गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २५ वर्षीय अविवाहित तरुण आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मेव्हणीवर माझे प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मुलगीही लग्नासाठी तयार आहे. एवढेच नव्हे, तर तिच्या घरच्यांचाही या लग्नाला काही विरोध नाही. पण माझी आई या लग्नाच्या ठाम विरोधात आहे. याला मजबूत कारणही आहे.

खरे म्हणजे माझी वहिनी (मुलीची बहीण) खूप उग्र आणि घमेंडखोर स्वभावाची आहे. तिने कधीही आपल्या पतीला आणि ना ही घरातील कुठल्याही सदस्याला मानसन्मान दिला. माझ्या वहिनीने घरातील लहानांनाही कधी जिव्हाळा दाखवला नाहीए. तिला फक्त आणि फक्त स्वत:ची काळजी आहे. ती आपल्या मनाप्रमाणे वागते.

याच कारणामुळे माझा दादा आणि आई-वडिलांचा विरोध असतानाही, ती एका खासगी कंपनीत खूपच खालच्या पातळीवरील नोकरी करू लागलीय. त्यामुळे घरातील काम व मुलांची जबाबदारी आईवर येऊन पडली आहे. माझी आई म्हणते की जर मोठ्या बहिणीने आमच्या नाकीनऊ आणले आहेतच. रोज घरात भांडणं करते, अशा वेळी तिच्या बहिणीशी लग्न केलेस, तर दोघी बहिणी मिळून घराची दुर्दशा करतील, हे मला कळले पाहिजे. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मोठ्या बहिणीचा स्वभाव असा आहे, याचा अर्थ छोटी बहीणही कडक स्वभावाची असेल, असे काही नाही. छोट्या बहिणीचा स्वभाव खरोखरंच मोठ्या बहिणीपेक्षा वेगळा आहे. ती खूप सरळसाधी असून तिला जबाबदारीची जाणीव आहे.

मी खूप समजावूनही घरातले लोक तयार होत नाहीएत. मी काय करू? मला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांनी परवानगी द्यावी, अशीही माझी इच्छा आहे. कृपा करून काहीतरी उपाय सांगा.

मी त्या मुलीला जेवढे जाणले आहे, ती आपल्या बहिणी(वहिनी)सारखी मुळीच नाहीए, पण ही गोष्ट मी कुटुंबीयाना समजावू शकत नाहीए. आई हट्टाला पेटली आहे की कुठल्याही मुलीशी (मग भले ती सुंदर नसली तरी) माझे लग्न लावून       देणार, पण या मुलीशी मुळीच नाही. मी काय करू?

घरच्यांनी तुमची वहिनी म्हणजेच मुलीच्या मोठ्या बहिणीचे वागणे पाहिले आहे. त्यांना जो वाईट अनुभव  मिळाला, त्यामुळे त्यांना असे लग्न त्या घरात करून देण्यास भीती वाटतेय. जर त्यांच्या बाजूने विचार केला, तर ते आपल्या जागी योग्यच आहेत.

तुमचे म्हणणे आहे की ती मुलगी (आपली प्रेयसी) आपल्या बहिणीसारखी नाहीए, तर तुम्हाला कळले पाहिजे की, लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या जीवनात खूप फरक असतो. विवाहाच्या पूर्वीचे जीवन काल्पनिक असते. तिथे प्रेयसी आणि  प्रियकर स्वत:ला एकमेकांसमोर उत्तम दर्शवण्याचाच प्रयत्न करतात. खरे गुणदोष तर लग्नानंतर कळतात. म्हणून लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी चांगल्याप्रकारे विचार करा. मनाबरोबरच मेंदूचेही ऐका. लग्न हा जीवनाचा महत्त्वाचा निर्णय आहे, जो रिटेक होत नाही.

जर तुम्हाला मुलीमध्ये काही वाईट गुण दिसत नाहीत, तर घरातील मंडळींना समजावण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजावा की दुसरी मुलगी जिची ते निवड करतील, ती चांगली आणि साधी असेलच, हे जरूरी नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्या पसंतीकडे दुर्लक्ष करू नये. जर ते तुमचे म्हणणे ऐकत नसतील, तर एखाद्या नातेवाइकाची किंवा कौटुंबिक मित्राची मदत घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, या लग्नाच्या चांगल्या-वाईट परिणामांना आपण जबाबदार असाल.

मी एक सुशिक्षित गृहिणी आहे. लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. २ गोंडस मुले आहेत. पती खूप प्रेम करणारे आणि काळजी घेणारे आहेत. मी हरप्रकारे आनंदी आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक सल लपून राहिला आहे. त्यामुळे मी दु:खी होते.

खरे तर शाळा-कॉलेजमध्ये मी खूप हुशार विद्यार्थिनी होते. लहानपणापासून माझी इच्छा होती की शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करेन, पण कॉलेजमधून बाहेर पडताच लग्न झाले. मग २ मुलांची देखभाल आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढी व्यस्त झाले की मनातील इच्छा मनातच राहिली. मला सारखे वाटत राहते की गृहिणीचे काम हे काय काम आहे? हे तर अशिक्षित आणि कमी शिकलेल्या बायकाही चांगल्याप्रकारे करतात. माझे शिक्षण आणि उच्चशिक्षित असल्याचा काय फायदा? मी काय करू?

आपण एक कुशल गृहिणी आहात. आपण कुशलतापूर्वक घरकुटुंबाची जबाबदारी पार पाडत आणि मुलांची चांगली देखभाल करत आहात, ही कमी महत्त्वाची गोष्ट नाहीए. तुम्ही असे का समजता की गृहिणी बनून राहिल्यास आपले शिक्षण वाया जातेय. असे म्हणतात की एका स्त्रीने शिक्षण घेतल्याने संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे कल्याण होते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्यांना कमी समजू नका.

जर आपल्याला खंत वाटत असेल की गृहिणीच्या कर्तव्यामुळे आपण काही खास करू शकला नाहीत, तर आपण घरबसल्या ट्युशन इ.चे काम करू शकता. यामुळे आपण आपल्या शिक्षणाचा सदुपयोगही कराल शिवाय आपल्याला मानसिक समाधानही मिळेल. एखादी एनजीओ वगैरेही जॉइन करू शकता.

गृहशोभिकेचा सल्ला

  • मी ३१ वर्षांची विवाहित स्त्री आणि ४ वर्षांच्या मुलीची आई आहे. मी एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर जिवापाड प्रेम करतो. मी विवाहित आणि एका मुलाची आई असूनही आम्हा दोघांचे प्रेमसंबंध खूप चांगले आहेत.

आम्ही निर्धास्त होऊन शारीरिकसंबंधही ठेवले आहेत. पण आता अचानक मला असं वाटू लागलं आहे की अशा प्रकारचं वाईट कृत्य मी करायला नकोय. म्हणून मी त्या मुलापासून दुरावा निर्माण केला आहे. पण तरी तो मला वारंवार फोन करत आहे.

तो मला भेटायला बोलवत आहे. मी त्याला एकदा भेटू का? मी काय करू सांगा?

तुम्ही एक विवाहित स्त्री आहात. अशा प्रकारे कोणा दुसऱ्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवून तुम्ही केवळ आपलं वैवाहिक जीवन धोक्यात घालत नव्हतात, तर त्या मुलाचीही दिशाभूल करत होता. हे तर बरं झालं की वेळीच तुम्हाला तुमची चूक कळली आणि तुम्ही तुमचं पाऊल मागे घेतलं. तुमच्यावर केवळ तुमच्या कुटुंबाचीच नव्हे तर तुमच्या लहान मुलीच्या पालनाचीही जबाबदारी आहे. म्हणून आपल्या निर्णयावर ठाम राहा.

तुमच्या प्रियकराला स्पष्ट सांगा की तुम्हाला त्याला भेटायचं नाहीए. म्हणून त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री असून एका किशोरवयीन मुलाची आई आहे. अलीकडे मी माझ्या एका कौटुंबिक समस्येमुळे खूप चिंतित आहे. मी शासकीय शाळेत शिक्षिका आहे. मात्र माझ्या पतींची सध्या फार वाईट अवस्था सुरू आहे. ते ज्या खाजगी कंपनीमध्ये आधी काम करायचे तिथून त्यांना अचानक असं सांगून काढून टाकलं गेलं की सध्या कंपनीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे.

आता समस्या ही आहे की त्यांना आपली पोझिशन आणि पात्रतेनुसार काम मिळत नाहीए. त्यांना आधीच्या कंपनीमध्ये जितका पगार मिळत होता, तितक्याच पगारावर काम करायचं आहे. असं घरातच रिकामं बसून त्यांना दोन महिने झालेत.

मी त्यांना सतत सांगते की पगार कमी मिळाला तरी हरकत नाही, पण त्यांनी नोकरीत रूजू व्हावं. पण ते अजिबात ऐकतच नाहीएत. म्हणतात, जग पुढे चालले आहे आणि मी का म्हणून मागे जाऊ? तुम्हीच सांगा, मी त्यांना कसं समजावू?

तुम्ही तुमच्या पतींना या गोष्टीसाठी तयार करा की त्यांना जर त्यांच्या मनासारखं काम मिळालं असेल आणि कंपनीही चांगली असेल तर त्यांनी पगाराला जास्त महत्त्व देऊ नये. कष्ट केले तर पुढे जाण्याचीही संधी मिळेल. नोकरी करता करता यापेक्षा चांगल्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण सतत जर ते काही काळ रिकामे बसले तर त्यांचा आत्मविश्वासही खचेल आणि मग चांगली नोकरी मिळणंही आणखीनच कठीण होऊन बसेल.

  • मी १८ वर्षांची तरुणी असून एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर खूप प्रेम करतो पण अलीकडे तो माझ्यावर नाराज आहे. त्याच्या नाराजीचं कारणही मी स्वत:च आहे. खरंतर तो जरा संशयी स्वभावाचा आहे. प्रत्येक गोष्टीवर तो संशय घेत असतो. त्याच्या या वागणुकीमुळे मी खूपच त्रस्त झाले होते.

प्रत्येक गोष्टीसाठी तो मला सतत जाब विचारायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी मीही एक मूर्खपणाचं पाऊल उचललं. मी एका मुलाशी मैत्री केली.

पण तो मुलगा खूपच धूर्त निघाला. त्याने मला फूस लावून माझ्याशी शारीरिकसंबंधही ठेवले आणि त्यानंतर माझ्याशी बोलणंही सोडून दिलं. माझ्या या बालिश वागणुकीचा आता मला खूपच पश्चात्ताप होत आहे.

माझा प्रियकर जो माझी इतकी पर्वा करायचा तोही मला भाव देत नाहीए. तुम्हीच सांगा, मी काय करू?

तुम्ही तुमच्या प्रियकराच्या संशयी स्वभावामुळे जर त्रस्त होता तर यासाठी त्याला तुम्ही समजावू शकला असता, की मैत्रीमध्ये एकमेकांवर विश्वास असणं फार जरुरी आहे. नाहीतर मैत्री पुढे जात नाही. तुम्ही अजाणतेपणी जी चूक केली त्याच्यासाठी तुम्हाला आता अपराधी वाटत आहे, हेच पुरेसं आहे. आपल्या प्रियकराला समजावण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्यावर प्रेम करतो तर नक्कीच तुमचं ऐकून घेईल. तुम्ही उगाच काळजी करू नका.

  • माझा एक चुलत भाऊ आहे. आम्ही दोघे समवयीन आहोत. आम्ही जेव्हा कधी काकांच्या घरी राहायला जातो तेव्हा रात्रीच्या वेळेस माझा भाऊ माझ्याजवळ येतो. पण त्यावेळेस तो ज्याप्रकारे माझ्यासोबत अश्लील चाळे करतो ते मला आवडत नाहीत. यासाठी मला त्याला अडवताही येत नाही की घरातही मी याविषयी कोणाला सांगू शकत नाही. कृपया तुम्हीच सांगा, मी काय करू?

तुमचा चुलतभाऊ रात्री तुमच्यासोबत अश्लील चाळे करत असेल तर तुम्ही त्याच्या खोलीमध्ये झोपायला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीसोबत झोपू शकता. पण तुम्ही असं काहीच करत नाहीए. तुम्हाला जर त्याची वागणूक खरोखरच आवडत नसती तर तुम्ही पहिल्यांदाच त्याला धमकावलं असतं, म्हणजे त्याने पुन्हा असं करण्याचं धाडस केलं नसतं. पण असं वाटतंय की तुम्हालाही या सगळ्यात मज्जा येते, म्हणून तुम्ही त्याला अडवत नाहीत. अर्थातच, या सगळ्यात तुमची मूक सहमती आहे. पण तुम्हाला हे कळायला हवं की यामुळे पुढे जाऊन तुम्ही अडचणीत सापडू शकता.

म्हणून त्याला यासाठी नकार द्या. तो ऐकत नसेल तर सक्तपणे त्याला धमकी द्या की तुम्ही तुमच्या कुटुंबियांकडे त्याची तक्रार कराल. अशाने तो आपोआपच सरळ होईल.

आरोग्य परामर्श

* डॉ. पूजा राणी, आयव्हीएफ एक्सपर्ट, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, रांची

प्रश्न :  माझ्या सुनेचे वय ३१ वर्षे आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मात्र, अजून ती आई बनू शकली नाही. मुलगा आणि सुनेच्या अनेक तपासण्या आणि उपचार केले, परंतु समस्या दूर झाली नाही. सून खूप उदास राहू लागली आहे. कधी-कधी कारणाशिवाय रडू लागते. कृपया सांगा काय करू?

उत्तर : कुठल्याही महिलेसाठी आई बनणे हा तिच्या जीवनातील सर्वात सुखद अनुभव असतो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या सुनेची मनस्थिती समजू शकते. तुमच्या सांगण्यावरून वाटते की आई न बनल्यामुळे तुमच्या सुनेला नैराश्य आले आहे. तुम्हाला तिला या स्थितीतून बाहेर काढावे लागेल. कारण तणाव वांझपणाची समस्या आणखी वाढवतो. तणावामुळे प्रजनन तंत्रासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. जगभरात वांझपणाची ५० टक्के प्रकरणे तणाव व इतर मानसिक समस्यांमुळे होतात. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या मानसशास्त्र तज्ज्ञाला दाखवा. तिला खूश ठेवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करा. कदाचित त्यांचे आई न बनण्याचे कारण मानसिकही असू शकते.

प्रश्न : मी लठ्ठपणामुळे आधी गर्भधारणा करू शकले नव्हते. परंतु आता मी माझे वजन कमी केले आहे, तरीही गर्भधारणा करण्यात मला समस्या येत आहे. गर्भधारणा करण्यासाठी आता आयव्हीएफ हाच एकमेव उपाय राहिला आहे का?

उत्तर : लठ्ठपणामुळे गर्भधारणा करण्यात समस्या येऊ शकते. परंतु लठ्ठ महिला कधीही आई बनू शकत नाहीत, असे नाही. आता तर तुम्ही तुमचे वजनही कमी केले आहे. सर्वप्रथम एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटून आपल्या वांझपणाचे कारण जाणून घ्या.

आयव्हीएफ वांझपणावर उपचार करण्यासाठी एकमेव उपाय नाहीए. या समस्येची अनेक कारणे असू शकतात. जेव्हा यावर योग्य प्रकारे डायग्नोसिस आणि उपचार केले जातील, तेव्हा सहजपणे गर्भधारणा करता येऊ शकते. फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये औषधे, हार्मोन थेरपी, आययूआय सर्वात प्रभावी उपचारपद्धती आहे.

काही वेळा जीवनशैलीत बदल करूनही वांझपणाची समस्या दूर होऊ शकते. जर या सर्व प्रयत्नांनंतरही संतानसुखाची प्राप्ती झाली नाही, तर मात्र आयव्हीएफ तंत्राची मदत घेता येईल.

प्रश्न :  माझे वय ३८ वर्षे हे आणि आता माझा मेनोपॉज सुरू झाला आहे. माझ्यासाठी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा होण्याची काही शक्यता आहे का?

उत्तर : मेनोपॉजसाठी ३८ वर्षे ही खूप लहान वय आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की हा खरोखरच मेनोपॉज आहे की दुसऱ्या कुठल्या कारणामुळे मासिक पाळी बंद झाली आहे. अल्ट्रासाउंडने मेनोपॉजची पुष्टी होते. मेनोपॉजमध्ये अंडेनिर्मितीची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे सहजरीत्या गर्भधारणा करणे अशक्य आहे. अशा वेळी आयव्हीएफ तंत्र गर्भधारणा करण्यात मदत करते. डोनर प्रोग्रामद्वारे दुसऱ्या एखाद्या महिलेचे अंडे घेतले जाते आणि त्यांना जोडीदाराच्या स्पर्मने फलित केले जाते. या भ्रूणाला महिलेच्या गर्भाशयात इम्प्लान्ट केले जाते.

जर दुसऱ्या एखाद्या कारणामुळे मासिक पाळी बंद झाली असेल, तर त्या कारणाचा शोध घेऊन उपचार घेऊ शकतो.

प्रश्न : मी ३३ वर्षीय गृहिणी आहे. लग्नाला १२ वर्षे झाली आहेत, पण आम्हाला अजून मूलबाळ नाही. आम्हाला आयव्हीएफद्वारे मूल हवे आहे, पण मी असे ऐकलेय की अशा प्रकारे जन्मलेल्या मुलामध्ये जन्मत:च दोष निर्माण होण्याची जास्त शक्यता असते?

उत्तर : आयव्हीएफ तंत्राद्वारे जन्म घेणाऱ्या मुलांमध्ये जन्मत:च विकृती असण्याची शक्यताही, सामान्य गर्भधारणेद्वारे जन्म घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत केवळ १-२ टक्के वाढलेली असते. सामान्यत: गर्भधारणेमध्ये ही शक्यता १५ मुलांमध्ये १ अशी असते आणि आयव्हीएफमध्ये ती प्रत्येक १२ मुलांमध्ये १ अशी असते.

असिस्टिड रीप्रॉडक्टिव्ह टेक्निक्समध्ये रोज नवीन तंत्र विकसित होत आहेत. हे केवळ त्याच लोकांचीच मदत करत नाहीत, जे काही कारणामुळे संतानहिन आहेत, शिवाय आनुवंशिकरीत्या निरोगी बाळाला जन्म देण्यासही मदत करत आहे.

अशी अनेक दाम्पत्य आहेत, जी सामान्य आहेत व वांझ नाहीत. परंतु ती अशा जीन्सची संवाहक आहेत, जे एखाद्या आनुवंशिक रोगाचे कारण आहे. उदा. थॅलेसीमिया, हनटिंग्टन डिसीज, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम इ. या प्रक्रियेमुळे अशा लोकांनाही निरोगी मूल मिळविण्यास मदत होत आहे. भ्रूण विकसित केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत तपासणी होते. केवळ तेच भ्रूण महिलेच्या गर्भामध्ये इम्प्लान्ट केले जाते, ज्यामध्ये जेनेटिकल काहीही समस्या नसते.

पूर्वी आयव्हीएफचे यश २०-४० टक्केच असे. परंतु संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की सर्वश्रेष्ठ भ्रूणांना निवडण्याचे जे आधुनिक तंत्र आहे, ते याच्या यशाचा दर ७८ टक्के वाढवते.

प्रश्न : मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. संतानप्राप्तीसाठी सर्व प्रयत्न केले. आता आम्हाला आयव्हीएफची मदत घ्यायची इच्छा आहे. पण असे ऐकलेय की हा एक धोकादायक आणि खूप खर्चिक उपचार प्रकार आहे?

उत्तर : नाही, हा धोकादायक नाहीए, तर हा एक सुरक्षित उपचार आहे. केवळ १-२ टक्के महिलाच गंभीर ओव्हेरियन हायपर स्टीम्युलेशन सिंड्रोमच्या कारणामुळे आजारी पडतात. आयव्हीएफ तंत्राची सफलता जवळपास ४० टक्के असते. हे यश केवळ उपचार तंत्रावर नव्हे, तर महिलांचे वय, वांझपणाची कारणे, बायोलॉजिकल आणि हार्मोनल कारणांवरही अवलंबून असते.

हा महागडा उपचार आहे. परंतु गेल्या वर्षांमध्ये यावर होणाऱ्या एकूण खर्चात जास्त वाढ झालेली नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें