रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारी मिठाई

* संकल्प शक्ती, लाइफस्टाइल गुरू आणि संस्थापक, गुडवेज फिटने

२०२१ मधील सण-उत्सवांवेळी आपल्या नातेवाईकांसोबत बसून विविध प्रकारच्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. कोविड -१९ ने लोकांना चांगलेच घाबरवले आहे. अशावेळी तुमच्यातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया, सण-उत्सवांदरम्यान कोणत्या प्रकारच्या मिठाईद्वारे तुम्ही तुमच्यातील इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता :

सुंठ : मिठाई बनविताना सुंठीचा वापर करा. ही एक प्रकारची औषधी असून यात रोगनिवारक गुणधर्म असतात. यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीइम्प्लिमेंट्री जसे की, बीटा कॅरोटीन, कॅप्सेसीन इत्यादी भरपूर प्रमाणात असते. ती मधुमेह, अर्धशिशी, हृदय रोग, गुढघेदुखी, संधिवात यावर परिणामकारक असून चयापचय प्रक्रियेचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी लाभदायी आहे. सुंठ गरम असते.

खजूर : खजुराचा वापर तुम्ही साखरेला पर्याय म्हणून करू शकता. साखरेत ‘ओ’ नावाचे न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्त्व असते, ज्यामुळे लठ्ठपणासह अनेक आजारांना निमंत्रण मिळते. याउलट खजुरात शरीराला बळकट करण्यासाठी आवश्यक कार्बोहायड्रेड, मिनरल्स, फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशी पोषक तत्त्वे असतात. खजूर रोगप्रतिकारक क्षमता वाढविते आणि कर्करोगाच्या पेशींविरोधात लढण्याची ताकद मिळवून देते.

तीळ : हे कॅल्शियम वाढवितात. महिलांना  कॅल्शियमची खूपच जास्त गरज असते. तीळ हाडे मजबूत करतात. यकृतही निरोगी ठेवतात. वजन नियंत्रणात ठेवून त्वचेला आरोग्यदायी आणि स्नायू बळकट करतात. मधुमेह नियंत्रणात ठेवून रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. यात झिंक, आयर्न, बी, ई जीवनसत्त्वासह मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

नारळ : हे पीसीओडी, पीरिएड्सच्या दिवसांत प्रचंड वेदना होणे, लघवीची समस्या, छातीत जळजळ, मुरूम, पुटकुळया, त्वचेवर व्रण उमटणे, अंडाशयातील गाठी यासारख्या अनेक समस्या बरे करणारे फळ आहे. नारळ थंड असून पित्तदोष कमी करतो.

तूप : याचा जेवणात समावेश करणे खूपच फायदेशीर आहे. ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करून आजारांपासून रक्षण करते. तुपातील ई जीवनसत्त्व त्वचा तसेच केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. संधिवात, वात दूर करणे तसेच वजन कमी करण्यासाठीही तुपाचे सेवन खूपच गरजेचे आहे. रिफाइंड तेल खराब कोलेस्ट्रॉल तर तूप चांगले कोलेस्ट्रॉल वाढविते. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तूप स्मरणशक्ती वाढवून शरीरही मजबूत बनविते.

अक्रोड : हे मेंदूतील गोंधळ कमी करून एकाग्रता वाढविते. चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते. यातील ओमेगा ३ मुळे ते शरीरासाठी अँटीऑक्सिडंटचे काम करते.

गूळ : याचा गोडवा नैसर्गिक आहे आणि साखरेच्या तुलनेत पदार्थाला गोडवा मिळवून देण्यासाठी गूळ खूपच चांगले आणि पोषक आहे. यात कॅल्शिअम, फायबर, आयर्नसह ब जीवनसत्त्व असते. गुळाच्या सेवनामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते. अपचन होत असल्यासही ते उपयोगी ठरते. तुम्ही किसमिस किंवा मधाचाही वापर करू शकता.

ज्येष्ठमध : हे गॅस, पित्त, डोकेदुखी, तणाव, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे, वेदना, संधिवात, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची समस्या तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाते. स्वयंपाकात याचा वापर म्हणजे एक प्रकारे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करण्यासारखेच आहे.

या सर्वांचाच तुम्ही दैनंदिन आहारात समावेश करू शकता, जसे की :

* पाणी किंवा दुधासोबत तिळाचे सेवन केल्यास कॅल्शियम कमी होण्याची समस्या कधीच निर्माण होत नाही. विशेष करून महिलांनी याचे सेवन अवश्य करायला हवे.

* जेवणापूर्वी खजूर खाल्ल्यास आपण कमी जेवतो, शिवाय अन्न लवकर पचते. गोड म्हणून चॉकलेट, कँडी, केक खाण्याऐवजी खजूर खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.

* जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे पचन चांगले होते. ते गरम पाण्यासोबत खाल्ल्यामुळे पोटविकार दूर होऊन वजनही कमी होते.

* तुपाच्या सेवनामुळे वजन कधीच वाढत नाही. मात्र बऱ्याच महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि संधिवाताच्या शिकार होतात.  डाळ, भाज्या, भात, पुलाव, पोळी, मिठाई आदींवर १-२ चमचे तूप घालून त्याचे नियमित सेवन करावे. खाण्यासाठी गायीचे तूप उत्तम असते.

अशी वाढवा शरीराची प्रतिकारकशक्ती

* गरिमा पंकज

हिवाळयात ज्यांची प्रतिकारकशक्ती कमकुवत असते ते अनेकदा आजारी पडतात. या ऋतूत प्रदूषणही उच्चांकावर असते. हवेतील गारवा शरीराची काम करण्याची क्षमता कमी करतो. अशा परिस्थितीत प्रतिकारकशक्ती चांगली असणे अत्यंत गरजेचे असते.

प्रतिकारकशक्ती म्हणजे काय?

रोग प्रतिकारकशक्ती ही आपल्या शरीरात असलेल्या विषारी द्रव्यांशी लढण्याची क्षमता असते. शरीरात टॉक्सिन असण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की, जीवाणू, विषाणू किंवा अन्य नुकसानकारक परजीवी. शरीराच्या आजूबाजूलाही खूप सारे जिवाणू, विषाणू आणि संसर्ग असतो जो आपल्याला अनेक प्रकारचे आजार देतो. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुस आणि श्वसनमार्गाशी संबंधित समस्याही निर्माण होतात.

या बाह्य संक्रमणांपासून, प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी शरीरात एक संरक्षण यंत्रणा असते ज्याला रोग प्रतिकारकशक्ती किंवा प्रतिकारशक्ती म्हणतात. तुमची प्रतिकारकशक्ती मजबूत असेल, तर बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमचे संरक्षण होते.

चला, रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे उपाय जाणून घेऊया :

शारीरिक सक्रियता महत्वाची

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी तुमचे शरीर सक्रिय असणे गरजेचे असते. शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिन नावाचे संप्रेरक बाहेर पडते, जे तणाव कमी करते, मन प्रसन्न ठेवते आणि शरीराची कार्यक्षमता वाढवते. जेव्हा तुम्ही काम करत नाही आणि भूक लागल्यावर अन्न खात नाही, तेव्हा तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक आजार होतात. शारीरिक निष्क्रियतेचा तुमच्या शरीराच्या प्रतिकारकशक्तीवरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा.

व्यायामामुळे तुमच्यातील क्षमता वाढते. पचनशक्ती चांगली राहाते. नियमित व्यायामामुळे लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि हृदयरोग तसेच व्हायरल आणि जीवाणू, विषाणूंच्या संसर्गासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. व्यायामामध्ये योगासह चालणे आणि सायकलिंगचा समावेश करा.

एरोबिक व्यायाम : जसे की चालणे, जॉगिंग, सायकलिंग आणि दीड तास, उच्च तीव्रतेचा एरोबिक व्यायाम जसे की धावणे तसेच रोज ४-५ मैल चालण्याची सवयही ठेवायला हवी. मार्च २०२० मध्ये ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तुम्ही दररोज जितके जास्त चालाल, तितकी तुमचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. चालणे आणि व्यायाम केल्याने आयुष्य वाढते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते, आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगही तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरते. ते तुमची हाडे मजबूत करते, रोग दूर ठेवते आणि पचन सुधारते.

भरपूर झोप घ्या

झोप ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे शरीर मुख्य रोग प्रतिकारक पेशी आणि रेणू जसे की साइटोकिन्स (एक प्रकारचे प्रथिन जे सूज रोखण्यासाठी लढू शकते किंवा ती वाढवू शकते) टी कोशिका (एक प्रकारची सफेद रक्त कोशिका जी प्रतिरक्षा प्रणाली नियंत्रित ठेवते) आणि इंटरल्यूकिन १२ ला नियंत्रित ठेवते. पुरेशी विश्रांती घेतल्याने आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारकशक्ती मजबूत होते.

बिहेवियरल स्लीप मेडिसिनच्या जुलै-ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, निरोगी तरुणांच्या तुलनेत (ज्यांना झोपेची समस्या नव्हती), निद्रानाश असलेल्या तरुणांना लस दिल्यानंतर त्यांना फ्लू होण्याची शक्यता जास्त असते.

झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोलची पातळीही वाढते जी रोग प्रतिकारकशक्तीसाठी निश्चितच चांगली नसते. झोपेच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी होते आणि आजाराशी लढण्याची किंवा बरे होण्याची क्षमताही कमी होते.

‘नॅशनल स्लीप फाउंडेशन’ सर्व प्रौढांना चांगल्या आरोग्यासाठी ७ ते ९ तासांची झोप घेण्याची शिफारस करते. झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करणे, फोनपासून दूर राहणे आणि हिंसक किंवा तणावपूर्ण मालिका किंवा संभाषण टाळणे आवश्यक असते.

आहारात बदल

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आणि आहारात काही बदल करून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता तसेच तुमची प्रतिकारकशक्तीही वाढवू शकता. आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळेल तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल. चिप्स, मॅगी, फ्रेंच फ्राईज, पास्ता, पिझ्झा, डबाबांद मिळणारे खाद्यपदार्थ, सोडा, शीतपेय इत्यादींचा चुकूनही तुमच्या आहारात समावेश करू नका. ज्यूस, लस्सी इत्यादींसोबत उकडलेली अंडी, हंगामी ताजी फळे, लापशी, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये इत्यादींचा आहारात समावेश करा.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी टोमॅटोचा आहारात नक्कीच समावेश करा. यामध्ये असलेले लाइकोपिन, के जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व आणि फायबर रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे संत्री, लिंबू, आवळा यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे सर्व प्रकारच्या संक्रमणांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करते.

या सर्वांना तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवा. लसूण शरीरात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स बनवून शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला रोगांशी लढण्याची ताकद देते. त्यात अॅलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला कोणत्याही प्रकारच्या संसर्ग आणि जीवाणूंशी लढण्याची ताकद देतो. पालक, मशरूम, मोड आलेली कडधान्ये इत्यादीदेखील तुम्हाला आतून मजबूत बनवतात.

आनंदी रहा

जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोकळेपणाने हसण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, तुम्ही तणाव कमी करू शकता आणि दीर्घकाळपर्यंत आजारी पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. याशिवाय तुमच्या नात्याला वेळ द्या. सामाजिक संबंध चांगले असल्यास सामाजिक आपलेपणाची सुखद भावना वाढीस लागते. तुम्ही मनाने आनंदी असाल, तर तुमचे शरीर बळकट होईल आणि वातावरणातील रोगांचे विषाणू तुमच्यावर हल्ला करू शकणार नाहीत.

निसर्गासोबत वेळ घालवा

तुमची रोग प्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा. निसर्गाचा सहवास शुद्ध हवा आणि आनंदी मन देते. झाडे आणि वनस्पतींचे सान्निध्य आपल्याला अनेक प्रकारे रोगमुक्त करते, आपली श्वसनसंस्था मजबूत करते. दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा, जेणेकरून सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे तुमच्यावर पडतील. ऊन हे ड जीवनसत्त्वाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, ज्यामुळे हाडे बळकट होतात तसेच रोग प्रतिकारकशक्तीही मजबूत होते.

अस्वच्छतेपासून दूर रहा

सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासोबतच आपल्या शारीरिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण अस्वच्छता ही अनेक रोगांचे कारण असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें