धर्मच आहे स्त्रियांसोबतच्या हिंसेचं कारण

* नसीम अन्सारी कोचर

आम्ही कधी असे पाहिले आहे का की कबुत्तर आणि कबुतरीण आपसात भांडत आहेत किंवा हत्ती आपल्या हत्तीणीला जिवानिशी मारतो वा मोर आणि लांडोरशी भांडला वा सिंह आपल्या सिहिणींशी भांडला नाही, तुम्ही हे कधी पाहिले अथवा ऐकले नसेल, कारण निसर्गाच्या या जातीचे काम एकमेकांना प्रेम देणे हे आहे, सोबत राहणे आणि त्या बदल्यात संतती निर्माण करणे. लाखो वर्षांपासून पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी निसर्गाच्या या नियमाचे पालन करत आपले जीवचक्र पूर्ण करत आहे. या पृथ्वीवर केवळ आपण मानवच आहोत जो निसर्गाच्या या नियमाला उध्वस्त करतो, आपल्या माद्यांना मारहाण करत आणि त्यांच्या सगळया जीवनाचे शोषण करत आहोत.

खाजगी संघटना सहज आणि समान मेजर्स २०३० द्वारे महिलांवर केलेले एक सर्वेक्षण भारताच्या आधुनिक आणि विकसित चेहऱ्यावर दिलेली सणसणीत चपराक आहे. वडोदराच्या या २ संस्थांना आपल्या सर्वेक्षणात आढळले की भारतात जवळपास १/३ विवाहित स्त्रियांना पतिच्या हातून मारहाण केली जाते, पण यात बहुतांश स्त्रियांना याबाबत काही तक्रार नाहीए. त्या हे आपले नशीब मानतात.

लज्जास्पद हे आहे की १५-४९ या वयातील महिलांमध्ये २७ टक्के महिला १५ वर्षापासूनच ही घरगुती हिंसा सहन करत आहेत. माहेरी वडील आणि भावाच्या हातून आणि सासरी पतिच्या हातचा मार खात आहेत.

अलीकडेच ‘मीटू’ आंदोलनामुळे शिकल्यासवरलेल्या, उच्च पदावर काम करणाऱ्या आणि आधुनिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांची विवशता, त्रास आणि दुर्दशा यांचं नग्न सत्य समोर ठेवलं आहे, हे पाहता अंदाज येतो की या देशाच्या कमी शिकलेल्या, आर्थिक दृष्ट्या कमजोर, विवश, खेडयापाडयात राहणाऱ्या स्त्रिया पुरुष जातीकडून कशाप्रकारे अपमान, हिंसा, छळ आणि शोषण यांचा सामना करत आहेत.

स्त्रीसोबतच हिंसा का

अखेरीस हिंसेच्या भक्ष्यस्थानी स्त्रीच का असते. तिच का मार खाते. तिचेच का शारीरिक शोषण होते? स्त्रियांना मारहाण करून आपल्या नियंत्रणात ठेवण्याची कसरत शेवटी या धरेवर केव्हा आणि कशी सुरु झाली? माणसाशिवाय आणखी कोणते सजीव आहेत, जे आपल्या माद्यांना मारहाण करतात किंवा त्यांचे शोषण करतात?

या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला इतर प्राण्यांच्या वर्तनाच्या आणि मानवजाती हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाला पडताळून पहावे लागेल. याशिवाय निसर्गाच्या नियमांनासुद्धा समजून घ्यावे लागेल.

पृथ्वीवर प्रामुख्याने दोनच जाती आहेत, नर आणि मादी. या शिवाय तिसरी जात आहे संकर. माणसाच्या भाषेत सांगायचे तर या जातिला म्हणतात, हिजडा वा किन्नर म्हणजे ज्याच्यात नर आणि मादी दोघांचेही गुण आढळतात. इतर दोन्ही जातींच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी आहे. नर अथवा मादी यांच्यापैकी एक जरी या धरेवर संपला तरी सृष्टी नष्ट होईल. म्हणजे दोघेही जीवन कार्यरत ठेवण्यास समानतेने महत्वपूर्ण आहेत. हे या पृथ्वीवर राहणाऱ्या लहान व मोठया जीवांसाठी सत्य आहे.

नर आणि मादी या दोन्ही जाती या पृथ्वीवर जीवन कार्यरत ठेवण्याचे माध्यम आहे. हेच यांचे मुख्य काम आहे. त्यामुळे यांच्यात नेहमी आकर्षण असते. दोन्ही  जाती एकमेकांना पूरक असल्याने तरीही त्यांचा प्रयत्न असतो की आपल्या आकर्षणात समोरच्याला बांधून ठेवावे, एकमेकांच्या प्रेमात सहभागी व्हावे, निर्सगाचे नियम पाळावे जेणेकरून नवीन जीवाला पृथ्वीवर येण्याची संधी मिळेल.

असे नाही की पृथ्वीवर वावरणाऱ्या इतर सजीवांची भांडणं होत नाहीत. अवश्य होतात, पण त्यांच्या भांडणाची कारणं काय असतात? हे सजीव जर आपसात भांडत असतील तर याचे कारण असते-जेवण. शेवटी जीवन पुढे नेण्याच्या निर्सगनियमाला पूर्ण करण्यासाठी अन्न तर आवश्यकच आहे. त्यामुळे इतर प्राण्यांमध्ये भांडण झालेच तर शिकारीसाठी होते.

सहवासात असलेले नर आणि मादी आपसात कधीच भांडत नाहीत. ते इतर प्राण्यांसोबत भांडतात. प्रत्येक प्राणी आपले आणि आपल्या पिल्लांचे पोट भरण्याच्या शोधात असतो. जंगलात एक नर दुसऱ्या नरासोबत लढतो. कधीकधी तर समोरच्या नराला मारूनसुद्धा टाकतो. पण आपल्या मादीसोबत कधीही भांडत नाही. पण माणूस सर्वात जास्त आपल्या घरातील स्त्रीसोबत भांडत असतो.

पुरुषांची क्रूरता

२३ वर्षांपूर्वी झालेले तंदूर हत्याकांड कोण विसरू शकेल. मानवी जीवनाच्या इतिहासात प्रथमच हे पाहण्यात आले की पुरुषाचा राग, घृणा, अमानुषता, क्रूरता यांची परिसीमा ही की एका स्त्रीला भट्टीत टाकून भाजून काढले. सुशील शर्मा नामक उच्चशिक्षित आणि युवा काँग्रेसच्या अध्यक्षाने त्या स्त्रीला भट्टीत टाकून भाजून काढले, जिच्यावर त्याने प्रेम केले होते, तिच्याशी सहवास साधला होता आणि जी त्याची पत्नी होती. नैना सहानी हत्याकांडाची झाळ लागून संपूर्ण देश तापू लागला होता.

सुशील शर्माने आधी आपल्या पत्नीला गोळी घातली, नंतर तिचे शव एका पॉलिथिन बॅगमध्ये गुंडाळून आपल्या कारमध्ये टाकून दिल्लीच्या रस्त्यावर फिरत राहिला. प्रयत्न केला की यमुना नदीच्या पुलावरून ते शव यमुनेत टाकू शकेल, पण लोकांच्या गर्दीमुळे तो असे करू शकला नाही. मग त्याने आपली कार कॅनॉट प्लेसमध्ये अपल्या रेस्टॉरंटकडे वळवली. रेस्टारंटमध्ये काही लोक जेवत होते. त्याने आपला मॅनेजर केशव याला रेस्टॉरंट बंद करायला सांगितले. केशवने रेस्टॉरंट बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना पाठवून दिले. यानंतर सुशीलने केशवला सांगितले की त्याच्या कारच्या डिक्कित एक शव आहे, ज्याची भट्टीत टाकून विल्हेवाट लावायची आहे. त्याने केशवला हे सांगितले नाही की ते शव त्याच्या प्रिय पत्नीचे आहे. पुरुषांच्या या भयानक चेहऱ्याच्या या कल्पनेनेच मनाचा थरकाप उडतो.

भट्टीचे तोंड लहान होते त्यामुळे त्यात पूर्ण शव जाऊ शकत नव्हते. तेव्हा केशव आणि सुशील शर्माने मिळून नैनाच्या प्रेताचे टुकडे केले. जेव्हा आग मंदावू लागली आणि शवाचे तुकडे पूर्णपणे जळत नव्हते तेव्हा त्यात भरपूर लोणी टाकले गेले. आग भडकली आणि धुराचे लोट निघाले. रेस्टॉरंटच्या बाहेर फूटपाथवर झोपलेल्या भाजी विकणाऱ्या अनारोला रेस्टॉपंटच्या चिमणीतून निघणारे धुराचे लोट पाहून वाटले की आग लागली आहे आणि तिने आरडाओरडा केला. जवळच गस्त घालणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या शिपायाच्या अब्दुल नजीर गुंजू यांच्या कानावर हा आवाज पडला आणि अशा प्रकारे समोर आली एका पुरुषाच्या क्रौर्याची अंगावर काटे उभे करणारी कथा जी वर्षानुवर्षे ऐकली आणि ऐकवली जाईल.

पुरुष समाजाच्या अत्याचाराच्या अशा कथा अगणित आहेत. मग ती जेसिका लाल केस असो, प्रियदर्शिनी मट्टु केस असो वा निर्भया बलात्कार प्रकरण आणि बीभत्स मृत्यूचे तांडव पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की पुरुषासारखा क्रुर आणि दुष्ट प्राणी जगात इतर कुठल्या प्रजातीत दिसणार नाही.

पुरुष का बनला नराधम

शेवटी ही विकृत मनोवृत्ती केव्हा निर्माण झाली? कोणी निर्माण केली? का निर्माण केली. असे कोणते कारण असू शकेल ज्यामुळे पुरुषाला स्त्रीच्या वरचढ केले असेल? स्वत:ला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ समजण्याची भावना केव्हापासून आणि कशाप्रकारे पुरुषांच्या डीएनएमध्ये आली, जेव्हा की निसर्गाने दोघाना एकमेकांना पूरक बनवले होते, एकमेकांचे प्रेमी आणि जोडीदार बनवले होते, प्रतिस्पर्धी नाही.

तसे पाहता, स्त्रियांला छळण्याचा खेळ सुरू द्ब्राला. हजारो वर्ष आधी, जेव्हा पृथ्वीवर धर्माच्या प्रसाराने आपले पाय पसरणे सुरु केले होते. धर्माचा प्रसार करणाऱ्यांनी माणसामाणसांमध्ये लढाया करवल्या. जास्तीत जास्त जमिनीवर आपले शिष्य आणि आपले विचार पसरवण्यासाठी घनघोर युद्ध घडवून आणली. ईश्वरासारख्या अदृश्य शक्तीला रचले आणि आपले म्हणणे पटवण्यासाठी निसर्ग नियमांना उध्वस्त करत त्यांना कमकुवत घटकांवर अत्यावर करायला सुरूवात केली.

विरोधकांच्या स्त्रिया जबरदस्तीने त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवलेत. अनैतिक मूलं जगात आणली. बस इथूनच पृथ्वीवर जीवनातील अनंत शांती कायम ठेवणारे एकमेकांना पूरक असलेले स्त्री पुरुष यांच्या दरम्यान कटूतेचे बीज निर्माण होणे सुरु झाले, इथूनच पुरुषाच्या डीएनएमध्ये क्रूरतेचा समावेश झाला आणि स्त्रीमध्ये भयाचे.

धर्माने हिसकावले मानवाचे नैसर्गिक गुण

धर्माने मानवजातीची कधीही प्रगती केली नाही, उलट त्याच्या नैसर्गिक गुणांना त्याच्यापासून हिसकावून घेतले. धर्माच्या निर्मितीसोबतच मनुष्य या पृथ्वीवर आढळणाऱ्या अन्य सर्व प्राण्यांपासून वेगळा ठरला. निसर्गाच्या नियमांची अवहेलना करू लागला. एवढेच नाही तर पुरुष स्वत:ला इतके श्रेष्ठ समजू लागला की निसर्गाचा विनाश करू लागला,

कालांतराने क्रूरता, भय, क्रोध, विनाश, अपमान, शोषण, अत्याचार यासारखे सर्व गुण त्याच्या डीएनएमध्ये खोलवर रुजत गेले. आज जर तो स्वत:ला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ मानून तिला अत्याचार करण्याची एक वस्तू मानत असेल तर याला जबाबदार धर्म आहे.

लाखो वर्षांपासून स्त्रियाच पुरुषावर आपले सर्वस्व लुटत आल्या आहेत. युद्धात पतिचे निधन झाले तर त्याच्या प्रेतावर त्याची पत्नी जळून सती होत आली आहे. असे करण्यासाठी तिला धर्माने भाग पाडले आहे. कधी असे ऐकले आहे का की एखादा पतिसुद्धा आपल्या पत्नीसाठी सती गेला आहे? सगळे नियम, सगळी व्यवस्था, सगळी शिस्त पुरुषांनी निर्माण केली. धर्माच्या नावावर निर्माण केल्या आहेत या गोष्टी.

हा धर्म स्त्रीवर पुरुषांमार्फत थोपला गेला आहे. सगळया कथा त्यांनी रचल्या आहेत, ज्यात पुरुष स्त्रीला वाचवून घेऊन येतो आणि अशा कथा बनवल्या जात नाही, ज्यात पुरुष स्त्रीला वाचवून परत घेऊन येतो आणि स्त्री गेली की तो दुसरी स्त्री शोधू लागतो, तिला वाचवण्याचा प्रश्नच नाही. पुरूषाने आपल्या सोयीसाठी ही सगळी व्यवस्था केली आहे.

त्या पुरुषांनी, ज्यांनी स्वत:ला धर्मगुरू म्हणवून घेतले आहे आणि ज्यांनी धर्माच्या आड लपून आपल्या ऐय्याशीची सोय करून ठेवली. वास्तविक पाहता ज्यांच्याकडे थोडी जरी शक्ती असेल कोणत्याही प्रकारची, ते थोडे अशक्त असतील कोणत्याही प्रकारे, त्यांच्यापेक्षा वरचढ होतातच. लगेच मालक बनून गुलामी निर्माण करतात. शारीरिक दृष्टया पुरुष थोडा शक्तिशाली आहे. पण त्याच्यात सहनशक्ती तेवढी जास्त नसते. स्त्रीकडे शारीरिक बळ कमी, पण सहनशक्ती अपार आहे. दोघांनाही निर्सगाने असे बनवले आहे जेणेकरून याच्या शक्तीचा वापर धरणीवर जीवनाची अथक वाटचाल कायम ठेवण्यासाठी केला जाऊ शकेल.

तुटले नियम

पुरुषाचे काम आहे भोजन देणे, सुरक्षा देणे, प्रेम देणे अन् स्त्रीचे काम आहे त्याच्या प्रेमाला आपल्या कुशीत स्थान देऊन नव्या जीवाला जन्म देणे. सगळी सृष्टी याच नियमांतर्गत चालते आहे. स्त्रीला ९ महिने मूल आपल्या पोटात सांभाळावे लागते आणि नंतर त्याला जन्म देण्याच्या वेदनेतून जावे लागते, यासाठी निसर्गाने तिला जास्तीची सहनशक्ती दिली आहे. पुरुषाने या ९ महिन्यात तिची काळजी घ्यायची असते, यात तिच्या जेवणाची व्यवस्था करायची असते, यासाठी त्याला शारीरिक बळ जास्त देण्यात आले  आहे. पण काही उतावीळ, तापट लोकांनी निसर्गाचा हा साधा नियम तोडून यावर धर्माला आणून बसवले आणि पुरुषाच्या शारीरिक शक्तीचा वापर चुकीच्या कार्यासाठी करण्यासाठी दबाव आणणे सुरु केले आणि त्यांना लढाईत झोकून दिले. विध्वंसक कामामध्ये लावून टाकले.

धर्माद्वारे उत्पन्न केल्या गेलेल्या या विकृती हजारो वर्षांपासून पुरुषांच्या रक्तात धावत आहेत आणि याच विकृतींचा परिणाम आहे कौटुंबिक हिंसा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें