* पारुल भटनागर
ज्या प्रकारे केकवर चेरी नसेल तर तो अपूर्ण वाटतो, त्याचप्रमाणे लग्नाचा दिवस जो प्रत्येक मुलीसाठी खास आणि महत्त्वाचा असतो त्यादिवशी तिने पसंत केलेल्या प्रत्येक दागिन्याला विशेष महत्त्व असते. सोबतच ते तिच्या लग्नाच्या पोशाखासाठीही सर्वात महत्त्वाचे ठरतात, कारण दागिन्यांशिवाय स्त्रीचा मेकअप अपूर्ण दिसतो.
परंतु फक्त पोशाखासोबत दागिने घातले म्हणजे वधूचा लुक परिपूर्ण होत नाही तर दागिन्यांच्या ट्रेंडकडेही लक्ष देणे खूप गरजेचे असते, कारण वधू म्हणून तुम्ही तुमच्या दागिन्यांसाह सोहळयात उठून दिसायलाच हवे, सोबतच सर्वांच्या नजरेतही भरणे आवश्यक असते.
चला तर मग दागिन्यांच्या अद्ययावत ट्रेंड्सबद्दल जाणून घेऊया :
सदाबहार कुंदन ज्वेलरी
स्वत:च्या लग्नात राजेशाही लुक असावे असे प्रत्येकीला वाटते. त्यामुळेच तुमचे लुक राजेशाही दिसावे यासाठी रॉयल पर्ल आणि कुंदन नेकलेस खूपच महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच नववधूच्या दागिन्यांच्या पेटीत गेल्यावर्षीही तो ट्रेंडमध्ये होता आणि नवीन वर्षातही राहील. या नेकलेसचे वैशिष्टये असे की, त्याला राजेशाही लुक देण्यासाठी तो वेगवेगळया आकाराच्या कुंदनचा वापर करून डिझाईन केला जातो, सोबतच आकर्षक मोती आणि माळांनी अधिक आकर्षक बनवला जातो.
या हारामध्ये अनेक लेअर्स असतात जे त्याला रुंद, मोठा करून जास्त सुंदर बनवतात. बाजारात तुम्हाला तुमच्या नजरेत भरणारे रॉयल पर्ल आणि कुंदन नेकलेस मिळतील जे तुम्ही तुमच्या नववधूच्या पोशाखासह मॅच करून खरेदी करू शकता. बहुतांश करून या कुंदन नेकलेसमध्ये विविध रंगांच्या वापरावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, जेणेकरून ते वधूच्या कुठल्याही लुकला मॅच होईल.
तुम्ही याच्यासोबत फ्यूजन करूनही ते बनवू शकता. याच्यासोबत त्याच रंगाचे किंवा विरुद्ध रंगाचे कुंदन असलेले कानातले आणि बिंदी लावल्यास निश्चिंतच तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
किंमत : हे तुम्हाला रुपये १ हजार रुपयांपासून ते रुपये २० हजार रुपयांपर्यंत मिळते, जे तुम्ही डिझाईन, तुमचा खिसा आणि आवड लक्षात घेऊन खरेदी करू शकता.
मल्टिकलर लटकन असलेला नेकलेस