ब्रायडल ज्वेलरी टेंड्स

* पारुल भटनागर

ज्या प्रकारे केकवर चेरी नसेल तर तो अपूर्ण वाटतो, त्याचप्रमाणे लग्नाचा दिवस जो प्रत्येक मुलीसाठी खास आणि महत्त्वाचा असतो त्यादिवशी तिने पसंत केलेल्या प्रत्येक दागिन्याला विशेष महत्त्व असते. सोबतच ते तिच्या लग्नाच्या पोशाखासाठीही सर्वात महत्त्वाचे ठरतात, कारण  दागिन्यांशिवाय स्त्रीचा मेकअप अपूर्ण दिसतो.

परंतु फक्त पोशाखासोबत दागिने घातले म्हणजे वधूचा लुक परिपूर्ण होत नाही तर दागिन्यांच्या ट्रेंडकडेही लक्ष देणे खूप गरजेचे असते, कारण वधू म्हणून तुम्ही तुमच्या दागिन्यांसाह सोहळयात उठून दिसायलाच हवे, सोबतच सर्वांच्या नजरेतही भरणे आवश्यक असते.

चला तर मग दागिन्यांच्या अद्ययावत ट्रेंड्सबद्दल जाणून घेऊया :

सदाबहार कुंदन ज्वेलरी

स्वत:च्या लग्नात राजेशाही लुक असावे असे प्रत्येकीला वाटते. त्यामुळेच तुमचे लुक राजेशाही दिसावे यासाठी रॉयल पर्ल आणि कुंदन नेकलेस खूपच महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच नववधूच्या दागिन्यांच्या पेटीत गेल्यावर्षीही तो ट्रेंडमध्ये होता आणि नवीन वर्षातही राहील. या नेकलेसचे वैशिष्टये असे की, त्याला राजेशाही लुक देण्यासाठी तो वेगवेगळया आकाराच्या कुंदनचा वापर करून डिझाईन केला जातो, सोबतच आकर्षक मोती आणि माळांनी अधिक आकर्षक बनवला जातो.

या हारामध्ये अनेक लेअर्स असतात जे त्याला रुंद, मोठा करून जास्त सुंदर बनवतात. बाजारात तुम्हाला तुमच्या नजरेत भरणारे रॉयल पर्ल आणि कुंदन नेकलेस मिळतील जे तुम्ही तुमच्या नववधूच्या पोशाखासह मॅच करून खरेदी करू शकता. बहुतांश करून या कुंदन नेकलेसमध्ये विविध रंगांच्या वापरावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, जेणेकरून ते वधूच्या कुठल्याही लुकला मॅच होईल.

तुम्ही याच्यासोबत फ्यूजन करूनही ते बनवू शकता. याच्यासोबत त्याच रंगाचे किंवा विरुद्ध रंगाचे कुंदन असलेले कानातले आणि बिंदी लावल्यास निश्चिंतच तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

किंमत : हे तुम्हाला रुपये १ हजार रुपयांपासून ते रुपये २० हजार रुपयांपर्यंत मिळते, जे तुम्ही डिझाईन, तुमचा खिसा आणि आवड लक्षात घेऊन खरेदी करू शकता.

मल्टिकलर लटकन असलेला नेकलेस

तुम्हाला हटके लुक हवा असेल तर तुम्ही मोठे स्टोन असलेला मल्टिकलर लटकनचा नेकलेस नक्की घालून बघू शकता. तो तुम्ही जवळपास अशा सर्वच नववधूंनी घातलेला पाहाला ज्यांना ट्रेंडसोबत राहायला आणि स्वत:चे कौतुक करून घ्यायला आवडते. तो संपूर्ण गळा झाकून टाकणाऱ्या चोकरसारखा नसतो तर लटकन स्टाईलमध्ये गोलाकार असतो, ज्यामुळे तुमच्या गळयाचा आकारही उठून दिसतो आणि हा ट्रेंडी नेकलेस वधूच्या सौंदर्यात भर घालतो.

तुमच्या लेहेंग्यात एम्ब्रॉयडरी किंवा मल्टिकलर वर्क असेल तर तुम्ही जराही विचार न करता याची खरेदी करा, कारण मल्टिकलर लटकन तुमच्या लेहेंग्याला अधिक उठावदार लुक मिळवून देईल. सोबतच नेकलेसमधील मोठया स्टोनचे वर्क या नेकलेसला अधिक आकर्षक करते.

किंमत : चोकर तुम्हाला रुपये २ हजारांपासून ते रुपये १५ हजार रुपयांच्या दरम्यान सहज मिळेल, जो तुम्हाला वास्तव लुक आणि परिपूर्ण बनवेल.

चोकर देईल मोहक रुप

साध्या पार्टीला जायचे असो किंवा ब्रायडल लुक हवे असेल तरी आजकाल प्रत्येक मुलीला पार्टीत किंवा आपल्या लग्नात चोकर घालायची इच्छा होतेच, कारण हा वन पीस चोकर गळयाला परिपूर्ण बनवण्यासोबतच तुमच्या लग्नाच्या दिवसाला खास बनवण्याचे काम करतो.

सेलिब्रिटी दीपिका पदुकोणनेही तिच्या लग्नात रुंद, सुंदर चोकरसोबत भारदस्त बिंदी आणि कानातले घालून स्वत:चे चांगलेच कौतुक करून घेतले होते. तुम्हाला बाजारात पारंपरिक चोकरसह सोन्याची प्लेट असलेले चोकर, मोती चोकर, रुबी चोकर, रुंद चोकर विविध डिझाईन्समध्ये मिळतील. ते तुम्ही तुमचे लुक, आवडीनुसार खरेदी करू शकता.

किंमत : चोकर तुम्हाला रुपये २ हजारांपासून ते रुपये १५ हजार रुपयांच्या दरम्यान सहज मिळेल.

राणीहार देतो राणीसारखा लुक

राणी म्हणजे क्वीन आणि हार म्हणजे नेकलेस. म्हणूनच तर प्रत्येक वधूला राणीहाराशिवाय तिचा मेकअप अपूर्ण वाटतो, कारण लांबलचक राणीहार तिला राजेशाही अनुभव मिळवून देतो. हा इतर नेकलेसच्या तुलनेत जास्त लांब आणि वजनदार असतो. तो चोकरसह घातल्यास परिपूर्ण लुक मिळतो.

ही फॅशन कधीच कालबाह्य होणारी नाही, पण याची डिझाईन वेळोवेळी अद्ययावत केली जाते. जसे की हिरवा बेस असलेला राणीहार बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातला होता आणि ज्यांना आपल्या लग्नात सेलिब्रिटीसारखे दिसायचे असते ती प्रत्येक मुलगी हा राणीहार तिच्या लग्नात घालू शकते. अशाच प्रकारे अनेक लेयर असलेला राणीहार घातल्यास राणीसारखे वाटू लागते. म्हणूनच ज्या वधूंना नैसर्गिकरित्या चमकायचे असते त्यांनी हा राणीहार नक्कीच घालायला हवा.

पर्सनलाईज्ड म्हणजेच वैयक्तिक दागिने

पर्सनलाईज्ड किंवा वैयक्तिक दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास २०२३ मध्येही याचा ट्रेंड कायम असेल, कारण हा हॉट ज्वेलरीचा ट्रेंड वधूला हॉट लुक देतो, सोबतच ब्रेसलेट असो, रिंग, झुमके किंवा बांगडया असोत, वधू वैयक्तिकरित्या तिच्या आवडीनुसार त्यावर काहीही खास करून घेऊ शकते.

कॅटरिनाच्या नववधूच्या रुपावर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या, पण ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले तो होता लाल रंगाचा चुडा. यावर तिने दोन शब्द लिहून सर्वांना तिच्याकडे आकर्षित केले. तुम्हीही अशाच प्रकारे तुमच्या कल्पक डिझाईन्सचे दागिने घालून त्या दिवसाला आणखीनच खास बनवू शकता.

किंमत : तुम्ही दागिन्यांवर काय लिहून घेऊ इच्छिता यावरून त्याची किंमत ठरते. यामुळे भलेही खर्च थोडा वाढला तरी ते हटके दिसतात.

कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभासी दागिने

नव्या ट्रेंडमध्ये विरोधाभासी रंगांची चलती असून अनेकांच्या आवडीत त्याला स्थान मिळत आहे. कपडयांमधील विरोधाभासी रंग असोत किंवा दागिन्यांमधील असोत, कारण अनेकदा जे मॅचिंग रंग आकर्षक वाटत नाहीत ते काम विरोधाभासी रंग करून दाखवतात. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी जितके विरोधाभासी दागिन्यांच्या फॅशनचे अनुकरण गरजेचे असते तितकेच कपडयांवर योग्य विरोधाभासी दागिने घालणे आवश्यक असते. जसे की, तुम्ही ट्रेंडमध्ये असलेले फिकट रंगाचे कपडे म्हणजे पांढरा, सौम्य करडा किंवा क्रीम रंगाचा ड्रेस निवडला तर त्यावर नेहमी उठावदार, उजळ रंगाचे दागिने घाला.

जर तुम्हाला विरोधाभासी रंगासह फार काही वेगळे करायचे नसेल तर तुम्ही कपडयांच्या रंगांमधून दागिन्यांचा एखादा रंग निवडून सुयोग्य विरोधाभासी पेहराव करू शकता. तुम्ही तुमच्या कपडयांच्या बॉर्डरच्या रंगाला शोभणाऱ्या रंगाचे दागिने घालू शकता. जर तुम्हाला रंगामुळे खुलून दिसणारा लुक हवा असेल तर तुम्ही कपडयांच्या विरुद्ध रंगांचे दागिने निवडा.

लग्नाच्या बांगडया ज्या करतील रुपाला परिपूर्ण

वधूच्या दागिन्यांबाबत बोलायचे झाल्यास त्यात बांगडया महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण त्या तुमच्या पेहरावाला मॅच करून खुलून दिसायला मदत करतात, पण त्यासाठी ट्रेंडवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. जसे की, तुम्ही नाव लिहिलेला वधूचा चुडा, कलाकुसरीने खडे वापरून बनवलेल्या बांगडया, कुंदन, मोत्यांच्या बांगडया, वधूच्या बांगडया, स्टायलिश लटकन असलेल्या बांगडया वापरून तुमच्या या खास दिवसाला तुम्ही अधिकच खास बनवू शकता.

ब्रायडल मेकअपचा ट्रेडिशनल ढंग

* ललिता गोयल

प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं की तिने आपल्या विवाहप्रसंगी सर्वात सुंदर अन् खास दिसावं. तिचा मेकअप ग्लोइंग, नॅचरल आणि लाँगलास्टिंग असावा असं तिला वाटत असतं.

दिल्ली प्रेस भवनमध्ये आयोजित मीटिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट गर्वित खुरानाने ब्रायडलचा ट्रेडिशनल लुकचा मेकअप शिकवण्यासोबत टीका सेटिंग, हेअरस्टाइल व साडी ड्रेपिंगसुद्धा शिकवलं. येथे ट्रेडिशनल लुकच्या मेकअपचं तंत्र जाणून घेऊया…

्रेडिशनल ब्रायडल लुक

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचं व्यवस्थित क्लिंजिंग करा. त्यानंतर एक अंडरबेस लावा जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकून राहिल. गर्वितने ट्रेडिशनल ब्राइडच्या मेकअपमध्ये एक प्रकारच्या पॅनकेक (लस्टर पॅनकेक)चा वापर केला. त्याने मेकअपच्या सुरुवातीला प्रायमर लावलं. त्यानंतर बेस लावला. मग टीएल पावडर लावली. त्यानंतर पॅनकेक लावला. चेहऱ्यावरील डागव्रण लपवण्यासाठी कन्सीलरचाही वापर केला.

गर्वितने सांगितलं की अलीकडे ब्रायडल मेकअपमध्ये शिमर लुक ट्रेण्डमध्ये आहे, त्यामुळे जर एखाद्या नववधूची इच्छा असेल तर ती आपल्या मेकअप आर्टिस्टला शिमर फाउंडेशनचा वापर करायलाही सांगू शकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही शाइनिंग पावडर लावणार असाल, तर लूज पावडरचा वापर करू नका; कारण यामुळे फाउंडेशनची चमक फिकी पडेल. फेसकटिंग व कंटूरिंगच्या माध्यमातून सामान्य चेहरासुद्धा नीटसा कोरीव दिसू लागतो.

हायलाइटरच्या मदतीने चेहऱ्यावरील आकर्षक भाग हायलाइट करा. ब्लशरमध्ये हलक्या शेडचा जसं की पिंक, पीच रंगाचा वापर करा.

डोळे : कोणत्याही वधूच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप खूप महत्त्वपूर्ण ठरतो. डोळ्यांवर आयशॅडो लावण्यापूर्वी आयलिडवर आयवॅक्स लावा. यामुळे आयशॅडो दीर्घकाळ टिकेल. अशाचप्रकारे लोअर आयलिडवर आयशॅडो आयसिलरसोबत लावा, मग ते पसरणार नाही. काजळ पेन्सिलने डोळे हायलाइट करा. काजळ लावल्यानंतर आयलायनर लावा. त्यानंतर मसकारा लावा. मसकारा आतील लॅशेजवर हलक्या रंगाचा आणि बाहेरच्या बाजूला थोड्या गडद रंगाचा वापरा. बाहेरच्या बाजूला थोडा अधिक गडद करा आणि भुवयांकडे थोडा हलका ठेवा. डोळे जर लहान असतील, तर ते मोठे दाखवण्यासाठी पापण्यांच्या बाहेरील कडेवर वरच्या बाजूस हलक्या रंगाची पावडर शॅडो छोट्या ब्लशरच्या मदतीने लावा. क्रीमजवळ गडद रंगाच्या शॅडोचा उपयोग करा परंतु नाकाकडे डोळ्यांच्या आतील भागावर कोणताही रंग वापरू नका. नाहीतर लहान डोळे अधिक लहान दिसतील. कडांवर शॅडो लावण्यासाठी ब्रशचा वापर करा.

ओठ : अलीकडे ग्लॉसी ओठांची फॅशन आहे. यासाठी आधी ओठांना लिपलायनरच्या सहाय्याने आकार द्या. मग ड्रेसला मॅच करणारी लिपस्टिक लावा. लिपस्टिक ब्रशने लावा. यानंतर लिपग्लॉस लावा. लक्षात घ्या की लिपस्टिकचा रंग ब्रायडल ड्रेसहून १वा २ नंबर गडद असावा.

बिंदी : बिंदी ट्रेडिशनल ब्रायडल मेकअपचा महत्त्वपूर्ण हिस्सा ठरते. ब्रायडल बिंदीची निवड चेहऱ्यानुसार करा. जर चेहरा गोल असेल तर लांबट बिंदीची निवड करा आणि लांबट असेल तर गोल बिंदीची आणि जर चौकोनी असेल तर डिझायनर बिंदी लावा.

हेअरस्टाइल : नववधूचा मेकअप खास असेल तर हेअरस्टाइलही डिफरण्ट व एलिगंट असली पाहिजे. ब्राइडला स्टायलिश हेअरस्टाइल देण्यासाठी सर्वप्रथम इयर टु इयर केसांचा एक भाग बनवा. मागच्या केसांचा एक पोनी बनवा. इयर टु इयर भागातून एक रेडियल सेक्शन घ्या आणि क्राउन एरियामध्ये आर्टिफिशिअल बन लावून पिनने सेट करा. मग रेडियल सेक्शनच्या केसांची एकेक बट घेऊन बॅककौंबिंग करून स्प्रे करा. या केसांचा उंच पफ बनवा आणि पिनने व्यवस्थित सेट करा. दोन्ही बाजूंच्या केसांमध्येही स्प्रे करून पोनी वरच्या बाजूला सेट करा.

आता पोनीवर आर्टिफिशिअल लांबट वेणी बनवा. पोनीवर गोल आर्टिफिशिअल मोठा बन लावा. आर्टिफिशिअल केसांमधून १-१ बट घेऊन बनच्यावर पिनने सेट करा. मग त्या केसांची नॉट बनवून बनवरच बॉब पिनने सेट करा. अशीच एक वेणी ३ नॉट अंबाड्यामध्ये गोलाकार तर दुसरीकडेही तशीच नॉट लावा. आता अंबाड्याच्या साइडला आणखीन एक वेणी लावा. अखेरीस केस बीड्सद्वारे अॅक्सेसराइज करा. पुढे समोरच्या बाजूलाही अॅक्सेसराइज करा.

मांगटीका सेटिंग

नववधूचा शृंगार मांगटीक्याविना अपूर्ण भासतो. नववधूच्या साजशृंगारातील हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा मानला जातो. सध्या चांदबाली स्टाइल व स्टोन पेंडेंट मांगटीका चलनात आहे. सेंटर पार्टिंग हेअरस्टाइल व सिंपल ब्रायडल बन हेअरस्टाइलसोबत मांगटीका नववधूचं सौंदर्य खुलवतो. जर कुणी ब्राइड मुगल लुक क्रिएट करू इच्छित असेल तर ते झुमर स्टाइल वा शैंडलियर स्टाइल मांगटीका लावू शकता.

मांगटिक्यासोबत अपडू, हेअर हाफ अप आणि साइड बॅगसारखी हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. या हेअरस्टाइलसोबत कपाळावर चमकणारा मांगटीका अतिशय आकर्षक दिसतो. गोल चेहऱ्याच्या तरुणींनी फ्रंट पफ हेअरस्टाइलसह मांगटीका कॅरी केला पाहिजे. दीपिका पादुकोण व आलिया भट्टसारख्या अभिनेत्री तर मोकळ्या केसांसोबतही टीका कॅरी करत आहेत आणि तरुणी त्यांची स्टाइल फॉलो करतात. जर नववधूचा चेहरा चौकोनी असेल तर ती झुमर स्टाइल टीका कॅरी करू शकते.

जर नववधूचं फोरहेड लहान असेल तर तिने लहान आकाराचा मांगटीका वापरावा. लक्षात घ्या की मांगटीका हेवी असेल तर नथ हलकी वापरा आणि जर मांगटीका हलका असेल तर नथ ठसठशीत वापरा. यामुळ लुक बॅलन्स दिसतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें