६ फूड करतात दुर्गंधी दूर

* पारुल भटनागर

समजा तुम्ही एका पार्टीत गेला आहात आणि तिथे तुमच्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे सर्वजण तुमच्यापासून दूर पळत आहेत तर विचार करा तुम्हाला किती लाजिरवाणे वाटेल. तुमच्या शरीराला येणारा दुर्गंधी हा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम तर करतोच पण तुमचा कॉन्फिडन्सही लूज करतो. त्यामुळे तुम्ही काही अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, ज्या तुमच्या शरीराची दुर्गंधी दूर करतील.

याविषयी रचना डाएटचे डॉ. पवन शेट्टी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की जेव्हा आपला फ्ल्युइड इंटेक चांगला नसतो, तेव्हा आपल्या युरिनचा कलर चेंज होण्याबरोबरच त्यातून दुर्गंधीही येऊ लागते आणि ती जागा प्रत्येक वेळी स्वच्छ न केल्याने आपल्या कपडयातून वास येऊ लागतो आणि त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवतो. त्यामुळे दररोज दर २२ ते ३० मिनिटांनी पाणी पीत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण ट्रान्सफॅटसारखे जंकफूड जास्त प्रमाणात खातो, तेव्हा त्यातून घामाच्या रूपातून जे विषारी पदार्थ निघतात, त्यांना फार दुर्गंधी येते. इतकेच नाही तर ट्रान्सफॅट युक्त पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हरही फॅटी होते. त्यामुळे हेल्दी खाणे घेतले पाहिजे. जेव्हा आपण योग्य आहार घेत नाही, तेव्हा आपल्या इन्टेस्टाइनमध्ये बॅड बॅक्टेरिया तयार होतात, जेणेकरून दुर्गंधी येते.

आहारात हे समाविष्ट करा

लक्षात ठेवा की फ्ल्युइड मेंटेन केल्याने ब्लड क्लॉट्स होत नाहीत आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. त्याचबरोबर युरीन ट्रॅक क्लिअर राहिल्याने इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवत नाही. त्यामुळे प्रॉपर डाएट करण्यासाठी आपल्या आहारात खालील पदार्थ घेण्यास विसरू नका :

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराला दुर्गंधीपासून वाचवण्याचे हे सर्वात सशक्त टूल आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा.

लिंबू : लिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हा शरीराची दुर्गंधी दूर करण्याचे काम करते, त्याचबरोबर यात अॅसिडिक गुण असल्याने हा स्किनच्या पीएच लेव्हलला कमी करण्याचे कामही करतो. ज्यामुळे बॅड बॅक्टेरिया निर्माण होण्यात अडथळे येतात. याशिवाय लिंबात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या सिस्टमला इंपुव करण्यासाठी दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याने करा. अंडरआर्म्स आणि पायांच्या खालच्या भागात लिंबू चोळल्याने थोडयाच वेळात दुर्गंधी नाहीशी होते.

टोमॅटो : टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने हे शरीरात दुर्गंधी पसरवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. यात असलेल्या नॅचरल अॅस्ट्रिजेंटमुळे चेहऱ्यावर घामही येत नाही. त्यामुळे दररोज १/२ कप टोमॅटो ज्यूस अवश्य प्या किंवा भोजनात सॅलड म्हणून टोमॅटोचा समावेश करा. ज्या जागी जास्त घाम येतो, तिथे १०-१५ मिनिटे टोमॅटो लावून ठेवा.

दही : यात उपयुक्त असे जीवाणू असल्याने हे जेवण पचण्यास साहाय्य करते. त्याचबरोबर हे सहजपणे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

वेलची : वेलचीसुद्धा फार उपयुक्त असते. जर तुम्हाला वाटते की तुमच्या शरीरातून छान सुगंध यावा तर खाण्यात १-२ वेलची दाणे अवश्य घाला, कारण यात बॅड बॅक्टेरिया शरीरातून बाहेर काढण्याची शक्ती असते.

आले : आले एकीकडे शरीराची दुर्गंधी दूर करून तुम्हाला फ्रेश फिलिंग देते, त्याचबरोबर हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कामही करते.

स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी डेली अँटीबॅक्टेरियल साबणाने अंघोळ करा आणि स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. जेव्हाही तुम्ही बाहेरून याल तेव्हा हातपाय, तोंड  स्वच्छ धुतले पाहिजे नाहीतर घाम येऊन दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

शरीराची दुर्गंधी आता नाही

– पारूल भटनागर

नेहा खूपच सुंदर होती व नेहमी युनिक स्टाईल परिधान करणे पसंत करायची, परंतु तरीदेखील तिच्या मैत्रिणी तिच्याजवळ जास्त वेळ बसणे टाळायच्या. ती मनातल्या मनात विचार करायची की मी तर सर्वांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या स्टाईल परिधान करते, परंतु तरीदेखील सगळया माझ्यापासून पळ काढतात.

एक दिवस जेव्हा तिने वैतागून स्नेहाला याचे कारण विचारले, तेव्हा तिने म्हटले की तुझ्या शरीरातून खूप दुर्गंध येते, जी कोणीही सहन करणे अवघड आहे. त्यामुळे सगळेजण तुझ्यापासून दूर पळतात. तेव्हा कुठे नेहाच्या खरी समस्या लक्षात आली व तिने या समस्येच्या निराकरणाविषयी माहिती घेतली, जेणेकरून तिच्या शरीराची दुर्गंधी तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कमी करणार नाही.

काय आहे शरीराची दुर्गंध

शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी शरीरातून घाम बाहेर पडतो. तसं बघता घामासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. यात प्रमुख आहेत बॅक्टेरिया. यामुळेच नेहमी शरीरातून दुर्गंधी येते. बॅक्टेरिया अॅपोक्राईन ग्रंथीच्या उत्सर्जनातून विकसित होतात. हे अमिनो अॅसिडची निर्मिती करतात. परिणामी दुर्गंधीयुक्त गंध येतो.

दुर्गंध घालवण्यासाठीचे घरगुती उपाय

बेकिंग सोडा : हा त्वचेतून मॉईश्चर शोषून घेण्यासोबतच दुर्गंध दूर करतो. सोबतच हा बॅक्टेरिया नष्ट करून नैसर्गिक सुवासासारखे काम करतो.

कसे लावावे : एक चमचा बेकिंग सोडयामध्ये एक चमचा लिंबाचा रस    मिसळून तो काख व त्या जागी लावा, जिथे जास्त घाम येतो. नंतर थोडयावेळाने पाण्याने धुवावे. असे काही आठवडयांपर्यंत रोज करावे.

अॅपल साइडर विनेगर : हा बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अतिशय अॅक्टिव्ह इन्ग्रीडियंट आहे. सोबतच हा त्वचेचा पीएच बॅलन्स संतुलित ठेवून शरीराची दुर्गंधी कमी करण्याचे काम करतो.

कसे लावावे : अॅपल साइडर विनेगरमध्ये कापसाचा बोळा घालून तो काखेमध्ये चोळावा. नंतर दोन ते तीन मिनिटांनी धुवावे. असे रोज दोन वेळा करावे.

लिंबाचा रस : याचा अॅसिडिक गुणधर्म त्वचेच्या पीएच लेवलला कमी करतो, ज्यामुळे दुर्गंध निर्मिती करणारा बॅक्टेरिया वाढू शकत नाही.

कसे लावावे : लिंबू कापून त्याचा एक भाग काखेवर चांगला रगडावा व नंतर ते धुवावे. ही प्रक्रिया रोज तोपर्यंत करावी, जोपर्यंत दुर्गंधी निघून जात नाही.

रोजमेरी : यात सुगंधाचा नैसर्गिक गुण असल्याकारणाने हा दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्याचे काम करतो.

कसे लावावे : चार कप गरम पाण्यात अर्धा कप वाळलेली रोज मेरीची पाने घालून दहा मिनिटे ठेवावे. नंतर हे पाण्यात घालून अंघोळ करावी. ही प्रक्रिया रोज केल्याने दुर्गंधी निघून जाईल.

टी ट्री ऑईल : टी ट्री ऑईलमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हे त्वचेत असणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते.

कसे लावावे : दोन चमचे पाण्यात दोन थेंब ऑइल घालून काखेवर लावावे. तुम्ही या मिश्रणाला स्प्रे बॉटलमध्येदेखील भरून ठेवू शकता. यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका होते.

या गोष्टींचीदेखील विशेष काळजी घ्यावी

* जेव्हा तुम्ही शॉवर घ्याल, तेव्हा प्रयत्न करा की एक वेळेस कोमट पाण्यानेदेखील अंघोळ करावी, कारण हे आपल्या त्वचेत लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते.

* नॅचरल फायबरचे कपडे परिधान करावेत, कारण यात हवा खेळती राहते, ज्याने घाम साठत नाही.

* एका संशोधनानुसार लसूण, कढीलिंब वा अन्य मसाले तुमच्या घामाचा वास वाढवू शकतात. त्यामुळे मसालेदार न खाण्याचे पथ्य पाळावे.

* आपल्या काखेतील केस वेळोवेळी साफ करत रहावेत, कारण केस असल्याने घाम शोषण्याची प्रक्रिया मंदावते, ज्याने शरीरातून दुर्गंधी येते.

* रोज आपली काख अँटी बॅक्टेरियल साबणाने स्वच्छ करावी, कारण यामुळे बॅक्टेरियाच्या संख्येत घट होते व शरीरातून दुर्गंधी येत नाही.

* जेव्हा तुम्ही अंघोळ कराल, तेव्हा आपल्या शरीराला चांगल्या रीतीने पूसा, विशेषत: त्याजागी जिथे सर्वात जास्त घाम साठतो.

* उन्हाळयात जास्त घाम आल्याकारणाने कपडे लवकर ओले होतात, जे जास्त वेळ घातल्याने दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे ते बदलावेत.

* आवडीचा सुवास असणाऱ्या परफ्युम्सना आपल्या पर्सनॅलिटीचा भाग जरूर बनवा. यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका तर होईलच, तुम्हालाही ताजेतवाने वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें