सनबर्नपासून वाचण्याचे घरगुती उपाय

– पारुल भटनागर

सूर्याच्या तीव्र किरणांचा थेट परिणाम महिलांच्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा काळवंडणे यासोबतच खाज, जळजळ व लाल चट्टे पडू लागतात. याला सनबर्न म्हणतात. यात हळूहळू त्वचेची आर्द्रता संपण्यासोबतच त्वचा रुक्ष व मृतवत होऊ लागते. इतकेच नव्हे तर सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांच्या अधिक संपर्कात आल्याने त्वचेला सुरकुत्या पडण्याने वयदेखील जास्त दिसू लागते.

जर तुम्हीसुद्धा सनबर्नने त्रस्त असाल तर घाबरू नका. उलट आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू, ज्याद्वारे तुम्हाला काही दिवसांतच सनबर्नच्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल.

घरीच सनबर्नच्या समस्येचे निवारण करा

जर सनबर्नची समस्या आहे तर सनबर्न झालेल्या जागी कच्च्या बटाटयाचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरचे डाग व चट्टे दूर होतात व वर्णदेखील उजळतो. याशिवाय तुम्ही बटाटयाचा रसदेखील घेऊ शकता, जो त्वचेची सूज कमी करण्यासोबतच त्वचेमध्ये होणारी जळजळदेखील कमी करतो. यासाठी तुम्ही एक बटाटा धुवून त्याची साल काढून किसून एका बाऊलमध्ये त्याचा ज्यूस काढा. नंतर यात काही थेंब लिंबाचा रस मिसळून कापूस बुडवून त्याला चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा नियमित वापर केल्याने सनबर्नची समस्या ठीक होऊन जाते.

बटाटयात व्हिटॅमिन, मिनरल, फायबर व नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. तसेच यात व्हिटॅमिन सीचे कॉम्बिनेशन असल्याने हे पिगमेंटेशन घालवण्यासोबतच त्वचेचा वर्णसुद्धा उजळण्याचे काम करते.

एलोवेरा, लाल मसूर व टोमॅटोचा पॅक

लाल मसूरचा पॅक सनबर्नसाठी बराच चांगला उपाय मानला जातो. यासाठी फक्त जेव्हा तुम्हाला हा पॅक चेहऱ्याला लावायचा असेल, तेव्हा एक तास आधी डाळ पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे स्मूथ पेस्ट बनवणे सोपे होईल. नंतर यात जवळपास एक चमचा टोमॅटोचा रस व थोडेसे एलोवेरा जेल मिसळून ही पेस्ट सनबर्न असलेल्या जागी लावून पाच मिनिटे मसाज करा. नंतर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा व नंतर धुवा. लावल्यानंतर काहीच दिवसात तुम्ही त्वचेत बदल पाहू शकाल.

ते अशासाठी की लाल मसूरमध्ये विटामिन सी असते, जे सनबर्न घालवण्यासोबतच त्वचेचा पोतदेखील सुधारण्याचे काम करते. सोबतच यातील पोषक तत्वांमुळे हे ड्राय पॅचेससुद्धा हटवते. याला स्किन क्लिंजरदेखील म्हणतात, ज्यामुळे त्वचा निरोगी टवटवीत व उजळ बनते. शिवाय कोरफडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा काळपटपणा व सुरकुत्या दूर करण्यासाठी उत्तम मानले जातात.

बेसन व हळदीचा पॅक

त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी बेसन व हळदीच्या पॅकचा वापर तर वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. अशात तुम्ही उजळपणासोबतच डागरहित त्वचा व सनबर्नपासून सुटका मिळवू इच्छिता, तर तुम्ही बेसन व हळदीचा पॅक जरूर लावा. यासाठी तुम्हाला एक छोटा चमचा बेसन, अर्धा लिंबू, एक छोटा चमचा मधात चिमुटभर लिंबाचा रस मिसळावा लागेल. नंतर या तयार पेस्टला चेहऱ्यावर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा. सुकल्यानंतर दुसऱ्यांदा स्क्रब करा. यामुळे काही मिनिटांमध्ये चेहरा उजळण्यासोबतच दर वेळच्या लावण्याने सनबर्न हळूहळू कमी होऊ लागेल. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आठवडयातून तीन ते चार वेळा लावावा लागेल.

बेसन नॅच्युरल एक्सफोलिएटरच्या रूपात काम करते, ज्यामुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यासोबतच त्वचेत जिवंतपणा येतो. हळद चेहऱ्यावर चमक आणण्यासोबतच पिगमेंटेशन दूर करण्याचेदेखील काम करते. मधात त्वचेच्या पेशी वेगाने भरून काढणारी तत्त्वे असतात, ज्याने त्वचेचा गेलेला वर्ण पुन्हा येऊ लागतो.

आईस क्यूब ट्रीटमेंट

आईस क्यूब प्रत्येक घरी सहज उपलब्ध असतात. सन बर्न ठीक करण्यासाठी हे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडपणा मिळण्यासोबतच ती घट्ट होईल व त्यावर तेजसुद्धा दिसू लागेल. बर्फात थंडपणाचे गुणधर्म असल्याने ते त्वचेच्या उष्णतेला शोषून घेऊन थंडपणा पोहोचवण्याचे कामदेखील करते, ज्यामुळे जळजळदेखील कमी होते. सोबतच काळया वर्तुळांपासूनदेखील सुटका होते.

दही पॅक

सनबर्नपासून वाचण्यासाठी दही खूप उपयुक्त ठरते. यात असणारे प्रोबायोटिक्स त्वचेची सूज कमी करून त्वचा स्वच्छ करतात. यासाठी तुम्ही दही दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा व नंतर धुवा. यामुळे रोमछिद्रे मोकळी होतात व त्वचा स्वच्छ होऊन जाते. दह्यात झिंक व अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजदेखील असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ बऱ्यापैकी कमी होते. तुम्ही हा पॅक आठवडयातून चार वेळा नक्की लावा.

हनी मिल्क पॅक

सनबर्न घालवण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे लागतील. पेस्ट बनवण्यासाठी यात दूध मिसळा. नंतर हे २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून धुवून टाका. रोज असे केल्याने तीव्र सनबर्नदेखील ठीक होतात. जिथे मधात अँटी टॅन एजंट असतात, तिथे दूध त्वचेला आर्द्र बनवण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेच्या तक्रारीही दूर होतात.

राईस वॉटर पॅक

सनबर्नसाठी राईस वॉटर पॅक उत्तम आहे. यासाठी तांदूळ शिजवा व त्याचे पाणी फेकू नका, तर एक दिवस तसेच ठेवा. मग त्यात इसेन्शियल ऑईल घालून त्याचा पॅक बनवा, जेणेकरून त्याची घाण निघून जाईल. नंतर त्यात टिशू पेपर घालून चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. याला सनबर्न ट्रीटमेंट असेही म्हणतात. याने खूप लवकर सन बर्न ठीक होतो.

या नॅच्युरल बाथ थेरपीजदेखील तुम्हाला सनबर्न व वेदना, जळजळ यापासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतील :

* आपल्या बाथटबमध्ये अर्धा कप अॅप्पल साइडर व्हिनेगर घाला. यामुळे सन बर्न त्वचेची पीएच लेवल पातळीत येण्याने त्वचा भरून येण्यात मदत होते.

* अंघोळ करते वेळी पाण्यात इसेन्शियल ऑईल, जसे की गुलाबजल, लव्हेंडर घाला. यामुळे वेदनेपासून बराच आराम मिळतो.

* थोडा बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने सनबर्नमुळे झालेली जळजळ व वेदना कमी होतात.

* एक कप ओट्स पाण्यात भिजवण्यासाठी ठेवून द्या. नंतर ह्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेची जळजळ दूर होण्यासोबतच त्वचेची गेलेली आर्द्रतादेखील परत येऊ लागते.

काही अत्याधुनिक ट्रीटमेंट्सदेखील आहेत ज्यांची माहिती करून घेऊया त्वचारोग तज्ञ डॉक्टर भारती तनेजा यांच्याकडून :

फ्रुट बायोपील फेशियल बरेच परिणामकारक

फेशियल तर तुम्ही पुष्कळ करून घेतले असतील, परंतु टॅनिंग वा सनबर्नसाठी फ्रुट बायोपील फेशियलसारखं उत्तम काही नाही. कितीही तीव्र सनबर्न का असेना, याच्या एका एप्लीकेशनने बऱ्याच प्रमाणात दूर होतो. जसे पपईचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा एका वेळेतच खूप सुंदर बनते.

व्हाइटनिंग फेशियल

व्हाइटनिंग फेशियलसुद्धा सनबर्नसाठी पुष्कळ लोकप्रिय फेशियल आहे, कारण यात व्हिटॅनॉल घातलं जातं. त्यामुळे याला व्हाइटनिंग फेशियल म्हणतात. यामुळे त्वचेवर कितीही तीव्र सनबर्न असेल, तरी तो आरामात निघून जातो, कारण यात अँटिऑक्सिडंट व पोषक तत्वे जी असतात, जी त्वचेतून मेलानिन कमी करून त्वचेचा वर्ण सुधारण्यासोबतच उजळण्याचेदेखील काम करतात.

लेर ट्रीटमेंट

चेहऱ्यावरील केस लेझरद्वारे काढण्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, परंतु आता तीव्र सनबर्नदेखील १-२ सीटिंग्समध्ये लेझर ट्रीटमेंटद्वारे हटवले जाऊ शकते. जेव्हा त्वचा लाल तसेच सोलवटून निघण्यासोबतच ताप, प्रभावित भागावर फोड येतात, तेव्हा लेझर ट्रीटमेंटची गरज पडते. यात स्किन पिगमेंटेशन लेझर ट्रीटमेंटद्वारे एकाच खेपेत त्वचेतून ८० टक्के मेलानिन हटवले जाते. फ्रॅक्सील लेझर ट्रीटमेंटने हायपर पिग्मेंटेशन, एजिंग व अॅक्ने व्रण यांना सहजतेने हटवून नवीन निरोगी त्वचा मिळवली जाऊ शकते.

योग्य आहारात दडले आहे सौंदर्याचे रहस्य

* श्रुती शर्मा, बॅरिएट्रिक समुपदेशक आणि न्यूट्रिशनिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

अन्नाचा परिणाम तुमच्या त्वचेचा रंग, केस आणि अगदी तुमच्या मूडवरही होतो. जर तुम्ही आतून निरोगी असाल तर तुमची त्वचा स्वत:हून चमकदार दिसते. त्वचेवरूनच तुमचे आरोग्य कसे आहे हे समजते. अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिज पदार्थ असतात, जे तुमचा ताण नियंत्रित करण्यासोबतच तुमच्या त्वचेलाही चमकदार ठेवतात. त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवणे कठीण नसते.

योग्य आहारामुळे वजन नियंत्रणात राहते : जास्त खाणे आणि चुकीचा आहार घेतल्याने वजन वाढते. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वत:ला मॉडेलसारखे एकदम सडपातळ बनवावे. लठ्ठपणादेखील चांगली गोष्ट नाही, कारण तो मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजाराचे कारण ठरू शकतो.

योग्य आहाराचे सेवन न केल्यास केस रूक्ष आणि निर्जीव होतात : केसांना पोषणाची गरज असते. आहाराचा थेट परिणाम केसांवर होतो.

नखांनाही हवे पोषण : तुमची नखे सहज तुटत असतील तर याचा अर्थ असा की तुम्ही आहारात बदल करायला हवा. केसांप्रमाणेच नखांनाही पोषण आवश्यक असते. त्यासाठी अंडी, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि मटण खा. यामुळे नखांना पुरेसे प्रोटीन (प्रथिने) मिळेल.

पोषक पदार्थांच्या अभावामुळे स्नायू कमजोर होतात : स्नायूंचा तुमच्या सौंदर्याशी थेट संबंध असतो. स्नायू कमजोर होऊ लागले तर तुम्ही वर्कआऊट करू शकणार नाही. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल. स्नायू बळकट ठेवण्यासाठी प्रथियुनक्त खाद्यपदार्थांचे सेवन करा.

तुम्ही जे काही खाता ते तुमच्या त्वचेद्वारे प्रतिबिंबित होते : रूक्ष आणि निर्जीव त्वचा तुमच्या निकृष्ट आहाराचा परिणाम आहे. तुम्ही पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्या खाल्ल्यास त्वचा तरूण, चमकदार राहील. चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नयेत.

पौष्टिक आहार वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करू शकतो : अन्नाचा परिणाम शरीरात होणाऱ्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेवरही होतो. अँटीऑक्सिडंटयुक्त आहार जसे की, सेंद्रिय फळे आणि भाज्या या फ्री रॅडिकल्स दूर करून त्वचेला सुरकुत्या आणि फाईन लाइन्सपासून वाचवतात.

आहाराचा परिणाम डोळे आणि पापण्यांवरही होतो : तुम्ही योग्य आहार घेत नसाल आणि पुरेसे पाणी पित नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या डोळयांवर आणि पापण्यांवर होऊ शकतो. योग्य पोषण न मिळाल्याने पापण्यांचे केसही गळायला सुरुवात होते.

सौंदर्यासाठी आवश्यक पोषक तत्त्व

व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हे कोलेजेन तयार करण्यासाठी मदत करते, जे त्वचा कोमल ठेवण्यासाठी आवश्यक असते. ब्रोकोली, अंकुरित धान्य, पेरू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पार्सली यात खूप जास्त व्हिटॅमिन सी असते.

सेलेनियम : सेलेनियमदेखील एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे त्वचेची लवचिकता कायम ठेवते. अक्रोड, ट्युना, लिव्हर, व्हीट जर्म, कांदे, सीफूड, कडधान्य, तपकिरी तांदूळ आणि कुकुट (पोल्ट्री) उत्पादनांमध्ये सेलेनियम मोठया प्रमाणात आढळते.

व्हिटॅमिन ई : त्वचेसाठी व्हिटॅमिन ई खूप महत्त्वाचे असते. ते व्हिटॅमिन ए सोबत मिळून त्वचेला कर्करोगापासून दूर ठेवते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे प्रदूषण, धुके, प्रक्रिया केलेले अन्न आणि उन्हामुळे त्वचेत तयार होणारी फ्री रॅडिकल्स दूर करतात. बदाम, पोल्ट्री उत्पादने, अक्रोड, अव्होकॅडो, शतावरी, सूर्यफुलाच्या बिया, काजू, शेंगदाणे, पालक, ओटचे जाडेभरडे पीठ आणि ऑलिव्ह हे व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असलेले पदार्थ आहेत.

ओमेगा ३ : याला अत्यावश्यक फॅटी अॅसिड असे म्हणतात. एझिमासारख्या त्वचेच्या अनेक आजारांमध्ये ते प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. आवश्यक फॅटी अॅसिड त्वचेतील आर्द्रता आणि लवचिकता कायम राखतात. शरीर स्वत: याची निर्मिती करू शकत नाही, म्हणून याचे सेवन आहारासोबत करणे गरजेचे असते. अक्रोड, सालमन, अळशी, चायना सीड हे ओमेगा -३ चे उत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन : त्वचेच्या देखभालीसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक असते. जर तुमची त्वचा कोरडी असेल, त्वचेची सालपटे निघत असतील तर समजून जा की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता आहे. हे उन्हामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवते. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनचे उत्तम स्रोत आहेत – शतावरी, पीच, बीट, ग्रीन पालक, अंडी, रताळे, लाल मिरची.

झिंक : झिंक हा एक महत्तवपूर्ण ट्रेस खनिज पदार्थ आहे, जो त्वचेच्या खराब झालेल्या उतींची दुरुस्ती आणि जखमांना बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही मुरुमांमुळे त्रस्त असाल तर शरीरात जस्ताची कमतरता असू शकते. झिंकचे स्रोत आहेत – ओएस्टर, पेकान, पोल्ट्री उत्पादने, भोपळयाच्या बिया, आले, डाळी, सीफूड, मशरूम, अख्खे धान्य इ.

निरोगी त्वचेसाठी टीप्स

भरपूर पाणी प्या : पाणी पिण्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि तिच्यातील विषारी द्रव्ये निघून जातात, ज्यामुळे त्वचा मऊ राहते.

कोशिंबीर खा : कोशिंबीर, कच्चा पालक आणि उकडलेली अंडी खा. यामध्ये कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

हळदीचं सेवन करा : तपकिरी भात, मांसाचे पदार्थ आणि शेक इत्यादीमध्ये हळद घालून त्याचे सेवन करा.

आरोग्यदायी पशु उत्पादने : आठवडयातून २-३ सालमन घ्या. यात उत्कृष्ट गुणवत्तेचे ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात.

साखरेचे कमी प्रमाणात सेवन करा : साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. ते ग्लायसेशन वाढवते, ज्याचा त्वचेच्या उतींवर वाईट परिणाम होतो.

खराब फॅटपासून दूर राहा, चांगल्या फॅटचे सेवन करा : वनस्पती तेल जसे की, कॉर्न ऑइल, कॉटन ऑईल, कॅनोला आणि शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू नका. त्याऐवजी खोबरेल तेल, अॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल किंवा तुपाचे सेवन करा.

मधाचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरेल

* गृहशोभिका टीम

आजकाल अति उष्मा आणि प्रदूषणामुळे त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते, त्यासाठी आपण बाजारातून क्रीम्स विकत घेतो, पण ती फार काळ बरी होत नाही. त्वचेचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी जर आपण नैसर्गिक घरगुती टिप्स वापरल्या तर ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी मधाचे फायदे सांगणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही बाजारातून आणलेल्या उत्पादनांऐवजी घरगुती उत्पादने वापराल.

  1. मधामुळे त्वचा चमकदार होईल

मध आणि दुधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरासाठी खूप चांगले असतात. मध आणि दुधापासून बनवलेला मास्क त्वचेवर लावल्याने झटपट चमक येते. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर त्याचा वापर करून तुम्ही फ्रेश दिसू लागतो. यासोबतच नियमित मध आणि दुधाचा मास्क घेतल्याने चेहऱ्यावरील टॅनिंगही निघू लागते. याशिवाय, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने, रंग सुधारण्यासदेखील मदत करते.

  1. सुरकुत्या काढा

जर तुम्हाला वृद्धत्वाची ही समस्या भेडसावत असेल आणि तुम्हाला सुरकुत्या दूर करायच्या असतील तर मध आणि दुधाने बनवलेला फेसपॅक तुम्हाला या समस्येत मदत करू शकतो. यासाठी दोन्ही समान प्रमाणात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

  1. फाटलेल्या ओठांसाठी मध घरगुती उपाय

अनेकदा लोकांना ओठ फाटण्याची समस्या असते. फाटलेल्या ओठांना ओलावा लागतो. तुम्ही तुमच्या ओठांना मॉइश्चराइज करण्यासाठी या जादुई पेस्टचा वापर करू शकता. हे वेळेवर लावल्याने तुम्ही फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून लवकरच सुटका मिळवू शकता.

  1. मध एक उत्तम क्लिन्झर आहे

कच्चे दूध हे चांगले क्लिन्झर आहे. ही गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे, पण कच्च्या दुधात मध मिसळल्याने त्वचेवर चांगला परिणाम होतो. यासाठी कच्च्या दुधात थोडे मध मिसळा आणि कापसाच्या साहाय्याने पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटे लावल्यानंतर धुवा. असे नियमित केल्याने तुमची त्वचा मुलायम आणि स्वच्छ होईल.

सायकल चालवा निरोगी रहा

* पूनम पांडे

काही वर्षांपूर्वी लोकांना सायकल चालवायला तसा संकोच वाटायचा. परंतु तीच लोक आता अगदी ज्यांच्या घरी लक्झरी कार असूनदेखील सायकल चालवत आहेत. तरुण वर्गात मुलं तंदुरूस्त रहाण्यासाठी सायकल चालवत आहेत. तर काही तरुणी सडपातळ राहण्यासाठी सायकलचा वापर करत आहेत.

सायकल चालविण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही देखील चकित व्हाल की फक्त ३० मिनिटे सायकल चालविण्याचे एवढे फायदे असतात :

* जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वा ३० मिनिटे सायकल चालवत असाल तर दीर्घकाळ तरूण दिसाल. याचं कारण हे आहे की रक्ताभिसरण अधिक चांगल होतं आणि स्फूर्ती दिवसेंदिवस वाढत जाते.

* अर्धा तास सायकल चालविल्याने शरीराचे सर्व अवयव अधिक अॅक्टिव्ह होतात आणि रात्री गाढ झोप लागते.

* अर्धा तास सायकल चालविल्यामुळे बॉडीचे इम्युन सेल्स अधिक अॅक्टिव्ह होतात आणि तुम्ही कमी आजारी पडता.

* सायकल चालविल्यामुळे शरीराच्या सर्व मासपेशी निरोगी आणि मजबूत होतात, त्यामुळे आत्मविश्वासदेखील वाढतो.

* सायकल चालविल्यामुळे बुद्धिमत्ता अधिक वाढते. कायम सायकल चालविनाऱ्याची निर्णय क्षमता सामान्य लोकांपेक्षा अधिक असते.

* अर्धा तास सायकल चालविण्याने एवढया कॅलरी जाळल्या जातात की त्यामुळे  शरीराची चरबीदेखील कमी होते. नियमितरित्या सायकल चालविण्याचे इम्युन सिस्टीम मजबूत होते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅरोलिनामध्ये एका संशोधनाअंती आढळले की जे लोक आठवडयातून कमीत कमी पाच दिवस अर्धा तास सायकल चालवतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता ५० टक्के कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी सायकल चालवणं अधिक लाभदायक ठरतं.

* सायकल चालवतेवेळी हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे शरीराचं रक्तभिसरण ठीक होतं. यामुळे हृदयरोगसारख्या समस्या उद्भवत नाहीत. हृदयाशी निगडित इतर आजार होण्याची शक्यतादेखील कमी होते.

* विविध अभ्यासात आढळले आहे की नियमितरित्या सायकल चालविणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत तणाव होण्याची शक्यता खूपच कमी होते.

* सायकलमुळे ब्लड सेल्स आणि त्वचेत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. तुम्ही समवयस्क लोकांच्या तुलनेत अधिक तरुण दिसता. केवळ तरुणच नाही तर शरीर वास्तवात अधिक तरुण होतं आणि शरीरात स्टॅमिना वाढला आहे आणि शरीरात नवीन ऊर्जा आणि ताकद आली आहे याची जाणीव होते.

* सायकलिंगचा एक मोठा फायदा असा आहे की यामुळे शरीराच्या सर्व अवयवंवाना व्यवस्थित व्यायाम मिळतो. हात, पाय, डोळे या सर्वांमध्ये व्यवस्थित को-ऑर्डिनेशन होऊन शरीराच एकूण संतुलन व्यवस्थित होतं. एवढेच नाही तर तुम्हाला बाईक वा स्कुटी चालवायला शिकायची असेल तर सायकलची माहिती तुमच्या कामी येऊ शकते. सायकल चालविल्यामुळे मनात एक समाधान निर्माण होतं की आपण पर्यावरणाच्या हितामध्ये काम केलं आहे आणि जे योगदान दिला आहे ते निसर्गासाठी अनुकूल आहे. म्हणजे सायकल चालविण्याचा एक अर्थ असादेखील आहे की तुम्ही तुमच्या धरतीवर प्रेम करता.

कोणती सायकल विकत घ्याल

सायकल कशी असावी हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही दररोज सायकलिंग करत असाल तर अशी सायकल विकत घ्या ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ चालविताना त्रास होणार नाही.

जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत प्रत्येक काम सायकलीनेच पूर्ण करत असाल आणि तुमचा छंद पूर्ण करण्यासाठी एक सायकल विकत घेण्याच प्लॅनिंग करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शोरूममध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी सायकल असतात. ज्यांच्या आकर्षणापायी लोक त्यांच्या खऱ्या गरजा मागे सोडून महागडी सायकल विकत घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. साधारणपणे बाजारात ४-५  प्रकारच्या सायकली असतात. कोणती सायकल विकत घ्यायची आहे हे ज्याच्या त्याच्या गरजेवर अवलंबून आहे. कोणाला रस्त्यावर चालवायची असेल वा पार्कमध्ये दोन तास वा चार तास बाजारात काम आहे वा डोंगरांवर रेसिंग करायची आहे वा नॉर्मल सायकलिंग करायची आहे.

रोड सायकल

याला रेसिंग सायकलदेखील म्हणतात. ही खूप हलकी असते आणि याची चाके खूप पातळ असतात. साधारणपणे याचा वापर अशी लोकं करतात ज्यांना अधिक काळ सायकलिंग करायची आहे. खास म्हणजे जे प्रोफेशनल सायकलिस्ट आहेत. या सायकलने काही तासातच शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतर पार केलं जाऊ शकतं. याची किंमत तीस हजारांपासून लाखापर्यंत आहे. खरंतर याचं मेंटेनन्सदेखील खूप महागडं आहे. रेसिंग वर्कआउटमध्ये ही सायकल सर्वात उत्तम मानली जाते. ही सायकल परदेशातून येते. अधिक सायकली या चीन व व्हिएतनाममधून येतात. सध्या यांची बरीच मोठी वेटिंग म्हणजेच प्रतीक्षा चालू आहे. जर तुम्ही शहरात राहात आहात आणि दररोज वीस ते तीस किलोमीटर सायकलिंग करत असाल तर ती सायकल तुमच्यासाठी नाही आहे. परंतु दररोज शंभर किलोमीटर पर्यंत चालवायची असेल तर तुम्ही खरेदी करु शकता. याची बनावट अशी असते की तुम्ही दीर्घकाळ सायकल चालवूनदेखील थकवा येणार नाही.

जाड टायरची सायकल

अलीकडे ही सायकल खूपच ट्रेंडमध्ये आहे. मोठे टायर असल्यामुळे याला फॅट टायर बाईकदेखील म्हणतात. साधारणपणे याचा वापर वाळू आणि बर्फ असणाऱ्या जागी केला जातो. या जागी ही खूप छान चालते. साध्या रस्तावर ही बाईक तेवढी यशस्वी नाही आहे. खरंतर या बाइकला रस्त्यावर चालविण्यासाठी खूप ताकद लावावी लागते. जर कोणाला वजन कमी करायचं असेल तर ही सायकल विकत घेऊ शकतात. बाजारात याची किंमत दहा ते वीस हजाराच्या दरम्यान आहे.

माऊंटन सायकल

ही देखील कुठेही चालवू शकतात. या सायकली सर्वात अधिक विकल्या जातात. साधारणपणे दररोज सायकलिंग करणारे याचा वापर करतात. या सायकल रस्त्या बरोबरच डोंगर व पायवाटांवर व्यवस्थित कामी येतात. ही उत्तम पकड, आरामदायक व गेयरच्या व्हरायटी असल्यामुळे लोकांची ही सर्वाधिक पसंती आहे. याला एडवेंचर सायकलदेखील म्हणतात. याचे टायरदेखील जाड असतात. ज्यांना सायकलींगची सुरुवात करायची आहे त्यांनी ती काळजीपूर्वक चालवावी, खास करून डोंगराळ रस्ते, कारण यामध्ये बॅलन्सिंग वा डिक्स ब्रेक अचानक लावल्याने पडण्याची भीती असते. याची किंमत १० हजार ते २० हजारापर्यंत असते.

फेस सीरमसह त्वचा तरुण आणि ताजी बनवा

* पारुल भटनागर

आत्तापर्यंत तुम्ही फेस स्क्रब, मॉइश्चरायझरबद्दल बरेच काही ऐकले असेल आणि तुम्ही ते तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये वापरत असाल. परंतु फेस सीरम फार लोकप्रिय नसल्यामुळे किंवा त्याच्या फायद्यांबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे, आपण सर्वजण आपल्या मेकअप रूटीनमध्ये याचा समावेश करण्यास घाबरतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की हे फेस सीरम त्वचेसाठी कोणत्याही जादूपेक्षा कमी नाही. कोणतीही मुलगी किंवा स्त्री दररोज याचा वापर करते, तिची त्वचा अधिक तरुण आणि तरुण दिसते. अशा परिस्थितीत, फेस सीरम म्हणजे काय आणि फेस सीरम वापरून तुम्ही तुमच्या त्वचेला कोणते घटक फायदेशीर ठरू शकतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया.

चेहरा सीरम काय आहे

त्वचा तरुण ठेवण्यासाठी आपण काय करू नये? कधी ते क्रीम बदलतात, कधी महागडी सौंदर्य उत्पादने निवडतात तर कधी त्वचेच्या उपचारांचा अवलंब करतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकदा तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये फेस सीरमचा समावेश केला तर तुमची त्वचा चमकते. अशी चमक पाहून प्रत्येकाला वाटेल की तुम्ही फेशियल घेतले आहे. तुम्हालाही असे कॉम्प्लिमेंट मिळवायचे असेल तर फेस सीरम नक्की करून पहा.

खरं तर, पाण्यावर आधारित आणि खूप हलके वजन असल्याने ते त्वचेमध्ये सहज शोषले जाते. यासोबतच यामध्ये अनेक सक्रिय घटक आहेत, जे त्वचेला हायड्रेट, तरुणपणा आणि त्वचेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून एक वेगळी चमक आणि आकर्षण आणण्याचे काम करतात. त्वचेला घट्टपणा, चमक आणि आर्द्रता आणून ती तरुण बनवण्याचे काम करते. पण जेव्हा तुमचा फेस सीरम या घटकांपासून बनवला जाईल.

तुमचे सीरम कसे आहे

1 व्हिटॅमिन सी

जर आपण व्हिटॅमिन सी बद्दल बोललो तर ते केवळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करत नाही तर त्वचेची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील खूप उपयुक्त आहे. यासोबतच यातील अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेला नेहमी तरुण ठेवतात. समजावून सांगा की व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये असामान्य मेलेनिनचे उत्पादन रोखून कार्य करते. ज्यामुळे त्वचेचा रंग सामान्य होतो, तसेच काळे डाग, सन स्पोर्ट्स, मुरुमांमुळे होणारे डाग आणि मेलास्मामुळे होणारे हायपरपिग्मेंटेशन कमी करण्याचे काम करते. आम्ही तुम्हाला सांगतो की हा घटक कोलेजन तयार करून निरोगी त्वचा देण्याचे काम करतो. यामुळे त्वचा चमकदार होते. म्हणूनच हा सक्रिय घटक त्वचेच्या सीरमचे जीवन रक्त बनतो.

त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट – जरी व्हिटॅमिन सी प्रत्येकाच्या त्वचेसाठी सर्वोत्तम आहे, परंतु जर तुम्हाला सुरकुत्या आणि बारीक रेषांपासून लढायचे असेल किंवा तुम्हाला वृद्धत्वापासून दूर राहायचे असेल तर तुमच्या सीरममध्ये व्हिटॅमिन सी घटक असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही बायोटिकचे व्हिटॅमिन सी डार्क स्पॉट फेस सीरम, द मॉम्स कंपनीचे नॅचरल व्हिटॅमिन सी फेस सीरम, लॅक्मे 9 ते 5 व्हिटॅमिन सी फेशियल सीरम निवडू शकता.

2 हायलुरोनिक ऍसिड

त्वचेतील ओलावा संपुष्टात येऊ लागला तर त्वचा निर्जीव होऊन त्वचेची सर्व मोहिनी संपुष्टात येऊ लागते. पण hyaluronic ऍसिड त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते, त्वचेतील ओलावा त्वचेत लॉक करण्याचे काम करते. हे त्वचेची दुरुस्ती करण्यासदेखील मदत करते, तसेच ते खराब झालेल्या ऊतींना रक्त प्रवाह प्रदान करते. कोणत्याही फेस सीरममध्ये हायलुरोनिक ऍसिड असते, ते सीरम त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.

त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट – जर तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्हाला तिचे पोषण करायचे असेल तर तुम्ही हायलुरोनिक अॅसिड असलेले सीरम निवडा. कारण ते त्वचेच्या पेशींमध्ये पाणी बांधून ते गुळगुळीत, हायड्रेटेड आणि ताजे वाटण्यासाठी कार्य करते. आणि जेव्हा त्वचा हायड्रेटेड राहते, तेव्हा वृद्धत्वाची चिन्हे त्वचेवर दिसत नाहीत. यासाठी, तुम्ही इट्स स्किनचे हायलुरोनिक अॅसिड मॉइश्चरायझर सिरम, लॉरियल पॅरिसचे हायलूरोनिक अॅसिड फेस सीरम निवडून तुमची त्वचा ग्लोइंग आणि हायड्रेट करू शकता.

3 रेटिनॉल

रेटिनॉल थेट कोलेजनच्या उत्पादनाला गती देण्याशी आणि निरोगी पेशींच्या जलद वाढीशी संबंधित आहे. आपण असे म्हणू शकता की रेटिनॉल सीरममधील स्टार घटक म्हणून कार्य करते. सुरकुत्या, बारीक रेषा आणि मुरुमांच्या खुणा हलक्या करून त्वचेची चमक आणि गुळगुळीतपणा राखण्याचे काम करते.

त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट – हे सामान्य ते कोरड्या त्वचेपर्यंत सर्वांनाच अनुकूल आहे. तसेच, छिद्रे अनब्लॉक करून मुरुमांशी लढण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यासह, हे वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत आणि टोन सुधारण्यासाठी कार्य करते. यासाठी तुम्ही Derma कंपनी Retinol Serum वापरू शकता.

4 Hexylerysorkinol

त्यात अँटिऑक्सिडेंट, तुरट, उजळ आणि अगदी त्वचेचा टोन गुणधर्म आहेत. त्याचे त्वचा उजळ करणारे गुणधर्म त्वचेचा टोन सुधारून त्वचेचा रंग वाढवण्याचे काम करतात. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे वातावरणातील मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट – जर तुमची त्वचा निस्तेज असेल, म्हणजे तुम्हाला हायपरपिग्मेंटेड त्वचा विकार असेल, तर तुम्ही तुमचा रंग सुधारून या घटकापासून बनवलेले सीरम वापरून त्वचेचा पोत सुधारू शकता. यासाठी तुम्ही Lakme Absolute Perfect Radiance Skin Brightening Serum ची निवड करू शकता.

5 विरोधी दाहक गुणधर्म

लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर तुम्हाला एक सीरम निवडावा लागेल ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतील. जेणेकरून त्वचेची जळजळ, लालसरपणा, फुटण्याची समस्या होणार नाही. यासाठी तुम्ही त्यात कोरफड, ग्रीन टी, व्हिटॅमिन बी3, कॅमोमाइन इत्यादी घटक आहेत का ते तपासले पाहिजे. यासाठी तुम्ही द मॉम्स कंपनी आणि न्यूट्रोजेनाचे सीरम वापरू शकता.

कोरड्या त्वचेसाठी फेस मास्क

* मोनिका गुप्ता

हिवाळयात कोरडी त्वचा मॅनेज करणे थोडे कठीण होते. कोणताही मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा, थोडया वेळाने पुन्हा चेहरा कोरडा होईल. कोरडया त्वचेला बरे करण्यासाठी महिला वेगवेगळया प्रकारचे फेस मास्कदेखील वापरतात. परंतु त्यांचा प्रभावही काही दिवसच टिकतो. परंतु असे काही नैसर्गिक फेस मास्क आहेत, जे आपण सहजपणे घरी बनवू शकता. त्यांचा वापर केल्याने त्वचा बऱ्याच काळासाठी ओलसर राहते :

कोरफडीचा फेस मास्क

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे शरीर आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. एलोवेरा फेस मास्क बनविण्यासाठी कोरफडीतून जेल बाहेर काढा. त्यात काकडीचा रस घाला. हा मास्क फेस वॉशनंतर चेहऱ्यावर लावा आणि नंतर थोडया वेळाने चेहरा धुवा. हे केवळ चेहऱ्यावरील कोरडेपणाच दूर करणार नाही तर चेहऱ्यावर चमकही दर्शवेल.

एवोकॅडो फेस मास्क

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते, चेहऱ्यावरही चमक टिकून असते. एवोकॅडोमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे त्वचेस निरोगी बनवतात. कोरडी व खराब झालेली त्वचा काढून टाकून ते त्वचेस कोमल बनवते. एवोकॅडो फेस मास्क तयार करण्यासाठी २ चमचे मॅश केलेल्या एवोकॅडोमध्ये, १ चमचे मध आणि १ चमचे गुलाब पाणी घाला आणि चांगले मिक्स करा. मग ते चेहरा स्वच्छ करून झाल्यावर चेहऱ्यावर लावा.

स्ट्रॉबेरी फेस मास्क

स्ट्रॉबेरीमुळे केवळ त्वचा कोमलच होत नाही तर चमकदारदेखील दिसते. तिच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. तिच्या वापरामुळे त्वचेत गोठलेल्या मृत पेशीही निघून जातात. स्ट्रॉबेरी फेस मास्कसाठी २-३ मोठया स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात १ चमचे मध आणि १ चमचे ओटचे पीठ मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर त्यास चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवडयातून असे दोनदा करा.

पपईचा फेस मास्क

पपई हे आरोग्य आणि सौंदर्य या दोघांसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्यात पोटॅशियम असते, जे त्वचेस हायड्रेटेड आणि सुंदर ठेवते. हे त्वचेमध्ये असलेल्या मृत पेशी आणि डाग साफ करण्यासदेखील मदत करते. पपईचा फेस मास्क बनविण्यासाठी, पिकलेल्या पपईपासून १ कप पेस्ट बनवा. नंतर त्यात १ चमचे मध आणि १ चमचे लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

केळी आणि चंदनाचा फेस मास्क

केळी फेस मास्क कोरडया त्वचेला ओलावा देऊन त्यास चमकदार बनविण्यात मदत करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा संपतो, शिवाय सुरकुत्यांची समस्यादेखील संपते. तसेच त्वचा घट्ट राहण्यासही मदत करते.

केळयाचा फेस मास्क बनविण्यासाठी, १ पिकलेली केळी चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या आणि त्यात १ चमचे मध, १ चमचे ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा चंदन पावडर घाला. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा. तो कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

Diwali Special: झटपट मेकअप टीप्सनी उजळा रूप

* अमित सारदा, मॅनेजिंग डायरेक्टर, सोलफ्लॉवर

सणांच्या काळात काम वाढत असल्याने आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी वेळ मिळत नाही. खरं तर या काळात आपल्या त्वचेला जास्त देखभालीची आवश्यकता असते. वेळ न मिळाल्यामुळे आपण त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाही आणि त्वचेतील कमतरता भरून काढण्यासाठी कॉस्मॅटिक पर्यायांचा वापर करतो. परंतु हे पर्याय चांगले नाहीत, कारण पारंपरिक कॉस्मॅटिक उत्पादने त्वचेला फायदा पोहोचविण्याऐवजी जास्त नुकसान पोहोचवू शकतात.

इथे स्किन केअर रूटीन टीप्स देत आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या त्वचेसाठी काही मिनिटे खर्च करून संपूर्ण दिवसभर ताजेतवाने राहाल.

* मिंट साबणाने अंघोळ केल्यास आपल्याला ताजेतवाने वाटेल. तुम्ही जर रोज मिंट साबणाचा वापर कराल, तुम्हाला रोजच ताजेपणाचा अनुभव येईल.

* आपला चेहरा आणि गालांना ग्रेप सीड ऑइलने मॉइश्चराइज करा. त्याचप्रमाणे, आपल्या डोळयांखाली व वर काकडी व गुलाबपाण्याचे मिश्रण लावून हलक्या हातांनी मालीश करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मालीश केल्याने आपल्याला केवळ फ्रेशच वाटणार नाही, तर यामुळे रूक्ष त्वचेला ओलावा मिळेल आणि त्वचा उजळेल.

* साबणाऐवजी लिक्विड क्लींजरचा वापर करा, त्याला फेस येत नाही. फोमयुक्त क्लींजरचा वापर करून त्वचेला नुकसान पोहोचविण्याऐवजी आरोग्यदायी उजळपणा मिळविण्यासाठी त्वचेचे पोषण आवश्यक आहे. आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर करून त्वचेला नैसर्गिक ओलावा प्रदान करू शकता.

* आपल्या आहारात आंबट फळांचा समावेश करा. कारण त्यात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे उत्साह वाढतो. अंघोळीसाठी संत्रे किंवा गाजराच्या गुणांचा साबण वापरल्यास आपल्याला टवटवी येईल व जास्त ऊर्जावान वाटेल.

* अनेक एक्सफोलिएंट अशा तत्त्वांनी बनलेले असतात, जे आपल्या त्वचेला सोलवटून क्षतिग्रस्त करतात. त्यामुळे त्वचेचे वय वेगाने वाढू लागते. म्हणून आपण एंजाइमॅटिक एक्सफोलिएंटचा वापर करा. पपईमध्ये नैसर्गिक एंजाइम पपाईन आढळून येते, जे त्वचेला अपेक्षेपेक्षा जास्त उजळपणा प्रदान करते.

* सिंथेटिक सुगंधाचा वापर करू नका. यामध्ये हानिकारक केमिकल असू शकतात. त्याऐवजी आपण शुद्ध एसेंशिअल ऑइलच्या रूपात असणाऱ्या नैसर्गिक सुगंधाचा वापर करा. यात मधुर सुगंध असतोच, परंतु त्याचबरोबर ते रूक्ष किंवा तेलकट त्वचेमध्ये सिबमच्या स्तराचे संतुलन करते.

* टीट्रीमध्ये अँटिबॅक्टेरिअल व अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात, जे मुरमांना अटकाव करतात. आपण अलोविरामध्ये या तेलाचे १-२ थेंब मिसळून लावा.

* केसांसाठी अँटिफ्रीज सीरम, उदा. एवोकॅडो कॅरियर ऑइल केसांना लावून त्यांना बांधून ठेवा. मग आपले दैनंदिन काम सुरू ठेवा. आपले केस पूर्ण सुकल्यानंतर मखमली होतील, जे आपण मोकळे किंवा अंबाडा बांधून ठेवू शकता.

* आपल्या चेहऱ्याचा मेकअप सुरू करण्यापूर्वी त्यावर प्राइमरचा एक थर लावा. त्यामुळे आपली त्वचा मुलायम होईल आणि आपणासाठी मेकअप करणेही सोपे होऊन जाईल. आपण प्राइमर दीर्घकाळ लावून ठेवा.

* केसांना ऑलिव्ह ऑइल लावा. त्यानंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवा आणि पाणी पिळून टाका. हे गरम टॉवेल आपल्या केसांना बांधा आणि पाच मिनिटे तसेच राहू द्या. गरम टॉवेल तीन ते चार वेळा केसांना बांधा. त्यामुळे आपले केस व डोके जास्त तेल शोषून घेतील.

हे उपाय केल्याने दिवाळीच्या झगमगत्या संध्येला तुमचं रूप अधिक खुलून दिसेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें