२४ तास

कथा * विपिन चाचरा

समीरला जाग आली तेव्हा सकाळचे ८ वाजले होते. वंदनाला इतका वेळ शेजारी झोपलेले पाहून त्याला एकदा आश्चर्य वाटले, पण नंतर आठवले की ते दोघेही त्याची बहीण सीमाच्या घरी आले आहेत. त्याने वंदनाला उठवण्याचा प्रयत्न केला नाही, तितक्यात अचानक बाहेरून दरवाजावर टकटक झाली त्यासोबतच त्याला शेजारी राहणारी सीमाची मैत्रीण अंजूचा प्रसन्न आवाज ऐकू आला, ‘‘समीर, वंदना, गरमागरम चहा आणला आहे.’’

समीरने पटकन दरवाजा उघडला आणि आश्चर्याने विचारले, ‘‘तू चहा घेऊन का आलीस?’’

‘‘कारण सीमा घरी नाही. वंदना, उठ आता,’’ अंजू जवळ गेली आणि वंदनाला हलवू लागली.

‘‘सीमा सकाळीच कुठे गेली?’’

‘‘ती पती आणि मुलासोबत कुठेतरी सहलीला गेली असावी,’’ अंजूने वंदनाला उठवले आणि कपांमध्ये चहा ओतू लागली.

‘‘आम्हाला न सांगताच कशी गेली?’’ समीरच्या चेहऱ्यावर काळजी होती.

‘‘सीमाने तुम्हा दोघांसाठी पत्र दिले आहे, ते दिवाणखान्यातील टेबलावर ठेवले आहे.’’

समीरने लगेच तिकडे जाऊन टेबलावर ठेवलेले पत्र उचलले. शेजारी ठेवलेला लाल गुलाबांचा सुंदर पुष्पगुच्छ पाहून त्याला आणखीनच आश्चर्य वाटले.

सीमाने पत्रात लिहिले होते :

‘‘आम्ही तिघे कुठे गेलो आहोत, का गेलो आणि तुम्हा दोघांना काहीच का सांगितले नाही, अशा सगळया प्रश्नांची उत्तरे आम्ही उद्या सकाळी परत आल्यावर देऊ.

‘‘समीर, आजचा दिवस वंदनासाठी खूप विशेष आहे. कृपा करून आज तिला जे हवं ते करू दे, ती गुलाबाच्या फुलासारखी सुंदर राहिली पाहिजे.

‘‘मौजमजेने भरलेल्या एका दिवसासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा.’’

सुंदर गुलाब बघून वंदना आनंदाने खुलली आणि तिने समीरला विचारले, ‘‘हा सुंदर पुष्पगुच्छ कोणी आणला आहे?’’

‘‘ताई आणि भाओजींनी तो आपल्याला दिला आहे. आज कोणता विशेष दिवस आहे?’’ वंदनाकडे पुष्पगुच्छ देताना समीरने गंभीर स्वरात विचारले.

थोडावेळ कसलातरी विचार केल्यानंतर वंदनाने नकारार्थी मान हलवत उत्तर दिले, ‘‘मला काहीच आठवत नाही. तू सांग.’’

समीरने शांतपणे पत्र तिच्या हातात दिले आणि मग अंजूकडून कप घेऊन चहा पिऊ लागला. पत्र वाचून वंदना गूढपणे हसली आणि म्हणाली, ‘‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस आहे, उद्या या प्रश्नाचे उत्तर फक्त सीमा ताईच देऊ शकेल, पण तिने तुला दिलेला सल्ला मला खूप आवडला.’’

‘‘कोणता सल्ला?’’

‘‘आज तू मला जे पाहिजे ते करू दे. हा दिवस मला माझ्या पद्धतीने जगू दे.’’

‘‘मी तुला कैद करुन ठेवले आहे का?’’

कदाचित अंजू तिथे असल्यामुळे समीर वंदनाचे बोलणे ऐकून चिडला.

वंदना पलंगावरून खाली उतरली, एक दीर्घ श्वास घेऊन, तिने गुलाबंचा सुगंध घेतला आणि मग समीरकडे जात आनंदी स्वरात म्हणाली, ‘‘आज तुझ्या नाराजीचा आणि रागाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. सुखाची, आनंदाची सोबत आज तू सोडू नकोस आणि मीही सोडणार नाही.’’

समीरच्या जवळ जाऊन वंदनाने पाय उंचावत त्याच्या गालाचे चुंबन घेतले आणि तो काही बोलण्याआधीच ती लाजत आंघोळीला गेली.

‘‘वंदना आज खूप रोमँटिक झाली आहे,’’ असे म्हणत अंजू खोडकरपणे मोठयाने हसली आणि समीरलाही त्याचे हसू आवरता आले नाही.

‘‘प्रेमाच्या गप्पा मारण्यासाठी मी तुम्हा दोघांना फक्त एक तास देते, त्यानंतर माझ्या घरी नाश्ता करायला या,’’ अंजू जाण्यासाठी उठून उभी राहिली.

‘‘तू का त्रास करून घेतेस? नाश्ता तर वंदना…’’

नाहणीघराच्या दारातून डोकावत वंदनाने लगेच समीरला रोखले, ‘‘मी आज स्वयंपाकघरात जाणार नाही. धन्यवाद अंजू ताई. मी काल रात्रीही जेवले नाही. आम्ही तुझ्या घरी ठरलेल्या वेळी नाश्ता करायला येऊ.’’

‘‘दुपारचे जेवण वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रंजनाकडे आहे.’’

‘‘छान, खूप छान. रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला कोणाकडे जावे लागेल?’’ वंदनाने हसत विचारले.

‘‘सीमाने संध्याकाळच्या चित्रपटाची दोन तिकिटे मला दिली आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर रात्रीचे जेवण बाहेरून करून या बाईसाहेब.’’

‘‘खूप छान. खूपच छान,’’ खूप आनंदी दिसत असलेल्या वंदनाकडे समीरने नाराजीने पाहिले. त्यावेळी वंदनाने त्याला चिडवले आणि नाहणीघराचा दरवाजा बंद केला.

बाहेर जाण्यापूर्वी अंजूने विचारले, ‘‘आज असा कोणता विशेष दिवस आहे की, वंदना इतकी आनंदी दिसत आहे?’’

‘‘मला खरंच माहीत नाही, अंजू,’’ समीरने उत्तर दिले,

‘‘जर तिचा किंवा तुझा वाढदिवस असता तर तुला माहीत असते. तुमच्या लग्नाला फक्त ५ महिने झालेत, त्यामुळे तुमच्या लग्नाचा वाढदिवसही असू शकत नाही. वर्षभरापूर्वी या दिवशी तू वंदनाला प्रेमाच्या जाळयात ओढले होतेस का?’’

‘‘आमचा प्रेम विवाह नाही, अंजू’’

‘‘काल रात्री ती मला भेटली तेव्हा खूप शांत आणि उदास दिसत होती, रातोरात अशी काय जादू झाली की, ती इतकी आनंदी दिसत आहे?’’

‘‘मला माहीत नाही, सीमा आणि वंदना यांच्यात नक्कीच संगनमत झाले असावे, असा माझा अंदाज आहे.’’

‘‘कारण काहीही असो, वंदना रोमँटिक झाल्यामुळे आज तू खूप मजा केली पाहिजेस,’’ अंजूने मिश्कीलपणे डोळे मिचकावले आणि मग हसत तिच्या घरी गेली.

समीर सोफ्यावर बसून सर्व घडामोडींचा विचार करू लागला.

‘‘तुमच्या दोघांकडे एक महत्वाचे काम आहे. लवकर आमच्या घरी पोहोचा,’’ वंदनाला संध्याकाळी तिच्या मेव्हण्याकडून असा मेसेज मिळाल्यावर ती काल रात्री नऊच्या सुमारास इथे पोहोचली.

अंजू काही वेळाने त्याला भेटायला आली होती. वंदना रात्री शांत आणि उदास होती, हे अंजूने बरोबर ओळखले होते.

आदल्या दिवशी संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांसमोर तो वंदनाला मोठयाने ओरडला होता. त्याची आई आणि धाकटी बहीण स्वयंपाकघरात काम करत असताना वंदना टीव्ही बघत बसल्याचे पाहून तो रागावला होता.

‘‘दादा, वहिनी भाजी बनवून गेली होती. तिने तिच्या वाटणीचे काम केले आहे,’’ त्याच्या बहिणीने वहिनीची बाजू घेत भावाचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला.

‘‘सुनेला रडवण्यात याल काय आनंद मिळतो काय माहीत? बघावे तेव्हा तिच्या मागे लागलेला असतो. स्वयंपाक आणि घरातील इतर कामांमध्ये तो इतका लक्ष का घालतो, हेच समजत नाही.’’ वंदनाला अश्रू ढाळताना पाहून आई समीरला ओरडली.

समीरने मनातल्या मनात मान्य केले की, त्याच्या आईचे म्हणणे चुकीचे नाही. लग्न झाल्यापासून त्याने वंदनाचा अपमान करायचा जणू विडा उचलला होता.

वधूच्या रुपातील वंदनाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले होते. ती घरातली सर्व कामं कुशलतेने करत असे. स्वभावानेही ती खूप मनमिळाऊ होती, तिचा पगारही समीरच्या पगारापेक्षा ५ हजार रुपये जास्त होता.

या सर्व कारणांमुळे, प्रत्येक नातेवाईक आणि ओळखीचा वंदनाचे कौतुक करायचा आणि समीरला नशीबवान म्हणायचा. हे सर्व ऐकून समीर कंटाळला होता. वंदनासोबत एकांतात असताना त्याचा वेळ खूप मजेत जायचा, पण इतर लोकांच्या उपस्थितीत वंदनाचे हसणे – बोलणे त्याला खटकत होते. लोक तिचे कौतुक करताना थकत नव्हते आणि तो तिच्या प्रत्येक कामात, तिच्या वागण्यात चुका शोधण्यात हुशार झाला होता, वंदनाने गर्विष्ठ होऊ नये, असे त्याला वाटत होते.

‘‘प्रत्येकाने तुझी स्तुती करावी, यासाठी त्यांच्यासमोर सतत जाऊ नकोस, तुझे जास्त हसणे-बोलणे शोभून दिसत नाही. यामुळे तुझे चारित्र्य बरे नसल्याचे तुझ्या सहकाऱ्यांना वाटेल, असा गैरसमज होण्याची त्यांना संधी का देतेस?’’ वंदनाच्या कोणत्याही सहकाऱ्याने दिलेल्या पार्टीतून आल्यानंतर समीर अनेकदा तिला असे खोचकपणे बोलत असे.

‘‘तुझा माझ्यावर विश्वास असायला हवा,’’ सुरुवातीला समीरचे असे बोलणे ऐकून वंदना खूप नाराज व्हायची.

‘‘माझा विश्वास जिंकण्यासाठी तुझे वर्तन बदल.’’

‘‘माझे वागणे ठीक आहे. तुझी विचारसरणी चुकीची आहे.’’

‘‘माझ्या मर्जीप्रमाणे नाही वागलीस तर तुला पश्चात्ताप होईल.’’

‘‘विनाकारण आणि कोणाच्याही समोर माझा अपमान करत राहिलास तर आपलं नातं कधीच फुलणार नाही.’’

‘‘माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नकोस.’’

‘‘मी काही अशिक्षित आणि असंस्कृत स्त्री नाही, जी तिचे व्यक्तिमत्व पुसून टाकेल आणि तुझ्या हातातली बाहुली बनून राहील.’’

सुरुवातीला असे बोलून वंदना त्याच्याशी वाद घालत असे. त्यानंतर एके दिवशी वंदना असा वाद घालत असताना समीरने तिच्या ५-६ कानाखाली मारून तिची बोलती बंद केली.

ही घटना सुमारे २ महिन्यांपूर्वी घडली होती. त्या दिवसानंतर वंदनाला त्याच्याशी बोलायची हिंमत झाली नाही. बहुतेकदा ती त्याच्यासमोर गप्प आणि नाराज असायची.

‘मी तिची समजूत काढली तर ती पुन्हा आगाऊपणा करेल’, असा विचार करून समीरने वैवाहिक जीवनातील तणाव कायम राहू दिला.

समीरला वाटेल तेव्हा तो वंदनावर रागवायचा. ती गप्प बसून अश्रू ढाळायची तेव्हा त्याला विलक्षण समाधान मिळायचे.

काल रात्री वंदना शांत आणि उदासपणे सीमाच्या घरी गेली. त्यानंतर लगेच आज सकाळी तिला खूप प्रसन्न पाहून समीर आश्चर्यचकित झाला. बराच वेळ डोकं खाजवूनही त्याला पत्नीच्या बदलाचे कारण सापडले नाही. त्याने उगाचच खांदे उडवले आणि वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. वंदना त्याच्या मागे उभी राहून त्याच्या डोक्याला मालिश करू लागली, तेव्हा वृत्तपत्रातील बातम्यांवरून त्याचे लक्ष विचलित झाले.

‘‘वा, खरंच खूप छान वाटतेय,’’ समीरने मालिशचा आनंद घेण्यासाठी डोळे मिटले.

‘‘मलाही अशी मालिश करायला मजा येते,’’ वंदनाचे हात झपाटयाने फिरू लागले.

‘‘आज मी तुलाही मालिश करून देतो.’’

‘‘राहू दे, आजपर्यंत कधी नाही केलीस, आता काय करणार?’’

‘‘यावेळी निरर्थक वाद घालणं खरंच गरजेचं आहे का?’’

‘‘रागावू नकोस,’’ वंदनाने खाली वाकून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग मनापासून मालिश करू लागली. मालिश झाल्यावर समीर सोफ्यावर झोपला, पण वंदनाने त्याला ओढत नाहणीघरात नेले. तिथे तो तिला आपल्या बाहूंच्या कैदेतून सोडायच्या मनस्थितीत नव्हता.

‘‘साहेब, मला पुन्हा अंघोळ करायची इच्छा नाही,’’ वंदनाने त्याला दूर लोटले आणि हसत बाहेर आली.

‘‘नेहमी रात्री तू दुसऱ्यांदा अंघोळ करतेसच. रात्री ऐवजी आताच दुसऱ्यांदा माझ्यासोबत अंघोळ कर ना.’’

‘‘माझ्यासोबत अंघोळ करायची असेल तर रात्रीची वाट बघा साहेब.’’

‘‘उगाच लाडात येऊन प्रेमाची ही संधी गमावू नकोस.’’

‘‘मी चहा बनवते. तू लवकर अंघोळ कर.’’ त्याच्या अंगावर आपल्या हाताने एक चुंबन सोडून वंदना स्वयंपाकघराकडे निघाली.

तिची मादक चाल पाहून समीरच्या डोळयात तीव्र इच्छा उमटल्या. त्यावर नियंत्रण ठेवत त्याने हसतमुखाने दरवाजा बंद केला आणि तो अंघोळ करू लागला.

काही वेळाने त्यांनी अंजूच्या घरी सांभार-डोसा मनसोक्तपणे खाल्ला. वंदनाने तिचा ५ वर्षाचा मुलगा अमितसोबत खूप गप्पा मारल्या. ती त्याला जवळच्या बाजारात घेऊन गेली आणि तिने त्याच्या आवडीचे चॉकलेट घेऊन दिले तेव्हा अमितची ती सर्वात जास्त आवडती झाली.

नाश्ता करून वंदना अंजूसोबत बाहेर पडली.

‘‘कुठे जात आहात?’’ समीरचा हा प्रश्न ऐकून वंदना आणि अंजू गूढपणे हसू लागल्या.

‘‘मला परत यायला दीड-दोन तास लागतील, तोपर्यंत तुम्ही भाओजींशी गप्पा मारा,’’ वंदनाने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

‘‘तू कुठे जातेस, ते का सांगत नाहीस?’’ समीरला राग आला.

‘‘रागावू नकोस. मी परत आल्यावर सांगेन,’’ समीरची हनुवटी प्रेमाने हलवून वंदनाने अंजूचा हात धरला आणि मुख्य दरवाजाच्या दिशेने निघाली.

सुमारे २ तासानंतर दोघीही परतल्या. वंदनाचा चमकणारा रंग आणि कापलेले केस पाहून वंदना ब्युटी पार्लरमध्ये गेल्याचे समीरच्या लक्षात आले.

समीर काहीच बोलला नाही, पण अंजूच्या पतीने वंदनाच्या सौंदर्याचे मनापासून कौतुक केले.

‘‘तुमच्या दोघांसाठी ही संध्याकाळच्या चित्रपटाची तिकिटे आहेत,’’ अंजूने तिकिटे त्यांच्या हातात दिली. ‘‘आता १२ वाजले आहेत. बरोबर २ वाजता आपण सगळे रंजनाच्या घरी जेवायला जाऊ, तोपर्यंत तुम्हा दोघांनाही जे काही करायचेय ते करा.’’

अंजूचे असे बोलणे ऐकून वंदनापेक्षा जास्त समीर लाजला. स्वादिष्ट नाश्त्याबद्दल त्यांचे आभार मानून दोघेही सीमाच्या घरी आले.

‘‘मी छान दिसत नाही का?’’ लांबलचक आरशात रूप न्याहाळत वंदनाने समीरला विचारले.

‘‘प्रिये, तू एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसतेस,’’ समीर तिच्या मागे उभा राहिला आणि त्याने वंदनाला मिठीत घेतलं.

‘‘मग तू मला पाहताच माझी स्तुती का केली नाहीस?’’

‘‘अंजूचा पती भरभरून तुझी स्तुती करत होता ना?’’

‘‘तू तर नाही केलीस ना?’’

‘‘स्तुती करण्याची माझी पद्धत वेगळी आहे.’’

‘‘कोणती पद्धत आहे साहेब?’’

‘‘ही,’’ असे म्हणत समीरने तिला उचलून घेतले आणि तिच्या अंगातून येणाऱ्या मादक सुगंधाचा आनंद घेत पलंगाकडे निघाला.

वंदना त्याला त्याचा चांगला मूड बदलू देत नव्हती. वेळोवेळी ती त्याच्या डोळयांकडे प्रेमाने पाहायची, बहुतेकदा ती त्याच्या जवळ बसायची आणि जेव्हा तिला संधी मिळायची तेव्हा ती गुपचूप त्याचा हात दाबायची किंवा त्याचे चुंबन घ्यायची. तिने तिच्या पतीला तिच्याशी वाद घालण्याची संधीच दिली नाही.

समीरने आपल्या मेहुण्याला अनेकदा फोन केला, पण त्याने प्रत्येक वेळी फोन कट केला, त्याचे हे वागणे समीरला गोंधळात टाकण्यात यशस्वी ठरले.

दुपारच्या जेवणानंतर दोघे काही वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले आणि नंतर चित्रपट पाहायला गेले. निळी जीन्स आणि लाल टॉपमध्ये वंदना खूपच मादक आणि सुंदर दिसत होती. हे कपडे तिने तिच्या नणंदेच्या कपाटातून काढले होते.

वंदनाने तिच्याकडे पाहणाऱ्या लोकांची कधीच पर्वा केली नव्हती, पण त्या संध्याकाळी समीरच्या डोळयात मात्र नाराजीचे भाव दिसू लागले, तरीही त्याने वंदनाला एकदाही फटकारले नाही.

इंग्रजी चित्रपट अॅक्शन आणि रोमान्सने भरलेला होता. दोघांनाही चित्रपट आवडला. चित्रपटगृहातून बाहेर पडून ते चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेले, तिथे त्यांनी एकत्र नूडल्स, मंचुरियन आणि त्यानंतर दोघांची आवडती रसमलाई खाल्ली.

रात्री ११ च्या सुमारास दोघेही फ्लॅटवर परतले. वंदना कपडे बदलण्यासाठी नहाणीघरात जाऊ लागली, तेव्हा समीरने हसत तिचा रस्ता अडवला, ‘‘तुला वचन आठवत नाही का?’’ त्याने खोडकरपणे विचारले.

‘‘कोणते वचन?’’ पतीच्या डोळयातले भाव वाचून वंदनाचे गाल गुलाबी झाले.

‘‘माझ्यासोबत अंघोळ करण्याचे वचन.’’

‘‘तू रात्री अंघोळ करत नाहीस ना?’’

‘‘आज मला करायची आहे, प्रिये.’’

‘‘मग उशीर कशाला?’’ वंदनाने त्याच्या गालावर अनेक चुंबनं घेतली आणि मग त्याला नाहणीघरात नेले.

लहान मुलांसारखा खोडसाळपणा करत दोघांनी एकत्र अंघोळ केली. हसून हसून त्यांचे पोट दुखायला लागले होते.

त्यानंतर समीरचे आवडते अत्तर लावून वंदना पलंगावर त्याच्या शेजारी जाऊन झोपली, तिचे उत्कटतेने चुंबन घेतल्यानंतर समीर तिच्या कानात भावनिक होऊन बोलला, ‘‘आजपासून तू माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.’’

‘‘आभारी आहे, माझ्या लाडक्या,’’ डोळयात अचानक आलेले अश्रू समीरपासून लपवण्यासाठी तिने एखाद्या वेलीप्रमाणे समीरला मिठी मारली.

दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ८ वाजता, समीर मोबाईल वाजल्यामुळे गाढ झोपेतून जागा झाला. त्याची बहीण सीमाने फोन केला होता.

‘‘मी झोपेतून उठवले का तुला?’’ सीमाने विचारले.

‘‘तू आहेस कुठे? काल न सांगता…’’

‘‘वंदना काय करतेय?’’ सीमाने त्याला थांबवत विचारले.

‘‘झोपलीय. आता माझ्या प्रश्नाचे…’’

‘‘गेले २४ तास तुम्हा दोघांसाठी कसे होते?’’

‘‘खूप छान… खूपच छान,’’ समीरचा चेहरा लगेचच उजळला.

‘‘वंदना खुश आहे का?’’

‘‘खूप जास्त.’’

‘‘मला तुला काही महत्वाचं सांगायचं आहे समीर.’’

‘‘बोल ताई.’’

‘‘परवा रात्री तू वंदनावर ओरडून तिला रडवले होतेस ना?’’

‘‘ताई, तिला जरा काही बोलले तरी ती रडू लागते.’’

‘‘तुझ्या त्या जराशा बोलण्यामुळेच वंदनाने तुला सोडून कायमचे माहेरी जाण्याचा ठाम निर्णय घेतला होता,’’ सीमाने सांगितले.

‘‘मला हे खरं वाटत नाही,’’ समीरने चिडून उत्तर दिले.

‘‘तुला हे खरं का वाटत नाही?’’ सीमाने रागाने विचारले. ‘‘दिवस-रात्र ओरडा खाणे आणि स्वत:चा अपमान सहन करणे, हे कोणत्या स्वाभिमानी स्त्रीला आवडेल? ती लोकांशी हसतमुखाने बोलली तर तुला ती चरित्रहीन वाटते.’’

‘‘हे सगळं काही खरं नाही,’’ समीरला राग आला होता.

‘‘खरं-खोटं करण्यापेक्षा मी तुला जे समजावून सांगतेय ते नीट समजून घे समीर, नाहीतर नंतर तुला पश्चाताप होईल.’’

‘‘काल संध्याकाळी फोनवर माझ्याशी बोलत असताना वंदना रडायला लागली, म्हणून आम्ही तुम्हा दोघांना इथे बोलावलं. मी तुझ्या सुंदर, विनम्र आणि हुशार पत्नीशी रात्री उशिरापर्यंत बोलले आणि मला समजले की, तुझ्या कठोर वागण्यामुळे ती खूप दु:खी आहे आणि कंटाळून तिला तिच्या माहेरी जायचे आहे.

‘‘मी समजावल्यानंतर तिने तुझ्या चुकीच्या वागणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तुझे जीवन २४ तासांसाठी सर्व सुखांनी, आनंदाने भरून देण्याचे मान्य केले.

‘‘माझ्या भावा, मागील २४ तास आठव आणि माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे, तुला ती सगळी सुखं आणि आनंद हवा आहे की, वंदनाला सतत हिणवल्यामुळे मिळणारे अहंकाराचे समाधान हवे आहे?’’ बोलता बोलता भावूक झाल्याने सीमाचा कंठ दाटून आला.

काही क्षणांच्या शांततेनंतर समीरने उत्तर दिले, ‘‘ताई, कालचा दिवस…मगाचे २४ तास, आम्हा दोघांसाठी अविस्मरणीय आहेत. मला माझी चूक समजली आहे. या क्षणापासून मी स्वत:ला बदलणार आहे.’’

‘‘मला जे सांगायचे होते, ते तुला समजले, यातच सर्व काही आले.’’

‘‘हो, चांगलेच समजले. फक्त तू आणि भाओजी माझायासाठी आणखी एक काम करा.’’

‘‘बोल, काय करू?’’

‘‘तुम्ही जसे वंदनाला २४ तास दिलेत तसे मला १२ तास द्या. मी माझ्यातील बदल दाखवून वंदनासोबतच्या माझ्या प्रेमाच्या नात्याचीमुळे आणखी मजबूत करेन.‘‘

‘‘ठीक आहे. आम्ही रात्री परत येऊ. नवीन सुरुवातीसाठी आमच्याकडून तुला शुभेच्छा,’’ सीमाने फोन ठेवताच धावत जाऊन वंदनाला मिठी मारण्यासाठी समीर आतूर झाला.

पूजापाठ नव्हे शिक्षण गरजेचे

* प्रतिनिधी

लग्नानंतर पत्नीला घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल आणि पतीला त्याची जाणीव होत नसेल किंवा काहीच करता येत नसेल तर पत्नीला यातून सुटका करून घेण्यासाठी आजारी पडण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. ज्या घरांमध्ये पती पत्नीबद्दल खूप उदासीन असतो तिथे पत्नी तणावात राहतात, त्यांना वारंवार डॉक्टरांकडे जावे लागते, पती-पत्नीमध्ये भांडण होते आणि दुसरा पर्याय नसल्यामुळे पत्नीला घर कैदेसारखे वाटू लागते.

अशी परिस्थिती धोकादायक असते. कमी संख्येने महिला या प्रकारची गुदमरल्याची लक्षणे असल्याचे प्रत्यक्ष मान्य करतात, परंतु किती जणींमध्ये ती असतात, हे सांगणे सोपे नाही.

याचे एक मोठे कारण म्हणजे कुटुंब लहान झाल्यापासून काका, मामा सर्वच वेगळे राहू लागले आहेत. विवाहित महिलांचा अनोळखी वाटणाऱ्या किट्टी मैत्रिणींशिवाय कोणाशीही संपर्क नसतो. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक आहे, पण स्वत:चे दु:ख त्या तिथे जाहीर करू शकत नाहीत. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी उपाय काय असू शकतो हे बहुतेक जणींना माहीत नसते.

शरीराला सुडौल आकार देण्यासाठी जिम आहेत, चेहरा उजळण्यासाठी पार्लर आहेत, लुप्त होत चाललेल्या शरीराला टवटवीत करण्यासाठी कॉस्मेटिक डॉक्टर्स आहेत, पण मानसिक जखमा भरून काढण्यासाठी जे काही थोडे फार तज्ज्ञ आहेत तेही अर्धवट आहेत. असो, ते फक्त तुमचे ऐकू शकतील. ते काहीतरी सल्ला देतील, काही तयार फॉर्म्युला देतील, असे मात्र शक्य नाही.

जीवन जगण्याचा धडा खरंतर लहानपणापासूनच मिळतो, पण आजच्या स्पर्धेच्या जगात, इतरांपेक्षा सरस बनण्याच्या प्रक्रियेत, शिकण्याची प्रथा संपली आहे. आई-वडील नुसते घर आणि पैसे देणारे एटीएम बनले आहेत. मित्र तेवढया पात्रतेचे नाहीत. असो, त्यांना काय करावे हेच कळत नाही, कारण गेली ६०-७० वर्षे जीवनातील शिक्षणाच्या नावाखाली केवळ पूजापाठ शिकवली जात आहे. लोक पर्यटनासाठी कमी आणि तीर्थयात्रेला जास्त जातात.

आयुष्य हे हजारो तुकडयांनी बनलेल्या गोधडीसारखे आहे. कुठेही कोणताही तुकडा विसावला की तो गोधडी खराब करू शकतो. त्यासाठी याची माहिती पहिल्यापासूनच असणे आवश्यक आहे, पण त्याचे शिक्षण पुस्तकांतून मिळत नाही, ते चित्रपटांतून, शेजाऱ्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनही मिळत नाही.

देशाची उत्पादकता कमी होत आहे. आपण विभागले जात आहोत. न्यायालयात खटल्यांचा ढीग पडत आहे. पूनावाला आणि श्रद्धासारख्या प्रकरणात आपण अडकत चाललो आहोत. श्रद्धासोबत जे काही घडले ते कोणत्याही पत्नीसोबत घडू शकते, हेही सर्वांना माहीत आहे, पण बहुतेक जखमा लपूनच जातात कारण लोक, समाज, सरकार सगळेच जखमेची चेष्टा करतात, मलम लावत नाहीत. जखम होऊ नये याचा धडा कोणीच शिकवत नाही.

आत्मसन्माचा हक्क सुनेलादेखील आहे

* प्रतिनिधी

तरुण पती-पत्नीला पतीच्या आई-वडिलांनी वेगळं राहण्यासाठी घर घेऊन दिलं आणि संसाराचा इतर खर्च तरुण पती-पत्नीने आपल्या दोघांच्या कमाईतून उचलला. नंतर पतीची आई अधूनमधून दोघांच्या संसारात नाक खुपसू लागली की हा सोपा बाजूला ठेवा, पडद्यांचा रंग बदला, मोलकर्णीला घरातून काढा कारण तिने घंटी वाजवताच दरवाजा उघडायला उशीर केला तसंच दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी दिला. यावर नवऱ्याच्या आईला काय म्हणणार?

हेच ना की ती मुलासुनेचं घर जोडत आहे जोडत नाहीए तर तोडत आहे. असंच काम आपल्या केंद्र सरकारचे नियक्त राज्यपाल अशा राज्यांमध्ये करत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही आहे.

दिल्लीमध्ये तर भयंकर रूपांत एका मागोमाग एक राज्यपाल करत आहेत. भाजपाने ७च्या ७ जागा जिंकल्यात, पहिल्या दोनवेळा ते विधानसभेत आणि यावेळी दिल्ली नगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालच्या आम आदमी पक्षाकडून हरले. आता ते अशा सासूप्रमाणे वागत आहेत जिच्या मुलाने आपल्या मर्जीने लग्न केलं आणि आईने शोधलेल्या मुलीला रिजेक्ट केलं होतं.

असा त्रास देण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीच्या डीएनएमध्येच आहे. कारण पुराणांमध्ये वारंवार उल्लेख आहे की ऋषीमुनी राजाच्या दरबारात घुसून जबरदस्तीने राजाकडून काम करून घेत असत.

नृसिंह अवतार बनून विष्णूने हिरण्यकश्यपचा अकारण वध केला. कृष्णाने विनाकारण कौरव आणि पांडवांमध्ये मतभेद उभे केले आणि या कुरुवंशाला समाप्त केलं. विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला जबरदस्तीने राक्षसांना मारण्यासाठी घेऊन गेले आणि पूर्ण रामायणात त्यांच्यासारखे ऋषीमुनी अयोध्येच्या कामकाजात विघ्न आणत राहिले.

जी कथा या ऋषीमुनींनी रचली त्यांच्यामध्ये राजाचं काम अशाच प्रकारच्या ऋषींच्या अकारण गोष्टी थोपवणं होतं जसं की केंद्र सरकारचे राज्यपाल पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, छत्तीसगड, झारखंडमध्ये करत आहेत.

पौराणिक ऋषींच्या दखल अंदाजामुळे पौराणिकथाचे राजा प्रत्येकवेळी ऋषीमुनींच्या आदेशावरून लढण्यास तयार असत आणि हेच ऋषीमुनी आज घरामध्ये तरुण पती-पत्नींना त्रास देत आहेत. साधारणपणे सासवा कोणत्या ना कोणत्या स्वामी महाराज, गुरुच्या भक्त असतात आणि रात्रंदिवस त्यांच्या सेवेमध्ये असतात. तेच सासवाना उकसावत राहतात की सुनेला कायम ताब्यात ठेवा.

जे विचार करतात की सरकार आपल्या कामाने फक्त संसार चालविणाऱ्यांच्या वा संसाराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात लागली आहे, ते चुकीचं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा निर्णय आज त्याचप्रकारच्या पौराणिक विचारसरणीच्या लोकांच्या हातात आली आहे. राज्यपालांची ढवळाढवळ, सरकारची धमकी, बुल्डोझरचं कारस्थान, हिंदू मुस्लिम विवाद सर्वांची काळी सावली आज प्रत्येक घरावर पडत आहे, समोरून वा मागून.

दु:खाची बाब ही आहे की स्त्रिया बरोबरीच्या मतदाता असूनदेखील जुन्या काळाच्या विचारसरणीला पाठिंबा देऊ लागल्या आहेत की आम्हाला काय करायचे जे पती सांगतील तेच करणार.

राज्यपालांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की एक तर आमचा ऐका अन्यथा आम्ही तुम्हाला त्रास देत राहणार, हाच विचार पंतप्रधान कार्यालयातून सुरू होतो आणि तोच प्रत्येक घरामध्ये पोहोचतो. विद्रोह करण्याचा, विरोध करण्याचा, स्वत:चा आत्मसन्मान व आत्मविश्वास  ठेवण्याचा हक्क प्रत्येक सुनेला आहे की नाही? लोकशाहीमध्ये विरोधकांना सरकार चालविण्याचा हक्क आहे की नाही?

उपाय स्वीकारून नाती अधिक दृढ करा

* अनुराधा गुप्ता

नात्यांना अधिक दृढ करण्यासाठी काही असे उपाय करा जे तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये गोडवा भरून ते अधिक सुखद करतील.

कौटुंबिक नाती

सर्वप्रथम आपण कौटुंबिक नात्यांबद्दल बोलूया जी आपल्याला वारसाने मिळतात आणि जी एखाद्या संपत्तीपेक्षा अधिक असतात. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही 10 पद्धती सांगतो ज्यामुळे तुम्ही तुमची कौटुंबिक नाती अधिक दृढ करू शकाल :

1) प्रपंच सोडा : प्रपंच खूपच खमंग शब्द आहे. लोक याचा मिटक्या मारत वापर करत असतात. उदाहरणार्थ. सुनेच्या भावाने आंतरजातीय लग्न केलं. मग काय सुनेला लोकांना उत्तर देणं कठीण होऊन बसतं. सासूबाई तर त्यांच्या संस्काराची उदाहरणं देऊन देऊन सुनेच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवण्यात गर्क झाल्या.

अहो, ही गोष्ट एवढा इश्यू बनविण्याची मूळात गरजेचं काय? आंतरजातीय लग्न कोणता गुन्हा तर नाहीए ना. हा, एक आहे तो म्हणजे तुमच्या समाजातील लोक ही गोष्ट पचवू शकत नाहीत. परंतु सून तर तुमच्याच घरची आहे. तिच्या सुखदु:खात सहभागी होणं तुमचं कर्तव्य आहे, जे तुम्ही प्रपंचाच्या नादात उडवत आहात. तुम्हाला काय वाटलं की प्रपंच केल्याने तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत मोठं बनता आणि समोरच्याला दुसऱ्यांच्या नजरेतून कमी करता. तसं नाहीए उलट यामुळे तुमचीच पत कमी होते. तुमच्याच कुटुंबाची खिल्ली उडते, ज्यामध्ये तुमचादेखील समावेश होतो.

म्हणूनच या रोगापासून स्वत:ला कसे मुक्त कराल आणि दुसऱ्यांना कोणता सल्ला द्याल हे नक्की ठरवा.

2) तुमचं कर्तव्य समजून घ्या : कर्तव्याचा अर्थ केवळ आईवडिलांची सेवा करणं एवढंच नाहीए, उलट तुमच्या मुलांबद्दलदेखील तुमची काही कर्तव्य असतात. अलीकडचे आईवडील आधुनिकतेच्या चादरीने लपेटलेले आहेत. मुलांना जन्म देणं आणि त्यांना सुखसुविधा देण्यातच ते आपली जबाबदारी मानतात. परंतु यापेक्षादेखील ते स्वत:;चा वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देतात. अशावेळी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही एक आदर्श आईबाबा नाही आहात. परंतु या वर्षात तुम्हीदेखील आदर्श होण्याचा किताब मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमची कर्तव्य अधिक योग्यतेने अमलात आणायला हवीत.

3) खोट्याचा आधार घेऊ नका : अनेकदा पाहाण्यात आलंय की आपल्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी, स्वत:चा बडेजाव मिरवण्यासाठी वा आपली चूक लपविण्यासाठी लोक खोट्याचा आधार घेतात. एकत्रित कुटुंबपद्धतीत या गोष्टी अधिक पाहायला मिळतात. कारण एकमेकांमध्ये स्वत:ला अधिक योग्य सिद्ध करण्याच्या नादात लोकांकडून चुकादेखील होतात. परंतु हे नकारात्मक पद्धतीने घेण्याऐवजी सकारात्मक रीतीने घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही अशी विचारसरणी ठेवाल तेव्हा खोटं बोलण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. यावर्षी विचारात सकारात्मकता आणा. यामुळे कौटुंबिक नात्यांसोबत तुमचं व्यक्तिमत्त्वदेखील उजळून निघेल.

4) आर्थिक वितुष्टापासून दूर राहा : आधुनिकतेच्या काळात लोकांनी नात्यांनादेखील पैशाच्या तराजूतून तोलायला सुरुवात केलीय. नात्यांमध्ये अनेकदा एखाद्या समारंभाच्या नावाखाली पैसा उधळण्याची प्रथा आहे. लग्नासारख्या समारंभाचंच घ्या ना. इथे शगुन म्हणून पाकीट देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. या पाकिटांमध्ये पैसे ठेवून नातेवाइकांना दिले जातात. जो जेवढे पैसे देतो त्यालादेखील तेवढेच पैसे परत देऊन व्यवहार पूर्ण केला जातो. परंतु जी नाती पैशांच्या आधारावर बनतात वा बिघडतात त्यांचा काहीच फायदा नसतो. यावर्षी ठरवा की नात्यांमधील आर्थिक गोष्टीवरून निर्माण होणाऱ्या वितुष्टांपासून दूर राहायचं, तरच नात्यांना भावनांनी जुळवू शकाल.

5) अभिव्यक्तीस्वातंत्र्य : अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्या देशाच्या घटनेतदेखील केला गेलाय. परंतु कुटुंबाच्या घटनेत हा हक्क थोड्याच लोकांना दिलेला आहे, जो खूपच चुकीचा आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क प्रत्येकाला द्यायला हवा. अनेकदा आपण समोरच्यांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. वा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. मुळातील साधेपणामुळे ती व्यक्ती दबलीदेखील जाते. परंतु यामुळे नुकसान तुमचंच होतं. कारण तो तुम्हाला योग्य सल्लादेखील देत असतो, परंतु तुम्ही त्याचं ऐकत नाही आणि स्वत:चंच म्हणणं खरं करत राहाता. अशामध्ये खरं आणि खोट्यातील अंतर तुम्ही कधीच समजू शकणार नाहीत. म्हणूनच यावर्षांपासून ठरवा की घरात स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल.

सामाजिक नाती : समतोल आणि सुखद आयुष्य जगण्यासाठी कौटुंबिक नात्यांबरोबरच सामाजिक नातीदेखील दृढ बनविणं गरजेचं आहे. चला तर मग आम्ही सांगतो तुम्हाला सामाजिक नाती योग्य बनविण्याच्या ५ पद्धती :

6) ईगोचा त्याग करा : ईगो खूपच लहान परंतु खूपच खतरनाक शब्द आहे. ईगो माणसांवर तेव्हा हावी होतो जेव्हा तो स्वत:च्यापुढे समोरच्याला तुच्छ समजतो, त्याला दु:ख देऊ पाहातो वा त्याचा आत्मविश्वास डळमळीत करू पाहातो. अनेकदा कार्यालयात काम करणाऱ्या साथीदारांमध्ये ईगोची भिंत उभारलेली असते. अशा परिस्थितीत अनेकदा ते अशी पावलं उचलतात ज्यामुळे ते त्यांची प्रतिमा मलिन करतात वा ते समोरच्यांचं बरंचसं नुकसान करण्यात यशस्वी होतात. परंतु ईगो तुम्हाला मोठेपणा देऊ शकतो का? कदाचित नाही. तो तुमच्याकडून नेहमी वाईट काम करवून घेतो. तुम्हाला वाईट माणसांच्या श्रेणीत आणतो. तर मग ज्यामुळे तुमचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं, अशा ईगोचा काय उपयोग? यावर्षी ठरवूनच टाका की ईगोचं नामोनिशाण तुमच्या व्यक्तिमत्त्वावरून मिटवून टाकाल आणि दुसऱ्यांचं वाईट करण्याऐवजी तुमचं व्यक्तिमत्त्व उजळविण्यात वेळ खर्च कराल.

7) मदतनीस व्हा : माणूस एक सामाजिक प्राणी आहे आणि नेहमी समूहाने राहात आलाय. या समूहात अनेक लोक याचे जाणकार असतात, तर काही अनभिज्ञदेखील असतात. परंतु मदत एक अशी प्रक्रिया आहे जी मनुष्याला मनुष्यानेच जोडते. एखाद्याच्या त्रासात त्याला सोबत करणं वा त्याला कधीही मदत करणं हे एक माणूस या नात्याने आपलं कर्तव्य आहे.

8) पुण्य नाही कर्तव्य समजा : धार्मिक ग्रंथांमध्ये पुण्य कमावणं एक मोठं व्याख्यान आहे. अनेकदा लोक पुण्य कमावण्याची संधी म्हणून एखाद्याला मदत करतात. परंतु जिथे पुण्य कमावण्याची संधी दिसत नाही तिथे ते ढुंकूनही पाहात नाहीत. असं म्हणतात की भुकेलेल्या आणि तहानलेल्या माणसाला खायला घालण्याने पुण्य मिळतं. हे पुण्य कमावण्यासाठी लाखों रूपये खर्चून भंडाऱ्याचं आयोजन करतात. मात्र दुसरीकडे हिच लोक वाटेतील गरीब भुकेलेल्या मुलाला २ भाकऱ्या देण्याऐवजी हाकलून देतात. उलट एखाद्या भुकेलेल्याला खायला घालणं हे पुण्य नाही तर तुमचं कर्तव्य आहे. अशाप्रकारे धर्माच्या नावाखाली वा त्याचा आधार घेऊन एखाद्या खास दिवसाची वाट पाहून एखादं कार्य करण्याऐवजी गरजवंताला पाहाताच त्याला आधार द्या आणि हे तुमचं कर्तव्य समजा. तर यावर्षी प्रतिज्ञा करा की काम पुण्य नाही तर कर्तव्य समजून कराल.

9) खुल्या मनाने मोठा विचार करा : यावर्षी तुमच्या विचारसरणीचा विस्तार करा. असं केल्यावर तुम्हाला आढळेल की तुमच्यापेक्षा अधिक समाधानी आणि चिंतामुक्त मनुष्य दुसरा कोणीही नाहीए. अशी अनेक लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला मिळतील जी स्वत:चा वेळ फक्त दुसऱ्यांबद्दल विचार करण्यासाठीच खर्च करतात. त्यांना प्रत्येक वेळी हेच वाटतं की त्यांच्या बाबतीत कोणीतरी चुकीचं करतंय वा बोलतंय. परंतु जरा विचार करा, या धावपळीच्या युगात कोणाकडेही दुसऱ्यासाठी विचार करायला तरी वेळ आहे का? तर नाही आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्याबद्दल विचार करा आणि कोणाचंही नुकसान न करता आपल्या फायद्याचं काम करा.

10) सन्मान द्या आणि सन्मान मिळवा : अनेक लोक जेव्हा एकाद्या मोठ्या स्तरावर पोहोचतात तेव्हा ते नेहमी आपल्यापेक्षा छोट्या स्तरावरच्या लोकांकडे कुत्सितपणे पाहू लागतात. अनेकदा कार्यालयांत असं होतं की स्वत:ला सीनिअर म्हणवून घेण्याच्या नादात लोक आपल्यापेक्षा खालच्या पदावरच्यांचं शोषण आणि अपमान करायला सुरुवात करतात. परंतु तुम्ही ही म्हण ऐकलीच असेल की चिखलात दगड टाकल्यास त्याचे शिंतोंडे आपल्यावरदेखील उडतातच. अशाप्रकारे अपमान करण्याऱ्यांनादेखील अपमानच मिळतो. म्हणूनच यावर्षी ठरवून टाका की कोणतीही स्थिती व परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांशी सन्मानपूर्वकच वागा

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें