जेव्हा मैत्रीण करेल महागड्या मागण्या

* पारुल भटनागर 

कोणत्या वयात मैत्री करावी हे सांगता येत नाही आणि मग त्या क्षणापासून आयुष्य इतके सुंदर होऊन जाते की, आपल्या या मित्रासाठी आपण चंद्र-तारे तोडण्याच्या गप्पा मारू लागतो, कारण विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाढते.

या नात्यात तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांसोबत चांगले क्षण घालवता, एकमेकांच्या भावनांचा आदर करता. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करता, एकमेकांना मदत करता.

पण जेव्हा तुमचा जोडीदार या नात्याच्या आडून हळूहळू तुमच्याकडून महागडया भेटवस्तूंची मागणी करू लागतो तेव्हा तुम्ही थोडे सावध राहणे गरजेचे असते, जेणेकरून ही मैत्री तुमच्या खिशाला जड होणार नाही आणि तुमच्या जोडीदाराचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल.

चला तर मग, जाणून घेऊया प्रेयसीने मागणी केल्यावर काय करावे आणि काय लक्षात ठेवावे…?

फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिनी

अंगठीची मागणी

भेटवस्तू मोठी असो किंवा छोटी, तीच चांगली असते जी मागून घेतलेली नसते तर मनापासून दिली जाते. नुकतेच तुम्ही त्याला ब्रँडेड शॉपिंग करून दिले असेल, पण आता जर तो पुन्हा येत्या फ्रेंडशिप डेला तुमच्याकडे अंगठीची मागणी करत असेल तर त्याला सांगा की, यावेळी मी अंगठी तेव्हाच देईन जेव्हा तूसुद्धा या खास दिवशी मला अंगठी देशील आणि ती स्वत:च्या हातांनी माझ्या बोटात घालशील.

त्याने होकार दिला तरच त्याला अंगठी भेट द्या, कारण यात कोणतेही नुकसान नाही, पण जर त्याने स्पष्टपणे नकार दिला तर तुम्हीही लाज न बाळगता नकार द्या, कारण मैत्री एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी असावी लागते.

आयफोनचा हट्ट

तुम्ही दोघांनी खरेदीला जायचे ठरवले असेल आणि ही योजना आखण्याचे संपूर्ण श्रेय तुमच्या मैत्रिणीला जात असेल, कारण तिनेच तुम्हाला खरेदीला जाण्यासाठी भाग पाडले असेल तर थोडे सावध व्हा, कारण खरेदी म्हणजे तुमच्या खिशावर भार पडणे.

मी पैसे आणि कार्ड आणायला विसरले, त्यामुळे आता तू तुझ्या कार्डने पैसे दे, मी नंतर पैसे देईन, असे सांगून तिने तुमच्याकडून आयफोन घेण्याचा आग्रह धरला तर वेळीच हुशारीने वागा. मीही कार्ड आणले नाही, त्यामुळे स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही, असे तिला स्पष्टपणे सांगा. तुम्ही पैसे भरलेत तर समजून जा की, तुमच्या खिशाला अळा बसायला सुरुवात झाली आहे. भलेही तुमचा नकार ऐकल्यावर ती तुमच्यावर थोडीशी नाराज होईल, पण तरीही तिच्या नाराजीकडे फारसे लक्ष देऊ नका, कारण पैशांच्या जोरावर कोणतेही नाते फार काळ टिकू शकत नाही.

सर्व गरजांसाठी तुमच्यावरच अवलंबून

मैत्री  झाल्यापासून प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ती जर तुमच्यावर अवलंबून असेल तर समजून जा की, तुमच्यासोबत तिने केवळ पैशांसाठी नाते जोडले आहे. जसे की, कधी फोन रिचार्ज, कधी कॅबचे बिल, कधी महागड्या उपहारगृहात जाण्याची हौस, अगदी प्रेमाच्या जोरावर दरमहा तुमच्याकडून खर्चासाठी मोठी रक्कम वसूल करणे.

जर तुमच्या मैत्रिणीची ही सवय झाली असेल तर आधी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. तरीही तिला समजत नसेल तर हे नाते तोडणेच योग्य ठरेल, अन्यथा तुमच्या पैशांची लूट होईल, कारण हा तिचा स्वार्थ असेल प्रेम नसेल.

लक्ष द्या

शोऑफ टाळा : बरीच मुले मैत्रिणीवर रुबाब झाडण्यासाठी कधी तिला स्वत:कडील पैसे दाखवतात तर कधी महागड्या उपहारगृहात घेऊन जातात. त्यामुळे ती प्रियकराला श्रीमंत समजून लुटायला लागते, पण हेच पुढे त्याच्या त्रासाचे कारण ठरते, कारण तिच्या रोजच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नात्यात शोऑफला थारा देऊ नका, जेणेकरून भविष्यात हे नाते ओझे बनणार नाही.

तिलाही संधी द्या : प्रेम खरे आहे की, हा सगळा पैशांचा खेळ आहे, याची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही खर्च करण्याची संधी द्या. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती पैसे देत असेल तर तिला रोखू नका, कारण यामुळे तिचे खरे रूप तुमच्या समोर येणार नाही. त्यासाठी तुम्ही उपहारगृहात जाऊ शकता. बिल आल्यावर घाईत पर्स आणायला विसरलो, असे सांगून तिच्याकडून बिलाचे पैसे काढू शकता.

मी पैसे दिले तर बिघडते कुठे? असे विचारत तिने आनंदाने पैसे दिले तर समजून जा, तुमचे नाते थोडे तरी खरे आहे. याउलट बिल भरल्यावर ती काहीशी नाराजीने तुमच्याशी बोलली तर समजून जा की, तिला फक्त तुमच्या पैशांवर मजा मारायची आहे.

तुमची कमाई फक्त तुमची आहे : कदाचित तुमचे कुटुंब सधन असेल आणि तुम्हीही चांगली नोकरी करत असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मैत्रिणीने विचार न करता फक्त तुमची कमाई वाया घालवावी. कधी, कुठे आणि किती खर्च करायचा, हे तुम्हीच ठरवायला हवे. चांगला कमावतोस तरीही इतका कंजूषपणा कशाला? असे तुमची मैत्रीण विचारत असेल तर तिला सांगा की, हा कष्टाचा पैसा आहे आणि जेव्हा गरज असते तेव्हाच मी तो खर्च करतो. मी जे कमावले आहे ते उडवून दिले तर माझ्या भविष्याचे काय? असा थेट प्रश्न विचारून स्वत:ची भूमिका मांडा. यामुळे तिच्या लक्षात येईल की, तुम्हाला तिच्यावर पैसे खर्च करायला लावणे तितकेसे सोपे नाही.

गरज समजून घ्या : मैत्रीण म्हटले म्हणजे ती पैसे उकळणारच किंवा प्रत्येकवेळी तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच ती एखादी मागणी करत असेल, असा समज करून घेणे चुकीचे आहे. कधी-कधी गरजेपोटी तिला तुमच्याकडून काहीतरी मागावे लागू शकते. अशावेळी तुम्ही त्याबद्दल तिला लगेच बोलू नका, तर तिचे म्हणणे ऐकून घ्या आणि गरज समजून घ्या. हीदेखील तुमची जबाबदारी आहे.

तुम्हाला वाटत असेल की, तिची मागणी न्याय्य आहे आणि ती तुमच्या खिशाला परवडणारी असेल तर तिला मदत करा, कारण गरजेच्यावेळी तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवलीत तर मजबूत नात्यासाठी ते योग्य ठरणार नाही.

वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी 11 टिप्स

* पूनम मेहता

तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल अनेकदा काळजी वाटते का? जर होय, तर तुम्हाला याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या चिंतेचे कारण तुमची स्वतःची वृत्ती किंवा तुमच्या दोघांची केमिस्ट्री असू शकते. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालवू शकता.

  1. संप्रेषण

तुमच्या भावना, विचार, समस्या एकमेकांशी शेअर करा. वर्तमान आणि भविष्याबद्दल बोला. तुमच्या दोघांबद्दल तुमची काय योजना आहे ते इतरांना सांगा. बोलण्यासोबतच ऐकणेही महत्त्वाचे आहे. मौन हादेखील एक संवाद आहे. तुमच्या हावभावात तुमच्या जोडीदाराप्रती प्रेम आणि आदर दाखवा, तसेच स्पर्श करा.

  1. तुमच्या सर्व आशा एकाच गोष्टीवर ठेवू नका

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवत असाल तर तुमची निराशा होईल. जोडीदाराकडून तेवढ्याच अपेक्षा करा, जितक्या तो पूर्ण करू शकतो. तुमची उरलेली आशा इतर पैलूंमध्ये ठेवा. जोडीदाराला जागा द्या. त्याचे चांगले आणि वाईट स्वीकारा.

  1. वाद टाळू नका

निरोगी नातेसंबंधासाठी युक्तिवाद चांगले आहेत. गोष्टी टाळून तीळ तळहात बनते. मनात ठेवलेला गोंधळ वाढवू नका, शब्द टाका. जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडत असेल तेव्हा गप्प बसू नका किंवा वाईट प्रतिक्रिया देऊ नका. काळजीपूर्वक ऐका आणि फुरसतीने समजून घ्या. भांडण किंवा शिवीगाळ अजिबात करू नका.

  1. वाईट वर्तनाला आव्हान द्या

तुमच्या जोडीदाराच्या वाईट वागण्याने दुखावुन तुमचा स्वाभिमान कधीही गमावू नका. कधीकधी आपल्या जोडीदाराच्या वागण्याने आपल्याला इतका धक्का बसतो की आपल्या वेदना व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतःला दोषी समजतो किंवा कबूल करतो. तुमचा जोडीदार तुम्हाला शारीरिक/मानसिक दुखावत असला तरी तुम्ही त्याला नकार देत नाही. हे चुकीचे आहे. वाईट वागणूक स्वीकारू नका. यामुळे नात्यात अशी दरी निर्माण होते जी कधीच दुरुस्त होत नाही.

५. एकमेकांना वेळ द्या

एकमेकांसोबत वेळ घालवून आणि दर्जेदार वेळ वाटून प्रेम वाढते. जोडीदारासोबत सहलीचे नियोजन कराल. फुरसतीचा वेळही घरी घालवा. ही वेळ फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ठेवा, यात वियोगाबद्दल बोलू नका. मग बघा, ही वेळ जेव्हा कधी आठवेल तेव्हा बरं वाटेल.

  1. विश्वास आणि आदर

तुम्ही तुमच्या जोडीदाराचा पाय खूप ओढता का? तुला नेहमी त्याच्यावर शंका येते का? तसे असेल तर नाते कधीच चांगले होणार नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे नेहमीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. एकमेकांचा आदर करणेदेखील महत्त्वाचे आहे. विश्वास आणि आदर हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. म्हणून त्यांना मजबूत ठेवा.

  1. गृहीत धरू शकत नाही

लग्न होऊनही टेकेन फॉर ग्रांटेड घेऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडीनुसार जगण्याचा प्रयत्न करत राहा. त्यानुसार स्वतःला साचेबद्ध करण्याचा प्रयत्न करत राहा. ज्याप्रमाणे रोपाला योग्य पद्धतीने सिंचन केल्यावरच ते सशक्त वृक्ष बनते, योग्य काळजी घेतल्यावरच ते फुलते, त्याचप्रमाणे केवळ 2 व्यक्तींनी मिळून वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकते.

  1. हे टीमवर्क आहे

पती-पत्नी दोघेही संघ म्हणून काम करतात तेव्हाच आनंदी जीवन जगू शकतात. एकमेकांसोबत जिंकण्याऐवजी एकत्र जिंकणे आवश्यक आहे हे दोघांनाही समजते. सुखी वैवाहिक जीवन हे दोन्ही पक्षांच्या मेहनतीचे फळ आहे.

  1. एकमेकांची काळजी घ्या

जर तुम्ही एकमेकांना जीवनात सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवले तर सुरक्षिततेची भावना वाढेल. ही भावना नात्याला घट्ट करते. प्रत्येक पती-पत्नीला एकमेकांकडून बिनशर्त प्रेम आणि आदर हवा असतो.

  1. मित्र काळजीपूर्वक निवडा

तुमचे मित्र तुमचे आयुष्य घडवू शकतात किंवा तोडू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि वागणुकीवर मित्रांचा खूप प्रभाव असतो. त्यामुळे चांगले मित्र निवडा.

  1. बोलण्यावर संयम

वैवाहिक जीवनात अनेक वेळा तुमचे बोलणे तुमचे वैवाहिक जीवन उध्वस्त करते. आपले शब्द व्यंग्य, शिवीगाळ किंवा टीका-टिप्पणीमध्ये वापरू नका, परंतु त्यांची प्रशंसा करा, गोड बोला. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.

६ संकेत जोडीदार फसवत तर नाही

* मिनी सिंह

या जगात कोणासाठीही प्रेम ही सर्वात गोड अनुभूती आहे. तुमचं कोणावर मनापासून प्रेम असेल आणि तोदेखील तेवढयाच निष्ठेने तुमच्यावर प्रेम करत असेल तर यापेक्षा निर्मळ भावना असूच शकत नाही. प्रेम करणारा फक्त प्रेमाचीच अपेक्षा करतो. परंतु प्रेमात सगळेच काही निष्ठावान नसतात. विश्वासघात, फसवणूक, धोका, चीटिंग हे केवळ एकाच शब्दाचे अर्थ नाहीएत, तर घट्ट नात्यांचा पाया निखळून टाकण्यासाठी पुरेसे आहेत. काही लोक त्यांच्या जोडीदाराला फसवतात. एका संशोधनानुसार, काही वर्षात अशा केसेस समोर आल्या आहेत, ज्यामध्ये लग्नानंतर जोडीदार फसवतात आणि अलीकडच्या काळात ही समस्या सर्वसामान्य झालीय.

तुमचा जोडीदार खरोखरच फसवणूक करतोय की नाही हे जाणून घेणं तसं कठीणच आहे. स्वभावात एकदम बदल होणं, अलिप्त राहणं ही थोडीफार नात्यात अडचण ठरते. तुमचा जोडीदार विश्वासू आहे की नाही आणि तो तुम्हाला धोका देतोय का? जाणून घेऊया असे काही संकेत ज्यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का हे समजेल.

स्वभावात बदल : सर्वात मोठी ओळख म्हणजे जोडीदाराच्या स्वभावात बदल होऊ लागतो. ‘मी कंटाळलोय’ सारख्या शब्दांनी काहीतरी गडबड असल्याचं जाणवू लागतं. दीप्ती माकाने सांगतात, जोडीदार जेव्हा फसवणूक करू लागतो तेव्हा आपोआप काही क्लू वा काही गोष्टी समोर येऊ लागतात, त्या फक्त समजून घेता यायला हव्यात, जसं की, ‘तुला कसं बोलायचं तेच समजत नाही, तुझं वजन कमी कर किती जाडी झाली आहेस.’ त्याबरोबरच आपल्या जोडीदाराची तुलना इतरशी करू लागतात. विनाकारण तुमची चूक दाखवू लागतात, एखाद्या चुकीसाठी तुम्हाला बेजबाबदार ठरवू लागले, तर तुम्ही सचित व्हायला हवं. खासकरून असं पूर्वी कधीही झालं नसेल, तर तुम्ही समजून जा की आता ते तुम्हाला अपमानित करण्यासाठी बोलत आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा त्याच जुनं नात तोडून दुसऱ्यासोबत संबंध ठेवते  तेव्हाच या गोष्टी घडतात.

दिनचर्येत बदल : दैनंदिन दिनचर्येत सतत होणाऱ्या बदलामुळेदेखील जोडीदार तुम्हाला धोका देण्याचा संकेत असू शकतो. जसं, अचानक वॉर्डरोबमधले कपडे बदलणं, स्वत:वर अधिक लक्ष देणं, आरशात सतत न्याहाळत राहणं, तुम्ही येताच सतर्क होणं वगैरे होत असेल तर समजून जा की काहीतरी गडबड आहे. पूर्वीसारखं तुमच्यात रुची न दाखवणं, कारण पूर्वी तुम्ही दोघे एकमेकांजवळ जाण्याचे बहाणे शोधात असायचे आणि आता जोडीदार दूर जाण्याचे बहाणे शोधू लागलाय. कमिटमेंटला घाबरू लागला की समजून जा तो तुम्हाला धोका देतोय. याशिवाय विनाकारण भांडण उकरून काढणं. प्रत्येक कामात दोष शोधणं. पूर्वीसारखं मनातल्या गुजगोष्टी, करिअर संबंधित गोष्टी न करणं, तेव्हा समजून जा की तो दूर जाण्याचा प्रयत्न करतोय.

तुमच्यावरच प्रेम कमी होणं : पूर्वी तुमची प्रत्येक गोष्ट त्यांना आवडायची, परंतु आता ते प्रत्येक गोष्टीत चिडचिड करतात. सिनेमा पहायला वा तुमच्यासोबत बाहेर जायला नकार देणं. जास्तीत जास्त वे ऑफिसमध्ये राहणं. या गोष्टींमुळे स्पष्टपणे समजतं की तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय. कदाचित तो एखाद्या दुसऱ्या गोष्टींमुळे अडचणीत असेल वा अजून काही दुसरं कारण असेलही. परंतु यासाठी तो तुमचा सल्ला घेत नसेल वा तुम्हाला तेवढं महत्वाचं समजत नसेल.

फोनशी संबंधित प्रश्न : तुम्ही जर तुमच्या जोडीदाराच्या फोनशी संबंधित कामांमध्ये बदल नोटीस करत असाल, तर नक्कीच बदल दिसेल. जसं की जोडीदार सतत फोनवर व्यस्त राहत असेल. ऑफिसमध्ये तासनतास फोन बिझी येत असेल, तुमच्यापासून मेसेज वा फोन लपवत असतील, फोनचा पासवर्ड बदलला असेल आणि तो सांगत नसतील आणि फोनला हात लावण्यास नकार देत असतील तर नक्कीच धोक्याची सूचना आहे. याशिवाय त्यांच सोशल मीडियावरच्या वागणुकीतदेखील बदल दिसू शकतो, जसं सतत फोटो अपलोड करणं वा वारंवार प्रोफाइल बदलत राहणं, वारंवार मेसेज चेक करत राहणं, सारखे छोटेछोटेबदल धोक्याचे संकेत असू शकतात.

छोटयाछोटया गोष्टींसाठी खोटं बोलणं : तुमचा जोडीदार जर प्रत्येक छोटयाछोटया गोष्टींसाठी खोटं बोलू लागला, गोष्टी लपवू लागला, तर समजून जा की नक्कीच काहीतरी गडबड आहे.

नजर न मिळवणे : तुमचा जोडीदार जर तुमच्याकडे न पाहता बोलत असेल, तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमच बोलण गांभीर्याने घेत नसेल, जे तुम्हाला आवडत नसेल नेमकं तेच करत असेल, स्वत:ची चूक कबूल करण्याऐवजी तुमचीच चूक दाखवत असेल, तुमचा फोन घेत नसेल आणि ना ही तुमचा मेसेजला उत्तर देत असेल, तर समजून जा की तुमचा जोडीदार तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतोय.

धोका देणारे नेहमी जवळचेच असतात आणि कदाचित यामुळेच जेव्हा फसवणूक होते तेव्हा खूप मोठा धक्का बसतो. खासकरून जेव्हा तो आपला जोडीदार असतो.

जोडीदार फसवणूक करतोय हे समजल्यावर काय करायचं ते पाहूया :

पूर्ण वेळ घ्या : तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या फसवणूकमुळे चिंतीत असाल तर त्वरित निर्णय घेऊ नका. पूर्ण वेळ घ्या. कोणाशीही याबाबत चर्चा करू नका. जोडीदाराशी तर अजिबातच नाही. तुम्हाला राग जरी येत असला तरी रागाच्या भरात बोललेले शब्द अधिक नुकसानदायक ठरतात.

वाद वा भांडण करू नका : विरोध करणं गरजेचे आहे आणि समोरच्याला काहीतरी असं घडलंय ज्यामुळे तुम्ही चिंतीत आहात हे समजणंदेखील गरजेचं आहे. परंतु तुम्ही तुमचा आवाज आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला काय वाटतंय हे जोडीदाराला नक्की समजू द्या.

तोवा तीला दोष देऊ नका : अनेकदा धोका देणाऱ्या जोडीदारा ऐवजी त्या मुलाला वा मुलीला दोष दिला जातो. असं करणं चुकीचं आहे. कारण जी व्यक्ती तुमचं प्रेम धुडकावून पुढे गेली, चूक त्याची अधिक आहे.

तुमच्या गोष्टीत दुसऱ्या कोणाला बोलू देऊ नका : तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये सगळं आलबेल हवं असेल तर यागोष्टीची चर्चा कोणाशीही करू नका. कोणा तिसऱ्याचा यामध्ये समावेश करणं धोकादायक ठरू शकतं.

अजून एक संधी द्या : तुमच्या जोडीदाराला त्याच्या चुकीची जाणीव झालीय आणि त्याला सगळं पूर्वीसारखं होऊ द्यायचं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की वेळ द्या. कदाचित सगळं पूर्वीसारखं होईल. यासाठी तुम्ही दोघ सोबत राहणं आणि वेळ देण गरजेचं आहे, यामुळे तुमच्यातील गैरसमज दूर होतील.

माहेरच्या माणसांच्या मूर्खपणामुळे मोडणारे मुलींचे संसार

* प्रतिभा अग्निहोत्री

‘‘आई, मी धड इकडची होऊ शकणार नाही की धड तिकडची, हे जर मला माहीत असते तर मी कधीच इकडे आले नसते.’ तुझ्याकडून मी नेहमीच असे ऐकत आले की, मुलीला लग्नानंतर सासरी आपले महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर काहीही झाले तरी पतीला आईचा लाडका होण्यापासून दूर ठेवायला हवे. इतकेच नव्हे तर आपल्या घरातही कधी आई मी तुला वडिलांच्या नातेवाईकांचा मान राखताना पाहिले नाही. तू दिलेला हाच धडा गिरवत लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच रवीने मला विचारूनच सर्व काही करावे, असे मला वाटू लागले होते. मात्र रवीचे आईवडिलांशिवाय पानही हलत नव्हते. जेव्हा कधी मी तुला माझ्या सासरच्या समस्या सांगायची तेव्हा तू हेच सांगायचीस की, तू कमावती आहेत. त्यामुळे दडपणाखाली राहण्याची गरज नाही. त्यांना तुझी किंमत नसेल तर कधीही परत ये, माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून मी सासरी क्षुल्लक कारणांवरुन भांडण करू लागले. रवीदेखील किती काळ माझे असे वागणे सहन करणार होता, अखेर आमच्यामध्ये वाद होऊ लागले. माहेरहून मिळालेल्या चुकीच्या शिकवणीमुळे मी स्वत:हून माझ्या पायावर दगड मारुन घेतला,’’ एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली सुवर्णा रडतच आईशी तावातावाने बोलत होती.

‘‘तूच तर सांगायचीस की, रवी तुझे नाही तर त्याच्या आईचेच सर्व काही ऐकतो. ज्या घरात तुझ्या शब्दाला किंमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे परिस्थिती आणखी बिघडत गेली असती. आम्ही तुला लाडाने वाढवले. तुला काहीच किंमत नाही, हे पाहून आम्हाला वाईट वाटणार नाही का?’’ सुवर्णाच्या आईने स्वत:ची बाजू मांडत सांगितले.

‘‘पण इकडे तरी कुठे मला महत्त्व आहे. तुम्ही सर्व शुल्लक कारणावरुन मला सतत बोलता. तिकडे रवीला माझ्या पगाराबद्दल काही देणेघेणे नव्हते. इकडे मात्र सर्व माझ्या पैशांवरच लक्ष ठेवून असतात. आई, मी मूर्ख होते पण तू तुला तर सर्व समजत होते ना, मग हळूहळू सर्व काही ठीक होईल, असे तू मला समजावून सांगायला हवे होते.’’

सुवर्णा आणि तिच्या आईमध्ये अशाप्रकारे वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. आई आणि बहिणीच्या सल्ल्यानुसार वागून सुवर्णा लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच प्राध्यापक असलेला नवरा आणि सासूला सोडून माहेरी आली होती. आता ४ वर्षांनंतर तिला असे वाटते की, आईचे ऐकून तिने मोठी चूक केली. ती सासरी परत जाण्याचा विचार करत आहे.

४० वर्षीय सवितासोबतही काहीसे असेच घडले. तिने सांगितले की, ‘‘मी घरातली एकुलती एक मुलगी आहे. आईने माझ्याकडून घरातले कुठलेच काम कधी करुन घेतले नाही. सासरी मी थोरली सून होते. अचानक खांद्यावर जबाबदारी आल्याने मी घाबरले. माझी अडचण जेव्हा आईला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘जास्त काम करायची काही गरज नाही. एकदा केलेस की रोजच करावे लागेल. तू त्या घरातली नोकर आहेस का?’’

आईने माझ्या मनात सासरच्या लोकांबद्दल इतके विष भरले होते की मी त्यांना कधीच आपले मानू शकले नाही. त्यामुळेच माझे नवऱ्यासोबत वाद होऊ लागले. सासरी कशीबशी ३ वर्षे राहिल्यानंतर आईवडिलांच्या सल्ल्यानुसार, मी माहेरी परत आले.

सुरुवातीला, जेव्हा पतीने मला परत नेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आईवडील आणि भावाने त्याला चांगलेच सुनावले. अनेक अटी घातल्या. मी वयाने लहान होती. वहिनी संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर सोडून ऑफिसला जायची. मी मात्र स्वत:ला त्या घरची राणी समजायचे. त्यामुळे मला हे सर्व पटायचे नाही. आता वय होत चालले आहे. आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत ठीक आहे. मी भाऊ, वहिनी, भाच्यांसाठी एखाद्या नोकराप्रमाणे आहे. जो तो स्वत:च्या मनानुसार मला वागवू इच्छितो. मूर्खपणे आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या त्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, पण आता हे सर्व सहन नाईलाजाने करावे लागत आहे.

अशा प्रकारच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात, जिथे मुलीच्या माहेरच्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे मुलीचा हसताखेळता संसार उद्ध्वस्त होतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या मुलीचे सर्वाधिक हित इच्छिणाऱ्या आईवडिलांच्या मुलीच्या संसारातील हस्तक्षेपामुळेच असे घडते. लग्नानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा ते खूपच भावूक होतात. लाडाने वाढलेली मुलगी त्यांच्यापासून खूप दूर जाणार असते. त्यामुळेच त्यांना तिची काळजी वाटू लागते. याच अतिकाळजीतून ते तिला चुकीचे सल्ले देऊ लागतात आणि स्वत:पेक्षा आईवडिलांवर जास्त विश्वास ठेवणारी मुलगी कसलाही विचार न करता त्या सल्लायांनुसारच वागू लागते.

मुलीने काय करावे

कोणताही पूर्वग्रह नसावा : लग्नाआधी मैत्रिणींवर किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून सासरच्यांविषयी कोणताही पूर्वग्रह करुन घेऊ नये. आस्थाचेच उदाहरण घ्या, तिने रोमिलशी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी मैत्रिणी आणि आईवडिलांनी समजावले की, ‘‘कायस्थ मुलगी ब्राह्मण कुटुंबात जात आहे. हे ब्राह्मण धर्माबाबत खूपच कट्टर असतात. पूजाविधीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुझे काय होईल?

चांगल्या गोष्टीच सर्वांना सांगा : लग्नानंतर सुरुवातीच्या काळात नववधू सासरच्यांबद्दलची प्रत्येक लहानसहान, चांगली-वाईट गोष्ट माहेरच्यांना सांगते. असे करणे चुकीचे आहे. कारण तुम्ही जे सांगता त्यावरुनच माहेरच्या माणसांचे तुमच्या सासरच्यांबद्दल मत तयार होत असते.

सासर आणि माहेरच्यांचे भरभरुन प्रेम मिळालेल्या माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की, ‘‘लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मी माहेरच्यांना नेहमी सासरच्यांबद्दल चांगल्याच गोष्टी सांगितल्या. त्याचा असा परिणाम झाला की, लग्नाच्या ५ वर्षांनंतर माझ्या सासरची आणि माहेरची माणसे ही एकमेकांचे चांगले मित्र बनली आहेत आणि मी स्वत: एक सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. पण, मी त्याकडे दुर्लक्ष करुन फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले.’’

फोनचा मर्यादित वापर करा : तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सुखी कुटुंबांना विभक्त करण्यात मोबाईलही कारणीभूत ठरत आहे. कारण आजकाल, दिवसभरातून १० वेळा तरी आई-मुलगी एकमेकींशी फोनवरुन बोलतात. यामुळे मुलीच्या घरात घडणारी प्रत्येक लहानसहान गोष्ट त्यांना माहीत होते. यामुळे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे आणि सल्ला देणे हा ते स्वत:चा अधिकार  समजू लागतात.

एके दिवशी रवी आणि नमितामध्ये शुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्याचवेळी नमिताच्या आईचा फोन आला. नमिताने रागाने, रडतच सर्व सांगितले. ते ऐकल्यानंतर आईला वाटले की जावई आपल्या मुलीवर अन्याय करत आहे. काहीही विचार न करता त्यांनी रवीला फोन करुन चांगलेच सुनावले. यामुळे नमिता आणि रवीमधले नाते घटस्फोटापर्यंत गेले. शेवटी नमिताने बऱ्याच प्रयत्नांनी हे नाते जोडून ठेवले. म्हणूनच, राग आणि भावनेच्या भरात माहेरच्यांशी बोलणे टाळा, जेणेकरून घरातला वाद घरातच राहील आणि तुम्ही तो तुमच्या पद्धतीने सोडवाल. कारण एकदा सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही.

समजूतदारपणे वागा : आई-वडिलांचा सल्ला किंवा त्यांच्या मताला विरोध करुन त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐका, पण ते अमलात आणण्यापूर्वी दहादा विचार करा की याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर किंवा पतीच्या कुटुंबावर काय परिणाम होईल. असा कोणताच सल्ला ऐकू नका ज्यामुळे तुमच्या पतीच्या कुटुंबाच्या आत्मसन्माला तडा जाईल.

अनिताने सांगितले, ‘‘आजारी नणंदेवर उपचार करण्यासाठी मी तिला घरी घेऊन आले. लहान मुलांची काळजी घेताना तिच्याकडे लक्ष देणे त्रासदायक होते. दरम्यान, माझ्या आईने मला सल्ला दिला की, तुझे घर तुझ्या नणंदेसाठी नवीन जागा आहे. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याकडेच सोडून ये आणि उपचारासाठी दरमहा पैसे पाठव. तू नोकरी कर आणि तुझे कुटुंब सांभाळ.’’

अनिताला आईचा सल्ला अजिबात आवडला नाही. तिने आईला सांगितले की, ‘‘जरा विचार कर, आज जर नणंदेच्या जागी माझी बहीण असती तर तू हाच सल्ला दिला असता का?’’

अनिताचे म्हणणे ऐकल्यानंतर तिची आई निरुत्तर झाली. त्या दिवसापासून तिने तिच्या सासरच्या गोष्टीत हस्तक्षेप करणे थांबवले.

पारदर्शकता ठेवा : पतीपासून लपून माहेरच्यांसाठी काहीच करू नका. प्रतिमाचे माहेर गरीब आहे. ती पतीपासून लपवून आई आणि भावाला पैशांची मदत करीत असे. जेव्हा तिच्या पतीला हे समजले तेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यामुळे तिचे माहेर आणि नवरा दोघांसोबतचे संबंध बिघडू लागले. म्हणूनच, आपल्या माहेरच्यांना आर्थिक मदत करण्यापूर्वी पतीला विश्वासात घेऊन सर्व सांगा. लक्षात ठेवा, पती-पत्नीच्या नात्यात पारदर्शकता असणे खूप गरजेचे आहे. एकमेकांपासून लपूनछपून केलेल्या व्यवहारांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

सीमा निश्चित करा : सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या संसारात कोणी किती हस्तक्षेप करावा, याची सीमा तुम्ही निश्चित करायला हवी. त्या व्यक्तीने याचे उल्लंघन केल्यास त्याला वेळीच रोखा. कारण तुमच्या कुटुंबातील समस्या तुम्ही आणि तुमचा पतीच चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. सासरच्या आणि माहेरच्या माणसांशी सारखेच प्रेमाने वागा.

आईवडिलांनी काय करावे : हे मान्य की, आजकाल बहुतेक पालक मुला-मुलीमध्ये फरक करत नाहीत. माहेरी लाडात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात दु:खाची सावली जरी आली तरी ते अस्वस्थ होतात. पण त्यांनी हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, आता त्यांची मुलगी ही कुणाची तरी सून, पत्नी आहे. तिच्या पतीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या मुलाला तितक्याच प्रेमाने वाढवले आहे. त्यामुळे सासरच्या अडचणी तिला स्वत:ला सोडवू द्या. एखाद्या वळणावर सल्ला देणे गरजेचे असल्यास तो तटस्थपणे द्या.

मुलीच्या सासरच्या गोष्टीत अनावश्यक हस्तक्षेप टाळा. तिला कोणत्याही विषयावर सल्ला देताना आधी हा विचार करा की, जर हाच सल्ला तुमच्या सुनेला तिच्या माहेरच्यांनी दिला तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

व्हिडिओ कॉलिंग, मोबाइल फोन यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर मुलगी कशी आहे, हे पाहण्यासाठी करा. तिच्या सासरच्यांना नावे ठेवण्यासाठी याचा वापर करु नका.

तुमची आर्थिक स्थिती भलेही मुलीच्या सासरच्यांपेक्षा जास्त चांगली असेल पण तरीही त्यांना तुमच्यापेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच करु नका. लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचा मान ठेवला तरच तुमची मुलगीही त्यांचा आदर करायला शिकेल.

मुलीला केवळ पतीचाच नव्हे तर संपूण सासरच्या मंडळींचा प्रेमाने आदरसन्मान करायला, त्यांच्यासोबत जमवून घ्यायला शिकवा. कुटुंबाशी नाते तोडून पतीसोबत वेगळे राहण्याची शिकवण तिला देऊ नका.

अनुजाने लग्नाच्या दोन दिवस आधी आपल्या मुलीला तिचे दागिने दाखवून सांगितले की, तुझे दागिने तुझ्या सासूकडे चूकुनही देऊ नकोस. एकदा दिलेस तर ते परत कधीच मिळणार नाहीत. असा अव्यवहार्य सल्ला देण्याऐवजी आपल्या मुलीच्या मनात सासरच्यांबद्दल प्रेम, आपलेपणाची भावना जागवा, जेणेकरुन तिचे वैवाहिक आयुष्य सुखाचे होईल.

लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीला थोडा वेळ द्या. ती कशी आहे, हे सतत विचारत राहून तिला त्रास देऊ नका. त्याऐवजी तिला सासरच्या मंडळींसोबत थोडा वेळ घालवू द्या, जेणेकरुन तिथल्या वातावरणात सहज रुळणे तिला शक्य होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें