आंब्याचे रसरशीत पदार्थ

* प्रतिनिधी

आंब्याची आंबटगोड इडली

साहित्य

* अर्धा छोटा चमचा जलजीरा

* २०० ग्रॅम इडलीचे तयार मिश्रण

* २ मोठे चमचे लोणी

* पाव छोटा चमचा फ्रूट सॉल्ट

* साखर चवीनुसार

* २ आंबे

* पाव छोटा चमचा पांढरे तीळ लोण्यात थोडे भाजून घेतलेले

* अर्धा छोटा चमचा जीरे

* १ छोटा चमचा ओल्या खोबऱ्याचा कीस

* मीठ चवीनुसार.

कृती

आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. काचेच्या भांड्यात आंब्याचा गर, इडलीचे मिश्रण, साखर, मीठ, पांढरे तीळ. २ मोठे चमचे आंब्याचे बारीक तुकडे मिसळा. मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडली पात्रात थोडे तूप लावून इडली वाफवून घ्या. आंबटगोड इडलीवर तूप किंवा गरम गरम मँगो सॉस घालून सर्व्ह करा.

मँगो टिक्का

साहित्य

* २ आंबे

* थोडी वाटलेली साखर

* ७० ग्रॅम पनीर

* अर्धा छोटा चमचा काळी मिरीपूड

* ५० ग्रॅम चक्का

* पाव छोटा चमचा जलजीरा

* पाव छोटा चमचा भाजलेले व भरड कुटलेले जीरे

* मीठ चवीनुसार.

कृती

आंबा आणि पनीर आवडत्या आकारात कापून घ्या. काचेच्या भांड्यात चक्का, आंबा व पनीरचे तुकडे, साखर, मीठ, काळी मिरी पूड व थोडी जलजीरा पूड घालून व्यवस्थित मिसळून घेऊन फ्रिजमध्ये थंड करून काळी मिरी पूड व जलजीरा घालून मँगो टिक्का सर्व्ह करा.

उत्सवी स्वाद -2

* प्रतिनिधी

1) अक्रोड चाप्स

साहित्य

* १ कप वॉलनट तुकडे
* २ कप उकडलेले बटाटे मॅश करून
* २ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
* १ छोटा चमचा बारीक कापलेले आले
* १ छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची
* १ छोटा चमचा धने पावडर
* १ छोटा चमचा लाल मिरची पावडर
* पाव छोटा चमचा आमचूर
* अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा चाट मसाला
* १ छोटा चमचा जाडसर डाळिंबाचे दाणे
* १ कप तेल
* चवीनुसार मीठ.

कृती

तेल सोडून बाकी सर्व साहित्य मिसळा. मग या तयार साहित्याचे चाप्स बनवून हार्ट शेपच्या कटरने कापा. सर्व चाप्सला तव्यावर थोडे-थोडे तेल घालून शॅलो फ्राय करून हिरव्या चटणीसोबत वाढा.

2) वॉलनट पराठा

साहित्य

* २ कप मल्टिपर्पज पीठ
* १ कप जाडसर बारीक केलेले अक्रोड
* १ छोटा चमचा जिरे
* १ मोठा चमचा धने पावडर
* चवीनुसार मीठ
* १ छोटा चमचा डाळिंबाच्या दाण्याची पावडर
* १ छोटा चमचा चाट मसाला
*अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा जाडसर काळीमिरी
* आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.

कृती

पिठात चवीनुसार मीठ मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून मऊ मळून घ्या. अक्रोडसोबत सर्व मसाले मिसळा. पिठाचे गोळे बनवा. ते लाटून तूप लावा. अक्रोडचे सारण पसरवून काठाकडून बंद करत पुन्हा गोळा बनवा. आता हलक्या हातांनी पराठा लाटा. दोन्ही बाजूला तूप लावून सोनेरी रंगावर भाजून घ्या.

3) रवा केशरी

साहित्य

* पाव कप बादामचा चुरा
* १ कप रवा
*२ मोठे चमचे तूप
* २ मोठे चमचे तूप
* ४ मोठे चमचे पिठीसाखर
* अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
* २ छोटे चमचे बदामाचे काप.

कृती

पॅन गरम करून तूप टाकून रवा घालून सोनेरी रंगावर भाजा. आता यात १ कप पाणी व साखर मिसळा. सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मग वेलची पावडर आणि बदामाचा चुरा टाकून २-३ मिनिटे अजून परता. आता हे आवडत्या आकाराच्या बाउलमध्ये ओता. थंड झाल्यावर काढून घ्या आणि बदामाचे काप पेरून सर्व्ह करा.

काश्मिरी दम आलू

रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* ५०० ग्रॅम छोटे बटाटे
* २५० ग्रॅम दही

* १५ ग्रॅम राईचे तेल
* १० ग्रॅम काश्मिरी मिरची पूड
* १० ग्रॅम धणे पूड

* १ छोटा चमचा बडिशेप पूड

* १ छोटा चमचा जिरे पूड

* अर्धा चमचा जिरे
* अर्धा चमचा गरम मसाला
* चिमूटभर वेलची पूड

* २ हिरव्या मिरच्या कापून
* ५० ग्रॅम कांदे कापून

* २ कढीपत्ते
* १ छोटा चमचा लसूण पेस्ट

* १ छोटा चमचा आलं पेस्ट

* १० ग्रॅम टोमॅटो प्यूरी
* सजावटीसाठी थोडीशी चिरलेली कोथिंबीर
* मीठ चवीनुसार.

कृती

बटाटे धुवून मीठ घालून कुकरमध्ये उकडून घ्यावेत. मग सोलून बाजूला ठेवावेत. एका भांड्यात राईचे तेल गरम करावे. जिरे घालून परतून घ्यावे. मग त्यात कडिपत्ता, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट व मग कांदा घालून व्यवस्थित परतावे. नंतर यात बटाटे घालावेत व दही मिसळून शिजवावे. यानंतर यात धणे पूड, बडीशेप पूड, लाल तिखट पूड, जिरे पूड व वेलची पूड घालून परतावे. थोड्या वेळाने टोमॅटो प्यूरी घालून शिजवावे. सर्व मिश्रणाला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर गरम मसाला घालून परतावे. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

बेक्ड मसाला फ्लॉवर

रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* १ फ्लॉवर

* ४ कांदे

* २ टोमॅटो

* १ छोटा आल्याचा तुकडा

* ६ लसूण पाकळ्या

* १ छोटा चमचा हळद

* २ तमालपत्र

* १ छोटा चमचा लालतिखट

* २ चमचे धणे पूड

* १ छोटा चमचा गरम मसाला

* १ छोटा चमचा जिरे पूड

* २ हिरव्या मिरच्या

* १० ग्रॅम तेल

* १५ ग्रॅम पिझ्झा चीज

* थोडी चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

* मीठ चवीनुसार.

कृती

फ्लॉवर वा पानांचा पूर्ण भाग काढून टाकून फ्लॉवर ५ मिनिटांसाठी मीठ टाकलेल्या गरम पाण्यात ठेवा. मग पाण्यातून काढून सुकवा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घ्या. या पेस्टमध्ये तमालपत्र, मीठ, धणेपूड, हळद, जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट घाला. हे मिश्रण फ्लॉवरला लावून ३० मिनिटे वेगळे ठेवा. आता बेकिंग टे्ला तेल लावून घ्या व फ्लॉवर फॉईलमध्ये गुंडाळून बेक करून घ्या. मग पिझ्झा चीज घाला आणि चीज वितळेपर्यंत बेक करा व कोथिंबीरीने सजवा.

आल्याची भाजी

रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* १०० ग्रॅम आले
* ५-६ लसूण पाकळ्या

* १ छोटा कांदा
* १ छोटा टोमॅटो
* १० एम.एल. दूध
* १० एम.एल तूप
* अर्धा छोटा चमचा लाल तिखट
* अर्धा छोटा चमचा हळद
* अर्धा छोटा चमचा बडिशेप
* अर्धा छोटा चमचा जिरे

* अर्धा छोटा चमचा ओवा
* कोथिंबीर व आल्याचे ज्युलिअन्स सजावटीसाठी

* मीठ चवीनुसार

कृती

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घालून परता. मग आलं-लसूण घाला. नंतर कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या. यात हळद व लाल तिखट आणि मीठ घाला. थोडं पाणी घालून कांदा व्यवस्थित शिजेल असा परतून घ्या. या मिश्रणात दूध घाला आणि एक उकळी काढा. शिजल्यावर कोथिंबीर आणि आल्याचे ज्युलिअन्स घालून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें