१७ ब्रायडल केसांसाठी टीप्स

* गरिमा पंकज

प्रत्येकासाठी लग्नाचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. विशेषत: मुलींसाठी, कारण त्या दिवशी त्यांना सगळयात सुंदर दिसायचे असते. भावी वधूच्या मेकअपमध्ये सुंदर केसांचे महत्त्व खूप जास्त असते. जर तुम्हीही या हिवाळयाच्या ऋतूत लग्न करणार असाल आणि केसांच्या समस्येने त्रस्त असाल किंवा तुमचे केस अधिक आकर्षक, निरोगी आणि चमकदार बनवायचे असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा :

* लग्नाच्या काही दिवस आधी वधू-वर खूप घाबरून जातात. तणाव वाढतो. तणाव आणि चिंता यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते आणि डोक्यावरची त्वचाही कमकुवत होते. अशावेळी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सकाळी फिरायला जा. नियमित व्यायाम करा.

* भावी वधूला अनेकदा लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर जावे लागते, त्यामुळे धूळ आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत आणि खराब होतात. याशिवाय जास्त वेळ उन्हात राहिल्यानेही केसांमधील ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस गळण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात. त्यामुळे कडक उन्हात बाहेर न जाणे उत्तम. निघायचेच असेल तर डोक्यावर स्कार्फ बांधून जा.

* लग्नाच्या दिवशी आणि त्याआधीही अनेक विधी असतात. या दरम्यान वधूला वेगवेगळया केशरचना कराव्या लागतात. हेअर ड्रायर, हॉट रोलर्स, फ्लॅट इस्त्री आणि हेअरस्टाइलसाठी वापरल्या जाणाऱ्या कर्लिंग चिमटयांमुळेही केस खराब होतात. वारंवार कलर ट्रीटमेंट केल्यानेही त्याचा केसांवर परिणाम होतो, कारण त्यात असलेली केमिकल्स केसांना इजा पोहोचवतात. त्यामुळे हेअर स्टाइलच्या साधनांचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

* शरीर हायड्रेट ठेवा. त्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतील. भरपूर पाणी प्या.

* केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट घेत राहा. केस गळती रोखण्यासाठी अँटीब्रोकरेज ट्रीटमेंट घ्या.

* केसांचे आरोग्य थेट आपल्या आहाराशी संबंधित असते. मजबूत आणि निरोगी केसांसाठी जीवनसत्त्व बी १२, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि झिंक म्हणजेच जस्त तुमच्या आहारात मुबलक प्रमाणात असायला हवे. झिंक हे अवेळी केस पांढरे होण्यापासून प्रतिबंध करते आणि केस गळतीही थांबवते. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. हे केस आणि डोक्यावरील त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

* केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर कमीत कमी करा. त्यांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. टॉवेलच्या मदतीने किंवा थोडावेळ उन्हात बसून केस सुकवणे हा सर्वात सोपा आणि योग्य मार्ग आहे. तुम्हाला हेअर ड्रायर वापरून केस सुकवायचे असतील तर त्याआधी केसांना सीरम लावा.

* केसांच्या पोषणासाठी तेल खूप महत्त्वाचे असते. नियमित तेल लावणे केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. ते रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते आणि केस नैसर्गिकरित्या चमकदार बनवते.

* ओल्या केसांवरून फणी फिरवून ते विंचरू नका, नाहीतर बरेच केस तुटतात.

* केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही हेअर पॅक वापरू शकता. त्यासाठी केसांना मेहंदी लावा किंवा अंडी आणि दही मिसळून हेअर पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे कोंडा निघून जातो आणि केस तुटण्याचा वेग कमी होतो.

* लग्नाच्या सुमारे महिनाभर आधी केसांना व्यवस्थित मेहंदी लावा.

* योग्य आहार घ्या, जेणेकरून केस कमकुवत होणार नाहीत.

* हिवाळयात कोंडयाची समस्या होऊ शकते. केसांमध्ये खूप कोंडा होत असेल तर अँटीडँड्रफ शाम्पू वापरा किंवा लिंबाचा रस इत्यादी लावून कोंडा दूर करण्याचा प्रयत्न करा. कोंडयामुळे केसांचे खूप नुकसान होते.

* लग्नापूर्वी केसांच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी करू नका. आठवडयातून किमान ३ वेळा शाम्पू करा. शाम्पूनंतर कंडिशनर लावा. प्रथिनांनीयुक्त शाम्पू वापरा.

* ओले केस बांधू नका किंवा विंचरू नका. केसांची मालिश करा.

* केसांना तेलासोबत कोरफडीचा गर लावा. त्याने टाळूची मालिश करा. ते केसांच्या मुळांना हायड्रेट करते. ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

* केस धुण्यासाठी किंवा ओले करण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नका, कारण त्यामुळे केसांचे नुकसान होते.

२०२३ हेअरस्टाईल ट्रेंड

* सोमा घोष

सुंदर आणि आकर्षक दिसावे असे प्रत्येक महिलेला वाटत असते. मेकअपसोबतच हेअरस्टाईलमुळेही चेहरा खुलून दिसू शकतो. यासाठी चेहऱ्याला साजेशी हेअरस्टाईल करणे गरजेचे असते. जास्त करून बॉलिवूडमधील हेअरस्टाईल बघून त्यानुसारच हेअरस्टाईल केली जाते, कारण अभिनेत्रीसारखेच दिसावे, असे महिलांना वाटत असते. हेच अचूक ओळखून हेअरस्टायलिस्ट दरवर्षी नवनवीन स्टाईल घेऊन येतात, ज्यात केसांच्या रंगापासून ते हेअरस्टाईलपर्यंत सर्व काही असते.

२०२१ मध्ये कोरोना संसर्गामुळे बहुसंख्य महिला घरीच आहेत किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत आणि कोरोना संसर्ग कमी होण्याची वाट पाहात आहेत, जेणेकरून पुन्हा एकदा कुठल्याही भीतीशिवाय घराबाहेर पडता येईल.

यासंदर्भात बियॉड द फ्रिंज सलूनच्या हेअरस्टायलिस्ट आणि शिक्षणतज्ज्ञ आशा हरिहरन यांनी सांगितले की, इतिहासात डोकावल्यास असे लक्षात येईल की, अनेकदा महामारी, नैसर्गिक आपत्ती, महागाई अशी अनेक संकटे जगावर ओढावली. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे, पण ब्युटी इंडस्ट्रीवर विशेष परिणाम जाणवला नाही. आता हळूहळू ‘स्वत:ची सर्व कामे स्वत:च करा’ असा नवा ट्रेंड जोरात आहे.

महिला फक्त सण-उत्सव किंवा लग्नाला जाण्यासाठीच मेकअप करत नाहीत तर मेकअप करून सतत सुंदर दिसायला त्यांना आवडते. नवीन वर्षात हेअरस्टाईलही खूप वेगळया असतील, काही अशा प्रकारे :

* यापूर्वी केसांची एखादी बट किंवा एक भाग रंगगवण्याची स्टाईल होती. मात्र आता ज्यांनी अशा प्रकारे केस रंगवले आहेत ते रंगवलेले केस महामारीच्या काळात वाढल्यामुळे रंग सौम्य होऊन केसांच्या मुळापासून ६ ते ८ इंच खाली आला असेल. यासाठीच ‘मनी पीस’ नावाचे नवीन तंत्रज्ञान आले आहे. याच्या माध्यमातून रंग कितीही खाली उतरला असला तरी याचे ६ ते ८ फॉईल्स प्रभावी ठरतात.

* याशिवाय महिलांच्या चेहऱ्याची ठेवण लक्षात घेऊन केसांचे २ पट्टे रंगवले तरी नवीन लुक मिळतो. फेस कंटूरिंग तंत्रज्ञानामुळे चेहऱ्यावर नाविन्याचे तेज झळकते. यासाठी लाल, चॉकलेटी, निळा, राखाडी असा कोणताही रंग वापरता येईल.

* आजच्या नववधूला साधी पण नवरीसारखी दिसणारी हेअरस्टाईल आवडते. पूर्वीसारखे भलेमोठे आंबाडे नवीन वर्षात चालणार नाहीत. सध्या नैसर्गिक मेकअपला जास्त पसंती मिळत आहे.

* गडद मेकअपचे युग आता कालबाह्य झाले आहे. नवरीला सुंदर, स्वच्छ आणि ग्लॅमरस रूप आवडते. तिला मेकअपला साजेशी अशीच हेअरस्टाईल आवडते आणि नवीन वर्षातही हा ट्रेंड कायम राहणार आहे. उदाहरणार्थ डिजॉल्व्स बन, हाय फॅशन पोनी विथ फ्रंट मेसी, मेसी वेणी इत्यादी. या तीन जास्त पसंत केल्या जातील. बनमध्येही छोटा किंवा मध्यम आकाराचा बन सर्वांना आवडतो.

केसांना चांगला आकार देण्यासाठी त्याची वाढ चांगल्या प्रकारे होणे आवश्यक असते. त्यासाठी पुढील उपाय नियमित करणे गरजेचे आहे :

* केस निरोगी राहण्यासाठी आठवडयातून एकदा केसांच्या मुळांना तेल लावा. केसांच्या टोकांना कमी तेल लावा. १ किंवा २ वेळा शाम्पू केल्यावर तेल निघून जाईल, एवढेच तेल लावा. जास्त तेल लावल्यास ते काढण्यासाठी जास्त शाम्पू लावावा लागतो. यामुळे केस रुक्ष आणि निर्जीव होतात.

* शाम्पू आणि कंडिशनर केल्यानंतर जेव्हा २० ते ४० टक्के पाणी केसांमध्ये राहते तेव्हा सिरम केसांच्या मधल्या भागावर आणि टोकांवर लावा. त्यानंतर केसांवर व्यवस्थित हात फिरवून ते डोक्यावर लावा. केसांना टॉवेल गुंडाळून ते सुकू द्या. सुकल्यावर टॉवेल काढा. केसांवर चमक येऊन ते सिल्की दिसतील, जे कुठल्याही महिलेच्या सौंदर्यात भर घालतील.

रीठा आणि शिकाकाईने केसांची निगा

* प्रतिनिधी

आज बाजारात हेअर केअरशी संबंधित विविध प्रकारची तेलं आणि शाम्पू आहेत. अनेक उत्पादनं अशी आहेत की जी केसांची निगा राखतात, त्यांना काही काळासाठी काळे आणि चमकदार बनवतात. ज्यामुळे ते हेल्दी दिसू लागतात. यापैकी जे प्रोडक्ट्स केमिकल बेस्डने बनलेले असतात त्यांचा खरा प्रभाव काही दिवसातच केस आणि स्कल्पचं नुकसान करू लागतात. केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. अनेक लोक आता हेअर केअरसाठी घरगुती उपाय करणे योग्य समजू लागले आहेत. या सोबतच रिठा आणि शिकाकाईने बनलेली उत्पादनं शाम्पू आणि हेअर ऑइलचा अधिक प्रयोग करत आहेत. यांचे उपयोग समजून घेणे गरजेचे आहे.

रिठाचा वापर केसांना धुण्यासाठी केला जातो. यामुळे याला शाम्पूच्या स्वरूपात अधिक वापरलं जातं. रीठा एक झाड असतं. रीठाच्या झाडावर उन्हाळयात फुले येतात. जी आकारात खूपच लहान असतात. यांचा रंग हलका हिरवा असतो. रिठाला फळे जुलै आणि ऑगस्टपर्यंत येतात. नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत फळ पिकतं. फळाला लोक मार्केटमध्ये विकतात. सुकवले गेलेलं फळ शाम्पू डिटर्जंट वा हात धुणाऱ्या साबणाच्या रूपात वापरलं जातं. याचा वापर केसांना मजबूती, चमकदारपणा आणि घनदाट बनविण्यात केला जातो.

रिठाने ऑइलदेखील काढलं जातं. याचा वापर शाम्पूमध्ये एका खास तत्त्वाच्या रूपात वापरलं जातं. हे केसांसाठी आरोग्यदायी असतं. जर केसांमध्ये उवा असतील तर रिठाच्या वापराने ऊवा एकदम निघून जातात. कोरडया रिठाच्या स्वरूपात वापर करताना त्यामध्ये एक अंड, एक चमचा आवळा पावडर, सुखा रिठा आणि शिकेकाई पावडर एकत्रित करा. याने डोक्याच्या त्वचेवर मसाज करा आणि तीस मिनिटासाठी सोडून द्या. नंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस धुवा. दोन महिन्यापर्यंत आठवडयातून दोनदा असं केल्याने केस गळती कमी होईल. रिठाचा वापर करतेवेळी लक्षात ठेवा की यांना डोळयांपासून दूर ठेवा.

केसांसाठी महत्वाचं काम करतं शिकाकाई

रीठाप्रमाणेच शिकाकाईचा वापरदेखील केसांची निगा राखण्यासाठी केला जातो. अनेकदा तर दोन्ही एकत्रित करून देखील वापर केला जातो. शिकाकाई एक जडीबुटी आहे. शिकाकाईच वैज्ञानिक नाव अॅक्केशिया कॉनसीना आहे. याचं झाड लवकर वाढणार आणि छोट्या छोट्या काटयांनी भरलेलं असतं. हे भारताच्या उन्हाळयात प्रदेशात आढळतं. शिकेकाईमध्ये अँटिऑक्सिडंटस आणि विटामिनसारखी पोषक तत्वं असतात. जे केसांना निरोगी आणि मजबूत बनविण्याचं  काम करतात. शिकाकाईच्या वापरामुळे केसांची वाढ होते. यामध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट केसांना आणि स्कल्पना नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

हेल्दी स्कल्प केसांची वाढ करतं. शिकाकाईमध्ये एंटी बॅक्टरियल आणि एंटी फंगल गुण असतात. हे स्काल्पमध्ये इंफ्लेमेशन कमी करतं आणि याचं आरोग्य अधिक वाढवतं. सोबतच स्कल्पचा पीएच स्तर बनविण्यातदेखील मदत करतं. ज्यामुळे केस निरोगी राहतात. कोंडा म्हणजे डॅन्डरफचा धोकादेखील संभवत नाही. केसांची गळती कमी होते. शिकाकाईने बनलेले शाम्पू वा हेयर मास्कमध्ये शिकेकाई पावडरचा वापर केल्याने केस कोमल आणि मुलायम होतात. केस घनदाट आणि मजबूत होतात. हे केसांच्या मुळांना मजबूत करून तुटण्यापासून रोखतात.

स्पलीट एन्ड्स केसांचा त्रास

स्पलीट एन्ड्स म्हणजेच विभाजित केसांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शिकेकाई मदत करतं. केमिकल हेअर ट्रीटमेंट, स्ट्रेटनिंग आणि फ्री रॅडिकलमुळे विभाजित केस येतात. एकदा का स्पलीट एन्ड्स आले की त्यांना ठीक करण्यासाठी केसांना कापण्या व्यतिरिक्त कोणताच उपाय उरत नाही. त्यानंतरदेखील जेव्हा तुमचे केस वाढतात तेव्हा हे पुन्हा विभाजित होतात. शिकेकाईच्या वापराने हा त्रास खूपच कमी होतो. शिकेकाईमध्ये पुरेपूर सॅपोनीन, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट आहेत. जे तुमच्या केसांना चमकदार बनवतात. शिकेकाई तुमच्या स्काल्पमध्ये सिबमला रिलीज करण्यातदेखील मदत करतात. ज्यामुळे केस मॉइश्चराइजर होतात आणि स्पलीट एन्ड्स रोखण्यात मदत करतात.

शिकेकाईचा हेअर मास्क बनविण्यासाठी शिकेकाई पावडर, आवळा पावडर आणि रिठा पावडरमध्ये दोन अंडी, दोन-तीन चमचे लिंबाचा रस आणि कोमट पाण्याबरोबर एकत्रित करा. केसांना आणि त्यांच्या मुळाशी अर्ध्या तासापर्यंत लावा. जेव्हा ते सुकलं जाईल तेव्हा स्वच्छ धुऊन केसांचे कंडिशनींग करून घ्या. अशा प्रकारे शिकेकाई आणि रिठाने बनलेली उत्पादनंदेखील केसांच्या वाढीसाठी खूपच उपयोगी आहेत.

मुलायम केसांसाठी योग्य उत्पादन

* पारुल भटनागर

केस सुंदर असल्यास चेहऱ्याचा रंग बदलतो. आजचे युग स्टाईलचे आहे आणि याच स्टाईलच्या मोहात महिला कधी केस रंगवतात, कधी हायलाइट करतात, कधी रिबॉन्डिंग करतात तर कधी हेअरस्टायलिंग उत्पादनांचा वापर करतात. काळासोबत ताळमेळ राखणे ही चांगली गोष्ट आहे, पण कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करून स्वत:चे नुकसान करून घेणे शहाणपणाचे नाही.

काहीवेळा सर्वकाही ठीक असते, परंतु जेव्हा तुम्ही स्टाईलच्या नावाखाली केसांवर जास्त प्रमाणात रसायने आणि उष्ण उत्पादने वापरण्यास सुरुवात करता किंवा केसांची काळजी घेत नाही तेव्हा केस खराब होतात. ही उत्पादने केसांतील नैसर्गिक ओलावा चोरून केस निर्जीव बनवतात.

इतकेच नाही तर केस गळती सुरू होते, केसांच्या दुभंगलेल्या टोकांची समस्या सुरू होते आणि केस रुक्ष होतात, जे तुमचे सौंदर्य कमी करण्याचे काम करतात.

अशा परिस्थितीत, खराब केसांवर विशेष उपचार करणे आवश्यक असते, जेणेकरून तुमच्या निर्जीव केसांना पुन्हा चमक मिळेल. याबद्दल जाणून घेऊया कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव यांच्याकडून :

सीरमने केस मॉइश्चराय करा

केसांतील आर्द्रता निघून गेल्यानंतरच केस खराब, निस्तेज होऊ लागतात.

परंतु जर खराब झालेले केस सीरमने हायड्रेटेड ठेवले तर हळूहळू ते पूर्ववत होऊ लागतात, कारण सीरम हे प्रदूषण आणि सूर्यप्रकाश यांच्यातील संरक्षणात्मक थर म्हणून काम करते. मात्र त्यासाठी तुमचे हेअर सीरम केसांच्या प्रकारानुसार असणे आवश्यक असते आणि ते लावण्याची पद्धत योग्य असावी लागते, तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही ते केसांना लावाल तेव्हा तुमचे केस थोडेसे ओलसर असायला हवेत. तुम्ही तुमच्या हातांवर सीरमचे काही थेंब घ्या, त्यांना दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून केसांना लावा आणि तसेच राहू द्या. यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या केसांवर चमक राहून ते मुलायम होतील. जेव्हा कधी तुम्हाला कोरडेपणा, रुक्षपणामुळे केस निर्जीव वाटतील त्यावेळी सीरम नक्की लावा. याला स्मूदनिंग ट्रीटमेंट असेही म्हणतात.

सीरममधील सामग्री

बाजारात तुम्हाला शेकडो सीरम मिळतील, पण तुम्ही तेच सीरम निवडा जे तुमच्या केसांना जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल. त्यासाठी सीरममध्ये कोणती सामग्री किंवा घटक वापरले आहेत, याची माहिती तुम्हाला असायला हवी.

* हलक्या वजनाचे सीरम सर्वोत्तम ठरते. यात ऑर्गन ऑईल, जोजोबा ऑइल आणि सनफ्लॉवर ऑईलचे गुणधर्म असतात. हे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करून केसांना निरोगी, मुलायम आणि चमकदार बनवते.

* कोकोनट मिल्क अँटीब्रेकेज सीरम हे कमी वेळेत केसांना चमकदार आणि निरोगी बनवते.

* सीरममधील ह्यालुरोनिक अॅसिड केसांना ओलावा मिळवून देते. केस घनदाट होण्यास मदत करते.

* यातील पॉलिफिनोल्स केसांना अँटीऑक्सिडंट्सचे संरक्षणात्मक कवच मिळवून देते.

* व्हिटॅमिन बी-१२ केसांना अतिशय मुलायम बनवते.

या सामग्रीपासून दूर राहा

* पीइजी, पॉलिक्वार्टेनियम, कृत्रिम रंग, डीसोडियम इडीटीए, सुगंध यासारख्या नुकसानदायी रसायनांपासून दूर राहा. सीरममध्ये सिंथेटिक सिलिकॉनचाही वापर केला जातो. तो केसांवर एक संरक्षणात्मक थर तयार करण्यासोबतच केसांमधील ओलावा पुरेशा प्रमाणात टिकवून ठेवण्याचे काम करतो. केसांचे नुकसान करणाऱ्या घटकांना केसांपर्यंत पोहोचू न देण्यासाठीही तो उपयोगी ठरतो.

हेअर कंडिशनर

कंडिशनर केसांना आवश्यक पोषक द्रव्ये देऊन त्यांना निरोगी, मुलायम बनवते. बहुतांश महिला असा विचार करतात की, केसांना रुक्ष होण्यापासून वाचवून मुलायम बनवण्यासाठी आम्ही कंडिशनरचा वापर केला होता, मात्र कंडिशनरचा वापर करून १ दिवस उलटताच केस जैसे थे होतात. कंडिशनरचा मात्र असा दावा असतो की, याच्या वापरामुळे केस अनेक दिवसांपर्यंत मुलायम राहतील.

असे होते कारण तुमच्या कंडिशनरमध्ये गरजेपेक्षा जास्त रसायनांचा वापर केलेला असतो ज्यामुळे केस कोरडे होतात.

त्यामुळेच जर तुमचे केस खराब झाले असतील तर कंडिशनर खरेदी करताना त्यात कोणती सामग्री वापरली आहे, हे माहीत करून घ्या तरच तुम्हाला कंडिशनरचा फायदा होईल.

कंडिशनरमधील सामग्री

* अवाकाडो ऑइलमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऑइल केसांना मजबूत बनवून अतिनील सूर्यकिरणांपासून त्यांचे रक्षण करते.

* वीट प्रोटीन तुमच्या केसांना मजबूत बनवून त्यांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्याचे काम करते.

* कंडिशनरमधील केराटिनचा वापर केसांसाठी उपयोगी ठरतो. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते. ते केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देते.

* ऑर्गन ऑइलमध्ये ओलिक आणि लिनोलेइक नावाचे फॅटी अॅसिड असते, जे तुमचे केस आणि केसांवरील त्वचेला फॅटी लेअर मिळवून देऊन केसांमधील कोरडेपणा दूर करते. केसांना नरम, मुलायम बनवते.

* पँथेनॉल म्हणजे व्हिटॅमिन बी ५ खूपच परिणामकारक असते जे केसांमधील मॉइश्चर वाढवण्याचे काम करते.

* शिया बटरमध्ये व्हिटॅमिन ए, इ आणि इसेन्शिअल फॅटी अॅसिड असते जे उष्ण उत्पादनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांना वाचवते. केसांमधील कोरडेपणा दूर करून त्यांची चमक वाढवण्यासाठी मदत करते.

या सामग्रीपासून दूर राहा

* पेरबेन्स, सल्फेट्स, ट्रिक्लोसन, सिंथेटिकचे रंग, सुगंध, रॅटीनील पल्मीटेड हे हळूहळू केसांमधील मॉइश्चर संपवण्यासह त्वचेच्या अॅलर्जीसही कारणीभूत ठरतात. म्हणूनच यांचा वापर करून बनवण्यात आलेल्या कंडिशनरचा वापर करू नका, अन्यथा खराब झालेले केस आणखी खराब होतील.

शाम्पू

धूळमाती आणि प्रदूषणामुळे केस खराब, रुक्ष होतात. यावर उपाय म्हणून आपण सतत शाम्पू करतो, पण कुठलीही माहिती न घेता ज्या शाम्पूचा वापर तुम्ही केसांना पोषण मिळवून देण्यासाठी करता त्याच शाम्पूमुळे तुमचे केस अधिक खराब होतात, याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यामुळे आठवडयातून किती दिवस शाम्पू करावा आणि कोणता शाम्पू वापरावा ज्यामुळे केसांना पोषण मिळून ते निरोगी राहतील, हे माहिती करून घेणे गरजेचे असते.

शाम्पूमधील घटक

* केसांच्या मुळापर्यंत जाऊन स्वच्छता करणारा शाम्पू सर्वोत्तम असतो. यात वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे केसांना पोषण मिळते. केसांमधील कोरडेपणा दूर होऊन केस मऊ, चमकदार दिसू लागतात.

* शाम्पूमध्ये फर्नेटेड राईस वॉटर, प्रो व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसिडसारखे घटक असतात जे काही दिवसांमध्येच निर्जीव झालेल्या केसांना दुरुस्त करण्याचे काम करतात.

* शाम्पूमधील सोया प्रोटीन केसांना पोषण देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेते, कारण यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन केस चमकदार होतात.

* हनी मॉइश्चर शाम्पू कोरडया आणि खराब झालेल्या केसांना हायड्रेट करून त्यांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्याचे काम करतो. केसांची मुळे मजबूत करून केस गळती रोखण्यास मदत करतो.

या सामग्रीपासून दूर राहा

शाम्पूमध्ये सोडियम लॉरेयल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट असते. ते केसांना कोरडे बनवते. यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

* पेराबेन्स आणि ऐथिल पेराबेन्स हे केसांच्या उत्पादनांचा टिकाऊपणा वाढवतात, मात्र ते महिलांमधील हार्मोन्सला प्रभावित करून कर्करोग होण्याचा धोका वाढवतात.

* शाम्पूला घट्ट बनवण्यासाठी सोडियम क्लोराईडचा वापर केला जातो, मात्र यामुळे केसांची त्वचा कोरडी होणे, जळजळ, केस गळतीची समस्या निर्माण होते.

* यात वापरण्यात आलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांची त्वचा खराब होते. अस्थमा, कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात.

* शाम्पूमधील सेलिनियम सल्फाईड कर्करोगाचे कारण बनू शकते.

* शाम्पूमध्ये वापरले जाणारे रंग रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याचे काम करतात.

द्य रॅटिनील पल्मिटेटमुळे त्वचा पिवळसर पडते. लाल चट्टे, जळजळ अशा समस्या निर्माण होतात.

हेअर मास्क

हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळते, कारण यात केसांना मॉइश्चर मिळवून देणारी तत्त्वे असतात. हे कंडिशनरच्या तुलनेत केसांना खूप जास्त पोषण मिळवून देते, पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा हेअर मास्क नैसर्गिक गोष्टींनी बनवलेले असते.

येथे आम्ही तुम्हाला काही अशा हेअर मास्कची माहिती देणार आहोत जे खराब झालेल्या केसांना पोषण मिळवून देण्यासोबतच केस मूलायम बनवण्याचेही काम करतात.

* केराटिन आणि ऑर्गन ऑइल हेअर मास्क केस गळती रोखून केसांना हायड्रेट, मॉइश्चर मिळवून देते. केसांना दुरुस्त करण्याचे काम करते. केराटिन हे आपल्या केसांमध्ये असलेले नैसर्गिक प्रोटीन असते, पण प्रदूषण, धूळमाती आणि उन्हामुळे ते केसांमधून गायब होते. ते पुन्हा केसांमध्ये परत येण्यासाठी कृत्रिम केराटिन उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे केस पुन्हा मुलायम होतात, तर ऑर्गन ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई केसांना मुलायम आणि सिल्की बनवण्याचे काम करते. विशेष म्हणजे हे सर्व प्रकारच्या केसांसाठी परिणामकारक असते. मार्केटमध्ये २०० मिलिलीटर हेअर मास्कची किंमत  सुमारे ५०० रुपये असते.

* रेड ओनियन ब्लॅक सीड ऑइलपासून बनवलेला हेअर मास्क केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देते. हे पातळ, कमकुवत आणि केस गळतीची समस्या दूर करते. यात पेराबिन, सल्फेट, सिलिकॉस आणि कोणतेही रंग नसतात. याचा अर्थ हे पूर्णपणे नैसर्गिक असते. यात व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंन्ट्स असल्यामुळे ते केसांची पीएच पातळी नियंत्रित ठेवते, तर ब्लॅक सीड ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंन्ट्स आणि नॅरिशमेंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ते फ्री रेडिकल्समुळे केसांच्या होणाऱ्या नुकसनापासून केसांचे रक्षण करून त्यांना सुदृढ बनवते.

* कोलेजन हेअर मास्क ब्लॅक सीड ऑइल आणि शिया बटरने बनवलेला असतो. यात रुक्ष, खराब झालेले केस पूर्ववत करण्याची क्षमता असते, कारण यात व्हिटॅमिन्स आणि आवश्यक फॅटी अॅसिड असल्यामुळे ते उष्णता आणि रसायनांमुळे केसांच्या होणाऱ्या नुकसनापासून केसांचे रक्षण करते. त्याच्या १०० ग्रॅम पाकिटाची किंमत सुमारे २५० रुपये असते.

* राईस वॉटर हेअर मास्क यासाठी खास आहे कारण यात उपलब्ध असलेले इनोसिटोल हे तत्त्व खराब झालेल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केसांना दुरुस्त करते. हे सल्फेट, सिलिकॉन आणि पेराबिन फ्री प्रोडक्ट आहे. याच्या २०० मिलिलीटर पाकिटाची किंमत सुमारे ५३० रुपये आहे.

थंडीत केसांची घ्यावयाची काळजी

* डॉ. नरेश अरोरा, संस्थापक, चेज अरोमा थेरपी कॉस्मेटिक्स

असे म्हटले जाते की केसांसाठी शँपू चांगला असतो, जे खरे नाही. शँपूपेक्षा साबण जास्त चांगला असतो. शँपू हे वेगवेगळया रसायनांचे मिश्रण आहे. जर तुम्हाला शँपू वापरायचा असेल तर मग असा शँपू निवडा, जो सल्फेट-फ्री डिटर्जेंट बेस असेल आणि तो पॅराबेन प्रिझर्वेटिव्हजपासूनदेखील मक्त असेल.

जर आपण शँपू योग्य प्रकारे धुतला नाही तर केसांची चमक आणि सौंदर्य संपुष्टात येईल. केसांना योग्य आकारात कायम ठेवण्यासाठी तेल लावणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. नारळी तेल वापरणे ठीक आहे, परंतु ते उन्हाळयात अधिक चांगले असते.

काही टिपांसह आपण केसांचे नैसर्गिक उपाय प्राप्त करू शकता :

* आयुर्वेदिक सिद्धांतांनुसार केसांना तेल लावणे हा त्यांना मजबूत करण्याचा आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे. परंतु योग्य तंत्र आणि योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे. बऱ्याच स्त्रियांना सकाळी तेल लावायला आवडते. हे बरोबर नाही. सकाळच्यावेळी कधीही तेल लावू नये. आपण आपल्या केसांची गुणवत्ता सुधारू इच्छित असल्यास, ते लांब करू इच्छित असाल, अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करू इच्छित असाल, विभाजित केसांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर रात्रीच्या वेळेस आपल्या केसांना तेल लावावे. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस धुवावे.

* केसांच्या मुळांवर (टाळूवर) तेल लावा, केसांना नाही.

* नारळी तेलात केसांशी संबंधित बऱ्याच समस्यांचे निराकरण आहे. याचा वापर डोक्यावर टॉवेल गुंडाळून वाफ घेऊन करा. यासाठी, १५ ते २० मिनिटांचा वेळ योग्य आहे.

* नेहमी कोमट पाणी वापरा. थंड हवामानात थंड पाण्याचा वापर केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि अशक्त होऊ शकतात. तसे, खूप गरम पाणी टाळूच्या त्वचेचे तेल (सीबम) शोषून घेते, ज्यामुळे केस अधिक कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. म्हणून कोमट पाण्याने आपले केस धुवा. आपण बेस ऑईल म्हणून बदाम, जोजोबा आणि ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.

अरोमा थेरेपीचा फॉर्म्युला

* १ लहान चमचा बेस तेल, २ थेंब व्हिटॅमिन ई तेल, १ थेंब टी ट्री तेल, १ थेंब पचौली तेल आणि १ थेंब तुळस तेल मिसळा. याचा उपयोग केसांची रचना चांगलीदेखील ठेवेल तसेच मजबूत ही बनवेल.

* आपण इच्छित असल्यास आपल्या केसांना वाफदेखील देऊ शकता परंतु दुसऱ्या दिवशी ते धुण्यास विसरू नका.

* केसांची निगा राखण्यासाठी कंडिशनरच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. हे टॉवेल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण करते. म्हणून गरज भासल्यास कंडिशनर वापरा. तसेच, यादरम्यान हे लक्षात ठेवा की लीव ऑन किंवा बिल्ड ऑन कंडीशनरचा वापर करू नका. त्यामध्ये सिलिकॉन तेल असते. हे केसांवर गुरुत्वाकर्षण दबाव आणते ज्यामुळे कालांतराने केसांची मुळे अजूनच कमकुवत होतात.

* असा कंडिशनर वापरा, जो केस धुताना पूर्णपणे निघून जाईल, तसेच ज्यामध्ये नैसर्गिक घटक वापरले गेले असतील.

* १ चमचा दही, १ चमचा आवळा, १ चमचा शिकाकाई, अर्धा चमचा तुळस, अर्धा चमचा पुदीना, अर्धा चमचा मेथी व्यवस्थित मिसळा आणि केसांवर लावा.

* आपण अंडयाचा पांढरा भाग शँपूमध्ये मिसळून केसांमध्ये लावू शकता.

काही इतर सूचना

योग्य प्रमाणात भोजन केल्याने पुरेसे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्त्वे मिळतात, ज्यामुळे शरीर आणि मेंदू कणखर आणि निरोगी होतात. योग्य प्रकारचे खाणे विविध प्रकारचे रोग टाळण्यास मदत करते आणि आरोग्यास होणारे नुकसान टाळता येते. हे केसांची पोत राखण्यासदेखील मदत करते, म्हणजेच आपल्याला चांगले केस हवे असतील तर आपले भोजनदेखील संतुलित असावे, आरोग्यवर्धक अन्न खावे जे व्हिटॅमिन एच, बी ५, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी १२ ने भरलेले असेल.

आठवडयातून ३ वेळा कोशिंबीरीसह अंकुरलेले धान्य खावे. कोशिंबीरीत मीठ असू नये. कोशिंबीरी घेतल्यानंतर दीड तासाने थोडया प्रमाणात लिंबाचा रस आणि पुदीनेची चटणी खाल्ल्यास बराच फायदा होईल.

मॉर्निंग वॉकमुळे भविष्यात कोणत्याही अडथळयाशिवाय व्हिटॅमिन डी शोषण्यास मदत मिळते. सूर्यप्रकाशामध्ये फारच कमी प्रमाणात प्रदूषण कमी केले जाऊ शकते. बळकट आणि दाट केसांसाठी जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी घेण्याचा प्रयत्न करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें