जिराफः संरक्षण की अत्याचार

* मेनका गांधी

१९९०मध्ये कोलकाताच्या प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयात एका मादी जिराफाला आफ्रिकेतून मागवण्यात आले होते. मादी जिराफ प्रत्यक्षात खूपच सुंदर होती. तिचं नाव एका तिस्ता नावाच्या नदीवरून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी जेव्हा हरकत घेतली गेली की अलीपूर प्राणिसंग्रहालय खूप छोटे आहे, त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयाला मोकळ्या जागेत नेलं जाईल, जिथे तिस्ता मोकळेपणाने फिरू शकेल. तो दिवस अजूनपर्यंत उगवला नाहीए. तिस्ताही वाचली नाही आणि ४००० इतर प्राणीही अकाली मृत्यूचे शिकार झाले.

कोलकाता प्राणिसंग्रहालयाने जिराफांना एका ट्रकमधून ओडिशाच्या नंदनकानन प्राणिसंग्रहालयात पाठविलं होतं, पण वाटेत लागलेल्या खराब रस्त्यांच्या धक्क्यांमुळे तिस्ताची कातडी सोलवटली आणि डोकं एका विजेच्या वायरीला लागलं. त्यामुळे करंट लागून तिचा मृत्यू झाला.

मोजकेच राहिलेत जिराफ

जगाला वाघ, हत्ती आणि चिंपांजींची काळजी आहे, पण लुप्तप्राय होणाऱ्या जिराफांची कोणी काळजी करत नाहीए. गेल्या १५ वर्षांत त्यांची संख्या ४० टक्के घटली आहे आणि आता जगभरात केवळ ८०,००० जिराफ राहिले आहेत.

यातील मुख्य दोषींमध्ये अमेरिकाही आहे, जी त्यांना धोकादायक स्थितीत पोहोचलेल्या प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करायला तयार नाहीए, अमेरिकी पर्यटक जिराफांच्या हाडांपासून बनलेल्या सजावटी वस्तू आवडीने खरेदी करतात. अमेरिकी शान मिरवण्यासाठी रोज सरासरी १ जिराफ मारले जाते. अजून चीनींना याची नशा चढलेली नाही. ज्या दिवशी त्यांच्यावर जिराफांपासून बनलेल्या वस्तू खरेदी करण्याची नशा चढेल, ते आपल्या मनी पॉवरने सर्व जिराफांना एका महिन्यात मारून तुकडे करून चीनमध्ये मागवतील. जिराफांची संख्या आता हत्तींपेक्षा कमी आहे.

जिराफ जगातील सर्वात उंच प्राणी आहे. त्यांचे पाय साधारण उंच माणसापेक्षाही जास्त उंच असतात. ते आफ्रिकेतील ओसाड व कोरड्या भागात चरताना दिसून येतात. ते खूप वेगाने धावू शकतात – प्रतितास ३५ मिलोमीटर वेगाने, पण हा वेग बंदुकीच्या गोळीपेक्षा खूप कमी आहे.

सहजपणे शिकार

जिराफांची मान उंच असते, त्यामुळे जमिनीवरील गवत तर खाऊ शकत नाहीत, पण झाडांची पाने खाऊ शकतात. जवळपास ४५ किलो दिवसातून दोनदा.

अर्थात, ते उंच असतात, त्यांची इच्छा असली, तरी ते वाघांप्रमाणे लपू शकत नाहीत आणि प्राणी, चोर सहजपणे त्यांची शिकार करू शकतात.

तसेही जिराफ समूहाने राहणारा प्राणी आहे. तो पिल्लं आणि मादींसह राहतो. त्यांचे सरासरी वय ४० वर्षे असते. जसे ते मोठे आणि वृध्द होतात, त्यांच्यावरील डाग गडद होतात. जिराफ मादी उभी राहूनच पिल्लांना जन्म देते. पिल्लू जवळपास ६ फुटांचे असते. ते अर्ध्या तासात आपल्या पायावर चालू लागते. एक मादी ५ पिल्लांपर्यंत जन्माला घालू शकते, पण अर्धीच वाचतात.

कधी काळी ते आफ्रिकेतील खूप मोठ्या भागात राहात होते, पण आता छोट्या भागात राहिले आहेत आणि त्यांचे समूह २०हून घटून ६-७चा राहिले आहेत.

धर्मावर होते पैशांची उधळपट्टी

* मोनिका अग्रवाल

राधेराधे… राधेराधे… राधेराधे… जय श्रीराम… जय श्रीराम… जय श्रीराम… रमाकांत पूर्ण श्रद्धेसह भक्तीत लीन झाले होते. सोबत घरातली मंडळी घंटा वाजवत होती. या आवाजामुळे मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तो सतत जाऊन आईला सांगत होता, ‘‘आई, कृपा करून बाबांना सांग की, सर्वांना थोडया हळू आवाजात पूजा करायला लावा. उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे आणि आवाजामुळे मी नीट अभ्यास करू शकत नाही.’’

त्याचे बोलणे रमाकांत यांनी ऐकले आणि रागाने म्हणाले, ‘‘ही काय अभ्यासाची वेळ आहे? उद्या परीक्षा असेल तर तुला आज देवासमोर नतमस्तक होऊन बसायला हवे.’’

बोला जय सीताराम… जय जय सीताराम… असे म्हणत ते बायकोवरच रागावले. अक्कल नाही का तुला? इथे महाराज पूजा करत आहेत आणि तू मुलामध्ये वेळ का घालवतेस? मूर्ख बाई… जा, सर्वांसाठी गरमागरम दूध आण. बिचारी, ‘हो’ असे म्हणत आत गेली.

प्रसाद तयार झाला का? महाराजांच्या सेवेत काही कमतरता नको. जितकी मनोभावे सेवा करशील तितकाच मेवा मिळेल… आपले अहोभाग्य म्हणून महाराज आपल्या घरी आलेत… किती जणांनी त्यांना आमंत्रण दिले असेल…  पण ते मात्र आपल्याकडेच आले. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळेच, असे अधूनमधून सासू मोठयाने बोलत होती.

महाराजांच्या सेवेत संपूर्ण दिवस आणि अर्धी रात्र निघून जायची. झोपायला कसेबसे २ तास मिळायचे, मात्र तितक्यातच ४ वाजायचे आणि सासू आवाज द्यायची की, महाराजांच्या अंघोळीची वेळ झाली… तयारी केलीस का…? ६ वाजता त्यांना फेरफटका मारायला जायचे असेल… लक्षात आहे ना तुझ्या? सर्वात आधी उठून अंघोळ कर.

असे दरवर्षी व्हायचे. या घरी आली आल्यापासून हेच बघत आली होती. एखाद्या गरीब, गरजूने विनवणी करूनही त्याला घरातले कोणी साधे १० रुपये देत नसत, पण महाराज, बाबा-बुवांवर लाखो रुपये खर्च केले जात, याचे तिला दु:ख व्हायचे. ती लग्न करून आली तेव्हा सुरुवातीला फक्त एकच महाराज येत असत. तेही फक्त २ किंवा ३ तासांसाठी, पण हळूहळू नवऱ्याचा बाबा-बुवा, महाराजांवरील विश्वास वाढला. त्यातच उत्पन्नही वाढले आणि एका महाराजासोबत आणखी दोघे येऊ लागले. आता तर महाराज त्यांची पत्नी आणि सोबत ११ माणसांना घेऊन येतात. एकाचा पाहुणचार करणे सोपे होते, आता एवढ्या सर्वांची उठबस करावी लागते. त्यातच शेजारी, नातेवाईक महाराजांना भेटायला येतात आणि काम करणारी ती फक्त एकटीच असते.

नुकतीच घडलेली गोष्ट आहे जेव्हा शेजाऱ्यांकडे साक्षी गोपाळ महाराज आले होते. कितीतरी दिवस सकाळ-संध्याकाळी त्यांचे प्रवचन आणि पहाटेच्या प्रभात फेरीमुळे शेजाऱ्यांकडे वेळच उरला नव्हता. त्यांना व्यवसाय वाढवायचा होता आणि त्यासाठीच महाराजांची सेवा करायची होती.

ही कसली अंधश्रद्धा?

विश्वास किंवा श्रद्धा त्यांच्या स्थानी असते, पण अंधविश्वास हा आकलनापलीकडचा विषय आहे. हा कसला अंधविश्वास जो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे दु:ख समजू देत नाही? लहानसहान गोष्टींसाठी बाबाबुवा, महाराजांकडे धाव घेणारे लोक पाहून माझे रक्त उसळते.

जसजशी आपण जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तशी लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढत आहे. संपूर्ण जगात अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतीय आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ज्या देशाने उपग्रहासारखे वैज्ञानिक शोध लावले तोच आधुनिक भारत अंधश्रद्धेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दान कशासाठी?

अनेकदा, नुकसानाच्या भीतीने, पुण्य कमावण्यासाठी किंवा नवस करताना अथवा तो पूर्ण झाल्याच्या मोबदल्यात दान दिले जाते. काही वेळा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वायफळ उपाय सांगितले जातात. दानाचे विविध प्रकार असतात. धर्मगुरू, धार्मिक संस्था अशाच प्रकारचे दान गोळा करतात. राजकीय पक्ष निधीसाठी ज्या प्रकारे देणग्या गोळा करतात अगदी त्याच पद्धतीने हे दान गोळा केले जाते.

प्रत्यक्षात भक्त किंवा श्रद्धाळू भलेही गरीब किंवा कफल्लक असतील, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्मकांडाच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जातातच. प्रायश्चित्त करणे, ग्रहदशा सुधारणे, दुर्भाग्य दूर करणे, अशा अनेक समस्या सोडवण्याच्या नावाखाली मोठी दक्षिणा उकळली जाते, पण ज्या धर्माला पुढे करून देवाच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात त्याच देवाला किंवा धर्माला पुजारी, महाराज का घाबरत नाहीत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

दिखाऊपणाचा फायदा कोणाला?

उदाहरण : एक निर्यातदार आहेत ज्यांना सर्व प्रकारचे छंद आहेत. तरीही वर्षातून दोनदा ते श्रीकृष्णाच्या वृंदावनात जाऊन भंडारा घालतात. कमाईतील एक भाग देवाला दिल्यामुळे जीवनात कुठलीच अडचण येणार नाही आणि दान केल्यामुळे नावलौकिकही होईल, असे त्यांना वाटते. त्यांच्या घरातील महिलाही सतत पूजा करतात.

मंदिराशिवाय घरातही लोक देवाच्या बऱ्याच मूर्ती ठेवतात आणि त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा करतात. महाराजांना प्रवचनासाठी घरी बोलावणे ही अभिमानाची बाब मानली जाते.

गरिबांना संपत्तीची तर श्रीमंतांना प्रसिद्धीची हाव असते. त्यामुळे मंदिरात दगड ठेवले जातात किंवा घरात महाराजांना बोलावले जाते. आता दानधर्मही दिखाऊपणाचे झाले आहे. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी लोक दानधर्म करतात किंवा घरी महाराजांना बोलावले जाते. असेही लोक आहेत जे भरपूर काळा पैसा कमावतात, परंतु पापाला घाबरतात, म्हणून ते सढळ हस्ते दान करतात, जेणेकरून त्यांना भरपूर पुण्य मिळेल. खोटा अभिमान असो किंवा ढोंगीपणा, पण असे अंधश्रद्ध वागणे चुकीचेच आहे.

सुशिक्षितही जबाबदार

भोंदूबाबांची दुकाने सुरू असतील, तर त्यामागचे एक कारण म्हणजे सुशिक्षित लोकही या सापळयात अडकून भरपूर पैसा खर्च करतात. बॉलीवूडही यापासून दूर राहिलेले नाही. कोणतेही दुकान ग्राहक गेल्यावरच चालते. हे पुजाऱ्यांचे दुकान आहे. त्याची भरभराट होत असेल तर यात जितका हात गरिबांचा आहे, तितकाच श्रीमंतांचाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, ज्या धर्माच्या, देवाच्या नावाखाली लोक महाराज, पुजाऱ्यांकडे जातात त्याच देवाच्या घरी काम करणाऱ्यांच्या मनात चुकीचे काम करण्याची इच्छा का आणि कशी निर्माण होते?

चुकीच्या मागण्या

उदाहरण : एका जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल होत नव्हते. यासाठी ते अनेकदा एका भोंदू बाबांकडे जात होते. एके दिवश त्या बाबाने संधीचा फायदा घेऊन सांगितले की, तुझ्या पत्नीला रात्री माझ्याकडे पाठव. नवऱ्याची या बाबावर एवढी आंधळी भक्ती होती की, त्याने स्वत:च पत्नीला बाबाच्या स्वाधीन केले. त्या बाबाने रात्रभर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुशिक्षित लोक आणि नेत्यांसमोर धर्माचे गुणगान गाणारे हे बाबा, महाराज किंवा तांत्रिक जेव्हा एखादी आक्षेपार्ह मागणी करतात, तेव्हा ते त्यांच्या कानाखाली मारायचे सोडून त्यांची अवैध मागणी पूर्ण करतात.

उदाहरण

उत्तर प्रदेशातील एक बाबा असा दावा करायचा की, तो संधिवात बरा करू शकतो. त्यासाठी तो रुग्णाचे रक्त काढून तांब्याच्या भांडयात टाकायचा आणि नंतर रुग्णाला द्यायचा. एका डॉक्टरची सख्खी बहीण ही डॉक्टर भावाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून या बाबाकडे उपचारासाठी गेली. त्यानंतर खूप आजारी पडली, कारण तिची हिमोग्लोबिन पातळी २ (सामान्य १५ किंवा १२) झाली. अशी उदाहरणे आपल्याला रोजच पाहायला मिळतात. अनेक डॉक्टर आणि परिचारिकांनी तिचा जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिच्या उपचारांसाठी कुटुंबाला ५ लाख रुपये खर्च करावे लागले. प्रत्यक्षात या आजारावर नित्यनियमाने उपचार केल्यास महिन्याला केवळ एक हजार रुपये खर्च येतो.

जून महिन्यात प्राइड परेड का साजरी करायची, चला जाणून घेऊया त्याचा संपूर्ण इतिहास

* सोनाली ठाकूर

जून महिना जगभरात ‘प्राइड मंथ’ म्हणून साजरा केला जातो, विशेषत: लॅटिन-अमेरिकन देशांमध्ये. जून महिन्याला काही खास समुदायांकडून प्राइड परेड मंथ म्हणतात. दरवर्षी जगभरातील LGBTQ समुदाय आणि त्याला पाठिंबा देणारे लोक मोठ्या उत्साहाने तो साजरा करतात. प्रात्यक्षिक दरम्यान, हे लोक त्यांच्या हातात एक ध्वज घेऊन जातात ज्याला इंद्रधनुष म्हणतात.

गर्व महिना का साजरा केला जातो?

28 जून 1969 रोजी अमेरिकेतील मॅनहॅटन येथील स्टोन वॉलमधील LGBTQ समुदायाच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला होता, हा छापा समलिंगी समुदायाच्या लोकांच्या सततच्या निदर्शने आणि धरणे यांच्या निषेधार्थ टाकण्यात आला होता. या छाप्यादरम्यान पोलिस आणि तेथे उपस्थित लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी लोकांना अटक करण्यास सुरुवात केल्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर या समाजाच्या लोकांनी बंडखोरी सुरू केली आणि हा संघर्ष सलग तीन दिवस चालला. या लढ्याने केवळ अमेरिकेतच समलिंगी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली नाही, तर अनेक देशांमध्ये चळवळही सुरू झाली. यानंतर या समाजातील लोकांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आणि त्यांच्या ओळखीचा अभिमान बाळगण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात शांततेत प्राईड परेड काढण्याचा निर्णय घेतला.

प्राईड महिन्यात लाखो लोकांची परेड निघते

हा महिना LGBTQ समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थही दिसतो. राजकीयदृष्ट्या LGBTQ समुदायाबद्दल सकारात्मक छाप पाडण्यासाठीदेखील या महिन्याचा वापर केला जातो. महिनाभर हे लोक शहरात ठिकठिकाणी परेड काढतात. या समाजाला आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी अनेक संघटनाही त्यांच्या परेडमध्ये सहभागी होतात.

अमेरिकेत प्राइड मंथ कधी ओळखला गेला?

बिल क्लिंटन हे 2000 साली अधिकृतपणे प्राइड मंथ ओळखणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. बराक ओबामा जेव्हा 2009 ते 2016 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी जून महिन्यात LGBTQ लोकांसाठी प्राईड मंथ घोषित केला होता. मे 2019 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्विटद्वारे प्राइड मंथ ओळखला. त्यांच्या प्रशासनाने LGBTQ ला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी जागतिक मोहीम सुरू केल्याची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही अधिकृतरीत्या ‘प्राइड मंथ’ घोषित केला आहे. न्यूयॉर्क प्राइड परेड ही सर्वात मोठी आणि प्रसिद्ध परेड आहे.

अभिमान परेडचा ध्वज काय आहे

प्राइड परेडचा ध्वज 1978 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरातील कलाकार गिल्बर्ट बेकर यांनी डिझाइन केला होता. बेकरने बनवलेल्या ध्वजात 8 रंग होते – गुलाबी, लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि व्हायलेट, परंतु पुढच्याच वर्षीपासून हा ध्वज लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा अशा सहा रंगांमध्ये बदलण्यात आला. आणि वायलेट रंग आहेत. हे लोक इंद्रधनुष्य मानतात आणि परेडमध्ये समाविष्ट करतात. या महिनाभर चालणाऱ्या परेडमध्ये कार्यशाळा, मैफिली आणि इतर अनेक कार्यक्रमांचा समावेश होतो, जे सर्वत्र लोकांना आकर्षित करतात. या समाजातील लोक त्यांच्या उत्सवात सामील होण्यासाठी वेशभूषा, मेकअपसह तयार होतात.

प्राइड परेड हे नाव कोणी दिले?

1970 मध्ये समलिंगी हक्क कार्यकर्ते एल. क्रेग शूनमेकर यांनी या चळवळीला ‘प्राइड’ म्हणण्याचा सल्ला दिला होता. एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला, तो म्हणाला की याच्याशी संबंधित लोक आतून संघर्ष करत होते आणि त्यांना स्वतःला समलिंगी असल्याचे सिद्ध करून अभिमान कसा बाळगावा हे समजत नाही.

भारतात LGBTQ चे कायदेशीर अधिकार काय आहेत?

समलैंगिकता हा भारतातील कलम ३७७ अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीखाली होता, परंतु २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेवरील कलम ३७७ ला मान्यता दिली. या ऐतिहासिक निर्णयानंतर भारतात LGBTQ ला संबंध ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला. हा आनंदाचा प्रसंग साजरा करण्यासाठी, LGBTQ समुदायाच्या लोकांनी देशभरात मुक्त नागरिक म्हणून मोर्चा काढला.

भारतातील LGBTQ समुदायाच्या लोकांना अजूनही लग्न करण्याचा आणि मुले दत्तक घेण्याचा अधिकार नसला तरी ऑस्ट्रेलिया, माल्टा, जर्मनी, फिनलंड, कोलंबिया, आयर्लंड, अमेरिका, ग्रीनलँड, स्कॉटलंड यासह 26 देशांमध्ये LGBTQ समुदायाच्या लोकांना परवानगी आहे. लग्न करा आणि मुले दत्तक घ्या. मुलांना दत्तक घेण्याचा अधिकार आहे.

भारतात प्राइड परेड कधी सुरू झाली आणि त्याचा इतिहास?

भारतातील पहिली प्राइड परेड 02 जुलै 1999 रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्याला कोलकाता रेनबो प्राइड वॉक असे नाव देण्यात आले. सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोलकाता येथील या परेडमध्ये केवळ 15 लोक सहभागी झाले होते, ज्यामध्ये एकही महिला नव्हती. यानंतर येत्या काही वर्षांत देशातील अनेक राज्यांमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे.

2008 मध्ये, दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रथमच, LGBTQ समुदायाच्या लोकांनी प्राइड परेडचे आयोजन केले होते. दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी दिल्लीत या समुदायातर्फे प्राइड परेड आयोजित केली जाते.

आधुनिकतेच्या मापदंडावर डबडबणारे दारूचे पेले

 रितु वर्मा

आज भूमीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि तिने पती कार्तिकच्या आग्रहाखातीर प्रथमच बिअरचा स्वाद घेतला. आता कधीकधी कार्तिकला सोबत देण्यासाठी ती ही सेवन करते आणि एक दिवस जेव्हा कार्तिक कुठेतरी घराबाहेर पडला, त्यावेळी भूमीने आपल्या मैत्रिणींसह पार्टी केली, परंतु त्यानंतर भूमी स्वत:ला रोखू शकली नाही आणि येत्या दिवसांत अशा मद्यपान पार्ट्या तिच्याकडे आयोजित होऊ लागल्या. भूमी आणि कार्तिक आपल्या या छंदाला उच्चवर्गीय समाजात उठण्या-बसण्यासाठी एक अत्यावश्यक भाग मानतात. ही वेगळी बाब आहे की, अत्यंत अल्कोहोल घेतल्यामुळे लहान वयातच कार्तिक उच्च रक्तदाबाचा बळी ठरला आहे, तर भूमीच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे आणि ती आई होऊ शकत नाही आहे.

आज राजेश खन्नाजी मोठया अस्वस्थतेने शतपावली करत होते, त्यांची मुलगी तन्वी अद्याप घरी परतली नव्हती. दाराची बेल वाजली आणि दारूच्या नशेत डोलणारी तन्वी दारात उभी होती, राजेशजींची तर भीतीने गाळण उडाली, त्यांना कळत नव्हते की त्यांच्या संगोपनात काय चूक झाली. दुसऱ्याच दिवशी जेव्हा तन्वीचे कोर्ट मार्शल झाले तेव्हा तन्वी तिच्या वडिलांना म्हणाली, ‘‘पापा, हे सर्व ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये चालते आणि तसे रोशन बंधूही तर मद्यपान करतातच ना.’’

राजेशजी रागाने म्हणाले, ‘‘जर त्याने विहिरीत उडी मारली तर तूही उडी घेशील; जर मुलांची बरोबरी करायचीच असेल तर मुली, चांगल्या सवयींची कर.’’

आजच्या धावपळीच्या जीवनात, सर्व लोक अत्यंत ताण-तणावाखाली आहेत, परंतु जेथे पूर्वी पुरुषच ताणतणावाशी लढण्यासाठी मद्यपान करत असत, तेथे आता स्त्रियादेखील पुरुषांसमवेत या मोर्चावर खंबीरपणे उभ्या आहेत. असं का न व्हावं शेवटी हे एकविसावे शतक आहे. महिला आणि पुरुष प्रत्येक कामात समान भागीदार आहेत. जेव्हापासून बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कॉलसेन्टरचा पूर भारतात आला आहे तेव्हापासून अल्कोहोल आणि सिगारेटच्या सेवनामध्येही आश्चर्यकारक वाढ झाली आहे. येथील कामकाजाचा कालावधी, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि कधीच न संपणाऱ्या कामांमुळे इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव व्याप्त असतो. त्याचे निवारण ते प्रामुख्याने अल्कोहोलच्या सेवनाने करतात.

विभक्त कुटुंबात वाढते व्यसन

पूर्वीच्या आयुष्यात तणाव नव्हता असे नाही, परंतु पूर्वी आम्ही कुटुंबियांसमवेत संध्याकाळी बसून आपले सुख-दु:ख सामायिक करायचो. मात्र आता विभक्त कुटुंबांच्या प्रथेमुळे ही भूमिका अल्कोहोलने घेतली आहे.

अखिल आणि प्रज्ञा मुंबईत राहतात. त्यांच्या घरात ना पैशांची कमतरता आहे आणि ना आधुनिक संस्कारांची. ते दोघेही आपल्या मुलीसमोर बसतात आणि मुलगी कायरावर काय परिणाम होईल याचा विचार न करता ते स्वत: मद्यपान करतात. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याच्या बाटलीत दारू बाळगल्यामुळे कायराला एक दिवस शाळेतून निलंबित करण्यात आले. त्यांना स्वत:ला समजत नव्हते की आपल्या मुलीला काय समजवावे. सध्या दोघेही मुलीच्या सामोरे जाणे टाळत आहेत आणि एकमेकांना दोष देत आहेत.

टपट युग

आजकालचा काळ हा झटपट मिळविण्याचा आहे. सर्व काही हवे आहे परंतु फार लवकर आणि कठोर परिश्रम न करता. जर तणाव असेल तर त्याशी लढण्यासाठी सर्वात सोपा पर्याय वाटतो तो म्हणजे मद्यपान करणे. याचे दोन फायदे आहेत: पहिला आपण थोडया काळासाठी का होईना तणावमुक्त रहाल आणि दुसरा म्हणजे आपल्याला मॉडर्नदेखील म्हटले जाईल.

त्याचवेळी जेव्हा घरातील वडीलधाऱ्यांना मुलांच्या या सवयीबद्दल कळते तेव्हा काही शेरेबाजी करूनच ते आपल्या कर्तव्याची समाप्ती करतात.

‘‘कसे युग आले आहे, पुरुषांची तर गोष्ट सोडा, आजकाल महिलादेखील मद्यपान करतात.’’

गीतिका ही २८ वर्षांची मुलगी असून ती आधुनिक कार्यालयात काम करते. याबद्दल मी तिच्याशी बोलले तेव्हा ती म्हणाली, ‘‘ताई, आजकाल ऑफिस पार्टयांमध्ये दारू पिणे ही एक अनिवार्य गोष्ट बनली आहे. नोकरी तर करायचीच आहे ना तर मग मद्यपान कसे टाळावे.’’

मला या लेखाद्वारे अल्कोहोल किंवा सिगारेटला उत्तेजन देण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु मला तुमच्या सर्वांचे लक्ष समाजातील बदलत्या मापदंडाकडे आकर्षित करायचे आहे.

चला आता काही कारणांवर प्रकाश टाकूया, ज्यामुळे आजकाल महिलांमध्ये मद्यपान करण्याची सवय वाढत आहे.

फॅशन स्टेटमेंट : आजकाल मद्य किंवा सिगारेटचे सेवनदेखील फॅशन स्टेटमेंट बनले आहे. जर तुम्ही मद्यपान न केल्यास तुम्ही बाबा आदमच्या काळातील आहात. जर आपल्याला आज कालच्या रीतीभाती माहित नसतील तर आपण आपल्या कारकीर्दीत कशी प्रगती कराल?

समानतेची इच्छा : आजकाल स्त्रिया आयुष्याच्या प्रत्येक आघाडयांवर पुरुषांसह खांद्याला खांदा लावून चालत आहेत. जर पुरुषवर्ग दारू पित असेल, तर मग आजची आधुनिक, श्रृंगारप्रिय स्त्री मागे कशी राहिल. बहुतेक स्त्रिया सर्व काही माहित असूनही केवळ समानतेच्या इच्छेने या मार्गाकडे वळतात.

तणावापासून दिलासा : एकीकडे करिअरचा दबाव, दुसरीकडे वृद्ध आई-वडिल, वाढत्या मुलांच्या गरजा, कधीच न संपणारे काम या सर्व गोष्टींपासून दिलासा मिळविण्यासाठीदेखील आजकाल स्त्रिया दारूच्या आहारी गेल्या आहेत. थोडया काळासाठी का होईना तिला असं वाटतं की ती एका वेगळया जगात गेली आहे.

स्वीकार होण्याची इच्छा : आजकाल बहुतेक मुली नोकरीमुळे आपले घर सोडतात आणि महानगरांमध्ये एकटयाच राहतात. नवीन ठिकाण, नवीन मित्र आणि त्या मित्रांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी इच्छा नसतानाही त्या मद्यपान करू लागतात. नवीन नातेसंबंध तयार होतात तेव्हा उत्सवांमध्ये मद्यपान केले जाते आणि नंतर जेव्हा संबंध तुटतात तेव्हा मग दु:ख कमी करण्यासाठी अल्कोहोलचे सेवन केले जाते.

मद्यपान केल्याने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांशी आपण सर्वजण चांगलेच परिचित आहोत. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनावर आपण दृष्टी टाकल्यास असे आढळते की पुरुषांपेक्षा महिलांच्या आरोग्यावर अल्कोहोलचा अधिक दुष्परिणाम होतो.

* अल्कोहोल पचवण्यासाठी यकृतमधून एक एंझइम सोडले जाते, जे अल्कोहोल पचायला मदत करते. स्त्रियांमध्ये हे एंझइम कमी सोडले जाते, ज्यामुळे त्यांच्या यकृताला पुरुषांच्या तुलनेत अधिक परिश्रम करावे लागतात.

* महिलांची शरीर रचना पुरुषांपेक्षा वेगळी आहे, म्हणून त्यांच्या आरोग्यावर अल्कोहोलचे दुष्परिणाम जलद आणि दीर्घकाळपर्यंत होतात.

* अल्कोहोलचे सेवन केल्याने स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो आणि जर स्त्रिया गरोदरपणात मद्यपान करत असतील तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावरही होतो.

घरातील प्रमुख किंवा वडील म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अस्वस्थ असाल तर तुम्ही त्यांना अवश्य समजावून सांगा, तसेच मद्यपान केल्याने होणाऱ्या नुकसानीबद्दलदेखील सांगा परंतु मुलगा, मुलगी किंवा सून सर्वांना एक समानच सल्ला द्या.

हे अवश्य लक्षात ठेवा, जी स्त्री दुर्बल आहे तीच प्रतिकूल परिस्थितीत दारूच्या वाटेवर घसरते. कोणत्याही प्रकारच्या नशेची आवश्यकता तेव्हाच पडते जर आपल्यात धाडसाची ठिणगी नसेल.

धुंद असेल जेव्हा आपणास धाडसाच्या उड्डाणाचे

तर मग काय कराल आपण मद्याच्या पेल्याचे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें