बाळाच्या त्वचेची काळजी स्मार्ट टीप्स

* नसीम अंसारी कोचर

साक्षी त्या दिवशी शाळेतून रडत घरी आली. जेव्हा आईने कारण विचारले तेव्हा ८ वर्षांची साक्षी रडत म्हणाली, ‘‘आई, मी अस्वलाची मुलगी आहे का? तू मला प्राणीसंग्रहालयातून आणलेस का?’’

‘‘नाही, माझ्या प्रिय बाहुले… तू माझी मुलगी आहेस… तू अस्वलाची मुलगी आहेस असे कोण म्हणाले?’’ मुलीचे अश्रू पुसत आईने विचारले.

‘‘सगळेजण बोलतात. आज हिंदीच्या शिक्षिकांनीही सांगितले की, मी अस्वलासारखी दिसते,’’ साक्षी रडत म्हणाली.

‘‘का? त्या असं का म्हणाल्या?’’

‘‘माझ्या हातावर आणि पायावर खूप केस आहेत. मी सगळयांना अस्वलासारखी वाटते,’’ साक्षीने तिचे दोन्ही हात आईसमोर पसरवत सांगितले.

साक्षीचे बोलणे ऐकून आई अस्वस्थ झाली. प्रत्यक्षात साक्षीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर दाट केस होते. त्यामुळे तिचा रंगही खुलून दिसत नव्हता. एवढया लहान वयात तिला वॅक्सिंगसाठी पार्लरमध्ये नेणेही शक्य नव्हते. साक्षी अभ्यासात हुशार होती. नृत्य आणि अभिनयही उत्तम करायची, पण तिला शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात संधी मिळत नसे. कधी नृत्यासाठी घेतलेच तरी उत्तम नृत्य करूनही तिला मागच्या रांगेत ठेवले जात असे, कारण तिचा केसाळ चेहरा आणि हात-पाय, जे मेकअपमध्येही लपवता येत नसत.

शरीर मजबूत आणि स्वच्छ होते

खरं तर साक्षीच्या जन्मानंतर तिच्या शरीराला जी मालिश व्हायला हवी होती ती कधीच झाली नाही. अनेकदा नवजात बालकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही केस असतात, जे सतत मालिश केल्याने एक वर्ष किंवा सहा महिन्यांत निघून जातात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की ग्रामीण महिला त्यांच्या नवजात मुलांना आपल्या पायावर झोपवतात आणि मोहरीचे तेल, हळद आणि बेसनाचे पीठ लावून त्यांची मालिश करतात.

शहरी माता आपल्या बाळाला विविध प्रकारच्या बेबी ऑइलने मालिश करतात, ज्यामुळे त्यांचे शरीर मजबूत आणि स्वच्छ होते. मालिश केल्याने त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते आणि ऊर्जा मिळते, पण साक्षीच्या जन्मानंतर तिच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला आणि जवळपास २ वर्षे ती अंथरुणाला खिळून होती.

जन्मानंतर साक्षी जवळपास ४ वर्षे तिच्या आजीसोबत राहिली. आजी खूप वृद्ध होती. त्यामुळे नवजात बालकांची जी चांगली काळजी घेतली जाते तशी काळजी साक्षीची कोणी घेतली नव्हती. तिच्या शरीराला कधी नीट मालिशही मिळाली नव्हती. हेच कारण होते की, जन्माच्यावेळी तिच्या अंगावर असलेले केस वयोमानानुसार अधिक दाट आणि राठ झाले आणि आता ते कुरूप दिसू लागले होते.

मुलांचा योग्य विकास

लहान मुलांच्या शरीराची मालिश अनेक कारणांसाठी खूप महत्त्वाची असते. मालिश केल्याने शरीरावरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका तर होतेच, शिवाय हाडेही मजबूत होतात आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले झाल्यामुळे मुलाचा विकास योग्य प्रकारे होतो.

बेबी मालिशची गरज लक्षात घेऊन विविध प्रकारची बेबी केअर उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. आज केवळ शहरी माताच नव्हे तर ग्रामीण भागातील माताही मालिशसाठी या उत्पादनांचा वापर करू लागल्या आहेत.

उत्पादने खरेदी करण्यापूर्वी

तुमच्या बाळाच्या नाजूक त्वचेसाठी एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी माहिती घेणे आणि सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे असते. या उत्पादनांमध्ये अनेक प्रकारची रसायने, सुगंध, कपडयांना रंग देण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ, डिटर्जंट किंवा बाळासाठी आवश्यक अन्य उत्पादनांचा समावेश होतो, जे नवजात बाळाच्या आरोग्यासाठी तसेच त्याच्या त्वचेसाठी हानिकारक असतात. यामुळे बाळाला डाग, पुरळ, रखरखीतपणा, चिडचिड आणि कोरडेपणा होऊ शकतो, म्हणून बाळाच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने निवडताना काय लक्षात ठेवावे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे, बाळाच्या शरीराच्या काळजीसाठी सर्वात जास्त आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत-बेबी क्रीम, शाम्पू, बेबी साबण, केसांचे तेल, मालिश तेल, पावडर आणि बाळाचे कपडे..

आईने हे जाणून घेणे गरजेचे

जन्मानंतर सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेत आणि केसांमध्ये सतत बदल होत असतात. नवजात बाळाच्या शरीरातून अनेक दिवस पांढऱ्या रंगाचे कवच बाहेर पडते, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. याला व्हर्निक्स म्हणतात. बाळाच्या शरीरावर तेलाने हळूवार मालिश केल्याने हा खपला पूर्णपणे काढून टाकला जातो आणि अनावश्यक केसही निघून जातात.

परंतु काही लोक मुलाला जास्त घासून किंवा स्क्रब करून ते लवकर काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, हा योग्य मार्ग नाही. बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये हे जाणून घेणे नवीन आईसाठी खूप महत्त्वाचे असते.

त्वचेला पोषण द्या

बाळाच्या त्वचेला पोषण आवश्यक असते. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा त्याला मालिश करू शकता. मालिशसाठी तुम्ही नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह तेल इत्यादी कुठलेही नैसर्गिक तेल घेऊ शकता. लक्षात ठेवा की, बेबी ऑइलच्या नावाने विकल्या जाणाऱ्या तेलांपासून दूर राहा ज्यात तीव्र सुगंध, मजबूत रंग आणि रसायने असतात.

सौम्य साबण वापरा

बाळाच्या त्वचेवर रासायनिक उत्पादने वापरल्याने कोरडेपणा किंवा पुरळ येऊ शकते, म्हणून केस आणि त्वचेसाठी नेहमी सौम्य शाम्पू आणि साबण वापरला पाहिजे.

जास्त पावडर लावू नका

बाळाच्या त्वचेवर पावडर जपून वापरा. आंघोळीनंतर, मऊ सुती कापडाने बाळाची त्वचा पूर्णपणे कोरडी करा आणि त्यानंतरच पावडर लावा. पावडर चांगल्या कंपनीची आहे आणि जास्त सुगंध नाही याची खात्री करा.

धुतलेले कपडे घाला

तुमच्या बाळाला नेहमी धुतलेले कपडे घाला. अस्वच्छ कपडयांमुळे त्वचेवर पुरळ, कोरडेपणा, खाज सुटणे किंवा अन्य एखादी समस्या उद्भवू शकते.

नखे स्वच्छ ठेवा

लहान मुलांची नखे झपाटयाने वाढतात आणि ती न कापल्यास चेहऱ्याला दुखापत होऊ शकते.

सुती लंगोट घाला

डायपरच्या वापरामुळे, बाळाला पुरळ उठू शकते आणि ते ओले झाल्यामुळे त्याला खाज सुटणे, पुरळ उठणे आणि लालसरपणाची समस्या उद्भवू शकते.

अंधश्रद्धेपासून दूर राहा

बाळाची त्वचा खूप नाजूक असते. त्यावर काजळ, कुंकू, हळद, चंदन इत्यादी विनाकारण लावू नका. या उत्पादनांमध्ये वेगवेगळया प्रकारची रसायने असू शकतात.

सूर्यकिरणांपासून संरक्षण करा

आपल्या बाळाला कधीही थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. लहान मुलांसाठी सकाळचा सूर्यप्रकाश सर्वोत्तम असतो. जर बाळाच्या त्वचेवर चट्टे किंवा लाल पुरळ उठत असेल तर त्याला ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. ती अॅलर्जीदेखील असू शकते.

उन्हाळ्यात नवजात मुलांची काळजी कशी घ्यावी

* प्रतिनिधी

नवजात मुलांसाठी उन्हाळा खूप असह्य असतो, कारण पहिल्यांदाच अशा वातावरणाचा सामना करावा लागतो. मोठ्याने आणि सतत रडणे, भरपूर घाम येणे, ओले केस, लाल गाल आणि जलद श्वासोच्छ्वास ही लक्षणे बाळाला अति उष्णतेने त्रास होत असल्याची लक्षणे आहेत. उन्हाळ्यात अतिसार होण्याचे थेट कारण ओव्हर हिटिंग आहे, जे अनेक नवजात मुलांसाठीदेखील घातक ठरू शकते.

सूर्यापासून संरक्षण करा

उन्हाळ्यात नवजात बालकांना सूर्यप्रकाशाच्या थेट किरणांपासून दूर ठेवा. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या नवजात बालकांच्या त्वचेमध्ये सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी फारच कमी मेलेनिन असते. मेलेनिन हे एक रंगद्रव्य आहे, जे त्वचा, डोळे आणि केसांना रंग देते. त्यामुळे मेलेनिनच्या अनुपस्थितीत सूर्यकिरणांमुळे त्वचेच्या पेशींनाही कायमचे नुकसान होऊ शकते.

मसाज तेल

बॉडी मसाज मुलाच्या विकासासाठी उपयुक्त आहे. योग्य मालिश केल्याने बाळाच्या ऊती आणि स्नायू उघडतात आणि यामुळे त्याचा योग्य विकास होतो. बाळाच्या नाजूक त्वचेला सर्वात योग्य असे तेल निवडणे आवश्यक असले तरी त्यामुळे चिकटपणा येत नाही हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तेलाऐवजी मसाज लोशन आणि क्रीम देखील वापरू शकता. आंघोळ करताना, याची संपूर्ण मात्रा मुलाच्या शरीरातून काढून टाकली पाहिजे, कारण तेल मुलाच्या घामाच्या ग्रंथींना रोखू शकते.

टबमध्ये आंघोळ करा

उष्णतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आंघोळ करणे. तसे, प्रत्येक वेळी आंघोळ करण्याऐवजी मुलाला ओल्या कपड्याने पुसत राहणे चांगले. परंतु जेव्हा जास्त उष्णतेमुळे मूल अस्वस्थ होत असेल तेव्हा त्याला पूर्ण टबमध्ये आंघोळ द्या. यामध्ये पाण्याचे तापमान कोमट ठेवावे.

टॅल्कम पावडर

टबमध्ये आंघोळ केल्यानंतर बाळाच्या अंगावर टॅल्कम पावडर लावणे चांगले मानले जाते. काही मुलांना टॅल्कम पावडरचा वापर उष्णतेची पुरळ कमी करण्यासाठी उपयुक्त वाटतो, तर काहींची स्थिती बिघडते. त्यामुळे तळहातावर थोडी पावडर घेऊन त्वचेवर लावा, त्यावर शिंपडू नका.

नियंत्रित तापमान

मुलाला 16 ते 20 अंश तापमानात ठेवा. दिवसा त्याची खोली थंड ठेवण्यासाठी पडदे लटकवून खोली अंधारमय करा. पंखा चालू ठेवा. मुलाला कधीही एअर कंडिशनरच्या थेट संपर्कात ठेवू नका, कारण यामुळे सर्दी देखील होऊ शकते.

योग्य ड्रेस

मुलाला कोणता पोशाख घालायचा याबाबत माता अनेकदा द्विधा असतात. पौराणिक कथेनुसार, नवजात मुलांना भरपूर उबदार कपडे घालावेत, कारण असे मानले जाते की गर्भाच्या बाहेरचे तापमान आतल्या तापमानापेक्षा थंड असते. पण उन्हाळ्यात त्यांच्या कपड्यांचा थर कमी करून त्यांना हलक्या कपड्यांमध्ये ठेवता येते. त्यांना सैल सुती कपडे घालायला लावा जेणेकरून हवेचा प्रवाह त्यांच्या त्वचेत राहील आणि त्यांना आरामदायक वाटेल. सुती कपडे मुलांसाठी फायदेशीर असतात, कारण त्यांच्यामध्ये हवाही चांगल्या प्रकारे प्रवेश करते आणि त्यांच्यात घाम शोषण्याची क्षमता देखील असते. मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी, त्याला उन्हात बाहेर काढताना टोपी घाला.

डॉ. कृष्णा यादव, पारस ब्लिस हॉस्पिटल, पंचकुला

बाळाच्या त्वचेसाठी खास सुरक्षा

* आशिष श्रीवास्तव

नवजात बाळ आणि मोठयांच्या त्वचेत खूप फरक असतो, जसे की, नवजात बाळाची एपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा मोठया माणसांच्या तुलनेत खूपच पातळ असते. त्याच्या घामाच्या ग्रंथी मोठयांच्या तुलनेत कमी काम करतात. यामुळे त्वचा ओलावा लवकर शोषून घेते. याशिवाय नवजात बाळाची त्वचा अतिशय कोमल असते. चला, माहिती करून घेऊया की, बाळाच्या कोमल त्वचेला या समस्यांपासून कसे सुरक्षित ठेवता येईल :

उत्पादनांवरील लेबल अवश्य वाचा : जर लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या एखाद्या उत्पादनावर  हायपोअॅलर्जिक लिहिले असेल तर त्या उत्पादनाच्या वापरामुळे कदाचित बाळाला अॅलर्जी होऊ शकते, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ते बाळाच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे, असे सांगता येणार नाही. त्यामुळे नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य द्या. उत्पादनाच्या सामग्रीत थँलेट आणि पेराबिन असेल तर ते खरेदी करू नका.

उन्हाळयात बाळाची मालिश : बाळाच्या त्वचेवर गरमीमुळे व्रण उठू नयेत या भीतीने बाळाची आई उन्हाळयाच्या ऋतूत त्याची मालिश करणे बंद करते. असे मुळीच करू नका, कारण मालिश बाळाची हाडे मजबूत करण्यासोबतच बाळाच्या नर्व्हस यंत्रणेसाठीही फायदेशीर ठरते. पण हो, अशा ऋतूत मालिश करण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही सौम्य तेल वापरा, सोबतच त्याला अंघोळ घालताना त्याच्या शरीरावरील तेल व्यवस्थित निघून जाईल, याकडेही लक्ष द्या.

बाळाचे कपडे आणि खोलीतील तापमान : तुमच्यासाठी ही गोष्ट नवीन असेल पण ती बाळासाठी सर्वात महत्त्वाची आहे. यासाठी वरचेवर घरातले तापमान तपासण्याची गरज नाही. फक्त त्याला सैलसर, मोकळा श्वास घेता येईल असे कपडे घाला. बाळ डोकं आणि तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. म्हणूनच त्याला झोपवताना त्याचा चेहरा आणि डोकं झोकू नका. अन्यथा त्याच्या शरीरातील उष्णता वाढू शकते. याचा बाळाच्या चेहऱ्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो. कपडे मऊ नसल्यास बाळाच्या त्वचेला अॅलर्जी होते.

त्वचेच्या सुरक्षेसाठी विशेष कापड : बऱ्याच आई स्तनपान करताना, बाळाचे डायपर बदलताना किंवा त्याची शी, शू काढताना साध्या कापडाचा वापर करतात. असे करणे बाळाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असते. शिवाय यामुळे बाळाच्या त्वचेचेही नुकसान होते. अनेकदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाळाच्या गळयाखाली एकच लाळेरे बांधलेले असते. त्याचा वापर दिवसभर बाळाचे तोंड पुसण्यासाठी केला जातो. यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडू शकते, शिवाय बाळ किटाणूंच्या संपर्कात येऊ शकते. यासाठी बाजारात बाळाला पुसण्यासाठी तयार केलेले खास प्रकारचे कापड उपलब्ध आहे. ते बाळाच्या त्वचेचे नुकसान होऊ न देता त्याला स्वच्छ करते. त्याच्या वापरामुळे बाळाच्या त्वचेवर व्रणही उमटत नाहीत.

लक्षात ठेवा की, बाळाच्या जन्माच्या १ वर्षापर्यंत त्याची त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे त्वचेसंबंधी छोटया-मोठया समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच या काळात बाळाच्या त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर बाळ त्वचेसंबंधी विविध समस्यांचे शिकार ठरू शकते.

बालगोपाळांच्या कपड्यांची काळजी

* गरिमा पंकज

आईवडील जेव्हा आपल्या छोटयाशा बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन येतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर नसतो. बाळाच्या जन्माआधीच छोटया, सुंदर, रंगीबेरंगी कपडयांनी घर भरून जाते. पण त्यांची खरेदी करताना आणि बाळाचे कपडे धुताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खूपच गरजेचे असते, कारण कपडयांवरच बाळाचे आरोग्य आणि सुरक्षा अवलंबून असते.

कपडे खरेदी करताना सावधान

कापड : लहान मुलांसाठी नेहमी मऊ, आरामदायक कपडे खरेदी करा. ते सहज धुता येतील असे हवे. बाळाच्या त्वचेचे नुकसान होणार नाही, असेच कापड हवे. मुलांसाठी सुती कपडे सर्वात चांगले असतात, पण लक्षात ठेवा की सुती कपडे धुतल्यावर थोडे आकसतात.

लांबी-रुंदी : मुलांचे कपडे ३ महिन्यांच्या फरकाने तयार केलेले असतात. ०-३ महिने, ३-६ महिने, ६-९ महिने आणि ९-१२ महिने अशा प्रकारे शिवलेले असतात. मुलांना खूप मोठे कपडे घालू नका. ते सतत गळा आणि डोक्यावर येतात. यामुळे श्वास कोंडण्याची भीती असते.

सुरक्षा : बी एल कपूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नवजात बाळांचे सल्लागार, तज्ज्ञ डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, लहान मुलांसाठी नेहमी साधे कपडे खरेदी करावेत. फॅन्सी, वजनदार कपडे विकत घेणे टाळा. ज्याला बटन, रिबीन, गोंडा नसेल, असे कपडे खरेदी करू नका. मुले बटण गिळू शकतात, ते त्यांच्या घशात अडकू शकते. ज्याला ओढायच्या दोऱ्या असतील, असे कपडेही खरेदी करू नका. त्या दोऱ्या कशात तरी अडकून ताणल्या जाऊ शकतात.

आरामदायी : असे कपडे खरेदी करा, जे मुलाला सहज घालता येतील, जेणेकरून कपडे बदलताना त्रास होणार नाही. पुढून उघडता येणारे सैल कपडे चांगले असतात. असे कपडे खरेदी करा जे स्ट्रेचेबल म्हणजे ताणले जातात. ते मुलाला घालणे आणि काढणे सोपे असते. ज्याला चैन असेल असे कपडे खरेदी करू नका.

कपडे धुण्याच्या टिप्स

डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. म्हणूनच त्यांचे कपडे धुताना कपडे धुण्याची साधी पावडर वापरू नका. रंगीत आणि सुवासिक पावडर तर अजिबात वापरू नका. लोकरीचे कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी सौम्य पावडर वापरणे जास्त चांगले असते. मुलांचे कपडे खूप वेळा पाण्यातून काढा, जेणेकरून पावडर किंवा साबण पूर्णपणे निघून जाईल. मुलाची त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली पावडरच वापरा.

मुलांचे कपडे लहान आणि मऊ असतात. म्हणूनच ते वॉशिंग मशीनऐवजी हाताने धुणे जास्त चांगले असते. मशीनमध्ये धुणार असाल तर ड्रायर वापरू नका. मोकळया जागेवर, ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात कपडे सुकवा. तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरणार असाल तर खास मुलांसाठी असणाऱ्या सॉफ्टनरचाच वापर करा.

कपडे धुण्याच्या अन्य टिप्स

त्वचा किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये यासाठी मुलांचे कपडे कसे स्वच्छ ठेवायचे, हे माहिती करून घेऊया :

* कपडयांवर लावलेले लेबल नीट वाचा. लेबलवर मुलांच्या कपडयांसाठी ज्या सूचना असतील त्यांचे पालन करा.

* बरेचसे कपडे जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. म्हणूनच कपडे धुताना जास्त गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा.

* रंग, कापड आणि लागलेले डाग पाहून त्यानुसार मुलांचे कपडे वेगवेगळे धुवायला ठेवा. एकसारखे असलेले कपडे एकत्र धुवा. यामुळे कपडे धुणे सोपे होईल आणि ते सुरक्षितही राहतील.

* मुलांच्या कपडयांवर डाग लागले असतील तर बेबी फ्रेंडली सौम्य पावडर लावून हलक्या हातांनी चोळून कपडे धुवा. यामुळे डाग हलका होईल. त्यानंतर व्यवस्थित पाणी वापरून कपडे नीट धुवा.

* मुलांचे कपडे किटाणूमुक्त ठेवण्यासाठी काही महिला कपडे अँटीसेफ्टिक सोल्यूशनमध्ये भिजवतात. हे चुकीचे आहे. यामुळे मुलाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

* कपडे लादीवर ठेवून चोळण्याऐवजी हात किंवा मशीनच्या झाकणावर ठेवून धुवा.

* मुलाचे कपडे घरातील इतरांच्या कपडयांसोबत धुवू नका. बऱ्याचदा मोठयांचे कपडे जास्त मळलेले असतात. सर्व कपडे एकत्र धुतल्यामुळे त्यांच्यातील किटाणू मुलाच्या कपडयांमध्ये जाऊ शकतात.

* कपडे सुकल्यावर ते नीट इस्त्री करा, जेणेकरून उरलेले किटाणूही मरून जातील.

* कपडे नीट घडी करून कव्हरमध्ये किंवा कॉटनच्या कपडयात गुंडाळून ठेवा.

कोरड्या त्वचेसाठी फेस मास्क

* मोनिका गुप्ता

हिवाळयात कोरडी त्वचा मॅनेज करणे थोडे कठीण होते. कोणताही मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा, थोडया वेळाने पुन्हा चेहरा कोरडा होईल. कोरडया त्वचेला बरे करण्यासाठी महिला वेगवेगळया प्रकारचे फेस मास्कदेखील वापरतात. परंतु त्यांचा प्रभावही काही दिवसच टिकतो. परंतु असे काही नैसर्गिक फेस मास्क आहेत, जे आपण सहजपणे घरी बनवू शकता. त्यांचा वापर केल्याने त्वचा बऱ्याच काळासाठी ओलसर राहते :

कोरफडीचा फेस मास्क

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे शरीर आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. एलोवेरा फेस मास्क बनविण्यासाठी कोरफडीतून जेल बाहेर काढा. त्यात काकडीचा रस घाला. हा मास्क फेस वॉशनंतर चेहऱ्यावर लावा आणि नंतर थोडया वेळाने चेहरा धुवा. हे केवळ चेहऱ्यावरील कोरडेपणाच दूर करणार नाही तर चेहऱ्यावर चमकही दर्शवेल.

एवोकॅडो फेस मास्क

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते, चेहऱ्यावरही चमक टिकून असते. एवोकॅडोमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे त्वचेस निरोगी बनवतात. कोरडी व खराब झालेली त्वचा काढून टाकून ते त्वचेस कोमल बनवते. एवोकॅडो फेस मास्क तयार करण्यासाठी २ चमचे मॅश केलेल्या एवोकॅडोमध्ये, १ चमचे मध आणि १ चमचे गुलाब पाणी घाला आणि चांगले मिक्स करा. मग ते चेहरा स्वच्छ करून झाल्यावर चेहऱ्यावर लावा.

स्ट्रॉबेरी फेस मास्क

स्ट्रॉबेरीमुळे केवळ त्वचा कोमलच होत नाही तर चमकदारदेखील दिसते. तिच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. तिच्या वापरामुळे त्वचेत गोठलेल्या मृत पेशीही निघून जातात. स्ट्रॉबेरी फेस मास्कसाठी २-३ मोठया स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात १ चमचे मध आणि १ चमचे ओटचे पीठ मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर त्यास चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवडयातून असे दोनदा करा.

पपईचा फेस मास्क

पपई हे आरोग्य आणि सौंदर्य या दोघांसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्यात पोटॅशियम असते, जे त्वचेस हायड्रेटेड आणि सुंदर ठेवते. हे त्वचेमध्ये असलेल्या मृत पेशी आणि डाग साफ करण्यासदेखील मदत करते. पपईचा फेस मास्क बनविण्यासाठी, पिकलेल्या पपईपासून १ कप पेस्ट बनवा. नंतर त्यात १ चमचे मध आणि १ चमचे लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

केळी आणि चंदनाचा फेस मास्क

केळी फेस मास्क कोरडया त्वचेला ओलावा देऊन त्यास चमकदार बनविण्यात मदत करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा संपतो, शिवाय सुरकुत्यांची समस्यादेखील संपते. तसेच त्वचा घट्ट राहण्यासही मदत करते.

केळयाचा फेस मास्क बनविण्यासाठी, १ पिकलेली केळी चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या आणि त्यात १ चमचे मध, १ चमचे ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा चंदन पावडर घाला. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा. तो कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

स्किन अॅलर्जीपासून बाळाचे करावे रक्षण

* पारुल भटनागर

मुलांची स्किन विशेषकरून नुकत्याच जन्मलेल्या बाळाची स्किन खूप नाजूक असते. अशक्त असल्यामुळे ते खूप लवकर अॅलर्जी व इन्फेक्शनच्या संपर्कातही येऊ लागते. त्यासाठी त्यांना विशेष काळजीची आवश्यकता असते.

याविषयी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसचे डॉक्टर सुमित चक्रवर्ती बाळाला अॅलर्जीपासून वाचवण्यासाठी काही विशेष टीप्स सांगत आहेत :

स्किन अॅलर्जी काय आहे

जेव्हा बेबीची स्किन अॅलजर्न अर्थात अॅलर्जी तयार करणाऱ्या तत्वांनी प्रभावित होते किंवा मग शरीर जेव्हा एका अॅलर्जीद्वारे ट्रिगर रासायनिक हिस्टामाइनचे उत्पादन करते तेव्हा स्किन अॅलर्जी होते.

मुलांमध्ये साधारणपणे ही अॅलर्जी डायपरद्वारे, खाण्यातून, साबण व क्रीमने, हवामानात आलेल्या बदलावामुळे व बऱ्याच वेळा कपडयांमुळेही होते. याचा प्रभाव विशेषकरून सेंसिटिव स्किनवर सर्वाधिक पडतो, ज्यास विशेष काळजीची आवश्यकता हवी असते.

कशा-कशा स्किन अॅलर्जी

एक्जिमा : हा नेहमी ३-४ महिन्यांच्या बाळांमध्ये बघायला मिळतो. यात शरीराच्या कुठल्याही अंगावर लाल रंगाचे चट्टे बघायला मिळतात. ज्यामुळे एवढी खाज येते की बाळाला ते सहन करणे अवघड होते.

कारण : हा आजार नेहमी एकतर आनुवंशिकपणे किंवा मग कपडे, साबण, अस्वच्छता व बदलत्या हवामानामुळे होतो. अशा स्थितीत आपणास जेव्हा ही आपल्या बाळाच्या स्किनवर लाल रंगाचे चट्टे बघावयास मिळाले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.

काय करावे : आपल्या मुलाच्या स्किनला रोज माईल्ड सोपने स्वच्छ करा. स्किन जास्त वेळेपर्यंत ओली ठेवू नये नाहीतर तिला अॅलर्जी होण्याचे चान्सेस वाढतात.

डायपर पुरळ : बाळाने साउंड स्लिप घ्यावी यासाठी पेरेंट्स त्याला नेहमी डायपर घालून ठेवतात, परंतु बऱ्याच काळासाठी डायपर परिधान केल्याने बाळाच्या त्वचेवर सूज येते आणि पुरळ उठते.

कारण : दीर्घ काळापर्यंत डायपर चेंज न करणे, जास्त ओला डायपर, आवश्यकतेपेक्षा जास्त टाइट डायपर पुरळ उठण्याचे कारण बनतो.

काय करावे : प्रत्येक दोन-तीन तासांनी डायपर बदलावे आणि चेंज करण्यापूर्वी स्किन व्यवस्थितपणे स्वच्छ करावी. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्यानुसार डायपर पुरळावर क्रिमपण लावावे. जर मुलाला डायपर घालण्यास त्रास होत असेल तर त्याची त्वचा उघडीच ठेवावी.

बग बाइट रॅशेज : बहुतेकदा उन्हाळयात डास किंवा बैड बग्जमुळे मुलांच्या त्वचेवर चट्टे आणि त्यांना खाजल्यामुळे त्यांच्या त्वचेलाही खाज येते, ज्यामुळे मुले शांत झोपत नाहीत.

कारण : बऱ्याचवेळा अस्वच्छतेमुळे घरात किडे होतात, यांपासून वाचण्यासाठी आपले घर रोज व्यवस्थित स्वच्छ करावे.

काय करावे : त्वरित डॉक्टरांना दाखवावे, जेणेकरुन अँटीबायोटिक मलममुळे चट्टे आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. मुलाला अधिक घट्ट कपडे घालण्याचे टाळावे.

हिट रॅशेज : उन्हाळयात मुलांच्या त्वचेवर विशेषत: त्यांच्या चेहऱ्यावर, मान, अंडरआर्म आणि मांडीच्या जवळ गर्मीमुळे रॅशेज येतात, ज्यांत खाज सुटल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो.

कारण : शरीरावर घाम साचणे व कपडे घालणे हिट रैशेजचे कारण बनते.

काय करावे : मुलाला थंड जागेवर ठेवावे. त्याला घट्ट कपडे परिधान करू नयेत.

गजकर्ण : हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे, जो सामान्यत: टाळू व पायांवर परिणाम करतो आणि स्पर्श केल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.

कारण : हे घाणेरडे टॉवेल्स, कपडे, खेळणी व घाम एका जागी साचल्याकारणाने होते.

काय करावे : जेव्हाही मुलाला त्रास होत असेल तेव्हा त्याला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अँटीफंगल क्रीम लावावे आणि या गोष्टीची विशेष काळजी घ्या की क्रीम लावण्यापूर्वी प्रभावित जागेला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या.

डोक्यावर पापुद्रा जमणे : जन्माच्या वेळेस बाळाच्या डोक्यावर पापुद्रा असतो. जी साधारण गोष्ट आहे. परंतु बऱ्याच वेळा कालांतरानेसुद्धा मुलांमध्ये अशीच समस्या बघावयास मिळते, जी खूप त्रासदायक असते.

कारण : शरीराच्या तेलाच्या ग्रंथींमध्ये जास्त तेल तयार झाल्यामुळे ही समस्या बाळाला होते.

काय करावे : स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

त्वचेची निगा राखण्यासाठी टीप्स

या गोष्टींची काळजी घेत नवजात बालकांना त्वचेच्या संसर्गापासून वाचवता येते.

* बाळाला अंघोळीनंतर बेबी क्रीम लावायला विसरू, कारण यामुळे स्किन कोरडी होत नाही.

* नवजात बालकासाठी साबण आणि शम्पू डॉक्टरांच्या सल्यानुसारच खरेदी करा.

* जर कुटुंबातील कोणा सदस्याला स्किन अॅलर्जी असेल तर त्यापासून बाळाला दूरच ठेवावे.

* अस्वच्छ हातांनी बाळाच्या त्वचेला स्पर्श करू नये.

* फक्त मऊ फॅब्रिकचे कपडेच घालावेत.

* खाण्या-पिण्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

* बेबीला कव्हर करून ठेवावे, जेणेकरून किटक चावण्याची भीती राहणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें