पुन्हा आली बूट कटची फॅशन

* मोनिका गुप्ता

फॅशनचा अर्थ आहे कुल, हॉट आणि सेक्सी दिसणे. स्वत: कुल, हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी गरज आहे योग्य कपडयाच्या निवडीची आणि ते व्यवस्थित कॅरी करण्याची.

फॅशन जगतात डेनिमचा वेगळाच स्वॅग आहे. ९०च्या दशकात घातल्या जाणाऱ्या बूट कट जीन्सने पुन्हा एकदा फॅशन जगतात पुनरागमन केले आहे. करीना कपूर, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, काजोल, रवीना टंडन यांच्यासारख्या अनेक हिरोइन्सना तुम्ही ९०च्या दशकातील चित्रपटांमध्ये बूट कट जीन्स घालून नक्कीच पाहिले असेल. तोच बूट कट आता पुन्हा फॅशनमध्ये प्रचलित झाला आहे.

बूट कट जीन्सला बेलबॉटम आणि स्किनी फ्लेअर्ड जीन्ससुद्धा म्हटले जाते. या जीन्सचे वैशिष्टय असे की तुम्ही हे कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही लुकसोबत वापरू शकता.

बूट कट फॅशनमध्ये बॉलीवूड

फॅशनच्या बदलांमध्ये फॅशन डिझायनर्ससोबत बॉलीवूड स्टार्सचाही महत्त्वपूर्ण सहभाग असतो. आपली फॅशन बॉलीवूडच्या ट्रेंडप्रमाणे आत बाहेर होत राहते. एखादा नवीन चित्रपट आला आणि तो हीट झाला की चित्रपटातील फॅशनचा ट्रेंड आपला स्टाईल स्टेटमेंट बनतो. ज्याप्रकारे जुन्या चित्रपटांना जुन्या गाण्यांना नव्या प्रकारे रीमेक केले जाते, तशाच प्रकारे फॅशनचासुद्धा रीमेक केला जातो. प्लाजो, क्रोप टॉप, लाँग स्कर्ट, हाय वेस्ट जीन्स, बूट कट जीन्स हे सर्व ९०च्या दशकात वापरलं जायचं. आता हे सगळे फॅशनमध्ये पुन्हा आले आहेत. ९०च्या दशकातील चित्रपटांमध्ये कितीतरी हिरोइन्स बूट कट जीन्समध्ये दिसायच्या.

नवनव्या लग्नाच्या बंधनात अडकलेली फॅशन क्वीन सोनम कपूर आहूजासुद्धा बूट कट स्टाईलच्या ड्रेसमध्ये दिसली. निळ्या रंगांच्या या ड्रेसमध्ये सोनम एकदम क्लासी आणि एलीगंट दिसत होती.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करीअरची सुरूवात करणारी आलिया भट्टसुद्धा स्वत:ला फॅशनच्या बाबतीत मागे ठेवत नाही. निळ्या डेनीम बूट कट जीन्ससोबत पांढऱ्या टीशर्टमध्ये आलिया भट्ट आपल्या मित्रांसोबत लंचला जाताना दिसली.

‘मुन्नी बदनाम’सारख्या आयटम साँगवर सगळ्यांना नाचवणारी मलायका अरोरा नेहमी आपल्या लुक्स आणि ड्रेसिंगसाठी सोशल मिडीयावर चर्चेत असते.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी अॅक्टिव्ह असणारी मलायका आपल्या रिसेंट पोस्टमध्ये अत्यंत फॅशनेबल आणि कुल लुकमध्ये दिसली. ब्ल्यू डेनीम बूट कट जीन्ससोबत लांब फेदर जॅकेट आणि ब्लॅक शेडचा तिचा हा लुक खूप चर्चेत राहिला.

अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावणारी दीपिका पादुकोण एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत आपल्या हॉट आणि सेक्सी लुक्ससाठी नेहमी बातम्यांमध्ये असते.

बूट कटला कसे कराल कॅरी

आजचे तरूण स्वत:ला वेगळे आणि स्टायलिश दर्शवण्याच्या प्रयत्नात असतात. ड्रेसिंग सेंसची समज तर सगळ्यांनाच असते. परंतु योग्य फॅशन-सेंसची समज फार कमीजणांना असते. केवळ डिझायनर ड्रेस घातल्याने तुम्ही स्टायलिश दिसू शकत नाही. ती योग्य पद्धतीने कॅरी करूनच तुम्ही स्टायलिश दिसू शकता. बूट कट जीन्सचा ट्रेंड वेळोवेळी बदलत राहिला आहे. कधी हायवेस्ट, कधी लो वेस्ट तर कधी स्किनी. परंतु सध्या जो ट्रेंड आहे, तो आहे बूट कट जीन्सचा. बूट कट जीन्सचा ट्रेंड एका वर्षांपूर्वीसुद्धा होता आणि आता पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहे.

जर तुम्ही असा विचार करून काळजीत पडला असाल की कॅरी कशी करायची तर चला जाणून घेऊ ही कॅरी करायच्या काही टीप्स :

* जर तुम्ही मित्रांबरोबर हँगआऊटचा प्लान बनवत असाल तर तुम्ही बूट कट जीन्ससोबत डेनीम जॅकेट किंवा प्रिंटेड व्हाईट टॉप कॅरी करू शकता.

* जर तुम्ही बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणार असाल, तर बूट कट जीन्ससोबत क्रॉप टॉप कॅरी करा.

* शॉपिंगला जायचे असो किंवा मुव्ही बघायला जायचे असो, बूट कट जीन्स ही तुमची योग्य निवड आहे. बूट कट जीन्सवर हॉट शर्ट घालून तुम्ही परफेक्ट दिसाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें