शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

रवा कोकोनट बर्फी

साहित्य

* ३ मोठे चमचे तूप

* पाऊण कप रवा

* अर्धा कप किसलेले खोबरे

* २ कप दूध

* पाऊण कप साखर

* १ छोटा चमचा वेलची पावडर

* गार्निशिंगसेठी पिस्ता.

कृती

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा हलका सोनेरी रंगावर परता. आता त्यात खोबरं टाकून ५ मिनिटे परता आणि मग गॅसवरून उतरून एका बाजूला ठेवा. एका दुसऱ्या पॅनमध्ये दूध मंद आंचेवर उकळून त्यात रव्याचं मिश्रण टाकून चांगल्याप्रकारे ढवळा. दूध सुकल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर टाकून चांगल्याप्रकारे ढवळा. हे मिश्रण जोपर्यंत तूप सुटत नाही, तोपर्यंत ढवळत राहा. आता एका ट्रेला तूप लावून स्पॅट्यूलाने मिश्रण पसरवून सेट होण्यासाठी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा बर्फी चांगल्याप्रकारे सेट होईल, तेव्हा आवडत्या आकारात कापून पिस्त्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

कॅरामल कस्टर्ड

साहित्य

* अर्धा कप साखर

* ३ फेटलेली अंडी

* दीड छोटे चमचे व्हॅनिला

* २ कप उकळलेले दूध
* जायफळ

* गार्निशिंगसाठी मिंट स्प्रिंग.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात साखर घालून ती कमी हीटवर ओव्हनमध्ये सोनेरी होईपर्यंत वितळवा. मग हे सीरप चार मोल्डमध्ये भरून ओव्हनमध्ये १० मिनिटे कडक होण्यासाठी ठेवा. एका मिडियम बाउलमध्ये फेटलेली अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स आणि जायफळ घालून चांगल्याप्रकारे मिसळा. हे मिश्रण चाळणीने गाळून मोल्डमध्ये तीन चतुर्थांश भरा. मग ओव्हन रॅकवर रॅक्टँग्यूलर पॅन घेऊन त्यात भरलेले मोल्ड्स ठेवा. (पॅनमध्ये गरम पाणी ठेवा). मग ते जोपर्यंत चाकू सहजपणे बाहेर येत नाही, तोपर्यंत शिजू द्या. मग स्पॅटयूलाच्या मदतीने कस्टर्ड काठाने बाहेर काढा आणि मोल्डवर प्लेट ठेवून त्यावर डिश पलटा. आता तयार कॅरेमल सीरप सॉसप्रमाणे कस्टर्डच्या काठावर ओतून मिंट स्प्रिंगने गार्निश करून सर्व्ह करा.

शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

राजगिरा हलवा

साहित्य

* १ कप राजगिरा पीठ

* अडीच कप दूध

* ८ मोठे चमचे साजूक तूप

* अर्धा कप साखर

* थोडीशी वेलची पावडर

* थोडेसे काप केलेले काजू व बदाम.

कृती

एका पॅनमध्ये मंद आंचेवर दूध तापवा. तापल्यानंतर त्यात साखर घालून चांगल्याप्रकारे ढवळा. आता आणखी एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात राजगिरा पीठ घालून सोनेरी होईपर्यंत ढवळत राहा. मग यात हळूहळू दूध घालत मंद आंचेवर थोडा वेळ ढवळा. दूध सुकले आणि तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची पावडर व ड्रायफ्रूट्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

बेसनचे लाडू

साहित्य

* १ कप बेसन

* थोडीशी वेलची पावडर

* पाव कप तूप

* अर्धा कप पिठीसाखर

* गार्निशिंगसाठी थोडेसे काप केलेले पिस्ते.

कृती

बेसन चाळा. जाड बुडाच्या कढईमध्ये तूप गरम करून बेसन हलक्या सोनेरी रंगावर भाजा. तयार मिश्रण ताटात काढून थोडं थंड करा आणि मग यात वेलची पावडर व साखर चांगल्याप्रकारे मिक्स करा. मिश्रणाचे लाडू बनवून पिस्त्यांनी सजवून सर्व्ह करा.

शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

मोदक

सारणाचे साहित्य

*  थोडेसे पाणी

* १ कप किसलेला गूळ

* २ कप किसलेले खोबरे

* थोडीशी वेलची पावडर

* २ मोठे चमचे तूप

* थोडेसे बारीक कापलेले काजू.

पिठाचे साहित्य

* १ कप पाणी

* १ छोटा चमचा तूप

* १ कप तांदळाचे पीठ

* चवीनुसार मीठ.

कृती

एका पॅनमध्ये पाणी आणि गूळ टाकून मिडियम आंचेवर शिजवा. मग यात खोबरं टाकून १० मिनिटे चांगल्याप्रकारे ढवळा. मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स झाले की त्यात तूप, वेलची पावडर आणि काजू घालून चांगल्याप्रकारे ढवळा व आंचेवरून उतरून एका बाजूला ठेवा. पीठ तयार करण्यासाठी १ कप पाणी गरम करून त्यात तूप व मीठ टाका. पाणी जेव्हा चांगल्याप्रकारे उकळू लागेल, तेव्हा त्यात तांदळाचे पीठ टाकून चांगल्याप्रकारे ढवळत राहा, म्हणजे गठ्ठे बनणार नाही. मग ते झाकून १ मिनीट वाफवा आणि गॅस बंद करा. आता हे मिश्रण गरमागरमच चांगल्याप्रकारे मिक्स करत १० समान गोळे बनवून पुरीच्या आकारात लाटा. लाटल्यानंतर खोबऱ्याचे सारण भरून त्याच्या पाऱ्या बनवून बंद करा. मग स्टीमर प्लेटवर केळीचे पान ठेवून१०-१५ मिनिटे उकडून गरमागरम सर्व्ह करा.

 

स्टफ्ड मावा लाडू

साहित्य

* १ कप खवा किंवा मावा

* अर्धा कप पिठी साखर

* अर्धा मोठा चमचा तूप

* पाव कप मिक्स ड्रायफ्रूट्स

* ४ मोठे चमचे किसलेले खोबरे

* थोडेसे पिस्ते.

कृती

एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून मावा घालून २ मिनिटे परता. मग त्यात साखर मिसळून गॅसवरून उतरून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हाताला तूप लावून या मिश्रणाचे स्मूद बॉल्स बनवा. ते सपाट करून मध्ये खड्डा करून ड्रायफ्रूट्स भरून ते कडेने बंद करून पुन्हा स्मूद बॉल्स बनवा. मग पिस्ते आणि खोबऱ्यात लपेटून थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवा आणि मग सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें