्या फराळाचा आस्वाद घ्या

* दिवाळीत वेगवेगळया प्रकारचा फराळ घरोघरी  बनत असतो. तुम्हीदेखील बाहेरून भेसळ युक्त मिठाई  खरेदी करण्याऐवजी तुमचे पती आणि मुलांच्या आवडीचं काही स्पेशल ट्विस्ट फराळ बनवून खायला द्या.

* पती किचनमध्ये जाउन काही डिश तयार करू शकतात वा मदत करू शकतात. दररोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून हे सर्व शक्य होत नाही. परंतु दिवाळीच्या क्षणी या गोष्टीचा आनंद घ्यायला विसरू नका. विश्वास ठेवा मोठया आनंदाऐवजी अशा छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधू शकता.

* जर तुमचे मित्र व नातेवाईक खाण्यापिण्याचे शौकीन असतील, तर तुम्ही बनविलेला फराळ खाण्यासाठी त्यांना घरी बोलवा वा त्यांच्या घरी फराळ घेऊन जा. हवं असल्यास दिवाळी सेलिब्रेशनसाठी रात्री आपल्या सर्व नातेवाईकांना निमंत्रित करा. अशाप्रकारे गेट-टुगेदरदेखील होईल आणि मुलेदेखील या आनंदी वातावरणाचा आनंद घेतील. दिवाळीत सर्वजण मिळून टेस्टी फराळाचा आस्वाद

घेतील तेव्हा नात्यांमध्ये आपलेपणा अधिक वाढेल.

नातेवाईक आणि मित्रांना भेटा

* आजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त आयुष्यात आपल्याला आपल्या जिवलगांसोबत काही क्षणदेखील घालविण्याची संधी मिळत नाही. परंतु सणवार आपल्याला आपल्या लोकांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी देतात. दिवाळीदेखील असाच एक खास सण आहे, जो आपल्याला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना भेटण्याची संधी देतो. अशा प्रकारे पाहायला गेलं तर दिवाळी आपल्या नात्यांना सुमधुर बनविते. तुम्हीदेखील या दिवाळीत असा प्रयत्न करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आनंद अधिक द्विगुणित होईल .

* तुम्ही देखील तुमचा जिवनसाथी आणि मुलांसोबत मिळून आपल्या जवळच्या लोकांच्या घरी जा. त्यांनादेखील आपल्या घरी बोलवा. यादरम्यान खूप गप्पा मारा. जुन्या आठवणी उजळवा आणि नवीन आठवणींचे क्षण जतन करा.

* जर एखाद्या मित्र वा नातेवाईकांसोबत काही कारणामुळे जर दुरावा वाढला असेल तर अशा रागवलेल्या नातेवाईकांचा रुसवा दूर करा. त्यांच्या घरी भेटवस्तू घेऊन जा. त्यांना आपल्या आनंदामध्ये सहभागी करा. प्रत्येक रागरुसवा दूर करून आपलेपणाने हा क्षण साजरा करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यदेखील यामुळे खूप आनंदित होतील.

या उत्सवात भीती नाही आनंद आणा

* पारुल भटनागर

सण-उत्सवाचा अर्थ आनंदाचा काळ, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना आपल्यामध्ये राहील्यामुळे आपण सतत आपल्या घरात राहण्यास विवश झालो आहोत आणि जर बाहेर पडलो तरीदेखील अजूनही भीती मनात असतेच. यामुळे लोकांना भेटणं फारसं होतच नाहीए.

आता सणउत्सवात ती एक्साइटमेंटदेखील पहायला मिळत नाही, जी पूर्वी मिळत होती. अशावेळी गरजेचं झालंय की आपण सणउत्सव मोकळेपणाने साजरे करावेत. स्वत:देखील सकारात्मक रहावं आणि दुसऱ्यांमध्येदेखील ही सकारात्मकता निर्माण करावी.

तर चला आपण जाणून घेऊया अशा टीप्सबद्दल ज्यामुळे तुम्ही या सणावारी तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं टिकवून ठेवू शकता :

घरामध्ये बदल करा

सणवार येण्याचा अर्थ घराची साफसफाई करण्यापासून खूप सारी खरेदी करणं, घरातील इंटेरियरमध्ये बदल करणं, घर व स्वत:साठी प्रत्येक अशी गोष्ट खरेदी करणं, जी घराला नवीन लुक देण्याबरोबरच आपल्या जीवनात आनंद आणण्याचेदेखील काम करेल. तर या सणावारी तुम्ही असा विचार अजिबात करू नका की कोण कशाला घरी येणार आहे वा जास्त बाहेर जायचंच नाहीए, उलट असा विचार करुन घर सजवा की यामुळे घराला नवेपणा मिळण्याबरोबरच तर घरात आलेल्या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील उदासपणा सकारात्मकतेमध्ये बदलेल.

यासाठी तुम्ही जास्त बाहेर पडू नका तर स्वत:च्या क्रिएटिविटीने घराला सजविण्यासाठी छोटया-छोटया वस्तू बनवा वा बाजारातदेखील बजेटमध्ये सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकता आणि जर तुम्ही बराच वेळापासून घरासाठी काही मोठं सामान विकत घेण्याबद्दल विचार करत असाल आणि तुमचं बजेटदेखील असेल तर या सणावारी त्याची खरेदी कराच. विश्वास ठेवा हा बदल तुमच्या आयुष्यातदेखील आनंद देण्याचं काम करेल.

करा सोबत सेलिब्रेट

सणवार असेल आणि तुमच्या जिवलगांची भेट होत नसेल तर सणावारी तेवढी मजा येत नाही, जी तुमच्या जिवलगांसोबत सेलिब्रेशन करण्यामध्ये येते. या सणावारी तुम्ही सावधानता बाळगून तुमच्या जिवलगांसोबत आनंदाने उत्सव साजरा करा. जर तुम्ही व तुमचे कुटुंबीय हे जिवलग आणि मित्रांसोबत सण साजरा करण्याचा प्लान करत आहात आणि जर ते पूर्णपणे व्हॅक्सिनेटेड असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत योग्य काळजी घेऊन सण साजरा करू शकता. या दरम्यान मोकळेपणाने मस्ती करा. खूप सेल्फी घ्या, भरपूर खूप डान्स करा, पार्टी करा, आपल्या लोकांसोबत गेम्स खेळून आनंदाच्या रात्रीदेखील सजवा.

पार्टीमध्ये एवढी मजा करा की तुमच्या आयुष्यातील सर्व उदासीनता गायब होईल आणि तुम्ही या दिवसांमध्ये केलेली मजा लक्षात राहील, हाच विचार करा की सगळे दिवस असेच असोत. म्हणजेच सेलिब्रेशनमध्ये एवढी मजा असो की तुम्हाला त्याची आठवण येताच तुमच्या चेहऱ्यावर आपोआप समाधानाचं हास्य परतेल.

स्वत:लादेखील रंगांमध्ये रंगवा

तुम्ही सणावारी घर तर सजवलं परंतु सणाच्या दिवशी तुमचा लुक अगदीच साधा असेल तर तुम्हालादेखील उत्सवाची अनुभूती होणार नाही. अशावेळी घर सजविण्याबरोबरच तुमच्या आयुष्यातदेखील रंग भरण्यासाठी आनंदी राहण्याबरोबरच नवीन कपडे विकत घ्या आणि स्वत:ला सजवा म्हणजे तुमच्यामध्ये आलेला नवीन बदल पाहून तुमचादेखील उत्साह वाढेल.

स्वत:ला वाटू लागेल कि तुम्ही सण मनापासून साजरा करत आहात. तुमच्या नवीन आऊटफिट्सवर तुमचा फुललेला चेहरा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलवीण्याचं काम करेल. तुम्ही भलेही कोणाला भेटा वा भेटू नका, परंतु सणावारी नटूनथटून नक्की रहा, कारण हा बदल आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करतं.

भेटवस्तूनी दुसऱ्यांमध्ये आनंद वाटा

जेव्हादेखील तुम्ही सणावारी कोणाच्या घरी जाल वा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही त्याला मोकळया हाताने परत पाठवू नका. आपापसात आनंद वाटण्यासाठी भेटवस्तूंची देवाण-घेवाण करा. भलेही भेटवस्तू जास्त महागडी नसेल, परंतु हे मनाला अशा प्रकारे आनंद देईल की याचा अंदाजदेखील तुम्ही लावू शकत नाही.

भेटवस्तू मिळाल्याच्या आनंदापासून ते खोलण्याचा व पाहण्याचा आनंद आपल्याला आतल्या आत उत्तम फिल देण्याचं काम करतं. सोबतच यामुळे कोणत्यातरी स्पेशल डेचीदेखील जाणीव होते. तुम्ही ऑनलाईनदेखील तुमचे गिफ्ट पाठवू शकता. तर मग या सणावारी तुमच्या जिवलगांच्या चेहऱ्यावर भेटवस्तूंनी आनंद आणा.

मिठाईचा आनंद घ्या

जर तुम्हाला सणावारी सणासारखा आनंद घ्यायचा असेल तर या दिवसात बनणाऱ्या पक्वान्नांचा खूप आनंद घ्या. असा विचार करू नका की जर आपण चार दिवस गोड, तळलेलं खाल्लं तर जाडजूड होऊ. उलट या दिवसात बनणाऱ्या प्रत्येक ट्रॅडिशनल फराळाची मजा घ्या. स्वत:देखील खा आणि दुसऱ्यांनादेखील  खायला द्या.

कोरोनामुळे सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत नक्कीच बदल झाला आहे, परंतु तुम्ही सणवार पुरेपूर एनर्जीसोबत साजरे करा, जसे पूर्वी साजरे करत होते. भलेही कोणी नाही आलं तरी तुम्ही तुमच्या लोकांसाठी फराळ बनवा. जेव्हा घरात फराळ बनेल आणि त्यांच्यासोबत तुम्ही एकत्रित बसून खाल तेव्हा सणाची मजा अधिक द्विगुणित होईल.

सजावटीमुळे मिळते सकारात्मकता

जर तुम्ही तुमच्या घरात एकच वस्तू अनेक वर्षापासून पाहून कंटाळला आहात आणि घरात सकारात्मकता आणायची असेल, तर घरात छोटया छोटया गोष्टींमध्ये बदल करा. जसं खोलीमध्ये एकच भिंत हायलाइट करा. यामुळे तुमच्या पूर्ण खोलीचा लुक बदलला जाईल. तसंच घरात नावीन्यपणा आणण्यासाठी कुशन कव्हर, टेबल कव्हर बेडशीटमध्येदेखील रंगसंगती आणा. तुम्ही बाहेर बाल्कनीमध्ये हँगिंगवाल्या कुंडया लावण्यासोबतच रिकाम्या बाटल्यादेखील सजवून त्यामध्ये रोपटी लावू शकता.

असं केल्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळण्या बरोबरच तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं कामदेखील करेल. तसंच खोलीतील भिंती ज्या घराची शान असतात, त्यांनादेखील तुमच्या हाताने बनविलेल्या वस्तुनी सजवा आणि पहा पुन्हा घर हसेल.

उत्सवी रांगोळी

diwal* डॉ. अनिता सहगल बसुंधरा

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. यादिवशी जर रांगोळीदेखील साकारली तर सणाचा आनंद अधिक द्विगुणित होईल. आता तर दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरी रांगोळी साकारण्याची जणू काही परंपराच झाली आहे. या दिवशी लोक आपल्या घराची स्वच्छता करतात, ते सजवतात आणि दरवाजासमोर रांगोळी काढतात.

दिवाळीच्या दिवशी दरवाजावर रांगोळी बनवून लोक पाहुण्यांचं स्वागत करतात. या दिवशी जमिनीवर बनविलेल्या वेगवेगळया रांगोळया आपल्या प्रत्येक भागातील कलेचे महत्त्व दर्शवितात. प्रामुख्याने रांगोळी कमळ, मासोळी, पक्षी आणि साप इत्यादींच्या रूपात काढली जाते. जे माणसं, प्राणी आणि निसर्गाबद्दलच्या प्रेमाचं प्रतीक मानली जाते. अनेक रांगोळया एवढया सुंदररित्या साकारलेल्या असतात की त्यांना पाहताच असं वाटतं की जणू काही खऱ्या रंगांचं खरी रंगसंगती स्वत:मध्ये एक वेगळं रुप घेऊन अवतरीत झाल्या आहेत.

रांगोळीत २ त्रिकोण काढले जातात. ज्यांच्या चहूबाजूंनी २४ पाकळया साकारल्या जातात आणि नंतर बाहेर एक गोल बनविला जातो. अनेकदा कमळाच्या पाकळया त्रिकोणी आकारातदेखील काढल्या जातात. उत्तर बिहारच्या रांगोळीमध्ये पाऊलं काढली जातात.

वेगवेगळया राज्यातील वेगवेगळी रांगोळी

भारताच्या प्रत्येक राज्यात रांगोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

आंध्रप्रदेशात अष्टदल कमळाच्या रूपात विविध पद्धतीने रांगोळी साकारली जाते.

तामिळनाडूमध्ये हृदयाच्या आकाराचे कमळ काढलं जातं. ज्यामध्ये ८ तारे बनवितात.

तर महाराष्ट्रात कमळाला विविध आकार देऊन रांगोळी साकारली जाते.

गुजरात एक असं राज्य आहे जिथे कमळाच्या रांगोळीचे १,००१ प्रकारच्या डिझाइन्स पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त स्वस्तिक आणि शंख बनविण्याचीदेखील परंपरा आहे, जी पूर्णपणे आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा दर्शविते.

संपूर्ण भारतात दिवाळीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो आणि या दिवशी साकारली जाणारी रांगोळी एक आनंदाचं प्रतीक मानली जाते. अनेक रांगोळया ज्या भौमीतिक आकार जसं की गोल, वृत्त, कमळ, मासोळी, झाड आणि वेलींच्या रुपात साकारली जाते.

रांगोळीचे साहित्य

रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारचं साहित्य वापरलं जातं. जसं रंगीत तांदूळ, लाकडाचा भुसा, फुलं, तांदळाचं पीठ, डाळी, पाने. संपूर्ण भारतात रांगोळीचा पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो. पांढरा रंग शांतीचे प्रतीक असतं. अनेक रांगोळी तांदळाच्या पिठाने व त्याच्या घोळाने काढल्या जातात.

दुसरा सुंदर रंग पिवळा असतो. कारण हळद पावडर वा पिवळया रंगाने रांगोळीचा बाहेरचा भाग साकारला जातो. केशर आणि हिरव्या रंगाचादेखील उत्तम रंगांमध्ये समावेश केला जातो.

तसंही बाजारात रांगोळीचे विविध रंग आहेत. परंतु दिपावलीबद्दल बोलत आहोत तर यावेळी तांदळाने रांगोळी काढण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला त्यात रंग भरायचे असतील तर तुम्ही तांदळाला विविध रंगांमध्ये रंगवून दरवाजासमोर जमिनीवर रांगोळी काढू शकता. अशा प्रकारे सुसज्जित रांगोळीने सजवलेलं अंगण पाहून पाहुणे नक्कीच खूश होतील.

दिवाळी काही क्षणाच्या आनंदासाठी थकविणारा प्रवास

* सीमा ठाकूर

मुंबईत दरवर्षी कितीतरी मुलं वेगवेगळया शहरातून शिक्षणासाठी वा नोकरीसाठी येतात. इथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात, ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात.

दिवाळी आपल्या जिवलगांसोबत साजरा करण्याचा सणउत्सव आहे. साधारणपणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या मुलांसाठी दिवाळी म्हणजे महिन्याभरा पूर्वीपासूनच आई-बाबांसोबत मिळून घराची साफसफाई करणं, खरेदीला जाणं, भेटवस्तू खरेदी करणं, घर सजवणं आणि दिवाळीच्यादिवशी खूप मजा करणं.

परंतु, अशी काही मुलं असतात जी होस्टेलमध्ये अनेक मैलाचा प्रवास करून घरी फक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचतात. दिवाळी फक्त एक सण नाही तर त्यांच्यासाठी एक आठवण आहे, एक असं प्रेम आहे जे स्वत:च्या कुटुंबियांसाठी या सणाला खास बनवितो.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरात दरवर्षी अशी कितीतरी मुलं वेगळया शहरातून शिकायला आणि नोकरी करण्यासाठी येतात. तिथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात. ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात. याचमुळे वर्षभर ते भलेही आपल्या घरी गेले नसले तरी दिवाळीसाठी नक्कीच जातात.

दिल्ली युनिव्हर्सिटीत शिकणारी कशिश सांगते, ‘‘हॉस्टेलमधून घरी जाण्यासाठी मला सर्वात मोठा त्रास असतो तो कपडे पॅक करण्याचा. कपाटातून काढा, कपडयांची निवड करा आणि नंतर पॅक करा, खूपच कटकटीचं असतं. सर्वात जास्त टेन्शनचं काम असतं हॉस्टेलमधून परवानगी घेणं. अगोदर तर दहा प्रकारचे असे फॉर्म सही करून घेतात. त्यानंतर पालकांच्या आयडीवरून मेल पाठवावा लागतो. त्यानंतर हॉस्टेलमधून बाहेर पडताना पालकांशी बोलून द्यावं लागतं. नंतर एक एन्ट्री हॉस्टेलचा गेटवर आणि एक कॉलेजच्या गेटवरती करावी लागते. या सर्वानंतर कॉलेजमधून बाहेर पडल्यावर सुट्टयांमुळे कोणतीही रिक्षा मिळत नाही. एकतर स्वत:च्या सामानसोबत उभे राहा वा रोड क्रॉस करून जा. कसंबसं करून मेट्रोपर्यंत पोहोचताच एवढं भारी सामान उचला आणि स्क्रीनिंगवरती टाका. कधी फोन पडतो व कधी हॅन्ड बॅग आणि चुकून जर फोन बॅगमध्ये टाकून विसरलो तर समजा मिनी हार्ट अटॅक येता येता राहून जातो.

‘‘तसं मी माझ्या घरी फ्लाईटनेच जाते येते, परंतु दिवाळीच्या वेळी फ्लाईट खूपच एक्स्पेन्सिव्ह होतात. दिल्लीवरून लखनौच्या फ्लाईटमुळे तसाही वेळ वाचतो. परंतु सामान अधिक जास्त असेल तर त्रास होतो. ट्रेनने गेल्यास कमीत कमी ९ ते १० तास  लागतात. जेव्हा मी पहिल्या वर्षाला होती तेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीवरून लखनौला एकटी जात होती, कारण अॅडमिशनच्यावेळी आईसोबत आली होती आणि त्यानंतर मी सरळ दिवाळीला जात होती. माझी ट्रेन पूर्ण ६ तास लेट होती. तिची वेळ होती संध्याकाळी ७ वाजता पोहोचण्याची आणि मी पोहोचली रात्री दीड वाजता. आई बाबा तर खूपच चिंतेत होते. ११ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ती ट्रेन जागेवरून हललीच नव्हती आणि स्टेशनला पोहोचण्यासाठी चार किलोमीटर बाकी होते. मला वाटलं की थोडंसं डिस्टन्स मी कव्हर करेन म्हणून मी निघाली. खाणं फक्त मी एक वेळचंच आणलं होतं, तेदेखील मेसवाल्या दादाला प्लीज प्लीज बोलून, जे खूपच अगोदर संपलं होतं. माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. नंतर स्टेशनवर आई बाबांचा चेहरा पाहिला तेव्हा मी सर्व काही विसरून गेली.’’

व्हिडिओग्राफर म्हणून नोकरी करणारा निलेश आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण काढत दिवाळीच्या दरम्यान केलेला स्वत:चं हॉस्टेल ते घर प्रवासाची आठवण काढत सांगतो, ‘‘कॉलेजचे पहिलं वर्ष होतं. घर नागपूरमध्ये होतं आणि सर्व मित्र तिथेच होते. मला खूपच एकटेपणा वाटत होता. कॉलेज सुरू झाल्यानंतरदेखील दिवाळीची सुट्टी केव्हा पडेल आणि मी केव्हा घरी जाईन याची वाट पाहत होतो. त्यावेळी मला स्वत:च्या सामानसोबत कसं मॅनेज करायचं आणि प्रवास करायचा हे माहीत नव्हतं. मी घरी कोणालाही सांगितलं नव्हतं की मी येतोय. मी आगाऊपणे अगोदर कॉल करून सांगितलं होतं की मी येणार नाही. यावेळी मला अभ्यासाचं प्रेशर खूपच जास्त आहे.

‘‘मी कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट बूक केलं. मी माझा वेळ मॅनेज करण्यासाठी एक चार्ट बनवला की दोन दिवसात कोणा कोणाला भेटायचं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं, एवढं सगळं. मी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी होस्टेलवरून निघालो आणि कॅबमध्ये बसलो. कॅबमध्ये बसल्यानंतर पंक्चर झाली. मला अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन तास लागले. कारण जेव्हा मी कॅबमधून उतरलो तेव्हा समोरच रिक्षा मिळाली परंतु नेमकं तिचं सीएनजी संपलं होतं. त्यांनी मला सांगितलं की रस्ता फक्त २ किलोमीटरचा आहे. तू पायी जाऊ शकतोस. पुढे खूपच ट्रॅफिक होतं, त्यामुळे कोणतीही रिक्षा मला मिळत नव्हती.

‘‘मी २ किलोमीटर पायी चाललो आणि जसं स्टेशन वरती पोहोचलो तेव्हा ट्रेन निघणारच होती. हे पाहून मी माझं सामान माझ्या डोक्यावर उचललं आणि धावलो. माझं सामान आतमध्ये फेकलं आणि चढलो. माझा कोच होता बी २ आणि मी चढलो होतो एस १ मध्ये. नंतर हळूहळू आतून निघत मी माझ्या जागेवरती पोहोचलो. मी हॉस्टेलवर रहात असल्यामुळे प्रवासासाठी खाणं पॅक करून देणारं कोणीच नव्हतं. परंतु मी ज्या डब्यामध्ये होतो, त्यामध्ये बसलेल्या काकाकाकूंनी माझ्यासोबत त्यांचा डबा शेअर केला. माझा वेळ ट्रेनमध्ये छान गेला. मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांशी गप्पा मारु लागलो. छान झोपलोदेखील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचलो. मी घराचा गेट उघडला आणि जेव्हा आईने मला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी सगळा थकवा घालवणारा होता. माझ्यासाठी ही दिवाळी गेल्या दिवाळीपेक्षा खूपच खास होती.’’

कॉलेजच्या सहामाहीच्या ब्रेकमध्ये जिथे परीक्षेच्या टेन्शनमुळे सर्वच मुलं चिंतेत असतात, तिथे हॉस्टेलमधून घरी जाणाऱ्या मुलांच्या डोक्यावर तर जणू संकटांचा डोंगर पडलेला असतो. ईशान दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्यावेळी हॉस्टेलमधून त्याच्या घरी गोव्याला जातो. तो त्याचा अनुभव शेअर करत सांगतो, ‘‘घरापासून दूर राहिल्यावर घराचं महत्त्व समजतं. दिवाळीत घरी एक वेगळीच रोनक असते. त्यामुळे सतत वाटतं की या सगळया गोष्टींचा भाग बनावा. मला घरी जाण्यापूर्वी कॉलेजची सर्व कामे करावी लागतात. कारण २ ते ३ दिवसाची सुट्टी मिळते. मित्रांसोबत अनेक प्लान्स कॅन्सल करावे लागतात.  परीक्षेसाठी अगोदरच अभ्यास करून ठेवावा लागतो. आई-बाबा फोन करतात तेव्हा सांगतात की तुझ्यासाठी काय काय खरेदी करणार आहे वा काय खरेदी करून ठेवले आहे. आता तर सांगावंदेखील लागत नाही जसं लहानपणी सांगाव लागायचं.

खाणंदेखील माझ्या आवडीचं असतं. घरी जाऊन वाटतं की आपण पुन्हा लहान मुलं झालो आहोत. इथे मुंबईमध्ये वाटत रहातं की आपण खूप मोठे आहोत. परंतु घरी जाऊन एकदम वेगळंच वाटतं. हा, दिवाळीमध्ये फ्लाइटचं तिकीट खूपच महाग असतं आणि विचार करावा लागतो की घरी जाऊ की नको, १०,००० पेक्षा कमी नसतं व परंतु घरी जाण्याचा आनंदापुढे सगळं काही लहान दिसू लागतं. २ दिवस घरी खूपच छान वाटतं. आपल्या गावात पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती येते. सगळीकडे दिवाळीची खूप धामधूम असते.’’

अशीच काहीशी असते हॉस्टेलवाल्यांची दिवाळी, जिथे त्यांच्यासाठी दिवाळी फक्त दोन दिवसांचा सणवार नसतो, तर १२ ते १५ तासांचा थकविणारा प्रवासदेखील असतो, ज्याचा थकवा आणि त्रास घरातल्यांबरोबर दिवाळी साजरा करण्याच्या आनंदा खाली दबून जातो.

सर्वकाही शाकाहारीच आहे का?

* मेनका संजय गांधी

या जगात शुद्ध शाकाहारीसाठी आपले अस्तित्व टिकवणे शक्य आहे का, जेव्हा प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू सर्वत्र विखुरलेल्या असतील? युरोपमध्ये वेगान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुद्ध शाकाहारी लोकांना नेहमीच सावधगिरी बाळगावी लागते की कुठे प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू शाकाहार म्हणून तर दिल्या जात नाहीत ना.

काहीही शाकाहारी नाही

प्राण्यांची हाडे, अंडाशय, यकृत, फुफ्फुसे, ग्रंथी, मेंदू, पाठीचा कणा, त्यांच्या शरीरातील रसायने रोजच्या अनेक गोष्टींमध्ये टाकले जातात आणि वेगान त्यांचा शुद्ध शाकाहार म्हणून मजेत वापर करतात आणि या प्राण्यांचे रसायन औषधांमध्येदेखील वापरले जाते आणि कधीकधी नुकत्याच मेलेल्या किंवा मारले गेलेल्या प्राण्यांची रसायने औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जातात.

मेलाटोनिक प्राण्यांच्या पाइनल ग्रंथीमधून काढला जातो आणि निद्र्नाशांवर उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. यकृत रोग, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या निवारण्यासाठी औषधांमध्ये प्राणी आणि डुकरांच्या पोटाचे पित्त वापरले जाते. सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारे हॅल्यूरॉनिक एसिड हे प्राण्यांच्या सांध्यापासून बनते.

प्राण्यांवर क्रौर्य

सुगंधित वस्तूंमध्ये प्राण्यांची उत्पादने खूप वापरली जातात. महागडया अत्तरामध्ये वापरली जाणारी मस्क, कस्तुरी हिमालयातील मस्क हरिणातून निघते. हरिणाला मारल्यानंतर त्याची ग्रंथी सुकविली जाते आणि नंतर अल्कोहोलमध्ये बुडविली जाते जेणेकरून कस्तूरी निघू शकेल. कॅस्टोरियम पेस्ट जेल हे एक रसायन असते, जे यकृतामधून निघते आणि परफ्यूममध्ये किंवा वाहन अपहोल्स्ट्रीमध्ये ताज्या नवीन लेदरला सुगंध देण्यासाठी वापरले जाते.

प्राण्यांच्या गुद्दवारातून बाहेर येणारी रसायनेही अत्तरांमध्येही वापरली जातात आणि ती रसायने केवळ तेव्हाच मिळतात जेव्हा प्राणी जिवंत असेल आणि त्याच्याशी क्रुरता अवलंबिली जाईल. इतरांना घाबरवण्यासाठी किंवा त्यांच्या साथीदारांना सावध करण्यासाठी त्यांना गंध निसर्गाने दिला आहे, परंतु आता त्याचा मोठया प्रमाणात औद्योगिकरित्या वापर केला जात आहे आणि आफ्रिकेत अशी वीसएक फार्म आहेत, जिथून जगभर अशी रसायने पाठविली जातात.

माणूस हा प्राण्यांचा शत्रू आहे

काही क्रीममध्ये सेरेब्रोसाइड आणि एराफिडॉजिक एसिड मेंदूच्या ऊतींमधून निघतात. प्राण्यांच्या ऊतींमधून एसिड्स लिपस्टिकमध्ये वापरली जातात. प्रोव्हिटामिन बी ५ शॅम्पू आणि कंडिशनर्समध्ये जोडले जाते, जे प्राण्यांची शिंगे, खुर, पंख, केसांपासून मिळवले जाते.

वंगण घालणाऱ्या क्रिममध्ये शार्क यकृत तेलाचा वापर केला जातो. गाई, डुक्कर आणि बकऱ्यांच्या पोटातून निघणाऱ्या रेनाइटचा उपयोग चीज तयार करण्यासाठी केला जातो.

प्राण्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे मानव, जो स्वत:ला शाकाहारी म्हणतो आणि प्राण्यांपासून बनवलेल्या गोष्टी मजेत वापरतो.

आपली कमाई सासूबाईंच्या हातात द्यावी की…

* गरिमा पंकज

भलेही सासू सुनेच्या नात्याला ३६चा आकडा म्हटलं जातं असलं तरी सत्य हे देखील आहे की एका आनंदी कुटुंबाचा आधार सासूसुनेमधील आपापसातील ताळमेळ आणि एकमेकांना समजण्याच्या कलेवर अवलंबून असतं.

एक मुलगी जेव्हा लग्न करून कोणाच्या घरची सून बनते तेव्हा सर्वप्रथम तिच्या  सासूच्या हुकुमतीचा सामना करावा लागतो. सासू अनेक वर्षांपासून जे घर चालवत असेल ते एकदम सुनेच्या हवाली करू शकत नाही. सुनेने तिला मान द्यावा, तिच्यानुसार चालावं असं तिला वाटत असतं.

अशामध्ये सून जर नोकरदार असेल तर तिच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की तिने तिची कमाई स्वत:जवळ ठेवावी का सासूच्या हातामध्ये? ही गोष्ट केवळ सासूचा मानण्याची नसते तर सुनेचा मानदेखील महत्त्वाचा असतो. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.

सुनेने स्वत:ची कमाई सासूच्या हाती केव्हा द्यावी

सासूबाई असतील विवश : जर सासू एकटी असेल आणि सासरे जिवंत नसतील तर अशावेळी एका सुनेने आपली कमाई सासूला सोपवली, तर सासूला तिच्याबद्दल आपलेपणा वाटू लागतो. पती नसल्यामुळे सासूला काही खर्चात हात आखडता घ्यावा लागतो, जे गरजेचे असूनदेखील पैशाच्या तंगीमुळे ती करू शकत नाही. मुलगा भलेही पैसा खर्चासाठी देत असेल परंतु काही खर्च असे असू शकतात ज्याच्यासाठी सुनेच्या कमाईचीदेखील गरज पडते. अशामध्ये सासूला पैसे देऊन सून कुटुंबाची शांती कायम राखू शकते.

सासू वा घरामध्ये कोणी आजारी होण्याच्या स्थितीत : जर सासूची तब्येत खराब रहात असेल आणि उपचारासाठी अनेक पैसे लागत असतील तर सुनेचं कर्तव्य आहे की तिने तिची कमाई सासूबाईंच्या हाती ठेवून त्यांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध करण्यात मदत करावी.

स्वत:ची पहिली कमाई : जसं एक मुलगी आपली पहिली कमाई आपल्या आई वडिलांच्या हातावरती ठेवून आनंदीत होते तसंच जर तुम्ही सून असाल तर तुमची पहिली कमाई सासूबाईच्या हातावर ठेवून त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी चुकवू नका.

जर तुमच्या यशाचं कारण सासूबाई असेल : सासूच्या प्रोत्साहनामुळे तुम्ही शिक्षण व एखादी कला शिकून नोकरी मिळवली असेल तर म्हणजेच तुमच्या यशामध्ये तुमच्या सासूबाईचं प्रोत्साहन आणि प्रयत्न असतील तर तुम्ही तुमची कमाई त्यांना देऊन कृतज्ञता प्रकट करा. सासूच्या पाणवलेल्या डोळयांमध्ये लपलेल्या प्रेमाची जाणीव होऊन तुम्ही नव्या जोशात पुन्हा कामावरती लागू शकाल.

जर सासूबाई जबरदस्तीने पैसे मागत असेल तर : पहिल्यांदा हे बघा की अशी कोणती गोष्ट आहे की सासूबाई जबरदस्तीने पैसे मागत आहेत. आतापर्यंत घराचा खर्च कसा चालत होता? या प्रकरणात योग्य म्हणजे तुम्ही तुमच्या पतींशी बोलून घ्या. त्यानंतर पती-पत्नी मिळून या विषयावर घरातील दुसऱ्या सदस्यांशी बोलून घ्या. सासुबाईंना समजवा. त्यांना पुढे मोकळेपणाने सांगा की तुम्ही किती रुपये देऊ शकता. मग ते घराचे काही खास खर्च जसं की रेशन, बिल, भाडं इत्यादीची जबाबदारी तुमच्यावर घ्या. यामुळे सासूबाईंनादेखील समाधान वाटेल आणि तुमच्यावर अधिक भार पडणार नाही.

जर सासू सर्व खर्च एका जागी करत असेल तर : अनेक कुटुंबांमध्ये  घराचा खर्च एकाच जागी केला जातो. जर तुमच्या घरामध्येदेखील जाऊ, मोठे दिर, छोटे दिर, नणंद इत्यादी एकत्र राहत असतील तर पूर्ण खर्च एकाच जागी होत असेल तर घराच्या प्रत्येक कमावू सदस्याने आपली जबाबदारी उचलायला हवी.

जर घर सासू-सासऱ्यांचं आहे : ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात जर ते सासू-सासऱ्यांचं आहे आणि सासू मुलगा सुनेकडून पैसे मागत असेल तर तुम्ही ते त्यांना द्यायला हवे आणि अगदीच नाही तर घर आणि इतर सुख सुविधांच्या भाडयाच्या रूपात पैसे नक्की द्या.

जर सासूने लग्नात केला असेल बराचसा खर्च : तुमच्या लग्नाचं सासू-सासऱ्यांनी खूप चांगल आयोजन केलं असेल आणि खूप पैसे खर्च केले असतील. घेणंदेणं, पाहुणचार तसंच भेटवस्तू इत्यादीमध्ये कोणतीही कसर सोडली नसेल, सून आणि तिच्या घरातल्यांना खूप दागिनेदेखील दिले असतील तर अशावेळी सुनेचं कर्तव्य आहे की तिने तिची कमाई सासूबाईंच्या हाती ठेवून त्यांना आपलेपणाची जाणीव करून द्यावी.

नणंदेच्या लग्नासाठी : जर घरामध्ये तरुण नणंद आहे आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले जात असेल तर मुलासूनेचं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या कमाईचा मोठा भाग देऊन आपल्या आई-वडिलांना मदत करावी.

जर पती दारुडा असेल : अनेकदा पती दारुडा व काहीच काम करत नसेल आणि पत्नीच्या रुपयांवर मजा करण्याची संधी शोधत असेल, पत्नीकडून पैसे घेऊन दारू वा वाईट संगतीत खर्च करत असेल अशा स्थितीमध्ये तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे तुम्ही पैसे आणून सासूबाईंच्या हाती द्यावे.

केव्हापर्यंत तुमची कमाई सासूच्या हातांमध्ये ठेवू नये

जर तुमची इच्छा नसेल आणि तुमच्या इच्छेच्या विरुद्ध तुमची कमाई सासूच्या हातामध्ये ठेवत असाल तर घरात नक्कीच अशांती निर्माण होते. सून नाखुष असते आणि इकडे सासू-सासऱ्यांच्या वागणुकीला नोटीस करून ती दु:खी राहील. अशा परिस्थितीत सासूला पैसे देऊ नका.

सासरे जिवंत असतील आणि घरात पैशाची उणीव नसेल : जर सासरे जिवंत आहेत आणि कमावत आहेत व सासू आणि सासरे यांना पेन्शन मिळत असेल तरीदेखील तुम्ही तुमची कमाई स्वत:जवळ ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे. कुटुंबात दिर, मोठे दिर आहेत आणि ते कमवत असतील तर तेव्हादेखील तुम्हाला तुमची कमाई देण्याची गरज नाही.

जर सासू त्रास देत असेल : जर तुम्ही तुमची पूर्ण कमाई सासूच्या हातात देत असाल आणि तरीदेखील सासू तुम्हाला वाईट बोलत असेल आणि कार्यालयाबरोबरच घरीदेखील सर्व कामे तुम्ही करत असाल, तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर पैसे देत नसेल तर अशा स्थितीमध्ये सासूच्या पुढे आपल्या हक्कासाठी लढायला हवं. अशा सासूच्या हातात पैसे ठेवून तुम्हाला स्वत:चा अपमान करून घेण्याची गरज नाही. उलट स्वत:च्या मर्जीने स्वत:वर पैसे खर्च करण्याचा आनंद घ्या आणि तुमचं डोकं टेन्शन फ्री ठेवा.

जर सासू खर्चिक असेल : जर तुमची सासू खूप खर्चिक असेल आणि जेव्हा तुम्ही तुमची कमाई त्यांच्या हाती देत असाल तेव्हा ते रुपए २-४ दिवसातच त्या खर्च करत असतील व सर्व रुपये पाहुण्यांसाठी व आपल्या मुलीं आणि बहिणींवर खर्च करत असेल तर तुम्ही सांभाळायला हवं. सासूच्या आनंदासाठी तुमच्या मेहनतीची कमाई अशीच बरबाद होण्याऐवजी ते तुमच्याजवळ ठेवा आणि योग्य जागी गुंतवणूक करा.

भेटवस्तू देणं योग्य आहे

यासंदर्भात सोशल वर्कर अनुजा कपूर सांगतात की तुम्ही तुमची पूर्ण कमाई सासूला देणं गरजेचं नाही. तुम्ही भेटवस्तू आणून सासूवर रुपये खर्च करू शकता. यामुळे त्यांचं मनदेखील आनंदित होईल आणि तुमच्याजवळ काही रुपये वाचतील. सासूबाईंचा वाढदिवस असेल तर त्यांना भेटवस्तू द्या. त्यांना बाहेर घेऊन जा. खाणं खायला द्या. शॉपिंग करा. त्यांना जेदेखील खरेदी करायचे ते त्यांना खरेदी करून द्या. सणावारी घराची सजावट आणि सर्वांच्या कपडयांवर खर्च करा.

पैशाच्या देणे घेण्यामुळे घरात ताण-तणाव निर्माण होतात. परंतु भेटवस्तूने प्रेम वाढतं. नाती सांभाळली जातात आणि सासूसुनेमध्ये बॉण्डिंग मजबूत होतं. लक्षात ठेवा पैशाने सासूमध्ये अरेरावीची भावना वाढू शकते. तर सुनेच्या मनातदेखील असमाधानाची भावना उत्पन्न होऊ लागते. सुनेला वाटतं की मी कमाई का करते जर सर्व रुपये सासूलाच द्यायचे आहेत. म्हणून गरजेच्यावेळी सासू व कुटुंबीयांवर पैसे आवर्जून खर्च करा. दर महिन्याला पूर्ण रक्कम सासूच्या हातात देऊ नका.

७ लेटेस्ट फ्लोअरिंग ट्रेंड

* नसीम अन्सारी कोचर

तुमच्या घराचे सौंदर्य ठरविण्यात टाईल्स किंवा फरशी मोठी भूमिका बजावतात. आज बाजारात विविध प्रकारच्या सुंदर टाईल्स पाहायला मिळतात, पण आपण ज्या ठिकाणी राहातो त्या ठिकाणचे हवामान, तापमान आणि आर्द्रता लक्षात घेऊनच टाईल्स निवडणे गरजेचे असते. याशिवाय जमिनीवर लावायच्या टाईल्स, स्वयंपाकघराच्या टाईल्स, भिंतीच्या टाईल्स यांची निवडही काळजीपूर्वक करायला हवी.

जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च करत असाल, तेव्हा प्रत्येक खोलीत सारख्याच टाईल्स पाहाणे तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. तुम्हाला प्रत्येक खोलीत काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन पाहायला आवडेल, जेणेकरून प्रत्येक खोलीत एक वेगळी अनुभूती येईल.

गृहिणी अनेकदा घराकरिता सर्वोत्तम टाईल्स खरेदी करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अनेकदा इंटरनेटवर योग्य निवड करता न आल्यामुळे दुकानांमध्ये जातात आणि तिथे दुकानदार त्यांना गोंधळात टाकतात. मग त्यांना अशा टाईल्स आवडतात ज्याचा त्यांना काही दिवसातच कंटाळा येऊ लागतो. अशा परिस्थितीत, काही सूचना आहेत ज्या तुम्ही तुमच्या घराचे फ्लोअरिंग ठरवण्यापूर्वी लक्षात ठेवल्या तर तुमचे शेजारी आणि मित्र-मैत्रिणी तुमच्या घराचे फ्लोअरिंग पाहून आश्चर्यचकित होतील.

टाईल्स खरेदी करण्यापूर्वी

सर्वप्रथम तुम्ही त्या खोलीचा विचार करा, ज्या खोलीत टाईल्स लावायच्या आहेत. त्या खोलीतील फर्निचर आणि कपाटांना कोणता रंग आहे? भिंतींचा रंग कोणता? त्या खोलीत तुम्ही कोणत्या रंगाचे पडदे वापरणार आहात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधल्यानंतरच, टाईल्सच्या दुकानात जा, जेणेकरून तुम्ही दुकानदाराला सर्व माहिती देऊ शकाल. यामुळे त्याला खोलीतील इतर गोष्टींना अनुरूप टाईल्स किंवा फ्लोअरिंग दाखवणे सोपे होईल आणि तुमचाही गोंधळ उडणार नाही.

एकदा तुमची खोली टाईल्स लावण्यासाठी तयार झाली की, तुम्हाला किती टाईल्स लागतील हे तपासा. एकाचवेळी त्या विकत घेणे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त घेणे केव्हाही चांगले, कारण जर लावताना काही टाईल्स खराब झाल्या किंवा तुटल्या तर तुम्हाला त्या तशाच्या तशा पुन्हा मिळतील की नाही, हे सांगणे कठीण असते. म्हणूनच त्या थोडया अधिक घेणे चांगले असते.

टाईल्स किंवा फ्लोअरिंगसाठी डिझायनर किंवा कॉन्ट्रॅक्टरला सोबत घेऊन जाणे उत्तम, कारण टाईल्सचा आकार पाहून तो तुम्हाला सांगू शकेल की, कोणत्या टाईल्स बहुतेक खोल्यांच्या रंगांशी जुळतील आणि एखाद्या विशिष्ट खोलीसाठी तुम्हाला त्या कशा अनुकूल ठरतील. शयनगृह किंवा दिवाणखान्यात. किती टाईल्स लागतील, हेही ते सांगतील.

तुमच्या जमिनीवरच्या टाईल्स सुस्थितीत असल्यास तुमच्या खोलीचे स्वरूप बदलण्यासाठी तुम्ही पीव्हीसी पॉलीविनाइल क्लोराईड किंवा विनाइल फ्लोअरिंग करून घेऊ शकता. हे काम कमी बजेटमध्ये होते.

काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत जसे की, लहान आकाराच्या खोलीसाठी मोठया आकाराच्या टाईल्स कधीही घेऊ नयेत, त्या सुंदर दिसत नाहीत. लहान खोलीवरील खर्च कमी करण्यासाठी, लहान आकाराच्या टाईल्स घ्याव्यात.

टाईल्स खरेदीसाठी कधीही संध्याकाळी किंवा रात्री दुकानात जाऊ नका, नेहमी दिवसाच्या उजेडात जा आणि वेगवेगळया खोल्यांच्या गरजेनुसार सूर्यप्रकाशात टाइल्सचा रंग आणि डिझाईन निवडा.

विट्रिफाइड टाईल्स

संगमरवरी आणि ग्रॅनाइटचा हा उत्तम पर्याय आहे. सिलिका आणि चिकणमातीपासून बनवलेल्या विट्रिफाइड टाईल्स टिकाऊपणाच्या दृष्टीने सर्वोत्तम आहेत. व्हरांडा पॅटिओ किंवा आउटडोअर फ्लोअरिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ओरबडे येणे आणि डाग प्रतिरोधक असल्याने, व्हिट्रिफाइड टाइल्स स्वयंपाकघरासारख्या सतत राबता असलेल्या खोलीसाठी चांगल्या आहेत, त्या ग्लॉसी फिनिश किंवा मॅट फिनिशसह अनेक डिझाईन आणि प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

संगमरवरी टाईल्स

भारतातील घरांमध्ये आकर्षक आणि शाही लुक देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकारांपैकी संगमरवर हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. उच्च दर्जाचे भारतीय संगमरवर परवडणारे आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. ते सर्व प्रकारच्या रंग आणि डिझाईनमध्येही उपलब्ध आहे. त्याची हलकीशी चमक आणि नाजूक लुक तुमचे घर ग्लॅमरस बनवेल. त्यामुळे काहीसा राजेशाही थाटाचाही अनुभव येईल.

विनाईल

ज्यांना त्यांच्या घराच्या जमिनीला लाकडी फ्लोअरिंगचा लुक द्यायचा आहे त्यांच्यासाठी विनाईल फ्लोअरिंग हा एक चांगला पर्याय आहे. विनाईल विविध प्रकार, रंग, चकाकी आणि डिझाईनमध्ये येते. लाकूड किंवा संगमरवरी फ्लोअरिंगच्या अगदी विरुद्ध असे विनाइल फ्लोअरिंग कमी बजेटमध्ये येते. ते जास्त काळ टिकते. त्यामुळे तुमची गुंतवणूक वाया जाणार नाही याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

ग्राफिक चिनीमातीच्या टाईल्स

तुम्हाला भडक आणि उठावदार असे काहीतरी हवे असल्यास ग्राफिक टाईल्स फक्त तुमच्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. या निवडक, चकचकीत टाईल्स लक्ष वेधण्याचा उत्तम मार्ग आहेत. या टाईल्स तुमची खोली क्षणार्धात उजळून टाकतात. पाणी आणि इतर न निघणारे डाग सहन करण्याच्या क्षमतेमुळे त्या बहुतेक करून स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा भिंतींवर लावल्या जातात.

लाकडी टाईल्स

लाकडी टाईल्स खोलीत उबदारपणा आणि मनमोकळेपणाचा अनुभव देतात. त्या खोली अधिक आकर्षक बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. लाकडी फ्लोअरिंगची योग्य काळजी घेतल्यास ते अत्यंत टिकाऊ असून आणि सर्व प्रकारच्या सजावटीसह उपलब्ध आहे.

लॅमिनेट

लाकडी फ्लोअरिंगचा विचार केल्यास लॅमिनेट हा एक चांगला पर्यायी पर्याय आहे, तुम्ही कमी खर्चात लाकडी फ्लोअरिंगचा आनंद घेऊ शकता. हे सिंथेटिक मिश्रण लॅमिनेट मटेरियलच्या जोरदार दाबलेल्या थरांनी बनलेले असते आणि त्यावर संरक्षणासाठी अत्यंत प्रतिरोधक सेल्युलोजरल आवरण असते.

कारने प्रवास करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवा

* प्रतिभा अग्निहोत्री

आपल्या मुलांना शाळेला सुटी लागताच आपण सर्वजण सहलीचे नियोजन करू लागतो. 2020 मध्ये कोरोनाचे आगमन झाल्यापासून, बहुतेक लोक त्यांच्या वैयक्तिक कारने प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला जास्त नियोजन करण्याची गरज नाही, कितीही सामान सोबत नेले जाऊ शकते, प्रवासादरम्यान चोरीची भीती नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. कुटुंबातील सदस्यांमधील संबंध मजबूत करते. या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही तुमच्या कारने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात

  1. कार तपासा

शक्य असल्यास, प्रवासाला निघण्यापूर्वी कारची सर्व्हिसिंग करून घ्या आणि जर तुम्हाला ती पूर्ण करणे शक्य नसेल, तर गाडीचे टायर तपासून घ्या तसेच पंक्चर झाल्यास वापरल्या जाणार्‍या स्पेअर टायरमधील हवा तपासून घ्या. प्रवासादरम्यान तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एसी इ.

  1. वेळेची काळजी घ्या

जर तुमचा प्रवास लांब असेल तर सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान तुमचा प्रवास सुरू करा जेणेकरून तुम्हाला गाडी चालवायला पुरेसा वेळ मिळेल आणि अंधार पडण्यापूर्वी तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचा. सकाळी लवकर प्रवास सुरू केला तर रात्री उशिरापर्यंत ७०० किलोमीटरचे अंतर सहज पार करता येईल.

  1. हायड्रेटेड रहा

ड्रायव्हिंग करताना भरपूर कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे द्रवपदार्थ पिणे चालू ठेवा. साध्या पाण्यासोबत नारळाचे पाणी, ग्लुकोज किंवा विविध रस आणि बदाम, अक्रोड, मनुका यांसारखे नटही वापरता येतात.

  1. पुरेशी झोप घ्या

ज्या रात्री तुम्हाला प्रवास करायचा आहे, त्या रात्री तुम्ही 7 ते 8 तासांची पूर्ण झोप घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रवासादरम्यान पूर्णपणे ताजेतवाने वाटेल.

  1. ब्रेक घ्या

दोन ते तीन तास गाडी चालवल्यानंतर 15-20 मिनिटांचा ब्रेक घ्या.त्यामुळे गाडीच्या इंजिनसह तुमच्या शरीराला विश्रांती मिळेल आणि मोकळ्या हवेत तुमचे रक्ताभिसरण संतुलित राहील.

  1. संगीताच्या आवाजाकडे लक्ष द्या

वाहन चालवताना संगीत ऐकणे आनंददायी वाटते, पण तेच संगीत खूप जोरात वाजले तर अपघातही होऊ शकतो.त्यामुळे संगीत ऐका पण आवाज कमी ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मागून येणारी वाहने पाहता येतील व ऐकू येतील.

  1. टायरचा दाब तपासा

प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या गाडीच्या टायरचे प्रेशर तपासा. जर तुमचा प्रवास लांबचा असेल तर रोज सकाळी प्रेशर तपासा. कारण खूप जास्त आणि कमी दोन्हीमुळे अपघात होतात.

या महत्त्वाच्या वस्तू तुमच्या कारमध्ये ठेवा

1.पंप

आजकाल बाजारात टायर्समध्ये हवा भरण्यासाठी छोटे पंप उपलब्ध आहेत, ज्यांना एअर इन्फ्लेटर असे म्हणतात. ते तुमच्याजवळ ठेवा जेणेकरुन तुम्ही जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांचा वापर करू शकाल.

  1. बॅटरी जंप केबल

अनेक वेळा तुम्ही घरातून चांगल्या स्थितीत बाहेर पडता आणि एकदा थांबल्यावर गाडी सुरू होत नाही. कारण गाडीची बॅटरी संपून जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे बॅटरी जंप केबल असेल तर तुम्ही तुमची बॅटरी चार्ज करू शकता. दुसऱ्या कारमधून. तात्काळ काम हाताळू शकते.

  1. टॉर्च आणि चार्जिंग केबल

मोबाईलच्या या युगात टॉर्चला फारसे महत्त्व वाटत नसले तरी प्रवासादरम्यान मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक आणि चार्जिंग केबल सोबत बाळगणे खूप उपयुक्त आहे.

शेजारी आणि परिचितांशी कसे वागावे?

* प्रतिनिधी

शेजारी असो वा आपल्या ओळखीची कोणी, आपण कधी आपल्यावर रागावलो किंवा काही चुकीचे बोललो तर आपले मन नक्कीच दुखावते, कारण ज्यांच्याशी आपण रोज संपर्कात येतो त्यांचा राग आणि त्यांच्या वागणुकीत होणारा बदल आपल्यावर परिणाम करतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्यासारखे वागायला लागाल तर प्रकरण आणखीनच बिघडेल, त्यामुळे अशा वेळी धीर धरून परिस्थिती हाताळा आणि भविष्यात त्यांच्याशी सामना करताना आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करा.

शेजाऱ्याला सहज राग आला तर

काही लोकांना अशी सवय असते की त्यांनी इतरांसोबत कितीही मस्करी केली तरी त्यांना ते सहन होत नाही जेव्हा कोणी त्यांच्याशी चेष्टा करतो आणि ते चिडतात आणि बोलणे बंद करतात. अशा वेळी तुम्हीही त्यांच्याशी विनोद करणे थांबवावे, फक्त कामावर बोला आणि जेव्हा ते तुमच्याशी विनोद करतात तेव्हा त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की आमच्या नात्यात गोडवा टिकवण्यासाठी काही अंतर आवश्यक आहे.

तुमचे वापरा

आपली एखादी वस्तू देण्यास ताबडतोब नकार देणे आणि जे आपले आहे ते पूर्ण हक्काने काढून घेणे याला स्वार्थ म्हणतात. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने तुमच्याशी एक-दोनदा असे केले तर काही हरकत नाही, पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो फक्त तुमचा वापर करत आहे, तेव्हा तुम्ही त्याला नकार द्यायलाही शिकले पाहिजे.

पैशाचा व्यवहार करू नका

पैशाच्या व्यवहारामुळे नाती लवकर बिघडतात. जर तुमचा शेजारी तुमच्याकडून दररोज पैसे घेतो आणि तुम्हाला त्याच्याकडे पैसे मागताना लाजाळू किंवा संकोच वाटत असेल आणि तुम्हाला आतून गुदमरल्यासारखे वाटत असेल तर स्पष्टपणे नकार देणे चांगले आहे. आपल्या घरात अशा गोष्टी आवडत नाहीत असे म्हणूया. यानंतर, तो तुमच्याकडून पैसे मागण्याची हिम्मत कधीच करू शकणार नाही.

सर्वत्र तुझ्याबद्दल वाईट बोलतो

तो तुमच्याशी इतकं गोड बोलतो की जणू कोणी तुमच्या जवळचं आहे, पण जेव्हा तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलते, तेव्हा तुमचे मन दुखावते. जेव्हा तुम्हाला इतर लोकांकडून कळते की ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलत राहते, तेव्हा त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊ नका तर तुमच्या जवळच्या व्यक्तीशी थेट बोला. यामुळे त्याला समजेल की जर त्याने आपले वर्तन बदलले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें