मनीचेही दीप करा प्रज्वलीत

– गरिमा पंकज

दिवाळीच्या दिवशी बाह्य अस्वच्छतेसोबत मनातील मलिनता व अंधार दूर लोटणंही तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे सकाळच्या वेळी दवबिंदू सूर्यप्रकाश परावर्तित करतात, त्याचप्रमाणे आपली मन:स्थितीसुद्धा चेहऱ्यावर दिसून येते. मग आपलं मनही सकारात्मक भावनांनी प्रकाशमान करूया, जेणेकरून त्याचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावरही झळकू लागेल व ही दीपावली आपल्या सर्वांसाठी नवीन प्रकाशाचं, नवीन तेजाचं द्योतक ठरेल.’’

मनात अंधार अन् मलिनता पसरवणारे काही प्रमुख भाव हे आहेत.

संशय : संशयाचे बळी आपण सगळेच होत असतो. खासकरून स्त्रिया थोड्या जास्तच संशयी असतात.

विल्यम शेक्सपिअर म्हणतो की आपला संशय आपल्याला सर्वात जास्त फसवतो. यामुळेच आपल्या हातातून ते सारे निसटून जाते, जे आपण सफलतेने मिळवू शकत असतो. मग दिवाळीच्या या मंगलप्रसंगी आपण आपल्या मनातून, डोक्यातून हरतऱ्हेचा संशय दूर करून पूर्ण विश्वासाने आयुष्याच्या या प्रवासाचे मार्गक्रमण करूया.

भीतिला दूर पळवून लावा : फॉर्म्यूला वन कार रेसर, नारायण कार्तिक याचं म्हणणं आहे की, ‘‘जीवनात भीतिला कुठलेही स्थान नाही. मी भीतिशी मैत्री केली आहे. भीतिची जागा आता विश्वासाने घेतली आहे.’’

वास्तविक, जोपर्यंत आपल्याला आपल्या शक्तीचा अंदाज नसतो किंवा आपल्या मनात एखाद्या गोष्टीचं भय निर्माण झालेलं असतं, तेव्हा आपण उगीचच घाबरू लागतो. अज्ञान व अंधश्रद्धेची धुंदी आपल्या डोळ्यांसमोर पसरते. वास्तव आपल्याला समजून येत नाही आणि मग आयुष्य आपल्याला आयुष्याप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातून आपण नकारात्मकता व भीती फेकून दिली पाहिजे. अज्ञानामुळे भीतिचा जन्म होतो आणि अडाणीपणा अंधश्रद्धेला जन्म देतो. मग आपण घाबरू लागतो की असे तर नाही ना होणार किंवा तसे झाले तर. यासाठी हेच योग्य आहे की ही भीती आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून हद्दपार करून टाकू व मनात विश्वासाचे दिप प्रज्वलित करू.

क्रोध : मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे राग, क्रोध आणि या रागाचा जन्म होतो अहंकारामुळे. रागात व्यक्तिचा स्वत:वरील ताबा सुटतो. यामुळे तो स्वत:ला शारीरिक त्रास तर करून घेतोच, पण नात्यांमध्येही यामुळे दरी निर्माण होते.

रागिट व्यक्तींपासून लोकच काय पण आनंदही दूर जाऊ लागतो. एखादी सतत आरडाओरडा चिडचिड करणारी स्त्री कधीच पतीची आवडती होऊ शकत नाही.

द्वेष व इर्ष्या : आपल्या अयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ आपण बऱ्याचदा इतरांचा द्वेष व इर्ष्या करण्यात वाया घालवतो. यामुळे आपली मानसिक स्थिती तर आपण बिघडवून घेतोच पण इतरांच्या समस्यादेखील वाढवतो. दूरदर्शनवरील मालिकांचंच उदाहरण घ्या. प्रत्येक मालिकेत कुठली न कुठली स्त्री इरेला पेटून दुसऱ्या महिलेच्या विरोधात कारस्थान रचत असलेली दिसते. ‘जोधा अकबर’मधील स्कैया बेगम किंवा ‘बालिका वधू’मधील बुआजी यांचीच कारस्थानं पाहा. अशाप्रकारचे द्वेषपूर्ण विचार आपल्याला उद्ध्वस्त करून टाकतात.

दीपावलीच्या याशुभप्रसंगी मनातील कलुषित भाव दूर करून सकारात्मक विचारांसाठी जागा निर्माण केली पाहिजे.

निराशा : ‘‘मानसिक स्थितीचा आपल्या शरीरावर थेट प्रभाव पडतो,’’ असे डॉ. विलिअम एम. एडलर यांचे म्हणणे आहे.

स्वत:ला निराशेच्या अंध:कारातून बाहेर काढण्याची वेळ म्हणजे दिवाळी. नकारात्मक विचारांचा स्वत:वर प्रभाव पाडून घेऊ नका. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रूजवेल्ट यांचे दोन्ही पाय निकामी होते. पण त्यामुळे निराश होण्याऐवजी पुढे जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली.

चिंता : अमेरिकेचे मेंदू चिकित्सक डॉ. जेकोबी यांच्या शब्दात, ‘‘अति चिंता केल्याने शरीरावर असा प्रभाव पडतो जसा शरीरावर गोळ्या किंवा तलवारीचे वार केल्यावर होईल.

‘‘चिंता मनुष्याला आतून पोखरून काढते व जास्त भावूक असल्यामुळे स्त्रिया सतत छोट्या मोठ्या गोष्टींची चिंता करत राहातात. समजा आपला मेंदू उघडून त्यावर एका छोट्या हातोडीने सतत घाव घालाला तसा चिंतेचा यांत्रिक प्रभाव असतो त्यामुळे मेंदूतील पेशी विघटित होतील व कार्यक्षमताच हरवून बसेल. म्हणून डोक्यातून, मनातून सर्व चिंता काढून टाका व फक्त प्रकाशाला थारा द्या. या दिवाळीत आधी एवढं काम कराच.’’

हीनभावना : ज्यांच्या मनात इतरांविषयी हीनभावना असते, अशा व्यक्ती स्वत: आनंदी राहू शकत नाहीत व इतरांनाही आनंद देऊ शकत नाही. स्वत:ला कमी समजत राहिलं की त्या गोष्टींचा ताण चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागतो. आपल्या कमकुवतपणाचे ते एक मोठे कारण बनते. आपण एकदा कमकुवत झालो की इतर लोकही आपल्याशी चांगले वागत नाहीत.

डेव्हिड टी जॉन यांचे म्हणणे आहे, ‘‘स्वत:बद्दल वाईट विचार करणे ही जगातील सर्वात वाईट सवय आहे, यामुळे शरीरात नकारात्मक उर्जा तयार होते.’’

या सर्व उणिवा, कलुषित मनोभाव दूर लोटून मनाच्या अंगणात पुढील विचार रूजवा.

हास्याचे फटाके उडवा

जेव्हा तुम्ही हसता तेव्हा आमाशयामध्ये नृत्यासारख्या हालचाली होत असतात. यामुळे पाचनतंत्राची प्रकिया वेगाने घडते. हृदयाचे ठोके जलद होतात. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह खेळकर राहतो. डोळ्यांत आगळीच चमक येते व शरीराचा प्रत्येक अवयव औषधासारखा काम करतो. प्रसन्न भाव आणि हास्य या दोन गोष्टी महिलांचे अलंकार आहेत. प्रसन्न दिसणारी गृहिणी तिच्या पतीबरोबच पूर्ण कुटुंबाला आवडते, हवीहवीशी वाटते.

दिवाळीच्या दिवशी स्मितहास्याचे फटाके उडवा, तरच दिवाळीचा आनंद वर्षभर तूमच्या आयुष्याला नवचैतन्य देत राहिल.

सकारात्मक विचारांचा प्रकाश

आयुष्याकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एखाद्या अर्ध्या रिकाम्या ग्लासाला अर्धा भरलेला आहे असंही म्हणू शकता. आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणणे खूप महत्वाचे आहेत.

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ प्रो. रिचर्ड फॉक्स म्हणतात, ‘‘सकारात्मक बदल चांगल्या गोष्टींच्या लहरी तयार करतात. ज्यामुळे तुमचं आयुष्य व आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती या लहरींमुळे आनंदी होऊ शकतो. एक बदल मग दुसऱ्याला जन्म देतो व यानंतर बदल घडत जातात व आपल्या आयुष्यात आनंदाचे गाणे झिकारू लागते.’’

आत्मविश्वासाचे दिवे

स्वत:ला कधीही कोणापेक्षा कमी समजू नये. आत्मविश्वास बाळगावा. जेम्स इलियट म्हणतात, ‘‘जेव्हा तमचा आत्मविश्वास बळकट असतो, तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खुश राहू शकता आणि एक आनंदी व्यक्ती प्रचंड क्रियाशील व कल्पकसुद्धा असते.’’

एनर्सन म्हणतात, ‘‘काहीजण जिंकत आलेला खेळही हरतात, कारण त्यांचा स्वत:वर विश्वास नसतो. जर तुम्हाला हरत चाललेला डाव जिंकायचा असेल तर स्वत:वर विश्वास ठेवा.’’

यासंदर्भात सुधा चंद्रन यांचे उदाहरण घेता येईल. अपघातामध्ये दोन्ही पाय गमावूनही आपला आत्मविश्वास त्यांनी डळमळू दिला नाही व नकली पायांच्या सहाय्याने नृत्य क्षेत्रात वेगळीच उंची गाठली.

माजी राष्टपती अब्दुल कलाम यांचं म्हणणं होतं की जितकी मोठी स्वप्नं तुम्हाला पाहाता येतील तितकी पाहा व ती पूर्णही करा. पण डोळे बंद करून स्वप्नं पाहू नका, स्वप्नं असं पाहा की ते पूर्ण होण्यासाठी तुमची झोप उडून जाईल.

प्रेमाची पणती लावा

दिवाळीच्या झगमगत्या वातावरणात आपल्या आयुष्याला प्रेमाची भेट द्या. रूसलेल्यांची समजूत काढा व आपल्या प्रियजनांसोबतचे प्रेमाचे बंध अजून दृढ करा व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना दाखवून द्या की त्यांचे तुमच्या आयुष्यात किती मोलाचे स्थान आहे. या दिवाळीत तुम्ही त्यांना अशी भेट देत द्या जी त्यांनाही हवी आहे व तुम्हालाही त्यांना द्यायची आहे.

पत्नीला खूश करायचे असेल तर तिच्यासाठी दागिने, कपडे, किचनसंबंधी साहित्य किंवा इतर काही वस्तू घेऊ शकता. या दिवसांमध्ये कपड्यांवर सूट आणि वरायटीही उपलब्ध असते. जागोजागी सेल ही लागलेले असतात.

कासा ब्रॅण्डच्या संचालिका विनिता मित्तल सांगतात, ‘‘सणासुदीच्या दिवसांत तऱ्हेतऱ्हेचं डिस्काउंट मिळतं. एक असतं कॅश डिस्काउंट, ज्यात विक्रेता वस्तूंची किंमत घटवून विक्री करतात. दुसऱ्यात दुकानदार लोन किंवा हप्त्यावर वस्तू विकतात. तसं पाहाता यावर इंटरेस्ट रेट शून्य असतो.’’

दागिने ही स्त्रियांची पहिली आवड आहे आणि या सीझनमध्ये अनेक मोठे ज्वेलर्स अशा सवलती देतात की तुम्हाला एकरकमी पैसे देता येत नसतील तर तुम्ही हप्त्यांमध्ये ती रक्कम देऊ शकता. अनेकदा शेवटचा हप्ता त्यांच्याकडूनच भरला जातो. हप्त्यावर सोने घेतले तर तुमचे खर्चाचे गणितही बिघडत नाही. तुम्ही सोन्याची नाणी किंवा ब्रिक्सदेखील घेऊ शकता.

आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा

इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज, एलसीडी अशा वस्तू तुम्ही वर्षभरात कधीही खरेदी करू शकता. पण यावर्षी दिवाळीच्या दिवशीच या वस्तू खरेदी करून घरच्यांचा आनंद द्विगुणित करा.

तुमच्या घरात सिंगलडोअर जुना फ्रिज असेलही पण त्यात पुरेसं कुलिंग होत नसेल व पत्नी त्याची नेहमी तक्रार करत असेल तर यावेळी बाजारात आलेला नवीन पद्धतीचा वीज बचत करणारा, जास्त क्षमतेचा फ्रिज घेऊन या. घरात जर सेमीऑटोमेटिक वॉशिंग मशिन असेल तर या दिवाळीत फुली ऑटोमॅटिक किंवा फ्रंट लोडेड वॉशिंग मशिन खेरदी करू शकता.

याचप्रकारे दिवाळीला खर्चाचे गणित बसवून गाडी घेण्याचेही ठरवू शकता. तुमच्या मुलीसाठी किंवा पत्नीसाठी स्कूटी घेऊ शकता किंवा पूर्ण कुटुंबासाठी मोठी कार घेऊन सर्वजण एकत्र फिरायला जाऊ शकता.

स्त्रिया पतीसाठी मनगटी घड्याळ, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप अशा वस्तू घेऊ शकतात किंवा नविन फर्निचर, गालिचे, पडदे, चादरी अशा वस्तू विकत घेऊन पूर्ण घरभर एक नवा रंग व नवा उत्साह आणू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें