दिवाळीत रंग रंगोटी कामापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

* पारुल भटनागर

एशियन पेंट्सची एक जाहिरात तर तुम्हा सर्वांनाच आठवतचं असेल, ज्यामध्ये सुनील बाबू आयुष्यात पुढे जात राहतात, प्रत्येक गोष्टीत बदल घडतो, परंतु एक एक गोष्ट ते बदलत नाहीत, ते म्हणजे त्यांचं घर, जे कायमचं नवीन दिसत राहतं.

जर तुम्हीदेखील तुमच्या घराला पेंट करण्याबद्दल विचार करत असाल तर थोडी हुशारी तुम्हीदेखील दाखवा म्हणजे तुमचं घर कायमच नवीन दिसेल आणि लोकं तुमचं कौतुक करताना थकणार नाहीत. तर चला जाणून घेऊया घराला पेंट म्हणजेच रंगकाम करतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि रंगांची निवड कशी करावी :

कंटेंस व इंटिरियर लक्षात घ्या

जेव्हादेखील तुम्ही तुमचं घर पेंट करण्याबद्दल विचार कराल तेव्हा सर्वप्रथम हे पहा की तुमच्या घरात घरांमध्ये कंटेंस कशाप्रकारे लागला आहे, कारण नेहमीच पेंट हा घराचे पडदे, इंटिरियर इत्यादींना लक्षात घेऊन करायला हवं. कारण यामुळेच घराचा लुक उठून दिसतो.

संपूर्ण घरात एकसारखाच पेंट करायला हवा असंदेखील गरजेचं नाहीए. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळया खोल्यांमध्ये मॅच करणारा पेंट लावू शकता. जो  सुंदर दिसण्याबरोबरच अलीकडे ट्रेंडमध्येदेखील आहे. यासाठी तुम्ही एखाद्या एक्सपर्टसचा सल्ला नक्कीच घ्या म्हणजे तुमच्या घराला योग्य प्रकारे न्यूमेकओवर मिळण्यास मदत मिळू शकेल.

मुलांना लक्षात घेऊनच पेंट करा

जेव्हादेखील घरात रंगकाम कराल तेव्हा मुलांचा नक्कीच विचार करा. असं यासाठी की जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि तुम्ही भिंतींवर नॉर्मल पेंट लावायचं ठरवत असाल तर तुमचा पेंट लवकर खराब होण्याबरोबरच, मुलांनी भिंतींवर काही लिहिल्यास वा चित्र काढल्यास ते वाईट दिसण्याबरोबरच घराचं सौंदर्यदेखील कमी करतं.

याऐवजी तुम्ही भिंतींवर ऑइल पेंट, वॉटरप्रूफ पेंट करू शकता. यावर लागल्यास त्वरित वॉश केल्यास ते निघून जातं. सोबतच तुम्ही घराला सुंदर दिसण्यासाठी एक चांगला व महागडा पेंट करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मुलांच्या रूममध्ये त्यांची थीम लक्षात घ्या कारण त्यांच्या खोलीमध्ये आवडत्या थीमचा  वॉल पेंट जसं की कार्टून कॅरेक्टर्स वगैरे असल्यामुळे मुलं त्याकडे त्वरित आकर्षित होतात आणि तिथे बसून ते मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी करण्यासाठी तयार होतात.

विविध प्रकारचे पेंट्स

जर तुम्ही तुमच्या घराला फ्रेश लुक द्यायचं ठरवत असाल तर त्यासाठी तुम्हाला योग्य पेंट, कलर व त्याचं फिनिश लक्षात घेणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही तुमच्या घराला सुंदर बनवू शकाल. परंतु यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणते पेंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या पेंटबद्दल जाणून घेऊन तुम्हाला तुमच्या घरासाठी पेंटची निवड करणं सहज शक्य होईल.

तर जाणून घेऊया उत्तम पेंट्सबद्दल

* ऐनामल पेंट ऑइल बेस्ट पेंट असतो, जो दीर्घकाळ टिकून राहण्याबरोबरच भिंतींना ग्लॉसी फिनिश दिल्यामुळे घराला रॉयल लुक देण्याचंदेखील काम करतो. हाफ पेंट ज्या जागी अधिक मॉइश्चर व ह्युमिडिटी असते त्या जागी अधिक सूट करतो. परंतु हा पेंट लावल्यावर, काही काळानंतर क्रॅक्स पडायला सुरुवात होते.

* डिस्टेंपर पेंट पॉकेट फ्रेंडली असण्याबरोबरच भिंतींवर प्रायमरशिवाय देखील डायरेक्ट अप्लाय करू शकता. परंतु हे वॉटरप्रुफ नसतात. ओलसर झाल्यावर डिस्टेंपर निघून जातो.

* टेक्सचर पेंट भिंतींवर खूपच युनिक टच देण्याचं काम करतो. हे वॉटरफ्रुफ असण्याबरोबरच भिंतींवर विशेष टेक्निक्सचा आधार घेऊन भिंतींना खास इफेक्ट देण्याचं काम करतो. परंतु हा पेंट खूपच महाग असण्याबरोबरच हे फक्त एक्सपर्ट पेंटर्सच करू शकतात.

* मेटॅलिक पेंट वॉटर बेस्ट असण्याबरोबरच भिंतींना मेटॅलिक फिनिश दिल्यामुळे घराला लुक देण्याचं काम करतात. हा पेंट अधिक महाग असल्यामुळे हा शानदार इफेक्ट देण्याबरोबरच छोटया छोटया भागांमध्येदेखील लावला जातो.

* अॅक्रेलिक पेंट वॉटरप्रुफ असल्यामुळे अनेक लोकांचा आवडीचा आहे कारण हा दीर्घकाळ टिकणारा आहे. हा मॅट सेटिन, सिल्क प्रत्येक प्रकारच्या फिनिशमध्ये उपलब्ध आहे. हा भिंतींवर तडेदेखील पडू देत नाही. फक्त पेंट करण्यापूर्वी भिंतींवर प्रायमर कोड करणं गरजेचं आहे.

कलर्सची निवड लक्षात घ्या

* लिविंग रूम घराचा असा भाग आहे, जिथे आपण कुटुंबासोबत बसून सर्वाधिक काळ व्यतीत करतो. अगदी बाहेरून आलेल्या लोकांना हाच भाग आकर्षित करतो. अशावेळी या खास जागेसाठी न्यूट्रल शेडची निवड करू शकता.

* जर तुम्हाला डायनिंग रूमसाठी कॉफी लुक द्यायचा असेल तर तुम्ही रेड शेड्सची निवड करा कारण रेड कलर लाइवलीनेसला प्रमोट करण्याबरोबरच भूक वाढविण्याचेदेखील काम करतो. यामुळेच स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये लाल रंगाचे फॅन असतात. तर पिवळा रंग आनंदाच प्रतीक असण्याबरोबरच ते तिथे तुम्हाला अधिक कम्फर्ट मिळून चांगलं खाण्याबद्दल तुम्ही विचार करता. ग्रीन म्हणजेच हिरवं डायनिंग रूम निसर्गाच्या जवळ आणण्याबरोबरच तुम्हाला उत्तम खाण्यासाठीदेखील प्रमोट करण्याचं काम करतो.

* मुलांच्या रूममध्ये नेहमीच सोफ्ट टोन्सवाले पेंट अधिक करायला हवेत कारण हे त्यांना शांत व कुल ठेवण्याचं काम करतात.

* बेडरूम घराची अशी जागा आहे, जिथे आपण स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी जातो. अशावेळी जेव्हादेखील बेडरूमसाठी पेंट कलर्सची निवड कराल तेव्हा ते सॉफ्ट कलर्स म्हणजेच लाईट कलर्स ऑफ टोन्स असावेत, जे तुम्हाला रिलॅक्स फिल करण्याचं काम करतील.

* जेव्हा किचन म्हणजेच स्वयंपाकघर कलर कराल तेव्हा त्यामध्ये पांढरा, राखाडी, लाल, पिवळा, हिरवासारख्या शेड्सची निवड करा. कारण हे रंग अधिक शाईन करण्याबरोबरच आकर्षित करण्याचंदेखील काम करतात.

* बाथरूममध्ये पांढरा रंग देणं बेस्ट आहे कारण हा नेहमीच फ्रेश व क्लीन फिल देण्याचं काम करतो. सोबतच तुम्ही सोफ्ट राखाडी, लाईट ब्ल्यू, पिस्ता, लाईट ग्रीनसारख्या शेड्सदेखील ट्राय करू शकता. हे रंगदेखील खूपच कूल फील देण्याचं काम करतात.

ट्रॅडिशनल पेंट्सचादेखील ट्रेंड

जर तुम्ही तुमच्या घराला ट्रॅडिशनल लुक देण्याचं ठरवत असाल तर अलीकडे ट्रेंडमध्ये चालू असणाऱ्या मधुबनी पेंट्सने भिंती सजवू शकता. सर्वप्रथम मधुबनी पेंटिंग रांगोळीच्या रुपात लोकांना माहित होती. परंतु आता ही आधुनिक रूपात कपडे, भिंती तसंच कागदावर उतरली आहे. या कलेला फक्त भारतातच नाही तर परदेशातदेखील खास पसंत केलं जातंय.

दिवाळी काही क्षणाच्या आनंदासाठी थकविणारा प्रवास

* सीमा ठाकूर

मुंबईत दरवर्षी कितीतरी मुलं वेगवेगळया शहरातून शिक्षणासाठी वा नोकरीसाठी येतात. इथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात, ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात.

दिवाळी आपल्या जिवलगांसोबत साजरा करण्याचा सणउत्सव आहे. साधारणपणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या मुलांसाठी दिवाळी म्हणजे महिन्याभरा पूर्वीपासूनच आई-बाबांसोबत मिळून घराची साफसफाई करणं, खरेदीला जाणं, भेटवस्तू खरेदी करणं, घर सजवणं आणि दिवाळीच्यादिवशी खूप मजा करणं.

परंतु, अशी काही मुलं असतात जी होस्टेलमध्ये अनेक मैलाचा प्रवास करून घरी फक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचतात. दिवाळी फक्त एक सण नाही तर त्यांच्यासाठी एक आठवण आहे, एक असं प्रेम आहे जे स्वत:च्या कुटुंबियांसाठी या सणाला खास बनवितो.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरात दरवर्षी अशी कितीतरी मुलं वेगळया शहरातून शिकायला आणि नोकरी करण्यासाठी येतात. तिथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात. ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात. याचमुळे वर्षभर ते भलेही आपल्या घरी गेले नसले तरी दिवाळीसाठी नक्कीच जातात.

दिल्ली युनिव्हर्सिटीत शिकणारी कशिश सांगते, ‘‘हॉस्टेलमधून घरी जाण्यासाठी मला सर्वात मोठा त्रास असतो तो कपडे पॅक करण्याचा. कपाटातून काढा, कपडयांची निवड करा आणि नंतर पॅक करा, खूपच कटकटीचं असतं. सर्वात जास्त टेन्शनचं काम असतं हॉस्टेलमधून परवानगी घेणं. अगोदर तर दहा प्रकारचे असे फॉर्म सही करून घेतात. त्यानंतर पालकांच्या आयडीवरून मेल पाठवावा लागतो. त्यानंतर हॉस्टेलमधून बाहेर पडताना पालकांशी बोलून द्यावं लागतं. नंतर एक एन्ट्री हॉस्टेलचा गेटवर आणि एक कॉलेजच्या गेटवरती करावी लागते. या सर्वानंतर कॉलेजमधून बाहेर पडल्यावर सुट्टयांमुळे कोणतीही रिक्षा मिळत नाही. एकतर स्वत:च्या सामानसोबत उभे राहा वा रोड क्रॉस करून जा. कसंबसं करून मेट्रोपर्यंत पोहोचताच एवढं भारी सामान उचला आणि स्क्रीनिंगवरती टाका. कधी फोन पडतो व कधी हॅन्ड बॅग आणि चुकून जर फोन बॅगमध्ये टाकून विसरलो तर समजा मिनी हार्ट अटॅक येता येता राहून जातो.

‘‘तसं मी माझ्या घरी फ्लाईटनेच जाते येते, परंतु दिवाळीच्या वेळी फ्लाईट खूपच एक्स्पेन्सिव्ह होतात. दिल्लीवरून लखनौच्या फ्लाईटमुळे तसाही वेळ वाचतो. परंतु सामान अधिक जास्त असेल तर त्रास होतो. ट्रेनने गेल्यास कमीत कमी ९ ते १० तास  लागतात. जेव्हा मी पहिल्या वर्षाला होती तेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीवरून लखनौला एकटी जात होती, कारण अॅडमिशनच्यावेळी आईसोबत आली होती आणि त्यानंतर मी सरळ दिवाळीला जात होती. माझी ट्रेन पूर्ण ६ तास लेट होती. तिची वेळ होती संध्याकाळी ७ वाजता पोहोचण्याची आणि मी पोहोचली रात्री दीड वाजता. आई बाबा तर खूपच चिंतेत होते. ११ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ती ट्रेन जागेवरून हललीच नव्हती आणि स्टेशनला पोहोचण्यासाठी चार किलोमीटर बाकी होते. मला वाटलं की थोडंसं डिस्टन्स मी कव्हर करेन म्हणून मी निघाली. खाणं फक्त मी एक वेळचंच आणलं होतं, तेदेखील मेसवाल्या दादाला प्लीज प्लीज बोलून, जे खूपच अगोदर संपलं होतं. माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. नंतर स्टेशनवर आई बाबांचा चेहरा पाहिला तेव्हा मी सर्व काही विसरून गेली.’’

व्हिडिओग्राफर म्हणून नोकरी करणारा निलेश आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण काढत दिवाळीच्या दरम्यान केलेला स्वत:चं हॉस्टेल ते घर प्रवासाची आठवण काढत सांगतो, ‘‘कॉलेजचे पहिलं वर्ष होतं. घर नागपूरमध्ये होतं आणि सर्व मित्र तिथेच होते. मला खूपच एकटेपणा वाटत होता. कॉलेज सुरू झाल्यानंतरदेखील दिवाळीची सुट्टी केव्हा पडेल आणि मी केव्हा घरी जाईन याची वाट पाहत होतो. त्यावेळी मला स्वत:च्या सामानसोबत कसं मॅनेज करायचं आणि प्रवास करायचा हे माहीत नव्हतं. मी घरी कोणालाही सांगितलं नव्हतं की मी येतोय. मी आगाऊपणे अगोदर कॉल करून सांगितलं होतं की मी येणार नाही. यावेळी मला अभ्यासाचं प्रेशर खूपच जास्त आहे.

‘‘मी कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट बूक केलं. मी माझा वेळ मॅनेज करण्यासाठी एक चार्ट बनवला की दोन दिवसात कोणा कोणाला भेटायचं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं, एवढं सगळं. मी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी होस्टेलवरून निघालो आणि कॅबमध्ये बसलो. कॅबमध्ये बसल्यानंतर पंक्चर झाली. मला अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन तास लागले. कारण जेव्हा मी कॅबमधून उतरलो तेव्हा समोरच रिक्षा मिळाली परंतु नेमकं तिचं सीएनजी संपलं होतं. त्यांनी मला सांगितलं की रस्ता फक्त २ किलोमीटरचा आहे. तू पायी जाऊ शकतोस. पुढे खूपच ट्रॅफिक होतं, त्यामुळे कोणतीही रिक्षा मला मिळत नव्हती.

‘‘मी २ किलोमीटर पायी चाललो आणि जसं स्टेशन वरती पोहोचलो तेव्हा ट्रेन निघणारच होती. हे पाहून मी माझं सामान माझ्या डोक्यावर उचललं आणि धावलो. माझं सामान आतमध्ये फेकलं आणि चढलो. माझा कोच होता बी २ आणि मी चढलो होतो एस १ मध्ये. नंतर हळूहळू आतून निघत मी माझ्या जागेवरती पोहोचलो. मी हॉस्टेलवर रहात असल्यामुळे प्रवासासाठी खाणं पॅक करून देणारं कोणीच नव्हतं. परंतु मी ज्या डब्यामध्ये होतो, त्यामध्ये बसलेल्या काकाकाकूंनी माझ्यासोबत त्यांचा डबा शेअर केला. माझा वेळ ट्रेनमध्ये छान गेला. मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांशी गप्पा मारु लागलो. छान झोपलोदेखील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचलो. मी घराचा गेट उघडला आणि जेव्हा आईने मला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी सगळा थकवा घालवणारा होता. माझ्यासाठी ही दिवाळी गेल्या दिवाळीपेक्षा खूपच खास होती.’’

कॉलेजच्या सहामाहीच्या ब्रेकमध्ये जिथे परीक्षेच्या टेन्शनमुळे सर्वच मुलं चिंतेत असतात, तिथे हॉस्टेलमधून घरी जाणाऱ्या मुलांच्या डोक्यावर तर जणू संकटांचा डोंगर पडलेला असतो. ईशान दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्यावेळी हॉस्टेलमधून त्याच्या घरी गोव्याला जातो. तो त्याचा अनुभव शेअर करत सांगतो, ‘‘घरापासून दूर राहिल्यावर घराचं महत्त्व समजतं. दिवाळीत घरी एक वेगळीच रोनक असते. त्यामुळे सतत वाटतं की या सगळया गोष्टींचा भाग बनावा. मला घरी जाण्यापूर्वी कॉलेजची सर्व कामे करावी लागतात. कारण २ ते ३ दिवसाची सुट्टी मिळते. मित्रांसोबत अनेक प्लान्स कॅन्सल करावे लागतात.  परीक्षेसाठी अगोदरच अभ्यास करून ठेवावा लागतो. आई-बाबा फोन करतात तेव्हा सांगतात की तुझ्यासाठी काय काय खरेदी करणार आहे वा काय खरेदी करून ठेवले आहे. आता तर सांगावंदेखील लागत नाही जसं लहानपणी सांगाव लागायचं.

खाणंदेखील माझ्या आवडीचं असतं. घरी जाऊन वाटतं की आपण पुन्हा लहान मुलं झालो आहोत. इथे मुंबईमध्ये वाटत रहातं की आपण खूप मोठे आहोत. परंतु घरी जाऊन एकदम वेगळंच वाटतं. हा, दिवाळीमध्ये फ्लाइटचं तिकीट खूपच महाग असतं आणि विचार करावा लागतो की घरी जाऊ की नको, १०,००० पेक्षा कमी नसतं व परंतु घरी जाण्याचा आनंदापुढे सगळं काही लहान दिसू लागतं. २ दिवस घरी खूपच छान वाटतं. आपल्या गावात पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती येते. सगळीकडे दिवाळीची खूप धामधूम असते.’’

अशीच काहीशी असते हॉस्टेलवाल्यांची दिवाळी, जिथे त्यांच्यासाठी दिवाळी फक्त दोन दिवसांचा सणवार नसतो, तर १२ ते १५ तासांचा थकविणारा प्रवासदेखील असतो, ज्याचा थकवा आणि त्रास घरातल्यांबरोबर दिवाळी साजरा करण्याच्या आनंदा खाली दबून जातो.

Diwali Special: लग्नानंतरची पहिली दिवाळी अशी बनवा संस्मरणीय

* गरिमा पंकज

लग्नानंतर सृष्टीची पहिलीच दिवाळी होती. तिचे सासूसासरे आणि दिर जाऊ जवळच दुसऱ्या फ्लाटमध्ये राहत असत. सृष्टीचे पती मनीष यांना कंपनीतर्फे वेगळा फ्लॅट मिळाला होता. त्यात दोघे पतिपत्नी एकटे राहत असत. सृष्टीही नोकरी करत असल्याने घराला दिवसभर कुलुप असे.

ऑफिसमध्ये दिवाळीची सुट्टी एकच दिवस होती पण सृष्टीने २ दिवस सुट्टी घेतली होती. तिला तिची दिवाळी अविस्मरणीय बनवायची होती. दिवाळीच्या दिवशी मनीषला महत्त्वाच्या मिटींगसाठी बाहेर जावे लागले. मिटींग लांबली. परतताना सायंकाळ झाली. मनीषने सृष्टीला फोन केला तर तिने उचलला नाही. घरी परतताना मनीष विचार करत होता की आज नक्कीच सृष्टी त्याला टोमणे देईल किंवा मग निराश तरी झालेली असेल.

गोधंळाच्या मन:स्थितित त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला, पण आत अंधार होता. तो क्षणात एकदम घाबरला आणि जोरात ओरडला, ‘‘सृष्टी, कुठे आहेस गं, आय एम सॉरी.’’

तितक्यात अचानक सृष्टी आली आणि त्याला बिलगून हळूच म्हणाली, ‘‘आय लव यू डिअर, हॅप्पी हॅप्पी दिवाली.’’

तितक्यात दोघांवरही फुलांची बरसात होऊ लागली. पूर्ण खोलीत रंगबेरंगी मेणबत्ती जळू लागल्या आणि मनमोहक संगुधाने वातावरण भरून गेले. समोर खूपच आकर्षक आणि सांजश्रृंगार केलेली सृष्टी उभी राहून हसत होती. मनीषने पटकन् तिला उचलून कवेत घेतले. सर्व घर व्यवस्थित सजवलेले होते. टेबलावर खूप मिठाया आणि फायरक्रॅकर्स ठेवले होते. सृष्टी हळूच हसत होती.

दोघांनी १-२ तास आतषबाजीची मजा लुटली. तोपर्यंत मनीषचे आईवडिल, भाऊवहिनी आणि त्यांची मुलेही आली. सृष्टीने सर्वांना आधीच आमंत्रित केले होते. पूर्ण कुटुंबाने एकत्रित दिवाळी साजरी केली. मनीष आणि सृष्टीसाठी ही दिवाळी आयुष्यभारासाठी संस्मरणीय ठरली होती.

मनंही प्रकाशाने उजळू दे

याला म्हणतात दिवाळीचा आनंद ज्यामुळे घरासोबतच मनंही उजळून निघतात. लग्नानंतरच्या दिवाळीचं विशेष महत्त्व असते. जर हा दिवस भांडणं, वादावादी किंवा तणावात घालवलात तर समजा तुम्ही मौल्यवान क्षण वाया घालवले. आयुष्य आनंद साजरे करण्याचेच नाव आहे, तर मग दिवाळीसारख्या विविधरंगी आणि प्रकाशाच्या क्षणाने आपले तनमन का बरे उजळू नये?

लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी पहिली दिवाळी साजरी करते तेव्हा तिला होम सिकनेस आणि तिच्या घरच्यांची कमतरता जाणवते. असे होणे स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असा नाही की दिवाळीसारखा क्षण वाया घालवावा. त्यापेक्षा नवे वातावरण, नवी माणसे यांच्यासोबत प्रेमाने दिवाळी साजरी करावी. ती ही इतकी आनंदात की येणारा काळही नवीन आनंदाने उजळून निघेल.

सासूसासऱ्यांसोबत खरेदी करावी

हे प्रसंग अविस्मरणीय बनवायचे असतील तर तुमची सासू किंवा नणंदेसोबत खरेदी करावी. सर्व कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी कराव्यात. कोणासाठी काय खरेदी करायचे याची यादी बनवावी. याकामी सासूची मदत घेऊ शकता. तुम्हांला सर्वांची आवडनिवड सांगू शकतात. सर्व भेटवस्तू आकर्षकपणे रॅप कराव्यात आणि सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. भेटवस्तूशिवाय मिठाया, चॉकलेट्स, फायरक्रॅकर्स आणि सजावटीच्या शोभेच्या सामानाचीही खरेदी करावी.

उजळू द्या घरातील कोपरा न् कोपरा

दिवाळी प्रकाशाचा सण आहे. म्हणून पूर्ण घर दिवे मेणबत्त्या आणि इतर डिझायनर बल्बने सजवावे. लाइट अॅरेजमेंट अशी करावी की तुमचे घर वेगळेच झगमगताना दिसेल.

घरी बनवा मिठाई

ही एक जुनी व अगदी समर्पक अशी म्हण आहे की कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचायचे असेल तर तो मार्ग त्यांच्या पोटातून जातो. लग्नानंतर तुमच्या सासरच्या मंडळींच्या व पतीच्या हृदयापर्यंत याच मार्गाने जाऊ शकाल. यासाठी तुम्हाला पाककुशल व्हावे लागेल. चविष्ट सणाचे जेवण आणि रूचकर मिठाया बनवाव्या लागतील. जास्त माहिती नसेल तर आई किंवा सासूकडून माहिती घ्यायला घाबरू नका. मासिकांमध्येही अनेक प्रकारच्या रेसिपी प्रकाशित होत असतात.

दिवाळी पार्टी

तुमची पहिली दिवाळी अविस्मरणीय बनवण्यासाठी आजूबाजूचे लोक व नातेवाईंकांना समजून घेण्याची आणि नाती जपण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. घरात दिवाळी पार्टीचे आयोजन करा आणि लोकांना बोलावून धमाल मजामस्ती करा.

विभक्त कुटुंब

जर तुम्ही लग्नानंतर काही कारणास्तव सासरच्यांपासून वेगळे राहत असाल तर तुमची आव्हाने काही वेगळी असतील. तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवे की तुम्हाला ज्याप्रमाणे होमसिकेनस जाणवतो, त्याप्रमाणे तुमच्या पतिलाही जाणवत असणार. अशात तुम्ही तुमच्या पतिला विशेष महत्त्व द्या आणि त्यांच्यासाठी विशेष सरप्राइज तयार करा.

या संदर्भात तुम्ही तुमच्या आईला विचारू शकता की तिने काय विशेष केले होते. दिवाळी साजरी करताना तुमच्या सासूला फोन करून सांगा की तुम्ही काय सरप्राईज तयार केले आहे. त्यांना सांगा की तुमच्यापेक्षा त्या पतिला अधिकिने ओळखतात. म्हणून त्यांनी तुमची मदत करावी. तुमच्या सासूला हे जाणून आनंद होईल की तुम्ही त्यांच्या मुलाच्या जीवनात त्यांचे विशेष स्थान असण्याला दुजोरा देत आहात. महत्त्व देत आहात. त्या तुमची मदत करतील. आंनदी होतील.

आपल्या पतिसाठी काही विशेष भेटवस्तू खरेदी करा. एखादे गॅद्ब्रोट किंवा नवा डे्स किंवा तुमच्या बजेटनुसार अन्य काही खरेदी करा. त्यांच्या आवडीच्या मिठाया, आवडते पदार्थ बनवा. त्यांच्यासाठी छान शृंगार करा. रात्री घराचा कोपरा न् रोपरा उजळून टाका.

हल्लीच्या काळात स्काईप व फेसबुकच्या माध्यमातून हा खास क्षण तुम्ही संस्मरणीय बनवू शकता व हे क्षण इतरांशी शेअरही करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें